मराठी व्याकरण
224K subscribers
8.51K photos
36 videos
338 files
589 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
From Marathi Mhani app:

जे पिंडी ते ब्रम्हांडी.

Meaning:
जी गोष्ट आपल्याजवळ आहे ती सगळीकडे आहे.
👍103
From Marathi Mhani app:

जेथे भरे डेरा तोच गाव बरा.

Meaning:
ज्या गावात आपला चरितार्थ चालेल तोच गाव उत्तम.
6
From Marathi Mhani app:

ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी.

Meaning:
एकाच गावातील लोक एकमेकांना चांगलेच ओळखतात.
13
From Marathi Mhani app:

ज्याचे पोट दुखेल तोच ओवा मागेल.

Meaning:
ज्याला दु:ख भोगावे लागते, त्यालाच त्याची कल्पना असते.
9
From Marathi Mhani app:

ज्याला नाही अक्कल, त्याची घरोघरी नक्कल.

Meaning:
मूर्ख किंवा निर्बुद्ध माणसाचा घरोघरी उपहास होतो.
3
🔹सराव प्रश्नसंच

1. क्रियापदावरून फक्त काळाच बोध होत असेल म्हणजेच फक्त क्रियापदाचा मूळ अर्थ समजत असेल तर अशा क्रियापदाला ........ क्रियापद असे म्हणतात.

स्वार्थ
आज्ञार्थ
विध्यर्थ
संकेतार्थ
उत्तर : स्वार्थ

2. वाक्याचा काळ ओळखा - 'मी नदीकाठी खेळत असतो'

साधा भूतकाळ
अपूर्ण भूतकाळ
पूर्ण भूतकाळ
रिती भूतकाळ
उत्तर : पूर्ण भूतकाळ

3. विधर्थी क्रियापदावरून कोणता आख्यातविकार ओळकता येतो?

ऊ-आख्यात
ई-लाख्यात
लाख्यात
वाख्यात
उत्तर : ऊ-आख्यात

4. 'चमचम' - हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे?

गतिदर्शक
अनुकरणदर्शक
निश्चयदर्शक
प्रकारदर्शक
उत्तर : गतिदर्शक

5. वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शविणार्‍या अविकारी शब्दाला ....... अव्यय असे म्हणतात.

शब्दयोगी
उभयान्वयी
केवलप्रयोगी
शब्दसिद्धी
उत्तर : केवलप्रयोगी

6. कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते तिलाच व्याकरणात ....... असे म्हणतात.

क्रिया विशेषण
प्रयोग
अव्यय
आख्यात विकार
उत्तर : अव्यय

7. ज्या तत्पुरुषात पूर्वपदाच्या सप्तमीच्या 'ई' विभक्ती प्रत्याचा लोप होत नाही, त्यास ....... तत्पुरुष असे म्हणतात.

अलुक
उपपद
कृदत
नत्र
उत्तर : कृदत

8. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा ...... हा अलंकार होतो.

पर्यायोक्ती
सार
अन्योक्ती
भ्रांतिमान
उत्तर : भ्रांतिमान

9. अक्षरगण वृत्ताचे प्रकार ओळखा - अक्षरे - 12, गण - य,य,य,य.

1
1
1
1
उत्तर : 1

10. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

आशिर्वाद
आकृती
विहीर
अंतर्मुख
उत्तर : आकृती

-----------–--------------------------
मराठी व्याकरण विषयक अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे @marathi चॅनेल.

Telegram.me/marathi
41👍2🤔2🔥1
मराठी म्हणी भाग

@marathi

अगं अगं म्हशी मला कोठे नेशी -
स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे.

आपला हात जगन्नाथ -
आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते.

अति तेथे माती -
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो.

आयत्या बिळात नागोबा -
दुसर्‍याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे.

आईजीच्या जीवावर बाईजी उदार -
दुसर्‍याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे.

आपल्याच पोळीवर तूप ओढणे -
फक्त स्वत:चाच तेवढा फायदा साधून घेणे.

आंधळे दळते कुत्रं पीठ खाते -
एकानं काम करावं आणि दुसर्‍यांनं त्याचा फायदा घ्यावा.

आधी पोटोबा मग विठ्ठोबा -
आदी पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा.

अडला हरी गाढवाचे पाय धरी -
एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते.

आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे -
अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.

अति शहाणा त्याचा बैल रिकामा -
जो माणूस फार शहाणपणा करायला जातो. त्याचे मुळीच काम होत नाही.

आधी शिदोरी मग जेजूरी -
आधी भोजन मग देवपूजा

असतील शिते तर जमतील भुते -
एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात.

आचार भ्रष्टी सदा कष्टी -
ज्याचे आचार विचार चांगले नसतात. तो नेहमी दु:खी असतो.

आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली -
अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती.

आईचा काळ बायकोचा मवाळ -
आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा

आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास -
मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे.

आपलेच दात आपलेच ओठ -
आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीचे स्थिती निर्माण होणे.

अंथरूण पाहून पाय पसरावे -
आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.

आवळा देऊन कोहळा काढणे -
क्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे.

आलीया भोगाशी असावे सादर -
कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे

अचाट खाणे मसणात जाणे -
खाण्यापिण्यात अतिरके झाल्यास परिणाम वाईट होतो.

आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते -
अगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते.

आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला -
ज्या दोषाबद्दल आपण दुसर्‍याला हसतो. तोच दोष आपल्या अंगी असणे.

आपला तो बाब्या दुसर्‍याचं ते कारटं -
स्वत:चे चांगले आणि दुसर्‍यांचे वाईट अशी प्रवृत्ती असणे.

अळी मिळी गुप चिळी -
रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे.

अहो रूपम अहो ध्वनी -
एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलटपक्षी खोटी स्तुती करणे. 
52
जॉईन करा @Marathi
9
जॉईन करा @Marathi
16👌1
जॉईन करा @Marathi
👍76🙏2👌1
जॉईन करा @Marathi
👍107👌1
जॉईन करा @Marathi
20👍5
जॉईन करा @Marathi
30👍4🔥4👌1
लक्षणा (लक्ष्यार्थ) :- 

ज्या शब्दशक्तीमध्ये शब्दांचा मूळ अर्थ लक्षात न घेता, त्याच्याशी सुसंगत असा दुसराच अर्थ घ्यावा लागतो. मनात शंका येते, हे कसे शक्य आहे तेव्हा ती शब्द लक्षणा असते.

उदा. आम्ही ज्वारी खातो. याचा अर्थ आम्ही ज्वारीपासून केलेले पदार्थ खातो. शब्दाचा मूळ अर्थ न घेता त्याला साजेसा जो दुसरा अर्थ घेतला जातो त्याला ‘लक्ष्यार्थ’ म्हणतात.

1) बाबा ताटावर बसले.

2) घरावरून हत्ती गेला.

3) आम्ही आजकाल ज्वारी खातो.

4) मी शेक्सपिअर वाचला.

5) सूर्य बुडाला.

6) पानिपतावर सव्वा लाख बांगड्या फुटल्या.

 
18🔥3🙏1
"ल" आणि "ळ" ही दोन स्वतंत्र अक्षरे.
या दोन अक्षरांचे उच्चार जवळपास पूर्ण मिळते जुळते.
त्यामुळे अनेकदा "ळ" चा उच्चार काही लोक सहजपणे "ल" सारखा पण "ल" नाही, "ल" व "ळ" च्या मधला करतात. तर काही वेळेस "ल" करतात.

"ल" हा उच्चार जगातील सर्व भाषांमधे आहे.
पण "ळ" हा उच्चार भारताबाहेर फक्त नेपाळमधे आहे, बाकी जगात कोठेही नाही.
भारतातदेखील "ळ" हा उच्चार सर्वत्र नाही.

संस्कृत मधे सध्या "ळ" नाही.
हिंदी, बंगाली, आसामी मधे "ळ" नाही.

सिंधी, गुजराती मधे "ळ" आहे,पण माझ्या अंदाजानुसार फारसा वापरात नाही.

मराठी व दक्षिण भारतातील सर्व भाषात "ळ" आहे व वापर भरपूर आहे.

"ल" व "ळ" च्या उच्चारातील सारखेपणा मुळे "ळ" च्या ऐवजी "ल" बोलले लिहिले तर कुठे बिघडते असे अनेकांना वाटत असेल कदाचित.

हिंदीत कमल व मराठीत कमळ

"ल" काय, "ळ" काय..
काय फरक पडला?

पण कसे मराठीत होत नाही. "ल" की "ळ" यावरून अर्थात फरक पडतो.

T.me/marathi

काही शब्द पाहू.

अंमल - राजवट
अंमळ - थोडा वेळ

वेळ time
वेल- झाड, सायलीचा वेल वगैरे

खल- गुप्त चर्चा किंवा
खल बत्ता मधील खल
खळ- गोंद

पाळ - कानाची पाळ
पाल -. सरडा, पाल वगैरे

नाल.- घोड्याच्या, बैलांच्या खुरांना मारतात ती धातूची पट्टी
नाळ - बाळ आईच्या पोटात असताना अन्न पुरवठा वगैरे करणारा बेंबीशी संबंधीत अवयव

कल - निवडणूकीचा कल, झुकाव
कळ - वेदना,पोटातील कळ किंवा यंत्राचे बटण

लाल - लाल रंग
लाळ - थुंकी

ओल - पावसात भिंतीला येणारा ओलसरपणा
ओळ - रेघ

मल - शौच
मळ - कानातला, त्वचेचा मळ

माल - सामान
माळ - मण्यांची माळ, हार

चाल - चालण्याची ढब....त्याची चाल ऐटदार आहे वगैरे
चाळ - नर्तकीच्या पायातील घुंगरांचा दागिना

दल.- राजकीय पक्ष, संघटना--जनता दल, पुरोगामी लोकशाही दल
दळ - भाजी अथवा फळाचा गर, वांग्याचे दळ वगैरे

छल.- कपट
छळ - त्रास

काल - yesterday
काळ - कालखंड वगैरे, मृत्यु

गलका - ओरडा आरडा
गळका - पाण्याचा पाईप लिकेज असणे वगैरे

खाली म्हणजे वरतीच्या विरुद्ध under, down,

हिंदीत खाली म्हणजे रिकामे

मराठीत गाडी रिकामी होते........खाली होत नाही.

तरी आपली भाषा जपा इंग्रजी, हिंदीचे आक्रमण रोखा.

इंग्रजी, हिंदीच्या नादी लागून थाळीला थाली म्हणू नका.

जॉईन करा @Marathi

"ळ" जपा.............मराठीचे सौंदर्य जपा....!!!
44🔥5
Forwarded from SpardhaGram
🟢 इतिहास अभ्यासक्रम व Strategy
✍🏻 राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे

By : Prof. Sachin Gulig

🗓 दिनांक:- 24 जानेवारी 2026
वेळ:- सायंकाळी 7वा.

🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.

लिंक
https://youtu.be/45R6MKv0tps
https://youtu.be/45R6MKv0tps
========
🎯 Like, Share & Subscribe
8
🔹शब्दसमूहाबद्दल एक शब्द :-

१) जे विसरता येणार नाही असे - अविस्मरणीय
२) परमेश्वराचे अस्तित्व मानणारा - आस्तिक
३) जाणून घेण्याची इच्छा असलेला - जिज्ञासू
४) सतत उद्योग करणारा - दीर्घोद्योगी
५) दुसऱ्याच्या जिवावर जगणारे - परोपजीवी
६) गावाचा कारभार - गावगाडा
७) वाजवीपेक्षा जास्त खर्च करणारा - उधळ्या
८) तीन रस्ते मिळतात ती जागा - तिठा
९) मोफत पाणी मिळण्याची व्यवस्था - पाणपोई
१०) घोड्यांना बांधण्याची जागा - पागा
10🔥3
🔹समान अर्थाचे शब्द

२) समान अर्थाचे शब्द :- समानार्थी शब्द म्हणजे एका शब्दाशी समसमान अर्थव्याप्ती आणि वापराची व्याप्ती असलेला, त्याच भाषेतला दुसरा शब्द किंवा शब्दसमूह.

१) आनंद = हर्ष, मोद, संतोष
२) दिवस = वार, वासर, अहन
३) वारा = अनिल, पवन, वायू, समीरण
४) सोने = कनक, सुवर्ण, हेम, कांचन
५) मुलगा = पुत्र, सुत, नंदन, तनुज
६) पान = पर्ण, पत्र, पल्लव
७) नदी = सरीता, तटिनी, तरंगिणी
८) अनल = विस्तव, पावक, अग्नी, वन्ही
९) तोंड = आनन , मुख, वदन
१०) दैत्य = दानव, राक्षस, असुर
12🔥4
🔹विरुद्धार्थी शब्द

३) विरुद्धार्थी शब्द :-

१) इहलोक x परलोक
२) तेजी x मंदी
३) पुरोगामी x प्रतिगामी
४) श्रेष्ठ x कनिष्ठ
५) स्वच्छ x घाणेरडा
६) सुटका x अटक
७) सुभाषित x कुभाषित
८) हिरमुसलेला x उत्साही
९) स्वार्थ x परमार्थ
१०) विलंब x त्वरा
16👍4🔥3