LetsUpp Marathi
4.85K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
📣 फेसबुकचे लॉग इन डिटेल्स विकले जातात 340 रुपयांत

Letsup I Update

फेसबुकवरील लॉग इनचे डिटेल्स केवळ 340 रुपयांना विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फेसबुकवर एखाद्या फोटोशी तुलना करण्यासाठी, स्वभावाविषयी जाणून घेऊन ते पोस्ट करण्यासाठी आपण ज्या अ‍ॅपमध्ये लॉग इन करतो, अशा अ‍ॅपच्या माध्यमातून ही डेटाचोरी होत आहे. ब्रिटनमधील रिसर्च कंपनी केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका या कंपनीने डेटाचोरी केल्याचे प्रकरण समोर आणले आहे.

टेस्ला, स्पेस एक्स पेज डिलीट!

केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणानंतर अमेरिकन उद्योग सम्राट इलॉन मस्क यांनी त्यांच्या ‘स्पेस एक्स’ आणि इलेक्ट्रीक कार तयार करण्याऱ्या ‘टेस्ला’ या कंपन्याचे फेसबुकवरील पेज बंद केले आहेत.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

💥
🛰 चांद्रयान-2चे प्रक्षेपण ऑक्टोबरमध्ये

Letsup I Update

तज्ज्ञांनी काही गोष्टींचे परीक्षण करण्याचा सल्ला दिल्यामुळे चांद्रयान-2चे प्रक्षेपण ऑक्टोबर महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो)चे अध्यक्ष के. शिवन यांनी दिली.

भारताचा चंद्रयान-2 हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून यासाठी 800 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. चांद्रयान-2 हे पूर्णपणे भारतात विकसित करण्यात आलेले मिशन आहे. या अवकाश यानाचे वजन 3 हजार 290 किलो असून हे यान चंद्राच्या चार बाजूंना फिरून माहिती गोळा करण्याचे काम करेल.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
💫 सीमेवरील जवान होणार हायटेक

Letsup I Update

केंद्र सरकारने भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या जवानांसाठी आधुनिक रायफल्स, लाइट मशीन गन आणि क्लोजक्वार्टर बॅटल कार्बाइन्स उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. ही शस्त्रास्त्रे जलदगती प्रक्रियेतंर्गत (एफटीपी) पुरवली जाणार आहेत.

याबाबत संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 72,400 असॉल्ट रायफल्स, 16,479 एलएमजी आणि 93,895 सीक्यूबी कार्बाइन्ससाठी निवडलेल्या विदेशी कंपन्यांना निविदा देण्यात आली आहे. हा व्यवहार सुमारे 5,366 कोटी रूपयांचा आहे. दहा दिवसांच्या आत हा करार निश्चित केला जाणार आहे. ही शस्त्रास्त्रे येत्या वर्षभरात भारताला सोपवली जातील अशी अपेक्षा केली जात आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
💑 अखेर सोनम कपूरचं लग्न ठरलं!

Letsup I Update

बऱ्याच चर्चेनंतर बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजाचं लग्न ठरलं आहे. एका वृत्तपत्रानुसार, सोनम 11 आणि 12 मे दरम्यान दिमाखदार सोहळ्यात जिनिव्हात लग्न करणार आहे.

या विवाहसोहळ्यात पाहुण्यांना आमंत्रण देण्याची सर्व जबाबदारी खुद्द अनिल कपूर यांनी आपल्या खांद्यावर घेतल्याचे कळत आहे. संगीत, मेहंदीचा कार्यक्रम आणि पारंपरिक पद्धतीने सर्व विधी पार पाडत तिच्या विवाहसोहळ्याची रंगत वाढणार आहे. सोनमने वेडिंग ड्रेसची जबाबदारी अबु जानी आणि संदीप खोसला यांना दिली आहे. वेडिंग वॉर्डरोबचे काम ब्रिटिश डिझायनर टमारा राल्फ आणि मायकल रूसो यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
LetsUp I News Updates

🔅 नवी दिल्ली - शेतकर्‍यांना उत्पादन खर्चापेक्षा दीडपट हमीभाव देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून केली

🔅 नवी दिल्ली - राज्यसभेतील सुमारे 90 टक्के खासदार कोट्यधीश असून त्यांची सरासरी संपत्ती 55.62 कोटी रुपये एवढी आहे

🔅 नवी दिल्ली - नरेंद्र मोदी अॅप डाऊनलोड करणाऱ्या युझर्सचा डेटा थर्ड पार्टीला विकला जात असल्याचा राहुल गांधींचा आरोप

🔅 नवी दिल्ली - आधारकार्डधारकांच्या व्हेरीफिकेशनसाठी एक जुलैपासून आता चेहर्‍याची ओळख हा पर्याय दिला जाणार

🔅 नवी दिल्ली - अण्णांच्या आंदोलनाला संघाची फूस, हार्दिक पटेलचा सनसनाटी आरोप, आरक्षणावरुनही निशाणा

🔅 मॉस्को - रशियातील सैबेरिया शहरातल्या कॅमरोव्हो भागात एका मॉलला भीषण आग लागून 37 जणांचा होरपळून मृत्यू

🔅 मुंबई - सरकारने लोकशाहीचा गळा दाबला, आंदोलन करण्याचा अधिकार नाकारला, प्रकाश आंबेडकर यांचे टीकास्त्र

🔅 मुंबई - महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेने मुंबईकरांमधील आजाराचे सर्वेक्षण केले, त्यात मानसिक आजारांचा क्रमांक पहिला

🔅 मुंबई - राज्यातील ऊस गाळप हंगाम अखेरीस सुरुवात, 187 पैकी 41 साखर कारखान्यांची धुराडी बंद

🔅 नवी दिल्ली - टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या कारला अपघात, देहराडूनहून दिल्लीला जाताना ट्रकला धडक

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💥 आधारवर चेहऱ्याची ओळख लागू होणार!

LetsUp I Updates

भारतीय विशेष ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार सुरक्षेच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. येत्या 1 जुलै पासून UIDAI आधार कार्डवर डोळ्यांच्या प्रतिमा, हातांच्या पंजाचे ठशांसोबतच आता चेहऱ्याची ओळखही लागू करणार आहे. येत्या 1 जुलैपासून हा नवा बदल सुरू करण्यासाठी UIDAI सज्ज झाली आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚡
💥 खुशखबर; राज्यात मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना

LetsUp I Updates

राज्य सरकारने मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना केली आहे. विद्यार्थ्यांचे कला-क्रीडागुण अधिक बहरावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ पाचवी, आठवी, दहावी व बारावीची परीक्षा देऊन व त्यासाठी मोजकेच विषय निवडून विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करता येणार आहे.

आपल्या दोन इयत्तांपुढील शिक्षण घेण्याची बुद्धिमत्ता असणारे अतिप्रगत विद्यार्थी, दिव्यांग, कलाकार, खेळाडू अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व ते मुख्य शिक्षणप्रवाहातही राहावेत यासाठी या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚡
⚠ सावधान! मार्च एंडची कामे उरकून घ्या...

LetsUp I Updates

यंदाच्या मार्च एंडला सलग चार सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे ज्यांची बॅंकांची कामे शिल्लक असतील त्यांनी दोन दिवसातच कामे करून घ्यावीत. कारण 29 मार्चपासून 1 एप्रिलपर्यंत बॅंकांना सुट्या आहेत. यामध्ये 29 मार्चला महावीर जयंती, 30 मार्चला गुड फ्रायडे, 31 मार्चला इअर एन्डिंग आणि 1 एप्रिलला रविवार आहे.

ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक बँकांनी या सलग आलेल्या सुट्यांबाबत आपल्या ग्राहकांना सूचना दिल्या आहेत. दरम्यान बॅंका बंद असल्यामुळे एटीएममध्येही रोख रकमेची कमतरता जाणवू शकते त्यामुळे कॅशची व्यवस्थाही आधीच करून ठेवा.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚡
💥 काँग्रेसने अॅप हटवले; काय लपवताय? भाजपाची विचारणा

Letsup I Update

डेटा चोरीच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीनंतर काँग्रेसने प्ले स्टोरमधून आपले अॅप हटवले आहे. यावरून भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले आहेत की, ‘काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी काय लपवण्याचा प्रयत्न करत आहेत? यांनी गुजरात निवडणुकीत लोकांचा डाटा चोरी करुन निवडणूक धोरण आखले आणि आता कर्नाटकातही तेच करत आहेत’.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
LetsUp I News Updates

🔅 नवी दिल्ली - भाजपच्या आरोपानंतर प्ले स्टोअरवरून काँग्रेसने पक्षाचे अॅप हटवले, डेटा लीक झाल्याचा भाजपचा आरोप

🔅 नवी दिल्ली - अण्णांच्या आंदोलनावर आज तोडगा निघेल, अण्णा हजारेंशी झालेल्या चर्चेनंतर गिरीश महाजन यांचा दावा

🔅 नवी दिल्ली - लोकसभेत अविश्वासदर्शक ठरावासाठी उपस्थित राहण्याच्या काँग्रेस पक्षाच्या खासदारांना तीन ओळींचा व्हीप जारी

🔅 कोरापूत - ओडिशामधील कोरापूत येथे झालेल्या चकमकीत 4 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश

🔅 न्यूयार्क - अमेरिकेचे रशियाच्या 60 राजनीतीज्ञांना देश सोडून जाण्याचे व सिएटलचा दूतावास बंद करण्याचे आदेश

🔅 मुंबई - एमपीएससी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या 42 उमेदवारांना ब्लॅकलिस्ट करण्यात आले, उमेदवारांची यादीही जाहीर

🔅 मुंबई - संभाजी भिडेंना 8 दिवसात अटक न केल्यास विधानभवनाला घेराव घालू, प्रकाश आंबेडकरांचे सरकारला अल्टिमेटम

🔅 रायगड - जिल्ह्यातील भीरा येथे राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद, तापमान 42.5 अंश सेल्सियसवर पोहोचले

🔅 मुंबई - बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितच्या 'बकेट लिस्ट' या मराठीतील पहिल्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

🔅 नवी दिल्ली - राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदी अजिंक्य रहाणेची वर्णी, बॉल टॅम्परिंग प्रकरणामुळे स्टीव्ह स्मिथची हकालपट्टी

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💥 छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ

LetsUp I Updates

जामीनावर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दुसऱ्यांदा नकार दिल्याने, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात अटकेत असलेले छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ हे मार्च 2016 पासून तर त्यांचा पुतण्या समीर भुजबळ फेब्रुवारी 2016 पासून कैदेत आहेत.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚡
💥 रेल्वे भरती; 2 कोटी उमेदवारी अर्ज दाखल

LetsUp I Updates

रेल्वेने यंदा गट ‘क’ आणि गट ‘ड’ साठी 90 हजार जागांसाठी मेगा भरती काढली आहे. मात्र, या 90 हजार जागांसाठी 2 कोटीपेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे अद्याप 5 दिवस बाकी आहेत. त्यामुळे पुढील पाच दिवसांत आणखी अर्ज येण्याची शक्यता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚡
💥 कर्नाटकमध्ये निवडणुकांचे बिगूल वाजले!

ब्रेकिंग

देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे अखेर बिगूल वाजले आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. एकाच टप्प्यात 56 हजार मतदान केंद्रांवर हे मतदान होणार असून या निवडणुकीत 4.96 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावनार आहेत. याठिकाणी आजपासूनच आचारसंहिता लागू झाल्याची घोषणाही आयोगाने केली आहे.

महत्त्वाच्या तारखा

👉 अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख - 25 एप्रिल 2018

👉 अर्ज मागे घेण्याची तारीख - 27 एप्रिल 2018

👉 मतदानाची तारीख - 12 मे 2018

👉 मतमोजणीची तारीख - 15 मे 2018

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚡
💥 एमआरपीपेक्षा जास्त पैसे आकारल्यास 5 लाखाचा दंड होणार?

LetsUp I Updates

एमआरपीपेक्षा जास्त पैशांना वस्तूंची विक्री करणे विक्रेत्यांना आता महागात पडू शकते. कारण अशा विक्रेत्यांवर ग्राहक मंत्रालय कठोर कारवाई करण्याचा विचार करत आहे. केंद्र सरकारने हा प्रस्ताव स्वीकारल्यास संबंधित विक्रेत्यांना 5 लाख रुपये दंड आणि दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. त्यामुळे आता केंद्र सरकार काय निर्णय घेते याकडे देशवासीयांचे लक्ष लागले आहे.

तक्रार कुठे करावी?

एमआरपीपेक्षा जास्त पैसे आकारून वस्तूची विक्री करणाऱ्यांविरोधात 1800 11 4000 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येते. +918130009809 या क्रमांकावर SMS करूनही तक्रार केली जाऊ शकते. याशिवाय मंत्रालयाच्या consumerhelpline.gov.in या वेबसाइटवरही तक्रार करता येते.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚡
⚡ यापुढे फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट 14 दिवसांच्या आत ऑटोडिलीट होणार!

Letsup I Update

आपल्याला फेसबुकवर सतत कोणाच्या ना कोणाच्या फ्रेंड रिक्वेस्ट येत असतात. अनेकदा अशा कित्येक फ्रेंड रिक्वेस्ट आपण अ‍ॅक्सेप्ट करत नाही. यामुळे कित्येक दिवस, कित्येक महिने किंवा वर्षभर त्या फ्रेंड रिक्वेस्ट इनबॉक्समध्ये पेंडिंग राहतात. फेसबुक या समस्येवर काम करत असून सध्या नव्या फीचरची चाचणी सुरु आहे.

या फीचरमुळे फ्रेंड रिक्वेस्ट आल्यानंतर ती अ‍ॅक्सेप्ट करण्यासाठी प्रत्येक युजर्सकडे 14 दिवसांचा अवधी असणार आहे. रिक्वेस्टखाली मुदत संपायला किती अवधी उरला आहे हे दिसणार आहे. 14 दिवसांत युजरकडून रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट केली नाही तर ती ऑटोडिलीट होणार असल्याचे टेक क्रंचने म्हटले आहे. फेसबुकच्या प्रवक्त्यांनी देखील याला अधिकृत दुजोरा दिला आहे. त्यामुळे लवकरच हे फीचर लाईव्ह होणार आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
📣 अॅट्रॉसिटी निर्णय; सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार

Letsup I Update

दलित संघटना आणि विरोधी पक्षांच्या दबावानंतर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात अॅट्रॉसिटी कायद्याच्या निकालासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची तयारी दाखवली आहे. सरकारी अधिकारी किंवा सामान्य व्यक्तींवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यास, सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेऊनच पुढील कारवाई करण्यात येईल, असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
👁 अण्णांच्या आंदोलनावर भाजपची छुपी नजर?

Letsup I Update

जनलोकपालसह इतर मागण्यांवर सुरु असलेल्या उपोषणावर भाजपची छुप्या पद्धतीने नजर आहे, असा गंभीर आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कोअर कमिटीने केला आहे. दिल्लीतील रामलीला मैदानावर पाचव्या दिवशीही अण्णांचे उपोषण सुरुच आहे.

आंदोलनात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे आऊटपुट दिल्ली भाजप कार्यालयाला दिलेले आहे. आंदोलनस्थळी असलेल्या सीसीटीव्ही रुममधील स्क्रीनवर BJP office असे लिहून येत आहे, असा आरोप कोर कमिटीचे सदस्य नवीन जयहिंद यांनी केला आहे. विशेष म्हणजे नवीन जयहिंद यांनी जो आरोप केला, ते नाव सीसीटीव्ही रुममधील कॉम्प्युटरमध्येही दिसत आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
LetsUp I News Updates

🔅 नवी दिल्ली - तात्काळ अटक रोखण्यावर पुनर्विचार करावा, अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल केंद्र सरकारची याचिका

🔅 नवी दिल्ली - मोदींविरोधात तिसऱ्या आघाडीसाठी मोटबांधणी, ममता बॅनर्जींकडून शरद पवार, संजय राऊत यांची भेट

🔅 नवी दिल्ली - मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याचे हायकोर्टाचे आदेश, कारवाईचा अहवाल 8 मेपर्यंत सादर करण्याच्या सूचना

🔅 नवी दिल्ली - अण्णा हजारे यांनी केंद्राच्या मसुद्यात अनेक त्रुटी दाखवल्या, आंदोलन आणखी लांबण्याची शक्यता

🔅 नवी दिल्ली - येत्या 2 एप्रिलला डॉक्टरांचा देशव्यापी संप, नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाला डॉक्टरांचा विरोध

🔅 मुंबई - विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विरोधकांनी दाखल केलेला अविश्‍वासाचा ठराव मागे घेतला

🔅 मुंबई - भाजपकडून युतीसाठी हालचाली, मुनगंटीवारांवर चर्चेची जबाबदारी, शिवसेना ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत

🔅 नवी दिल्ली - पी. व्ही. सिंधू, अनुष्का शर्मा आणि स्मृती मंधाना या तिघीही फोर्ब्सच्या यादीत झळकल्या

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🎒 शाळांची सुट्टी लांबणार; आता 1 मेपासून सुट्टी!

LetsUp I Updates

वार्षिक परीक्षा संपली की शाळेचे वर्ष संपते व विद्यार्थ्यांना सुट्टी लागते. मात्र आता पहिली ते नववीच्या राज्यमंडळाच्या शाळा 1 मे पर्यंत सुरू ठेवाव्यात असे आदेश विद्या प्राधिकारणाने दिले आहेत. त्यामुळे 1 मे पर्यंत विद्यार्थी व शिक्षकांना शाळेत येणे बंधनकारक असणार आहे.

दरम्यान, शाळांमधील पहिली ते नववीचे वर्ग 1 मेपर्यंत सुरू राहतील. या कालावधीत उन्हाळी शिबीर आणि इतर उपक्रम राबविले जातील. त्यामुळे वर्गातील उपस्थिती विद्यार्थ्यांना बंधनकारक असणार आहे. दुसरीकडे या निर्णयावर चोहो बाजूने टीका होत आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚡
🚆 कल्पना सुचवा आणि मिळवा 10 लाख

LetsUp I Updates

रेल्वेच्या विकासासाठी तुम्हाला हटके आणि वेगळी कल्पना सुचवायची आहे. याद्वारे तुम्ही घरी बसून 10 लाखापर्यंत कमवू शकता. इन्कम वाढविण्यासाठी रेल्वेने प्रयत्न सुरु केले असून यासाठी 'How to Raise Money For Railways To Provide Better Services' अशी एक योजना सुरु केली असून यासाठी हि स्पर्धा आयोजित केली आहे.

या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्याला 5 लाख रुपये आणि तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या 3 लाख रुपये मिळणार आहेत. याशिवाय चौथा क्रमांक पटकावणाऱ्याला 1 लाख रुपये मिळणार आहेत.

तुम्ही सुचवलेली कल्पना हि एक हजाराहून अधिक शब्दांची असता कामा नये. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 19 मे शेवटची तारीख असून तुम्ही तुमची आयडिया इंग्रजी अथवा हिंदी भाषेत देऊ शकता. या स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल तर https://innovate.mygov.in वर जाऊन रजिस्ट्रेशन करा.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚡
🎒 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय मागे

Letsup I Update

परीक्षा झाल्यावरही 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरु ठेवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याबाबत घोषणा केली असून आपण अधिकाऱ्यांना बोलावून सूचना देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याआधी शिक्षण विभागाने मार्चमध्ये परीक्षा झाल्यावरही 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆