मराठी व्याकरण
222K subscribers
8.5K photos
36 videos
336 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
*नारायण सुर्वे*

*मराठी भाषेतील कवी*

*स्मृतिदिन - १६ ऑगस्ट २०१०*

नारायण गंगाराम सुर्वे (ऑक्टोबर १५, इ.स. १९२६ - ऑगस्ट १६, इ.स. २०१०) हे मराठी भाषेतील कवी होते. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी यांना इ.स. १९९८चा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.

नारायण सुर्वे यांच्या पत्नी कृष्णाबाई सुर्वे यांनी नारायण सुर्व्यांच्या आठवणी ’मास्तरांची सावली’ या आत्मकथनात्मक पुस्तकात लिहिल्या आहेत.

जीवन

नारायण गंगाराम सुर्वे अनाथ मूल म्हणून वाढले. जन्म झाल्यावर जन्मदात्रीने त्यावेळी नवजात अर्भक असलेल्या नारायणास सोडून दिले. मुंबईच्या इंडिया वुलन मिलमध्ये कामगार म्हणून नोकरी करणारा गंगाराम कुशाजी सुर्वे व त्याची कामगार पत्‍नी काशीबाई यांनी अनाथ असलेल्या नारायणास मात्यापित्यांचे छत्र दिले . गंगाराम सुर्वे इंडिया वुलन मिलच्या स्पिनिंग खात्यात साचेवाल्याचे काम करत असे, तर काशीबाई त्याच गिरणीच्या बाइंडिंग खात्यात कामगार म्हणून नोकरी करत.

गुजराण करण्यासाठी नारायण छोटेमोठे व्यवसाय करत असे. या काळात स्वतःच्या हिंमतीने तो लिहिण्या-वाचण्यास शिकला.

नारायण सुर्वे हे परभणी येथे इ.स. १९९५मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार (इ.स. २००४)
मध्यप्रदेश सरकारचा कबीर पुरस्कार
पद्मश्री पुरस्कार (इ.स. १९९८)

दोन दिवस


दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले।

नारायण सुर्वे
🔴समास व त्याचे प्रकार

🔸काटकसर करणे हा मनुष्याच्या अंगी असलेला एकूण गुण आहे.
 
🔹आपण दैनंदिन जीवनात बरीच काटकसर करतो. त्यामुळे आपण बोलतांना सुद्धा हा गुण वापरतो.
 
🔸बर्‍याचदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो.
 
🔶जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो. यालाच समास असे म्हणतात.
 
🔷अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात.

🅾उदा.

🔹वडापाव - वडाघालून तयार केलेला पाव.
 
🔹पोळपाट - पोळी करण्यासाठी लागणारे पाट
 
🔹कांदेपोहे - कांदे घालून तयार केलेले पोहे.
 
🔹पंचवटी  - पाच वडांचा समूह

🔴समासाचे मुख्य चार प्रकार पडतात.

अव्ययीभाव समास
तत्पुरुष समास
व्दंव्द समास
बहुव्रीही समास

📚MPSC💺UPSC-Katta📚

🔶अव्ययीभाव समास :

🔹ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारख केला जातो त्यास अव्ययीभवन समास असे म्हणतात.
 
🔸अव्ययीभाव समासात आपल्याला खलील भाषेतील उदाहरणे पाहावयास मिळतात.

🔴मराठी भाषेतील शब्द -

🅾उदा.    

गोवोगाव - प्रत्येक गावात
गल्लोगल्ली -  प्रत्येक गल्लीत
दारोदारी -  प्रत्येक दारी
घरोघरी -  प्रत्येक घरी

🔴संस्कृत भाषेतील शब्द -

🅾उदा.  

🔹प्रती (प्रत्येक) - प्रतिमास, प्रतिक्षण, प्रतिदिन

🔹आ (पर्यत) - आमरण

🔹आ (पासून) - आजन्म, आजीवन
 
🔹यथा (प्रमाण) - यथाविधी, यथामती, यथाशक्ती.

 🔴अरबी व फारसी भाषेतील शब्द -

🅾उदा.    

🔹दर (प्रत्येक) - दारसाल, दरडोई, दरमजल.
 
🔹गैर (प्रत्येक) - गैरसमज, गैरहजर, गैरशिस्त
 
🔹हर (प्रत्येक) - हररोज, हरहमेशा
 
🔹बे (विरुद्ध) - बेकायदा, बेमालूम, बेलाशक, बेलाईक

क्रमशः ........
🔹समास व त्याचे प्रकार

🅾तत्पुरुष समास :

🔸ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेल्या शब्द, विभक्तीप्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुषसमास असे म्हणतात.
 
🔸थोडक्यात ज्या समासात दूसरा शब्द प्रधान / महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.

🌑उदा.    

महामानव - महान असलेला मानव
 
राजपुत्र - राजाचा पुत्र
 
तोंडपाठ - तोंडाने पाठ
 
गायरान - गाईसाठी रान
 
वनभोजन - वनातील भोजन

🔸वरील उदाहरणांमध्ये पहिल्या पदापेक्षा दुसरे पद प्रधान आहे आणि या शब्दांना ला, चा, ने हे विभक्ती प्रत्यय वापरावे लागतात म्हणून त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.
 
🔸तत्पुरुष समासाचे 7 उपप्रकर पडतात.

🅾i) विभक्ती तत्पुरुष -

🔸ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणार्याग शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पद जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात.
 
🔸वरील उदाहरणांत वेगवेगळ्या सामासिक शब्दांचा विग्रह केला असता त्याला वेगवेगळ्या विभक्त्या लागलेल्या दिसतात.
 
🅾विभक्ती तत्पुरुष समासाची काही उदाहरणे :

🌑उदा

गुनहीन - गुणाने हीन - तृतीया तत्पुरुष
 
विधाभ्यास - विधेचा भास - षष्ठी तत्पुरुष
 
कर्मकुशल - कर्मात कुशल - सप्तमी तत्पुरुष

🅾ii) अलुक तत्पुरुष -

🔸ज्या विभक्ती तत्पुरुष अमासात पहिला पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास म्हणतात.
 
🔸अलुक म्हणजे लोप न पावणारा म्हणजे ज्या विभक्ती तत्पुरुष सामासिक शब्दांच्या पहिल्या पदाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात.

🌑उदा.    

तोंडी लावणे
 
पाठी घालणे
 
अग्रेसर

🅾iii) उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष -
ज्या तत्पुरुष समासात दुसरे पद महत्वाचे असून व ते दुसरे पद हे धातुसाधीत/ कृदंत म्हणून त्या शब्दांत येते तसेच त्याचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही अशा समासास उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष असे म्हणतात.

🅾उदा.    

ग्रंथकार - ग्रंथ करणारा
 
शेतकरी - शेती करणारा
 
लाचखाऊ - लाच खाणारा
 
सुखद - सुख देणारा
 
जलद - जल देणारा वरील

🔸उदाहरणांमध्ये पहिल्या पदात ग्रंथ, शेत, लाच, सुख, जल हे सर्व धातू आहेत.
 
🔸नंतर दुसर्‍या पदात त्यांचे रूपांतर धातुसाधीतांमध्ये झाले आहे म्हणून ते उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत.
 
🔸इतर उदाहरणे : लाकूडतोडया, आगलाव्या, गृहस्थ, कामकरी, कुंभकर्ण, मार्गस्थ, वाटसरु.

🅾iv. नत्र तत्पुरुष समास -

🔸ज्या तत्पुरुष सामासातील प्रथम पद हे नकारार्थी असते त्यास नत्र तत्पुरुष  असे म्हणतात.
 
🔸म्हणजेच ज्या समासातील पहिले पद हे अभाव किंवा निषेध दर्शवतात त्यांना  नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात.
 
उदा. (अ, अन्, न, ना, बे, नि, गैर इ.)

🌑उदा.    

अयोग्य - योग्य नसलेला
 
अज्ञान - ज्ञान नसलेला
 
अहिंसा - हिंसा नसलेला
 
निरोगी - रोग नसलेला

क्रमशः .........
👍1
From Marathi Mhani app:

कुडी तशी पुडी.

Meaning:
देहाप्रमाणे आहार.
From Marathi Mhani app:

कुणाची म्हैस, कुणाला ऊठबैस.

Meaning:
काम एकाचे आणि त्रास दुसऱ्याला.
From Marathi Mhani app:

कुत्र्याचे शेपूट, नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच.

Meaning:
मूर्खाच्या मनावर उपदेशाचा परिणाम होत नाही.
From Marathi Mhani app:

कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ.

Meaning:
आपल्याच हातून आपल्या जातभाईंचे नुकसान होणे.
From Marathi Mhani app:

कुसंतनापेक्षा निसंतान बरे.

Meaning:
वाईट पुत्र होण्यापेक्षा पुत्र न झालेले बरे.
From Marathi Mhani app:

केर डोळ्यात, फुंकर कानात.

Meaning:
भलत्याच जागी भलताच उपाय.
From Marathi Mhani app:

केळी खाता हरकले, हिशेब देता टरकले.

Meaning:
पैसे असेपर्यंत काही वाटले नाही, पैसे संपताच मात्र दुःख वाटले.
From Marathi Mhani app:

केळीवर नारळी अन् घर चंद्रमोळी.

Meaning:
अत्यंत गरीब परिस्थिती असणे.
From Marathi Mhani app:

केळ्याचा लोंगर, दे‌ई पैशाचा डोंगर.

Meaning:
केळीचे पीक भरपूर पैसे देते.
From Marathi Mhani app:

कोंड्याचा मांडा करुन खाणे.

Meaning:
आपल्याला जे मिळेल त्यात समाधान मानणे.
From Marathi Mhani app:

कोरड्याबरोबर ओले जळते.

Meaning:
ज्याची काही चूक नाही असा माणूस चूक करणाऱ्याबरोबर निष्कारण गुन्हेगार म्हणून धरला जातो.
From Marathi Mhani app:

कोरड्याबरोबर ओले जळते.

Meaning:
ज्याची काही चूक नाही असा माणूस चूक करणाऱ्याबरोबर निष्कारण गुन्हेगार म्हणून धरला जातो.
From Marathi Mhani app:

कोल्हा काकडीला राजी.

Meaning:
लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात / जे मिळेल ते पदरात पाडून घेणे.
From Marathi Mhani app:

कोळसा कितीही उगाळला तरी काळाच.

Meaning:
वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच असते.
★|| eMPSCkatta ||★

जॉईन करा www.empsckatta.blogspot.in या ब्लॉग चे अधिकृत टेलिग्राम चॅनेल.

जॉईन करण्यासाठी @empsckatta यथे क्लिक करा , चॅनेल ओपन होईल , त्यानंतर चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN या ऑप्शन वर क्लिक करा.

किंवा

Telegram.me/eMPSCkatta येथे क्लिक करा , चॅनेल ओपन होईल , त्यानंतर चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा.
________________________________________
आपल्या मित्रांनाही जॉईन करा.
🔹विरूध्द अर्थी शब्द


👉 अतिरेकीविवेकी
👉 रसिकअरसिक
👉 अतिवृष्टीअनावृष्टी
👉 उदयअस्त
👉 अनुकूलप्रतिकूल
👉 ककृशमंजुळ
👉 अधोगतीप्रगती
👉 गोडकडू
👉 अबोलबोलका
👉 अवनतीउन्नती
👉 अमृतविष
👉 नीतीअनीती
👉 आरंभशेवट
👉 अंहकारविनंम्रता
👉 आशानिराशा
👉 गर्विष्ठविनंम्र
👉 आळशीकामसू
👉 शूरभिञा
👉 आस्तिकनास्तिक
👉 आरामकष्ट
👉 इष्टअनिष्ट
👉 अब्रूबेअब्रू
👉 उंचबुटका
👉 आगमननिगृमन
👉 अवाॅचीनप्राचीन
👉 निरभ्रआभ्राच्छादित
👉 एकमतदुमत
👉 आयातनियात
👉 उलटसुलट
👉 आदरअनादर
👉 उपद्रवीनिरूपद्रवी
👉 आघाडीपिछाडी
👉 गुणअवगुण/दोष
👉 अपराधीनिरपराधी
👉 साकारनिराकार
👉 अशक्तसशक्त
👉 शकुनअपशकुन
👉 सुकाळदुष्काळ
👉 अपमानसन्मान
👉 सावधबेसावध
👉 साम्यवादभांडवलशाही
👉 अमावास्यापोर्णीमा
👉 हषृखेद
👉 अवघडसोपे
👉 विकासर् हास
👉 प्रकाशकाळोख
👉 विधवासधवा
👉 कंजुसउदार
👉 गध्यपध्य
👉 मंदचपळ
👉 सुरअसुर
👉 निःशस्ञसशस्ञ
👉 विघटनसंघटन
👉 स्वामीसेवक
👉 तेजीमंदी
👉 पापपुण्य
👉 खोलउथळ
👉 नागरीग्रामीण
👉 देवदानव
👉 कमालकिमान
👉 उचितअनुचित
👉 सुसंवादविसंवाद
👉 तप्तशीतल
👉 खंडनमंडन
👉 स्वातंञ्यपारतंञ्य
👉 ज्ञानअज्ञान
👉 पचनअपचन
👉 सासरमाहेर
👉 जहालमवाळ
👉 वियोगसंयोग
👉 संवादविवाद
👉 श्वासनिःश्वास
👉 सुसह्यअसह्य
👉 सुरसनिरस
👉 सबलदुबृल
👉 निंदास्तुती
👉 रणशूररणभीरू
👉 वंध्यनिंध्य
👉 आंतरजातीयसजातीय
👉 वरवधू
👉 स्थूलकृश
👉 सुरूपकुरूप
👉 ज्ञातअज्ञात
___________________________________
Join us @marathi
समास व त्याचे प्रकार

💠v) कर्मधारय तत्पुरुष समास :

ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात व त्या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य या प्रकारचा असतो त्यालाच कर्मधारेय तत्पुरुष समास म्हणतात.

🌅उदा.    

🌓नील कमल - नील असे कमल
 
🌓रक्तचंदन - रक्तासारखे चंदन
 
🌓पुरुषोत्तम - उत्तम असा पुरुष
 
🌓महादेव - महान असा देव

💠कर्मधारण्य समासाचे पुढील 7 उपप्रकर पडतात.

💠अ) विशेषण पूर्वपद कर्मधारय -

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील पहिले पद विशेषण असते अशा समासला विशेषण पूर्वपद कर्मधारय असे म्हणतात.

🌅उदा.

🌓महादेव - महान असा देव
 
🌓लघुपट - लहान असा पट
 
🌓रक्तचंदन - रक्तासारखे चंदन

💠आ) विशेषण उत्तरपद कर्मधारय -

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांतील दुसरे पद विशेषण असते अशा समासाला विशेषण उत्तरपद कर्मधारय असे म्हणतात.

🌅उदा.

🌓पुरुषोत्तम - उत्तम असा पुरुष
 
🌓मुखकमल - मुख हेच कमल
 
🌓वेशांतर - अन्य असा वेश
 
🌓भाषांतर - अन्य अशी भाषा

💠इ) विशेषण उभयपद कर्मधारय -

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील दोन्ही पदे विशेषण असतात तेव्हा अशा समासला विशेषण उभयपद कर्मधारय असे म्हणतात.

🌅उदा.  

🌓लालभडक - लाल भडक असा
 
🌓श्यामसुंदर - श्याम सुंदर असा
 
🌓काळाभोर - काळा भोर असा

💠ई) उपमान पूर्वपद कर्मधाराय -

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत पहिले पद उपमान असते म्हणजे त्या सामासिक शब्दांतील पूर्वपदापेक्षा उत्तरपदाला जास्त महत्व दिलेले असते व त्या शब्दांत पूर्वपद हे उत्तरपदाचे विशेषणासारखे काम करते त्याला उपमान पूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात.

🌅उदा.    

🌓वज्रदेह - वज्रासारखे देह
 
🌓चंद्रमुख - चंद्रासारखे मुख
 
🌓राधेश्याम - राधेसारखा शाम
 
🌓कमलनयन - कमळासारखे नयन

💠उ) उपमान उत्तरपद कर्मधारय -

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत दुसरे पद उपमानअसते म्हणजे त्या सामासिक शब्दांतील उत्तरपदपेक्षा पूर्वपदाला जास्त महत्व दिलेले असते व त्या शब्दांत उत्तरपद हे पूर्वपदाचे विशेषणासारखे काम करते त्याला उपमान उत्तरपद कर्मधारय समास असे म्हणतात.

🌅उदा.  

🌓मुखचंद्र - चंद्रासारखे मुख
 
🌓नरसिंह - सिंहासारखा नर
 
🌓चरणकमल - कमलासारखे चरण
 
🌓हृदयसागर - सागरासारखे चरण

💠ऊ) अव्यय पूर्वपद कर्मधारय -

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत पहिले पद अव्यय असेन त्याचा उपयोग विशेषणासारखा केला जातो अशा समासाला अव्यय पूर्ववाद कर्मधारय असे म्हणतात.

🌅उदा.   

🌓सुयोग - सु (चांगला) असा योग
 
🌓सुपुत्र - सु (चांगला) असा पुत्र
 
🌓सुगंध - सु (चांगला) असा गंध

💠ए) रूपक कर्मधारय -

जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांतील दोन्ही पदे एकरूप असतात. तेव्हा अशा समसाला रूपक कर्मधारय समास असे म्हणतात.  

🌅उदा.    

🌓विद्याधन - विद्या हेच धन
 
🌓यशोधन - यश हेच धन
 
🌓तपोबल - ताप हेच बल
 
🌓काव्यांमृत - काव्य हेच अमृत
 
क्रमशः ..........
2👏1
मराठी व्याकरण

🔹लिंगविचार

🏀 *आकारान्त पुल्लिंगी* *प्राणिवाचक नामाचे स्त्रीलिंगी रुप*
*ईकारान्त* होते व त्याचे नपुसकलिंग
रुप एकारांत होते
उदा....
मुलगा -- मुलगी - मुलगे

पोरगा -- पोरगी - पोरगे

🏀 *काही प्राणिवाचक पुल्लिंगी शब्दास *ईण* प्रत्यय लागून त्यांची
स्त्रीलिंगी रुपे होतात.
उदा...
कुंभार -- कुंभारीण
सुतार -- सुतारीण
पाटील -- पाटलीण
वाघ -- वाघीण
माळी -- माळीण

🏀 *काही प्राणिवाचक अकारान्त पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रुपे ईकारान्त होतात*.

उदा...
दास - दासी

वानर -- वानरी

तरुण - तरुणी

🏀 *काही आकारान्त पुल्लिंगी पदार्थ*
*वाचक नामांना *ई* प्रत्यय लागून
त्यांची लघुत्वदर्शक स्त्रीलिंगी रुपे बनतात.उदा...

लोटा - लोटी

गाडा - गाडी

दांडा -दांडी

🏀 *संस्कृत मधून मराठीत आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रुपे *ई* प्रत्यय
लागून होतात.

उदा....

श्रीमान -- श्रीमती

युवा - युवती

भगवान - भगवती

🏀वरील बाबींचा सराव पाठातील
जितके जास्त शब्द घेवून करता येईल
तितके करावे.

🏀वर्तमानपत्र , उतारा यांचा वापर
करता येईल .