मराठी व्याकरण
208K subscribers
8.77K photos
36 videos
337 files
618 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
🔹शब्द एक - अर्थ अनेक

४) शब्द एक - अर्थ अनेक :-

१) पक्ष - पंख, बाजू, भाग, श्राद्ध
२) पूर - नगर, शहर, पाण्याचा पूर
३) वर - पती, आशीर्वाद
४) नाद - आवाज, छंद, आवड
५) वजन - माप, वचक, प्रतिष्ठा
६) खूण - चिन्ह, सूचना, इशारा, संकेत
७) काळ - वेळ, मृत्यू
८) मान - आदर, स्वाभिमान, शरीराचा एक अवयव
९) तीर - नदीचा काठ, बाण
१०) दल - सैन्याची तुकडी, फुलाची पाकळी
20
🔹समूहवाचक शब्द

५) समूहवाचक शब्द :-

१) खेळाडूंचा - संघ
२) भाकऱ्यांची - चवड
३) तारकांचा - पुंज
४) फळांचा - घोस
५) पक्ष्यांचा - थवा
६) प्राण्यांचा - जथा
७) मुलांचा, मुलींचा - घोकळा
८) हत्तींचा - कळप
९) दुर्वांची - जुडी
१०) किल्ल्यांचा - जुडगा
28👌5
🔹आलंकारिक शब्दयोजना

६) आलंकारिक शब्दयोजना :-

१) अतिशय बुद्धिमान व्यक्ती - ब्रह्मदेव
२) अप्राप्य गोष्ट - मृगजळ
३) अत्यंत रागीट माणूस - जमदग्नी
४) अत्यंत कुरूप स्त्री - कुब्जा
५) वेडेवाकडे बोलणे - मुक्ताफळे
६) तात्पुरती विरक्ती - स्मशानवैराग्य
७) कलहप्रिय स्त्री - कैकेयी
८) एकत्र येऊन कारस्थान करणारे लोक - चांडाळचौकडी
९) नेहमी सत्य बोलणारा धर्मनिष्ठ माणूस - धर्मराज
१०) गुणकारी उपाय - रामबाण
30👌2
★|| मराठी व्याकरण ||★

🍀📝 शब्दशोध 📝🍀


खालील शब्दांचे किंवा शब्दसमूहाचे अर्थ सांगा.उत्तर केवळ चार अक्षरी शब्द हवा व प्रत्येक शब्दात शेवटचे दोन अक्षरे
🔹दा र 🔹 असली पाहिजेत.
😊😊 चला प्रयत्न करू या


१) घोडा सांभाळणारा -मोतदार
२) वेत्रधारी- चोपदार
३) ऑफिसर- कामदार
४) रूचकर - चवदार
५) सुंदर - छबीदार
६) चांगल्या घाटाचा -डौलदार
७) उतरती - ढाळदार
८) मोतद्दार -खासदार
९) सोयरा - नातेदार
१०) शोभिवंत - टुमदार
११) तेजस्वी - पाणीदार
१२) छत्रधर -माहीदार
१३) गच्च भरलेले - भरदार
१४) प्रांतावरचा मुख्य अधिकारी - सुभेदार
१५) अधिन -ताबेदार
___________________________
आमचे मराठी व्याकरण चॅनेल जॉईन होण्यासाठी येथे क्लीक करा telegram.me/Marathi
26
🔹संधी व त्याचे प्रकार

ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो यास 'जोडाक्षर' म्हणतात.

उदा.

विधालय : धा : द + य + आ

पश्चिम : श्चि : श + च + इ

आम्ही : म्ही : म + ह + ई

शत्रू : त्रू : त + र + ऊ

संधी:

स्वरसंधी -

जोडशब्द्ध तयार करतांना पहिल्या शब्दातील शेवटचे वर्ण व दुसर्‍या शब्दातील पहिले वर्ण हे एकमेकांत मिसळतात व त्या दोघांबद्दल एक वर्ण तयार होतो वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास 'संधी' असे म्हणतात.



उदा.

ईश्र्वरेच्छा = ईश्र्वर + इच्छा

सूर्यास्त = सूर्य + अस्त

सज्जन = सत् + जन

चिदानंद = चित् + आनंद

संधीचे प्रकार:

संधीचे मुख्य तीन प्रकार आहेत.



स्वर संधी -

एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर त्यांना 'स्वरसंधी' असे म्हणतात किंवा एक पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला स्वरसंधी असे म्हणतात.



दिर्घत्व संधी -

अ + अ = आ

आ + आ = आ

आ + अ = आ

इ + ई = ई

ई + ई = ई

इ + इ = ई

उ + ऊ = ऊ

उ + उ = ऊ

नियम -

(1) 'अ' किंवा 'आ' यांच्यापुढे इ+ई आल्यास त्या दोघांऐवजी 'ए' येतो आणि 'उ' किंवा 'ऊ' आल्यास 'ओ' येतो व ऋण आल्यास 'र' येतो.

उदा.

ईश्र्वर+ईच्छा (अ+इ=ए) ईश्र्वर+ए+च्छा=ईश्र्वरेच्छा

गण+ईश (अ+इ=ए) गण+ए+श=गणेश

उमा+ईश (आ+इ=ए) उम+ए+श=उमेश

चंद्र+उदय (अ+उ=ओ) चंद्र+ओ+दय=चंद्रोदय

महा+ऋर्षी (आ+ऋ=अर) महा+अर+र्षी=महर्षी

देव+ऋर्षी (अ+ऋ=अर) देव+अर+र्षी=देवर्षी

(2) अ/आ यांच्यापुढे 'ए/ऐ' हे स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल 'ऐ' येतो आणि 'अ' किंवा 'अ' किंवा 'आ' या स्वरापुढे 'ओ/औ' स्वर आल्यास त्याबद्दल 'आ' येतो.

उदा.

एक+एक्य (अ+ए+=ऐ) एक+ऐ+अ= एकैक्य

सदा+ऐव (आ+ऐ=ऐ) सदा+ ऐ+व= सदैव

मत+एक्य (अ+ऐ=ऐ) मत+ऐ+क्य= मतैक्य

प्रजा+ऐक्य (आ+ऐ=ऐ) प्रज+ऐ+क्य= प्रजैक्य

जल+औघ (अ+ओ=औ) जल+औ+घ= जलौघ

गंगा+औघ (आ+औ=औ) गंगा+औ+घ= गंगौघ

(3) इ.उ,ऋ (र्हवस्व/दीर्घ) यांच्यापुढे विजातीय स्वर आल्यास 'इ/ई' बद्दल 'य' हा वर्ण येवून पुढील स्वर त्यात मिसळतो. 'उ/ऊ' बद्दल 'व' हा वर्ण येवून पुढील स्वर त्यात मिसळतो. 'ऋ' बद्दल 'र' हा मिसळून संधी होते.

उदा.

प्रीती+अर्थ (ई+अ+र्थ) प्रीत्यर्थ

इति+आदी (इ+आ+दी) इत्यादी

अति+उत्तम (इ+उ+त्तम) अत्युतम

प्रति+एक (इ+ए+क) प्रत्येक

मनू+अंतर (उ+अ+तर) मन्वंतर

पितृ+आज्ञ (ऋ+आ+ज्ञा) पित्राज्ञा

(4) ए,ऐ,ओ,औ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे अय,आय,अवी.आवि असे आदेश होवून पुढील त्यात मिसळतो.

उदा.

ने+अन (ए+अ=अय) न+अय+न = नयन

गै+अन (ऐ+अ=आय) ग+आय+न = गायन

गो+ईश्र्वर (ओ+ई=अवी) ग+अवी+श्वर = गवीश्र्वर

नौ+इक ( औ+इ=आवि) न+आवि+क = नाविक

व्यंजन संधी :

एका पाठोपाठ एक येणारे व्यंजन किंवा स्वर यांच्या एकत्र होण्याच्या क्रियेला 'व्यंजनसंधी' म्हणतात.

उदा.

सत्+जन = सज्जन (व्यंजन + व्यंजन = व्यंजन संधी)

चित्+आनंद = चिदानंद (व्यंजन + स्वर = व्यंजन संधी)

नियम -

(1) पहिल्या 5 वर्गापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापूढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होतो. यालाच 'प्रथम व्यंजन संधी' असे म्हणतात.
उदा.
विपद्+काल = द्+क= त्क = विपत्काल

वाग्+पति = ग्+प= क्प = वाक्पती

क्षुध्+पिपासा= ध्+प्= त्+प्= त्प = क्षुत्पिपासा

(2) पहिल्या पाच वर्गातील कठोर व्यंजनापूढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदु व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते त्याला *'तृतीय व्यंजन संधी'* असे म्हणतात.
48👍2
🔹 समानार्थी शब्द 🔹

▪️निफड - गरज, जरूरी, लकडा
 
▪️निका - चांगला, पवित्र, योग्य, शुद्ध
 
▪️निमंत्रण - अवतण, आमंत्रण, बोलावण
 
▪️पंगत - भोजन, रांग, ओळ
 
▪️पत्नी - भार्या, बायको, अर्धांगी, अस्तुरी
 
▪️पान - पर्ण, पत्र, दल
 
▪️परंपरा - प्रथा, पद्धत, चाल, रीत
 
▪️प्रभात - उषा, पहाट, प्रात:काल
 
▪️पाठ - नियम, धडा, पुन्हा-पुन्हा म्हणने, पार्श्वभाग
 
▪️पार्वती - उमा, दुर्गा, गौरी, भवानी
 
▪️पुष्प - कुसुम, सुमन, फूल
 
▪️पिता - जनक, तीर्थरुप, बाप, वडील
 
▪️प्रताप - शौर्य, बहादुरी, पराक्रम, सामर्थ्य
 
▪️पुरुष - मर्द, नर, मनुष्य
 
▪️पाखरू - पक्षी, खग, द्विज, विहंग
 
▪️पुरातन - जुनाट, प्राचीन, पूर्वीचा
 
▪️प्रख्यात - ख्यातनाम, प्रसिद्ध, नामांकित
 
▪️पाय - चरण, पाऊल, पद
 
▪️पोपट - शुक, रावा, राघू, कीर
 
▪️प्रौढ - प्रगल्भ, घीट, शहाणा
 
▪️प्रवाह - पाझर, धार, प्रस्त्रव
 
▪️फाकडा - माणीदार, हुशार, ऐटबाज, रुबाबदार
 
▪️फट - चीर, खाच, भेग
 
▪️फोड - सूज, फुगलेला भाग, फुगारा
 
▪️फरक - अंतर, भेद
----------------------------------------------
मराठी व्याकरण विषयक अधिक माहितीसाठी जॉईन करा @Marathi

https://t.me/Marathi
39🙏1
💢 शब्दसिद्धी व त्याचे प्रकार💢

शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच
'शब्दसिद्धी' असे म्हणतात.

शब्दांचे खालील प्रकार पडतात.

🌀 तत्सम शब्द

जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बादल न होता आले आहेत त्यांना 'तत्सम शब्द ' असे म्हणतात.

💠उदा.
राजा, भूगोल, चंचू, पुष्प, परंतु, भगवान, कर, पशु, अंध, जल, दीप, पृथ्वी, तथापि, कवि, वायु, भीती, पुत्र, अधापि, मति, पुरुष, शिशु, गुरु, मधु, गंध, पिता, कन्या, वृक्ष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, विद्वान, संत, निस्तेज, कर, जगन्नाथ, दर्शन, उमेश, स्वामि, मंदिर, तिथी, सूर्य, स्वल्प, घृणा, पिंड, कलश, प्रात:क, दंड, पत्र, ग्रंथ, उत्तम, आकाश पाप, मंत्र, शिखर, सूत्र, कार्य, होम, गणेश, सभ्य, कन्या, देवर्षि, वृद्ध, संसार, प्रीत्यर्थ, कविता, उपकार, परंतु, गायन, अश्रू, प्रसाद, अब्ज, राजा, संमती, घंटा, पुण्य, बुद्धी, अभिषेक, संगती, श्रद्धा, प्रकाश, सत्कार, देवालय, तारा, समर्थन, नयन, उत्सव, दुष्परिणाम, नैवेध.

🌀 तदभव शब्द

जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येतांना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना 'तदभव शब्द' असे म्हणतात.

💠उदा.
घर, पाय, भाऊ, सासू, सासरा, गाव, दूध, घास, कोवळा, ओळ, काम, घाम, घडा, फुल, आसू, धुर, जुना, चाक, आग, धूळ, दिवा, पान, वीज, चामडे, तहान, अंजली, चोच, तण, माकड, अडाणी, उधोग, शेत, पाणी, पेटी, विनंती, ओंजळ, आंधळा, काय, धुर, पंख, ताक, कान, गाय.

🌀देशी/देशीज शब्द

महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणार्या शब्दांना 'देशी शब्द' असे म्हणतात.

💠उदा.
झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजारी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकूण, कंबर, पीठ, डोळा, मुलगा, लाजरा, वेढा, गार, लाकूड, ओटी, वेडा, अबोला, लूट, अंघोळ, उडी, शेतकरी, आजार, रोग, ओढा, चोर, वारकरी, मळकट, धड, ओटा, डोंगर.

🌀 परभाषीय शब्द :

संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना ' परभाषीय शब्द' असे म्हणतात.

🌀1) तुर्की शब्द

💠कालगी, बंदूक, कजाग

🌀2) इंग्रजी शब्द

💠टी.व्ही., डॉक्टर, कोर्ट, पेन, पार्सल, सायकल, स्टेशन, हॉस्पिटल, बस, फाईल, रेल्वे, पास, ब्रेक, कप, मास्तर, फी, बॉल, स्टॉप, ऑफिस, एजंट, टेलिफोन, सिनेमा, सर्कस, पॅंट, बॅट, पोस्ट, तिकीट, ड्रायव्हर, मोटर, कंडक्टर, नंबर, टीचर, सर, मॅडम, पेपर, नर्स, पेशंट, इंजेक्शन, बटन ड्रेस, ग्लास, इत्यादी.

🌀 3) पोर्तुगीज शब्द
बटाटा, तंभाखू, पगार, बिजागरी, कोबी, हापूस, फणस, घमेले, पायरी, लोणचे, मेज, चावी, तुरुंग, तिजोरी, काडतुस.

🌀4) फारशी शब्द
💠रवाना, समान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख, सौदागार, कामगार, गुन्हेगार, फडवणीस, बाम, लेजीम, शाई, गरीब, खानेसुमारी, हजार, शाहीर, मोहोर, सरकार, महिना हप्ता.

🌀 5) अरबी शब्द
अर्ज, इनाम, हुकूम, मेहनत, जाहीर, मंजूर, शाहीर, साहेब, मालक, मौताज, नक्कल, जबाब, उर्फ, पैज, मजबूत, शहर, नजर, खर्च, मनोरा, वाद, मदत, बदल.


🌀6) कानडी शब्द
हंडा, भांडे, अक्का, गाजर, भाकरी, अण्णा, पिशवी, खोली, बांगडी, लवंग, अडकित्ता, चाकरी, पापड, खलबत्ता, किल्ली, तूप, चिंधी, गुढी, विळी, आई, रजई, तंदूर, चिंच, खोबरे, कणीक, चिमटा, नथ, तांब्या, उडीद, पाट, गाल, काका, टाळू, गादी, खिडकी, गच्ची, बांबू, ताई, गुंडी, कांबळे.

🌀7) गुजराती शब्द
सदरा, दलाल, ढोकळा, घी, डबा, दादर, रिकामटेकडा, इजा, शेट.

🌀8) हिन्दी शब्द
बच्चा, बात, भाई, दिल, दाम, करोड, बेटा, मिलाप, तपास, और, नानी, मंजूर, इमली.

🌀 9) तेलगू शब्द
ताळा, अनरसा, किडूकमिडूक, शिकेकाई, बंडी, डबी.

🌀10) तामिळ शब्द
चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा.


....,.......
71👌2🔥1
🔹शुद्ध शब्द

1. मही
2. अतिथि
3. पवित्र
4. मैत्री
5. दिशा
6. स्थैर्य
7. सूर्य
8. परीक्षा
9. शकुन
10. परीट
11. पंचारती
12. शिक्षण
13. इतिहास
14. पारितोषिक
15. वार्षिक
--------------------------------
जॉईन करा @Marathi
45
🔹वर्ण

अर्धस्वर:
य्,र्,ल्,व् यांची उच्चारस्थाने अनुक्रमे इ,ऋ,लृ,उ, या स्वरांच्या उच्चरस्थानासारखीच असल्याने या व्यंजनांचा वरील स्वरांशी निकटचा संबंध आहे. म्हणून त्यांना अर्धस्वर म्हणतात. अर्धस्वर एकूण चार आहेत, स्वरांच्या क्रमानुसार अर्धस्वरांचा क्रम य,व,र,ल असा आहे.

उष्मे:
श्,ष्,स यांना उष्मे म्हणतात. वरील वर्णाचा उचार करतांना घर्षणामुळे उष्णता निर्माण होते,. त्यामुळे त्यांना उष्मे घर्षक असे म्हणतात.

महाप्राण :
ह् वर्णाचा उच्चार करताना फुफ्फूसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून या वर्णाला महाप्राण असे म्हणतात.
,ख्,घ्,छ,झ्,ठ,ढ,थ्,ध,फ,भ्,श्,ष्,स, या वर्णात ह, या वर्णाची छटा असल्याने त्यांना सुध्दा महाप्राण असे म्हणतात. मराठीतील जो वर्ण इंग्रजीत लिहीतांना H अक्षर वापरावे लेगते त्या सर्व वर्णाना महाप्राण म्हणातात. बाकीचे अल्पप्राण आहेत.

उदा. ख – kh महाप्राण, ग – g अल्पप्राण ,
अपवाद : स – s महाप्राण, च – ch अल्पप्राण
क्,ग्,ङ,च्,ज्,त्र,ट,ड,ण्,त्,द,न्,प्,ब्,म्,य,र,ल्,व्,ळ, या व्यंजनाना अल्पप्राण असे म्हणतात. या वर्णात ह, ची छटा नसते,

स्वतंत्र वर्ण : ळ, हा मराठीतील स्वतंत्र वर्ण मानला जातो, तो इतर भाषेकडून घेतलेला नाही.
39
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯 (★|| 🇪 🇲 🇵 🇸 🇨 🇰 🇦 🇹 🇹 🇦 ||★ )
15
🔹उभयान्वयी अव्यय

1. प्रधानत्व सूचक
2. गौणत्व सूचक

1. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय :-

अर्थाच्या दृष्टीने दोन स्वतंत्र वाक्य जोडणाऱ्या शब्दाला प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणतात.

A) समुच्चय बोधक :- आणि , व , शिवाय, अन्, आणखी , न् , नि , आणिक

B) विकल्प बोधक :- अथवा , वा , की , किंवा , अगर

C) न्यूनत्वबोधक :- परंतु , पण , बाकी , किंतु , परी

D) परिणामबोधक :- म्हणून , सबब , याकरिता , यस्तव , तेंव्हा , तस्मात , की

2) गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय :-

एक वाक्य प्रधान व दूसरे वाक्य गौण हे त्यावर अवलंबून असते . त्यास गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय म्हणतात .

A) स्वरूपबोधक :- म्हणून , म्हणजे , की , जे

B) उद्देशबोधक :- म्हणून , सबब , यास्तव , कारण , की

C) संकेतबोधक :- जर - तर , जरी -तरी म्हणजे , की. , तर , यद्यपी - तथापी

D) कारणबोधक :- कारण , कारण की , की , का
-----------------------------------------------
जॉईन करा @Marathi
57
🔹शब्दसंपत्ती

#समानार्थी शब्द : भाग -1

1) ऐदी- आळशी, मंद, सुस्त

2) ऐट- नखरा, डौल, ताठा, मिजास, दिमाख, रुबाब

3) ऐषआराम- चैन , सुखोपभोग

4) ऐसपैस- विस्तीर्ण, प्रशस्त , अमर्याद

5) ओबडधोबड- बेडौल, खडबडीत, रांगडे
-----------------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे मराठी व्याकरण चॅनेल @Marathi
24
🔹शब्दसंपत्ती

#समानार्थी शब्द : भाग-२

1) ओझे - भार, बोजा, वजन, जबाबदारी, काळजी

2) ओंड - लोंगर, टरफल

3) ओढाळ - उनाड, भटक्या

4)ओढ - माया , लळा, कल

5) अंत - शेवट, मरण, मृत्यू, अखेर
-----------------------------------------
● वाचा भाग 1- https://t.me/marathi/646

अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे मराठी व्याकरण चॅनेल @Marathi
20👍3
🔹शब्दसंपत्ती

#विरुद्धार्थी शब्द : भाग -१

1) अस्ताव्यस्त × व्यवस्थित

2) उत्कर्ष × अपकर्ष

3) तीक्ष्ण × बोथट

4)चंचल × स्थिर

5)उणे × अधिक
-----------------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे मराठी व्याकरण चॅनेल @Marathi
11
🔹शब्दसंपत्ती

#विरुद्धार्थी शब्द : भाग -२

1) कीर्ती -- अपकीर्ती

2) गतकाल -- भविष्यकाळ

3) गुळगुळीत -- खडबडीत

4) उतरण -- चढण

5)जन्म -- मृत्यू
-----------------------------------------
विरुद्धार्थी शब्द : भाग 1-
https://t.me/marathi/647
-----------------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे मराठी व्याकरण चॅनेल @Marathi
21
🔹शब्दसंपत्ती

#वाक्प्रचार : भाग -१

1) अंगावरून वारे जाणे - शरीराचा उजवा किंवा दावा भाग लुळा पडणे.

2) अग्निकाष्ठ भक्षण करणे -- स्वतःला जाळून घेऊन मरणे.

3)अग्निदिव्य करणे -- फार मोठ्या संकटातून सुटका होणे.

4) अग्निप्रवेश करणे -- स्वतः चितेवर चढून जाळून घेऊन मरणे.

5) अचंबा वाटणे-- आचार्य वाटणे.
-----------------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे मराठी व्याकरण चॅनेल @Marathi
28👏2
#समानार्थी_शब्द
-------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल @Marathi
11
#वाक्प्रचार
-------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल @Marathi
11
#विरुद्धार्थी_शब्द
-------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल @Marathi
14
#विरुद्धार्थी_शब्द
-------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल @Marathi
13
#समानार्थी_शब्द
------------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल @Marathi
16🤔5