मराठी व्याकरण
222K subscribers
8.5K photos
36 videos
336 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
From Marathi Mhani app:

ऐकून घेत नाही त्याला सांगू नये काही.

Meaning:
जो सांगितलेले ऐकत नाही, त्याला उपदेश करण्यात काय अर्थ?
From Marathi Mhani app:

ऐतखाऊ लांडग्याचा भाऊ.

Meaning:
कष्ट केल्याविना खाण्याची सवय असणारा, जेथे आयते खायला मिळेल तेथे चांगलाच ताव मारुन घेतो.
From Marathi Mhani app:

ऐतखा‌ऊ गोसावी, टाळभैरव बैरागी.

Meaning:
आळशी लोकांचीही कधी कधी चंगळ असते.
From Marathi Mhani app:

ओ म्हणता ठो ये‌ईना.

Meaning:
अगदीच अक्षरशत्रू.
वर्णमाला

वर्ण - आपल्या तोंडावाटे पडणार्‍या मूल ध्वनीला वर्ण असे म्हणतात.

      मराठीत एकूण 48 वर्ण आहेत.
1. स्वर 
2. स्वरादी
3. व्यंजन 

1. स्वर : ज्यांचा उच्चार करतांना जिभेचा मुखातील कोठल्याही अवयवांशी स्पर्श होत नाही त्यांना स्वर असे म्हणतात.
         अ, आ, इ, ई, ल्र, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, ऋ

    स्वरांचे मुख्य प्रकार दोन आहेत.
1. र्‍हस्व स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या स्वरांना र्‍हस्व स्वर असे म्हणतात.
              अ, इ, ऋ, उ


2. दीर्घ स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात.
         आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ

    स्वरांचे इतर प्रकार
1. सजातीय स्वर : एकाच उच्चार स्थांनामधून जाणार्‍या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात.
                 अ-आ, उ-ऊ, ओ-औ, इ-ई, ए-ऐ 

2. विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थांनामधून उच्चारल्या जाणार्‍या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात.
                  अ-ई, उ-ए, ओ-ऋ

3. संयुक्त स्वर : दोन स्वर मिळून तयार होणार्‍या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात.
               याचे 4 स्वर आहेत.
               ए - अ+इ/ई
               ऐ - आ+इ/ई
               ओ - अ+उ/ऊ
               औ - आ+उ/ऊ

2. स्वरादी :  ज्याचा उच्चार करण्याअधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात.
            स्वर + आदी - स्वरादी
            दोन स्वरादी - अं, अः
            स्वरादी मध्ये अनुस्वार व विसर्ग यांचा समावेश होतो.
  दोन नवे स्वरदी : ओ, औ
  हे नवे स्वरादी इंग्लिश भाषेतून आलेले आहेत.
  उदा. बॅट, बॉल

3.व्यंजन : एकूण व्यंजन 34 आहेत.
          ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात. 
          व्यंजनाचे पाच प्रकारात वर्णन केले जाते.
1. स्पर्श व्यंजन (25)
2. अर्धस्वर व्यंजन (4)
3. उष्मा, घर्षक व्यंजन (3)
4. महाप्राण व्यंजन (1)
5. स्वतंत्र व्यंजन (1)
👍32
1. स्पर्श व्यंजन : एकूण व्यंजन 25 आहेत. 
                ज्याचा उच्चार करतांना फुफुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडतांना टाळू, कंठ, मुर्धा, दात, व ओठ यांचा स्पर्श 
                करून बाहेर निघते म्हणून त्यांना स्पर्श व्यंजन म्हणतात.
                उदा. क, ख, ग, घ, ड
                    च, छ, ज, झ, त्र
                    ट, ठ, ड, द, ण
                    त, थ, द, ध, न
                    प, फ, ब, भ, म
     स्पर्श व्यंजनाचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
1. कठोर वर्ण 
2. मृदु वर्ण 
3. अनुनासिक वर्ण 

1. कठोर वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात.
              उदा. क, ख
                  च, छ
                  ट, ठ 
                  त, थ 
                  प, फ

2. मृद वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना मृद वर्ण असे म्हणतात. 
            उदा. ग, घ
                ज, झ
                ड, ढ
                द, ध
                ब ,भ

3. अनुनासिक वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केल्या जातो त्यास अनुनासिक असे म्हणतात. 
                  उदा. ड, त्र, ण, न, म      
👍2
मराठी व्याकरण विडिओ:

खालील विडिओ मध्ये मराठी व्याकरणातील क्रियापद हा घटक समजावून देण्यात आला आहे.
*मराठी व्याकरण*

*शब्दसिद्धी व त्याचे प्रकार*

*शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच 'शब्दसिद्धी' असे म्हणतात.*

*शब्दांचे खालील प्रकार पडतात.*

*तत्सम शब्द :*

जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बादल न होता आले आहेत त्यांना *'तत्सम शब्द'* असे म्हणतात.

*उदा.*

राजा, भूगोल, चंचू, पुष्प, परंतु, भगवान, कर, पशु, अंध, जल, दीप, पृथ्वी, तथापि, कवि, वायु, भीती, पुत्र, अधापि, मति, पुरुष, शिशु, गुरु, मधु, गंध, पिता, कन्या, वृक्ष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, विद्वान, संत, निस्तेज, कर, जगन्नाथ, दर्शन, उमेश, स्वामि, मंदिर, तिथी, सूर्य, स्वल्प, घृणा, पिंड, कलश, प्रात:क, दंड, पत्र, ग्रंथ, उत्तम, आकाश पाप, मंत्र, शिखर, सूत्र, कार्य, होम, गणेश, सभ्य, कन्या, देवर्षि, वृद्ध, संसार, प्रीत्यर्थ, कविता, उपकार, परंतु, गायन, अश्रू, प्रसाद, अब्ज, राजा, संमती, घंटा, पुण्य, बुद्धी, अभिषेक, संगती, श्रद्धा, प्रकाश, सत्कार, देवालय, तारा, समर्थन, नयन, उत्सव, दुष्परिणाम, नैवेध.


*तदभव शब्द :*

*जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येतांना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना 'तदभव शब्द' असे म्हणतात.*

*उदा.*

घर, पाय, भाऊ, सासू, सासरा, गाव, दूध, घास, कोवळा, ओळ, काम, घाम, घडा, फुल, आसू, धुर, जुना, चाक, आग, धूळ, दिवा, पान, वीज, चामडे, तहान, अंजली, चोच, तण, माकड, अडाणी, उधोग, शेत, पाणी, पेटी, विनंती, ओंजळ, आंधळा, काय, धुर, पंख, ताक, कान, गाय.

*देशी/देशीज शब्द :*

*महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणार्‍या शब्दांना 'देशी शब्द' असे म्हणतात.*

*उदा.*

झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजारी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकूण, कंबर, पीठ, डोळा, मुलगा, लाजरा, वेढा, गार, लाकूड, ओटी, वेडा, अबोला, लूट, अंघोळ, उडी, शेतकरी, आजार, रोग, ओढा, चोर, वारकरी, मळकट, धड, ओटा, डोंगर.

*परभाषीय शब्द :*

*संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना 'परभाषीय शब्द' असे म्हणतात.*

*1) तुर्की शब्द*
कालगी, बंदूक, कजाग

*2) इंग्रजी शब्द*
टी.व्ही., डॉक्टर, कोर्ट, पेन, पार्सल, सायकल, स्टेशन, हॉस्पिटल, बस, फाईल, रेल्वे, पास, ब्रेक, कप, मास्तर, फी, बॉल, स्टॉप, ऑफिस, एजंट, टेलिफोन, सिनेमा, सर्कस, पॅंट, बॅट, पोस्ट, तिकीट, ड्रायव्हर, मोटर, कंडक्टर, नंबर, टीचर, सर, मॅडम, पेपर, नर्स, पेशंट, इंजेक्शन, बटन ड्रेस, ग्लास, इत्यादी.

*3) पोर्तुगीज शब्द*
बटाटा, तंभाखू, पगार, बिजागरी, कोबी, हापूस, फणस, घमेले, पायरी, लोणचे, मेज, चावी, तुरुंग, तिजोरी, काडतुस.

*4) फारशी शब्द*
रवाना, समान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख, सौदागार, कामगार, गुन्हेगार, फडवणीस, बाम, लेजीम, शाई, गरीब, खानेसुमारी, हजार, शाहीर, मोहोर, सरकार, महिना हप्ता.

*5) अरबी शब्द*
अर्ज, इनाम, हुकूम, मेहनत, जाहीर, मंजूर, शाहीर, साहेब, मालक, मौताज, नक्कल, जबाब, उर्फ, पैज, मजबूत, शहर, नजर, खर्च, मनोरा, वाद, मदत, बदल.

*6) कानडी शब्द*
हंडा, भांडे, अक्का, गाजर, भाकरी, अण्णा, पिशवी, खोली, बांगडी, लवंग, अडकित्ता, चाकरी, पापड, खलबत्ता, किल्ली, तूप, चिंधी, गुढी, विळी, आई, रजई, तंदूर, चिंच, खोबरे, कणीक, चिमटा, नथ, तांब्या, उडीद, पाट, गाल, काका, टाळू, गादी, खिडकी, गच्ची, बांबू, ताई, गुंडी, कांबळे.

*7) गुजराती शब्द*
सदरा, दलाल, ढोकळा, घी, डबा, दादर, रिकामटेकडा, इजा, शेट.

*8) हिन्दी शब्द*
बच्चा, बात, भाई, दिल, दाम, करोड, बेटा, मिलाप, तपास, और, नानी, मंजूर, इमली.

*9) तेलगू शब्द*
ताळा, अनरसा, किडूकमिडूक, शिकेकाई, बंडी, डबी.

*10) तामिळ शब्द*
चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा.


*सिद्ध व सधीत शब्द :*

*1) सिद्ध शब्द—*

*भाषेत जे शब्द मुळात धातू असतात त्यांना 'सिद्ध शब्द' असे म्हणतात.*

उदा. ये, जा, खा, पी, बस, उठ, कर, गा इत्यादी.

*सिद्ध शब्दांचे 3 प्रकार पडतात.*

*अ) तत्सम*

*ब) तदभव*

*क) देशी (यांचा अभ्यास आपण यापूर्वी केला आहे)*

*2) साधीत शब्द—*

*सिद्ध शब्दाला म्हणजेच धातूच्या पूर्वी उपसर्ग किंवा नंतर प्रत्यय लागून 'साधित शब्द' तयार होतो.*

*साधित शब्दांचे पुढील 4 प्रकार पडतात*

*अ)उपसर्गघटित*

*ब) प्रत्ययघटित*

*क) अभ्यस्त*

*ड) सामासिक*

*अ) उपसर्गघटित शब्द—*

*शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात. तसेच अशी अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्या शब्दांना 'उपसर्ग घटित शब्द' असे म्हणतात.*


उदा. अनुभव, अपयश, अधिकार, अवगुण अधिपती, उपहार, आकार, साकार, प्रतिकार, प्रकार इ.

वरील शब्दांमध्ये अनु. अप, अधि, अव, अधि, उप, आ, सा, प्रति,प्रइ. उपसर्ग लागलेली आपल्याला दिसतात. असे उपसर्ग लागून तयार होणार्‍या शब्दांना उपसर्ग घटित शब्द असे
म्हणतात


*ब) प्रत्ययघटित शब्द—*

*धातूच्या कि
👍32
ंवा शब्दांच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून प्रत्यय तयार होतात व तयार होणार्‍या शब्दांना 'प्रत्ययघटित शब्द' असे म्हणतात.*


उदा. जनन, जनक, जननी, जनता इ.

वरील शब्दांना न,क, नी ता ही प्रत्यय लागलेली आपल्याला दिसतात असे प्रत्यय लावून तयार होणार्‍या शब्दांना 'प्रत्ययघटित शब्द' असे म्हणतात.

*क) अभ्यस्त शब्द—*

*एखाधा शब्दांत एका शब्दाची अथवा काही अक्षरांनी पुनरावृत्ती झालेली असते. अशा शब्दांना 'अभ्यस्त शब्द' असे म्हणतात. अभ्यसतचा अर्थ दुप्पट करणे असा होतो.*


उदा. आतल्या आत, शेजरीपाजारी, किरकिर इ.

*अभ्यस्त शब्दांचे खलील 3 प्रकार पडतात.*

*i) पूर्णाभ्यस्त*

*ii) अंशाभ्यस्त*

*iii) अनुकरणवाचक*


*i) पूर्णाभ्यस्त शब्द—*

*एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा येऊन जोडशब्द तयार होतो त्याला पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात.*

उदा. बारीक बारीक, कळाकाळा, आतल्या आत, हळहळ, वटवट, कळकळ, मळमळ, बडबड, समोरासमोर, हळूहळू, पुढेपुढे, पैसाच पैसा, मजाच मजा, हिरवेहिरवे इ.

*ii) अंशाभ्यस्त शब्द—*

*जेव्हा पूर्ण शब्द हा जोडशब्दात जशाच्या तसा पुन्हा येतो एखादे अक्षर बदलून येतो तेव्हा त्या जोडशब्दांना अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात.*

उदा. अदलाबदल, उलटसुलटा, शेजारीपाजारी, बारीकसारीक, लाडीगोडी, सोक्षमोक्ष, जिकडेतिकडे, गोडधोड, गडबड, जाळपोळ, दगडबिगड, किडूकमिडूक, घरबीर इ.

*iii) अनुकरणवाचक शब्द—*

*ज्या शब्दांमध्ये एखाधा ध्वनिवाचक शब्दांची पुनरावृत्ती झालेली असते, अशा शब्दांना अनुकरणवाचक/नादानुकारी शब्द असे म्हणतात.*

उदा. किरकिर, खडखडाट, रिमझिम, गुणगुण, घणघण, कडकडाट, टिकटिक, गडगड इ.

*ड) सामासिक शब्द—*

*जेव्हा दोन किंवा अधिक शब्द एकमेकांमधील परस्पर संबंधामुळे एकत्र येऊन तयार होणार्‍या शब्दाला 'सामासिक शब्द' असे म्हणतात.*

उदा. पोळपाट, देवघर, दारोदार इ.
मराठी व्याकरण विडिओ:

खालील विडिओ मध्ये मराठी व्याकरणातील क्रियापद हा घटक समजावून देण्यात आला आहे. हा मागील विडिओचाच दुसरा पार्ट आहे.
From Marathi Mhani app:

ओठात एक आणि पोटात एक.

Meaning:
बाहेर बोलणे वेगळे आणि मनात वेगळे असणे.
👍1
From Marathi Mhani app:

ओठी ते पोटी.

Meaning:
बोलावे तसे वागावे.
👍2
From Marathi Mhani app:

ओल्याबरोबर सुके जळते.

Meaning:
वाईटाबरोबर कधी कधी चांगल्या माणसाचेही नुकसान होते.
1👍1
From Marathi Mhani app:

ओळखीचा चोर जीवे मारी.

Meaning:
ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो.
👍1
From Marathi Mhani app:

ओसाड रानात एरंडाचा उदो उदो.

Meaning:
गावात सारेच अडाणी असले व एखादा थोडाफार शिकलेला असला, तर तोच गावात विद्वान मानला जातो.
👍1
From Marathi Mhani app:

औटघटकेचे राज्य.

Meaning:
थोडावेळ टिकणारे ऐश्वर्य.
From Marathi Mhani app:

औषधावाचून खोकला गेला.

Meaning:
आपोआपच विघ्न टळले.
प्रश्नसंच:

1. खालील वाक्यांपैकी कोणत्या वाक्यातील 'श्रीमंत' शब्द नामाचे कार्य करतो ?
वाक्य क्र.1 श्रीमंत माणसांना गर्व असतो.
वाक्य क्र.2 श्रीमंतांना गर्व असतो

वाक्य क्र.1        वाक्य क्र.2    वाक्य क्र.1 व 2         यापैकी नाही

उत्तर : वाक्य क्र.1 व 2

2. वाक्य क्र.1 गवळी धार काढली. वाक्य क्र.2 : राम भजे खातो, या वाक्यापैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद हे समर्पक क्रियापद आहे ?

वाक्य क्र.1         वाक्य क्र.2          वाक्य क्र.1 व 2          यापैकी नाही

उत्तर : वाक्य क्र.1 व 2  

3. खालीलपैकी कोणते क्रियाविशेषण नाही ?

वेगात             जोरात             हळूहळू              तलम     

उत्तर : वेगात

4. मरावे परी कीर्तीरूपे उरावे. या वाक्यात 'परी' हे कोणते अव्यय आहे ?

उभयान्वयी अव्यय         शब्दयोगी अव्यय         केवलप्रयोगी अव्यय         समुच्च्यबोधक अव्यय

उत्तर : केवलप्रयोगी अव्यय

5. नळे इंद्रासी असे बोलीजेले. या वाक्यातील प्रयोग ओळखा ?

कर्मणी प्रयोग         कर्तरी प्रयोग         कर्तृककर्मणी प्रयोग         नवीन कर्मणी प्रयोग

उत्तर : कर्तृककर्मणी प्रयोग

6. 'आम्हा मुलांना कोण विचारतो' ? या वाक्यातील विशेषनाचा प्रकार सांगा .

दर्शक विशेषण         प्रश्नार्थक विशेषण         सर्वनामिक विशेषण          यापैकी नाही

उत्तर : सर्वनामिक विशेषण

7. 'मी नककीच क्रिकेट शिकेन.' या वाक्यातील अर्थ कोणता ?

आज्ञार्थ         विध्यर्थ         संकेतार्थ         यापैकी नाही   

उत्तर : यापैकी नाही

8. 'चूक' या शब्दाचे अनेकवचन रूप सांगा .

चूका          चुकी         चूक     यापैकी नाही  

उत्तर : चुका

9. 'हरी' या नामाचा प्रकार ओळखा .

विशेषणाम         सामान्यनाम         धातुसाधित नाम         यापैकी नाही

उत्तर : विशेषणाम

10. 'खोंड' या शब्दाचे लिंग कोणते ?

नपुसकलिंग         स्त्रीलिंग         पुल्लिंग          यापैकी नाही

उत्तर : पुल्लिंग
From Marathi Mhani app:

कंबरेचं सोडलं, डोक्याला बांधलं.

Meaning:
लाजलज्जा पार सोडून देणे.
1