LetsUpp Marathi
4.85K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
👌 धोनी, रैना आणि हरभजनच्या मुलीचा 'हा' व्हिडिओ व्हायरल!

Letsup I Update

एकीकडे आयपीएलचा थरार सुरू असतानाच दुसरीकडे संघातल्या स्टार खेळाडूंच्या मुली एकमेकींशी मैत्री करण्यात दंग झाल्या आहेत. सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी आणि हरभजन सिंग या तिघांच्या मुलींचा एकत्र खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. सुरेश रैनाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

हा व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/T6XdsR

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
LetsUp News Updates

● नवी दिल्ली - रशियात सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बहुराष्ट्रीय लष्करी सरावात प्रथमच भारत आणि पाकिस्तानचे लष्कर सहभागी होणार

● नवी दिल्ली - केंद्र सरकारने अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात केली वाढ, अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली घोषणा

● नवी दिल्ली - भारताच्या 500 हून अधिक वेबसाइट्स हॅक करणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील दोघांना पटियाला हाऊस कोर्टाने 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

● नवी दिल्ली - भारतीय खेळाडूंनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या, चांगल्या कामगिरीच्या जोरावर पदकं जिंकली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'मन की बात' कार्यक्रमात वक्तव्य

● उत्तर कोरिया मे महिन्यात त्यांच्या देशातील अणू चाचणी परीक्षण स्थळ बंद करणार, दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाची माहिती

● पालघर - लोकसभा पोटनिवडणुकीत युती न करता शिवसेना स्वतंत्र उमेदवार देणार, 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निर्णय

● पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील, उपाध्यक्षपदी नवाब मलिक तर खजिनदारपदी हेमंत टकले यांची निवड

● टाटा स्काय कंपनीने नेटफ्लिक्स या व्हिडीओ ऑन डिमांड सेवेसोबत कंटेंटच्या पुरवठ्याबाबत सहकार्याचा करार केल्याची माहिती जाहीर

● सनरायझर्स हैदराबाने राजस्थान रॉयल्सचा 11 धावांनी केला पराभव; कोलकाताचा बेंगळुरूवर 6 गडी राखून विजय

● मुंबई - स्कोर ट्रेड्स इंडिंयाच्या 'परिपक्व' अभिनेत्रींच्या यादीत अष्टपैलू अभिनेत्री दिव्या दत्ता पहिल्या स्थानी तर 'परिपक्व' अभिनेत्यांच्या यादीत अभिनेता सलमान खान सर्वोच्च स्थानी

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🌾 लवकरच शेतकऱ्यांना 1100 कोटींची मदत

Letsup I Update

▪ राज्य सरकारने बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच 1100 कोटींची मदत देण्याचा घेतला निर्णय

▪ बोंडअळीने 43 लाख हेक्टर क्षेत्रापैकी राज्यात 34 लाख हेक्टर क्षेत्रावरील कापसाचे नुकसान झाल्याचे राज्य सरकारने केलेल्या सर्वेक्षणात आढळले

▪ कीटकनाशकांमुळे भात व इतर खरीप पिकाचेही नुकसान झाले होते. संबंधित शेतकऱ्यांनाही उपरोक्त निधीतून मदत दिली जाणार

▪ पुढच्या आठवड्यात या मदतीचे वितरण सुरू होईल, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार यांनी दिली माहिती

▪ राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकरी व त्यांचे बँक खात्यांची यादी तयार केली असून शेतकऱ्यांच्या खात्यांवर ही मदत जमा होणार आहे

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
LetsUp News Updates

● पाकची नवी कुरापत, भारत आणि पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानने बांधकाम करण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर, बीएसएफची करडी नजर

● नवी दिल्ली - नदीकिनारची सर्वाधिक प्रदूषित शहरे महाराष्ट्रात; पर्यावरण मंत्रालयाचा अहवाल

● नवी दिल्ली - शारदा चिटफंट घोटाळ्या प्रकरणी इडीने बजावली पी. चिदंबरम यांची पत्नी नलिनी चिदंबरम यांना नोटीस, 7 मेपर्यंत हजर राहण्याचे दिले आदेश

● पुणे - आयआयटी जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर, आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील सुरज कृष्णा देशात पहिला तर अर्णव दातार पुण्यातून पहिला

● मुंबई - शहिदांच्या पत्नींना एसटीचा आजीवन मोफत प्रवास, एका पाल्यास एसटीत नोकरी : परिवहनमंत्री रावते

● मुंबई - सोमवार ठरला घातवार, दिवसभरात विविध ठिकाणी तीन अपघातांमध्ये 14 जणांचा मृत्यू

● मुंबई - पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून विश्वजित कदम यांना उमेदवारी

● भंडारा - लाखनी येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या नागपूरच्या वऱ्हाड्यांना ट्रेलरने चिरडले, 8 ठार; 13 जखमी

● पुणे - चुरशीच्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्जने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 13 धावांनी केली मात, शेन वॉटसन ठरला सामनावीर

● मुंबई - 'लय भारी' सिनेमाच्या घवघवीत यशानंतर अभिनेता रितेश देशमुख 'माऊली' या सिनेमातून पुन्हा भेटीला येणार

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👌 अभिमानास्पद महाराष्ट्र माझा

Letsup I Special Update

▫ 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली म्हणून हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.

▫ 1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली.

▫ महाराष्ट्र दिन म्हणजे महाराष्ट्रात साजरे होत असलेल्या सण-उत्सवांच्या शृंखलेतील एक भव्यदिव्य असा उत्सवच आहे. हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा करणे हे या पवित्र भूमीमध्ये निवास करत असलेल्या प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.

▫ संतभूमी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आदी थोर पराक्रमी महाराजांची परंपरा असलेल्या महाराष्ट्राचे नागरिक असणे, हे आपले भाग्यच आहे. अशा पुण्यवंतांच्या महाराष्ट्राचा देशाच्या प्रगतीमध्ये कायमच सिंहाचा वाटा राहिला आहे.

▫ देशाच्या पटलावर महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य आहे की जेथे देशातील प्रत्येक राज्यातील व्यक्तीची काही ना काही कारणास्तव येथे नाळ जोडलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र काय आहे, हे वेगळेपणे सांगण्याची आवश्यकताच नाही.

▫ व्यापकता हा या राज्याच्या मातीतील अलौकिक असा गुण आहे. येथे वर्षानुवर्षे वास्तव्य करत असलेल्या परराज्यातील मंडळींनी तो आत्मसात करून आपापल्या राज्यांत महाराष्ट्रासारखी व्यापक विचारांची विचारधारा रुजवली पाहिजे.

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा! महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा!

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
🙏 संघर्षाची प्रेरणा देणारा कामगार दिन

Letsup I Special Update

▫ देशाच्या पर्यायाने जगाच्या विकासात कामगारांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी 1 मे हा दिवस जगभरात कामगारदिन म्हणून पाळला जातो.

▫ औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला परंतु त्यांची पिळवणूकही होत होती. याविरोधात कामगार एकत्र आले व कामगार संघटनांनी निर्मिती झाली. कामगारांच्या विविध मागण्यांना उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले. त्यानंतर कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली व 1891 पासून 1 मे हा कामगारदिन पाळण्यात येतो.

▫ भारतातील पहिला कामगार दिन तत्कालीन मद्रास शहरात 1 मे 1923 रोजी पाळण्यात आला. लेबर किसान पार्टी हिंदुस्थान या संघटनेने हा दिवस पाळला होता.

▫ दरवर्षी 1 मे रोजी जगभरातील 80 हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो.

▫ कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. कामगार संघटना तसेच उद्योजक व सरकारतर्फे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कामगारांचा गौरव करण्यात येतो.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
🎬 श्रीदेवीच्या जीवनावर डॉक्यूमेंट्री येणार

Letsup I Update

▪ बॉलिवूडमधील लेडी सुपरस्टार श्रीदेवीचे योगदान कायम प्रेक्षकांसमोर ठेवण्यासाठी तिच्या जीवनावर आधारित एक डॉक्यूमेंट्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

▪ श्रीदेवीशी संबंधित प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकणारी एक विस्तृत डॉक्यूमेंट्री तयार केली जावी, असा बोनी कपूरचा विचार आहे.

▪ सदर डॉक्यूमेंट्रीसाठी बोनी कपूरने अनेक शिर्षकांचा विचार करून ठेवला आहे. ही नावे त्यानी फिल्म प्रोड्युसर्स असोसिएशनकडे नोंदवूनही ठेवली आहेत. यात सुमारे 20 शिर्षकांचा समावेश आहे.

▪ या डॉक्यूमेंट्रीमध्ये श्रीदेवीच्या काही प्रकाशात न आलेल्या व्हिडीओंचाही समावेश असेल. याशिवाय श्रीदेवीबाबत अनेक संबंधितांची इंटरव्हूपण असतील. या डॉक्यूमेंट्रीचे दिग्दर्शन करण्यासाठी बोनी कपूरनी शेखर कपूरबरोबर चर्चाही केली आहे, असे समजते आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
LetsUp News Updates

● नवी दिल्ली - मोबाईल सिम कार्ड घेण्यासाठी आता आधार कार्डची सक्ती नाही, केंद्र सरकारचे आदेश

● नवी दिल्ली - पोक्सो कायद्याअंतर्गत दाखल होणाऱ्या प्रकरणांवर लवकरात लवकर सुनावणी घेण्यासाठी विशेष कोर्टाची नियुक्ती करण्यात यावी, सुप्रीम कोर्टाचे आदेश

● नवी दिल्ली - ऐतिहासिक वारसा असलेल्या ताजमहालाच्या रंगात झालेल्या बदलाविषयी सर्वाेच्च न्यायालयाने केली चिंता व्यक्त

● मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जमाफीसाठीची ऑनलाईन अर्ज नोंदणीची मुदत 20 मे पर्यंत वाढवण्यात आली

● मुंबई - अंधश्रद्धा निर्मूलन समितीची 'सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्या'ची राज्यव्यापी अंमलबजावणी मोहीम सुरू

● मुंबई - आता व्हॉट्सअॅपने 'रिस्ट्रिक्ट ग्रुप' हे फीचर आणले, या फीचरमुळे ग्रुप अॅडमिनला काही विशेष अधिकार मिळणार आहेत

● मुंबई - टीम इंडियाने आयसीसीच्या सुधारित कसोटी क्रमवारीतले अव्वल स्थान केले आणखी भक्कम

● बेंगळुरू - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने त्यांच्या घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सवर 14 धावांनी मिळवला विजय, टीम साऊथी ठरला सामनावीर

● नवी दिल्ली - बीसीसीआयमध्ये एक राज्य एक मत अनिवार्य करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यास बीसीसीआय तयार

● मुंबई - अभिनेत्री सोनम कपूर बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत 8 मे रोजी विवाह बंधनात अडकणार, दोन्ही कुटुंबांनी दिली माहिती

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⛳ छत्रपती शिवरायांचा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा ठरणार

Letsup I Update

छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात भव्य स्मारक उभे राहणार आहे. छत्रपती शिवरायांचा हा पुतळा जगातील सर्वात उंच (212 मीटर) ठरणार आहे. याविषयीच्या प्रस्तावाला केंद्राने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली.

ते म्हणाले, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची 212 मीटरपर्यंत वाढविण्यास मान्यता मिळाली असून स्मारकाच्या कामाला सुरुवातही झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनीला देण्यात आले आहे. यासाठी 2500 कोटींचे कंत्राट मंजूर करण्यात आले असले तरी याचा पहिल्या व दुसऱ्या टप्प्याचा एकूण खर्च 3600 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🎯 केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 191 जागांसाठी भरती

Letsup I Job Update

पोस्ट आणि जागा खालीलप्रमाणे :

* मार्केटिंग ऑफिसर : 28
* असिस्टंट डायरेक्टर : 03
* असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (सिव्हिल) : 04
* लेक्चरर (केमिकल) : 05
* लेक्चरर (इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) : 24
* लेक्चरर (प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी) : 07

------------------------
👨🎓 ड्रीम जॉब हवाय? मग साईनअप करा शाईन.कॉम सोबत आणि बनवा तुमचं स्वप्नातील करिअर, त्यासाठी क्लिक करा 👉 https://goo.gl/Vs1ZVr
------------------------

वयाची अट : पद क्र.1: 30 वर्षांपर्यंत, पद क्र.2 ते 6: 35 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

फी : General & OBC : ₹25/- (SC/ST/महिला/अपंग : फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : 17 मे 2018

जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/TyKXbt

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/YCkKFV

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
LetsUp News Updates

● नवी दिल्ली - देशात 5 वर्षांत 1 लाख कोटींचे 23 हजार बँक घोटाळे, रिझर्व्ह बँकेची माहिती; बँकांना 78 कोटींचा चुना

● नवी दिल्ली - लष्करावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या टॉप-5 देशांच्या यादीत भारताचा समावेश, भारताचा लष्करी खर्च आता फ्रान्सपेक्षा अधिक

● नवी दिल्ली - महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि बल्लारशहा रेल्वे स्टेशनं देशात सर्वात सुंदर, 10 लाखांचे पहिले बक्षीस मिळवले

● नवी दिल्ली - आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 62 पर्यंत वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारची पावले

● नवी दिल्ली - व्हेनेझुएला या दक्षिण अमेरिकेतील देशाने भारताला 30 टक्के कमी दराने कच्चे तेल विकण्याची दाखवली तयारी

● मुंबई - शेतकरी कर्जमाफी योजनेला पुन्हा मुदतवाढ, कर्जाच्या वन टाइम सेटलमेंटसाठी 30 जूनपर्यंत मुदत, अर्ज करण्यासाठी 20 मेपर्यंत मुदतवाढ

● मुंबई - ज्येष्ठ पत्रकार जे. डे हत्येप्रकरणी छोटा राजनसह 9 दोषींना जन्मठेप, विशेष मोक्का न्यायालयाचा निकाल

● सॅन फ्रान्सिस्को - डॉट कॉम किंवा डॉट ऑर्गप्रमाणे लवकरच डॉट अॅपनेही डोमेन रजिस्टर करता येणार

● दुबई - आयसीसी वनडे क्रिकेटची ताजी क्रमवारी जाहीर, टीम इंडियाला मागे टाकून इंग्लंडने वनडेत अव्वल स्थान पटकावले

● दिल्लीचा राजस्थान रॉयल्सवर 4 धावांनी विजय, रिषभ पंत ठरला सामनावीर

● मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर, सोनम कपूर, आणि स्वरा भास्कर यांच्या 'वीरे दी वेडींग'मधील 'तरीफा' गाणे झाले रिलीज

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🎯 स्पर्धा परीक्षा; सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी खास टिप्स

Letsup I Career Katta

सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञानासंबंधित प्रश्न विचारले जातात. या सेक्शनच्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची व बुद्धिमत्तेची तपासणी केली जाते. खालील काही टिप्सच्या मदतीने तुम्ही या विषयाची चांगली तयारी करू शकता...

1) तुम्ही जर स्पर्धा परीक्षा किंवा प्रवेश परीक्षांची तयारी करत असाल तर दररोज वर्तमानपत्र वाचायला हवे. कारण यातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडी, खेळ, बॉलीवूड, उद्योग, अर्थजगत याविषयी माहिती मिळते.

2) चालू घडामोडी किंवा गाजलेल्या बातम्यांची संपूर्ण माहिती मिळवून त्याविषयी टिपण्या काढून ठेवा. परीक्षेच्या वेळी या टिपण्या कामी येतात.

3) सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी इंटरनेट मोठे वरदान आहे. यामुळे तुम्हाला अपडेट राहून सर्व पैलू समजून घेण्यास मदत होईल.

4) स्पर्धा परीक्षांची तयारी करताना आधी अभ्यासक्रम समजून घेऊन त्या अनुषंगाने तयारी करा. कारण बँकेच्या परीक्षेसाठी बँकिंग व वित्तविषयक प्रश्न विचारले जातात. परंतु सिव्हिल सर्विसेसाठी राजकारण, समाजशास्त्र व इतर विषयांचा अभ्यास करावा लागतो.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
📌 शिक्षणाची गुणवत्ता क्रमवार यादी 2017

Letsup I Statistics Update

1) स्वित्झर्लंड
2) सिंगापूर
3) फिनलंड
5) यू.एस.
16) जर्मनी
20) यूके
26) फ्रान्स
31) जपान
34) भारत
35) इंडोनेशिया
39) चीन
52) रशिया
54) सौदी
74) इराण
94) पाकिस्तान
99) तुर्की
102) मेक्सिको
106) दक्षिण आफ्रिका
119) ब्राझील
120) नायजेरिया
129) इजिप्त (WEF)

शिक्षणाची गुणवत्ता क्रमवार यादी 2017 मध्ये भारताचा 34 वा क्रमांक लागतो.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
LetsUp News Updates

● नवी दिल्ली - चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च 2018) देशातील सोन्याच्या मागणीत 12 टक्क्यांची घट

● नवी दिल्ली - कावेरी पाणी वाद, कर्नाटक सरकारने तामिळनाडूला चार टीएमसी पाणी द्यावे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, 8 मे रोजी होणार पुढील सुनावणी

___
👌 तुम्ही लोन मिळवण्यास पात्र आहेत का? चेक करण्यासाठी तुमचा सिबिल स्कोर चेक करा, सोबत मिळवा PayTm कॅश 👉 https://goo.gl/bLAq8A
___

● नवी दिल्ली - आगामी 48 तासांमध्ये उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागांना धुळीच्या आणखी एका वादळाचा फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली

● लखनौ - 12 राज्यांत वादळी पाऊस; 130 जणांचा मृत्यू, 300 हून अधिक लोक जखमी, पिकांचे प्रचंड नुकसान

● मुंबई - न्यायालयीन कर्मचारी भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा, मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती उठवली, दिव्यांगाचा कोटा राखून भरती सुरू ठेवण्याचे आदेश

● मुंबई - केंद्र सरकारने औषधांच्या पाकिटांवर लाल रंगाच्या चौकटीत काळ्या ठळक शब्दांत रुग्णांसाठी सूचना छापणे केले बंधनकारक, या निर्णयाची अंमलबजावणी 1 नोव्हेंबरपासून

● ट्विटर या सोशल नेटवर्किंग वेबसाईटने आपल्या सगळ्या युजर्सना पासवर्ड त्वरित बदलण्यासंदर्भातले जारी केले प्रसिद्धी पत्रक

● आयडिया कंपनीने आपल्या फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्कचा विस्तार करत याचा सहा नवीन सर्कल्मध्ये प्रारंभ करण्यात आला

● कोलकाताचा चेन्नईवर 6 गडी राखून विजय, सुनील नारायण ठरला सामनावीर, चेन्नईने अव्वल स्थान गमावले

● मुंबई - बॉलिवूडचं सर्वात लाडकं जोडपं रणवीर- दीपिका नोव्हेंबरमध्ये विवाहबंधनात अडकणार अशा चर्चा सध्या सुरु

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🎬 मराठीतलं भन्नाट आकपेला गाणं नक्की पहा!

Letsup I Videos

मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी एका भन्नाट आकपेला गाण्याची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे या गाण्याचे संगीत तोंडाच्या माध्यमातून दिले आहे. प्रत्यक्षात कोणत्याही संगीत उपकरणाचा यात वापर केला गेला नाही. मराठी चित्रपटातील जवळपास सर्वच कलाकार आणि अनेक गाणी गाण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. अमेय खोपकरची ही निर्मिती आहे.

हे गाणं पाहण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/st7FBK

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🎬 कसा आहे 102 Not Out?

Letsup I Movie Review

उमेश शुक्ला दिग्दर्शित अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर अभिनित 102 नॉट आऊट सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात अशा बाप- लेकांची कथा सांगण्यात आली आहे ज्यात वडील 102 वर्षांचे असतात तर मुलगा 75 वर्षांचा असतो.

दोघंही वृद्धापकाळात असले तरी त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र फार वेगळा असतो. तो कसा आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमा पहावा लागेल. हा सिनेमा गुजराती नाटकावर आधारित आहे. या नाटकाचे नावही 102 नॉट आऊट असेच होते. या सिनेमाचे दिग्दर्शन उमेश शुक्ला यांनी केले आहे. या सिनेमाचे लेखन सौम्या जोशी यांनी केले आहे. जर तुमचा मूड हलका-फुलका सिनेमा पाहायचा असेल तर 102 नॉट आऊट हा उत्तम पर्याय आहे.

(रेटिंग : 3.5 / 5)

या चित्रपटाची तिकिटे BookMyShow वर बुक करण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/AiJjhL

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
LetsUp News Updates

● नवी दिल्ली - पेट्रोल, डिझेल जीएसटी अंतर्गत आणण्यासाठी जीएसटी समितीला विनंती केली : पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान

● नवी दिल्ली - साखरेवर सेस लावण्याचा निर्णय जीएसटी काऊन्सिलने टाळला

● स्टॉकहोम - सेक्स स्कँडलध्ये अडकल्यानंतर पुरस्कार प्रदान करणाऱ्या समितीने 2018 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार न देण्याचा घेतला निर्णय

● मुंबई - राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना जामीन मंजूर, मात्र रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्यास किमान एक आठवडा लागणार, सूत्रांची माहिती

● मुंबई - आर्थिकदृष्ट्या दुर्बल मराठा विद्यार्थ्यांचे मेडिकलचे निम्मे शुल्क सरकार भरणार, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

● मुंबई - राज्यात शहरांमधील 31 डिसेंबर 2015 पर्यंतच्या बेकायदा बांधकामांना सशर्त संरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाविषयीचा निकाल मुंबई हायकोर्टाने राखून ठेवला

● मुंबई - अण्णाभाऊ साठे महामंडळातील फाईल गहाळप्रकरणी महामंडळाचे महाव्यवस्थापक नागेश जुंबाडे निलंबित

● सोनी कंपनीने भारतीय बाजारपेठेत फोर-के रेझोल्युशन क्षमता असणाऱ्या स्मार्ट टिव्हींची नवीन मालिका केली सादर

● मुंबई इंडियन्सचा किंग्ज इलेव्हन पंजाबवर सहा विकेट्स राखून दणदणीत विजय, सूर्यकुमार यादव ठरला सामनावीर

● मुंबई - अभिनेत्री माधुरी दीक्षितचा पहिला मराठी चित्रपट 'बकेट लिस्ट'चा ट्रेलर प्रदर्शित

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🏏 IPL; विजयाने मुंबई संघाच्या आशा कायम!

Letsup I IPL Updates

कृणाल पांड्याच्या आक्रमक खेळीमुळे (12 चेंडूंत 31 धावा) मुंबई इंडियन्स संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबवर रोमहर्षक विजय मिळवला. त्यामुळे आता मुंबईला आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये धडक मारायची असेल, तर उर्वरित पाचही सामने जिंकण्याची आवश्यकता आहे.

पहिल्या डावात पंजाबला 20 षटकांत सहा बाद 174 धावांचीच मजल मारता आली. मग पंजाबचे 175 धावांचे आव्हान घेऊन मुंबईकडून एविन लुईसचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी उत्तम धावगती राखली. त्यामुळे मुंबईला सहा चेंडू आणि सहा विकेट्स राखून विजय साजरा करता आला. सलामीला येऊन 57 धावांची खेळी उभारुन मुंबईच्या विजयाचा पाया रचणाऱ्या सूर्यकुमार यादवला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🎬 माधुरीच्या 'बकेट लिस्ट'चा ट्रेलर रिलीज

Letsup I Videos

'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचा पहिला वहिला मराठी सिनेमा 'बकेट लिस्ट'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. 'बकेट लिस्ट- माझी, तुमची.. आपल्या सगळ्यांची' अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. हा सिनेमा 25 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

ट्रेलर पाहण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/iKT7XP

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🍽 भांड्यांचा येणारा वास दूर करण्यासाठी...

Letsup I Kitchen Tips

सर्वप्रथम किचनची स्वच्छता हा मुद्दा लक्षात घेतला तर भांडी स्वच्छ असणे आवश्यक आहे. कारण त्यातच आपण अन्न शिजवतो, साठवतो. पाणी भरतो, पितो. पण अनेकदा भांड्यांना येणारा वास काही केल्या जात नाही. भांडी घासल्यानंतरही तो कायम राहतो. मग अशावेळी काय करावे? खालील घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

1) भांड्यांना येणारा माशांचा वास दूर करण्यासाठी लिंबाची साल भांड्यावर घासा आणि 20 मिनिटे भांडे तसेच ठेवा. त्यानंतर भांडे धुवा.

2) भांड्यांचा वास घालवण्यासाठी आधी भांडे साबणाने घासून स्वच्छ करा. त्यानंतर भांड्यात एक चमचा व्हिनेगर घालून ठेवून द्या. काही वेळाने पाण्याने भांडे धुवा.

3) भांडी संत्र्याच्या सालीने घासा. 30 मिनिटांनंतर लिक्विड सोपने धुवा. भांड्यांना येणारा वास दूर होईल.

4) मासे शिजवून झाल्यानंतर भांडे पाण्याने स्वच्छ करा आणि त्यानंतर सफरचंदाचे एक स्लाईस भांड्यावर घासा. यामुळे देखील भांड्यांना वास येणार नाही.

5) भांड्याचा वास दूर करण्यासाठी भांड्यात काही वेळ गरम पाणी घालून ठेवा. त्यानंतर लिक्विड सोपने घासा.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💐 ज्येष्ठ गायक अरुण दाते यांचे निधन

Letsup I Breaking

ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते (85 वर्ष) यांचे आज रविवारी पहाटे निधन झाले. त्यांनी मुंबईतील कांजूरमार्ग येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. शुक्रतारा मंदवारा, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी यासारखी असंख्य गाणी अरुण दाते यांनी अजरामर केली होती.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup