LetsUpp Marathi
4.85K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
_*LetsUp News Updates*_

● नवी दिल्ली - नोटबंदीनंतर जवळपास 73 हजार अनोंदणीकृत कंपन्यांनी बँक खात्यात 24 हजार कोटी रुपये केले जमा

● नवी दिल्ली - देशातील पहिले क्रीडा विद्यापीठ मणिपूरमध्ये, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला राष्ट्रपतींची मान्यता

● नवी दिल्ली - रेल्वेसेवा देण्यास उशीर झाल्यास कर्मचाऱ्यांची बढती रोखण्याचा इशारा रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी सर्व विभागातील प्रमुखांना दिला

● कोलकाता - पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांना होमवर्क दिले जाऊ नये यासाठी केंद्र सरकार संसदेत विधेयक आणण्याच्या तयारीत

● मुंबई - भडकलेल्या इंधन दरांमुळे निर्माण झालेली महागाई नियंत्रणात आणण्यास रिझर्व्ह बँक रेपो दरात वाढ करण्याची शक्यता

● नागपूर - 'एचएमटी'सह तांदळाचे विविध वाण शोधणारे कृषिभूषण दादाजी खोब्रागडे (76) यांचे दीर्घ अाजाराने निधन

● पुणे - मान्सून एक दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल होणार, दोन दिवस मराठवाड्यासह राज्यात पूर्वमोसमी

● गुगलने स्थानिक बाबींना प्राधान्य देणारे अर्थात 'हायपर लोकल' या प्रकारातील नेबरली हे अॅप भारतीय ग्राहकांसाठी केले सादर

● जागतिक क्रमवारीतील नंबर वन कसोटी गोलंदाज कागिसो रबाडा याची दक्षिण आफ्रिकेचा या वर्षाच्या सर्वोत्तम क्रिकेटर पुरस्कारासाठी निवड

● संजय दत्तचे बायोपिक 'संजू'चे पहिले गाणे 'मैं बढिया, तू भी बढिया...' झाले रिलीज

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🎬 'संजू'चं पहिलं 'बढीया' गाणं रिलीज

LetsUp I Video

अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपट 'संजू' चं पहिले गाणे 'मैं बढिया, तू भी बढिया...' रिलीज झाले आहे. हे गाणे सोनम कपूर आणि रणबीरवर चित्रीत करण्यात आले आहे. या चित्रपटातील हे पहिलच गाणं आहे. हे गीत सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांनी गायले आहे.

व्हिडिओ पाण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/f4Emwd

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
_*LetsUp News Updates*_

● नवी दिल्ली - बँक एटीएममधून पैसे काढणं किंवा चेकबुक यांसारख्या ग्राहकांच्या निःशुल्क सेवांचा जीएसटीमध्ये समावेश नाही

● नवी दिल्ली - आयडीबीआय, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, सेंट्रल बँक आणि बँक ऑफ बडोदा यांचे विलीनीकरण करून सरकार एक मोठी बँक बनवू शकते

● नवी दिल्ली - गेल्या सहा वर्षात 1.26 टक्केच वाढले देशातील जंगल, केंद्रीय पर्यावरणमंत्री हर्षवर्धन यांची माहिती

● कोलकाता - रेल्वे विभागाच्या निर्णयानुसार, 2022 पर्यंत सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांची गती 25 किमी प्रतितास वेगाने वाढवली जाणार

● मुंबई - ‘NEET’ 2018चा निकाल जाहीर, कल्पना कुमारी ऑल इंडिया रँकमध्ये पहिली तर नांदेडचा कृष्णा देशात सातवा

● मुंबई - शेतकऱ्यांनी आता टोकाची भूमिका घ्यायला हवी, प्रश्न मार्गी लागेपर्यंत शेतकऱ्यांनी मागे हटू नये; शरद पवार यांचे शेतकऱ्यांना आवाहन

● मुंबई - पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून पत्ता कट केल्यानंतर आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिला राजीनामा

● आता भीम अॅपवरून पैशांच्या देवाण-घेवाणीसह विविध प्रकारांचे बील्स भरण्याची सुविधा देखील ग्राहकांना अपडेटच्या माध्यमातून प्रदान

● फ्रेंच ओपन स्पर्धेतून सेरेना विल्यम्सची माघार, दंडाच्या दुखापतीमुळे घेतला निर्णय, सेरेनाने माघार घेतल्याने शारापोव्हा उपांत्यपूर्व फेरीत दाखल

● केकेआर संघाचा स्टार खेळाडू शुभमन गिल हा बॉलिवूड स्टार शाहरुख खानची मुलगी सुहानाचे क्रश असल्याची क्रिकेट वर्तुळात चर्चा

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⚡ आता एटीएम व्यवहार आणि चेकबुकवर GST नाही!

LetsUp I Update

▫ बँक एटीएममधून पैसे काढणं किंवा चेकबुक यांसारख्या ग्राहकांच्या निःशुल्क सेवांचा जीएसटीमध्ये समावेश नाही

▪ क्रेडिट कार्डचं बिल उशिरा भरल्यानंतर लागणाऱ्या शुल्कावर जीएसटी आकारण्यात येणार आहे

▪ अनिवासी भारतीयांकडून विमा खरेदीवरही जीएसटी लागणार आहे

▪ महसूल विभागाने बँकिंग सेवा, विमा आणि शेअर यावर जीएसटी लागण्यासंबंधित पुन्हा-पुन्हा विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांवर उत्तर देत दिले स्पष्टीकरण

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🚩 शिवाजी महाराज यांचा 345 वा राज्याभिषेक सोहळा

LetsUp I Update

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांचा 345 वा राज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर साजरा होत आहे. यासाठी केवळ राज्यातूनच नाही तर देशभरातून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल झाले आहेत.

किल्ले रायगडावरील वातावरण शिवमय झालं आहे. ढोलताशांचा गजर सुरू आहे. लवकरच पालखी मिरवणूक निघणार आहे. तसेच रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजी राजे यांच्या उपस्थितीत मुख्य सोहळ्याला सुरुवात होईल, संभाजीराजे यांचे मार्गदर्शन झाल्यानंतर राजसदरेवरून पालखीचे शिवसमाधिकडे प्रस्थान होईल तेथे समाधी दर्शनानंतर या दिमाखदार सोहळ्याची सांगता होईल.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👌 राज्यातील अंगणवाड्या होणार डिजिटल

LetsUp I Update

राज्यातील 30 जिल्ह्यांमधील 85 हजार 452 अंगणवाडी केंद्रांमध्ये "राष्ट्रीय पोषण मिशन' राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील अंगणवाड्या डिजिटल होण्यास मदत होणार आहे.

या मिशनअंतर्गत अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन, लहान मुलांचे वजन-उंची घेण्यासाठी आधुनिक साधने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रामुख्याने बालकांमधील कुपोषण व रक्तक्षयाचे प्रमाण कमी करणारा हा प्रकल्प राज्यात 2018-19 पासून राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. सध्या हा प्रकल्प 30 जिल्ह्यात राबविण्यात येणार असून 2019-20 मध्ये उर्वरित सहा जिल्ह्य़ांमध्येही राबविण्यात येणार आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
LetsUp News Updates

● नवी दिल्ली - आरबीआयने 2018-19 या वर्षाचं तीसरे पतधोरण केले जाहीर, रेपो दरात पाव टक्क्यांनी वाढ केल्याने महागाईही वाढण्याची चिन्हं

● नवी दिल्ली - केंद्रीय कॅबिनेटने ग्रामीण डाक सेवकांच्या वेतनात केली तिप्पट वाढ, 1 जानेवारी 2016 पासून लागू होईल वाढ

● नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साखर उत्पादकांना केंद्राकडून साडेआठ हजार कोटींचं पॅकेज

● नवी दिल्ली - कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी आणि कथित नक्षली संबंधावरुन अटक करण्यात आलेल्या राणा जेकब याला ट्रान्झीट रिमांड; 8 जून रोजी पुणे कोर्टात करणार हजर

● मुंबई - एसटीच्या तिकीट दरात 18 टक्के वाढ, येत्या 15 जूनपासून नवे दर लागू होणार, एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आणि डिझेलच्या वाढलेल्या दरांमुळे निर्णय

● मुंबई - अमित शाह-उद्धव ठाकरेंमधील भेट सकारात्मक, येणाऱ्या दिवसांत अजून 2 ते 3 बैठका होण्याची शक्यता

● मुंबई - महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ यांनाही मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

● व्हॉट्सअॅपवर लवकरच प्रेडिक्टीव्ह अपलोड हे फिचर येणार, याच्या मदतीने युजरला फोटो शेअरिंगमध्ये सुविधा मिळणार

● क्रिकेटपटू विराट कोहलीचा जगातल्या सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीत 83 वा क्रमांक, तो 24 दशलक्ष अमेरिकेन डॉलर्स कमावत असल्याचा फोर्ब्जचा अंदाज

● सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'काला' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज, प्रदर्शनापूर्वीच 'काला'ने तब्बल 230 कोटी रुपयांची केली कमाई

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⚡ व्हॉट्सअॅपवर लवकरच प्रेडिक्टीव्ह अपलोड फिचर

LetsUp I Update

लवकरच व्हॉट्सअॅपवर प्रेडिक्टिव्ह अपलोड या नवीन फिचरची भर पडणार आहे. हे फिचर फोटो अपलोडींगशी संबंधित आहे. यात कोणत्याही चॅट किंवा ग्रुपमध्ये फोटो सेंड करण्याआधी तो व्हॉट्सअॅपच्या सर्व्हरवर अपलोड होईल. यानंतर संबंधीत चॅट किंवा ग्रुपमध्ये याला सेंड करणे सोपे होणार आहे.

प्रेडिक्टीव्ह अपलोड फिचर सिंगल आणि मल्टीफोटो या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. तथापि हे सध्या प्रयोगात्मक अवस्थेत असल्यामुळे याचा सध्या वापर करण्यासाठी युजरला त्याचा कॅमेरा अथवा फोटो गॅलरीतील किमान 12 फोटोंना सिलेक्ट करावे लागणार आहे. या प्रतिमा संपादीत (एडिट) करून कोणत्याही चॅट ग्रुपमध्ये पाठविण्याआधी याला व्हाटसअॅपच्या सर्व्हरवर पाठविले जाणार आहे.

यामुळे एडिट केलेले फोटो हे क्षणार्धात संबंधीत चॅट किंवा ग्रुपमध्ये सेंड करता येणार आहे. सध्या अँड्रॉईड व आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी याला सादर करण्यात आले आहे. लवकरच व्हाटसअॅपच्या सर्व युजर्ससाठी याला लागू करण्यात येणार आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🤔 आता दिवस होणार 25 तासांचा!

LetsUp I Update

पृथ्वीवरचा प्रत्येक दिवस आता 25 तासांचा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांना काम पूर्ण करण्यासाठी थोडा अधिक वेळ मिळणार आहे तर आळशी लोकांना आराम करायला एक तास जास्त मिळणार आहे.

सुमारे 1.4 अब्ज वर्षांपूर्वी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ होता. पृथ्वीचे परिवलन आणि चंद्र यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. चंद्र त्यावेळेस पृथ्वीच्या अत्यंत जवळ असल्यामुळे तेव्हा दिवस केवळ 18 तासांचा असायचा म्हणजे पृथ्वीला स्वतःच्या आसाभोवती फिरून एक चक्र पूर्ण करायला केवळ 18 तास पुरेसे असायचे.

चंद्र जसजसा पृथ्वीपासून दूर जाऊ लागला तसा परिवलनाला वेळ जास्त लागू लागला आणि आज चंद्र ज्या अंतरावर आहे त्यावरुन पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालायला 24 तास लागतात. पण संशोधकांनी आता हे लक्षात आणून दिलंय की, चंद्र पृथ्वीपासून अजूनही दूर जातंच आहे. त्यामुळे पृथ्वीच्या परिवलनाची गतीही हळूहळू मंदावत जाईल. साहजिकच परिवलानासाठी म्हणजे एका दिवसासाठी लागणारे तासही वाढणार आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⚡ दहावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींची बाजी

# ताज्या बातम्यांसाठी 👉 LetsUp.in

महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्याचा निकाल यंदा 89.41 टक्के लागला आहे. परंपरेप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुलींचा निकाल 91.97 टक्के इतका लागला आहे. तर 87.27 टक्के मुले पास झाली

👉 विभागवार निकाल खालीलप्रमाणे :

▫ कोकण : 96%
▪ कोल्हापूर : 93.88%
▫ पुणे : 92.08%
▪ मुंबई : 90.41%
▫ औरंगाबाद : 88.81%
▪ नाशिक : 87.42%
▫ अमरावती : 86.49%
▪ लातूर : 86.30%
▫ नागपूर : 85.97%

🌐खालील वेबसाईटवर तुम्ही निकाल पाहू शकता.

▫ www.mahresult.nic.in
▪ www.sscresult.mkcl.org
▫ www.maharashtraeducation.com

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⚡ आता व्हॉट्सअॅपवरील फेक मेसेज ओळखता येणार!

LetsUp I Update

व्हॉट्सअॅपने एक नवीन फीचर आणले आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपवरील फॉरवर्ड मेसेज ओळखता येणार आहेत. त्याद्वारे संबंधित मेसेज फॉरवर्ड केलेला आहे की टाईप करून पाठवण्यात आला आहे हे कळणार आहे.

व्हॉट्सअॅपने हे फीचर अॅण्ड्रॉईड बीटा (2.18.179) व्हर्जनमध्ये लाँच केले आहे. यूजर्सने व्हॉट्सअॅपवर एखादा मेसेज फॉरवर्ड पर्याय निवडून इतरांना पाठवला असेल तर, त्या मेसेजच्या वरच्या भागात 'फॉरवर्डेड' असा उल्लेख असणार आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीला मेसेज पाठवला आहे, तिला तो फॉरवर्ड मेसेज असल्याचे समजेल. मात्र, मेसेज कॉपी आणि पेस्ट करून पाठवला असल्यास त्यावर 'फॉरवर्डेड' असा उल्लेख नसेल.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
LetsUp News Updates

● नवी दिल्ली - रक्तदान करण्यासाठी केंद्र सरकारने पहिल्यांदा व्यापक नियम आणि अटी केल्या निश्चित, त्यानुसार आता सतराव्या नव्हे, अठराव्या वर्षी करता येईल रक्तदान

● नवी दिल्ली - कर विभागाने निर्यातदारांचे 7 हजार कोटींचे थकीत जीएसटी रिफंड केले जारी, निर्यातदारांचे 14 हजार कोटींचे रिफंड होते थकीत

● पणजी - गोवा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार शांताराम नाईक यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे निधन, ते 73 वर्षांचे होते

● मुंबई - राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा अघोषित संप मागे; परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि एसटी कामगार संघटना यांच्या बैठकीत सकारात्मक तोडगा

● मुंबई - पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे त्यांच्याकडील कृषी व फलोत्पादन खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेशी जाण्यापूर्वी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविले

● पुणे - महाराष्ट्राचा ७० टक्के भाग मान्सूनने व्यापला; आज राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पावसाचा अंदाज; हवामान खात्याची माहिती

● रिलायन्स जिओ 4 जी चा डाऊनलोड स्पीड एप्रिल 2018 मध्ये झाला कमी तर एअरटेलचा स्पीड थोडा वाढला असल्याचे ट्रायच्या अहवालात नमूद

● सॅन फ्रान्सिस्को - दोन दशकाहून अधिक काळ लोकप्रिय ठरलेल्या 'याहू'ची चॅट व मेसेंजर सेवा पुढील महिन्यात 17 जुलैनंतर पूर्णपणे बंद होणार

● आशिया कपमध्ये भारताच्या महिला संघाने पाकिस्तानवर सात विकेट्सने विजय मिळवत फायनलमध्ये दिली धडक

● नवी दिल्ली - अमेरिकन दूरचित्रवाणी कार्यक्रम क्वांटिकोमध्ये भारतीयांबाबत दाखवण्यात आलेल्या आक्षेपार्ह चित्रणाबाबत प्रियांका चोप्राने मागितली माफी

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💫 JEE ADVANCE 2018 परीक्षेचा निकाल जाहीर

LetsUp I Update

▫ देशभरात आयआयटी, एनआयटी आणि तत्सम संस्थांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘जेईई अॅडव्हान्स’ परीक्षेचा निकाल झाला जाहीर

▪ विद्यार्थी आपला निकाल अधिकृत संकेतस्थळ jeeadv.ac.in यावर जाऊन पाहू शकतात

▫ 20 मे रोजी आयआयटी कानपूरच्या वतीने देशभरातील विविध केंद्रांवर हि परीक्षा घेण्यात आली होती

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
LetsUp News Updates

● केंद्र सरकारने प्रशासकीय व्यवस्थेत हुशार लोकांना संधी देण्यासाठी मोठा बदल करण्याचा घेतला निर्णय, त्यानुसार यूपीएससी परीक्षा न देताही प्रशासकीय अधिकारी होण्याची संधी मिळणार

● देशात माता मृत्यू दरात कमालीची घट, 1990मध्ये एक लाख जन्मांमागे 556 इतका असलेला माता मृत्यू दर 2016मध्ये 130पर्यंत खाली आणण्यात आले यश

● हिंसेमुळे 2017 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या खरेदी क्षमतेच्या आधारावर 80 लाख कोटींपेक्षा अधिक झाले नुकसान

● कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या सहा दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने घातले कंठस्नान

● जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर, हरियाणाचा प्रणव गोयल देशात तर महाराष्ट्रातून ऋषी अग्रवाल प्रथम

● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परदेश दौऱ्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता

● राज्यातील विविध न्यायालयांत कार्यरत असलेल्या 121 सहायक सरकारी वकिलांच्या (गट-अ) प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या

● अॅपलने आपल्या कार प्ले प्रणालीमध्ये आता थर्ड पार्टी अॅप्सचा उपयोग करण्याची दिली सुविधा, यामुळे ही सिस्टीम युजर्ससाठी अधिक उपयुक्त ठरणार

● बांगलादेशने अखेरच्या चेंडूवर भारताचा तीन विकेट्सनी पराभव करून, महिलांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकावर पहिल्यांदाच कोरले आपले नाव

● 'हाऊसफुल्ल' या चित्रपटांच्या मालिकेत आता चौथा भाग येणार असल्याचे झाले स्पष्ट, यामध्ये संजय दत्तचीही एन्ट्री होणार असल्याची चर्चा

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
LetsUp News Updates

● केंद्राने ब्लड बँकेचे नाव बदलण्याचा दिला प्रस्ताव, त्याप्रमाणे आता याला ब्लड सेंटर संबोधले जाईल

● भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याचा सरकारचा सध्या विचार नाही व असा विचार भविष्यातही कदापि असणार नाही, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही

● भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्राला अच्छे दिन; मे महिन्यात दररोज विकली 73,632 वाहने

● माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना मूत्रसंसर्ग झाला असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे; एम्सकडून जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमधील माहिती

● काबूल शहरातील दारुलमन येथील ग्रामविकास मंत्रालयातील आत्मघातकी हल्ल्यात 12 ठार आणि 31 जखमी झाल्याची पोलिसांची माहिती

● यंदा महाराष्ट्र बोर्डाची दहावीची फेरपरीक्षा 17 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान तर बारावीची फेरपरीक्षा 17 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान होणार

● उस्मानाबाद-बीड-लातूर मतदारसंघाचा आज निकाल, तब्बल 21 दिवसांनी लागला मुहूर्त

● फेसबुकने खास गेमर्ससाठी स्वतंत्र पोर्टल केले जाहीर, यावर युजरला विविध गेम्सच्या लाईव्ह तसेच रेकॉर्डेड स्ट्रीमिंगचा आनंद घेता येणार

● भारत विरुद्ध अफगाणिस्तान दरम्यान होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यांसाठी तिकिटांचे दर अतिशय कमी ठेवण्यात आले, सर्वात स्वस्त तिकीट 50 रुपये तर सर्वात महागडे तिकीट 2000 रुपयांना

● अभिनेत्री क्रिती खरबंदा 'यमला पगला दिवाना' च्या चित्रीकरणात व्यस्त, क्रिती 'यमला पगला दिवाना फिर से'मध्ये ती पहिल्यांदाच अॅक्शन करताना दिसणार

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
LetsUp News Updates

● किरकोळ महागाईच्या निर्देशांकात वाढ, मे महिन्याअखेरीस निर्देशांक 4.87 टक्क्यांवर पोहोचला, गेल्या चार महिन्यांतील ही सर्वोच्च वाढ

● अटल पेन्शन योजनेंतर्गत दरमहा देण्यात येणाऱ्या कमाल पेन्शनची मर्यादा 10 हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन

● केंद्रीय विद्यापीठांमधून निवृत्त झालेल्या अध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित पेन्शन देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

● अमेरिका आणि उत्तर कोरिया या दोन शत्रूराष्ट्रांच्या प्रमुखांनी सिंगापूरमध्ये घेतलेली ऐतिहासिक भेट यशस्वी, 50 मिनिटांच्या या चर्चासत्रामुळे तिसरे महायुद्ध टळले

● खाजगी स्कूल व्हॅन्स सरसकट बंद करणं व्यवहार्य ठरणार नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची गैरसोय होईल, अशा शब्दात हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावले

● आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या, आज दुपारी 2.30 वाजता 'मेघदूत मुक्तिधाम' येथे होणार अंत्यसंस्कार

● लातुर-उस्मानाबाद बीड विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस 76 मतांनी विजयी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंना धक्का

● सुझुकी कंपनीने आपल्या अॅक्सेस 125 या स्कूटरला आता सीबीएस (कंबाईन्ड ब्रेक सिस्टीम) या प्रणालीसह बाजारपेठेत उतारण्याची केली घोषणा

● वेगवान गोलंदाज डेल स्टेनचे दक्षिण आफ्रिकन संघात पुनरागमन, आगामी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याला दक्षिण आफ्रिकेच्या चमूत स्थान

● अभिनेता सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिसचा अॅक्शन चित्रपट 'रेस 3' ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार, यादरम्यान अभिनेता आयुष शर्माचा 'लवरात्री' चित्रपटाचा टीझर सुद्धा रिलीज करण्यात येणार

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⚡ जिओची ग्राहकांसाठी मोठी ऑफर

LetsUp I Update

जिओने पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दमदार ऑफर आणली आहे. त्यानुसार जिओ यूजरने कोणाताही प्लान घेतला तर त्याच्यासोबत 1.5 जीबी अतिरिक्त डेटा म्हणजे एकून 3 जीबी डेटा दररोज मिळणार आहे.

------------------------
तुमचा सिबिल स्कोर चेक करा आणि सोबत मिळवा PayTm कॅश.! त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा आणि साईनअप करा 👉https://bitly.com/2Lipchk
------------------------

जिओने 149 रुपये, 349 रुपये, 399 रुपये आणि 449 रुपयांचा प्लान आणला आहे. आता 1.5 जीबी डेटा प्रतिदिनसह एकूण 3 जीबी डेटा रोज मिळणार आहे. 198 रुपये, 398 रुपये, 448 रुपये आणि 498 रुपयांच्या पॅकमध्ये आता एकूण 2 जीबी डेटा प्रतिदिन भेटतो आहे. पण नव्या ऑफरनुसार आणखी 1.5 जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजे आता एकूण 3.5 जीबी डेटा मिळणार आहे.

जिओच्या 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये 3 जीबी डेटा रोज मिळतो पण आता 1.5 जीबी अतिरिक्त डेटासह एकूण 4.5 जीबी डेटा रोज मिळणार आहे. 509 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1.5 जीबी अतिरिक्त डेटासह 5.5 जीबी डेटा रोज मिळणार आहे. 799 रुपयांच्या प्लॅनमध्ये 5 जीबी डेटा प्रतिदिन मिळतो पण आता 6.5 जीबी डेटा रोज मिळणार आहे. जिओने 300 रुपयांपेक्षा अधिकच्या रिचार्जवर 100 रुपयांची सूट देण्याची घोषणा केली आहे. 300 रुपयांच्या रिचार्जवर 20 टक्के सूट मिळणार असून जिओ अॅपमध्ये रिचार्ज केल्यावर देखील ही ऑफर मिळेल.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
LetsUp News Updates

● पंतप्रधान आवास योजनेत व्याज अनुदान मिळण्यासाठी पात्र ठरणाऱ्या मध्यम उत्पन्न गटासाठीच्या (एमआयजी) घरांच्या आकारात केंद्र सरकारने 33 टक्क्यांनी केली वाढ

● गेल्या चार वर्षांमध्ये युपीए सरकारच्या शेवटच्या चार वर्षांपेक्षा 71 टक्के अधिक लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांची झाली निर्मिती

● राष्ट्रपती रामनाथ कोविंद 27 जून रोजी सौर चरखा मोहिमेची सुरुवात करणार, याद्वारे 2 वर्षात 1 लाख रोजगार निर्माण होणार

● एअर इंडियाची शेअर बाजारात नोंदणी शक्य, निर्गुंतवणुकीत अपयश आल्यानंतर सरकार यावर विचार करू शकते

● केंद्रासह राज्यांतील एससी-एसटी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची माहिती

● अमेरिकेने भारताला 93 कोटी डॉलरमध्ये 6 एएच 64 इ अपाचे अटॅक हेलिकॉप्टर विकण्याच्या व्यवहारास दिली मंजुरी

● आणीबाणीत कारावास भोगणाऱ्यांना मिळणार दहा हजार रुपये पेन्शन, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने केले शिक्कामाेर्तब

● फेसबुकने 'मेमरीज' हे नवीन फिचर दिले, याच्या माध्यमातून एकाच पेजवर युजरला त्याने शेअर केलेले सर्व कंटेंट एकाच ठिकाणी पाहता येणार

● जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेला भारतीय संघ आणि पहिलीवहिली कसोटी खेळणारा अफगाणिस्तान संघ यांच्यातील ऐतिहासिक कसोटी क्रिकेट सामन्याला आजपासून प्रारंभ

● डान्सिंग अंकल अर्थात मध्यप्रदेशातील संजीव श्रीवास्तव यांना बॉलिवूड स्टार गोविंदा यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार असल्याची चर्चा

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🏡 पीएम आवास योजना; अधिक मोठ्या घरांना मिळणार अनुदान

LetsUp I Update

पंतप्रधान आवास योजनेत व्याज अनुदान मिळण्यासाठी पात्र ठरणाऱ्या मध्यम उत्पन्न गटासाठीच्या (एमआयजी) घरांच्या आकारात केंद्र सरकारने 33 टक्क्यांनी वाढ केली आहे. गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने निवेदनाद्वारे या निर्णयाचा तपशील जाहीर केला.

बऱ्याच वेळा मध्यमवर्गीय पहिलेच घर मोठे घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र अशी घरे पंतप्रधान आवास योजनेच्या निकषाच्या बाहेरची असतात. या लोकांना या योजनेचा फायदा मिळू शकत नाही, असे सर्वेक्षणात दिसून आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. अनुदानासाठी पात्र ठरणाऱ्या घरांचा आकार वाढविल्याने आता ‘एमआयजी’ वर्गातील अधिक लोक या योजनेतील घरे खरेदी करू शकतील. त्यामुळे 2021 पर्यंत सर्वांना घर देण्याचे उद्दिष्ट गाठणे सोपे होईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🏦 येणार 20 रुपये किंमतीचे नाणे

LetsUp I Update

भारतीय चलनात आता नव्या नाण्याचा खणखणाट लवकरच ऐकू येणार आहे. रिझर्व बँक 20 रु. मूल्याची नवी नाणी चलनात आणणार असल्याचे सांगितले जात आहे. या नाण्याचे डिझाईन व थीम वेगळी असेल. दोन धातूंच्या मिश्रणातून ते बनविले जात असून त्याच्या डिझाईनचे काम अंतिम टप्प्यात आहे.

आजमितीला भारतीय चलनात 26 हजार कोटी नाणी आहेत. त्यात आता 20 रुपयाच्या नाण्याची भर पडणार आहे. यापूर्वी 20 रु. चे नाणे स्मारक नाणे म्हणून काढले गेले होते. मात्र नवे नाणे चलनातील वैध नाणे म्हणून चलनात येत आहे. नोटा काही वर्षानंतर खराब होणारच म्हणून अधिक काळ टिकणारी नाणी चलनात आणली जात आहेत. सध्या 10 रु. मूल्याची पुरेशी नाणी चलनात असून आता 20 रु. मूल्याची नाणी चलनात आणली जात आहेत.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⚡ _*जात पडताळणीशिवाय मिळणार प्रवेश!*_

*# ताज्या बातम्यांसाठी* 👉 LetsUp.in

2018-19 या शैक्षणिक वर्षांसाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता जात पडताळमी प्रमाणपत्र नसलं तरीही प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

मात्र ही प्रक्रिया झाल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे विद्यार्थ्यांना बंधनकारक असेल. यासंबंधी कायद्यातील सुधारणा करण्याच्या अध्यादेशाला राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मान्यता दिली आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup