मराठी व्याकरण
222K subscribers
8.5K photos
36 videos
336 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
From Marathi Mhani app:

काम नाही कवडीचं अन् रिकामपण नाही घडीचं.

Meaning:
काहीही काम न करणारा माणूस नुसत्या सबबी सांगतो.
1
From Marathi Mhani app:

कामापुरता मामा अन् ताकापुरती आजी.

Meaning:
काम साधण्यापुरते गोड बोलणे.
From Marathi Mhani app:

काळ आला होता पण वेळ आली नव्हती.

Meaning:
नाश होण्याची वेळ आली होती पण थोडक्यात निभावले.
From Marathi Mhani app:

काळी बेंद्री एकाची, सुंदर बायको लोकाची.

Meaning:
सुंदर स्त्रीकडे वाईट नजर असणे.
1
From Marathi Mhani app:

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.

Meaning:
क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही.
From Marathi Mhani app:

कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते.

Meaning:
पूर्वग्रहदूषिच व्यक्तीला सर्वत्र दोषच दिसतात.
1
From Marathi Mhani app:

काशी केली, गंगा केली, नशिबाची कटकट नाही गेली.

Meaning:
सर्व प्रयत्न केले पण गुण आला नाही.
From Marathi Mhani app:

कुंपणच शेत खातय तर जाब विचारायचा कुणाला?

Meaning:
ज्याला रक्षण करायला ठेवले अशाच माणसाने विश्वासघात करुन चोरी केल्यावर कोणालाच सांगता येत नाही.
From Marathi Mhani app:

कुंभाराची सून कधीतरी उकिरड्यावर येईलच.

Meaning:
दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो.
1👍1
From Marathi Mhani app:

कुचेष्टेवाचून प्रतिष्ठा नाही.

Meaning:
दुसऱ्याची टवाळकी केल्यावाचून आपला मोठेपणा वाढत नाही, ही मूर्ख लोकांची वृत्ती.
From Marathi Mhani app:

कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शाम भटाची तट्टानी.

Meaning:
अतिशय थोर माणूस व अति क्षुद्र माणूस यांची बरोबरी होत नाही.
👍2
From Marathi Mhani app:

कुठेही जा, पळसाला पाने तीनच.

Meaning:
कुठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच.
From Marathi Mhani app:

कुडास कान ठेवी ध्यान.

Meaning:
भिंतीच्या आडून कोणी ऐकण्याची शक्यता.
म्हणी:
1. पी हळद हो गोरी – उतावळेपणा दाखविणे
2. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही
3. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर – दोनपैकी एक पर्याय निवडणे
4. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच
5. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे
6. उंटावरचा शहाणा – मूर्ख सल्ला देणारा
7. अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते
8. नाचता येईना अंगण वाकडे – स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो
9. तोंड दाबून बुक्क्यांचा मार – विनाकारण जुलूम सहन करावा लागणे
10. नावडतीचे मीठ अळणी – नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही
11. अंथरूण पाहून पाय पसरावे – ऎपत पाहून खर्च करवा
12. छत्तीसाचा आकडा – विरुद्ध मत असणे
13. तेरड्याचा रंग तीन दिवस – एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे
14. दुष्काळात तेरावा महिना – संकटात अधिक भर
15. नव्याचे नऊ दिवस – नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही
16. एका हाताने टाळी वाजत नाही – दोष दोन्हीकडे असतो
17. पालथ्या घड्यावर पाणी – सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे
18. वासरात लंगडी गाय शहाणी – अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो
19. रात्र थोडी सोंगे फार – काम भरपूर, वेळ कमी
22. अति शहाणा त्याचा बैल रिकामा – अति शहाणपणाने नुकसान होते
21. शेरास सव्वाशेर – प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ
22. नाकाचा बाल – अत्यंत प्रिय व्यक्ती
23. नाकापेक्षा मोती जड होणे – डोईजड होणे
24. आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना – दोन्ही बाजूंनी अडचण
25. कामापुरता मामा – काम साधण्यापुरते गोड बोलणे
26. आधी पोटोबा मग विठोबा – अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे
27. काखेत कळसा गावाला वळसा – वस्तू स्वत:पाशी असून शोधत राहणे
28. झाकली मूठ सव्वा लाखाची – दुर्गुण असले तरी प्रकट करू नये.
1👍1
महत्वपूर्ण यादी....खास आपल्या ग्रुपसाठी

टोपणनावाने लिहिणारे मराठी साहित्यिक, गद्यलेखक, कवी
जुन्या अन् नव्या कालखंडातील काही नामवंत... 4G पर्यंतची मराठी वाङमयीन झेप...
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

📓अकिंचन
वासू. ग. मेहेंदळे

📔अनंततनय
दत्तात्रेय अनंत आपटे

📔अनंतफंदी
अनंत भवानीबावा घोलप

📙अनंतसुत विठ्ठल, कावडीबाबा
विठ्ठल अनंत पिंपळगावकर

📔अनिल
आत्माराम रावजी देशपांडे

📔अनिल भारती
शान्ताराम पाटील

📒अशोक (कवी)
नारायण रामचंद्र मोरे

📘अज्ञातवासी
दिनकर गंगाधर केळकर

📔आधुनिक नीळकंठ
बळवंत ऊर्फ बापूसाहेब भवाळकर

📘आनंद
विनायक लक्ष्मण बरवे

📘आनंदतनय
गोपाळ आनंदराव देशपांडे

📓इंदिरा
इंदिरा संत

📓इंदुकांत
दिनकर नानाजी शिंदे

📕उदासी/हरिहरमहाराज
नीलकंठ रामकृष्ण पाळंदे

📙उद्धवचिद्धन/उद्धवचैतन्य/उधोबाबा/
उद्धव xxxx कोकिळ

📗एकनाथ, एकाजनार्दन
एकनाथ सूर्यनारायण पैठणकर

📒कलापी, बालकवी
त्र्यंबक बापूजी ठोंबरे

📓कवीश्वरबास
भानूभट/भास्करभट्ट xxxx बोरीकर

📙कावडीबाबा/अनंतसुत विठ्ठल
विठ्ठल अनंत पिंपळगावकर

📙कांत
वा.रा. कांत

📓काव्यशेखर
भास्कर काशीनाथ चांदूरकर

📓किरात/भ्रमर
कृष्णाजी लक्ष्मण सोमण

📙कुंजविहारी
हरिहर गुरुनाथ सलगरकर

📗कुमुदबांधव
स.अ. शुक्ल

📓कुसुमाग्रज
विष्णू वामन शिरवाडकर

📙कृष्णकेशव
अनुपलब्ध

📓कृष्णाग्रज
अनुपलब्ध

📘केशवकुमार
प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे

📒केशवसुत
कृष्णाजी केशव दामले

📘केशवसुत
नारायण केशव बेहेरे

📕के.स.रि.
केशव सदाशिव रिसबूड

📙कोणीतरी
नरहर शंकर रहाळकर

📓गिरीश
शंकर केशव कानेटकर

📙गोपिकातनया
कु.द्वारका हिवरगावकर(सौ.मनोरमा श्रीधर रानडे)

📓गोपीनाथ
गोपीनाथ तळवलकर

📒गोमा गणेश
गणेश कृष्ण फाटक

📙गोविंद
गोविंद दत्तात्रय दरेकर

📘गोविंदपौत्र
श्रीधर व्यंकटेश केतकर

📓गोविंदप्रभु
गुंडम अनंतनायक राऊळ

📙गोविंदाग्रज
राम गणेश गडकरी

📓ग्रेस
माणिक सीताराम गोडघाटे

📒चक्रधर
श्रीचांगदेव राऊळ

📓चंद्रशेखर
चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे

📕चेतोहर
परशुराम नारायण पाटणकर

📗जगन्नाथ
जगन्नाथ धोंडू भांगले

📘जगन्मित्र
रेव्हरंड नारायण वामन टिळक

📗जननीजनकज
पु.पां गोखले

📓टेंबे स्वामी/वासुदेवानंद सरस्वती
वासुदेव गणेश टेंबे

📗ढोलीबुवा/महीपतिनाथ
सखाराम केरसुण

📙दत्त
दत्तात्रय कोंडो घाटे

📓दया पवार
दगडू पवार

📕दा.ग.पा.
दामोदर गणेश पाध्ये

📔दासोपंत/ दिगंबरानुचर
दासो दिगंबर देशपांडे

📕दित्जू/माधव जूलियन
माधव त्र्यंबक पटवर्धन

📘नारायणसुत
श्रीपाद नारायण मुजुमदार

📒निरंजन
वसंत सदाशिव बल्लाळ

📓निशिगंध
रा.श्री. जोग

📓निळोबा
निळा मुकुंद पिंपळनेरकर

📙नीरजा
नीरजा साठे

📓नृसिंहसरस्वती
नरहरी माधव काळे

📘पठ्ठे बापूराव
श्रीधर कृष्ण कुलकर्णी (रेठरेकर)

📓पद्मविहारी
रघुनाथ गणेश जोशी

📔पद्मा
पद्मा गोळे

📓पी.सावळाराम
निवृत्तिनाथ रावजी पाटील

📓पुरु.शिव. रेगे
पु.शि. रेगे

📘पूर्णदास
बाबा उपसकर-राजाध्यक्ष

📒प्रभाकर शाहीर
प्रभाकर जनार्दम दातार

📙बहिणाबाई
बहिणाबाई नथूजी चौधरी

📕(संत) बहिणाबाई
कु.बहिणा आऊदेव कुळकर्णी (सौ.बहिणा रत्नाकर पाठक)

📓बाबा आमटे
मुरलीधर देवीदास आमटे

📕बाबुलनाथ
विनायक श्यामराव काळे

📓बालकवी/कलापि
त्र्यंबक बापूजी ठोंबरे

📗बाळा
बाळा कारंजकर

📒बी; B
बाळकृष्ण अनंत भिडे

📙बी; BEE
नारायण मुरलीधर गुप्ते

📗बी रघुनाथ/फुलारी
भगवान रघुनाथ कुळकर्णी

📙बोधलेबुवा
माणकोजी भानजी जगताप

📓भगवानकवि
भवान रत्नाकर कर्‍हाडकर

📗भानजी
भास्कर त्रिंबक देशपांडे

📕भानुदास/मामळूभट
भानुदास पैठणकर(एकनाथांचे पणजोबा)

📓भावगुप्तपद्म
पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी

📗भावशर्मा
के.(केशव) नारायण काळे

📕भालेंदु
भालचंद्र/गुलाबराव सीताराम सुकथनकर

📒भ्रमर/किरात
कृष्णाजी लक्ष्मण सोमण

📓मंदार
एकनाथ पांडुरंग रेंदाळकर

📕मध्वमुनीश्वर
त्रिंबक नारायणाचार्य ( आडनाव अनुपलब्ध)

📒मनमोहन
गोपाळ नरहर उर्फ मनमोहन नातू

📙मनोहरबंधू
भास्कर कृष्ण उजगरे

📓महिपती
महिपती दादोपंत कांबळे-ताहराबादकर

📘महीपतिनाथ/ढोलीबुवा
सखाराम केरसुणे

📙माणिक/माणिकप्रभू
माणिक मनोहर नाईक,

📗माधव
माधव केशव काटदरे

📒माधव जूलियन,
माधव त्र्यंबक पटवर्धन

📕माधव मिलिंद
कॅ. मा.कृ. शिंदे

📗माधवसुत
दामोदर माधव कुळकर्णी

📗माधवानुज
काशीनाथ हरी मोडक

📕मीरा
मीरा तारळेकर

📓मुकुंदराय
मुकुंद गणेश मिरजकर

📓मुक्ताबाई/मुक्ताई
मुक्ता विठ्ठलपंत कुळकर्णी

📔मुक्तिबोध
शरच्चंद्र माधब मुक्तिबोध

📓मुक्तेश्वर
मुक्तेश्वर चिंतामणी मुद्गल

📓मोरोपंत
मोरेश्वर रामचंद्र पराडकर

📓यशवंत
यशवंत दिनकर पेंढरकर

📓यशोधरा
यशोधरा साठे

📒योगेश
भालजी पेंढारकर

📗रंगनाथ स्वामी (निगडीकर)
रंगनाथ बोपाजी घोडके

📓रघुनाथ पंडित
रघुनाथ पंडित चंदावरकर

📙रमेश बाळ
बाळ सीताराम मर्ढेकर

📓राजहंस
यादव शंकर वावीकर
👍1🙏1
📙राधारमण
कृष्णाजी पांडुरंग लिमये

📒रामजोशी/कविराय
राम जनार्दन जोशी

📓वसंत
वासुदेव बळवंत पटवर्धन

📓वसंतविहार
शंकर दत्तात्रय जोशी

📗वा.दा.ओ.
वामन दाजी ओक

📕वामन पंडित
वामन तानाजी शेषे

📒विठाबाई
विठा रामप्पा नायक

📓विठा रेणुकानंदन
विठ्ठल मनोहर बडवे-कुलकर्णी

📒विठ्ठल केरीकर
विठ्ठल नरसिंह साखळकर

📘विठ्ठलदास
विठ्ठल अनंत क्षीरसागर्/बीडकर

📗विंदा करंदीकर
गोविंद विनायक करंदीकर

📙विष्णुदास
कृष्णराव रावजी धांदरफळे

📔विसोबा खेचर
विसोबा चाटे

📓विहंगम
बाळकृष्ण लक्ष्मण अंतरकर

📙शारदाश्रमवासी
पुरुषोत्तम गोपाळ काणेकर

📘श्रीकृष्ण
श्रीकृष्ण नीळकंठ चापेकर

📕श्रीधर
श्रीधर ब्रह्मानंद नाझलेकर

📔संजीव
कृष्ण गंगाधर दीक्षित

📗संजीवनी
संजीवनी मराठे

📓सरस्वतीकंठाभरण
दिनकर नानाजी शिंदे

📙साधुदास
गोपाळ गोविंद मुजुमदार/पाटणकर

📕साने गुरुजी
पांडुरंग सदाशिव साने

📔सांवतामाळी
सांवता परसूबा माळी

📔सुधांशु
हणमंत नरहर जोशी

📒सुहृद्चंपा
पुरुषोत्तम शिवराम रेगे

📔सौमित्र
किशोर कदम

📓विश्वसुत
एकनाथ विश्वनाथ पवार

📔स्वरूपानंद
रामचंद्र विष्णू गोडबोले

📙हरिबुवा
हरिबुवा शिंपी (हरीबोवा केरेश्वर भोंडवे)

📙होनाजी
होनाजी सयाजी शेलारखाने

📓📓 📖📙📰🗞📝🔍🔏📚📖💳
सर्वत्र शेअर करा..आपल्या नव्या पिढिना माहित असू द्या.
1👌1
*नारायण सुर्वे*

*मराठी भाषेतील कवी*

*स्मृतिदिन - १६ ऑगस्ट २०१०*

नारायण गंगाराम सुर्वे (ऑक्टोबर १५, इ.स. १९२६ - ऑगस्ट १६, इ.स. २०१०) हे मराठी भाषेतील कवी होते. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी यांना इ.स. १९९८चा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.

नारायण सुर्वे यांच्या पत्नी कृष्णाबाई सुर्वे यांनी नारायण सुर्व्यांच्या आठवणी ’मास्तरांची सावली’ या आत्मकथनात्मक पुस्तकात लिहिल्या आहेत.

जीवन

नारायण गंगाराम सुर्वे अनाथ मूल म्हणून वाढले. जन्म झाल्यावर जन्मदात्रीने त्यावेळी नवजात अर्भक असलेल्या नारायणास सोडून दिले. मुंबईच्या इंडिया वुलन मिलमध्ये कामगार म्हणून नोकरी करणारा गंगाराम कुशाजी सुर्वे व त्याची कामगार पत्‍नी काशीबाई यांनी अनाथ असलेल्या नारायणास मात्यापित्यांचे छत्र दिले . गंगाराम सुर्वे इंडिया वुलन मिलच्या स्पिनिंग खात्यात साचेवाल्याचे काम करत असे, तर काशीबाई त्याच गिरणीच्या बाइंडिंग खात्यात कामगार म्हणून नोकरी करत.

गुजराण करण्यासाठी नारायण छोटेमोठे व्यवसाय करत असे. या काळात स्वतःच्या हिंमतीने तो लिहिण्या-वाचण्यास शिकला.

नारायण सुर्वे हे परभणी येथे इ.स. १९९५मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार (इ.स. २००४)
मध्यप्रदेश सरकारचा कबीर पुरस्कार
पद्मश्री पुरस्कार (इ.स. १९९८)

दोन दिवस


दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले।

नारायण सुर्वे
🔴समास व त्याचे प्रकार

🔸काटकसर करणे हा मनुष्याच्या अंगी असलेला एकूण गुण आहे.
 
🔹आपण दैनंदिन जीवनात बरीच काटकसर करतो. त्यामुळे आपण बोलतांना सुद्धा हा गुण वापरतो.
 
🔸बर्‍याचदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो.
 
🔶जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो. यालाच समास असे म्हणतात.
 
🔷अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात.

🅾उदा.

🔹वडापाव - वडाघालून तयार केलेला पाव.
 
🔹पोळपाट - पोळी करण्यासाठी लागणारे पाट
 
🔹कांदेपोहे - कांदे घालून तयार केलेले पोहे.
 
🔹पंचवटी  - पाच वडांचा समूह

🔴समासाचे मुख्य चार प्रकार पडतात.

अव्ययीभाव समास
तत्पुरुष समास
व्दंव्द समास
बहुव्रीही समास

📚MPSC💺UPSC-Katta📚

🔶अव्ययीभाव समास :

🔹ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारख केला जातो त्यास अव्ययीभवन समास असे म्हणतात.
 
🔸अव्ययीभाव समासात आपल्याला खलील भाषेतील उदाहरणे पाहावयास मिळतात.

🔴मराठी भाषेतील शब्द -

🅾उदा.    

गोवोगाव - प्रत्येक गावात
गल्लोगल्ली -  प्रत्येक गल्लीत
दारोदारी -  प्रत्येक दारी
घरोघरी -  प्रत्येक घरी

🔴संस्कृत भाषेतील शब्द -

🅾उदा.  

🔹प्रती (प्रत्येक) - प्रतिमास, प्रतिक्षण, प्रतिदिन

🔹आ (पर्यत) - आमरण

🔹आ (पासून) - आजन्म, आजीवन
 
🔹यथा (प्रमाण) - यथाविधी, यथामती, यथाशक्ती.

 🔴अरबी व फारसी भाषेतील शब्द -

🅾उदा.    

🔹दर (प्रत्येक) - दारसाल, दरडोई, दरमजल.
 
🔹गैर (प्रत्येक) - गैरसमज, गैरहजर, गैरशिस्त
 
🔹हर (प्रत्येक) - हररोज, हरहमेशा
 
🔹बे (विरुद्ध) - बेकायदा, बेमालूम, बेलाशक, बेलाईक

क्रमशः ........
🔹समास व त्याचे प्रकार

🅾तत्पुरुष समास :

🔸ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेल्या शब्द, विभक्तीप्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुषसमास असे म्हणतात.
 
🔸थोडक्यात ज्या समासात दूसरा शब्द प्रधान / महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.

🌑उदा.    

महामानव - महान असलेला मानव
 
राजपुत्र - राजाचा पुत्र
 
तोंडपाठ - तोंडाने पाठ
 
गायरान - गाईसाठी रान
 
वनभोजन - वनातील भोजन

🔸वरील उदाहरणांमध्ये पहिल्या पदापेक्षा दुसरे पद प्रधान आहे आणि या शब्दांना ला, चा, ने हे विभक्ती प्रत्यय वापरावे लागतात म्हणून त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.
 
🔸तत्पुरुष समासाचे 7 उपप्रकर पडतात.

🅾i) विभक्ती तत्पुरुष -

🔸ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणार्याग शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पद जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात.
 
🔸वरील उदाहरणांत वेगवेगळ्या सामासिक शब्दांचा विग्रह केला असता त्याला वेगवेगळ्या विभक्त्या लागलेल्या दिसतात.
 
🅾विभक्ती तत्पुरुष समासाची काही उदाहरणे :

🌑उदा

गुनहीन - गुणाने हीन - तृतीया तत्पुरुष
 
विधाभ्यास - विधेचा भास - षष्ठी तत्पुरुष
 
कर्मकुशल - कर्मात कुशल - सप्तमी तत्पुरुष

🅾ii) अलुक तत्पुरुष -

🔸ज्या विभक्ती तत्पुरुष अमासात पहिला पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास म्हणतात.
 
🔸अलुक म्हणजे लोप न पावणारा म्हणजे ज्या विभक्ती तत्पुरुष सामासिक शब्दांच्या पहिल्या पदाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात.

🌑उदा.    

तोंडी लावणे
 
पाठी घालणे
 
अग्रेसर

🅾iii) उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष -
ज्या तत्पुरुष समासात दुसरे पद महत्वाचे असून व ते दुसरे पद हे धातुसाधीत/ कृदंत म्हणून त्या शब्दांत येते तसेच त्याचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही अशा समासास उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष असे म्हणतात.

🅾उदा.    

ग्रंथकार - ग्रंथ करणारा
 
शेतकरी - शेती करणारा
 
लाचखाऊ - लाच खाणारा
 
सुखद - सुख देणारा
 
जलद - जल देणारा वरील

🔸उदाहरणांमध्ये पहिल्या पदात ग्रंथ, शेत, लाच, सुख, जल हे सर्व धातू आहेत.
 
🔸नंतर दुसर्‍या पदात त्यांचे रूपांतर धातुसाधीतांमध्ये झाले आहे म्हणून ते उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत.
 
🔸इतर उदाहरणे : लाकूडतोडया, आगलाव्या, गृहस्थ, कामकरी, कुंभकर्ण, मार्गस्थ, वाटसरु.

🅾iv. नत्र तत्पुरुष समास -

🔸ज्या तत्पुरुष सामासातील प्रथम पद हे नकारार्थी असते त्यास नत्र तत्पुरुष  असे म्हणतात.
 
🔸म्हणजेच ज्या समासातील पहिले पद हे अभाव किंवा निषेध दर्शवतात त्यांना  नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात.
 
उदा. (अ, अन्, न, ना, बे, नि, गैर इ.)

🌑उदा.    

अयोग्य - योग्य नसलेला
 
अज्ञान - ज्ञान नसलेला
 
अहिंसा - हिंसा नसलेला
 
निरोगी - रोग नसलेला

क्रमशः .........
👍1
From Marathi Mhani app:

कुडी तशी पुडी.

Meaning:
देहाप्रमाणे आहार.
From Marathi Mhani app:

कुणाची म्हैस, कुणाला ऊठबैस.

Meaning:
काम एकाचे आणि त्रास दुसऱ्याला.