LetsUpp Marathi
4.85K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
🏏 IPL मध्ये DRS प्रणालीची एंट्री

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच DRS प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. BCCI ने आयपीएलमध्ये DRS सिस्टमचा वापर करण्याला परवानगी दिली आहे. BCCI सुरुवातीला या प्रणालीबाबत सकारात्मक नव्हते. मात्र बीसीसीआयने या प्रणालीचा आयपीएलमध्ये प्रयोग करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. एका मुलाखतीत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel. To Join Click : t.me/letsup

👆
📣 पैसे काढण्यासाठी EPFO चा नवा नियम

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) विभागाने पीएफमधून 10 लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज अनिवार्य केला आहे. EPFO ने पेपरलेस वर्क करण्याकडे हे पाऊल उलचले आहे.

यासोबतच ईपीएफओने कर्मचारी पेन्शन योजना (EPS) 1995 मधून पाच लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठीही ऑनलाईन अर्ज अनिवार्य केला आहे. सध्या EPFO खातेदारांना ऑनलाईनसोबतच मॅन्युअल पद्धतीनेही पैसे काढण्याची परवानगी आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
⚡ स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी 'हे' पुस्तक प्रकाशित

LetsUp | Update

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात 'MPSC' आणि केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात 'UPSC' देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणारे 'भारत 2018' या माहितीपर पुस्तकाचे नवी दिल्ली येथे अनावरण करण्यात आले आहे. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे.

शासनाकडून हे पुस्तक दरवर्षी प्रकशित केले जाते. या पुस्तकाच्या ई-आवृत्तीचे देखील अनावरण करण्यात आले आहे. या पुस्तकाच्या आवृत्ती अॅमेझोन आणि गुगल प्ले-स्टोअरवर देखील उपलब्ध असतील. मागील वर्षांत भारतात काय घडले याची संपूर्ण माहिती या पुस्तकात असून आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, सरकारच्या योजना अशा सगळ्या विषयांतील माहिती या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
LetsUp I News Updates

🔅 नवी दिल्ली - 2017-18 च्या तिसर्‍या तिमाहीत भारताचा जीडीपी 7.2 टक्क्यांवर, या बाबतीत भारताने चीनला मागे टाकले

🔅 नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांच्या भत्त्यांत वाढ करण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब

🔅 नवी दिल्ली - बँकांची 515 कोटी रुपयांची फसवणूक, आर. पी. इन्फो सिस्टिम्स कंपनीविरोधात सीबीआयने गुन्हा नोंदवला

🔅 नवी दिल्ली - कांचीपुरम पीठाचे 69 वे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे निधन, हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

🔅 पंढरपूर - आषाढी वारीला येणा-या भक्तांची संख्या ही जगात विक्रमी असून त्याची नोंद ‘वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्ड’ मध्ये करण्यात आली

🔅 पुणे - आजपासून दहावीची परीक्षा, 1 मार्च ते 24 मार्च दरम्यान परीक्षा पार पडणार, साडेसतरा लाख विद्यार्थी परीक्षा देणार

🔅 मुंबई - जवानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे, चौकशी अहवालानंतरच निलंबन मागे

🔅 मुंबई - भारताचा अव्वल भालाफेकपटू दविंदर सिंग कांग उत्तेजक चाचणीत दोषी, चार वर्षांची बंदी घालण्यात येण्याची शक्यता

🔅 पणजी - 9 वा गोवा राज्य चित्रपट महोत्सव येत्या 21 ते 24 एप्रिल या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे

(आता ब्रेकिंग न्यूज सोबत मिळवा माहिती आणि मनोरंजन तुमच्या WhatsApp वर त्यासाठी जॉईन करा LetsUp - डिजिटल मॅगेझीन, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/KGP2Ly )
💐 ऑल द बेस्ट...! आजपासून दहावीची परीक्षा

LetsUp I Updates

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. यंदा राज्यभरातून 17 लाख 51 हजार 353 विद्यार्थी परिक्षा देणार आहे. बारावीप्रमाणे याही परीक्षेला 10.30 नंतर एक मिनिटेही उशिरा येणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळे आधी केंद्रावर पोहचण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.

दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना LetsUp - Digital Magazine कडून शुभेच्छा...!

For Breaking News on WhatsApp Join LetsUp. To Join Click 👉 https://goo.gl/X1SDS6

⚡
💥 जीडीपीमध्ये भारत चीनच्या पुढे!

Breaking

आर्थिक वर्ष 2017-18 च्या तिसर्‍या तिमाहीत भारताचा जीडीपी 7.2 टक्क्यांवर पोहोचला असून भारताने जीडीपीच्या बाबतीत चीनला मागे टाकले आहे. याच तिमाहीतला चीनचा जीडीपी 6.8 टक्के आहे. अर्थतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी काळात हा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे भारत जगात वेगाने प्रगती करणारा देश ठरला आहे.

For Breaking News on WhatsApp Join LetsUp. To Join Click 👉 https://goo.gl/EkhTcm

⚡
💇🏻‍♀ होळीच्या रंगांपासून वाचवा केसांंना

LetsUp I Holi Special

होळी आणि रंगपंचमीच्या रंगात खेळताना आपल्या केसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामुळे रंग खेळताना केसांची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी काही टिप्स...

👉 होळी खेळताना केसांचे कमीत-कमी नुकसान व्हावे याकरिता केमिकल फ्री आणि नैसर्गिक रंगांचा अधिक वापर करा.

👉 होळी खेळायला जाण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी केसांना तेल लावून बाहेर पडा.

👉 होळी खेळताना केसांचे नुकसान होऊ नये म्हणून ते घट्ट वेणी किंवा आंबाड्यात बांधा. केस मोकळे ठेवू नका.

👉 कॅप किंवा स्कार्फ घालणार असाल तर त्याखाली शॉवर कॅपही घाला. यामुळे रंगांचा थेट डोक्याशी किंवा केसांशी संपर्क येत नाही.

👉 केसांमधील रंग काढताना गरम पाण्याचा वापर कटाक्षाने टाळा. कारण गरम पाण्याने केस धुतल्यास ते अधिक शुष्क, कोरडे होऊ शकतात.

For Breaking News, Jobs & Infotainment on WhatsApp Join LetsUp. To Join Click 👉 https://goo.gl/egfuvE

⚡
LetsUp I News Updates

🔅 नवी दिल्ली - आर्थिक गुन्हे करुन पळून जाणाऱ्यांना आळा घालण्यासाठी 'फ्यूजिटिव्ह ईकनॉमिक ऑफेंडर्स बिल' मंजूर

🔅 नवी दिल्ली - दहशतवाद आणि मूलगामी शक्‍तींविरुद्धचा लढा हा कोणत्याही धर्माच्या विरुद्ध नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी

🔅 नवी दिल्ली - SBI, PNB आणि ICICI या भारतातील तीन मोठ्या बँकांनी कर्जावरील व्याजदरात वाढ केली

🔅 नवी दिल्ली - आधार क्रमांकाशी जोडल्यामुळे देशात 2.75 कोटी बोगस रेशनकार्ड सापडले, वितरणात अन्नधान्याची होणार बचत

🔅 बेळगाव - महापौरपदी कन्नड गटाचे बसप्पा चिक्कलदिनी बिनविरोध, तर उपमहापौरपदी मराठी गटाच्या मधुश्री पुजारी

🔅 मुंबई - डी. एस. कुलकर्णी यांची पत्नीसह येरवडा कारागृहात रवानगी, डीएसकेंना 15 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

🔅 मुंबई - अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे कंत्राट 'एल अँड टी' कंपनीला, स्मारक उभारण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी

🔅 मुंबई - सलमान लवकरच मुंबई पोलिसांच्या जीवनावर आधारित मालिकेची निर्मिती करणार असल्याची माहिती

(आता ब्रेकिंग न्यूज सोबत मिळवा माहिती आणि मनोरंजन तुमच्या WhatsApp वर त्यासाठी जॉईन करा LetsUp - डिजिटल मॅगेझीन, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/KGP2Ly )
👉 शिवस्मारकाचे काम तीन वर्षात पूर्ण होणार?

LetsUp I Updates

अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जागतिक कीर्तीच्या स्मारकाचे काम पावसाळ्यापूर्वी सुरू होणार आहे. या शिवस्मारकाचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एल अँड टी कंपनीला देण्यात आले. त्यानुसार तीन वर्षांत हे स्मारक पूर्ण होईल. यासाठी सुमारे अडीच हजार कोटी रूपये खर्च येणार आहे.

For Breaking News, Jobs & Infotainment on WhatsApp Join LetsUp. To Join Click 👉 https://goo.gl/kqpvN7

⚡
🛰 आता चंद्रावरही मिळणार 4G

LetsUp I Updates

चंद्रावर पुढील वर्षांपर्यंत 4G नेटवर्क सुरू करण्यात येणार आहे असे व्होडाफोन या ब्रिटिश टेलिकॉम कंपनीने म्हटले आहे. यात नोकिया कंपनीला तंत्रज्ञान भागीदार करण्यात आले असून या फोर जी सेवेसाठी लागणारे उपकरण नोकिया तयार करणार आहे.

For Breaking News, Jobs & Infotainment on WhatsApp Join LetsUp. To Join Click 👉 https://goo.gl/LAKJnZ

💥
💰 जीपीएफ सहज काढणं शक्य!

केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर दिली आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांना सहजासहजी प्रॉव्हिडंट फंड अर्थात जीपीएफ काढता येणार आहे.

जीपीएफमधून सहजपणे पैसे काढण्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीपीएफ ऑनलाईन नावाची सुविधा लाँच केली आहे. यानुसार जीपीएफ अकाऊंट एम्प्लॉई आयडीसोबत जोडण्यात येईल, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना पैसे काढणे सोपं होईल.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
📽 _*रजनी-नानाच्या 'काला' चा टीझर रिलीज*_

सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी ‘काला’ या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. या सिनेमात रजनीकांत यांच्यासोबत अभिनेते नाना पाटेकर यांचीही प्रमुख भूमिका आहे.

पी ए रंजीत यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात हुमा कुरेशी, संपथ राज, सयाजी शिंदे यासारखी स्टारकास्ट आहे.

टिझर पाहण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/xdPWdR

------------------------
🧢 _*BnB रिंग कॅप (Pack of 4) खरेदी करा आणि वाढत्या उन्हापासून स्वतःला सुरक्षित ठेवा. फक्त 242/- रुपयांत हि अप्रतिम ऑफर फ्लिपकार्टवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा*_ 👉 https://goo.gl/dfs8f5
------------------------

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
💸 131 भारतीय अब्जाधीश...

हुरून ग्लोबलने जारी केलेल्या यादीनुसार जगातील श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत 131 भारतीय अब्जाधीश आहेत. सर्वाधिक अब्जाधीश असणाऱ्या देशात भारत तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. यात भारतीय वंशाच्या नागरिकांचा समावेश केल्यास हा आकडा 171 च्या घरात जातो.

चीन 819 अब्जाधीशांसह अव्वलस्थानी असून त्यापाठोपाठ अमेरिकेचा (571 अब्जाधीश) नंबर लागतो. भारतीय अब्जाधीशांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रिजचे प्रमख मुकेश अंबानी (45 अब्ज) अव्वलस्थानी आहेत. लक्ष्मी मित्तल (1.17 लाख कोटी) दुसऱ्या स्थानावर आहेत. तर सनफार्माचे प्रमुख दिलीप सांघवी (96.2 हजार कोटी) तिसऱ्या स्थानावर आहेत.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
LetsUp News Updates

● नवी दिल्ली - त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या ईशान्य भारतातील राज्यांची सत्ता कुणाला मिळणार याचा फैसला आज (शनिवार) होणार

● नवी दिल्ली - महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी भाजपकडून प्रकाश जावडेकर, धर्मेंद्र प्रधान आणि नारायण राणे या तिघांची नावं निश्चित

● रायपूर - छत्तीसगडमध्ये कमांडरसह 10 नक्षली ठार, एक जवान शहीद, तेलंगणा पोलिस आणि छत्तीसगड पोलिसांनी केली संयुक्त कारवाई

● बेंगळूरू - ज्येष्ठ पत्रकार आणि समाजसेविका गौरी लंकेश हत्याप्रकरणी एकाला अटक

● मुंबई - पंजाब नॅशनल बँकेचे माजी चीफ ऑडिटर बिष्णुब्राता मिश्रा यांना 14 मार्चपर्यंत सीबीआय कोठडी; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

● मुंबई - यंदा राज्यात सरासरी इतका पाऊस पडणार, भारतीय हवामान खात्याने म्हणजेच आयएमडीने वर्तवला अंदाज

● मुंबई - कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बहिष्कार टाकल्यामुळे राज्यातील बारावीच्या परीक्षांचा निकाल लांबण्याची शक्यता

● मुंबई - मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर रविवार, 4 मार्चला सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार

● मुंबई - देशभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) अनेक वर्षांपासून घेण्यात येणाऱ्या परीक्षेत सुरू असलेली वजा गुणपद्धती बंद होणार

● नवी दिल्ली - आशियाई कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटू नवजोत कौरला सुवर्ण

● मुंबई - 'सोनू के टिट्टू की स्वीटी' चित्रपटाची बॉक्सऑफिसवर बक्कळ कमाई, भारतामध्ये 41 कोटींचा पल्ला गाठला

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🌧 यंदा सरासरी इतका पाऊस!

यंदा राज्यात सरासरी इतका पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. ला नीनाच्या प्रभावामुळे मान्सूनची स्थिती सुधारली आहे.

शिवाय, पाऊसकाळ चांगला राहण्याची शक्यता वाढली आहे. ला नीनाची ही स्थिती मे महिन्यापर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे यंदाचा पाऊस जूनपर्यंत दाखल होईल आणि पाऊस चांगला होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
📣 बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बहिष्कार टाकल्यामुळे बारावीच्या विविध विषयांच्या तब्बल 80 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. यामुळे राज्यातील बारावीच्या परीक्षांचा निकाल लांबण्याची शक्यता आहे.

शिक्षक महासंघ आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यात झालेल्या बैठकीत काही निर्णयांवर शासन आदेश काढण्यात आले. मात्र शिक्षक संघटनांनी महत्वाच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
⚡ Election Results – 2018

त्रिपुरा (60 जागांपैकी 59 जागांचे निकाल) :

👉 सीपीएम + : 18 I भाजप : 41 I काँग्रेस : 0 I अन्य : 0

नागालँड (60 जागा) :

👉 भाजप+ : 25 I NPF : 29 I काँग्रेस : 2 I अन्य : 4

मेघालय (60 जागा) :

👉 काँग्रेस : 18 I NPP : 19 I अन्य : 19 I भाजप - 3

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
🇺🇸 अमेरिका लावणार पोलादावर आयात शुल्क!

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पोलाद आणि अ‍ॅल्युमिनियमवर आयात शुल्क लावण्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोर अमेरिका व्याज दरात वाढही करणार आहे.

या कारणामुळे अमेरिकेसह जागतिक शेअरबाजारात गेल्या दोन दिवसांपासून घसरण सुरू आहे. तसेच जागतिक पातळीवर व्यापारयुद्ध सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
⚡ मोदी, चोक्सीविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट

PNB घोटाळा करणारा हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याविरोधात विशेष PMLA न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. तसेच या दोघांची संपत्ती जप्त करण्याचा विचार युद्धपातळीवर सुरू आहे. याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून ईडीने या दोघांचे नियंत्रण असलेल्या 41 स्थावर मालमत्तांवर टाच आणली आहे.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👆
LetsUp I News Updates

🔅 नवी दिल्ली - देशातील 68 टक्के जनतेवर एनडीएचे राज्य, तर यूपीएचे केवळ 8 टक्के जनतेवर राज्य

🔅 नवी दिल्ली - एप्रिल 2013 ते जून 2016 दरम्यान बँक कर्मचार्‍यांचा सहभाग असलेले 2450 कोटी रुपयांचे घोटाळे उघडकीस

🔅 नवी दिल्ली - व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष त्रान दाई कुआंग हे तीन दिवस भारत दौर्‍यावर, आण्विक ऊर्जा सह तीन करारांवर स्वाक्षरी

🔅 नवी दिल्ली - दिल्ली दूर आहे असा ईशान्येकडील जनतेचा समज होता पण दिल्ली स्वत: चालत ईशान्येच्या दरवाज्यापर्यंत गेली - पंतप्रधान

🔅 नवी दिल्ली - देशातल्या 10 सर्वाधिक तापलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्राची पाच शहरे, अकोला आणि चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत सर्वाधिक तापमान

🔅 बीड - केज तालुक्यात बारावी गणित पेपरच्या 1199 उत्तरपत्रिका जळून खाक, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

🔅 मुंबई - एक एप्रिलपासून बेस्ट प्रवास महागणार, सहा किमीपासून पुढील अंतरासाठी 1 ते 12 रुपयांपर्यंत भाडेवाढ

🔅 मुंबई - अनुष्‍का शर्माचा हॉरर चित्रपट 'परी'ला पाकिस्‍तानात विरोध, काही दृश्‍यांवर पाक सेन्‍सॉर बोर्डाचा आक्षेप

🔅 मुंबई - पहिल्यावहिल्या सांघिक स्नूकर वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानला 3-2 ने नमवून विजेतेपद पटकावले

(आता ब्रेकिंग न्यूज सोबत मिळवा माहिती आणि मनोरंजन तुमच्या WhatsApp वर त्यासाठी जॉईन करा LetsUp - डिजिटल मॅगेझीन, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/KGP2Ly )

जाहिरातीसाठी संपर्क : 7875190190
🌧 वातावरण ढगाळ; पावसाची शक्यता?

LetsUp I Updates

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने आगामी काळात राज्यातील तापमानात बदल होणार असून कोकणातील काही भागात ढगाळ वातावरण निर्माण होईल. तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही भागात पावसाची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

For Breaking News, Jobs & Infotainment on WhatsApp Join LetsUp. To Join Click 👉 https://goo.gl/2xMUCR

💥