मराठी व्याकरण
222K subscribers
8.5K photos
36 videos
336 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
From Marathi Mhani app:

इच्छा तसे फळ.

Meaning:
जशी वासना असते तसे फळ मिळते.
From Marathi Mhani app:

इच्छा तेथे मार्ग.

Meaning:
इच्छा तीव्र असली की, ती पूर्ण करण्याचा मार्ग आपोआप सापडतो.
From Marathi Mhani app:

इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकही राजे होते.

Meaning:
इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते.
From Marathi Mhani app:

इन मिन साडे तीन.

Meaning:
एखाद्या कारणासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे.
From Marathi Mhani app:

ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो.

Meaning:
जन्मास आलेल्याचे पालनपोषण होतेच.
From Marathi Mhani app:

उंटावरचा शहाणा.

Meaning:
मूर्ख सल्ला देणारा.
From Marathi Mhani app:

उंटावरून शेळ्या हाकणे.

Meaning:
आळस, हलगर्जीपणा करणे.
From Marathi Mhani app:

उंदराला मांजराची साक्ष.

Meaning:
दोघेही एकमेकांचे साक्षीदार असलेली परिस्थिती.
From Marathi Mhani app:

उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी.

Meaning:
प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो.
From Marathi Mhani app:

उकराल माती तर पिकतील मोती.

Meaning:
मशागत केल्यास चांगले पीक येते.
From Marathi Mhani app:

उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला?

Meaning:
एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो.
From Marathi Mhani app:

उघड्या डोळ्याने प्राण जात नाही.

Meaning:
भलतीच गोष्ट आपल्या डोळ्यादेखत घडत असताना तिचा प्रतिकार केल्यावाचून आपल्याला राहवत नाही.
👍1
From Marathi Mhani app:

उचल पत्रावळी, म्हणे जेवणारे किती.

Meaning:
जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्याच चौकशा करणे.
From Marathi Mhani app:

उचलली जीभ लावली टाळ्याला.

Meaning:
विचार न करता बोलणे.
1
कुसुमाग्रज यांची खालील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.

कविता संग्रह :

अक्षरबाग (१९९९)
किनारा(१९५२)
चाफा(१९९८)
छंदोमयी (१९८२)
जाईचा कुंज (१९३६)
जीवन लहरी(१९३३)
थांब सहेली (२००२)
पांथेय (१९८९)
प्रवासी पक्षी (१९८९)
मराठी माती (१९६०)
महावृक्ष (१९९७)
माधवी(१९९४)
मारवा (१९९९)
मुक्तायन (१९८४)
मेघदूत(१९५६)
रसयात्रा (१९६९)
वादळ वेल (१९६९)
विशाखा (१९४२)
श्रावण (१९८५)
समिधा ( १९४७)
स्वगत(१९६२)
हिमरेषा(१९६४)

निबंध संग्रह :

आहे आणि नाही (पुस्तक) - लघुनिबंध संग्रह
प्रतिसाद (पुस्तक) - लघुनिबंध संग्रह
नाटक
ऑथेल्लो
आनंद
आमचं नाव बाबुराव
एक होती वाघीण
कौंतेय
जेथे चंद्र उगवत नाही
दिवाणी दावा
दुसरा पेशवा
दूरचे दिवे
देवाचे घर
नटसम्राट
नाटक बसते आहे
बेकेट
मुख्यमंत्री
ययाति देवयानी
राजमुकुट
विदूषक
वीज म्हणाली धरतीला
वैजयंती

कथासंग्रह :

अपॉईंटमेंट (कथासंग्रह)
काही वृद्ध काही तरुण (कथासंग्रह)
फुलवाली (कथासंग्रह)
बारा निवडक कथा (कथासंग्रह)
सतारीचे बोल (कथासंग्रह)

कादंबरी :

कल्पनेच्या तीरावर (कादंबरी)
जान्हवी (कादंबरी)
वैष्णव (कादंबरी)
1👍1
@Marathi

🔹अध्याक्षर अ पासून समानार्थी शब्द:

अनाथ = पोरका
अनर्थ = संकट
अपघात = दुर्घटना
अपेक्षाभंग = हिरमोड
अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम
अभिनंदन = गौरव
अभिमान = गर्व
अभिनेता = नट
अरण्य = वन, जंगल, कानन
अवघड = कठीण
अवचित = एकदम
अवर्षण = दुष्काळ
अविरत = सतत, अखंड
अडचण = समस्या
अभ्यास = सराव
अन्न = आहार, खाद्य
अग्नी = आग
अचल = शांत, स्थिर
अचंबा = आश्चर्य, नवल
अतिथी = पाहुणा
अत्याचार = अन्याय
अपराध = गुन्हा, दोष
अपमान = मानभंग
अपाय = इजा
अश्रू = आसू
अंबर = वस्त्र
अमृत = पीयूष
अहंकार = गर्व
अंक = आकडा
_________________________
जॉईन करा आमचे @marathi चॅनेल
From Marathi Mhani app:

उठता लाथ, बसता बुक्की.

Meaning:
कायम धाकात ठेवणे.
From Marathi Mhani app:

उडत्या पक्ष्याची पिसे मोजणे.

Meaning:
अगदी सहज चालता चालता एखाद्या गोष्टीची परीक्षा करणे.
From Marathi Mhani app:

उडदामाजी काळे-गोरे, काय निवडावे निवडणारे?

Meaning:
प्रत्येक व्यक्तीच्या अंगी चांगले-वाईट गुण असतात.
From Marathi Mhani app:

उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक.

Meaning:
एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते.
From Marathi Mhani app:

उतावळा नवरा घुडग्याला बाशिंग.

Meaning:
अतिशय उतावळेपणामुळे होणारे मुर्खपणाचे वर्तन.