मराठी व्याकरण
222K subscribers
8.5K photos
36 videos
336 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
From Marathi Mhani app:

ओठी ते पोटी.

Meaning:
बोलावे तसे वागावे.
👍2
From Marathi Mhani app:

ओल्याबरोबर सुके जळते.

Meaning:
वाईटाबरोबर कधी कधी चांगल्या माणसाचेही नुकसान होते.
1👍1
From Marathi Mhani app:

ओळखीचा चोर जीवे मारी.

Meaning:
ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो.
👍1
From Marathi Mhani app:

ओसाड रानात एरंडाचा उदो उदो.

Meaning:
गावात सारेच अडाणी असले व एखादा थोडाफार शिकलेला असला, तर तोच गावात विद्वान मानला जातो.
👍1
From Marathi Mhani app:

औटघटकेचे राज्य.

Meaning:
थोडावेळ टिकणारे ऐश्वर्य.
From Marathi Mhani app:

औषधावाचून खोकला गेला.

Meaning:
आपोआपच विघ्न टळले.
प्रश्नसंच:

1. खालील वाक्यांपैकी कोणत्या वाक्यातील 'श्रीमंत' शब्द नामाचे कार्य करतो ?
वाक्य क्र.1 श्रीमंत माणसांना गर्व असतो.
वाक्य क्र.2 श्रीमंतांना गर्व असतो

वाक्य क्र.1        वाक्य क्र.2    वाक्य क्र.1 व 2         यापैकी नाही

उत्तर : वाक्य क्र.1 व 2

2. वाक्य क्र.1 गवळी धार काढली. वाक्य क्र.2 : राम भजे खातो, या वाक्यापैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद हे समर्पक क्रियापद आहे ?

वाक्य क्र.1         वाक्य क्र.2          वाक्य क्र.1 व 2          यापैकी नाही

उत्तर : वाक्य क्र.1 व 2  

3. खालीलपैकी कोणते क्रियाविशेषण नाही ?

वेगात             जोरात             हळूहळू              तलम     

उत्तर : वेगात

4. मरावे परी कीर्तीरूपे उरावे. या वाक्यात 'परी' हे कोणते अव्यय आहे ?

उभयान्वयी अव्यय         शब्दयोगी अव्यय         केवलप्रयोगी अव्यय         समुच्च्यबोधक अव्यय

उत्तर : केवलप्रयोगी अव्यय

5. नळे इंद्रासी असे बोलीजेले. या वाक्यातील प्रयोग ओळखा ?

कर्मणी प्रयोग         कर्तरी प्रयोग         कर्तृककर्मणी प्रयोग         नवीन कर्मणी प्रयोग

उत्तर : कर्तृककर्मणी प्रयोग

6. 'आम्हा मुलांना कोण विचारतो' ? या वाक्यातील विशेषनाचा प्रकार सांगा .

दर्शक विशेषण         प्रश्नार्थक विशेषण         सर्वनामिक विशेषण          यापैकी नाही

उत्तर : सर्वनामिक विशेषण

7. 'मी नककीच क्रिकेट शिकेन.' या वाक्यातील अर्थ कोणता ?

आज्ञार्थ         विध्यर्थ         संकेतार्थ         यापैकी नाही   

उत्तर : यापैकी नाही

8. 'चूक' या शब्दाचे अनेकवचन रूप सांगा .

चूका          चुकी         चूक     यापैकी नाही  

उत्तर : चुका

9. 'हरी' या नामाचा प्रकार ओळखा .

विशेषणाम         सामान्यनाम         धातुसाधित नाम         यापैकी नाही

उत्तर : विशेषणाम

10. 'खोंड' या शब्दाचे लिंग कोणते ?

नपुसकलिंग         स्त्रीलिंग         पुल्लिंग          यापैकी नाही

उत्तर : पुल्लिंग
From Marathi Mhani app:

कंबरेचं सोडलं, डोक्याला बांधलं.

Meaning:
लाजलज्जा पार सोडून देणे.
1
From Marathi Mhani app:

कठीण समय येता कोण कामास येतो?

Meaning:
आपल्या अडचणींच्या वेळी कोणीही उपयोगी पडत नाही.
👌1
From Marathi Mhani app:

कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले, तरी कडू ते कडूच.

Meaning:
माणसाचा मुळ गुणधर्म कितीही प्रयत्न केला तरी बदलत नाही.
From Marathi Mhani app:

कधी खावे तुपाशी, कधी राहावे उपाशी.

Meaning:
सांसारिक स्थिती नेहमीच सारखी नसते.
1
From Marathi Mhani app:

कधी गाडीवर नाव, कधी नावेवर गाडी.

Meaning:
सर्वांचे दिवस येतात, तीच ती स्थिती कधीच राहत नाही.
From Marathi Mhani app:

कर नाही त्याला डर कशाला?

Meaning:
ज्याने वाईट कृत्य केले नाही त्याला भीती बाळगण्याचे कारण नाही.
From Marathi Mhani app:

करंगळी सुजली म्हणजे डोंगरा एवढी हो‌ईल का?

Meaning:
जी गोष्ट लहान असते, ती कितीही प्रयत्न केला तरी अमर्याद मोठी होऊ शकत नाही.
From Marathi Mhani app:

करणी कसायची, बोलणी मानभावची.

Meaning:
बोलणे गोड गोड, आचरण मात्र निष्ठूर.
From Marathi Mhani app:

करायला गेले गणपती अन् झाला मारुती.

Meaning:
जे करायचे ते समजून उमजून नीटपणे करावे. नाहीतर त्यातून भलतेच घडते.
From Marathi Mhani app:

करायला गेलो एक अन् झाले एक.

Meaning:
करायचे एक आणि झाले भलतेच.
From Marathi Mhani app:

करावे तसे भरावे.

Meaning:
जसे चांगले वाईट करावे तसे त्याचे चांगले वाईट परिणाम भोगावे.
👍1
From Marathi Mhani app:

करीन ती पूर्व दिशा.

Meaning:
एखादी अधिकारी व्यक्ती सांगेल ते सारे इतरांनी निमूटपणे मान्य करणे.
From Marathi Mhani app:

करू गेले काय अन् उलटे झाले काय.

Meaning:
करायचे एक आणि झाले भलतेच.
From Marathi Mhani app:

कवडी कवडी माया जोडी.

Meaning:
काटकसरीने वागून थोडी थोडी बचत केल्यास बरीच मोठी रक्कम शिल्लक पडते.