LetsUpp Marathi
4.85K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
LetsUp News Updates

● नवी दिल्ली - सन 2012-13 ते 2016-17 या कालावधीत सर्वाधिक 20 हजार 475 आंतरजातीय विवाह महाराष्ट्रामध्ये

● नवी दिल्ली - ई-फायलिंगसाठी 7 आयटीआर फॉर्म जारी; यामुळे करदात्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने परतावा भरणे झाले सोपे

● नवी दिल्ली - सीबीएसई बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, यंदा 83.01% निकाल, निकालात मुलींनी मारली बाजी

● नवी दिल्ली - चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा बुक करणाऱ्या भाविकांना आता 15 ते 16% जास्त भाडे मोजावे लागेल

● दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाने कुख्यात गँगस्टर अबु सालेमला 2002 च्या खंडणी प्रकरणात ठरवले दोषी

● आयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांनी अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे केले समर्थन

● एसटीचे दर लवकरच वाढणार, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले संकेत, डिझेल दर वाढीमूळे एसटीला 470 कोटीचा फटका

● विवो कंपनी आपला विवो एक्स-21 हा फ्लॅगशीप स्मार्टफोन 29 मे रोजी भारतात करणार लाँच, याची अगावू नोंदणी सुरू

● IPLचा महामुकाबला आज रंगणार; तिसऱ्यांदा चॅम्पियनसाठी चेन्नई सज्ज तर हैदराबादची नजर दुसऱ्या जेतेपदावर

● मुंबई - बॉलिवूड अभिनेता इरफान खानच्या प्रकृतीत सुधारणा; लवकरच 'उधम सिंह' या सिनेमात झळकणार

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🍽 भाकरी पिझ्झा

Letsup I Recipe

भाकरी पिझ्झा शरीरासाठी अतिशय पौष्टीक आहे. चला तर आज भाकरी पिझ्झा कसा बनतो याबद्दल माहिती जाणून घेवूयात.

साहित्य : बाजरी / ज्वारीची भाकरी - 1, घट्ट वरण - 1 वाटी, टोमॅटो - 1 (बारीक चिरलेले), काकडी - 1 (बारीक चिरलेली), कांदा - 1 (बारीक चिरलेला), कोथिंबीर - आवश्यकतेनूसार, चीझ - 50 ग्रॅम, तिखट, मीठ, चाट मसाला - चवीनुसार.

कृती : घट्ट वरणामध्ये तिखट, मीठ टाकुन मिश्रण तयार करुन घ्या. सर्वात आधी एका बाजूने भाकरीवरील पापुद्रा काढूण टाका. नंतर त्यावर तयार केलेले घट्ट वरणाचे मिश्रण पसरवून घ्यावे. वरण पसरवल्यानंतर त्याच्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि काकडी टाकूण पुन्हा घट्ट वरणाचे मिश्रण पसरवून घ्या. नंतर त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. तसेच चवीनुसार चाट मसाला टाका. यानंतर टोमॅटो सॉसने भाकरीवर डिझाईन बनवा, यामुळे ते चांगले दिसेल. त्यानंतर चीझ त्याच्यावर किसून घ्या. यानंतर भाकरीला पिझ्झ्यासारखे कट करुन घ्या. तुमचा भाकरी पिझ्झा आता तयार आहे.

टिप : तुम्ही हा पिझ्झा टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणी सोबत खाऊ शकतात. भाकरी आधल्या दिवशीच्या असल्या तर पिझ्झ्यामध्ये चांगली टेस्ट येईल.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
_*LetsUp News Updates*_

● नवी दिल्ली - देशातील सर्व राजकीय पक्ष 'आरटीआय'च्या कक्षेबाहेर, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण, दक्षता आयोगाचे निर्देश धुडकावले

● नवी दिल्ली - किफायतशीर दरात आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा देणाऱ्या जगभरातील आघाडीच्या पाच कंपन्यांमध्ये इंडिगो आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या भारतीय कंपन्यांचा समावेश

● श्रीनगर - पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेनजीकच्या गावांमध्ये तब्बल 5,500 बंकरची उभारणी केली जाणार, तसेच 200 सीमा भवन बांधण्याचे नियोजन

● लंडन - भारत-श्रीलंका संबंधांच्या 195 फाईल ब्रिटनने केल्या नष्ट, संशोधक-अभ्यासकांची चिंता

● इस्लामाबाद - पाकिस्तानात 25 जुलै रोजी निवडणूक होणार, राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन यांनी निवडणूक आयोगाच्या प्रस्तावित तारखेला दिली मंजुरी

● तिरुवनंतपुरम - केरळमधील निपाह व्हायरसच्या प्रकोपामुळे संपूर्ण राज्यातील लोकांच्या मनात धास्ती निर्माण, फळांचा व्यापार झाला ठप्प

● मुंबई - पालघर आणि भंडारा-गोंदियातल्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान, या निवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार

● शाओमी कंपनीने आपली मी क्रेडीट ही नवीन सेवा केली सुरु, या माध्यमातून ग्राहकांना इन्स्टंट पर्सनल लोन प्रदान करण्यात येणार

● शेन वॉटसनच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने इंडियन प्रीमियर लीगमधील आपल्या तिसऱ्या विजेतेपदाची मोहोर उमटविली

● मुंबई - मराठी ब्लॉकबस्टर चित्रपट 'आपला माणूस' च्या हिंदी रिमेकमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची वर्णी लागण्याची शक्यता

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🎉 चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन

Letsup I Ipl Special

चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्सने धुव्वा उडवून तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. चेन्नईने याआधी 2010 आणि 2011 साली आयपीएलचे विजेतेपद पटकावले.

शतकी खेळी करणारा सलामीचा शेन वॉटसन चेन्नईच्या फायनलमधल्या यशाचा प्रमुख शिल्पकार ठरला. त्याने 57 चेंडूंत आठ षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 117 धावांची नाबाद खेळी केली. याबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

👉 अंतिम सामन्यात झालेले काही विक्रम :

1) आयपीएलच्या अंतिम फेरीत धावसंख्येचा पाठलाग करताना शतक झळकावणारा शेन वॉटसन हा पहिला खेळाडू ठरला आहे. वृद्धिमान साहाने याआधी 2014 साली आयपीएलच्या अंतिम फेरीत शतक झळकावले होते, मात्र साहाचा किंग्ज इलेव्हन पंजाब संघ अंतिम फेरीत पराभूत झाला होता.

2) एखाद्या संघाने एका संघाला एकाच हंगामात आतापर्यंत 4 वेळा पराभूत केले नव्हते. 2018 साली चेन्नई सुपरकिंग्ज संघाने ही किमया साधली आहे. साखळी फेरीत दोनदा, एकदा क्वालिफायर सामन्यात व एकदा अंतिम फेरीत चेन्नईने हैदराबादवर मात केली आहे.

3) रोहित शर्माच्या नावावर आतापर्यंत 4 आयपीएल विजेतेपद जमा आहेत. (3 वेळा मुंबई इंडियन्स, 1 वेळा डेक्कन चार्जर्स) या पंक्तीत आता अंबाती रायडू आणि हरभजनसिंह यांनाही स्थान मिळाले आहे.

4) चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या 3 वेळा विजेतेपद मिळवण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

5) आयपीएल टायटल जिंकण्यासोबतच धोनीने आणखी एक विक्रम नावावर केला. धोनी आयपीएलमध्ये सर्वाधिक स्टम्पिंग करणारा विकेटकीपर ठरला आहे. धोनीने विकेटच्या मागे आतापर्यंत 33 स्टम्पिंग केल्या आहेत.

6) अंतिम सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जच्या एनगिडी आणि हैदराबाद संघाच्या भुवनेश्वर कुमारने निर्धाव षटके टाकली.

7) धोनी व रैना सातव्यांदा चेन्नईकडून फायनलमध्ये खेळले. धोनी एकदा पुणे संघाकडून फायनलपर्यंत पोहोचला.

8) बक्षीस आणि रोख रक्कम : चेन्नई (विजेता संघ) - 20 कोटी आणि ट्रॉफी I हैदराबाद (उपविजेता संघ) – 12.5 कोटी : I केन विल्यमसन (ऑरेंज कॅप) - 12 लाख आणि ट्रॉफी I अँड्रू टाय (पर्पल कॅप) - 10 लाख आणि ट्रॉफी

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
📣 आता व्हॉट्सअॅपवर मीडिया कंटेंट लपवता येणार

LetsUp I Update

व्हॉट्सअॅपवर 'मीडिया व्हिजीबिलीटी' हे नवीन फीचर आले आहे. हे फीचर व्हॉट्सअॅप अॅन्ड्रॉइड बीटा अॅपच्या 2.18.195 व्हर्जनवर उपलब्ध होणार आहे.

या फीचरमुळे व्हॉट्सअॅपवर आलेले फोटो, व्हिडिओ किंवा Gif फाईल्स यांसारखे मीडिया कंटेंट गॅलरीमध्ये हाईड करता येणार म्हणजे लपवून ठेवता येणार आहे. तसेच आणखी एक नवीन फीचर 'कॉन्टॅक्ट शॉर्टकट' आले आहे. या फीचरद्वारे व्हॉट्सअॅपवरून कोणत्याही नवीन कॉन्टॅक्टला अॅड करणे सोपे होणार आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👌 सकारात्मक जगण्यासाठी आवश्यक सवयी

LetsUp I Motivational

▫ सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आनंद मिळेल असे काही तरी दिवसभरात एक तरी काम करा.

▪ सकाळी उठल्यावर स्वतःला आरशात पहा आणि स्वत:ला शुभेच्छा द्या.

▫ तुम्ही ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या कायम स्मरणात ठेवा. त्याची उजळणी करत राहा.

▪ डोळे मिटा आणि तुमची स्वप्ने आणि ध्येय शांतपणे पहा.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
📣 CBSE बोर्ड; दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

LetsUp I Update

▫ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेच्या निकालाची तारीख जाहीर

▪ उद्या मंगळवारी दुपारी 4 वाजता सीबीएसईच्या 10 वी च्या परिक्षेचा निकाल जाहीर होणार

▫ cbse.nic.in या वेबसाईटरवर निकाल पहिल्यांदा जाहीर करण्यात येणार

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
_*LetsUp News Updates*_

● नवी दिल्ली - टेलिकॉम क्षेत्रात पतंजलीचा प्रवेश; समृद्धी सिमकार्ड बाजारात दाखल, हरिद्वारमध्ये या सिमकार्डचे अनावरण

● इस्लामाबाद - पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून निवृत्त न्यायाधीश नसीर उल मुल्क कार्यभार सांभाळणार

● बंगळुरु - कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार सिद्धू न्यामगौडा यांचा रस्ते अपघातात मृत्यू, काँग्रेस आमदारांची संख्या कमी होऊन झाली 77

● मुंबई - कर्नाटक निवडणुकीनंतर सलग सुरू असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने महाराष्ट्रासह 19 राज्यांना 18,728 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळाला

● पालघर, गोंदियात 'ईव्हीएम'मध्ये बिघाड; पालघरमध्ये 46 तर भंडारा- गोंदियात 42 % मतदानाचा प्राथमिक अंदाज

● मुंबई - राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या महामार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी 160 ठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी करणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

● पुणे - नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) आज मंगळवारी, 29 मे रोजी दक्षिण केरळमध्ये दमदारपणे दाखल होण्याची शक्यता

● वादात सापडलेल्या पेटीएमने आपण युजर्सचा डाटा कोणत्याही थर्ड पार्टीला देत नसून सुरक्षा व गोपनीयतेला प्राधान्य देत असल्याचे दिले स्पष्टीकरण

● नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केंद्र सरकारला भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेबाबत आपली नीती अधिकृतपणे स्पष्ट करण्याची केली विनंती

● मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असलेल्या 'राझी' चित्रपटाने अल्पावधीतच शंभर कोटींचा टप्पा केला पार

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👌 भरघोस ऑफरसह आलंय पतंजलीचं सीमकार्ड

LetsUp I Update

बीएसएनएलसोबत भागीदारी करत योग गुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीने 'स्वदेशी समृद्धी सिम कार्ड' लाँच केले आहे. या सिमद्वारे केवळ डेटा आणि कॉलिंग सुविधाच नाही, तर वैद्यकीय सुविधा देणंही आमचे ध्येय आहे, असे रामदेव बाबांनी सांगितले.

👉 जाणून घ्या सिम कार्डची वैशिष्ट्ये :

▫ पतंजलीच्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखवून सिम मिळणार

▪ 144 रुपयांच्या रिचार्जमध्ये 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सुविधा

▫ पंतजलीच्या वस्तूंवर दहा टक्के सूट

▪ सिमधारकांना अडीच लाख रुपयांचा वैद्यकीय विमा आणि पाच लाख रुपयांचा जीवन विमा

▫ विम्याची रक्कम फक्त रस्ते अपघातातील व्यक्तींनाच मिळणार

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💥 बारावीच्या निकालाची तारीख जाहीर

Letsup I Breaking

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या दिनांक 30 मे 2018 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. खालील बोर्ड वेबसाईटवर देखील निकाल उपलब्ध करुन देणार आहे. शिवाय SMS द्वारे मोबाईलवरही निकाल मिळू शकेल.

▫ www.mahresult.nic.in

▪ www.result.mkcl.org

▫ www.maharashtraeducation.com

▪ www.knowyourresult.com

▫ www.hscresult.mkcl.org

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
_*LetsUp News Updates*_

● नवी दिल्ली - 10 लाख बँक कर्मचारी आजपासून दोन दिवस संपावर, ग्राहकांनी गैरसोय होऊ नये म्हणून यूपीआय, इंटरनेट बँकिंग वापरावे, असे बँकांनी केले आवाहन

● नवी दिल्ली - कथुआ बलात्कार प्रकरणातील पीडितेची माहिती उघड करणाऱ्या बातम्या हटवण्याचे दिल्ली हायकोर्टाचे आदेश

● जकार्ता - पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशियामध्ये दाखल, मलेशिया, सिंगापूर आणि इंडोनेशियाच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर

● मुंबई - गोंदिया –भंडारा लोकसभा मतदारसंघातील 49 ठिकाणी आज पुन्हा मतदान घेतले जाणार, ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या घोळामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला निर्णय

● मुंबई - राज्यातील शहरी भागातील 600 चौरस फुटापर्यंतच्या बेकायदा निवासी अथवा वाढीव बांधकामांना नियमित करण्यासाठी आकारण्यात येणारी दंडाची रक्कम पूर्णपणे माफ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

● पुणे- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2018 दरम्यान घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार

● पुणे - 1 जून पासून राज्यात पुन्हा शेतकरी आंदोलन, किसान सभा राज्यभरातील तहसील कार्यालयांना घेराव घालणार

● फोर्ड मोटर्सने आपल्या इकोस्पोर्ट या लोकप्रिय मॉडेलचे एस आणि सिग्नेचर एडिशन या नावाने दोन नवीन व्हेरियंट ग्राहकांना केले सादर

● मुंबई - आयपीएल दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे भारतीय संघाचा यष्टीरक्षक वृद्धीमान सहा अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यास मुकणार

● मुंबई - अभिनय बेर्डेनेचा दुसरा चित्रपट 'अशी ही आशिकी' लवकरच येणार, या चित्रपटासाठी हिरोईन म्हणून हेमल इंगळेची निवड

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🏏 नाणेफेकीची परंपरा बंद होणार नाही : आयसीसी

Letsup I Sports Update

आयसीसी क्रिकेट समितीच्या बैठकीत महत्त्वाच्या बाबींवर सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता शिवीगाळ, बॉल टॅम्परिंग, मॅचफिक्सिंग यांसारख्या गोष्टींमध्ये दोषी सापडलेल्या क्रिकेटपटूंना कठोर कारवाईचा सामना करावा लागणार आहे.

क्रिकेटला कलंकित करणाऱ्या घटनांसाठी नवा नियमही तयार करण्यात येणार आहे. कसोटीमधून नाणेफेक रद्द करण्यात येणार असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगू लागली होती. मात्र नाणेफेक ही कसोटी क्रिकेटचा अविभाज्य घटक असल्यामुळे ती यापुढेही कायम राहणार आहे. परदेशी संघांच्या पारड्यात नाणेफेक जिंकल्याचा निर्णय थेट टाकण्यात येणार नाही.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
_*LetsUp News Updates*_

● नवी दिल्ली - देशात सरासरीच्या 97 टक्के पावसाचा हवामान विभागाचा अंदाज, विभागाकडून मान्सूनचा दुसरा अंदाज जाहीर

● मॉस्को - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन यांची सिंगापूर येथे 12 जून रोजी भेट होणार

● मुंबई - बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 60 हजार कोटींचा फटका, संपाचा आज दुसरा दिवस

● केरळ - 1 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलवरील कर रद्द करण्याचा निर्णय केरळ सरकारने घेतला, 1 जूनपासून अंमलबजावणी

● मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परिक्षेचा निकाल जाहीर, राज्यातून रोहितकुमार राजपूत प्रथम

● मुंबई - भारतात 6.25 लाख मुले दररोज धूम्रपान करतात, टोबॅको अॅटलासने केलेल्या सर्वेक्षणाअंती जाहीर झालेल्या अहवालातून आले समोर

● मुंबई - पीक विम्याची रक्कम 7 जून आधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमा कंपन्यांना आदेश

● अॅपल कंपनीने आपल्या आयओएस या ऑपरेटींग सिस्टीमची नवीन आवृत्ती सादर करण्याचे दिले संकेत, यात एनएफसी तंत्रज्ञानाची व्याप्ती वाढविण्यात येणार

● मेलबोर्न - अष्टपैलू मिशेल मार्शकडे या वर्षअखेर होणाऱ्या भारत दौऱ्यासाठी आॅस्ट्रेलिया अ संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले

● मुंबई - भारतीय बँकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून परदेशात पसार झालेला उद्योगपती विजय मल्ल्यावर आधारित 'रंगीला राजा' चित्रपटात गोविंदा मुख्य भूमिकेत दिसणार

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
📣 भारतात सायबर हल्ल्यांचे प्रमाण सर्वाधिक

LetsUp I Update

जगभराचा विचार केला असता, भारतात तब्बल 48 टक्के सायबर अटॅक होत असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन फ्रॉड होत आहे. आरएसए या रिसर्च संस्थेने ऑनलाईन फसवणुकीबाबतचा जानेवारी ते मे 2018 दरम्यानचा अहवाल नुकताच जाहीर केला. त्यात याबाबत खुलासा करण्यात आला आहे.

भारतातील एकंदरीत ऑनलाईन फ्रॉडपैकी एकंदरीत 65 टक्के फसवणुकीची प्रकरणे ही स्मार्टफोनच्या माध्यमातून करण्यात आली आहेत. यात स्मार्टफोन अॅप्लीकेशन अथवा मोबाईल ब्राऊजरचा वापर करण्यात येत आहे. अर्थात एकंदरीतच सायबर गैरव्यवहाराचा विचार केला असता अमेरिका आणि रशियानंतर भारताचा क्रमांक लागत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

कोणतेही आमीष दाखवून फसवणूक करण्याचे प्रमाण देखील भारतात वाढले आहे. यात कॅनडा व अमेरिकेनंतर भारताचाच क्रमांक आहे. यानंतर ब्राझील, नेदरलँड, कोलंबिया, स्पेन, मेक्सिीको, जर्मनी व दक्षीण आफ्रिकेत फिशींगचे प्रकार होत आहेत. भविष्यातही हाच ट्रेंड कायम राहू शकतो. त्यामुळे युजर्सने ऑनलाईन विश्वात वावरतांना सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असल्याचे देखील अहवालात सूचित करण्यात आले आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
_*LetsUp News Updates*_

● नवी दिल्ली - केंद्र सरकारने महाराष्ट्रातील 15 शहरांमध्ये 13,506 घरांच्या बांधकामांना दिली मंजुरी, या प्रकल्पावर 643 कोटी खर्च केले जाणार

● नवी दिल्ली - रेल्वेत आता विंडो तिकीट बुक करणाऱ्या प्रतीक्षा यादीतील प्रवाशांनाही पर्याय निवडण्याची सोय मिळणार

● सिंगापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिंगापूरमध्ये भारतीय रुपे कार्ड अॅप केले लाँच; ते म्हणाले, भारताने जगासाठी द्वार उघडले

● इस्लामाबाद - पाकिस्तान सरकारने माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांचे राष्ट्रीय ओळखपत्र आणि पासपोर्ट केले स्थगित, देशद्रोहाच्या खटल्यात विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई

● बालासोर - अत्याधुनिक पिनाका रॉकेटची चाचणी यशस्वी, या राॅकेटची मारक क्षमता 40 किमीहून 70 किमीपर्यंत वाढली

● मुंबई - यापुढील कोणत्याही निवडणुकीत युती नाही, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली घोषणा

● मुंबई - राज्यातील उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल लागला असून, नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार

● व्हॉट्सअॅपवरील पेमेंट प्रणाली आता सर्व भारतीय युजर्सला वापरता येणार, याबाबत लवकरच होणार घोषणा

● पॅरिस - स्पॉनिश क्लब रियाल माद्रीदला सलग तिसऱ्या वर्षी वर्ल्ड कप जिंकून देणारा प्रशिक्षक झिनेदीन झिदानने आपल्या पदाचा दिला राजीनामा

● मुंबई - सलमान खानच्या बहुप्रतिक्षित आगामी 'रेस 3 चित्रपटातील 'अल्लाह दुहाई है' या गाण्याचा टीझर रिलीज

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⚡ शेतकरी आजपासून 10 दिवस संपावर!

LetsUp I Update

सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्या, यासाठी राष्ट्रीय किसान महासंघ, किसान क्रांती जनआंदोलन आणि किसान एकता मंचाने आजपासून (शुक्रवार) दहा दिवस शेतकरी संप पुकारला आहे.

राष्ट्रीय किसान महासंघाने देशभरातील 22 राज्यांमध्ये हे आंदोलन पुकारले आहे. त्या अंतर्गत पुणे, मुंबईसह सर्व प्रमुख शहरांना एक जूनपासून भाजीपाला, दूधासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित केला जाणार आहे. या संपात राज्यातील अनेक शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
_*LetsUp News Updates*_

● नवी दिल्ली - देशातील बेनामी संपत्ती धारकांच्या मुसक्या आवळण्यासाठी सरकारकडून बक्षिस योजना सुरू, काळा पैसा, बेनामी संपत्तीविषयी माहिती दिल्यास 5 कोटींचे बक्षीस

● नवी दिल्ली - देशभरात गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ, अनुदानीत सिलेंडर अडीच रुपयांनी तर विनाअनुदानीत सिलेंडरमध्ये 48 रूपयांची वाढ

● नवी दिल्ली - जीएसटीच्या माध्यमातून मे महिन्यामध्ये केंद्र सरकारच्या तिजोरीत 94,016 कोटी रुपयांचा महसूल जमा

● नवी दिल्ली - कर्नाटकात सरकार स्थापन केल्यानंतर आठवड्याभरापासून मंत्रिमंडळाचा ताटकळलेला विस्तार 6 जून रोजी होणार

● 1993 मुंबई स्फोटातील आरोपी अहमद मोहम्मद लंबूला अटक, गुजरात एटीएसची कारवाई, एटीएस लवकरच त्याला मुंबई सीबीआयच्या हवाली करणार

● अन्य युरोपियन देशांप्रमाणे डेन्मार्कमध्येही बुरखा आणि निकाब परिधान करण्यावर बंदी, डेन्मार्कच्या संसदेने बुरखा आणि निकाब बंदीचा कायदा केला मंजूर

● मुंबई - एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना 32 ते 48 % वेतनवाढ, परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली घोषणा

● ठाणे - आयपीएल सामन्यांवरील बेटिंग प्रकरणात ठाणे खंडणीविरोधी पथकाने अभिनेता अरबाज खानला बजावले समन्स

● भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी गुगल इंडियातर्फे देशभरात गुगल सर्च कॉन्फरन्सचे आयोजन, यामध्ये भाषीक कंटेंटेमधील संकेतस्थळे, सर्च टर्म्स, एसईओ आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार

● हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी अ.ब.क या मराठी चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⚡ जिओची नवी ऑफर; 2750 रुपयांचा मिळणार कॅशबॅक

LetsUp I Update

रिलायन्स जिओतर्फे Samsung Galaxy J2 2018 आणि Samsung Galaxy J7 Duo खरेदीवर जबरदस्त ऑफर देण्यात येत आहे. या दोन स्मार्टफोन्सपैकी तुम्ही कुठलाही एक स्मार्टफोन खरेदी कराल तर तुम्हाला जिओ कडून 2750 रुपयांचा कॅशबॅक तसेच 100 GB 4G डेटा ही देण्यात येणार आहे.

हा कॅशबॅक तुमच्या 'MyJio Account' मध्ये क्रेडिट केला जाईल. या ऑफरचा लाभ केवळ रिलायन्स जिओचे युजर्स व नवा सॅमसंग गॅलेक्सी J2 2018 किंवा सॅमसंग गॅलेक्सी J7 ड्युओ खरेदी करणाऱ्यांना मिळणार आहे.

👉 Samsung Galaxy J2 2018 वर ऑफर काय?

▫ 2,750 रुपयांचा कॅशबॅक 50-50 रुपयांचे 55 व्हाऊचरमधून मिळणार

▪ 100 GB 4G डेटाचा लाभ 10-10 GB च्या डेटा व्हाऊचरमधून मिळणार

▫ ऑफरचा लाभ केवळ 30 सप्टेंबर 2018 पर्यंत घेता येणार

▪ ही ऑफर केवळ 198 रुपये किंवा 299 रुपयांच्या प्लानमध्ये मिळणार

👉 Samsung Galaxy J7 Duo वर ऑफर काय?

▫ 2,750 रुपयांचा इंस्टंट कॅशबॅक 50-50 रुपयांचे 55 व्हाऊचरमधून मिळणार

▪ ऑफरचा लाभ केवळ 30 सप्टेंबर 2018 पर्यंत घेता येणार

▫ कॅशबॅकसाठी 198 रुपये किंवा 299 रुपयांच्या प्लानने रिचार्ज करावे लागणार

▪ डबल इंटरनेट डेटासाठी 198 किंवा त्याहून अधिकचे रिचार्ज करावे लागणार

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
_*LetsUp News Updates*_

● नवी दिल्ली - जीएसटी अंतर्गत इंट्रा स्टेट ई-वे बिल आज 3 जूनपासून देशभरात बंधनकारक असणार

● नवी दिल्ली - यूपीएससीकडून सनदी सेवांसाठी आज रविवारी 2018 ची प्राथमिक परीक्षा घेतली जाणार, परीक्षा दोन टप्प्यांत होणार

● नवी दिल्ली - स्टेट बँकेने मार्जिनल कॉस्टवर आधारित कर्ज दरांमध्ये (एमसीएलआर) 0.10 टक्के वाढ करण्याचा घेतला निर्णय

● लखनौ - उत्तर भारतामध्ये पुन्हा एकदा धुळीच्या वादळाने घातले थैमान, या वादळाने घेतला 25 जणांचा बळी

● एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर, पीसीबी गटात अभिजित कदम राज्यात पहिला, तर पीसीएम गटात आदित्य अभंग राज्यात अव्वल

● मुंबई - शेतकऱ्यांनी सरकारला 7 जूनपर्यंत मागण्या मान्य करण्याचा दिला अल्टिमेटम, मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शहरांचा दूध आणि भाजीपाला पुरवठा थांबवण्याचा निर्णय

● बीड - लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा आज चौथा स्मृतिदिन, गोपीनाथ गडावर मोठा जनसागर उसळणार

● सॅमसंगने खास सिनेमागृहांसाठी फोर-के क्षमता असणारा अतिविशाल आकारमानाचा एलईडी डिस्प्ले केला लाँच, या माध्यमातून प्रेक्षकांना अत्युच्च अनुभूती घेता येणार

● ठाणे - पाच-सहा वर्षांपासून क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावत असल्याची चित्रपट अभिनेता-निर्माता अरबाज खानकडून कबुली

● अभिनेत्री अमृता खानविलकर लवकरच डिजिटल दुनियेत डेब्यू करणार, नव्या वेबसीरिजमध्ये ती रहस्यमय भूमिकेत दिसणार

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
_*LetsUp News Updates*_

● नवी दिल्ली - नोटबंदीनंतर जवळपास 73 हजार अनोंदणीकृत कंपन्यांनी बँक खात्यात 24 हजार कोटी रुपये केले जमा

● नवी दिल्ली - देशातील पहिले क्रीडा विद्यापीठ मणिपूरमध्ये, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला राष्ट्रपतींची मान्यता

● नवी दिल्ली - रेल्वेसेवा देण्यास उशीर झाल्यास कर्मचाऱ्यांची बढती रोखण्याचा इशारा रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी सर्व विभागातील प्रमुखांना दिला

● कोलकाता - पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांना होमवर्क दिले जाऊ नये यासाठी केंद्र सरकार संसदेत विधेयक आणण्याच्या तयारीत

● मुंबई - भडकलेल्या इंधन दरांमुळे निर्माण झालेली महागाई नियंत्रणात आणण्यास रिझर्व्ह बँक रेपो दरात वाढ करण्याची शक्यता

● नागपूर - 'एचएमटी'सह तांदळाचे विविध वाण शोधणारे कृषिभूषण दादाजी खोब्रागडे (76) यांचे दीर्घ अाजाराने निधन

● पुणे - मान्सून एक दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल होणार, दोन दिवस मराठवाड्यासह राज्यात पूर्वमोसमी

● गुगलने स्थानिक बाबींना प्राधान्य देणारे अर्थात 'हायपर लोकल' या प्रकारातील नेबरली हे अॅप भारतीय ग्राहकांसाठी केले सादर

● जागतिक क्रमवारीतील नंबर वन कसोटी गोलंदाज कागिसो रबाडा याची दक्षिण आफ्रिकेचा या वर्षाच्या सर्वोत्तम क्रिकेटर पुरस्कारासाठी निवड

● संजय दत्तचे बायोपिक 'संजू'चे पहिले गाणे 'मैं बढिया, तू भी बढिया...' झाले रिलीज

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🎬 'संजू'चं पहिलं 'बढीया' गाणं रिलीज

LetsUp I Video

अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपट 'संजू' चं पहिले गाणे 'मैं बढिया, तू भी बढिया...' रिलीज झाले आहे. हे गाणे सोनम कपूर आणि रणबीरवर चित्रीत करण्यात आले आहे. या चित्रपटातील हे पहिलच गाणं आहे. हे गीत सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांनी गायले आहे.

व्हिडिओ पाण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/f4Emwd

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup