महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा
8.74K subscribers
1.41K photos
3 videos
556 files
1.81K links
महाराष्ट्र शिक्षक भरती माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

https://chat.whatsapp.com/I4V6FomMTPr28qfQtzevxD

https://chat.whatsapp.com/JodfJ718KCWA3YJK0TvhA9

टेलिग्राम चॅनल जॉईन करा.
https://t.me/mahatet20
Download Telegram
🌷 प्रयोग व त्याचे प्रकार 🌷

🌷वाक्यातील कर्ता, कर्म, व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात.

🌷मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात.
1. कर्तरी प्रयोग 
2. कर्मणी प्रयोग 
3. भावे प्रयोग 

1. कर्तरी प्रयोग : 
जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किवा वचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
उदा . तो चित्र काढतो. (कर्ता- पुल्लिंगी) 
       ती चित्र काढते. (कर्ता- लिंग बदलून)
       ते चित्र काढतात. (कर्ता- वचन बदलून)

🌷कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात.
1. सकर्मक कर्तरी प्रयोग 
2. अकर्मक कर्तरी प्रयोग 

1. सकर्मक कर्तरी प्रयोग : 
ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
उदा . राम आंबा खातो.
       सीता आंबा खाते. (लिंग बदलून)
       ते आंबा खातात. (वचन बदलून)


2. अकर्मक कर्तरी प्रयोग : 
ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
उदा . राम पडला 
       सीता पडली (लिंग बदलून)
       ते पडले (वचन बदलून)    

2. कर्मणी प्रयोग :
 क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किवा वचनानुसार बदलते तेंव्हा त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा . राजाने राजवाडा बांधला. (कर्म- पुल्लिंगी)
       राजाने कोठी बांधली. (कर्म- लिंग बदलून)
       राजाने राजवाडे बांधले. (कर्म- वचन बदलून )

🌷कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात.
1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग  
2. नवीन कर्मणी प्रयोग 
3. समापन कर्मणी प्रयोग 
4. शक्य कर्मणी प्रयोग 
5. प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग

1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग : 
हा प्रयोग मूळ संस्कृत कर्मणी प्रयोगापासून तयार झालेला आहे तसेच या कर्माच्या उदाहरणातील वाक्य संस्कृत मधील आढळतात.                
उदा. नळे इंद्रास ऐसें बोलीजेल।
      जो - जो किजे परमार्थ लाहो।

2. नवीन कर्मणी प्रयोग :
  ह्या प्रयोगात इंग्लिश मधील Passive Voice प्रमाणे वाक्याची रचना आढळते. तसेच वाक्याच्या सुरवातीला कर्म येते व कर्त्याला कडून प्रत्यय लागतात.
उदा . रावण रामाकडून मारला गेला.
       चोर पोलीसांकडून पकडला गेला.

3. समापन कर्मणी प्रयोग : 
जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो किंवा वाक्याचा शेवट संयुक्त क्रियापदाने होतो तेव्हा त्यास समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा . त्याचा पेरु खाऊन झाला.
       रामाची गोष्ट सांगून झाली.


4. शक्य कर्मणी प्रयोग :
 जेव्हा कर्मणी प्रयोगतील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्याने ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो,  तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा . मला डोंगर चढवितो.
रामला आंबट दही खाववते.

5. प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग :
 कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो तेव्हा त्या प्रयोगास प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा . त्याने काम केले. 
       तिने पत्र लिहिले.  

3. भावे प्रयोग : 
जेव्हा कर्त्याच्या किवा कर्माच्या लिंग किवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात.
उदा . सुरेशने बैलाला पकडले.
       सीमाने मुलांना मारले.    

🌷भावे प्रयोगाचे तीन उपप्रकर पडतात. 

1. सकर्मक भावे प्रयोग
2. अकर्मक भावे प्रयोग
3. अकर्तृक भावे प्रयोग

1. सकर्मक भावे प्रयोग :
 ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असल्यास त्यास सकर्मक भावे प्रयोग म्हणतात.
उदा. शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकविले.
      रामाने रावणास मारले.

2. अकर्मक भावे प्रयोग : 
ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसते त्यास अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात.
उदा . मुलांनी खेळावे.
       विद्यार्थांनी जावे.

3. अकर्तुक भावे प्रयोग :
 भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्ता आलेला नसेल तेव्हा त्यास अकर्तृक भावे प्रयोग असे म्हणतात.
उदा .आज सारखे गडगडते.
       तिला फार मळमळते.
       आज सारखे उकडते.

http://t.me/mpscmarathivyakaran
🌷 प्रयोग व त्याचे प्रकार 🌷

🌷वाक्यातील कर्ता, कर्म, व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात.

🌷मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात.
1. कर्तरी प्रयोग 
2. कर्मणी प्रयोग 
3. भावे प्रयोग 

1. कर्तरी प्रयोग : 
जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किवा वचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
उदा . तो चित्र काढतो. (कर्ता- पुल्लिंगी) 
       ती चित्र काढते. (कर्ता- लिंग बदलून)
       ते चित्र काढतात. (कर्ता- वचन बदलून)

🌷कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात.
1. सकर्मक कर्तरी प्रयोग 
2. अकर्मक कर्तरी प्रयोग 

1. सकर्मक कर्तरी प्रयोग : 
ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
उदा . राम आंबा खातो.
       सीता आंबा खाते. (लिंग बदलून)
       ते आंबा खातात. (वचन बदलून)


2. अकर्मक कर्तरी प्रयोग : 
ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
उदा . राम पडला 
       सीता पडली (लिंग बदलून)
       ते पडले (वचन बदलून)    

2. कर्मणी प्रयोग :
 क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किवा वचनानुसार बदलते तेंव्हा त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा . राजाने राजवाडा बांधला. (कर्म- पुल्लिंगी)
       राजाने कोठी बांधली. (कर्म- लिंग बदलून)
       राजाने राजवाडे बांधले. (कर्म- वचन बदलून )

🌷कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात.
1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग  
2. नवीन कर्मणी प्रयोग 
3. समापन कर्मणी प्रयोग 
4. शक्य कर्मणी प्रयोग 
5. प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग

1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग : 
हा प्रयोग मूळ संस्कृत कर्मणी प्रयोगापासून तयार झालेला आहे तसेच या कर्माच्या उदाहरणातील वाक्य संस्कृत मधील आढळतात.                
उदा. नळे इंद्रास ऐसें बोलीजेल।
      जो - जो किजे परमार्थ लाहो।

2. नवीन कर्मणी प्रयोग :
  ह्या प्रयोगात इंग्लिश मधील Passive Voice प्रमाणे वाक्याची रचना आढळते. तसेच वाक्याच्या सुरवातीला कर्म येते व कर्त्याला कडून प्रत्यय लागतात.
उदा . रावण रामाकडून मारला गेला.
       चोर पोलीसांकडून पकडला गेला.

3. समापन कर्मणी प्रयोग : 
जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो किंवा वाक्याचा शेवट संयुक्त क्रियापदाने होतो तेव्हा त्यास समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा . त्याचा पेरु खाऊन झाला.
       रामाची गोष्ट सांगून झाली.


4. शक्य कर्मणी प्रयोग :
 जेव्हा कर्मणी प्रयोगतील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्याने ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो,  तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा . मला डोंगर चढवितो.
रामला आंबट दही खाववते.

5. प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग :
 कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो तेव्हा त्या प्रयोगास प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा . त्याने काम केले. 
       तिने पत्र लिहिले.  

3. भावे प्रयोग : 
जेव्हा कर्त्याच्या किवा कर्माच्या लिंग किवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात.
उदा . सुरेशने बैलाला पकडले.
       सीमाने मुलांना मारले.    

🌷भावे प्रयोगाचे तीन उपप्रकर पडतात. 

1. सकर्मक भावे प्रयोग
2. अकर्मक भावे प्रयोग
3. अकर्तृक भावे प्रयोग

1. सकर्मक भावे प्रयोग :
 ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असल्यास त्यास सकर्मक भावे प्रयोग म्हणतात.
उदा. शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकविले.
      रामाने रावणास मारले.

2. अकर्मक भावे प्रयोग : 
ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसते त्यास अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात.
उदा . मुलांनी खेळावे.
       विद्यार्थांनी जावे.

3. अकर्तुक भावे प्रयोग :
 भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्ता आलेला नसेल तेव्हा त्यास अकर्तृक भावे प्रयोग असे म्हणतात.
उदा .आज सारखे गडगडते.
       तिला फार मळमळते.
       आज सारखे उकडते.

http://t.me/mpscmarathivyakaran
🔸! साहित्यिकांची टोपणनावे !🔸
HTTPS://t.me/mpscmarathivyakaran
🌀टोपणनाव----------------लेखक🌀

अनंत फंदी-------शाहीर अनंत घोलप
अनंततनय-------दत्तात्रय अनंत आपटे
अनिरुध्द पुनर्वसू-------नारायण गजानन आठवले
अनिल-------आत्माराम रावजी देशपांडे
अमरशेख-------मेहबूब पठाण
अज्ञातवासी-------दिनकर गंगाधर केळकर
आनंद-------वि.ल.बर्वे
आरती प्रभु-------चिंतामण त्र्यंबक खानोलकर
काव्यविहारी-------धोंडो वासुदेव गद्रे
कुंजविहारी-------हरिहर गुरुनाथ कुलकर्णी
कुमुद-------स.अ.शुक्ल
कुसुमाग्रज-------वि.वा.शिरवाडकर
कृष्णकुमार-------सेतू माधव पगडी
केशवकुमार-------प्र.के. अत्रे
करिश्मा-------न.रा.फाटक
केशवसुत-------कृष्णाजी केशव दामले
गदिमा-------ग.दि.माडगुळकर
गिरीश-------शंकर केशव कानेटकर
ग्रेस-------माणिक शंकर गोडघाटे
गोल्या घुबड-------विष्णुशास्त्री चिपळूणकर
गोविंद-------गोविंद त्र्यंबक दरेकर
गोविंदाग्रज-------राम गणेश गडकरी
चंद्रिका /चंद्रशेखर-------शिवराम महादेव गो-हे
चारुता सागर-------दिनकर दत्तात्रय भोसले
छोटा गंधर्व-------सौदागर नागनाथ गोरे
बालगंधर्व-------नारायणराव राजहंस
जीवन-------संजीवनी मराठे
ठणठणपाल/अलाणे-फलाणे-------जयवंत दळवी
तुकडोजी महाराज-------माणिक बंडोजी ब्रम्हभट्ट
संत तुकाराम-------तुकाराम बोल्होबा अंबिले
तुकाराम शेंगदाणे-------ज्ञानेश्वर नाडकर्णी
दत्त (कवी)-------दत्तत्रय कोंडदेव घाटे
द्या पवार (कवी)-------दगडू मारुती पवार
जागल्या (कथालेखक)-------दगडू मारुती पवार
दक्षकर्ण-------अशोक रानडे
दादुमिया-------दा.वि.नेने
दासोपंत-------दासोपंत दिगंबर देशपांडे
दिवाकर-------शंकर काशिनाथ गर्गे
दिवाकर कृष्ण-------दिवाकर कृष्ण केळकर
धनुर्धारी-------रा.वि.टिकेकर
धुंडिराज-------मो.ग.रांगणेकर
नागेश-------नागेश गणेश नवरे
नाथमाधव-------व्दारकानाथ माधवराव पितके
निशिगंध-------रा.श्री.जोग
नृसिंहाग्रज-------ल.गो.जोशी
पद्मा-------पद्मा विष्णू गोळे
पराशंर-------लक्ष्मणराव सरदेसाई
पी.सावळाराम-------निवृत्ती रावजी पाटील
पुष्पदंत-------प्र.न.जोशी
प्रफुल्लदत्त-------दत्तात्रय विष्णू तेंडोलकर
प्रभाकर (शाहीर)-------प्रभाकर जनार्दन दातार
फडकरी-------पुरूषोत्तम धाक्रस
फरिश्ता-------न. रा. फाटक
बाकीबा-------बाळकृष्ण भगवंत बोरकर
बाबा कदम-------वीरसेन आनंद कदम
बाबुराव अर्नाळकर-------चंद्रकांत सखाराम चव्हाण
बाबुलनाथ-------वि.शा.काळे
बालकवी-------त्र्यंबक बापूजी ठोंबरे
बाळकराम (विनोदासाठी)-------राम गणेश गडकरी
बी-------नारायण मुरलीधर गुप्ते
बी रघुनाथ-------भगवान रघुनाथ कुलकर्णी
बंधुमाधव-------बंधु माधव मोडक (कांबळे)
भटक्या-------प्रमोद नवलकर
भाऊ पाध्ये-------प्रभाकर नारायण पाध्ये
भानुदास-------कृष्णाजी विनायक पोटे
भानुदास रोहेकर-------लीला भागवत
भालचंद्र नेमाडे-------भागवत वना नेमाडे
मकरंद-------बा.सी.मर्ढेकर
मंगलमूर्ती-------मो.ग.रांगणेकर
मनमोहन-------गोपाळ नरहर नातू
लोककवी श्री मनमोहन-------मीनाक्षी दादरकर
माधव ज्युलियन-------माधव त्र्यंबक पटवर्धन
माधवानुज-------डॉ. काशिनाथ हरि मोडक
मामा वरेरकर-------भार्गव विट्ठल वरेरकर
मधू दारूवाला-------म.पा.भावे
मिलिंद माधव-------कॅ. मा कृ. शिंदे
मुक्ताबाई (संत)-------मुक्ताबाई विठ्ठल कुलकर्णी
मोरोपंत-------मोरेश्वर रामचंद्र पराडकर
मंडणमित्र-------द.पा.खंबिरे
यशवंत-------यशवंत दिनकर पेंढारकर
यशवंत दत्त-------यशवंत दत्ताजी महाडिक
रघुनाथ पंडित-------रघुनाथ चंदावरकर
रमाकांत नागावकर(गंधर्व)-------बळवंत जनार्दन करंदीकर
रसगंगाधर-------गंगाधर कुलकर्णी
राजा ठकार-------नारायण गजानन आठवले
राजा मंगळवेढेकर-------वसंत नारायण मंगळवेढेकर
राधारमण-------कृष्ण पांडुरंग लिमये
रा. म. शास्त्री-------वि.ग कानिटकर
रूप-------प्रल्हाद वडेर
रे. टिळक-------नारायण वामन टिळक
लता जिंतूरकर-------लक्ष्मीकांत तांबोळी
लक्ष्मीनंदन-------देवदत्त टिळक
लोकहितवादी-------गोपाळ हरि देशमुख
वनमाळी-------वा.गो.मायदेव
वसंत बापट-------विश्वनाथ वामन बापट
वसंत सबनीस-------रघुनाथ दामोदर सबनीस
वामन पंडित-------वामन नरहर शेखे
विजय मराठे-------ना.वि.काकतकर
विंदा करंदीकर-------गोविंद विनायक करंदीकर
विनायक-------विनायक जनार्दन करंदीकर
विनोबा-------विनायक नरहर भावे
विभावरी शिरुरकर-------मालतीबाई विश्राम बेडेकर
विष्णुदास-------नरहर सदाशिव जोशी
वशा-------वसंत हजरनीस
विष्णुबुवा ब्रम्हचारी-------विष्णु भिकाजी गोखले.
🌷ज्ञानपीठ पुरस्कार🌷

१) विष्णू सखाराम खांडेकर : ययाती( १९७४ )

२) विष्णू वामन शिरवाडकर ( कुसुमाग्रज ) : मराठी साहित्याबद्दल लक्षणीय योगदानाबद्दल ( १९७८ )

३) विं. दा. करंदीकर : मराठी साहित्यातील लक्षणीय योगदानाबद्दल ( २००३ )

४) भालचंद्र नेमाडे : मराठी साहित्यातील लक्षणीय योगदानाबद्दल ( २०१४ )

Join @mpscmarathivyakaran
🌷म्हणी🌷

1 मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही

2 बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर – दोनपैकी एक पर्याय निवडणे

3 चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच

4 आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे

5 अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते

6 नाचता येईना अंगण वाकडे – स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो

7 तोंड दाबून बुक्क्यांचा मार – विनाकारण जुलूम सहन करावा लागणे

8 नावडतीचे मीठ अळणी – नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही

9 अंथरूण पाहून पाय पसरावे – ऎपत पाहून खर्च करवा

10 छत्तीसचा आकडा – विरुद्ध मत असणे

11 तेरड्याचा रंग तीन दिवस – एखादे कार्य
थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे

12 दुष्काळात तेरावा महिना – संकटात अधिक भर

13 नव्याचे नऊ दिवस – नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नाही

14 एका हाताने टाळी वाजत नाही – दोष दोन्हीकडे असतो

15 पालथ्या घड्यावर पाणी – सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे

16 वासरात लंगडी गाय शहाणी – अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो

17 रात्र थोडी सोंगे फार – काम भरपूर, वेळ कमी

18 अति शहाणा त्याचा बैल रिकामा – अति शहाणपणाने नुकसान होते

19 शेरास सव्वाशेर – प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ

20 नाकापेक्षा मोती जड होणे – डोईजड होणे

21 आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना – दोन्ही बाजूंनी अडचण

22 कामापुरता मामा – काम साधण्यापुरते गोड बोलणे

23 काखेत कळसा गावाला वळसा – वस्तू स्वत:पाशी असून शोधत राहणे

24 झाकली मूठ सव्वा लाखाची – दुर्गुण असले तरी प्रकट करू नये
@mpscmarathivyakaran
@mpscmarathivyakaran
🔹 स्वरांच्या र्‍हस्व व दीर्घ उच्चारानुसार शब्दांचे वेगळे अर्थ होऊ शकतात.

(१) पाणि --हात पाणी --जल

(२) दिन --दिवस दीन --गरीब

(३) शिर --डोके शीर --रक्त वाहिनी

(४) पिक --कोकीळ पीक --धान्य

(५) सुत -- मुलगा सूत --धागा

(६) सुर --देव सूर --आवाज

(७) सलिल -पाणी सलील -लीलेने

(८)चाटु - संतोष देणारे चाटू -लाकडी पळी

(९) मिलन --भेट मीलन --मिटणे
@mpscmarathivyakaran
🌷कथासंग्रह🌷


🌷वि.वा.शिरवाडकर : फुलवाली, सतारीचे बोल,काही वृद्ध काही तरुण

🌷अरुण साधू : एक माणूस उडतो त्याची गोष्ट, बिनपावसाचा दिवस, मुक्ती, मंत्रजागर, ग्लानिर्भवती भारत

🌷प्र. के.अत्रे : अशा गोष्टी अशा गमती, कशी आहे गंमत, कावळ्याची शाळा, फुले आणि मुले

🌷गंगाधर गाडगीळ : कडू आणि गोड, नव्या वाटा, भिरभिरे, संसार, कबुतरे, तलावतले चांदणे, वर्षा, खंडू, पाळणा, काजवा

🌷चिं. त्र्य. खानोलकर : चाफा आणि देवाची आई,सनई

🌷पु.भा.भावे : परंपरा, सार्थक,पहिला पाऊस,बंगला, हिमानी, फुलवा,झुंझारराव, दुर्गा

🌷रा.रं. बोराडे : नातीगोती, पेरणी, बुरुज, मळणी, माळरान

🌷राजन गवस : आपण माणसात जमा नाही
@mpscmarathivyakaran
🌷कथासंग्रह🌷


🌷विजय तेंडुलकर : काचपत्रे, मेनपात्रे, गाणे

🌷अण्णाभाऊ साठे : खुळवाडी, बरबाद्या कंजारी, फरारी, रानवेल, कृष्णाकाठच्या कथा, भानामती, मास्तर, गुऱ्हाळ, आबी, निखारा, लाडी, पिसाळलेला माणूस

🌷शंकरराव खरात : बारा बलुतेदार, तडीपार, दौंडी, सांगावा, गावशिव , माझा काय दोष, टिटविचा फेरा, लिलाव, सुटका, आडगावचे पाणी

🌷पु.ल.देशपांडे : बटाट्याची चाळ, नसती उठाठेव, खोगीर भरती
🌸मराठी व्याकरण 🌸
_________________

🍁समनार्थी शब्द🍁

◆ अनघ : निष्पाप

◆उथव् : भरती

◆ मज्जन : स्नान करने

◆ कृपण : कंजुष

◆ लवण : मीठ

◆ हलाहल : विष

◆ प्रथमनाथ : शंकर

◆ मिठी : आवड

@mpscmarathivyakaran
🌸मराठी व्याकरण🌸
__________________
@mpscmarathivyakaran
🍁ग.दि. मादुगुळकर 🍁

जन्म : १ ऑक्टोबर १९१९–

मृत्यु : १४ डिसेंबर १९७७)

◆टोपन नाव : आधुनिक वाल्मिकी

◆ विख्यात मराठी कवी व पटकथा–संवाद-लेखक.

◆जन्म शेटेफळ ह्या गावचा.

◆शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध

◆हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, मा. विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी (१९३८) ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला.

◆सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले.

◆कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर हे मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले.

◆नाटक :
१)युद्धाच्या सावल्या(प्रयोग, १९४४)

◆ कविता–
१)जोगिया (१९५६),
 २)चार संगीतिका (१९५६),
३)काव्यकथा (१९६२), 
४)गीत रामायण (१९५७),
५)गीत गोपाल (१९६७), 
६)गीत सौभद्र (१९६८).

◆कथासंग्रह–

१)कृष्णाची करंगळी (१९६२), 
२)तुपाचा नंदादीप (१९६६), 
३)चंदनी उदबत्ती (१९६७).

◆कादंबरी–आकाशाची फळे (१९६०).

◆ आत्मचरित्रपर–मंतरलेले दिवस (१९६२)
आणि वाटेवरल्या सावल्या (१९८१).
🌸मराठी व्याकरण 🌸
________

@mpscmarathivyakaran

🍁पु.ल.देशपांडे🍁

◆पूर्ण नाव: पुरषोत्तम लक्ष्मन देशपांडे.

◆टोपन नाव : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व

◆जन्म : ८-११-१९१९(मुंबई )

◆मृत्यु : १२-६-२०००.(पुणे)

◆शिक्षण :- M.A.,LL.B.

◆विवाह :-सुनीता देशपांडे.(१९४६)

◆कार्यक्षेत्र:- ,कवि, रंगभूमि कलावंत

◆अवार्ड : पद्मश्री-१९६६,
पद्मभूषण -१९९० ,
महाराष्ट्र भूषण,
साहित्य अकादमी
संगीत नाटक अकादमी
1. स्पर्श व्यंजन : एकूण व्यंजन 25 आहेत. 
@mpscmarathivyakaran
                ज्याचा उच्चार करतांना फुफुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडतांना टाळू, कंठ, मुर्धा, दात, व ओठ यांचा स्पर्श 
                करून बाहेर निघते म्हणून त्यांना स्पर्श व्यंजन म्हणतात.
                उदा. क, ख, ग, घ, ड
                    च, छ, ज, झ, त्र
                    ट, ठ, ड, द, ण
                    त, थ, द, ध, न
                    प, फ, ब, भ, म
     स्पर्श व्यंजनाचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
1. कठोर वर्ण 
2. मृदु वर्ण 
3. अनुनासिक वर्ण 

1. कठोर वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात.
              उदा. क, ख
                  च, छ
                  ट, ठ 
                  त, थ 
                  प, फ

2. मृद वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना मृद वर्ण असे म्हणतात. 
            उदा. ग, घ
                ज, झ
                ड, ढ
                द, ध
                ब ,भ

3. अनुनासिक वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केल्या जातो त्यास अनुनासिक असे म्हणतात. 
                  उदा. ड, त्र, ण, न, म      
🔹काही समानार्थी म्हणी

आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा
 
आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा
 
कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे शेपूट नळीत घातले
 
साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - तरी वाकडे ते वाकडेच
 
कामा पुरता मामा - ताकापुरती आजी
 
काखेत कळसा गावाला वळसा - तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी
 
करावे तसे भरावे - जैसी करणी वैशी भरणी
 
खाई त्याला खवखवे - चोराच्या मनात चांदणे
 
खाण तशी माती - बाप तसा बेटा
 
आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू
 
गाढवापुढे वाचली गीता अन - नळी फुंकले सोनारे इकडून
 
काळाचा गोंधळ बरा - गेले तिकडे वारे
 
घरोघरी मातीच्या चुली - पळसाला पाने तीनच
 
चोरावर मोर - शेरास सव्वाशेर
 
जशी देणावळ तशी खानावळ - दाम तसे काम
 
पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या
 
नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस
 
नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही, बडा घर पोकळ वासा
 
बेलाफुलाची गाठ पडणे - कावळा बसायला आणि फाटा तुटायला
 
पी हळद अन हो गोरी - उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
 
वराती मागून घोडे - बैल गेला अन झोपा केला
 
वासरात लंगडी गाय शहाणी - गावंढया गावात गाढवीण

Join http://t.me/mpscmarathivyakaran
🔹 पुण्यातील औंधमध्ये बिम्सटेक देशांचा युद्ध सराव

बिम्सटेक अंतर्गत शस्त्रसज्जतेसोबतच चकमकीमध्ये दहशतवाद्यांचा मुकाबला करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा सराव इथे केला जातोय. नेपाळ आणि थायलंड या देशांनी सैन्य तुकडी न पाठवता फक्त निरीक्षक पाठवले आहेत. बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन म्हणजेच ‘बिम्सटेक’ या संघटनेचे सदस्य असलेल्या सात देशांचा पहिला लष्करी युद्ध सराव पुण्यात पार पडतोय. यामध्ये शस्त्रसज्जतेसोबतच चकमकीमध्ये दहशतवाद्यांचा मुकाबला करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा सराव इथे केला जातोय.

तत्परता, शिस्त, चपळता आणि धाडस हे सैनिकाचं वैशिष्ट्य. मग हा सैनिक भारतीय सैन्यातला असो किंवा इतर कुठल्याही सैन्यातला. पुण्यातील औंधमधल्या लष्करी मैदानावर हीच गुण वैशिष्ट्ये सध्या दर्शनीय आहेत. ‘बिम्सटेक’मध्ये भारत, बांगलादेश, नेपाळ, भूटान, श्रीलंका, थायलंड आणि म्यानमार या देशांचा समावेश आहे.

या युद्ध सरावात प्रत्यक्षपणे भारत, बांगलादेश, भूटान, श्रीलंका आणि म्यानमार हे सहभागी झाले आहेत. तर नेपाळ आणि थायलंड या देशांनी सैन्य तुकडी न पाठवता फक्त निरीक्षक पाठवले आहेत. दहशतवादाचा सामना करण्यासाठी या युद्ध सरावाचं आयोजन करण्यात आलं आहे.

दहशतवाद्यांना तोंड देण्यासाठी ज्या कौशल्यांची आवश्यकता असते, त्यांची देवाणघेवाण या युद्ध सरावाच्या माध्यमातून केली जात आहे. 10 सप्टेंबरपासून याची सुरुवात झाली आणि 16 सप्टेंबरला त्याची सांगता होणार आहे. या दरम्यान सहभागी देशांच्या सैन्य तुकड्या थिअरॉटीकल आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून युद्ध सराव करत आहेत.

शहरी भाग तसेच घनदाट जंगलाच्या भागात दहशतवादविरोधी कारवाई यशस्वीपणे करण्यासाठी हे सैनिक सज्ज होत आहेत. यामध्ये सहभागी झालेल्या देशांच्या तुकडीमध्ये 25 सैनिक आणि 5 निरीक्षकांचा समावेश आहे. या सरावात सहभागी होऊन अनेक नव्या युक्त्या शिकायला मिळाल्याची भावना सहभागी झालेल्या सैनिकांनी व्यक्त केली आहे.

▪️नेपाळ आणि थायलंडचा सहभाग का नाही?

नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये झालेल्या बिम्सटेक संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सदस्य देशांना युद्धसरावाचं निमंत्रण दिलं होतं. थायलंड वगळता सर्व देशांनी आपण यात सहभागी होणार असल्याचं सांगितलं. थायलंडने तेव्हाच स्पष्ट केलं होतं, की आपण फक्त निरीक्षक म्हणून यामध्ये सहभाग घेऊ. नेपाळने मात्र ऐनवेळी यातून माघार घेतली. नेपाळमधील अंतर्गत राजकीय कारण यामागे सांगितलं जात आहे. यानंतर नेपाळने फक्त निरीक्षकाच्या भूमिकेत यामध्ये सहभाग घेतला.
Join HTTPS://t.me/mpscmarathivyakaran
▪️काय आहे बिम्सटेक?

बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन म्हणजेच ‘बिम्सटेक’ ही दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियातील सात देशांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. 6 जून 1997 रोजी स्थापना करण्यात आलेल्या या संघटनेत भारत, बांगलादेश, नेपाळ, भूटान, श्रीलंका, थायलंड आणि म्यानमार या देशांचा समावेश आहे.

बंगालच्या उपसागरावर अवलंबून असलेल्या या सात देशांसाठी ‘बिम्सटेक’ हे महत्त्वाचं व्यासपीठ मानलं जातं. दळणवळण, पर्यावरण, दहशतवाद रोखणं, पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी मिळून काम करणं, ऊर्जा, आरोग्य, कृषी, व्यापार, तंत्रज्ञान, मासेमारी, हवामान बदल, संस्कृतीक समन्वय अशा घटकांवर बिम्सटेक संमेलनात प्रकाश टाकला जातो.

'बिम्सटेक'चं पहिलं संमेलन बँकॉकमध्ये (थायलंड) 31 जुलै 2004 रोजी झालं होतं. तर दुसरं संमेलन 13 नोव्हेंबर 2008 रोजी नवी दिल्लीत, तिसरं संमेलन 4 मार्च 2014 रोजी न्याय प्यायी डॉ (म्यानमार) आणि चौथं संमेलन नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये नुकतंच पार पडलं.
🌸मराठी व्याकरण 🌸
_____________

@mpscmarathivyakaran

🍁समनार्थी शब्द🍁

◆ अनघ : निष्पाप

◆उथव् : भरती

◆ मज्जन : स्नान करने

◆ कृपण : कंजुष

◆ लवण : मीठ

◆ हलाहल : विष

◆ प्रथमनाथ : शंकर

◆ मिठी : आवड
🌹नऊ संख्या आणि नवरात्र आध्यात्मिक संबंध आणि महत्त्व🌹


🌺 *नवरात्रीच्या घटाभोवती पसरलेल्या मातीत पेरली जाणारी ‘नऊ’ धान्यं*
साळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, हरभरा, जवस, मटकी.

🔶 *दुर्गामातेचे ‘नऊ’ अवतार*
शैलपुत्री, ब्रह्यचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिरात्री.

🔶 *दुर्गादेवीची ‘नऊ’ नावं*
अंबा, चामुंडा, अष्टमुखी, भुवनेश्वरी, ललिता, महाकाली, जगदंबा, नारायणी, रेणुका.

🌺 *महाराष्ट्रातली देवीमातेची प्रसिद्ध ‘नऊ’ देवस्थानं*
वज्रेश्वरी (वसई), महालक्ष्मी (डहाणू), महाकाली (अडिवरे), सप्तशृंगी (वणी), रेणुकादेवी (माहूर), महालक्ष्मी (कोल्हापूर), तुळजाभवानी (तुळजापूर), योगिनीमाता (अंबेजोगाई),
श्री एकवीरादेवी (कार्ला).

🌺 *नवरात्रींचे ‘नऊ’ रंग*
लाल, निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, भगवा किंवा केशरी, पांढरा, गुलाबी, जांभळा.

🌺 *नवग्रहांच्या ‘नऊ’ समिधा*
रुई, पलाश, खदिर, अपामार्ग, पिंपळ, औदुंबर, शमी, दुर्वा, कुश.

🌺 *नवग्रहांची ‘नऊ’ रत्नं*
माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलमणी, गोमेद, वैडूर्य,पीतवर्ण-मणी.

🌺 *‘नऊ’ प्रकारची दानं*
अन्नदान, धनदान, भूदान, ज्ञानदान, अवयवदान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, देहदान.

🔶 *नवविध भक्तीचे ‘नऊ’ प्रकार*
श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन, पादसेवन, वंदन, सख्य, दास्य, आत्मनिवेदन.

🌺 *प्रसिद्ध ‘नऊ’ नाग*
शेष, वासुकी, तक्षक, शंखपाल, कालिया, कर्कोटक, पद्मक, अनंत, पद्मनाभ.

🔶 *समस्त मानवजातीला सामावून घेणा-या पृथ्वीचे नवखंड*
भरतखंड (पूर्व), केतुमालखंड (पश्चिम), रम्यखंड (दक्षिण), विधिमालखंड (उत्तर), वृत्तखंड (आग्नेय), द्रव्यमालखंड (नैऋत्य), हरिखंड (वायव्य), हर्णखंड (ईशान्य), सुवर्णखंड (मध्य).

🌺 *मानवी देहांतर्गत असलेले ‘नऊ’ कोश* अन्नमय, शब्दमय, प्राणमय , आनंदमय, मनोमय, प्रकाशमय, ज्ञानमय , आकाशमय, विज्ञानमय.

🌺 *मानवी मनाचे ‘नऊ’ गुणधर्म* धैर्य, सामर्थ्य, भ्रांती, कल्पना, वैराग्यवादी, सद्विचार, रागद्वेषादी असद्विचार, क्षमा, स्मरण, चांचल्य.

🌺 *मानवी शरीराच्या ‘नऊ’ अवस्था*
मातेच्या उदरातली निषेक रूपावस्था, गर्भावस्था, जन्म, बाल्य, कौमार्य, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व, मृत्यू.

@mpscmarathivyakaran
🌺 *नाथांच्या नीतीशास्त्रातली ‘नऊ’ रहस्यं*
आयुष्य, वित्त, गृहछिद्र, मैथून, मंत्र, औषध, दान, मान, अपमान.
2 ) 🌷तत्पुरुष समास 🌷

@mpscmarathivyakaran

      ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेली पदे पुन्हा घ्यावी लागतात, त्यास तत्पुरुषसमास असे म्हणतात. 

थोडक्यात ज्या समासात दूसरा शब्द प्रधान / महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.

       उदा.    

1.    महामानव      -   महान असा मानव

2.    राजपुत्र        -    राजाचा पुत्र

3.    तोंडपाठ       -    तोंडाने पाठ

4.    गायरान       -    गाईसाठी रान

5.    वनभोजन     -    वनातील भोजन

      🌷तत्पुरुष समासाचे 7 उपप्रकर पडतात

i) विभक्ती तत्पुरुष

      ज्या तत्पुरुष समासात विभक्ती प्रत्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडलेली असतात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात.
उदा :

1)कृष्णाश्रित : कृष्णाला आश्रित

2)गुणहीन : गुणाने हीन

३)पूजाद्रव्य : पूजेसाठी द्रव्य

4)राजवाडा : राजाचा वाडा


ii) अलुक तत्पुरुष

     ज्या विभक्ती तत्पुरुष अमासात पहिला पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास म्हणतात.

           अलुक म्हणजे लोप न पावणारा म्हणजे ज्या विभक्ती तत्पुरुष सामासिक शब्दांच्या पहिल्या पदाचा विभक्तीप्रत्यय लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात.

      उदा. 

1.    तोंडी लावणे

2.    पाठी घालणे

3.    अग्रेसर

4.    कर्तरी प्रयोग

5.    कर्मणी प्रयोग


iii) उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष

      ज्या तत्पुरुष समासात दुसरे पद महत्वाचे असून ते दुसरे पद हे धातुसाधीत/ कृदंत म्हणून त्या शब्दांत येते तसेच त्याचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही अशा समासास उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष असे म्हणतात.

      उदा.    

1.    ग्रंथकार          -    ग्रंथ करणारा

2.    शेतकरी          -    शेती करणारा

3.    लाचखाऊ        -    लाच खाणारा

4.    सुखद            -    सुख देणारा

5.    जलद            -    जल देणारा


iv. नत्र तत्पुरुष समास

     ज्या तत्पुरुष सामासातील प्रथम पद हे नकारार्थी असते त्यास नत्र तत्पुरुष असे म्हणतात.

       म्हणजेच ज्या समासातील पहिले पद हे अभाव किंवा निषेध दर्शवतात त्यांना नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात.

    उदा. (अ, अन्, न, ना, बे, नि, गैर इ.)

उदा.    

1. अयोग्य      -    योग्य नसलेला 

2. अज्ञान       -    ज्ञान नसलेला 

3. अहिंसा       -     हिंसा नसलेला
 

4. निरोगी       -    रोग नसलेला

 
5. निर्दोष        -    दोषी नसलेला
 
v) कर्मधारय तत्पुरुष समास

       ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात व त्या दोन्ही  पदांचा संबंध विशेषण व विशेष्य या प्रकारचा असतो त्यालाच कर्मधारेय तत्पुरुष समास म्हणतात.

     उदा.    

1.    नील कमल      -    नील असे कमल

2.    रक्तचंदन       -    रक्तासारखे चंदन

3.    पुरुषोत्तम       -    उत्तम असा पुरुष

4.    महादेव          -    महान असा देव

5.    पीतांबर          -    पीत असे अंबर (पिवळे,वस्त्र)

7.   चरणकमळ      -    चरण हेच कमळ

8.    खडीसाखर       -    खडी अशी साखर

     कर्मधारय समासाचे पुढील 7 उपप्रकर पडतात

    अ) विशेषण पूर्वपद कर्मधारय

🌷  जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील पहिले पद विशेषण असते अशा समासाला विशेषण पूर्वपद कर्मधारय असे म्हणतात.

  उदा.

1. महादेव         -    महान असा देव 

2. लघुपट          -    लहान असा पट
 
3. रक्तचंदन      -    रक्तासारखे चंदन


आ) विशेषण उत्तरपद कर्मधारय

🌷 जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील दुसरे पद विशेषण असते अशा समासाला विशेषण उत्तरपद कर्मधारय असे म्हणतात.

  उदा.

1. पुरुषोत्तम     -    उत्तम असा पुरुष 

2. मुखकमल     -    मुख हेच कमल

3. वेशांतर        -    अन्य असा वेश
 
4. भाषांतर       -    अन्य अशी भाषा


इ) विशेषण उभयपद कर्मधराय

🌷या समासातील दोन्ही पदे विशेषणे असतात

उदा:

1)पांढरा शुभ्र : पांढरा शुभ्र असा

2)हिरवागार : हिरवा गार असा

ई)उपमान पूर्वपद

🌷या सामासिक शब्दातील पहिले पद उपमान असते

उदा:

1) चंद्रमुख : चंद्रासारखे मुख

2)घोडनवरा : घोड्यासारखा नवरा

उ)उपमान उत्तरपद

🌷या सामासिक शब्दातील दुसरे पद उपमान असते

उदा:

1)मुखचंद्र : चंद्रासारखे मुख

2)चरणकमल : कामळासारखे चरण

ऊ)रूपक उभयपद

🌷या सामासिक शब्दातील दोन्ही पदे एकरूप असतात

उदा :

1)विद्याधन : विद्या हेच धन

2)भारतमाता : भारत रुपी माता
Forwarded from Laxman Kamble
विवाहाच्या वाटेवर : सप्तपदी

घरात एकदा लग्न आहे म्हटलं की सारं घरच लग्नमय होऊन जातं. कार्यलय, विविध वस्तूंची खरेदी, पाहुणे सगळी नुसती कामांची यादी.. किती याद्या तयार केल्या तरी हे राहिलं ते राहिलं, असं होतंच नाही का?

विवाहाच्या बंधनातील ‘सप्तपदी’ हा विधी खूप महत्त्वाचा असतो. मला वाटतं जुन्या काळातल्या स्त्रिया लग्नाच्या वेळी वयाने लहान होत्या. शिक्षण जेमतेम झालेलं मग तिला जो उपदेश सप्तपदीतून दिला जात असे तो अर्थपूर्ण होताच. पण आपण आजच्या बदलत्या काळानुसार मुलीला सप्तपदीची नवी सूत्रं दिली तर ती तिला निश्चित उपयोगी पडतील असं वाटतं.

1) हे सौभाग्याकांक्षिणी! तू आता विद्यासंपन्न झाली आहेस. संगणकाचे ज्ञानही अवगत केले आहेस आणि सहजपणे तू तुझ्या नोकरीतही कौशल्यं प्राप्त केली आहेस. तुझ्या पायात सामर्थ्य आहे. पंखात भरारी घेण्याचं बळ आहे; पण आज तू दोन घराण्यांना तुझ्या सद्विचारांनी एकत्र बांधणार आहेस.

2) हे रमणी, तुझं हे दुसरं पाऊल आहे, त्या पावलावर तू पतीसमवेत सुंदर स्वप्न पूर्ण करणार आहेस. या पावलावर तुला सार्‍या घरात आनंद निर्माण करायचा आहे. तू आनंदी असशील तरच तुझं कुटुंब आनंदी होईल. त्यामुळे ‘आनंदी जीवन’ हे सूत्र लक्षात ठेव.

3) हे प्रज्ञावंत मुली, तू खूप शिकलीस आणि नोकरीही करतेस याचा अहंपणा करू नकोस. कुणास तुच्छ लेखू नकोस. माणसातलं माणूसपण जपत जपत सासु-सासर्‍यांवर आई-वडिलांसारखं प्रेम करण्याचं ठरवून तू तिकडं पाऊल उचलले आहेस.

4) हे विद्याश्री, तुला पतीची साथ आयुष्यभर हवी आहे असं मनोमन ठरवून चौथे पाऊल उचलणार आहेस. पतीच्या सोबत त्याच्या घरातील अनेकांशी तू नव्या नात्यांचा सुंदर गोफ बांधणार आहेस.

5) हे ललने, पाचवं पाऊल उचलताना तू हे लक्षात घे की घराचा ‘ताल’ आणि ‘तोल’ तुला छानपैकी सांभाळायंचा आहे. जेवढं प्रेम वाटेवरती देत जाशील त्याच्या दुप्पट प्रेमाने तुझी ओंजळ नक्की भरेल.

6) हे मानिनी, सहाव्या पावलाशी तू हे ठरवणार आहेस की ज्या योग्य, चांगल्या परंपरा, रीतिरिवाज आहेत ते तू पुढे नेणार आहेस. पण नवविचारांचे बदल घेऊन त्याची भर टाकणार आहेस. नव्या विचारांच्या दिशेने जाताना कुणी दुखावणार नाहीना म्हणून तू काळजी नक्कीच घेणार आहेस.

7) हे सृजनशालिनी, तू तुझ्या संसारवेलीवर काही दिवसांनी नवीन जीव निर्माण करणार आहेस. तो मुलगा असू दे नाही तर मुलगी असू दे. तुला समभावनेनं त्याचं थासांग पालन-पोषण करायचं आहे. या चिमुकल्या जिवाला नवीन जग दाखवाचं आहे हे लक्षात घे.
HTTPS://t.me/saptpadivivah
काय वाटतंय वाचून? आता नव्या युगातील विवाहाच्या वाटेवरच्या मुलींनी ते वाचून विचार करावा असं वाटतं. शेवटी रुखवतातील सप्तपदी महत्त्वाची आहे नाही का?
🌷मराठी भाषेतील नऊ रस🌷

रसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे सहा रस आहेत. या सहा रसांमुळेच आपणास पदार्थांची गोडी किंवा चव कळते. यालाच आपण रसास्वाद म्हणतो.

साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसनिर्मिती होते.

मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात उदा. प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दु:खाची, पराक्रमांची इत्यादी या मनातील ‘स्थिर’ व ‘शाश्वत’ भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’ असे म्हणतात.

साहित्य कृतीच्या वाचनाने ‘स्थायी भाव’ जागृत होतात व रसनिर्मिती होते.

१) स्थायीभाव - रती

🌷रसनिर्मिती – शृंगार

हा रस कुठे आढळतो - स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्ननातून

उदा – डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहु नका.

२) स्थायीभाव – उत्साह

🌷रसनिर्मिती - वीर

हा रस कुठे आढळतो - पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनात

उदा. ‘शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’

३) स्थायीभाव –शोक

🌷रसनिर्मिती – करुण

हा रस कुठे आढळतो - दुख, वियोग, संकट यांच्या वर्णनात

उदा – आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी!

४) स्थायीभाव – क्रोध

🌷रसनिर्मिती – रौद्र

हा रस कुठे आढळतो – क्रोध, चीड किंवा रागाचे वर्णन

उदा – मनिषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती.

५) स्थायीभाव – हास

🌷रसनिर्मिती – हास्य

हा रस कुठे आढळतो - विसंगती, असंबध्द भाषण, विडंबन,चेष्टा यांच्या वर्णनात

उदा – उपास मज लागला सखेबाई उपास मज लागला.

६) स्थायीभाव – भय

🌷रसनिर्मिती- भयानक

हा रस कुठे आढळतो - युद्ध, मृत्यु, खून, सूड, राक्षस, स्मशान इत्यादीच्या वर्णनात

उदा. तो गुरासारखा ओरडला त्याचे सारे रक्त उलथे पालथे झाले व त्याने जोरात किंकाळी फोडली.

७) स्थायीभाव – जुगुप्सा

🌷रसनिर्मिती – बीभत्स

हा रस कुठे आढळतो - किळस, वीट, तिटकारा इत्यादीच्या वर्णनात.

उदा – मुंबईचा कामगार चाळीतल्या दहा बाय बाराच्या घरात, कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी, ओकारी आणणाऱ्या दुर्गंधीत आयुष्यभर खितपत पडलेला असतो.

८) स्थायीभाव – विस्मय

🌷रसनिर्मिती- अदभुत

हा रस कुठे आढळतो - आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनात

उदा – असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.

९) स्थायीभाव – शम (शांती)

🌷रसनिर्मिती – शांत

हा रस कुठे आढळतो - परमेश्वर विषयक भक्ती भाव असलेली गाणी किंवा वातावरणात.

उदा – सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनि तेजाकंडे प्रभू आमच्या ने जीवंना !
@mpscmarathivyakaran
📚 अव्ययीभाव समास :

▪️ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास‘अव्ययीभाव समास’ असे म्हणतात.

▪️अव्ययीभाव समासात आपल्याला खालील भाषेतील उदाहरणे पहावयास मिळतात.

अ) मराठी भाषेतील शब्द

उदा.  
▪️गावोगाव– प्रत्येक गावात
▪️गल्लोगल्ली – प्रत्येक गल्लीत
▪️दारोदारी – प्रत्येक दारी
▪️घरोघरी – प्रत्येक घरी

▪️मराठी भाषेतील व्दिरुक्ती (पहिल्या शब्दांचीच पुनरावृत्ती) होऊन तयार झालेले शब्द हे क्रियाविशेषणा प्रमाणे वापरले जातात म्हणून ही उदाहरणे अव्ययीभाव समासाची आहेत.

ब) संस्कृत भाषेतील शब्द

उदा.  
▪️प्रती (प्रत्येक)– प्रतिमास, प्रतिक्षण, प्रतिदिन
▪️आ (पर्यत) – आमरण
▪️आ (पासून) – आजन्म, आजीवन
▪️यथा (प्रमाण) – यथाविधी, यथामती, यथाशक्ती.

▪️वरील उदाहरणात प्रति, आ, यथा हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत. संस्कृत मधील उपस्वर्गाना अव्यय मानले जाते.
वरील उदाहरणामध्ये हे उपस्वर्ग प्रारंभी लागून सामासिक शब्द तयार झालेला आहे व ह्या उपस्वर्गाना सामासिक शब्दांत अधिक महत्व आहे.

क) अरबी व फारसी भाषेतील शब्द

उदा.
▪️दर (प्रत्येक) – दरसाल, दरडोई, दरमजल.
▪️गैर (प्रत्येक) – गैरसमज, गैरहजर, गैरशिस्त
▪️हर (प्रत्येक) – हररोज, हरहमेशा
▪️बे (विरुद्ध) – बेकायदा, बेमालूम, बेलाशक, बेलाईक

▪️वरील उदाहरणात संस्कृत भाषेमध्ये फारसी व अरबी भाषेतील उपस्वर्ग लागून मराठी भाषेत अव्ययीभाव समासाची उदाहरणे तयार झाली आहेत.
@mpscmarathivyakaran