LetsUpp Marathi
4.85K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
LetsUp News Updates

● नवी दिल्ली - एका महत्त्वाकांक्षी योजनेत केंद्र सरकारने सशस्त्र दलात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) समावेश करण्याचे काम केले सुरु

● नवी दिल्ली - डिझेलनंतर पेट्रोलचा दर आता विक्रमी पातळीवर, तेल कंपन्यांनी पेट्रोल 33 पैसे, डिझेल 26 पैशांनी वाढवले

● नवी दिल्ली - ओपेकने उत्पादन घटवल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ : धर्मेंद्र प्रधान

● नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमवारी रशियाच्या दौऱ्यावर, दोन्ही देशांच्या दृष्टीने महत्वपूर्ण भेट, लष्करी सहकार्यावर होणार चर्चा

● जगलपूर - नक्षल्यांनी भूसुरुंगाने वाहन उडवले, 7 जवान शहीद, छत्तीसगडमध्ये दंतेवाडा जिल्ह्यात भीषण हल्ला, शस्त्रेही लुटून नेली

● मुंबई - छगन भुजबळ ट्विटरवर; जनतेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल मानले आभार

● सोलापूर - राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'म्होरक्या' या मराठी चित्रपटाचे निर्माते कल्याण राममोगली पडाल (38) यांनी घरात टॉवेलने गळफास घेऊन केली आत्महत्या

● कार्बन कंपनीने फ्रेम्स एस 9 हा स्मार्टफोन केला लाँच, यासोबत एयरटेल कंपनीची कॅशबॅक ऑफर देखील मिळणार

● मुंबई इंडियन्सचा दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून 11 धावांनी पराभव, चेन्नई सुपर किंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबला 5 विकेट व 5 चेंडू राखून हरवले

● मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओन हिचा वीरमहादेवी या दाक्षिणात्य चित्रपटातील पहिला लूक आला समोर

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🏏 प्ले ऑफच्या चारही टीम नक्की!

LetsUp I Sports Update

आयपीएलमध्ये प्ले ऑफ खेळणाऱ्या चारही टीम निश्चित झाल्या आहेत. हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि राजस्थान या टीमचा प्ले ऑफमध्ये प्रवेश झाला आहे.

▫ 22 मे : पहिला क्वालिफायर : हैदराबाद vs चेन्नई, वानखेडे स्टेडियम, मुंबई.

▫ 23 मे : एलिमिनेटर सामना : कोलकाता vs राजस्थान, ईडन गार्डन.

23 मे चा सामना जो हरेल त्याचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येईल. तर दोघांपैकी जो जिंकेल तो चेन्नई-हैदराबादपैकी जी टीम हरेल त्याच्याविरुद्ध 25 मे रोजी क्वालिफायरचा दुसरा सामना खेळेल. ही मॅच जिंकलेली टीम क्वालिफायर-1 जिंकलेल्या टीमशी 27 मे रोजी वानखेडे स्टेडियमवर फायनल खेळेल.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⚡ UPSCचे नियम बदलण्याची शक्यता!

LetsUp I Update

देशभरात होणाऱ्या लोकसेवा परीक्षांच्या नियमांमध्ये केंद्र सरकारकडून अमूलाग्र बदल केला जाण्याची शक्यता आहे. याअंतर्गत नोकरी आणि केडर निवडण्यासाठी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे पुस्तकी ज्ञानासह व्यवहारिक ज्ञानही तपासले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानंतर हे नवे बदल याच वर्षी लागू होतील, असे म्हटले जात आहे. या नव्या सिस्टमनुसार अशी शक्यताही आहे की, ट्रेनिंगमधील सुमार कामगिरीमुळे परीक्षेतील टॉपरला आयएएस केडर मिळू शकणार नाही, तर त्याच्यापेक्षा कमी रँक असलेल्या उमेदवाराने ट्रेनिंगमध्ये चांगली कामगिरी केली तर तो आयएएस बनू शकतो.

पंतप्रधान कार्यालयाच्या निर्देशानुसार, कर्मचारी प्रशिक्षण विभागाने ही नवी यंत्रणा लागू करण्यासंदर्भात अनेकांकडून सल्ले मागितले आहेत. या प्रस्तावानुसार, उत्तीर्ण उमेदवारांना फाऊंडेशन कोर्स पूर्ण केल्यानंतर आणि त्यात मिळालेल्या गुणांवरच केडर आणि नोकरीचे ठिकाण दिले जाईल. जर नवे नियम लागू झाले तर ट्रेनिंगनंतरच कोणाला कोणती सेवा आणि कोणत्या राज्याचे केडर मिळणार हे ठरणार आहे. ट्रेनिंगमध्ये मिळालेले गुण यूपीएससीच्या अंतिम निकालात जमा होतील, त्यानंतर त्यांचा रँक ठरणार आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💥 'निपाह' व्हायरस; हाय अलर्ट घोषित

LetsUp I Update

सध्या केरळ राज्यामध्ये 'निपाह' व्हायरसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अज्ञात इन्फेक्शनमुळे 16 जणांचा मृत्यू झाला आहे. WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संस्थेने निपाह व्हायरसमुळे हाय अलर्ट घोषित केला आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डबल्यूएचओ) च्या मते, निपाह व्हायरस हा वटवाघळांमधून फळांमध्ये आणि फळांतून प्राणी तसेच माणसांत पसरतो. 1998 मध्ये सर्वात आधी मलेशियाच्या कांपुंग सुंगई निपाहमध्ये अशा प्रकारच्या केसेस पाहायला मिळाल्या होत्या. त्यामुळे त्याला निपाह व्हायरस असे नाव देण्यात आले. सर्वात आधी डुकरांमध्ये याचे परिणाम पाहायला मिळाले होते. 2004 मध्ये बांगलादेशात या व्हायरसचा प्रकोप पाहायला मिळाला होता.

👉 लक्षणं काय आहेत?

▫ हा व्हायरस थेट संसर्ग झालेल्या माणसाच्या, प्राण्याच्या संपर्कात आल्यास होऊ शकतो.

▫ हा व्हायरस मेंदूवर थेट हल्ला करतो. त्यामुळे ताप, थकवा, बेशुद्धावस्था अशी लक्षण आढळतात.

▫ लक्षण आढळताच तात्काळ उपचार न घेतल्यास पुढील 24-48 तासामध्ये संबंधित व्यक्ती कोमामध्ये जाण्याची शक्यता असते.

▫ अनेक रूग्णांमध्ये मेंदूशी निगडीत, श्वासोश्वासाशी निगडीत आणि हृद्याच्या ठोक्याशी निगडीत समस्या वाढल्याचे निदर्शनास आले.

▫ ताप, थकवा, शुद्ध हरपणे, चक्कर येणे, उलट्या होणे, मळमळणे, अस्वस्थ वाटणे ही लक्षणे 7-10 दिवस आढळतात.

▫ सुरूवातीच्या टप्प्यावर श्वासाशी संबंधित काही त्रास होतोय का? हे तपासून पाहणे अत्यावश्यक आहे.

👉 काय काळजी घ्याल?

▪ सध्या या व्हायरसचा धोका टाळण्यासाठी कोणतेही औषध, इंजेक्शन उपलब्ध नाही.

▪ पडलेली फळं, प्रामुख्याने खजुराचे फळं खाणे टाळा. कारण वटवाघुळांनी खाल्लेल्या फळांद्वारा किंवा त्यांच्या संपर्कात आल्यास व्हायरस पसरू शकतो.

▪ संसर्ग झालेले डुक्कर, वटवाघुळ किंवा माणसांच्या थेट संपर्कात येणे टाळा.

▪ वैद्यकीय मदत करणाऱ्या व्यक्तींनीही रूग्णांवर उपचार करताना पुरेशी काळजी (ग्लोव्ह, मास्क) घेणे आवश्यक आहे.

▪ मान्यताप्राप्त लॅबोरेटरीमध्येच चाचणी करा. तुम्हाला इंफेक्टेड भागात फिरताना अस्वस्थ वाटत असल्यास संबंधित चाचण्या करणे आवश्यक आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
_*LetsUp News Updates*_

● नवी दिल्ली - परदेशी पर्यटकांना देऊ केलेल्या ई व्हिसा सुविधेमुळे सरकारच्या तिजोरीत चौदाशे कोटी रुपयांची भर, केंद्रीय गृह मंत्रालयाची माहिती

● नवी दिल्ली - चाईल्ड पॉर्नोग्राफी आणि बलात्कार व्हिडीओ प्रकरण, सर्वोच्च न्यायालयाने गुगल, फेसुबक आणि व्हॉट्सअॅपला ठोठावला 1 लाखाचा दंड

● नवी दिल्ली - जस्टिस लोया मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात बॉम्बे लॉयर्स असोसिएशनच्यावतीने पुनर्विचार याचिका दाखल

● मुंबई - अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) हिरे व्यापारी नीरव मोदीची 170 कोटींची संपत्ती घेतली ताब्यात

● मुंबई - विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील सहा जागांसाठी साेमवारी सरासरी 99.81 टक्के झाले मतदान

● मुंबई - ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते डॉ. हेमू अधिकारी यांचे 81 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन

● मुंबई - भारतात OnePlus-6 स्मार्टफोन लॉन्च, या स्मार्टफोनची सुरूवातीची किंमत 34 हजार 999 रूपये

● मुंबई - आयपीएल-11 च्या पात्रता फेरीतील पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपरकिंग्जदरम्यान आज मंगळवारी सायंकाळी 7 वाजता रंगणार

● पॅरिस - स्पेनचा राफेल नदाल हा एका आठवड्यातच पुन्हा एकदा जगातील नंबर-1 पुरुष टेनिस खेळाडू बनला

● मुंबई - प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या 'मुंबई- पुणे- मुंबई' या चित्रपटाचा तिसरा भाग 28 सप्टेंबरपासून आपल्या भेटीला येण्यासाठी सज्ज

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🏏 IPL च्या अंतिम सामन्याची मज्जा मराठीत!

LetsUp I Update

▫ मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपीएलचा अंतिम सामना (27 मे) मराठी समालोचनासह पाहता येणार

▪ स्टार प्रवाह वाहिनीवर VIVO IPLचा 27 मे रोजी होणारा अंतिम सामना पाहता येणार

▫ विशेष म्हणजे अंतिम सामन्याच्या आधी होणाऱ्या खास कार्यक्रमात माधुरी दीक्षित आणि अभिनेता स्वप्नील जोशी सहभागी होणार

▪ तसेच संदीप पाटील, सुनंदन लेले आणि चंद्रकांत पंडीत यांच्या खुमासदार शैलीने अंतिम सामन्याची रंगत वाढणार

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👌 धोनी-झिवाचा 'हा' व्हिडिओ व्हायरल!

LetsUp I Video

महेंद्रसिंह धोनीच्या कुटुंबवत्सलतेची साक्ष देणारा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धोनी हा त्याची मुलगी झिवासोबत खेळत असल्याचा हा व्हिडिओ आहे. बापलेकीच्या खेळाचा हा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्जने ट्विट केला आहे. तो लाखो युजर्सनी शेअर केला आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/RrAiS1

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🏏 आज हैदराबाद-चेन्नई आमने-सामने!

LetsUp I IPL Special

आयपीएलच्या अकराव्या मोसमातील प्ले-ऑफ फेरीच्या लढतींना आज सुरुवात होणार आहे. या फेरीतील पहिला क्वालिफायर-1 सामना आज (मंगळवार) 7 वाजता सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज असा होणार आहे.

यात जो संघ जिंकणार आहे तो थेट अंतिम सामन्याला पात्र ठरणार आहे. तर पराभूत संघाला क्वालिफायर-2 मध्ये पुन्हा खेळण्याची संधी मिळणार आहे. या दोन्ही संघांच्या मजबूत आणि कमकुवत दुव्यांवर नजर टाकुयात...

👉 हैदराबादचे मजबूत दुवे : फलंदाजीत शिखर धवन,केन विल्यमस तर मधल्या फळीत युसूफ पठाण, मनीष पांडे, दीपक हूडा, वृद्धिमान साहा यांसारखे खेळाडू आहेत. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा, रशीद खान व शकिब अल हसन यांच्या सारखे टी-20 मधील उत्कृष्ट गोलंदाज आहेत.

👉 हैदराबादचे कमकुवत दुवे : अखेरच्या तीन सामन्यांत फलंदाजांच्या चांगल्या कामगिरीनंतरही हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला. कारण त्यांच्या गोलंदाजांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही.

👉 चेन्नईचे मजबूत दुवे : यंदाच्या मोसमात चेन्नईच्याच्या संघातील सर्व फलंदाज आणि सर्व गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे. चेन्नईच्या तब्बल तीन फलंदाजांनी 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तर गोलंदाजांमध्ये शार्दूल ठाकूरने 14 बळी मिळवले असून लुंगिसानी एन्गिडीने केवळ पाच सामन्यांत 9 फलंदाजांना बाद केले आहे.

👉 चेन्नईचे कमकुवत दुवे : फिरकीपटूंची कामगिरी म्हणावी तशी होत नाही. सोबत कमकुवत क्षेत्ररक्षण एक समस्या आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
LetsUp News Updates

● नवी दिल्ली - आता बुकिंगनंतर 24 तासाच्या आत विमानाचे तिकीट रद्द केल्यास शुल्क लागणार नाही

● नवी दिल्ली - राज्यसभेच्या माजी खासदार रजनी पाटील यांची हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी म्हणून नियुक्ती

● बोस्टन - एमआयटीच्या वैज्ञानिकांनी पोलिओसाठी नवीन लस केली तयार, यामुळे पोलिओच्या व्हायरसचा प्रभाव संपुष्टात येणार

● बंगळुरू - कर्नाटकात जेडीएस व काँग्रेस आघाडीचे सरकार आज बुधवारी सत्तारूढ होणार, दुपारी जेडीएसचे नेते कुमारस्वामी हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

● मुंबई - जे.जे रुग्णालयातील संपकर्त्या डॉक्टरांच्या बहुतांश मागण्या मान्य, मागण्या मान्य झाल्यानंतर चार दिवसांनी संप मागे

● मुंबई - माहिती अधिकाराखाली मिळालेल्या आकडेवारीनुसार मुंबईतून बेपत्ता होणाऱ्यांमध्ये 16 ते 25 वर्षे वयोगटातील मुला-मुलींची संख्या सर्वाधिक

● फ्लिपकार्टवर अॅपल वीक अंतर्गत सेल सुरू, सेल 27 मे पर्यंत चालू राहणार, विविध प्रॉडक्टवर आकर्षक सवलती देण्यात येत आहेत

● चेन्नई सुपरकिंग्जने सनरायझर्स हैदराबादचा दोन विकेट्सनी पराभव करत फायनलमध्ये धडक मारली, फॅफ ड्यू प्लेसीस ठरला सामनावीर

● कोलकाता - राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघादरम्यान आज बुधवारी सायंकाळी 7 वाजता एलिमिनेटर सामना रंगणार

● मुंबई - अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत 'बिग बॉस मराठी’ या शोमध्ये सहभागी होणार, वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे लवकरच ती बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🏏 चेन्नई फायनलमध्ये, हैदराबादचा पराभव

Letsup I IPL Special

फॅफ ड्यू प्लेसीच्या निर्णायक खेळीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने सनरायझर्स हैदराबादचा दोन विकेट्सनी पराभव करून आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. चेन्नईच्या या विजयात फॅफ ड्यू प्लेसीची नाबाद 67 धावांची (42 चेंडूं) खेळी निर्णायक ठरली.

त्याआधी, या सामन्यात चेन्नईने हैदराबादला सात बाद 139 असे रोखून धरले. सलामीच्या शिखर धवनला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतरही हैदराबादची घसरगुंडी सुरू राहिली आणि त्यांची अवस्था सहा बाद 88 अशी झाली. त्या कठीण परिस्थितीत कार्लोस ब्रॅथवेटने 29 चेंडूंत एक चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 43 धावांची खेळी उभारली. त्यामुळे हैदराबादला चेन्नईला 140 धावांचे लक्ष्य देता आले.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🎬 'मोगली'चा ट्रेलर रिलीज

LetsUp I Video

वॉर्नर ब्रदर्सने आपला चित्रपट मोगलीचा ट्रेलर रिलीज केला आहे. या चित्रपटाची कहाणी ही जंगल बुकच्या पुढची असून यात मोगलीच्या जिवंत राहण्याची संघर्ष कहाणी आहे. मागील चित्रपटासारखाच बघीरा, आणि बल्लू मोगलीला साथ देताना दिसणार आहे, या शिवाय चित्रपटात शेरखान देखील दिसणार आहे.

ट्रेलर पाहण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/PLznGn

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👌 मोदी केअर योजनेंतर्गत तपासणी व शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात

LetsUp I Update

केंद्र सरकारच्या मोदी केअर योजनेंतर्गत 1352 प्रकारच्या तपासणी व शस्त्रक्रिया सवलतीच्या उपलब्ध होणार असून नुकतेच त्याचे दर जाहीर झाले आहेत. केंद्रीय आरोग्य योजनेपेक्षाही (सीजीएचएस) या योजनेतील प्रोसिजर, शस्त्रक्रिया व तपासणीचे दर कमी आहेत. मंत्रालयाच्या वेबसाईटवर व एनएचपीएमच्या पोर्टलवर त्याची यादी लवकरच अपलोड केली जाणार आहे.

या योजनेत गुडघा प्रत्यारोपणासाठी 90 हजार रुपये, 40 हजारांत स्टेंट तर एक लाख 10 हजार रुपयांत बायपास शस्त्रक्रिया होणार आहे. आरोग्य मंत्रालयाने खासगी रुग्णालयांना मोदी केअर योजनेत जोडण्यासाठी व रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी खासगी रुग्णालयांना 30 % इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय घेतला आहे. एनएबीएच मान्यताप्राप्त रुग्णालयांना निश्चित केलेल्या दरापेक्षा 10 % जास्त रक्कम दिली जाईल. वैद्यकीय महाविद्यालयांनाही 10 % इन्सेंटिव्ह मिळेल. या सर्व सुविधा मागास भागातील रुग्णालयात असतील तर अशा रुग्णालयांना 30 टक्के इन्सेंटिव्ह मिळेल.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
_*LetsUp News Updates*_

● नवी दिल्ली - देशात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता मावळली, सोईसुविधांसाठी दरवाढ होतच राहणार, केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

● नवी दिल्ली - घर खरेदी करणाऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा, दिवाळखोर बिल्डरच्या संपत्ती वाटा मिळणार, बिल्डर दिवाळखोरीत गेल्यास त्यांच्या संपत्तीत वाटा मिळणार

● नवी दिल्ली - आरोग्य सुविधेच्या बाबतीत भारताची स्थिती अत्यंत खराब, 195 देशांमध्ये भारताचा नंबर 145 वा

● नवी दिल्ली - महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांसह नक्षलवादी कारवायांग्रस्त राज्यांत 4,072 मोबाइल मनोरे (टॉवर्स) उभारण्यात येणार

● नवी दिल्ली - 3 लाख टन साखरेच्या बफर स्टॉकची तयारी, साखर राखीव साठ्यासाठी कारखानदारांना किलोमागे 30 रुपये दराची शक्यता

● श्रीनगर - जम्मू-काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यात अतिरेक्यांच्या हल्ल्यातून महाराष्ट्रातील 5 आमदार बचावले सुखरूप

● बेंगळुरू - एच. डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटकचे 25 वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ, शपथविधी समारंभामध्ये भाजपविरोधी 11 पक्षीय नेत्यांची एकजूट

● इन्स्टाग्रामवर 'म्युट' हे फिचर, यामध्ये आपण ज्या युजरला म्युट करणार आहोत, त्याच्या पोस्ट आपल्याला दिसणार नाही

● कोलकाता नाईट रायडर्सचा राजस्थान रॉयल्सवर 25 धावांनी दणदणीत विजय, आता फायनलच्या तिकीटासाठी कोलकात्याचा हैदराबादशी मुकाबला

● बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा लवकरच छोट्या पडद्यावर करणार पर्दापण

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🏏 कोलकात्याची क्वालिफायर-2 मध्ये धडक

LetsUp I IPL Special

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सवर 25 धावांनी मात करत क्वालिफायर 2 मध्ये धडक मारली आहे. आता फायनलच्या तिकीटासाठी कोलकात्याचा मुकाबला हैदराबादशी होईल. हा सामना 25 मे रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवरच खेळवण्यात येईल.

दरम्यान, एलिमिनेटर सामन्यात कोलकात्याने राजस्थानला विजयासाठी 170 धावांचे आव्हान दिले होते. मात्र राजस्थानला वीस षटकांत चार बाद 144 धावांचीच मजल मारता आली. अवघ्या 25 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकार खेचत 49 धावांची निर्णयाने खेळी करणाऱ्या आंद्रे रसेलला सामानावीराचा पुरस्कार देण्यात आला.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👌 SBI मध्ये 10,300 कर्मचाऱ्यांची भरती

LetsUp I Job Update

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) 15,762 जागा रिकाम्या झाल्या असून त्यातील 10,300 कर्मचाऱ्यांची भरती बँक येत्या वर्षात करणार आहे. एसबीआयमध्ये सेवानिवृत्ती आणि डिजिटायझेशनमुळे वर्ष 2017-18 मध्ये 15,762 कर्मचारी कमी झाले आहेत. या जागा भरून काढण्यासाठी एसबीआय मार्च 2019 अखेर 10,300 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
_*LetsUp News Updates*_

● श्रीनगर - जम्मू-काश्मीर पोलिस खात्याच्या जवानांना कामावर असताना स्मार्टफोन बाळगण्यास बंदी

● इस्लामाबाद - पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच तृतीयपंथी उमेदवार सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

● महाराष्ट्रासह 27 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 25 मे पासून राज्यांतर्गत मालवाहतुकीसाठी ई-वे बिल प्रणाली

● मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ, तर मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला निकाल

● छत्तीसगड - पुसवाडाजवळ माओवाद्यांचा हल्ला, IED ब्लास्टमध्ये कोब्रा बटालियनचा एक जवान शहीद

● पुणे - येत्या 48 तासात मान्सून दक्षिण अंदमानात दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने केला व्यक्त

● पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या सहायक प्राध्यापक पदांसाठीच्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल ऑनलाईन जाहीर

● शाओमीचा रेडमी 5A हा स्मार्टफोन तुफान लोकप्रिय, जागतिक बाजापेठेत या मॉडेलने पटकावला तिसरा क्रमांक

● कोलकाता - आयपीएल-11 चा दुसरा पात्रता सामना आज शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराझर्स हैदराबाद दरम्यान रंगणार

● मुंबई - आता बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे शर्मिष्ठा राऊत प्रवेश करणार

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👌 येत्या 48 तासांत मान्सून अंदमानात

LetsUp I Update

▫ मान्सून सक्रीय होण्याच्या दृष्टीने पुन्हा अनुकूल वातावरण निर्माण

▪ येत्या 48 तासांमध्ये मान्सून अंदमानात दाखल झाल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली

▫ मिकुनू चक्रीवादळाचा मान्सूनच्या प्रवासावर परिणाम नाही

▪ उद्या शनिवारी दक्षिण कोकणात व गोव्यात पावसाची शक्यता

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🎬 कसा आहे बकेट लिस्ट?

LetsUp I Movie Review

माधुरी दीक्षितचा पहिला-वहिला मराठी चित्रपट 'बकेट लिस्ट' आज बॉक्स ऑफिसवर दाखल झालाय. करण जोहरच्या 'धर्मा प्रॉडक्शन'चा सिनेमा असल्यामुळे यात सगळा व्यावसायिक मसाला पहायला मिळतो.

हि कथा आहे सई नावाच्या वीस वर्षीय तरुणीची. हृदयदान करणाऱ्या या तरुणीच्या इच्छा पूर्ण करण्याचा निर्धार मधुरा साने (माधुरी दीक्षित) करते. पुढे सईच्या इच्छा पूर्ण करताना येणाऱ्या गंमती आणि अडचणी या बकेट लिस्टमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. आता ही सई कोण, ती माधुरीच्या आयुष्यात का येते आणि तिची बकेट लिस्ट माधुरी का पूर्ण करते? असे प्रश्न पडले असतील, तर त्याची उत्तरे थिएटरमध्येच मिळतील.

'बकेट लिस्ट'मध्ये माधुरीबरोबर मराठीतल्या कलाकारांची तगडी टीम आहे. सर्वानी सुरेख काम केलंय. सिनेमातील गाणीही आशयाला सोबत नेणारी आहेत. प्रेक्षकांना फार विचार करायला न लावणारा, त्यांची मस्त करमणूक करणारा, खळ-खळून हसवणारा आणि मध्येच रडवणारा हा सिनेमा नक्की पहा!

(रेटिंग : 3.5 / 5)

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💡 मुकेश अंबानींची भन्नाट योजना; कल्पना तुमची गुंतवणूक आमची!

LetsUp I Faide Ki Baat

तुम्हाला सुचणाऱ्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मुकेश अंबानी यांनी एक योजना आखलीय. त्यानुसार तुम्ही तुम्हाला सुचलेली कल्पना कंपनीला (रिलायन्स इंडस्ट्रीज) पाठवायची.

जर तुमची कल्पना कंपनीला आवडली तर कंपनी त्यात गुंतवणूक करणार आहे. सोबत कंपनीकडून तुम्हाला तीन महिन्यांचे ट्रेनिंग दिले जाईल. या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यापासून तो यशस्वी करण्यासाठी अनेक गोष्टींचे मार्गदर्शन केले जाईल.

👉 अर्ज कुठे कराल? : या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रथम https://goo.gl/gi665e इथे क्लिक करा. त्यानंतर वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज दाखल करावा लागेल. यामध्ये कंपनीद्वारे विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरेही तुम्हाला द्यावी लागतील. त्यानंतर तुम्हाला एक अर्जही मिळेल. यानंतर कंपनीकडून तुम्हाला संपर्क केला जाईल.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
LetsUp News Updates

● नवी दिल्ली - भारतात 2030 पर्यंत सर्व वाहने इलेक्ट्रिक करण्याचे सरकारने ठेवले उद्दिष्ट, मात्र ते 2050 पर्यंत शक्य होणार

● नवी दिल्ली - आज बारावी सीबीएसई बोर्डाचा निकाल, मनुष्यबळ विकास मंत्रालयातील शालेय शिक्षण सचिव अनिल स्वरूप यांची माहिती

● नवी दिल्ली - पेट्रोल-डिझेलपाठोपाठ ग्राहकांना आता बसणार वीज दरवाढीचा शॉक, वीजपुरवठ्याचे संकट निर्माण झाल्यामुळे वीज दरात अनपेक्षित वाढ अपेक्षित

● नवी दिल्ली - भारताने 2022 पर्यंत सौर व पवनऊर्जा क्षेत्रात 175 गिगावॅट वीजनिर्मिती करण्याचे केले उद्दिष्ट, त्यातून 3 लाख कामगारांना रोजगार मिळेल

● नवी दिल्ली - भारतातील सर्वात पहिली प्रवासी क्रूझ सेवा मुंबई ते गोवा जलमार्गावर सुरु, या क्रूझने प्रवास करायचा असल्यास तुम्हाला 7 हजाराहून अधिक पैसे मोजावे लागणार

● बंगळुरु - काँग्रेस-जेडीएस आघाडीने कर्नाटक विधानसभेत बहुमत केले सिद्ध, काँग्रेस-जेडीएस युतीला मिळाली 117 मते

● ठाणे - उद्धव ठाकरेंकडून भर सभेत मुख्यमंत्र्यांची सनसनाटी ऑडिओ क्लीप सादर, याध्ये मुख्यमंत्र्यांनी वापरलेली भाषा पक्षासाठी अडचणीचा मुद्दा ठरण्याची शक्यता

● नवी दिल्ली - काऊंटर पॉइंटने दिलेल्या रिपोर्टनुसार, रिलायन्स जिओचा फोन 2018 या वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच जगभरात बेस्ट सेलिंग फीचर फोन म्हणून आला समोर

● ईडन गार्डन्सवरच्या क्वालिफायर टू सामन्यात हैदराबादने कोलकात्यावर 13 धावांनी केली मात, आता विजेतेपदासाठी रविवारी चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद अशी फायनल रंगणार

● मुंबई - बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'रेस 3'मधील दुसरे गाणे 'सेल्फिश' रिलीज, या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे सलमान खानने हे गाणे लिहिले आहे

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
LetsUp News Updates

● नवी दिल्ली - सन 2012-13 ते 2016-17 या कालावधीत सर्वाधिक 20 हजार 475 आंतरजातीय विवाह महाराष्ट्रामध्ये

● नवी दिल्ली - ई-फायलिंगसाठी 7 आयटीआर फॉर्म जारी; यामुळे करदात्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने परतावा भरणे झाले सोपे

● नवी दिल्ली - सीबीएसई बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, यंदा 83.01% निकाल, निकालात मुलींनी मारली बाजी

● नवी दिल्ली - चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा बुक करणाऱ्या भाविकांना आता 15 ते 16% जास्त भाडे मोजावे लागेल

● दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाने कुख्यात गँगस्टर अबु सालेमला 2002 च्या खंडणी प्रकरणात ठरवले दोषी

● आयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांनी अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे केले समर्थन

● एसटीचे दर लवकरच वाढणार, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले संकेत, डिझेल दर वाढीमूळे एसटीला 470 कोटीचा फटका

● विवो कंपनी आपला विवो एक्स-21 हा फ्लॅगशीप स्मार्टफोन 29 मे रोजी भारतात करणार लाँच, याची अगावू नोंदणी सुरू

● IPLचा महामुकाबला आज रंगणार; तिसऱ्यांदा चॅम्पियनसाठी चेन्नई सज्ज तर हैदराबादची नजर दुसऱ्या जेतेपदावर

● मुंबई - बॉलिवूड अभिनेता इरफान खानच्या प्रकृतीत सुधारणा; लवकरच 'उधम सिंह' या सिनेमात झळकणार

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup