मराठी व्याकरण
222K subscribers
8.5K photos
36 videos
336 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
From Marathi Mhani app:

करीन ती पूर्व दिशा.

Meaning:
एखादी अधिकारी व्यक्ती सांगेल ते सारे इतरांनी निमूटपणे मान्य करणे.
From Marathi Mhani app:

करू गेले काय अन् उलटे झाले काय.

Meaning:
करायचे एक आणि झाले भलतेच.
From Marathi Mhani app:

कवडी कवडी माया जोडी.

Meaning:
काटकसरीने वागून थोडी थोडी बचत केल्यास बरीच मोठी रक्कम शिल्लक पडते.
From Marathi Mhani app:

कर्कशेला कलह गोड, पद्मिनीला प्रीती गोड.

Meaning:
दुष्ट स्त्रीला कलह करणे आवडते तर गुणवंतीला प्रेम आवडते.
From Marathi Mhani app:

कवड्याचे दान वाटले, गावात नगारे वाजले.

Meaning:
करणे थोडे पण गवगवाच फार.
From Marathi Mhani app:

कसायाला गाय धार्जिणी.

Meaning:
भांडखोर व नीतिमत्ता नसलेल्या गुंड माणसापुढे गरीब माणसे नसतात.
From Marathi Mhani app:

का गं बाई उभी, घरात दोघीतिघी.

Meaning:
घरात पुष्कळ लोक काम करावयास असले म्हणजे आळस चढतो.
From Marathi Mhani app:

काकडीची चोरी, फाशीची शिक्षा.

Meaning:
अपराध खूप लहान पण शिक्षा मात्र फार मोठी.
From Marathi Mhani app:

काखेत कळसा अन् गावाला वळसा.

Meaning:
भान नसल्याने जवळच असलेली वस्तू शोधण्यासाठी दूर जाणे.
#मराठी_साहीत्यातील_महत्वाच्या_कादंबऱ्या
.
1.ययाती------- वि.स.खांडेकर
2.गारंबीचा बापू--श्री ना पेंडसे
3. रथचक्र------श्री ना पेंडसे
4. शितू-------- गो.नी.दांडेकर
5. बनगरवाडी-- व्यंकटेश मांडगूळकर
6. फकिरा------अण्णाभाऊ साठे
7. स्वांमी ------रणजित देसाई
8. श्रीमान योगी-रणजित देसाई
9. कोसला------भालचंद्र नेमाडे
10. कोंडूरा-----शिवाजीराव सावंत
11. झुंज-------ना.स.इनामदार
12. आनंदी गोपाळ--श्री.ज.जोशी
13. माहीमची खाडी--मधु
मंगेश कर्णिक
14. गोतावळा-------आनंद य़ादव
15. पाचोळा--------रा.रं.बोराडे
16. मुंबई दिनांक----अरुण साधु
17. सिंहासन-------अरुण साधु
18. गांधारी---------ना.धो.महानोर
19.वस्ती वाढते आहे-भा.ल.पाटील
20. थँक यू मिस्टर ग्लाड---अनिल बर्वे
21. घर गंगेच्या काठी------ज्योत्स्ना देवध
रे22. वस्ती--------------- महादेव मोरे
23. पवनाकाठचा धोंडी ----गो.नी.दांडेकर
24. सावित्री------------- पु.शी.रेगे
25. बॅरिस्टर------------ जयवंत दळवी
26. श्यामची आई---------सानेगुरुजी
27. आस्तीक ----------- साने गुरुजी
28. अकुलिना------------पु.भा.भावे
29. आकाशाची फळे------ग.दि.मांडगूळकर
30. काळेपाणी-----------वि.दा.सावरकर
31. मृण्मयी-------------गो.नी.दांडेकर
32. पडघवली-----------गो.नी.दांडेकर
33. अमृतवेल-----------वि.स.खांडेकर.
👍21
★|| eMPSCkatta ||★ www.empsckatta.blogspot.in:
★|| eMPSCkatta ||★

🙏 धन्यवाद 🙏

आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने आज ( @eMPSCkatta टेलिग्राम चॅनेल सुरु करून आज 99वा दिवस आहे) आपल्या @eMPSCkatta टेलिग्राम चॅनेल ने
10,000
मेंबर चा टप्पा पूर्ण केला आहे.आपल्या सर्वांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नव्हते.

अजूनही ज्यांनी आपले @eMPSCkatta टेलिग्राम चॅनेल जॉईन केले नाही / तुमच्या ज्या मित्रांनी हे चॅनेल अजूनही जॉईन केले नाही त्यांना हे चॅनेल जॉईन करायला सांगा / जॉईन करून द्या.

चॅनेल जॉईन करणं एकदम सोपे आहे.

1) टेलिग्राम ऍप तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्या.

2) टेलिग्राम वरील सर्च मध्ये @empsckatta असे सर्च करा , eMPSCkatta चा लोगो असलेल्या चॅनेल वर क्लिक करा.चॅनेल ओपन होईल. चॅनेल वरील msg दिसू लागतील.

3) eMPSCkatta चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा.

झाले काम , तुम्ही eMPSCkatta चॅनेल चे मेंबर असाल आणि तुम्हाला चॅनेल वरील अपडेट्स मिळायला सुरवात होतील.

आपल्या सर्व मित्राना @eMPSCkatta या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा.

Telegram.me/eMPSCkatta

🙏 पुनश्च धन्यवाद 🙏

Regards- @eMPSCkattaAdmin
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
प्रश्नसंच :

1. खालीलपैकी कोणती स्वरसंधी नाही? कशाप्रकारे होईल?

मन्वंतर         सूर्यास्त  उमेशमतैक्य

उत्तर : सूर्यास्त

2. 'शब्दच्छल' या संधीची फोड कशाप्रकारे होईल?

शब्द+छलशब्द+चलशब्द+सलशब्द+च्छल

उत्तर : शब्द+छल

3. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात सांगा. आमच्या गावात बरेच पाटील आहेत.

भाववाचक नामसामान्य नामविशेषणविशेषनाम

उत्तर : सामान्य नाम

4. भाववाचक नाम ओळखा .

फुशारकी  शहराणी मुलेथोडी फळेबोलका पत्थर

उत्तर : फुशारकी

5. तृतीय विभक्तीचे प्रमुख कार्य .......... आहे .

 करण           आपादान          संप्रदान          अधिकरण

उत्तर : करण

6. 'बेडूक' या शब्दाचे स्त्रीलिंग रूप -

बेडूकबेडकीबेडकीन     बेडके

उत्तर : बेडकी

7. पुढीलपैकी कोणता शब्द नपूसंकलिंग नाही ?

पुस्तकचित्रमंगळसूत्रशाळा  

उत्तर : शाळा

8. मला परीक्षेची भीती वाटते. अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा?

चतुर्थीपंचमीषष्ठीसप्तमी

उत्तर : षष्ठी

9. खलील वाक्यातील ठळक अक्षरातील शब्दांची विभक्तीचा प्रकार शोधा. मुलांनो, ही वाक्य दहा मिनिटात लिहा.

द्वितीयसप्तमी  पंचमी     संबोधन

उत्तर : सप्तमी

10. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
'जो मुलगा अभ्यास करील तो पास होईल'.

दर्शक सर्वनामसंबंची सर्वनाम  अनिश्चित सर्वनामप्रश्नार्थक सर्वनाम

उत्तर : संबंची सर्वनाम
नाम व त्याचे प्रकार :

प्रत्येक्षात असणार्याव किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात.
 उदा. टेबल, कागद, पेन, साखर, अप्सरा, गाडी, खरेपणा, औदार्थ, देव, स्वर्ग, पुस्तक इ.

नामाचे प्रकार :

नामाचे एकूण 3 मुख्य प्रकार पडतात.

सामान्य नाम

एकाच जातीच्या पदार्थातील समान गुण धर्मामुळे त्या वस्तूचे जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात.
 उदा. मुलगा, मुलगी, घर, शाळा, पुस्तक, नदी, शहर, साखर, पाणी, दूध, सोने, कापड, सैन्य, वर्ग इ.
 (सामान्य नाम हे जातीवाच असते, काही विशिष्ट नामांचेच अनेकवचन होते. मराठीमध्ये पदार्थवाचक, समुहवाचक नाम हे सामान्य नामच समजले जाते.)

विशेष नाम  

ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात.
 उदा. राम, आशा, हिमालय, गंगा, भारत, धुळे, मुंबई, दिल्ली, सचिन, अमेरिका, गोदावरी इ.
 (विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते, विशेषनामाचे अनेकवचन होत नाही आल्यास सामान्य नाम समजावे.)
 उदा. या गावात बरेच नारद आहेत.सामान्य नामविशेषनाम      नदीगंगा, सिंधू, तापी, नर्मदा, गोदावरीपर्वतहिमालय, सहयाद्री, सातपुडामुलगास्वाधीन, हिमांशू, लक्ष्मण, कपिल, भैरवमुलगीमधुस्मिता, स्वागता, तारा, आशा, नलिनीशहरनगर, पुणे, दिल्ली, मुंबई, कोल्हापूर

भाववाचक नाम

ज्या नामाने प्राणी किंवा वस्तु यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म, किंवा भाव यांचा बोध होतो. त्याला भाववाचक नाम असे म्हणतात.
 उदा. धैर्य, किर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद इ.
 (पदार्थाच्या गुणाबरोबरच स्थिति किंवा क्रिया दाखविणार्यां नामांना भाववाचक नाम असे म्हणतात.
 उदा. धाव, हास्य, चोरी, उड्डाण, नृत्य ही क्रियेला दिलेली नावे आहेत. वार्धक्य, बाल्य, तारुण्य, मरण हे शब्द पदार्थाची स्थिती दाखवितात.)

भाववाचक नामे साधण्याचे प्रकार :

सामान्यनामे व विशेषनामे यांना आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण, पणा, य, या यासारखे प्रत्यय लावून नामे तयार होतात ती खालीलप्रमाणेशब्दप्रत्ययभाववाचक नामइतर उदाहरणे

 नवल

 श्रीमंत

 पाटील

 गुलाम

 शांत

 मनुष्य

 शहाणा

 सुंदर

 गोड

आई

  ई

  की

  गिरी

  ता

  त्व

  पण, पणा

  य

  वा

नवलाई

 श्रीमंती

 पाटीलकी

 गुलामगिरी

 शांतता

 मनुष्यत्व

 शहाणपण, पणा

 सौदर्य

 गोडवा

खोदाई, चपडाई, दांडगाई, धुलाई

 गरीबी, गोडी, लबाडी, वकिली

 आपुलकी, भिक्षुकी

 फसवेगिरी, लुच्चेगिरी

 क्रूरता, नम्रता, समता

 प्रौढत्व, मित्रत्व, शत्रुत्व

 देवपण, प्रामाणिकपणा, मोठेपण

 गांभीर्य, धैर्य, माधुर्य, शौर्य

 ओलावा, गारवा

नामाचे कार्य करणारे इतर शब्द :

नाम, सर्वनाम, विशेषण, ही जी नावे शब्दांच्या जातीला दिली जातात, ती त्यांच्या त्या त्या वाक्यातील कार्यावरून दिली जातात तीच गोष्ट येथेही लक्षात ठेवावयास हवी, सामान्यनाम, विशेषनाम, भाववाचकनाम ही नावे देखील नामांच्या विशिष्ट कार्यावरून दिली गेली आहेत. अशाच पद्धतीने नामांच्या कार्यावरून त्यांचे काही नियम आहेत ते खालीलप्रमाणे

नियम: 1. केव्हा-केव्हा सामान्यनाम हे विशेषनामांचे कार्य करतात.
उदा.    

आत्ताच मी नगरहून आलो.शेजारची तारा यंदा बी.ए. झाली.वरील वाक्यामध्ये वापरली गेलेली नगर कोणतेही शहर, तारा(नक्षत्र) ही मुळीच सामान्यनामे आहेत परंतु येथे ती विशेषनामे म्हणून वापरली गेलेली आहेत.

नियम: 2. केव्हा-केव्हा विशेषनाम सामान्य नामाचे कार्य करतात.
उदा.    

तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो.आमचे वडील म्हणजे जमदग्नि आहेत.आम्हाला आजच्या विधार्थ्यात सुदाम नकोत भीम हवेत.वरील वाक्यांत कुंभकर्ण, जमदग्नि, सुदाम, भीम गे मुळची विशेषनामे आहेत. पण येथे कुंभकर्ण अतिशय झोपाळू, जमदग्नि =अतिशय रागीट मनुष्य, सुदाम=अशक्त मुलगे व भीम=सशक्त मुलगे या अर्थाने वापरली आहेत. म्हणजे मुळची विशेषनामे वरील वाक्यांत सामान्य नामांचे कार्य करतात.

नियम: 3. केव्हा-केव्हा भाववाचक नामे विशेषनामांचे कार्य करते.
उदा.    

शांती ही माझ्या बहिणीची मुलगी.विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला.माधुरी उधा मुंबईला जाईल.वरील वाक्यात अधोरेखित केलेली शब्दे ही मुळची भाववाचक नामे आहेत. पण याठिकाणी त्यांचा वापर विशेषणामासारखा केला आहे.

नियम: 4. विशेषनामाचे अनेकवचन होत नाही झाल्यास त्यांना सामान्यनाम म्हणतात.
उदा.    

आमच्या वर्गात तीन पाटील आहेत.या गावात बरेच नारद आहेत.माझ्या आईने सोळा सोमवारांचे व्रत केले.विशेषनामाचे अनेकवचन होत नाही पण वरील वाक्यात विशेषनामे अनेकवचनी वापरलेली दिसतील या वाक्यातील विशेषनामे म्हणून वापरली आहेत.

नियम: 5. विशेषण केव्हा-केव्हा नामाचे कार्य करतात.
उदा.    

शहाण्याला शब्दांचा मार.श्रीमंतांना गर्व असतो.जातीच्या सुंदरांना काहीही शोभते.जगात गरीबांना मान मिळत नाही.वरील वाक्यात विशेषण ही नामासारखी वापरली आहेत.

नियम:
👍2
6. केव्हा-केव्हा अव्यय नामाचे कार्य करतात.
उदा.    

आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली.त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो.नापास झाल्यामुळे त्याची छी-थू झाली.वरील वाक्यामध्ये केवलप्रयोगी अव्यये ही नामाची कार्य करतात.

नियम: 7. धातू-साधिते केव्हा-केव्हा नामाचे कार्ये करते.
उदा.    

ज्याला कर नाही त्याला डर कसली.गुरुजींचे वागणे मोठे प्रेमळ असते.ते ध्यान पाहून मला हसू आले.देणार्या ने देत जावे.वरील उदाहरणांवरून असे दिसून येते की, सामान्यपणे, विशेषनामे व भववाचकनामे ही एकमेकांचे कार्य करतांना आढळतात. तसेच विशेषणे, अव्यय, धातुसाधिते यांचा वापरसुद्धा नामांसारखा करण्यात येतो.   
 

 
2
From Marathi Mhani app:

काट्याचा नायटा करणे.

Meaning:
एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा भलताच विपर्यास करणे.
From Marathi Mhani app:

काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही.

Meaning:
खऱ्या मैत्रीचा भंग आगंतुक कारणांनी होऊ शकत नाही.
From Marathi Mhani app:

काडी चोर तो माडी चोर.

Meaning:
क्षुल्लक अपराध केलेल्या माणसाचा एखाद्या घडलेल्या मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे.
From Marathi Mhani app:

काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाहीत.

Meaning:
थोड्याशा अधिकाराने जे काम होते, ते पुष्कळशा पैशाने देखील होत नाही.
From Marathi Mhani app:

कान आणि डोळे यात चार बोटांचे अंतर.

Meaning:
ऐकण्यात आणि पाहण्यात फार तफावत असते.
From Marathi Mhani app:

कान आणि डोळे यात चार बोटांचे अंतर.

Meaning:
ऐकण्यात आणि पाहण्यात फार तफावत असते.
From Marathi Mhani app:

कानात बुगडी, गावात फुगडी.

Meaning:
आपले वैभव प्रदर्शित करणारी स्त्री.
👍2