LetsUpp Marathi
4.85K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
🏅 राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान

LetsUp I Updates

देशातला सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून ओळखला जाणारा पद्म पुरस्कार प्रदान सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडला. कला, साहित्य, शिक्षा, क्रीडा, संशोधन, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, लोककला, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावर्षी 84 जणांना पद्म पुरस्कार घोषित झाले असून त्यातील 43 मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून समाजसेवक डॉ.अभय आणि राणी बंग, साहित्यिक गंगाधर पानतावणे, अरविंद गुप्ता, जेष्ठ अभिनेते मनोज जोशी, उद्योजक रामेश्वरलाल काबरा, मुरलीकांत, शिशिर मिश्रा यांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

💥
📞 भारतातील कॉल सेंटरमधील नोकऱ्या धोक्यात?

LetsUp I Updates

कॉल सेंटर्सच्या कर्मचाऱ्यांना आपण कोणत्या देशातून बोलत आहोत हे सांगणे बंधनकारक करणारे विधेयक अमेरिकी काँग्रेसमध्ये मांडण्यात आले. या विधेयकामुळे कॉल सेंटर्समधील रोजगार सुरक्षित होतील, असा दावा करण्यात आला असला तरी भारतासारख्या देशांतील कॉल सेंटर्सवर यामुळे गदा येण्याची शक्यता आहे. कारण जगभरातील अनेक देशात अमेरिकेची कॉलसेंटर्स आहेत. यामध्ये प्रामुख्याने भारतात अमेरिकेची सर्वात जास्त कॉलसेंटर्स आहेत.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚡
💥 दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

ब्रेकिंग

पुण्यात अटक केलेल्या पाच संशयित बांगलादेशींनी मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचल्याचे उघड झाले आहे. एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सारउल बांगला टीम म्हणजेच 'एबीटी' या संघटनेने महाराष्ट्रात तीन शहरात जाळे पसरवले होते. ही संघटना अल कायदाशी संलग्न असून कोलकाता, मुंबई आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याचा त्यांचा कट होता. मात्र एटीएसने पाच जणांना अटक करून कट उधळून लावला आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚡
📣 देशातल्या भिकाऱ्यांची यादी जाहीर

Letsup I Update

संपूर्ण देशात 4 लाख 13 हजार 760 भिकारी असल्याची धक्कादायक माहिती सामाजिक न्याय विभागाच्या अहवालातून समोर आली आहे. सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना हा अहवाल सादर केला.

देशात भिकाऱ्यांची सर्वाधिक संख्या पश्चिम बंगालमध्ये (81 हजार 244) आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश (65 हजार 835) असून तिसऱ्या क्रमांकावर बिहार (29 हजार 723) तर महाराष्ट्रात एकूण 24 हजार 307 भिकारी आहेत.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
💫 माहिती अधिकार अर्ज; मोजावे लागणार 50 रुपये

Letsup I Update

माहिती अधिकाराखाली अर्ज करायचा असेल तर आता जास्तीत-जास्त 50 रुपये शुल्क लागेल. तसेच प्रति पान 5 रुपये कागदपत्रांच्या फोटोकॉपीसाठी आकारले जातील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

उच्च न्यायालय, विधानसभा, विधानपरिषद, तसेच इतर सरकारी आणि आरटीआय कायद्यांतर्गत येणाऱ्या सर्व स्वायत्त संस्थांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश लागू असणार आहे. हा आदेश न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल आणि न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांच्या खंडपीठाने दिला आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
📌 #DeleteFacebook हा हॅशटॅग का होतोय ट्रेंड?

Letsup I Update

सध्या सोशल मीडियावर #DeleteFacebook हा हॅशटॅग ट्रेंड होत असून फेसबुक डिलीट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अॅप सारख्या फेसबुकशी निगडीत अन्य सेवाही डिलीट करण्यासाठी ट्विटरवर जोरदार मोहिम सुरू आहे.

अमेरिका आणि कॅनडात 1 कोटी फेसबुक युजर्सने आपले फेसबुक अकाऊंट डिलीट केले आहे. तर दुसरीकडे व्हॉट्सअॅपचे सहसंस्थापक ब्रायन अॅक्टन यांनी ट्विटरच्या माध्यमातून फेसबुक डिलीट करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी फेसबुक डिलीट करण्यास का सांगितले आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही.

👉 नेमकं प्रकरण काय?

हे संपूर्ण प्रकरण केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीशी निगडीत आहे. 2016 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांत फेसबुक युजर्सचा डेटा, त्यांच्या लाइक्स आदी माहितीचा वापर निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी करण्यात आल्याचे समोर आले.

केंब्रिज अॅनालिटिकाने ‘फेसबुक’वरील लक्षावधी नागरिकांचा तपशील त्यांच्या परवानगीशिवाय वापरला असा आरोप आहे. जवळपास पाच कोटी युजर्सची वैयक्तिक माहिती लीक झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणानंतर फेसबुकच्या गोपनीयतेवरच प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. म्हणूनच फेसबुकविरुद्ध #DeleteFacebook ही मोहीम जोर धरत आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
LetsUp News Updates

● नवी दिल्ली - येत्या काही दिवसांमध्ये वीज कंपन्या त्यांचे दर (93 पैसे प्रती युनिट) वाढवू शकतात, सूत्रांनी दिली माहिती

● नवी दिल्ली - अर्थसंकल्पात घोषित मोदीकेअर योजनेला मंजुरी; आयुष्यमान भारत नावाने योजना राबवणार

● नवी दिल्ली - 5 कोटी फेसबुक सदस्यांचा डेटा चोरून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा आरोप असणाऱ्या एका कंपनीवरून आता भारतीय राजकारणात खडाजंगी सुरू

● नवी दिल्ली - ई पलानीसामी आणि ओ. पनीरसेल्वम, टीटीव्ही दिनाकरन यांच्या पक्षाच्या निवडणूक चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात पुढच्या आठवड्यात होणार सुनावणी

● जम्मू-काश्मीर - कुपवाडातील हलमतपोरा येथे दहशतवाद्यांशी सुरू असलेल्या चकमकीत दोन पोलीस शहीद

● उत्तर प्रदेश - राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता; सुधांशू त्रिवेदी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता

● पणजी - सागरमाला योजनेत लवकरच 11 नद्यांना जोडण्यासह 60 नवी बंदरे निर्माण केली जातील : नितीन गडकरी

● मुंबई - आमदारकीचे आमिष; भाजप नेत्याला 10 कोटींचा गंडा घालण्याचा प्रयत्न, याप्रकरणी एका महिलेला ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली अटक

● युट्युबने आपल्या डेस्कटॉप युजर्ससाठी पीआयपी अर्थात पीक्चर इन पिक्चर मोड हे विशेष फिचर देण्याचे दिले संकेत

● नवी दिल्ली - बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला क्लीन चिट : सूत्र

● आता चीनमध्ये 'बाहुबली 2 : द कन्क्लुजन' हा चित्रपट प्रदर्शित होणार, चीनने या चित्रपटाला सेन्सॉर केले असले तरी प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⚡ आमच्याकडून चूक झाली : मार्क झुकरबर्ग

Letsup I Update

केंब्रिज अॅनालिटिकाच्या डेटा लीक प्रकरणावर फेसबुकने पहिल्यांदाच अधिकृत भाष्य केले आहे. फेसबुकचे सह-संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या हातून चूक घडली, अशी कबुली दिली आहे. फेसबुकच्या अंदाजे पाच कोटी युजर्सच्या खासगी माहितीचा गैरवापर करून केंब्रिज अॅनालेटिकाने 2016च्या निवडणुकीवर प्रभाव टाकला, असा आरोप ठेवण्यात आला आहे.

याप्रकरणी झुकरबर्ग यांनी पहिल्यांदाच मौन सोडले व ते म्हणाले, फेसबुकवर असे अनेक अॅप्स आहेत ज्याद्वारे युजर्सची माहिती त्या अॅप बनवणाऱ्यांना मिळते. अशा अॅप्सला चाप बसवण्यासाठी कठोर पावले उचलू. तुमच्या डेटाच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे. जर आम्ही त्याचं संरक्षण करू शकलो नाही तर तुम्हाला सेवा देण्यास आम्ही पात्र नाही, असं समजू. मी फेसबुकची स्थापना केली, म्हणून या प्लॅटफॉर्मवर जे काही होईल, त्यासाठी मी जबाबदार आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
🌾 कृषिपंपांच्या वीजबिल वसुलीला स्थगिती

Letsup I Update

राज्यातील कृषिपंपांच्या वीजबिल वसुलीला स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

कृषिपंपांचे वीजबिल माफ करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. विरोधकांनीही याप्रश्नाकडे राज्यसरकारचे वेळोवेळी लक्ष वेधले होते. यापार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पुढाकार घेऊन अखेर कृषिपंपांच्या वीजबिल वसुलीला स्थगिती दिली.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
LetsUp I News Updates

● नवी दिल्ली - रामलीला मैदानावर विविध मागण्यासाठी अण्णा हजारेंचे आजपासून सत्याग्रह आंदोलन

● नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा भागात चकमकीत 2 भारतीय जवान आणि 3 पोलीस शहीद

● नवी दिल्ली - चेन्नईस्थित ‘कनिष्क गोल्ड’चा 14 बँकाना 824 कोटींचा चुना, सीबीआयकडून गुन्हा दाखल

● नवी दिल्ली - भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांतील मिळून 52 हजार पदे रिक्त, 21 हजार पदे वरिष्ठ अधिकाऱ्यांची

● मुंबई - ओला, उबर टॅक्सी चालकांचा संप तीन दिवसांनी मागे, लेखी आश्वासनानंतर निर्णय

● मुंबई - 'सत्यमेव जयते' वॉटर कप स्पर्धेची घोषणा, 24 जिल्ह्यातील 5900 गावं सहभागी होणार

● मुंबई - राज्य सरकारने कृषीपंप वीजबिल वसुलीला स्थगिती दिली तर बोंडअळीग्रस्तांसाठी तीन हजार कोटींची मदत

● मुंबई - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव, एकनाथ खडसे यांनी केली होती मागणी

● मुंबई - उर्मिला मातोंडकरचे 10 वर्षांनी पुनरागमन, 'ब्लॅकमेल' चित्रपटात आयटम सॉंग करणार

● नवी दिल्ली - बीसीसीआयकडून मोहम्मद शमीला क्लिन चीट; तीन कोटींच्या करारात समावेश

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
📣 आजपासून अण्णांचे रामलीलावर आंदोलन

Letsup I Update

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजपासून दिल्लीतील रामलीला मैदानात शहीद दिनाचे औचित्य साधून आंदोलन करणार आहेत. जनलोकपालची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना हमीभाव, निवडणूक सुधारणा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन असणार आहे. दरम्यान, अण्णांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी सरकारकडून मध्यरात्रीपर्यंत वाटाघाटी सुरु होत्या.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
💐 शहीद दिन; जरा याद करो कुरबानी

Letsup I Update

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जिवाची बाजी लावणारे स्वातंत्र्य सैनिक भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी ब्रिटीश सरकारने फाशीची शिक्षा दिली होती. त्यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस 'शहीद दिवस' म्हणून साजरा केला जातो.

सायमन कमिशनचा विरोध करणारे लाला लजपत राय यांचा इंग्रजांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये मृत्यू झाला. यामुळे चंद्रशेखर आझाद, भगतसिंह, राजगुरू, सुखदेव आणि अन्य क्रांतिकारकांनी लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्याचा निर्णय घेतला. शेवटी त्यांनी 17 डिसेंबर 1928 रोजी ब्रिटिश अधिकारी साँडर्सला गोळ्या घालून ठार केले.

या प्रकरणी इंग्रजांनी भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना अटक करून फाशीची शिक्षा सुनावली. 23 मार्च 1931 रोजी संध्याकाळी 7 वाजून 33 मिनिटांनी तिघांना फाशी देण्यात आली. फाशीच्या वेळी तिघांनी 'मेरा रंग दे बसंती चोला, माय रंग दे; मेरा रंग दे बसंती चोला।' हे गाणे गायले होते.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚡
📚 खुशखबर; महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निघाली भरती

Letsup I Job Update

पोस्ट : कर सहायक गट-क - जागा : 478

पोस्ट : लिपिक टंकलेखक (मराठी) गट क - जागा : 316

पोस्ट : दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट-क - जागा : 33

पोस्ट : लिपिक टंकलेखक (इंग्रजी) गट क - जागा : 35

फी : 374 रुपये

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 11 एप्रिल 2018

अधिक माहितीसाठी : https://goo.gl/5sazHa

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/TDi541

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚡
💥 आक्षेपार्ह ट्वीट; हार्दिक पंड्याचे स्पष्टीकरण

Letsup I Update

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केल्याच्या आरोपांनंतर टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने स्पष्टीकरण दिले आहे. हार्दिकने याबाबत पत्रक प्रसिद्ध करुन सगळे आरोप फेटाळले आहेत.

‘मी अशा प्रकारचे कोणतेही ट्विट किंवा वक्तव्य ट्विटर किंवा कोणत्याही अन्य ठिकाणी केलेले नाही. माझं नाव आणि फोटो वापरत बोगस अकाऊंटवरुन हे ट्विट करण्यात आले आहे. मी संपर्क साधण्यासाठी फक्त माझ्या अधिकृत ट्विटर अकाऊंटचा वापर करतो. आणि ज्या ट्विटवरुन गदारोळ सुरु आहे ते मी असल्याचे भासवत बोगस अकाऊंटवरुन करण्यात आले आहे’, असे हार्दिक पंड्याने स्पष्ट केले आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
⚡ आपच्या 20 आमदारांना दिलासा!

Letsup I Update

दिल्ली उच्च न्यायालयाने आम आदमी पार्टीला मोठा दिलासा दिला असून न्यायालयाने आपच्या 20 आमदारांना पुन्हा आमदारकी बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने 19 जानेवारीला लाभाचे पद बाळलगल्या प्रकरणी आपच्या 20 आमदारांना अपात्र ठरवण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली होती.

दोनच दिवसात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही शिफारस मंजूर केली होती. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात आम आदमी पार्टीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने या आमदारांना पात्र ठरवतानाच पुन्हा हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे पाठवले आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
💧 बाटलीबंद पाण्याच्या MRP बाबतचा निर्णय कायम!

Letsup I Update

हॉटेल आणि रेस्टॉरंट पाण्याची बॉटल एमआरपीपेक्षा जास्त दराने विकू शकतात, हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये एमआरपीपेक्षा जास्त दराने पाण्याच्या बॉटलच्या विक्रीवर सरकारने बंदी घातली होती. मात्र मागील वर्षी डिसेंबरमध्ये सुप्रीम कोर्टाने हा निर्णय बदलला.

हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना बसण्यासाठी जागा दिली जाते, यासाठी मालकाने खर्च केलेला असतो. त्यामुळे त्यांनी एमआरपीपेक्षा जास्त दराने पाण्याच्या बॉटलची विक्री केली तर आम्ही ते रोखू शकत नाही, असे न्यायालयाने निकालात म्हटले होते.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
LetsUp I News Updates

● नवी दिल्ली - गेल्या 6 वर्षात लष्कराच्या 700 जवानांनी आत्महत्या केल्याची गृह विभागाची संसदेत माहिती

● नवी दिल्ली - अण्णांच्या आंदोलनासाठी येणार्‍या नागरिकांच्या बस, रेल्‍वे सरकारने रोखल्या, अण्णा हजारे यांचा आरोप

● नवी दिल्ली - यूपीमध्ये योगींनी मारली बाजी, राज्यसभेच्या नऊ जागा जिंकून आपले वर्चस्व कायम राखले

● नवी दिल्ली - भारतात 2022 पर्यंत रोज 775.5 टन वैद्यकीय कचरा निर्माण होण्याची भीती असल्याचा इशारा

● मुंबई - राज्यात मुलींचा जन्मदर घटला, हजार मुलांमागे मुलींचा दर 904 एवढा असल्याचा अहवाल

● पुणे - पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता

● मुंबई - मंत्रालयासमोर 56 वर्षीय गुलाब मारूती शिंगारी यांचा अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

● मुंबई - हरिभाऊ बागडेंवरील विश्वास ठराव आवाजी मतदानाने पारीत, पक्षपातीपणाचा विरोधकांचा आरोप

● मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांची व्‍यावसायिकाविरोधात विनयभंगाची तक्रार, व्यावसायिकाला अटक

● मुंबई - क्रिकेट वर्ल्डकप पात्रता फेरी, वेस्ट इंडिजने स्कॉटलंड तर अफगाणिस्तानने आयर्लंडला हरवले

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⚡ राज्यसभा निवडणुकीत 'भाजप'ची मुसंडी

Letsup I Update

राज्यसभेच्या 59 जागांसाठीची रणधुमाळी अखेर काल संपली. यापैकी 10 राज्यांतील 33 उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित सात राज्यांतील 26 जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले आणि रात्री उशिरा मतमोजणीचा निकाल जाहीर झाला. मतदान झालेल्या 26 पैकी 12 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर एकूण 59 जागापैकी भाजपने सर्वाधिक 28 जागा जिंकल्या आहेत.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

💥
💥 लालूंना 7 वर्षांची शिक्षा, 30 लाखांचा दंड

ब्रेकिंग

चारा घोटाळ्यातील चौथ्या प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर 30 लाख रूपयांचा दंडही ठोठावला आहे. चारा घोटाळ्यात लालूंना आधीच साडेतेरा वर्षांची शिक्षा झाली असून ते सध्या रांची येथील बिरसा मुंडा तुरुंगात आहेत.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚡
📣 फेसबुकचे लॉग इन डिटेल्स विकले जातात 340 रुपयांत

Letsup I Update

फेसबुकवरील लॉग इनचे डिटेल्स केवळ 340 रुपयांना विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फेसबुकवर एखाद्या फोटोशी तुलना करण्यासाठी, स्वभावाविषयी जाणून घेऊन ते पोस्ट करण्यासाठी आपण ज्या अ‍ॅपमध्ये लॉग इन करतो, अशा अ‍ॅपच्या माध्यमातून ही डेटाचोरी होत आहे. ब्रिटनमधील रिसर्च कंपनी केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका या कंपनीने डेटाचोरी केल्याचे प्रकरण समोर आणले आहे.

टेस्ला, स्पेस एक्स पेज डिलीट!

केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणानंतर अमेरिकन उद्योग सम्राट इलॉन मस्क यांनी त्यांच्या ‘स्पेस एक्स’ आणि इलेक्ट्रीक कार तयार करण्याऱ्या ‘टेस्ला’ या कंपन्याचे फेसबुकवरील पेज बंद केले आहेत.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

💥
🛰 चांद्रयान-2चे प्रक्षेपण ऑक्टोबरमध्ये

Letsup I Update

तज्ज्ञांनी काही गोष्टींचे परीक्षण करण्याचा सल्ला दिल्यामुळे चांद्रयान-2चे प्रक्षेपण ऑक्टोबर महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो)चे अध्यक्ष के. शिवन यांनी दिली.

भारताचा चंद्रयान-2 हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून यासाठी 800 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. चांद्रयान-2 हे पूर्णपणे भारतात विकसित करण्यात आलेले मिशन आहे. या अवकाश यानाचे वजन 3 हजार 290 किलो असून हे यान चंद्राच्या चार बाजूंना फिरून माहिती गोळा करण्याचे काम करेल.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆