LetsUpp Marathi
4.85K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
LetsUp News Updates

● नवी दिल्ली - मोबाईल सिम कार्ड घेण्यासाठी आता आधार कार्डची सक्ती नाही, केंद्र सरकारचे आदेश

● नवी दिल्ली - पोक्सो कायद्याअंतर्गत दाखल होणाऱ्या प्रकरणांवर लवकरात लवकर सुनावणी घेण्यासाठी विशेष कोर्टाची नियुक्ती करण्यात यावी, सुप्रीम कोर्टाचे आदेश

● नवी दिल्ली - ऐतिहासिक वारसा असलेल्या ताजमहालाच्या रंगात झालेल्या बदलाविषयी सर्वाेच्च न्यायालयाने केली चिंता व्यक्त

● मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जमाफीसाठीची ऑनलाईन अर्ज नोंदणीची मुदत 20 मे पर्यंत वाढवण्यात आली

● मुंबई - अंधश्रद्धा निर्मूलन समितीची 'सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्या'ची राज्यव्यापी अंमलबजावणी मोहीम सुरू

● मुंबई - आता व्हॉट्सअॅपने 'रिस्ट्रिक्ट ग्रुप' हे फीचर आणले, या फीचरमुळे ग्रुप अॅडमिनला काही विशेष अधिकार मिळणार आहेत

● मुंबई - टीम इंडियाने आयसीसीच्या सुधारित कसोटी क्रमवारीतले अव्वल स्थान केले आणखी भक्कम

● बेंगळुरू - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने त्यांच्या घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सवर 14 धावांनी मिळवला विजय, टीम साऊथी ठरला सामनावीर

● नवी दिल्ली - बीसीसीआयमध्ये एक राज्य एक मत अनिवार्य करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यास बीसीसीआय तयार

● मुंबई - अभिनेत्री सोनम कपूर बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत 8 मे रोजी विवाह बंधनात अडकणार, दोन्ही कुटुंबांनी दिली माहिती

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⛳ छत्रपती शिवरायांचा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा ठरणार

Letsup I Update

छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात भव्य स्मारक उभे राहणार आहे. छत्रपती शिवरायांचा हा पुतळा जगातील सर्वात उंच (212 मीटर) ठरणार आहे. याविषयीच्या प्रस्तावाला केंद्राने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली.

ते म्हणाले, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची 212 मीटरपर्यंत वाढविण्यास मान्यता मिळाली असून स्मारकाच्या कामाला सुरुवातही झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनीला देण्यात आले आहे. यासाठी 2500 कोटींचे कंत्राट मंजूर करण्यात आले असले तरी याचा पहिल्या व दुसऱ्या टप्प्याचा एकूण खर्च 3600 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🎯 केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 191 जागांसाठी भरती

Letsup I Job Update

पोस्ट आणि जागा खालीलप्रमाणे :

* मार्केटिंग ऑफिसर : 28
* असिस्टंट डायरेक्टर : 03
* असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (सिव्हिल) : 04
* लेक्चरर (केमिकल) : 05
* लेक्चरर (इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) : 24
* लेक्चरर (प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी) : 07

------------------------
👨🎓 ड्रीम जॉब हवाय? मग साईनअप करा शाईन.कॉम सोबत आणि बनवा तुमचं स्वप्नातील करिअर, त्यासाठी क्लिक करा 👉 https://goo.gl/Vs1ZVr
------------------------

वयाची अट : पद क्र.1: 30 वर्षांपर्यंत, पद क्र.2 ते 6: 35 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

फी : General & OBC : ₹25/- (SC/ST/महिला/अपंग : फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : 17 मे 2018

जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/TyKXbt

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/YCkKFV

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
LetsUp News Updates

● नवी दिल्ली - देशात 5 वर्षांत 1 लाख कोटींचे 23 हजार बँक घोटाळे, रिझर्व्ह बँकेची माहिती; बँकांना 78 कोटींचा चुना

● नवी दिल्ली - लष्करावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या टॉप-5 देशांच्या यादीत भारताचा समावेश, भारताचा लष्करी खर्च आता फ्रान्सपेक्षा अधिक

● नवी दिल्ली - महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि बल्लारशहा रेल्वे स्टेशनं देशात सर्वात सुंदर, 10 लाखांचे पहिले बक्षीस मिळवले

● नवी दिल्ली - आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 62 पर्यंत वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारची पावले

● नवी दिल्ली - व्हेनेझुएला या दक्षिण अमेरिकेतील देशाने भारताला 30 टक्के कमी दराने कच्चे तेल विकण्याची दाखवली तयारी

● मुंबई - शेतकरी कर्जमाफी योजनेला पुन्हा मुदतवाढ, कर्जाच्या वन टाइम सेटलमेंटसाठी 30 जूनपर्यंत मुदत, अर्ज करण्यासाठी 20 मेपर्यंत मुदतवाढ

● मुंबई - ज्येष्ठ पत्रकार जे. डे हत्येप्रकरणी छोटा राजनसह 9 दोषींना जन्मठेप, विशेष मोक्का न्यायालयाचा निकाल

● सॅन फ्रान्सिस्को - डॉट कॉम किंवा डॉट ऑर्गप्रमाणे लवकरच डॉट अॅपनेही डोमेन रजिस्टर करता येणार

● दुबई - आयसीसी वनडे क्रिकेटची ताजी क्रमवारी जाहीर, टीम इंडियाला मागे टाकून इंग्लंडने वनडेत अव्वल स्थान पटकावले

● दिल्लीचा राजस्थान रॉयल्सवर 4 धावांनी विजय, रिषभ पंत ठरला सामनावीर

● मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर, सोनम कपूर, आणि स्वरा भास्कर यांच्या 'वीरे दी वेडींग'मधील 'तरीफा' गाणे झाले रिलीज

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🎯 स्पर्धा परीक्षा; सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी खास टिप्स

Letsup I Career Katta

सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञानासंबंधित प्रश्न विचारले जातात. या सेक्शनच्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची व बुद्धिमत्तेची तपासणी केली जाते. खालील काही टिप्सच्या मदतीने तुम्ही या विषयाची चांगली तयारी करू शकता...

1) तुम्ही जर स्पर्धा परीक्षा किंवा प्रवेश परीक्षांची तयारी करत असाल तर दररोज वर्तमानपत्र वाचायला हवे. कारण यातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडी, खेळ, बॉलीवूड, उद्योग, अर्थजगत याविषयी माहिती मिळते.

2) चालू घडामोडी किंवा गाजलेल्या बातम्यांची संपूर्ण माहिती मिळवून त्याविषयी टिपण्या काढून ठेवा. परीक्षेच्या वेळी या टिपण्या कामी येतात.

3) सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी इंटरनेट मोठे वरदान आहे. यामुळे तुम्हाला अपडेट राहून सर्व पैलू समजून घेण्यास मदत होईल.

4) स्पर्धा परीक्षांची तयारी करताना आधी अभ्यासक्रम समजून घेऊन त्या अनुषंगाने तयारी करा. कारण बँकेच्या परीक्षेसाठी बँकिंग व वित्तविषयक प्रश्न विचारले जातात. परंतु सिव्हिल सर्विसेसाठी राजकारण, समाजशास्त्र व इतर विषयांचा अभ्यास करावा लागतो.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
📌 शिक्षणाची गुणवत्ता क्रमवार यादी 2017

Letsup I Statistics Update

1) स्वित्झर्लंड
2) सिंगापूर
3) फिनलंड
5) यू.एस.
16) जर्मनी
20) यूके
26) फ्रान्स
31) जपान
34) भारत
35) इंडोनेशिया
39) चीन
52) रशिया
54) सौदी
74) इराण
94) पाकिस्तान
99) तुर्की
102) मेक्सिको
106) दक्षिण आफ्रिका
119) ब्राझील
120) नायजेरिया
129) इजिप्त (WEF)

शिक्षणाची गुणवत्ता क्रमवार यादी 2017 मध्ये भारताचा 34 वा क्रमांक लागतो.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
LetsUp News Updates

● नवी दिल्ली - चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च 2018) देशातील सोन्याच्या मागणीत 12 टक्क्यांची घट

● नवी दिल्ली - कावेरी पाणी वाद, कर्नाटक सरकारने तामिळनाडूला चार टीएमसी पाणी द्यावे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, 8 मे रोजी होणार पुढील सुनावणी

___
👌 तुम्ही लोन मिळवण्यास पात्र आहेत का? चेक करण्यासाठी तुमचा सिबिल स्कोर चेक करा, सोबत मिळवा PayTm कॅश 👉 https://goo.gl/bLAq8A
___

● नवी दिल्ली - आगामी 48 तासांमध्ये उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागांना धुळीच्या आणखी एका वादळाचा फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली

● लखनौ - 12 राज्यांत वादळी पाऊस; 130 जणांचा मृत्यू, 300 हून अधिक लोक जखमी, पिकांचे प्रचंड नुकसान

● मुंबई - न्यायालयीन कर्मचारी भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा, मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती उठवली, दिव्यांगाचा कोटा राखून भरती सुरू ठेवण्याचे आदेश

● मुंबई - केंद्र सरकारने औषधांच्या पाकिटांवर लाल रंगाच्या चौकटीत काळ्या ठळक शब्दांत रुग्णांसाठी सूचना छापणे केले बंधनकारक, या निर्णयाची अंमलबजावणी 1 नोव्हेंबरपासून

● ट्विटर या सोशल नेटवर्किंग वेबसाईटने आपल्या सगळ्या युजर्सना पासवर्ड त्वरित बदलण्यासंदर्भातले जारी केले प्रसिद्धी पत्रक

● आयडिया कंपनीने आपल्या फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्कचा विस्तार करत याचा सहा नवीन सर्कल्मध्ये प्रारंभ करण्यात आला

● कोलकाताचा चेन्नईवर 6 गडी राखून विजय, सुनील नारायण ठरला सामनावीर, चेन्नईने अव्वल स्थान गमावले

● मुंबई - बॉलिवूडचं सर्वात लाडकं जोडपं रणवीर- दीपिका नोव्हेंबरमध्ये विवाहबंधनात अडकणार अशा चर्चा सध्या सुरु

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🎬 मराठीतलं भन्नाट आकपेला गाणं नक्की पहा!

Letsup I Videos

मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी एका भन्नाट आकपेला गाण्याची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे या गाण्याचे संगीत तोंडाच्या माध्यमातून दिले आहे. प्रत्यक्षात कोणत्याही संगीत उपकरणाचा यात वापर केला गेला नाही. मराठी चित्रपटातील जवळपास सर्वच कलाकार आणि अनेक गाणी गाण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. अमेय खोपकरची ही निर्मिती आहे.

हे गाणं पाहण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/st7FBK

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🎬 कसा आहे 102 Not Out?

Letsup I Movie Review

उमेश शुक्ला दिग्दर्शित अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर अभिनित 102 नॉट आऊट सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात अशा बाप- लेकांची कथा सांगण्यात आली आहे ज्यात वडील 102 वर्षांचे असतात तर मुलगा 75 वर्षांचा असतो.

दोघंही वृद्धापकाळात असले तरी त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र फार वेगळा असतो. तो कसा आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमा पहावा लागेल. हा सिनेमा गुजराती नाटकावर आधारित आहे. या नाटकाचे नावही 102 नॉट आऊट असेच होते. या सिनेमाचे दिग्दर्शन उमेश शुक्ला यांनी केले आहे. या सिनेमाचे लेखन सौम्या जोशी यांनी केले आहे. जर तुमचा मूड हलका-फुलका सिनेमा पाहायचा असेल तर 102 नॉट आऊट हा उत्तम पर्याय आहे.

(रेटिंग : 3.5 / 5)

या चित्रपटाची तिकिटे BookMyShow वर बुक करण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/AiJjhL

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
LetsUp News Updates

● नवी दिल्ली - पेट्रोल, डिझेल जीएसटी अंतर्गत आणण्यासाठी जीएसटी समितीला विनंती केली : पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान

● नवी दिल्ली - साखरेवर सेस लावण्याचा निर्णय जीएसटी काऊन्सिलने टाळला

● स्टॉकहोम - सेक्स स्कँडलध्ये अडकल्यानंतर पुरस्कार प्रदान करणाऱ्या समितीने 2018 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार न देण्याचा घेतला निर्णय

● मुंबई - राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना जामीन मंजूर, मात्र रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्यास किमान एक आठवडा लागणार, सूत्रांची माहिती

● मुंबई - आर्थिकदृष्ट्या दुर्बल मराठा विद्यार्थ्यांचे मेडिकलचे निम्मे शुल्क सरकार भरणार, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

● मुंबई - राज्यात शहरांमधील 31 डिसेंबर 2015 पर्यंतच्या बेकायदा बांधकामांना सशर्त संरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाविषयीचा निकाल मुंबई हायकोर्टाने राखून ठेवला

● मुंबई - अण्णाभाऊ साठे महामंडळातील फाईल गहाळप्रकरणी महामंडळाचे महाव्यवस्थापक नागेश जुंबाडे निलंबित

● सोनी कंपनीने भारतीय बाजारपेठेत फोर-के रेझोल्युशन क्षमता असणाऱ्या स्मार्ट टिव्हींची नवीन मालिका केली सादर

● मुंबई इंडियन्सचा किंग्ज इलेव्हन पंजाबवर सहा विकेट्स राखून दणदणीत विजय, सूर्यकुमार यादव ठरला सामनावीर

● मुंबई - अभिनेत्री माधुरी दीक्षितचा पहिला मराठी चित्रपट 'बकेट लिस्ट'चा ट्रेलर प्रदर्शित

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🏏 IPL; विजयाने मुंबई संघाच्या आशा कायम!

Letsup I IPL Updates

कृणाल पांड्याच्या आक्रमक खेळीमुळे (12 चेंडूंत 31 धावा) मुंबई इंडियन्स संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबवर रोमहर्षक विजय मिळवला. त्यामुळे आता मुंबईला आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये धडक मारायची असेल, तर उर्वरित पाचही सामने जिंकण्याची आवश्यकता आहे.

पहिल्या डावात पंजाबला 20 षटकांत सहा बाद 174 धावांचीच मजल मारता आली. मग पंजाबचे 175 धावांचे आव्हान घेऊन मुंबईकडून एविन लुईसचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी उत्तम धावगती राखली. त्यामुळे मुंबईला सहा चेंडू आणि सहा विकेट्स राखून विजय साजरा करता आला. सलामीला येऊन 57 धावांची खेळी उभारुन मुंबईच्या विजयाचा पाया रचणाऱ्या सूर्यकुमार यादवला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🎬 माधुरीच्या 'बकेट लिस्ट'चा ट्रेलर रिलीज

Letsup I Videos

'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचा पहिला वहिला मराठी सिनेमा 'बकेट लिस्ट'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. 'बकेट लिस्ट- माझी, तुमची.. आपल्या सगळ्यांची' अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. हा सिनेमा 25 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

ट्रेलर पाहण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/iKT7XP

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🍽 भांड्यांचा येणारा वास दूर करण्यासाठी...

Letsup I Kitchen Tips

सर्वप्रथम किचनची स्वच्छता हा मुद्दा लक्षात घेतला तर भांडी स्वच्छ असणे आवश्यक आहे. कारण त्यातच आपण अन्न शिजवतो, साठवतो. पाणी भरतो, पितो. पण अनेकदा भांड्यांना येणारा वास काही केल्या जात नाही. भांडी घासल्यानंतरही तो कायम राहतो. मग अशावेळी काय करावे? खालील घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

1) भांड्यांना येणारा माशांचा वास दूर करण्यासाठी लिंबाची साल भांड्यावर घासा आणि 20 मिनिटे भांडे तसेच ठेवा. त्यानंतर भांडे धुवा.

2) भांड्यांचा वास घालवण्यासाठी आधी भांडे साबणाने घासून स्वच्छ करा. त्यानंतर भांड्यात एक चमचा व्हिनेगर घालून ठेवून द्या. काही वेळाने पाण्याने भांडे धुवा.

3) भांडी संत्र्याच्या सालीने घासा. 30 मिनिटांनंतर लिक्विड सोपने धुवा. भांड्यांना येणारा वास दूर होईल.

4) मासे शिजवून झाल्यानंतर भांडे पाण्याने स्वच्छ करा आणि त्यानंतर सफरचंदाचे एक स्लाईस भांड्यावर घासा. यामुळे देखील भांड्यांना वास येणार नाही.

5) भांड्याचा वास दूर करण्यासाठी भांड्यात काही वेळ गरम पाणी घालून ठेवा. त्यानंतर लिक्विड सोपने घासा.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💐 ज्येष्ठ गायक अरुण दाते यांचे निधन

Letsup I Breaking

ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते (85 वर्ष) यांचे आज रविवारी पहाटे निधन झाले. त्यांनी मुंबईतील कांजूरमार्ग येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. शुक्रतारा मंदवारा, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी यासारखी असंख्य गाणी अरुण दाते यांनी अजरामर केली होती.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💥 रजनीकांतच्या घरी बॉम्ब लावण्याची धमकी!

Letsup I Update

▪ तामिळनाडू पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या घरी बॉम्ब लावण्याची दिली धमकी

▪ फोन आल्यानंतर काही वेळासाठी खळबळ उडाली होती, मात्र यापूर्वीही अशाप्रकारे फोन आले असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली, प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
LetsUp News Updates

● नवी दिल्ली - देशातली 13 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधले हवामान आज सोमवारी खराब असणार, वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस आणि गारपीटीची शक्यता

● नवी दिल्ली - 2017-18 या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीच्या जमा रकमेवर 8.55 टक्के व्याज मिळण्याची शक्यता

● नवी दिल्ली - सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 100 अॅपल आयफोन एक्स केले जप्त, प्रवाशाला अटक

● जम्मू-काश्मीर - दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले आहे, मात्र त्यांच्याकडून गोळीबार करण्यात येत आहे; शोपियान पोलिसांची माहिती

● काबुल - अफगाणिस्तानमध्ये सहा भारतीय अभियंत्यांचे अपहरण, यांच्यासोबत एका अफगाणिस्तानमधील व्यक्तीचाही समावेश

● अज्ञात हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे गृहमंत्री अहसान इक्बाल जखमी, द डॉन या वृत्तपत्राने दिले वृत्त

● मुंबई - वैद्यकीय कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला

● जोधपूर - काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर येथील न्यायालयात आज सुनावणी, शिक्षेला स्थगिती देण्याची सलमान खानची मागणी

● मुंबई - कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा 13 धावांनी शानदार विजय, किंग्ज इलेव्हन पंजाबचा राजस्थान रॉयल्सवर सहा गडी राखून विजय

● मुंबई - मुकेश अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशाचं लग्न ठरले, पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल यांचा मुलगा आनंदसोबत तिचा विवाह होणार

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🌞 आजपासून अनुभवा ‘शून्य सावली’ दिवस

Letsup I Update

राज्यात आज सोमवारपासून टप्प्याटप्प्याने शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे. म्हणजे सूर्य आपल्या डोक्यावर असताना भरदुपारी 12 वाजल्यानंतर सावली गायब होणार आहे. वर्षातून दोनदा उद्भवणारी ही स्थिती संपूर्ण राज्यातील नागरिकांना 26 मेपर्यंत अनुभवता येणार आहे.

👉 जाणून घ्या आपल्या शहरातील शून्य सावली दिवस :

7 मे : कोल्हापूर, सांगली, मिरज I 10 मे : सातारा, अक्कलकोट I 11 मे : वाई, महाबळेश्वर I 12 मे : बार्शी, बारामती I 13 मे : लातूर I 14 मे : पुणे, दौंड, अलिबाग I 15 मे : मुंबई I 16 मे : नगर, कल्याण, नांदेड, ठाणे I 18 मे : पैठण I 19 मे : जालना I 20 मे : औरंगाबाद, नाशिक I 21 मे : मनमाड

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🎯 लवकरच आंतरजातीय विवाह कायदा

Letsup I Update

राज्यात आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना "ऑनर किलींग' सारख्या प्रकारांपासून संरक्षण देण्यासाठी राज्य सरकार लकवरच एक कायदा करणार आहे.

सामाजिक न्याय राज्य मंत्री राजकुमार बडोले यांनी याबाबत सांगितले. आंतरजातीय आणि आंतरधर्मिय जोडप्यांच्या अपत्यांना शुल्क माफीसारख्या विशेष सवलती सरकारच्यावतीने दिल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
📣 पेटीएमचे टॅप कार्ड ऑफलाईन वापरा!

Letsup I Update

पेटीएमने आता टॅप कार्ड सादर केले असून याचा वापर ऑफलाईन देखील करता येणार आहे. याची खासियत म्हणजे यामध्ये इंटरनेटविना म्हणजेच ऑफलाईन पध्दतीने व्यवहार केले जाणार आहेत.

टॅप कार्डमध्ये निअर फिल्ड कम्युनिकेशन म्हणजेच एनएफसी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याच्या मदतीने अतिशय वेगवान आणि सुरक्षित पध्दतीने व्यवहार करणे शक्य आहे. कंपनीच्या पॉईंट ऑफ सेल म्हणजेच पीओएस मशिन्सवर याचा वापर करता येणार आहे. याच्या मदतीने कुणीही आपल्या पेटीएम अकाऊंटवरून पैशांना ऑफलाईन ट्रान्सफर करू शकतो. ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
LetsUp News Updates

● नवी दिल्ली - भारतात गेल्या 6 वर्षांमध्ये दत्तक घेतलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या मुलींची, हे प्रमाण 60 टक्के असल्याची सरकारी आकडेवारीवरुन माहिती समोर

● नवी दिल्ली - येत्या काही दिवसांत देशातील चलन टंचाई दूर होऊन सर्व व्यवहार सुरळीत होतील : सुभाष चंद्रा गर्ग, अर्थ सचिव

● नवी दिल्ली - कठुआ हत्याकांड प्रकरण पठाणकोटला हस्तांतरीत, बंद कॅमेऱ्यात रोज सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीवरील स्थगितीही मागे घेतली

● वॉशिंग्टन (अमेरिका) - अमेरिकेच्या हवाई राज्यातील किलाउआ ज्वालामुखीचा उद्रेक, ज्वालामुखीतून 200 फूट उंच लाव्हा उसळला

● राजस्थान - 33 पैकी 26 जिल्ह्यांना पुढचे दोन दिवस धुळीच्या वादळाचा धोका

● मुंबई - MPSC उमेदवारांना प्रोफाईल तातडीने आधार कार्डशी लिंक करावे लागणार, त्यासाठी 31 मेपर्यंतची मुदत

● मुंबई - कार्यालयांत अधिकारी इंग्रजीचा वापर बंद करून प्रशासनात मराठी सक्तीचा राज्य सरकारने काढला आदेश

● फेसबुकने आता ई-कॉमर्स मार्केटमध्येही एन्ट्री करण्याचे ठरवले, यासाठी फेसबुकने काही नामांकित ब्रँड्ससोबत केली चर्चा सुरु

● मुंबई - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अफगानिस्तान विरुद्ध टेस्ट मॅच खेळणार, अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद

● सनरायझर्स हैदराबादचा सनसनाटी विजय, बंगलोरवर पाच धावांनी मात, केन विल्यमसन ठरला सामनावीर

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🌏 पृथ्वीवर सूर्यावरचं वादळ धडकणार!

Letsup I Update

पृथ्वीला सोलर स्टॉर्म धडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वैज्ञानिकांच्या मते, सूर्याला एक कोरोनल होल होईल. ज्यामुळे सूर्यातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर येईल. या दरम्यान ब्लॅकआउट सारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.

या दरम्यान उपग्रहाशी संबंधित सर्व सेवा जसे मोबईल, टीव्ही, जीपीएस सेवा देखील बंद होऊ शकते. याशिवाय रेडिएशनचा धोका देखील वर्तवला जातो आहे. नॅशनल ओशन अ‍ॅण्ड अॅटमॉस्फियर असोसिएशनचे म्हणणे आहे की, हा सोलर स्टॉर्म जी-1 कॅटेगरीचा आहे. म्हणजे या वादळाची तीव्रता कमी असेल. पण यामुळे देखील मोठं नुकसान होऊ शकते. जी-1 कॅटगरीमध्ये पावर ग्रिडवर सर्वाधिक प्रभाव पडेल. मायग्रेटरी बर्ड्सवर देखील याचा गंभीर परिणाम होईल. याचा सर्वाधिक प्रभाव यूएस आणि यूकेमध्ये पडण्याची शक्यता आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup