मराठी व्याकरण
223K subscribers
8.5K photos
36 videos
337 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
"ल" आणि "ळ" ही दोन स्वतंत्र अक्षरे.
या दोन अक्षरांचे उच्चार जवळपास पूर्ण मिळते जुळते.
त्यामुळे अनेकदा "ळ" चा उच्चार काही लोक सहजपणे "ल" सारखा पण "ल" नाही, "ल" व "ळ" च्या मधला करतात. तर काही वेळेस "ल" करतात.

"ल" हा उच्चार जगातील सर्व भाषांमधे आहे.
पण "ळ" हा उच्चार भारताबाहेर फक्त नेपाळमधे आहे, बाकी जगात कोठेही नाही.
भारतातदेखील "ळ" हा उच्चार सर्वत्र नाही.

संस्कृत मधे सध्या "ळ" नाही.
हिंदी, बंगाली, आसामी मधे "ळ" नाही.

सिंधी, गुजराती मधे "ळ" आहे,पण माझ्या अंदाजानुसार फारसा वापरात नाही.

मराठी व दक्षिण भारतातील सर्व भाषात "ळ" आहे व वापर भरपूर आहे.

"ल" व "ळ" च्या उच्चारातील सारखेपणा मुळे "ळ" च्या ऐवजी "ल" बोलले लिहिले तर कुठे बिघडते असे अनेकांना वाटत असेल कदाचित.

हिंदीत कमल व मराठीत कमळ

"ल" काय, "ळ" काय..
काय फरक पडला?

पण कसे मराठीत होत नाही. "ल" की "ळ" यावरून अर्थात फरक पडतो.

T.me/marathi

काही शब्द पाहू.

अंमल - राजवट
अंमळ - थोडा वेळ

वेळ time
वेल- झाड, सायलीचा वेल वगैरे

खल- गुप्त चर्चा किंवा
खल बत्ता मधील खल
खळ- गोंद

पाळ - कानाची पाळ
पाल -. सरडा, पाल वगैरे

नाल.- घोड्याच्या, बैलांच्या खुरांना मारतात ती धातूची पट्टी
नाळ - बाळ आईच्या पोटात असताना अन्न पुरवठा वगैरे करणारा बेंबीशी संबंधीत अवयव

कल - निवडणूकीचा कल, झुकाव
कळ - वेदना,पोटातील कळ किंवा यंत्राचे बटण

लाल - लाल रंग
लाळ - थुंकी

ओल - पावसात भिंतीला येणारा ओलसरपणा
ओळ - रेघ

मल - शौच
मळ - कानातला, त्वचेचा मळ

माल - सामान
माळ - मण्यांची माळ, हार

चाल - चालण्याची ढब....त्याची चाल ऐटदार आहे वगैरे
चाळ - नर्तकीच्या पायातील घुंगरांचा दागिना

दल.- राजकीय पक्ष, संघटना--जनता दल, पुरोगामी लोकशाही दल
दळ - भाजी अथवा फळाचा गर, वांग्याचे दळ वगैरे

छल.- कपट
छळ - त्रास

काल - yesterday
काळ - कालखंड वगैरे, मृत्यु

गलका - ओरडा आरडा
गळका - पाण्याचा पाईप लिकेज असणे वगैरे

खाली म्हणजे वरतीच्या विरुद्ध under, down,

हिंदीत खाली म्हणजे रिकामे

मराठीत गाडी रिकामी होते........खाली होत नाही.

तरी आपली भाषा जपा इंग्रजी, हिंदीचे आक्रमण रोखा.

इंग्रजी, हिंदीच्या नादी लागून थाळीला थाली म्हणू नका.

जॉईन करा @Marathi

"ळ" जपा.............मराठीचे सौंदर्य जपा....!!!
95👍15🤔3🔥2
🔹शब्दसमूहाबद्दल एक शब्द :-

१) जे विसरता येणार नाही असे - अविस्मरणीय
२) परमेश्वराचे अस्तित्व मानणारा - आस्तिक
३) जाणून घेण्याची इच्छा असलेला - जिज्ञासू
४) सतत उद्योग करणारा - दीर्घोद्योगी
५) दुसऱ्याच्या जिवावर जगणारे - परोपजीवी
६) गावाचा कारभार - गावगाडा
७) वाजवीपेक्षा जास्त खर्च करणारा - उधळ्या
८) तीन रस्ते मिळतात ती जागा - तिठा
९) मोफत पाणी मिळण्याची व्यवस्था - पाणपोई
१०) घोड्यांना बांधण्याची जागा - पागा
73👌10👍8🙏7👏6
🔹समान अर्थाचे शब्द

२) समान अर्थाचे शब्द :- समानार्थी शब्द म्हणजे एका शब्दाशी समसमान अर्थव्याप्ती आणि वापराची व्याप्ती असलेला, त्याच भाषेतला दुसरा शब्द किंवा शब्दसमूह.

१) आनंद = हर्ष, मोद, संतोष
२) दिवस = वार, वासर, अहन
३) वारा = अनिल, पवन, वायू, समीरण
४) सोने = कनक, सुवर्ण, हेम, कांचन
५) मुलगा = पुत्र, सुत, नंदन, तनुज
६) पान = पर्ण, पत्र, पल्लव
७) नदी = सरीता, तटिनी, तरंगिणी
८) अनल = विस्तव, पावक, अग्नी, वन्ही
९) तोंड = आनन , मुख, वदन
१०) दैत्य = दानव, राक्षस, असुर
72👍23🔥16👏9👌9
🔹विरुद्धार्थी शब्द

३) विरुद्धार्थी शब्द :-

१) इहलोक x परलोक
२) तेजी x मंदी
३) पुरोगामी x प्रतिगामी
४) श्रेष्ठ x कनिष्ठ
५) स्वच्छ x घाणेरडा
६) सुटका x अटक
७) सुभाषित x कुभाषित
८) हिरमुसलेला x उत्साही
९) स्वार्थ x परमार्थ
१०) विलंब x त्वरा
54👌8
🔹शब्द एक - अर्थ अनेक

४) शब्द एक - अर्थ अनेक :-

१) पक्ष - पंख, बाजू, भाग, श्राद्ध
२) पूर - नगर, शहर, पाण्याचा पूर
३) वर - पती, आशीर्वाद
४) नाद - आवाज, छंद, आवड
५) वजन - माप, वचक, प्रतिष्ठा
६) खूण - चिन्ह, सूचना, इशारा, संकेत
७) काळ - वेळ, मृत्यू
८) मान - आदर, स्वाभिमान, शरीराचा एक अवयव
९) तीर - नदीचा काठ, बाण
१०) दल - सैन्याची तुकडी, फुलाची पाकळी
40👍7🤔2
🔹समूहवाचक शब्द

५) समूहवाचक शब्द :-

१) खेळाडूंचा - संघ
२) भाकऱ्यांची - चवड
३) तारकांचा - पुंज
४) फळांचा - घोस
५) पक्ष्यांचा - थवा
६) प्राण्यांचा - जथा
७) मुलांचा, मुलींचा - घोकळा
८) हत्तींचा - कळप
९) दुर्वांची - जुडी
१०) किल्ल्यांचा - जुडगा
63👍14🔥3
🔹आलंकारिक शब्दयोजना

६) आलंकारिक शब्दयोजना :-

१) अतिशय बुद्धिमान व्यक्ती - ब्रह्मदेव
२) अप्राप्य गोष्ट - मृगजळ
३) अत्यंत रागीट माणूस - जमदग्नी
४) अत्यंत कुरूप स्त्री - कुब्जा
५) वेडेवाकडे बोलणे - मुक्ताफळे
६) तात्पुरती विरक्ती - स्मशानवैराग्य
७) कलहप्रिय स्त्री - कैकेयी
८) एकत्र येऊन कारस्थान करणारे लोक - चांडाळचौकडी
९) नेहमी सत्य बोलणारा धर्मनिष्ठ माणूस - धर्मराज
१०) गुणकारी उपाय - रामबाण
66👍15
★|| मराठी व्याकरण ||★

🍀📝 शब्दशोध 📝🍀


खालील शब्दांचे किंवा शब्दसमूहाचे अर्थ सांगा.उत्तर केवळ चार अक्षरी शब्द हवा व प्रत्येक शब्दात शेवटचे दोन अक्षरे
🔹दा र 🔹 असली पाहिजेत.
😊😊 चला प्रयत्न करू या


१) घोडा सांभाळणारा -मोतदार
२) वेत्रधारी- चोपदार
३) ऑफिसर- कामदार
४) रूचकर - चवदार
५) सुंदर - छबीदार
६) चांगल्या घाटाचा -डौलदार
७) उतरती - ढाळदार
८) मोतद्दार -खासदार
९) सोयरा - नातेदार
१०) शोभिवंत - टुमदार
११) तेजस्वी - पाणीदार
१२) छत्रधर -माहीदार
१३) गच्च भरलेले - भरदार
१४) प्रांतावरचा मुख्य अधिकारी - सुभेदार
१५) अधिन -ताबेदार
___________________________
आमचे मराठी व्याकरण चॅनेल जॉईन होण्यासाठी येथे क्लीक करा telegram.me/Marathi
54👍6👌3
🔹संधी व त्याचे प्रकार

ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो यास 'जोडाक्षर' म्हणतात.

उदा.

विधालय : धा : द + य + आ

पश्चिम : श्चि : श + च + इ

आम्ही : म्ही : म + ह + ई

शत्रू : त्रू : त + र + ऊ

संधी:

स्वरसंधी -

जोडशब्द्ध तयार करतांना पहिल्या शब्दातील शेवटचे वर्ण व दुसर्‍या शब्दातील पहिले वर्ण हे एकमेकांत मिसळतात व त्या दोघांबद्दल एक वर्ण तयार होतो वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास 'संधी' असे म्हणतात.



उदा.

ईश्र्वरेच्छा = ईश्र्वर + इच्छा

सूर्यास्त = सूर्य + अस्त

सज्जन = सत् + जन

चिदानंद = चित् + आनंद

संधीचे प्रकार:

संधीचे मुख्य तीन प्रकार आहेत.



स्वर संधी -

एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर त्यांना 'स्वरसंधी' असे म्हणतात किंवा एक पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला स्वरसंधी असे म्हणतात.



दिर्घत्व संधी -

अ + अ = आ

आ + आ = आ

आ + अ = आ

इ + ई = ई

ई + ई = ई

इ + इ = ई

उ + ऊ = ऊ

उ + उ = ऊ

नियम -

(1) 'अ' किंवा 'आ' यांच्यापुढे इ+ई आल्यास त्या दोघांऐवजी 'ए' येतो आणि 'उ' किंवा 'ऊ' आल्यास 'ओ' येतो व ऋण आल्यास 'र' येतो.

उदा.

ईश्र्वर+ईच्छा (अ+इ=ए) ईश्र्वर+ए+च्छा=ईश्र्वरेच्छा

गण+ईश (अ+इ=ए) गण+ए+श=गणेश

उमा+ईश (आ+इ=ए) उम+ए+श=उमेश

चंद्र+उदय (अ+उ=ओ) चंद्र+ओ+दय=चंद्रोदय

महा+ऋर्षी (आ+ऋ=अर) महा+अर+र्षी=महर्षी

देव+ऋर्षी (अ+ऋ=अर) देव+अर+र्षी=देवर्षी

(2) अ/आ यांच्यापुढे 'ए/ऐ' हे स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल 'ऐ' येतो आणि 'अ' किंवा 'अ' किंवा 'आ' या स्वरापुढे 'ओ/औ' स्वर आल्यास त्याबद्दल 'आ' येतो.

उदा.

एक+एक्य (अ+ए+=ऐ) एक+ऐ+अ= एकैक्य

सदा+ऐव (आ+ऐ=ऐ) सदा+ ऐ+व= सदैव

मत+एक्य (अ+ऐ=ऐ) मत+ऐ+क्य= मतैक्य

प्रजा+ऐक्य (आ+ऐ=ऐ) प्रज+ऐ+क्य= प्रजैक्य

जल+औघ (अ+ओ=औ) जल+औ+घ= जलौघ

गंगा+औघ (आ+औ=औ) गंगा+औ+घ= गंगौघ

(3) इ.उ,ऋ (र्हवस्व/दीर्घ) यांच्यापुढे विजातीय स्वर आल्यास 'इ/ई' बद्दल 'य' हा वर्ण येवून पुढील स्वर त्यात मिसळतो. 'उ/ऊ' बद्दल 'व' हा वर्ण येवून पुढील स्वर त्यात मिसळतो. 'ऋ' बद्दल 'र' हा मिसळून संधी होते.

उदा.

प्रीती+अर्थ (ई+अ+र्थ) प्रीत्यर्थ

इति+आदी (इ+आ+दी) इत्यादी

अति+उत्तम (इ+उ+त्तम) अत्युतम

प्रति+एक (इ+ए+क) प्रत्येक

मनू+अंतर (उ+अ+तर) मन्वंतर

पितृ+आज्ञ (ऋ+आ+ज्ञा) पित्राज्ञा

(4) ए,ऐ,ओ,औ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे अय,आय,अवी.आवि असे आदेश होवून पुढील त्यात मिसळतो.

उदा.

ने+अन (ए+अ=अय) न+अय+न = नयन

गै+अन (ऐ+अ=आय) ग+आय+न = गायन

गो+ईश्र्वर (ओ+ई=अवी) ग+अवी+श्वर = गवीश्र्वर

नौ+इक ( औ+इ=आवि) न+आवि+क = नाविक

व्यंजन संधी :

एका पाठोपाठ एक येणारे व्यंजन किंवा स्वर यांच्या एकत्र होण्याच्या क्रियेला 'व्यंजनसंधी' म्हणतात.

उदा.

सत्+जन = सज्जन (व्यंजन + व्यंजन = व्यंजन संधी)

चित्+आनंद = चिदानंद (व्यंजन + स्वर = व्यंजन संधी)

नियम -

(1) पहिल्या 5 वर्गापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापूढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होतो. यालाच 'प्रथम व्यंजन संधी' असे म्हणतात.
उदा.
विपद्+काल = द्+क= त्क = विपत्काल

वाग्+पति = ग्+प= क्प = वाक्पती

क्षुध्+पिपासा= ध्+प्= त्+प्= त्प = क्षुत्पिपासा

(2) पहिल्या पाच वर्गातील कठोर व्यंजनापूढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदु व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते त्याला *'तृतीय व्यंजन संधी'* असे म्हणतात.
104👌4🙏2
समानार्थी शब्द

जॉईन करा @Marathi
27
समानार्थी शब्द

जॉईन करा @Marathi
17
समानार्थी शब्द

जॉईन करा @Marathi
20
समानार्थी शब्द

जॉईन करा @Marathi
13
समानार्थी शब्द

जॉईन करा @Marathi
38
🌹संग्रही ठेवावे असे🌹
टोपणनावाने लिहिणारे मराठी साहित्यिक, गद्यलेखक, कवी


मराठी भाषेत जेव्हा काव्यरचनेला सुरुवात झाली तेव्हापासून कवी बहुधा आपले पहिले नाव कविनाम म्हणून वापरत असत. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, मोरोपंत, सगनभाऊ ही या कवींची प्रथम नावे होती. प्रथम नाव, मधले नाव आणि नंतर आडनाव लिहायची पद्धत नंतरच्या काळात सुरू झाली. आधुनिक काळातदेखील इंदिरा, कवी गोविंद, दत्त, नीरजा, पद्मा, मनमोहन, माधव, मीरा, यशोधरा, विनायक, संजीवनी या कवि-कवयित्रींनी स्वतःच्याच पहिल्या नावाने काव्यलेखन केले. अनेक कवींनी आपल्या सग्यासंबंधींच्या नावाला अग्रज, अनुज, कुमार, जूलियन, तनय, सुत, इत्यादी प्रत्यय लावून आपापली टोपणनावे सिद्ध केली. इतरांनी या पद्धतींशी फारकत घेऊन अत्यंत स्वतंत्र टोपणनावे घेतली आणि आपले काव्यलेखन केले.

१९६० पासून टोपणनावाखाली कविता करण्याची पद्धत मराठीतून बहुधा हद्दपार झाली आहे.

काही मराठी आणि अन्य भारतीय कवींच्या टोपणनावांची ही यादी :


अकिंचन
🌹वासू. ग. मेहेंदळे

अनंततनय
🌹दत्तात्रेय अनंत आपटे

अनंतफंदी
🌹अनंत भवानीबावा घोलप

अनंतसुत विठ्ठल, कावडीबाबा
🌹विठ्ठल अनंत पिंपळगावकर

अनिल
🌹आत्माराम रावजी देशपांडे

अनिल भारती
🌹शान्ताराम पाटील
(या कातरवेळी, तो सलीम राजपुत्र)

अशोक (कवी)
🌹नारायण रामचंद्र मोरे

अज्ञातवासी
🌹दिनकर गंगाधर केळकर

आधुनिक नीळकंठ
🌹बळवंत ऊर्फ बापूसाहेब भवाळकर

आनंद
🌹विनायक लक्ष्मण बरवे

आनंदतनय
🌹गोपाळ आनंदराव देशपांडे

इंदिरा
🌹इंदिरा संत

इंदुकांत
🌹दिनकर नानाजी शिंदे

उदासी/हरिहरमहाराज
🌹नीलकंठ रामकृष्ण पाळंदे

उद्धवचिद्धन/उद्धवचैतन्य/उधोबाबा/
🌹उद्धव xxxx कोकिळ

एकनाथ, एकाजनार्दन
🌹एकनाथ सूर्यनारायण पैठणकर

एक मित्र, विनायक
🌹विनायक जनार्दन करंदीकर

कलापी, बालकवी
🌹त्र्यंबक बापूजी ठोंबरे

कवीश्वरबास
🌹भानूभट/भास्करभट्ट xxxx बोरीकर

कावडीबाबा/अनंतसुत विठ्ठल
🌹विठ्ठल अनंत पिंपळगावकर

कांत
🌹वा.रा. कांत

काव्यशेखर
🌹भास्कर काशीनाथ चांदूरकर

किरात/भ्रमर
🌹कृष्णाजी लक्ष्मण सोमण

कुंजविहारी
🌹🌹हरिहर गुरुनाथ सलगरकर

कुमुदबांधव
🌹स.अ. शुक्ल

कुसुमाग्रज
🌹विष्णू वामन शिरवाडकर

केशवकुमार
🌹प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे

केशवसुत
🌹कृष्णाजी केशव दामले

केशवसुत
🌹नारायण केशव बेहेरे

के.स.रि.
🌹केशव सदाशिव रिसबूड

कोणीतरी
🌹नरहर शंकर रहाळकर

गिरीश
🌹शंकर केशव कानेटकर

गोपिकातनया
🌹कु.द्वारका हिवरगावकर(सौ.मनोरमा श्रीधर रानडे)

गोपीनाथ
🌹गोपीनाथ तळवलकर

गोमा गणेश
🌹गणेश कृष्ण फाटक

गोविंद
🌹गोविंद दत्तात्रय दरेकर

गोविंदपौत्र
🌹श्रीधर व्यंकटेश केतकर

गोविंदप्रभु
🌹गुंडम अनंतनायक राऊळ

गोविंदाग्रज
🌹राम गणेश गडकरी

ग्रेस
🌹माणिक सीताराम गोडघाटे

चक्रधर
🌹श्रीचांगदेव राऊळ

चंद्रशेखर
🌹चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे

चेतोहर
🌹परशुराम नारायण पाटणकर

जगन्नाथ
🌹जगन्नाथ धोंडू भांगले

जगन्मित्र
🌹रेव्हरंड नारायण वामन टिळक

जननीजनकज
🌹पु.पां गोखले

टेंबे स्वामी/वासुदेवानंद सरस्वती
🌹वासुदेव गणेश टेंबे

ढोलीबुवा/महीपतिनाथ
🌹सखाराम केरसुणे

तुकाराम/तुका
🌹तुकाराम बोल्होबा/बाळकोबा मोरे/अंबिले/आंबले

दत्त
🌹दत्तात्रय कोंडो घाटे

दया पवार
🌹दगडू पवार

दामोदर
🌹वीरेश्वर सदाशिव ऊर्फ तात्या छत्रे

दा.ग.पा.
🌹दामोदर गणेश पाध्ये

दासोपंत/ दिगंबरानुचर
🌹दासो दिगंबर देशपांडे

दित्जू/माधव जूलियन
🌹माधव त्र्यंबक पटवर्धन

नामदेव
🌹नामदेव दामाशेटी शिंपी

नारायणसुत
🌹श्रीपाद नारायण मुजुमदार

निरंजन
🌹वसंत सदाशिव बल्लाळ

निशिगंध
🌹रा.श्री. जोग

निळोबा
🌹निळा मुकुंद पिंपळनेरकर

नीरजा
🌹नीरजा साठे

नृसिंहसरस्वती
🌹नरहरी माधव काळे

पठ्ठे बापूराव
🌹श्रीधर कृष्ण कुलकर्णी (रेठरेकर)

पद्मविहारी
🌹रघुनाथ गणेश जोशी

पद्मा
🌹पद्मा गोळे

पी.सावळाराम
🌹निवृत्तिनाथ रावजी पाटील

पुरु.शिव. रेगे
🌹पु.शि. रेगे

पूर्णदास
🌹बाबा उपसकर-राजाध्यक्ष

प्रभाकर शाहीर
🌹प्रभाकर जनार्दम दातार

फुलारी/बी रघुनाथ
🌹भगवान रघुनाथ कुलकर्णी

बहिणाबाई
🌹बहिणाबाई नथूजी चौधरी

(संत) बहिणाबाई
🌹कु.बहिणा आऊदेव कुळकर्णी (सौ.बहिणा रत्नाकर पाठक)

बापरखुमादेवीवर/बापविठ्ठलसुत
🌹ज्ञानदेव विठ्ठलपंत कुळकर्णी

बाबा आमटे
🌹मुरलीधर देवीदास आमटे

बाबुलनाथ
🌹विनायक श्यामराव काळे

बालकवी/कलापि
🌹त्र्यंबक बापूजी ठोंबरे

बाळा
🌹बाळा कारंजकर

बी; B
🌹बाळकृष्ण अनंत भिडे

बी; BEE
🌹नारायण मुरलीधर गुप्ते

बी रघुनाथ/फुलारी
🌹भगवान रघुनाथ कुलकर्णी

बोधलेबुवा
🌹माणकोजी भानजी जगताप

भगवानकवि
🌹भगवान रत्नाकर कर्‍हाडकर

भानजी
🌹भास्कर त्रिंबक देशपांडे

भानुदास/मामळूभट
🌹भानुदास पैठणकर(एकनाथांचे पणजोबा)

भावगुप्तपद्म
🌹पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी

भावशर्मा
🌹के.(केशव) नारायण काळे

भालेंदु
🌹भालचंद्र/गुलाबराव सीताराम स
130👏2🔥1
❇️ समानार्थी शब्द ❇️

● झोपाळा - झुला, हिंदोळा, टाळाटाळ
 
● झरा - निर्झर, ओहळ, ओढा
 
● झगडा - कलह, भांडण, तंटा
 
● टका - पैसा, पैका, जमीन मोजण्याचे माप
 
● टणक - निबर, कठिण, धट्टाकट्टा
 
● टिळा - तिलक, टिळक, ठिपका
 
● टूक - कुशलता, युक्ती, टक
 
● टाळाटाळ - र्हयगय, दिरंगाई, टगळमंगळ
 
● ठराव - नियम, सिद्धांत, निकाल
 
● ठळक - स्पष्ट, मोठे, जाड
 
● ठाम - पक्का, कायम, दृढ
 
● ठिकाण - पत्ता, स्थान, खूण
 
● डोके - माथा, मस्तक, शिर
 
● डोळा - नेत्र, लोचन, अक्ष, चक्षू
 
● डगर - उतरण, टेकडी, ढळ
 
● डौल - रुबाब, दिमाख, ऐट
 
● ढग - घन, जलद, मेघ, नीरद

● ढाळणे - गाळणे, आतणे, अभिषेक करणे
 
● ढेकूळ - ढेप, पेंड, भेली
 
● ढिलाई - चालढकल, दुर्लक्ष, दिरंगाई,  हयगय
 
● ढोंगी - लबाड, भोंदू, दांभिक, फसवा
 
● ढोल - नगारा, डंका, पडघम
 
● तक्रार - वाद, भांडण, हरकत
 
● तट - काठ, किनारा, बाजू, भांडण
 
● तत्व - सत्य, तात्पर्य, अंश

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
84👍11🤔2
अभ्यस्त शब्दाचा अर्थ दुप्पट करणे असा होतो,अभ्यस्त शब्द म्हणजे एकच शब्द किंवा वाक्य दोनदा उच्चारणे (अर्थ न बदलता).
उदा:बडबड, दगडबिगड, मळमळ इ....
.
आमचे चॅनेल जॉईन करा इथे @marathi
24👍13🤔3👏2
प्रश्नसंच :

1. शब्दाच्या जाती एकूण ----- आहेत?
2
3
5
8
उत्तर :8

2. नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी येणार्‍या विकारी शब्दाला ----- म्हणतात?
अव्यय
सर्वनाम
विशेषण
क्रियाविशेषण
उत्तर :सर्वनाम

3. 'शाळेकडे' या शब्दातील कडे हा शब्द ----- आहे?
शब्दयोगी अव्यय
केवलप्रयोगी अव्यय
क्रियाविशेषण अव्यय
भाववाचक नाम
उत्तर :शब्दयोगी अव्यय

4. 'शुक्र शुक्र' हा शब्द ----- आहे?
क्रियाविशेषण
भाववाचक नाम
शब्दयोगी अव्यय
केवलप्रयोगी अव्यय
उत्तर :केवलप्रयोगी अव्यय

5. ----- प्रयोगात कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते?
कर्मणी
भावे
केवल
कर्तरी
उत्तर :कर्तरी
______________________________________________

आमचे मराठी व्याकरण हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी प्रथम telegram ऍप डाउनलोड करा आणि नंतर टेलिग्राम ऍप मध्ये @marathi असे सर्च करा, आणि चॅनेल ओपन करून जॉईन करा.
______________________________________________
48🔥5
अनाथ = पोरका
अनर्थ = संकट
अपघात = दुर्घटना 
अपेक्षाभंग = हिरमोड
अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम 
अभिनंदन = गौरव
अभिमान = गर्व 
अभिनेता = नट
अरण्य = वन, जंगल, कानन  
अवघड = कठीण
अवचित = एकदम
अवर्षण = दुष्काळ
अविरत = सतत, अखंड
अडचण = समस्या
अभ्यास = सराव  
अन्न = आहार, खाद्य 
अग्नी = आग
अचल = शांत, स्थिर
अचंबा = आश्चर्य, नवल
अतिथी = पाहुणा  
अत्याचार = अन्याय
अपराध = गुन्हा, दोष
अपमान = मानभंग
अपाय = इजा 
अश्रू = आसू 
अंबर = वस्त्र
अमृत = पीयूष
अहंकार = गर्व
अंक = आकडा
आई = माता, माय, जननी, माउली 
आकाश = आभाळ, गगन, नभ, अंबर 
आठवण = स्मरण, स्मृती, सय
आठवडा = सप्ताह 
आनंद = हर्ष
आजारी = पीडित, रोगी 
आयुष्य = जीवन, हयात
आतुरता = उत्सुकता  
आरोपी = गुन्हेगार, अपराधी 
आश्चर्य = नवल, अचंबा
आसन = बैठक
आदर = मान  
आवाज = ध्वनी, रव 
आज्ञा = आदेश, हुकूम
आपुलकी = जवळीकता 
आपत्ती = संकट
आरसा = दर्पण 
आरंभ = सुरवात
आशा = इच्छा
आस = मनीषा
आसक्ती = लोभ
आशीर्वाद = शुभचिंतन 
इलाज = उपाय
इशारा = सूचना
इंद्र = सुरेंद्र
इहलोक = मृत्युलोक
ईर्षा = चुरस  
उत्सव = समारंभ, सण, सोहळा
उक्ती = वचन 
उशीर = विलंब
उणीव = कमतरता
उपवन = बगीचा
उदर = पोट
उदास = खिन्न
उत्कर्ष = भरभराट
उपद्रव = त्रास
उपेक्षा = हेळसांड
ऊर्जा = शक्ती
ॠण = कर्ज 
ॠतू = मोसम
एकजूट = एकी, ऐक्य
ऐश्वर्य = वैभव
ऐट = रुबाब, डौल 
ओझे = वजन, भार 
ओढा = झरा, नाला 
ओळख = परिचय
औक्षण = ओवाळणे 
अंत = शेवट 
अंग = शरीर
अंघोळ = स्नान 
अंधार = काळोख, तिमिर
अंगण = आवार
अंगार = निखारा
अंतरिक्ष = अवकाश 
कथा = गोष्ट, कहाणी, हकिकत 
कठीण = अवघड 
कविता = काव्य, पद्य 
करमणूक = मनोरंजन
कठोर = निर्दय
कनक = सोने
कटी = कंबर
कमळ = पंकज
कपाळ = ललाट
कष्ट = श्रम, मेहनत 
कंजूष = कृपण  
काम = कार्य, काज
काठ = किनारा, तीर, तट
काळ = समय, वेळ, अवधी 
कान = श्रवण
कावळा = काक
काष्ठ = लाकूड
किल्ला = गड, दुर्ग 
किमया = जादू 
कार्य = काम 
कारागृह = कैदखाना, तुरुंग
कीर्ती = प्रसिद्धी, लौकिक, ख्याती 
कुतूहल = उत्सुकता
कुटुंब = परिवार
कुशल = हुशार, तरबेज   
कुत्रा = श्वान  
कुटी = झोपडी
कुचंबणा = घुसमट
कृपण = कंजूष
कृश = हडकुळा
कोवळीक = कोमलता
कोठार = भांडार
कोळिष्टक = जळमट
खण = कप्पा  
खडक = मोठा दगड, पाषाण
खटाटोप = प्रयत्न
खग = पक्षी
खड्ग = तलवार
खरेपणा = न्यायनीती 
ख्याती = कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक 
खात्री = विश्वास
खाली जाणे = अधोगती  
खिडकी = गवाक्ष
खेडे = गाव, ग्राम  
खोड्या = चेष्टा, मस्करी 
गरज = आवश्यकता
गवत = तृण 
गर्व = अहंकार 
गाय = धेनू, गोमाता
गाणे = गीत, गान 
गंमत = मौज, मजा
गंध = वास, दरवळ
ग्रंथ = पुस्तक  
गाव = ग्राम, खेडे
गुन्हा = अपराध
गुलामी = दास्य 
गोड = मधुर  
गोणी = पोते 
गोष्ट = कहाणी, कथा
गौरव = सन्मान  
ग्राहक = गिऱ्हाईक 
घर = सदन, गृह, निकेतन, आलय 
घरटे = खोपा
घागर = घडा, मडके  
घोडा = अश्व, हय, वारू 
________________________________________
आमचे मराठी व्याकरण चॅनेल जॉईन करण्यासाठी @marathi येथे क्लिक करा , ग्रुप ओपन झाल्यावर , join वर क्लिक करा.
________________________________________
Telegram.me/marathi 
74👌6🤔1
समानार्थी शब्द :

चव = रुची, गोडी
चरण = पाय, पाऊल
चरितार्थ = उदरनिर्वाह  
चक्र = चाक  
चऱ्हाट = दोरखंड
चाक = चक्र 
चंद्र = शशी, रजनीनाथ, इंदू 
चिंता = काळजी
चिडीचूप = शांत
चिमुरडी = लहान 
चूक = दोष  
चेहरा = मुख 
चौकशी = विचारपूस 
छंद = नाद, आवड
छान = सुरेख, सुंदर 
छिद्र = भोक 
जग = दुनिया, विश्व
जत्रा = मेळा 
जन = लोक, जनता  
जमीन = भूमी, धरती, भुई 
जंगल = रान 
जीव = प्राण
जीवन = आयुष्य, हयात 
जुलूम = अत्याचार, छळ, बळजोरी, अन्याय  
झाड = वृक्ष, तरू
झोपडी = कुटीर, खोप 
झोप = निद्रा  
झोका = झुला 
झेंडा = ध्वज, निशाण
ठग = चोर 
ठिकाण = स्थान 
डोके = मस्तक, शीर्ष, शीर 
डोळा = नेत्र, नयन, लोचन
डोंगर = पर्वत, गिरी 
ढग = मेघ, जलद, पयोधर, अभ्र 
ॠण = कर्ज 
तक्रार = गाऱ्हाणे 
तळे = तलाव, सरोवर, तडाग
त्वचा = कातडी
तारण = रक्षण 
ताल = ठेका
तुरंग = कैदखाना, बंदिवास 
तुलना = साम्य 
थट्टा = मस्करी, चेष्टा
थवा = समूह 
थोबाड = गालपट   
दगड = पाषाण, खडक 
दरवाजा = दार, कवाड
दाम = पैसा  
दृश्य = देखावा  
दृढता = मजबुती
दिवस = दिन, वार, वासर
दिवा = दीप, दीपक 
दूध = दुग्ध, पय
द्वेष = मत्सर, हेवा 
देव = ईश्वर, विधाता 
देश = राष्ट्र 
देखावा = दृश्य
दार = दरवाजा 
दारिद्र्य = गरिबी 
दौलत = संपत्ती, धन  
धरती = भूमी, धरणी 
ध्वनी = आवाज, रव 
नदी = सरिता  
नजर = दृष्टी
नक्कल = प्रतिकृती
नमस्कार = वंदन, नमन  
नातेवाईक = नातलग 
नाच = नृत्य 
निश्चय = निर्धार 
निर्धार = निश्चय 
निर्मळ = स्वच्छ
नियम = पद्धत 
निष्ठा = श्रद्धा 
नृत्य = नाच 
नोकर = सेवक
__________________________________________
आमचे चॅनेल जॉईन करण्यासाठी @marathi येथे क्लिक करा , चॅनेल ओपन झाल्यावर join क्लिक करा.
66👏4
समानार्थी शब्द :

परिश्रम = कष्ट, मेहनत   
पती = नवरा, वर 
पत्र = टपाल 
पहाट = उषा  
परीक्षा = कसोटी 
पर्वा = चिंता, काळजी 
पर्वत = डोंगर, गिरी, अचल 
पक्षी = पाखरू, खग, विहंग
प्रकाश = उजेड 
प्रवास = सफर, फेरफटका, पर्यटन
प्रवासी = वाटसरू
प्रजा = लोक 
प्रत - नक्कल
प्रदेश = प्रांत 
प्रवास = यात्रा    
प्राण = जीव 
पान = पत्र, पत्ता 
प्रासाद = वाडा 
पाखरू = पक्षी
पाऊल = पाय, चरण
पाऊलवाट = पायवाट
प्रार्थना = स्तवन 
प्रामाणिकपणा = इमानदारी
प्रारंभ = सुरुवात, आरंभ  
प्रेम = प्रीती, माया, जिव्हाळा
प्रोत्साहन = उत्तेजन
पाऊस = वर्षा, पर्जन्य 
पाणी = जल, नीर, तोय, उदक
पिशवी = थैली 
पुस्तक = ग्रंथ
पुतळा = प्रतिमा, बाहुले
पुरातन = प्राचीन 
पृथ्वी = धरणी, जमीन, वसुंधरा, वसुधा  
फलक = फळा   
फांदी शाखा 
फूल = पुष्प, सुमन, कुसुम
बदल = फेरफार, कलाटणी 
बर्फ = हिम  
बहीण = भगिनी
बक्षीस = पारितोषिक, पुरस्कार 
बाग = बगीचा, उद्यान, वाटिका 
बासरी = पावा
बेत = योजना
बाळ = बालक 
बाप = पिता, वडील, जनक 
बादशाहा = सम्राट
बुद्धी = मती 
ब्रीद = बाणा   
भरवसा = विश्वास 
भरारी = झेप, उड्डाण 
भव्य = टोलेजंग
भाट = स्तुतिपाठक 
भारती = भाषा, वैखरी
भांडण = तंटा  
भाळ = कपाळ 
भाऊ = बंधू, सहोदर
भेसळ = मिलावट
भेदभाव = फरक
भोजन = जेवण   
मदत = साहाय्य 
ममता = माया, जिव्हाळा, वात्सल्य 
मन = चित्त, अंतःकरण
मजूर = कामगार 
महिना = मास
महिला = स्त्री, बाई, ललना 
मजूर = कामगार
मस्तक = डोके, शीर, माथा  
मानवता = माणुसकी 
मान = गळा  
मंगल = पवित्र 
मंदिर = देऊळ, देवालय  
मार्ग = रस्ता, वाट
म्होरक्या = पुढारी, नेता  
मित्र = दोस्त, सोबती, सखा, सवंगडी
मिष्टान्न = गोडधोड
मुलगा = पुत्र, सुत, तनय 
मुलगी = कन्या, तनया  
मुद्रा = चेहरा, मुख, तोंड, वदन 
मुख = तोंड, चेहरा 
मुलुख = प्रदेश, प्रांत, परगणा 
मेहनत = कष्ट, श्रम, परिश्रम
मैत्री = दोस्ती
मौज = मजा, गंमत
यश = सफलता 
युक्ती = विचार, शक्कल 
युद्ध = लढाई, संग्राम, लढा, समर 
योद्धा = लढवय्या 
रक्त = रुधिर 
रणांगण = रणभूमी, समरांगण 
र्हास = हानी    
राग = क्रोध, संताप, चीड 
राजा = नरेश, नृप 
राष्ट्र = देश 
रांग = ओळ 
रात्र = निशा, रजनी, यामिनी
रान = वन, जंगल, अरण्य, कानन
रूप = सौंदर्य
रुबाब = ऐट, तोरा  
रेखीव = सुंदर, सुबक 
लग्न = विवाह, परिणय  
लाट = लहर 
लाज = शरम, 
लोभ = हाव
वस्त्र = कपडा 
वारा = वात, पवन, अनिल, मारुत, समीर, वायू 
वाट = मार्ग, रस्ता 
वाद्य = वाजप 
वातावरण = रागरंग
वेग = गती
वेळ = समय, प्रहर
वेळू = बांबू 
वेश = सोशाख
वेदना = यातना  
विश्रांती = विसावा, आराम
वितरण = वाटप, वाटणी 
विद्या = ज्ञान 
विनंती = विनवणी 
विरोध = प्रतिकार, विसंगती
विसावा = विश्रांती, आराम  
विश्व = जग, दुनिया  
वीज = विद्युर, सौदामिनी 
वृत्ती = स्वभाव 
वृद्ध = म्हातारा 
वैराण = ओसाड, भकास, उजाड 
वैरी = शत्रू, दुष्मन 
वैषम्य = विषाद 
व्यवसाय = धंदा 
व्याख्यान = भाषण  
शरीर = देह, तनू, काया, कुडी, अंग
शक्ती = सामर्थ्य, जोर, बळ 
शर्यत = स्पर्धा, होड, चुरस 
शहर = नगर
शंकर = चंद्रचूड  
श्वापद = जनावर 
शास्त्रज्ञ = वैज्ञानिक 
शाळा = विद्यालय 
शाळुंका = शिविलिंग
शेत = 
शिवार, वावर, क्षेत्र
शिवार = शेत, वावर 
शीण = थकवा 
शील = चारित्र्य
शीतल = थंड, गार 
शिक्षा = दंड, शासन  
श्रम = कष्ट, मेहनत  
सकाळ = प्रभात, उष:काल
सचोटी = खरेपणा 
सफाई = स्वच्छता 
सवलत = सूट 
सजा = शिक्षा 
सन्मान = आदर 
संकट = आपत्ती
संधी = मोका
संत = सज्जन, साधू
संपत्ती = धन, दौलत, संपदा
सायंकाळ = संध्याकाळ 
सावली = छाया   
साथी = सोबती, मित्र, दोस्त, सखा 
स्तुती = प्रशंसा 
स्पर्धा = चुरस, शर्यत, होड, पैज
स्थान = ठिकाण, वास, ठाव  
स्त्री = बाई, महिला, ललना
संध्याकाळ = सायंकाळ, सांज 
स्फूर्ती = प्रेरणा 
स्वच्छता = झाडलोट
सुवास = सुगंध, परिमल, दरवळ 
सुंदर = सुरेख, रमणीय, मनोहर, छान 
सागर = समुद्र, सिंधू, रत्नाकर, जलधी
सावली = छाया  
सामर्थ्य = शक्ती, बळ
साहित्य = लिखाण
सेवा = शुश्रूषा    
सिनेमा = चित्रपट, बोलपट 
सिंह = केसरी, मृगराज, वनराज
सुविधा = सोय 
सुगंध = सुवास, परिमळ, दरवळ
सूत = धागा, दोरा
सूर = स्वर  
सूर्य = रवी, भास्कर, दिनकर, सविता 
सोने = सुवर्ण, कांचन, हेम
सोहळा = समारंभ 
हद्द = सीमा, शीव 
हल्ला = चढाई 
हळू चालणे = मंदगती
हकिकत = गोष्ट, कहाणी, कथा 
हात = हस्त, कर, बाहू 
हाक = साद 
हित = कल्याण 
हिंमत = धैर्य 
हुकूमत = अधिकार 
हुरूप = उत्साह 
हुबेहूब = तंतोतंत 
हेका = हट्ट, आग्रह 
क्षमा = माफी
_________________________________________
आमचे मराठी व्याकरण विषयक आणखी अपडेट मिळवण्यासाठी आमचे मराठी व्याकरण हे चॅनेल जॉईन करा @marathi
__________________________________________
Telegram.me/marathi
74👍4🔥4🤔1