LetsUpp Marathi
4.85K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
📣 बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बहिष्कार टाकल्यामुळे बारावीच्या विविध विषयांच्या तब्बल 80 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. यामुळे राज्यातील बारावीच्या परीक्षांचा निकाल लांबण्याची शक्यता आहे.

शिक्षक महासंघ आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यात झालेल्या बैठकीत काही निर्णयांवर शासन आदेश काढण्यात आले. मात्र शिक्षक संघटनांनी महत्वाच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
⚡ Election Results – 2018

त्रिपुरा (60 जागांपैकी 59 जागांचे निकाल) :

👉 सीपीएम + : 18 I भाजप : 41 I काँग्रेस : 0 I अन्य : 0

नागालँड (60 जागा) :

👉 भाजप+ : 25 I NPF : 29 I काँग्रेस : 2 I अन्य : 4

मेघालय (60 जागा) :

👉 काँग्रेस : 18 I NPP : 19 I अन्य : 19 I भाजप - 3

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
🇺🇸 अमेरिका लावणार पोलादावर आयात शुल्क!

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पोलाद आणि अ‍ॅल्युमिनियमवर आयात शुल्क लावण्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोर अमेरिका व्याज दरात वाढही करणार आहे.

या कारणामुळे अमेरिकेसह जागतिक शेअरबाजारात गेल्या दोन दिवसांपासून घसरण सुरू आहे. तसेच जागतिक पातळीवर व्यापारयुद्ध सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
⚡ मोदी, चोक्सीविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट

PNB घोटाळा करणारा हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याविरोधात विशेष PMLA न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. तसेच या दोघांची संपत्ती जप्त करण्याचा विचार युद्धपातळीवर सुरू आहे. याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून ईडीने या दोघांचे नियंत्रण असलेल्या 41 स्थावर मालमत्तांवर टाच आणली आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
LetsUp I News Updates

🔅 नवी दिल्ली - देशातील 68 टक्के जनतेवर एनडीएचे राज्य, तर यूपीएचे केवळ 8 टक्के जनतेवर राज्य

🔅 नवी दिल्ली - एप्रिल 2013 ते जून 2016 दरम्यान बँक कर्मचार्‍यांचा सहभाग असलेले 2450 कोटी रुपयांचे घोटाळे उघडकीस

🔅 नवी दिल्ली - व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष त्रान दाई कुआंग हे तीन दिवस भारत दौर्‍यावर, आण्विक ऊर्जा सह तीन करारांवर स्वाक्षरी

🔅 नवी दिल्ली - दिल्ली दूर आहे असा ईशान्येकडील जनतेचा समज होता पण दिल्ली स्वत: चालत ईशान्येच्या दरवाज्यापर्यंत गेली - पंतप्रधान

🔅 नवी दिल्ली - देशातल्या 10 सर्वाधिक तापलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्राची पाच शहरे, अकोला आणि चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत सर्वाधिक तापमान

🔅 बीड - केज तालुक्यात बारावी गणित पेपरच्या 1199 उत्तरपत्रिका जळून खाक, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

🔅 मुंबई - एक एप्रिलपासून बेस्ट प्रवास महागणार, सहा किमीपासून पुढील अंतरासाठी 1 ते 12 रुपयांपर्यंत भाडेवाढ

🔅 मुंबई - अनुष्‍का शर्माचा हॉरर चित्रपट 'परी'ला पाकिस्‍तानात विरोध, काही दृश्‍यांवर पाक सेन्‍सॉर बोर्डाचा आक्षेप

🔅 मुंबई - पहिल्यावहिल्या सांघिक स्नूकर वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानला 3-2 ने नमवून विजेतेपद पटकावले

(आता ब्रेकिंग न्यूज सोबत मिळवा माहिती आणि मनोरंजन तुमच्या WhatsApp वर त्यासाठी जॉईन करा LetsUp - डिजिटल मॅगेझीन, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/KGP2Ly )

जाहिरातीसाठी संपर्क : 7875190190
🌧 वातावरण ढगाळ; पावसाची शक्यता?

LetsUp I Updates

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने आगामी काळात राज्यातील तापमानात बदल होणार असून कोकणातील काही भागात ढगाळ वातावरण निर्माण होईल. तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही भागात पावसाची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

For Breaking News, Jobs & Infotainment on WhatsApp Join LetsUp. To Join Click 👉 https://goo.gl/2xMUCR

💥
✌ भाजपाच्या त्रिपुरातील यशात 'मराठमोळा' हाथ

LetsUp I Updates

25 वर्षांपासूनची डाव्यांची सत्ता उलथवून टाकून त्रिपुरा हे ईशान्य भारतातील महत्वाचे राज्य भाजपाने काबीज केले आहे. या विजयाचे शिल्पकार आहेत त्रिपुराचे भाजपचे प्रभारी 'मराठमोळे' सुनील देवधर. त्रिपुरामध्ये त्यांनी गेल्या 3 वर्षांपासून निवडणुकीची तयारी चालवली होती. गावागावात जाऊन त्यांनी भाजपचा प्रचार केला होता. त्यांच्याविषयी काही गोष्टी जाणून घेऊयात...

👉 सुनील देवधर मूळचे रत्नागिरीतील गुहागरचे रहिवासी आहेत.

👉 त्यांचा जन्म पुण्यात झाला तर मुंबईत शिक्षण पूर्ण झालं.

👉 52 वर्षांचे देवधर अविवाहित आहेत.

👉 लहानपणापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते राहिले आहेत.

👉 1991 साली देवधर संघाचे पूर्णवेळ प्रचारक झाले.

👉 1991 पासून 8 वर्षं त्यांनी मेघालयात काम केले.

👉 'माय होम इंडिया' या स्वयंसेवी संस्थेची त्यांनी स्थापना केली.

For Breaking News, Jobs & Infotainment on WhatsApp Join LetsUp. To Join Click 👉 https://goo.gl/Lwmhxd

⚡
💥 फेसबुकचे नवीन फिचर; स्टेटस अपडेट होणार सोप्पे

LetsUp I Updates

फेसबुक सध्या भारतात 'अॅड व्हॉइस क्‍लिप' या नवीन फीचरची चाचणी घेत आहे. या नवीन फीचरमुळे युजरला छोटी ऑडिओ क्‍लिप रेकॉर्ड करण्याची सुविधा मिळणार असून हे फीचर स्टेट्स अपडेटच्या मॅसेज कम्पोझिंग मेन्यूमध्ये दिसणार आहे. जगभरात टायपिंगमध्ये येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन फेसबुकने या नवीन स्टेटस फीचरची निर्मिती केली आहे.

आता ब्रेकिंग न्यूज तुमच्या 'व्हॉट्सअॅप'वर, त्यासाठी जॉइन करा लेट्सअप. क्लिक करा 👉 https://goo.gl/VyhZYE

⚡
📥 फोटो डिलीट झालेत? मग नक्की वाचा...!

LetsUp I Updates

अनेकदा नकळत महत्वाचे फोटो डिलीट होत असतात. अशावेळी आपण परेशान होऊन जातो मात्र आता चिंता करू नका. कारण आम्ही आज अशा काही अॅप्सची नावे सांगणार आहोत, ज्याच्या माध्यमातून डिलीट झालेले फोटो, व्हिडिओ तुम्ही पुन्हा मिळवू शकता.

👉 DiskDigger Photo Recovery

हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करू शकता. या अॅपच्या माध्यमातून तुम्हाला डिलीट झालेले सर्व फोटो पुन्हा मिळवता येऊ शकतात.

👉 Restore Image (Super Easy)

हे अॅप तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरुन मोफत डाऊनलोड करु शकता. याचे सर्व फीचर्स फ्री असून या अॅपच्या मदतीने तुम्ही डिलीट फोटो लगेच रिकव्हर करू शकता.

👉 Dumpster: Undelete & Restore Pictures and Videos

हे एक जबरदस्त अॅप असून याच्या माध्यमातून तुम्ही फोटो आणि व्हिडिओ दोन्ही रिकव्हर करु शकता. या अॅपच्या माध्यमातून अगदी कमी वेळात रिकव्हरीचे काम होऊन होते.

आता ब्रेकिंग न्यूज तुमच्या 'व्हॉट्सअॅप'वर, त्यासाठी जॉइन करा लेट्सअप. क्लिक करा 👉 https://goo.gl/Uvn6Zr

⚡
LetsUp I News Updates

🔅 आगरतळा - दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील लेनिनचा पुतळा भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुलडोझरच्या मदतीने तोडला

🔅 नवी दिल्ली - काश्मीरमधील सुंजवा लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड मुफ्ती वकासचा खात्मा

🔅 नवी दिल्ली - आयोध्या प्रश्‍नावर तोडगा निघाला नाही, तर भारताचा सीरिया होईल - आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर

🔅 नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील 21 पैकी 11 बँकांवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध, आणखी पाच बँकांवर निर्बंध येण्याची शक्यता

🔅 पणजी - मनोहर पर्रिकरांकडून घरातून फाईल्स क्लिअर, उपचारांसाठी अमेरिकेला जाण्याची शक्यता

🔅 मुंबई - शेतकरी कर्जमाफीसाठी ऑनलाईन फॉर्म भरता न आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा, 31 मार्चपर्यंत फॉर्म भरता येणार

🔅 मुंबई - राज्याचा पारा आणखी वाढणार, पुढील दोन ते तीन दिवस शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन

🔅 मुंबई - माजी वनमंत्री पतंगराव कदम यांना लीलावती रुग्णालयातील आयसीयू विभागात हलवले

🔅 श्रीलंका - टी-20 तिरंगी मालिकेला आजपासून सुरुवात, सलामीची लढत भारत आणि श्रीलंकेदरम्यान रंगणार

(आता ब्रेकिंग न्यूज सोबत मिळवा माहिती आणि मनोरंजन तुमच्या WhatsApp वर त्यासाठी जॉईन करा LetsUp - डिजिटल मॅगेझीन, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/KGP2Ly )

जाहिरातीसाठी संपर्क : 7875190190
👉 ...तर भारताचा सीरिया होईल - श्री श्री रविशंकर

LetsUp I Updates

आयोध्या प्रश्‍नावर तोडगा निघाला नाही, तर भारताचा सीरिया होईल, असे खळबळजनक विधान आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आता ब्रेकिंग न्यूज तुमच्या 'व्हॉट्सअॅप'वर, त्यासाठी जॉइन करा लेट्सअप. क्लिक करा 👉 https://goo.gl/4jc4Ko

⚡
🚫 पाडव्यापासून राज्यात प्लॅस्टिकबंदी!

LetsUp I Updates

राज्यात येत्या गुढीपाडव्यापासून संपूर्ण प्लॅस्टिक तसेच थर्मोकोल व त्यापासून बनविण्यात येणाऱ्या वस्तूंवर बंदी घालण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील प्रारुप अधिसूचनेचा आराखडा तयार करण्यात आला असून तो शासनाच्या राजपत्रात लवकरच प्रसिद्ध केला जाईल, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली.

आता ब्रेकिंग न्यूज तुमच्या 'व्हॉट्सअॅप'वर, त्यासाठी जॉइन करा लेट्सअप. क्लिक करा 👉 https://goo.gl/k4uWHP

⚡
LetsUp I News Updates

🔸 नवी दिल्ली - युनिसेफने केलेल्या सर्वेक्षणातून बालविवाहांवर प्रतिबंध घालण्यात दक्षिण आशियात भारत आघाडीवर

🔸 नवी दिल्ली - आधार जोडणीची 31 मार्चपर्यंतच्या मुदतीत वाढ करण्याचे केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात संकेत

👌 'फ्लिपकार्ट'वर जबरदस्त ऑफर्स सुरु. ऑफर्स चा फायदा घेण्यासाठी क्लिक करा 👉 http://fkrt.it/PmgXZLuuuN

🔸 नवी दिल्ली - नागालँडच्या मुख्यमंत्रीपदावर नेफ्यू रियो, मेघालयच्या कोनराड संगमा तर त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदावर विप्लवकुमार देव

🔸 मॉस्को - रशियाच्या लष्कराचे मालवाहू विमान सिरियात कोसळून झालेल्या दुर्घटनेत 32 जण ठार झाले

🔸 मुंबई - सॅमसंगने गॅलक्सी S9 आणि S9 प्लस हे दोन स्मार्टफोन भारतात लाँच केले, किंमत 57,900 रुपयांपासून सुरु

🔸 मुंबई - जीएसटी कायदा बनल्यानंतर देशात पहिल्यांदाच या कायद्यान्वये दोघा व्यावसायिकांना अटक

🔸 मुंबई - यापुढे कोणत्याच महापालिकेला कचरा डेपोसाठी जमीन देणार नाही, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

🔸 मुंबई - वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी गृहविभागाने राज्यातील 132 पोलीस ठाण्यांमध्ये परवानगी दिली

🔸 कोलंबो - निदाहस करंडक टी-20 तिरंगी मालिकेच्या सलामीच्या लढतीत यजमान श्रीलंकेकडून भारताचा पराभव

(आता ब्रेकिंग न्यूज सोबत मिळवा माहिती आणि मनोरंजन तुमच्या WhatsApp वर त्यासाठी जॉईन करा LetsUp - डिजिटल मॅगेझीन, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/KGP2Ly )

जाहिरातीसाठी संपर्क : 7875190190
🎯 Letsup I General Knowledge

1) कोणता देश 2017 साली अमेरिकेच्या सरकारी रोख्यांचा 12 वा सर्वात मोठा परकीय धारक आहे?

उत्तर : भारत

2) कोणता देश 2019 साली लोंगमार्च 5B अग्निबाण अंतराळात पाठविणार आहे?

उत्तर : चीन

3) कोणत्या ठिकाणच्या कॉफीला लवकरच भौगिलिक संकेतांक (GI) टॅग मिळणार आहे?

उत्तर : अराकू व्हॅली

4) कोणता युद्धसराव अलीकडेच भारतीय नौदलाकडून आयोजित करण्यात आला?

उत्तर : एनकोअर

आता ब्रेकिंग न्यूज तुमच्या 'व्हॉट्सअॅप'वर, त्यासाठी जॉइन करा लेट्सअप अणि मिळवा संधी iPhone जिंकण्याची, त्यासाठी क्लिक करा https://goo.gl/25Fp22

⚡
🛰 चीनचे अंतराळ स्थानक पृथ्वीवर कोसळणार

Aerospace Corporationने दिलेल्या माहितीनुसार चीनचे पहिले अंतराळ स्थानक (स्पेस स्टेशन) Tiangong-1 पृथ्वीवर कोसळणार आहे. 24 मार्च ते 19 एप्रिल दरम्यान ते पृथ्वीच्या नेमक्या कोणत्या भागात कोसळणार याबद्दल अंदाज आता वर्तवता येणार नसल्याचे सांगितले जात आहे.

या अंतराळ स्थानकात धोकादायक अशी रसायने देखील आहे. ही रसायने पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी धोकादायक आहेत. एका अंदाजानुसार हे स्थानक चीन, मध्यपूर्व आशिया, इटली, स्पेनचा उत्तरेकडील भाग, अमेरिकेच्या उत्तरेकडील राज्ये, न्यूझीलंड, टास्मानिया किंवा दक्षिण आफ्रिका येथे कोसळू शकते.

आता ब्रेकिंग न्यूज तुमच्या 'व्हॉट्सअॅप'वर, त्यासाठी जॉइन करा लेट्सअप अणि मिळवा संधी iPhone जिंकण्याची, त्यासाठी क्लिक करा https://goo.gl/SMVh61

⚡
💥 इच्छामरणाला सशर्त परवानगी!

ब्रेकिंग

सुप्रीम कोर्टाने इच्छा मरणाला सशर्त परवानगी दिली आहे. सन्मानाने जगणे जसा मूलभूत अधिकार आहे, तसाच अधिकार मृत्यूबाबतही आहे, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. या अधिकाराचा गैरवापर होऊ नये यासाठी कोर्टाने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने हा निर्णय दिला आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚡
⚡ बिल्पब देव त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री

Letsup I Update

त्रिपुरामध्ये आज तब्बल 25 वर्षानंतर भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. भाजपचे बिल्पब देव यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री म्हणून जिष्णू देव शर्मा यांच्यासह भाजपच्या अन्य नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली.

राज्यपाल तथागत रॉय यांनी मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांना गोपनियतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
💰 महाराष्ट्राचा संपूर्ण अर्थसंकल्प (भाग : 1)

Letsup I Budget Special

महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज 2018-19 चा राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला. यंदाचा त्यांचा हा चौथा अर्थसंकल्प आहे. यात शेतकरी वर्गाची वाढती नाराजी लक्षात घेता, शेती, सिंचन आणि शेतीपूरक व्यवसायासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. मात्र सातव्या वेतन आयोग आत्ताच लागू होणार नसल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. अर्थसंकल्पावर एक नजर टाकुयात...

▫ राज्यात 5 लाख 32 हजार नवे करदाते

▫ जीएसटी अंतर्गत 45 हजार कोटी रक्कम प्राप्त झाली

▫ मुंबई महापालिकेसह इतर पालिकांना 11 हजार कोटी रक्कम दिली गेली

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👉 स्मारकासाठी तरतूद खालीलप्रमाणे :

▫ अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी 300 कोटींची तरतूद

▫ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी 150 कोटींची तरतूद

▫ लहुजी वस्ताद यांचे पुणे येथे स्मारक उभे करणार

▫ अहिल्याबाई होळकर यांच्या सन्मानार्थ- सामाजिक सभागृह बांधली जातील - 30 कोटींची तरतूद

👉 शिक्षणासाठी तरतूद खालीलप्रमाणे :

▫ स्कील इंडिया - कुशल महाराष्ट्र योजना : राज्यातील 15 ते 25 वयोगटातील मुलांसाठी कौशल्य प्रदानाचा कार्यक्रम राबवला जातोय

▫ स्टार्टअप उदोयगांना प्रोत्साहन देण्यासाठी नविन कार्यक्रम

▫ परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्यांसाठी - परदेश रोजगार कौशल्य विकास केंद्र सुरु होतंय

▫ महाराष्ट्रात 6 कौशल्य विद्यापीठांची स्थापना होणार

▫ जिल्हास्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र - 50 कोटी

▫ मानव विकास मिशनसाठी 350 कोटी

▫ आकांक्षित जिल्ह्यांना 121 कोटी

▫ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 100 शाळा उभारणार, त्यासाठी नवीन मंडळ स्थापन होणार - 36 लाख रुपयांची तरतूद

▫ विद्यार्थ्यांचे विद्यावेतन 4000 रुपयांपर्यंत वाढवले

▫ राजर्षी शाहू महाराज शिक्षणशुल्क योजना - मर्यादा 6 लाखावरुन 8 लाखापर्यंत वाढवले (605 कोटी रू. निधी)

▫ अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी 400 कोटींची तरतूद

▫ महापुरुषांचे साहित्य सलग उपलब्ध व्हावे यासाठी वेबसाईटची निर्मिती - 4 कोटींची तरतूद

▫ महानुभाव पंथाचे आद्यप्रवर्तक चक्रधर स्वामी यांच्या नावे अध्यासन केंद्र

▫ अमरावती येथील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या प्रशासकीय इमारतीच्या व वसतीगृहाच्या बांधकामाकरिता रू. 13 कोटी निधी

▫ हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्थेचे बळकटीकरण व श्रेणीवर्धन करण्यासाठी 3 कोटी 50 लक्ष रू. निधीची तरतूद

👉 विविध योजनांसाठी तरतूद खालीलप्रमाणे :

▫ शामाप्रसाद मुखर्जी जनवनविकास योजना - 100 कोटी

▫ रमाई घरकूल योजना - 700 कोटी

▫ सरकारी वसतीगृहासाठी - 618 कोटी

▫ अल्पसंख्याक योजनांसाठी - 350 कोटींची तरतूद

▫ घर/गृह योजनांसाठी - 1075 कोटी

▫ ग्रामीण भागांच्या संगणकीकरणासाठी योजना

▫ रिक्षाचालकांसाठी एक महामंडळ स्थापन होणार - 5 कोटी

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💰 महाराष्ट्राचा संपूर्ण अर्थसंकल्प (भाग : 2)

Letsup I Budget Special

👉 शेतकऱ्यांसाठी काय?

▫ जलसंपदा विभागाकरता 8233 कोटी - अपूर्ण पाटबंधारे प्रकल्पापैकी 50 प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य

▫ कोकणातील पाटबंधारे प्रकल्पासाठी 60 कोटी तरतूद

▫ जलयुक्त शिवार - 1500 कोटी

▫ 82,000 सिंचन विहिरी पूर्ण - 132 कोटी विहीरींसाठी

▫ मागेल त्याला शेततळे या योजनेत 62 हजार शेततळी पूर्ण (160 कोटीची तरतूद)

▫ सूक्ष्म सिंचन - 432 कोटी

▫ कृषी विभागातर्फे वनशेतीस प्राधान्य - 15 कोटीची तरतूद

▫ सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 100 कोटीची तरतूद

▫ फलोत्पादन अभियानांतर्गत फळबाग लागवड योजना - 100 कोटी

▫ मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेकरीता 50 कोटी

▫ कर्जमाफी - 45.33 लाख कर्जखातेदारांना लाभ देण्याची बँकांना मान्यता (35.68 लाख खातेदारांना रकमेचा लाभ)

▫ 93,322 कृषी पंपाना विद्युत जोडणीसाठी 750 कोटींची तरतूद

▫ गोदामाची योजना, तसेच मालवाहतूक जलद वेगाने व्हावी यासाठी एसटीची नवी मालवाहतूक सेवा सुरु करण्यात येईल, ज्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल

▫ राज्यातील 145 मोठ्या बाजार समित्या राष्ट्रीय कृषि बाजार पोर्टलवर आणणार (ई नाम)

▫ 142 कोटी निधी - एसटी बसस्थानकांच्या डागडुजीसाठी उपलब्ध

👉 उद्योग/व्यवसायासाठी काय?

▫ वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी एक नवा कार्यक्रम सुरु

▫ विदर्भ, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात सूत गिरण्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येईल

▫ फिन्टेक धोरणांतर्गत सामायिक सोयीसुविधांसाठी भांडवली सहाय्य देण्यात येईल

▫ विजेवर चालणारी वाहने खरेदी करणाऱ्यांना सूट आणि निर्मिती करणाऱ्याला विशेष सहाय्य देण्यात येईल

▫ सूक्ष्म व लघु उद्योगांना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष योजना

▫ राज्यातील काथ्या उदयोग वाढीसाठी - 10 कोटीचा निधी

▫ हस्तकला उद्योगासाठी - 4 कोटी 28 लाख

▫ वर्धा इथे मातीकलेचे मंडळ - 10 कोटी

▫ सामूहिक उद्योग प्रोत्साहनासाठी 2620 कोटी

👉 पाणी, कचरा व्यवस्थापन व स्मार्ट सिटीसाठी तरतूद

▫ ग्रामीण भागात सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन - राज्यातील 15,000 लोकसंखा असलेल्या गावासाठी नवीन योजना - 335 कोटी

▫ नागरी पाणीपुरवठा, मलनिसारण यासाठी 7,750 कोटी केंद्राची मदत आहे, राज्याकडून 2,310 कोटींची तरतूद

▫ मोर्णा नदी अकोल्यातील नदी स्वच्छता मोहीत नागरिकांनी हाती घेतली, त्यांना मदत करण्यासाठी - 27 कोटी

▫ सागरी किनारा संवर्धनासाठी 9 कोटी 40 लाख

▫ घनकचरा व्यस्थापनासाठी - 1,526 कोटी

▫ ओलव्या कचऱ्यापासून कंपोस्ट खताची निर्मितीसाठी अनुदान देण्याचा मानस - 5 कोटी

▫ स्मार्ट सिटी अभियानासाठी 1,316 कोटींची प्रस्तावित

▫ नागरी पायाभूत सुविधांसाठी - 900 कोटी तरतूद

▫ स्वच्छ भारत अभियानाची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रू. 1 हजार 526 कोटी निधीची तरतूद

👉 रस्ते व ऊर्जा प्रकल्पासाठी तरतूद

▫ समृद्धी महामार्ग - ग्रिनफिल्ड रेखेला मान्यता. 701 किमी लांबी - 99 टक्के संयुक्त मोजणी पूर्ण, भूसंपादनाची 64 टक्के प्रक्रिया पूर्ण, डिझाईन प्रगतीपथावर, एप्रिलपासून काम अपेक्षित

▫ रस्ते विकासासाठी - 10,828 कोटींची तरतूद

▫ नाबार्डअंतर्गत रस्ते पूल बांधणीसाठी - 300 कोटी

▫ मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेची क्षमता वाढण्याचे काम हाती

▫ दुपदरीकरणासाठी - 26,000 कोटींचे प्रकल्प प्रगतीपथावर

▫ मुख्यमंत्री ग्रामसडक योजना - 2,255 कोटी 40 लाख निधी

▫ भाऊचा धक्का ते अलिबाग दरम्यान जलवाहतूक एप्रिलपासून सुरु होणार

▫ मिहान प्रकल्पासाठी - 4,066 कोटींचे सामंजस्य करार

▫ महावितरण कंपनीकरता शासनाच्या भागभांडवलापोटी रक्कम दिली

▫ महानिर्मिती कंपनीचे नवीन औष्णिक प्रकल्प प्रस्तावित आहेत - त्यासाठी 404 कोटींची तरतूद

▫ घारापुरी लेण्याला प्रथमच वीज पोहोचवली - 22 कोटींचा खर्च

▫ बस स्थानकांची पुनर्बांधणी करण्याकरिता 40 कोटींची तरतूद

▫ सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत दिवसा शेतकऱ्यांना 12 तास वीज पुरवठा - त्यासाठी प्रकल्प सुरु होतोय - ग्रीन सेस फंडातून 375 कोटींचा निधी

▫ डी आणि डी + उद्योगांसाठी वीजबिलात सवलतीसाठी - 926 कोटी

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
LetsUp I News Updates

🔅 नवी दिल्ली - 2019 मध्ये मोदींना पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, सोनिया गांधींचे भाजपला खुले आव्हान

🔅 नवी दिल्ली - अमेरिकेकडून 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यास 32.55 कोटींचे बक्षीस जाहीर

👌 नोव्हा कॉर्डलेस ट्रीमरने 'शेव्ह' ट्रिम करा आणि दिसा इम्प्रेसिव्ह, फ्लिपकार्ट वर खरेदी करण्यासाठी क्लिक करा 👉 http://fkrt.it/Ml!iJ2NNNN

🔅 राजस्थान - बारा वर्षांच्या खालील मुलीवर बलात्कार करणाऱ्यास मृत्यूदंडाची शिक्षा; राजस्थानमध्ये विधेयक मंजूर

🔅 बंगळुरु - कर्नाटक सरकार मुलींना प्राथमिक ते पदव्युत्तर पर्यंत शिक्षण मोफत देणार, 1 एप्रिलपासून अंमलबजावणी

🔅 इस्लामाबाद - पाकिस्तानचा माजी लष्करी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांच्या अटकेचे आदेश, देशद्रोहाचा खटला

🔅 मुंबई - माझ्या भाषणाच्या वेळी वीज घालवणाऱ्यांना तुडवा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिथावणीखोर वक्तव्य

🔅 भाऊराव कऱ्हाडे यांचा बहुप्रतीक्षित 'बबन' चा ट्रेलर रिलीज, ट्रेलर पाहण्यासाठी क्लिक करा - https://youtu.be/XXbl0S0k8hA

🔅 इपोह - सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारताचा आयर्लंडकडून पराभव; अंतिम फेरीतील प्रवेशाचे स्वप्न भंगले

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💐 लोकनेते डॉ. पतंगराव कदम काळाच्या पडद्याआड

LetsUp I Updates

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. आज संध्याकाळी 4 वाजता सांगलीतील वांगी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

डॉ. पतंगराव कदम यांचा जीवनप्रवास

👉 पतंगराव कदम यांचा जन्म 1945 रोजी सांगली जिल्ह्यातील सोनसळ या गावी झाला.

👉 गावात शाळा नसल्या कारणाने त्यांनी रोज 5 किमी चालत जाऊन प्राथमिक शिक्षण घेतले.

👉 1961 साली ते पुण्यात आले आणि एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स करुन, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले.

👉 1964 साली वयाच्या 20 व्या वर्षी पुण्यात भारती विद्यापीठाची स्थापना केली.

👉 1985 ते 2014 अशा कालावधीतील सात विधानसभा निवडणुकीत पतंगराव कदम भिलवडी-वांगी आणि पलूस विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले.

👉 सलग सातवेळा विजयी होण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.

👉 पश्चिम महाराष्ट्रातील 'लोकनेता' म्हणूनही त्यांचा गौरव झाला.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚡