LetsUpp Marathi
4.85K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
Lets Up News Updates

1. नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी वेब साईटवर त्यांची संपत्ती जाहीर केली असून ती 2 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले

2. अब पहली बार मेहंगाई गिरेगी... फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सुरु... जबरदस्त ऑफर्स आणि डिस्काऊंट्स… लिंकवर क्लिक करा आणि शॉपिंग करा बिनधास्त https://goo.gl/Pe1KPk

3. नवी दिल्ली - भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रमुख नेते अनिवासी भारतीय होते असे वक्तव्य काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी न्यूयॉर्क येथे केले

4. नवी दिल्ली - दूरसंचार नियामक प्राधिकरणाने मोबाईल इंटरकनेक्शन वापर शुल्क कमी केल्यामुळे लवकरच फोन कॉलचे दर कमी होण्याची शक्यता

5. नवी दिल्ली - काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तानने चर्चेने सोडवावा असे आवाहन चीनने दोन्ही देशांना केले, पाकिस्तानला धक्का

6. नवी दिल्ली - रेल्वेने तिकीट बुकिंगसाठी स्टेट बँक आणि आयसीआयसीआय बँकेसह 6 बँकेचे डेबिट अथवा क्रेडीट कार्ड वापरण्यास बंदी घातली

7. नवी दिल्ली - संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आज जैसलमेर आणि जोधपूर येथील सैन्यतळांचा दौरा करणार

8. मुंबई - चर्चगेट येथील आयकर भवनात 3 कोटी रुपयांची लाच घेताना आयकर विभागाचे उपायुक्त जयपाल स्वामीसह तीन जणांना रंगेहाथ अटक

9. मुंबई - शिवसेनेचे 20 ते 22 आमदार आणि 3 ते 4 मंत्री हे भाजपच्या संपर्कात, शिवसेनेने पाठींबा काढताच हे सर्वजण वर्षा बंगल्यावर दिसतील - अपक्ष आमदार रवी राणा

10. मुंबई - राज यांच्या फेसबुक पेजला तब्बल पाच लाखांवर लाइक्स मिळाले असून काही तासांतच त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 5 लाख 35 हजारांवर पोहोचली

11. लिबिया - येथे एक जहाज बुडून झालेल्या दुर्घटनेत 8 प्रवाशांना जलसमाधी मिळाली तर साधारणपणे 90 जण बेपत्ता, शोध सुरु

12. मुंबई - मराठमोळा तरुण प्रयोगशील दिग्दर्शक अमित मसूरकर याचा 'न्यूटन' हा चित्रपट भारताकडून ऑस्कर पुरस्कारासाठी निवडण्यात आला

13. मुंबई - भारताच्या ऑलिम्पिक स्पर्धेत जागतिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Lets Up News Updates

1. जम्मू - जम्मूमधल्या भारतीय चौक्या, खेडयांवर पाकिस्तानचा तुफान गोळीबार; BSF च्या दोन जवानांसह पाच नागरीक असे सात जण जखमी

2. नवी दिल्ली - आयआरसीटीसीने रेल्वे तिकीटांच्या बुकिंगकरता स्टेट बँक ऑफ इंडियासह 6 बँकांच्या कार्ड वापरावर बंदी घातलेली नाही, आयआरसीटीसीचा खुलासा

3. नवी दिल्ली - सध्या देशातील काही न्यायालये देश चालवण्याची जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत. हे काम न्यायालयांनी लोकांनी निवडून दिलेल्या लोकांवर सोडावे : रविशंकर प्रसाद

4. नोटाबंदीच्या अनावश्यक निर्णयामुळे अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे. तांत्रिक आणि आर्थिकदृष्या नोटाबंदीची अजिबात आवश्यक नव्हती : मनमोहन सिंग

5. वाराणसी - भाजपसाठी व्होटबँकेचे राजकारण आणि निवडणुकीतील विजयापेक्षा देशाचा विकास महत्त्वाचा आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

6. दोन्ही बाजूंनी दबाव आणण्याची अजित डोभाल यांची रणनिती केव्हाही यशस्वी होणार नाही, अशा शब्दांमध्ये पाकिस्तानने डोभाल यांच्यावर जोरदार टीका केली

7. अमेरिकेचे संरक्षण मंत्री जिम मॅटिस 26 ते 28 सप्टेंबर पर्यंत भारत दौऱ्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारमण यांची घेणार भेट

8. लंडन - टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या उबर कंपनीचा लायसन्सचे नूतनीकरण न करण्याचा लंडन शहराच्या वाहतूक विभागाचा निर्णय

9. मुंबई - महागाई विरोधात शिवसेना रस्त्यावर; विविध ठिकाणी मोर्चे आणि रास्ता रोको, 'एवढी माणसं कशाला, मोदींच्या मयताला', आंदोलनात शिवसैनिकांची घोषणाबाजी

10. मुंबई - राज ठाकरेंनी 'फेसबुक'वर मांडली स्मारकांबाबत भूमिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधून केवळ दलित मतं आपल्याकडे खेचण्याचा सरकारचा प्रयत्न

11. मुंबई - एकनाथ खडसेंविरोधातील खटले मागे घ्यावेत, यासाठी पाकिस्तानातून धमकीचा फोन; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा

12. अमरावती - शिवसेनेनं पाठिंबा काढला तरी सरकार पडणार नाही, त्यांना 15 आमदार मिळवून देण्याची जबाबदारी मी घेतली आहे : रामदास आठवले

13. पंढरपूर - पंढरपूरच्या विकासासाठी चक्क कॅनडा सरकारने आर्थिक सहाय्य करण्याची केली घोषणा, कॅनडा सरकारने दोन हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा केला तयार

14. जपान ओपन सुपरसिरीज स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्यफेरीत भारताचे आव्हान संपुष्टात, प्रणव चोप्रा आणि सिक्की रेड्डी जोडीचा पराभव

15. नवी दिल्ली - धडाकेबाज फलंदाज गौतम गंभीरने दिल्लीच्या रणजी संघाचे कर्णधारपद सोडले, यापुढे दिल्लीच्या नेतृत्त्वाची धुरा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याच्या खांद्यावर

16. मुंबई - 90व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी ऑफिशियल एंट्री मिळवलेल्या अमित मसुरकर दिग्दर्शित न्यूटन या सिनेमाने पहिल्या दिवशी 96 लाखांची केली कमाई

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Lets Up News Updates

1. न्यूयार्क - मागील 70 वर्षांमध्ये भारताने विकास साधला मात्र पाकिस्तानने दहशतवादी संघटना, जिहादी आणि दहशतवादी तयार केलेत - सुषमा स्वराज

2. नवी दिल्ली - देशातील नागरिकांना 24 तास वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 25 सप्टेंबरला नवी 'सौभाग्य' योजना सुरू करणार

3. नवी दिल्ली - बेनामी मालमत्तेबाबत सरकारी तपास यंत्रणांना माहिती देणार्‍यांना एक कोटी रुपयांपर्यंतचे रोख बक्षीस देण्याचा विचार सध्या केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू

4. नवी दिल्ली - ज्येष्ठ पत्रकार के. जे. सिंग आणि त्यांची आई गुरचरण कौर यांची त्यांच्या राहत्या घरी हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर

5. नवी दिल्ली - गोरक्षकांच्या हिंसाचाराचा फटका बसलेल्या पीडितांना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी राज्यांची आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले

6. मुंबई - देशाच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती गंभीर, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे आता दिसतंय, वाढत्या महागाईवरुन शरद पवारांची सरकारवर टीका

7. मुंबई - कर्जमाफी योजनेसाठी मुदतीत म्हणजे 22 सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत राज्यातील 56 लाख 59 हजार 393 शेतकऱ्यांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले

8. मुंबई - दसरा मेळावा ही लोकभावना त्यामुळे याबाबत लवकरच भूमिका जाहीर करू - पंकजा मुंडे यांची माहिती, समर्थक मात्र मेळावा घेण्यावर ठाम

9. यवतमाळ - भाईचंद हिराचंद रायसोनी बँकेतील आर्थिक अनियमितता प्रकरणात बँकेच्या अध्यक्षांसह 14 संचालकांना अटक करण्यात आली

10. मुंबई - शाओमीला फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज या सेलचा मोठा फायदा, शाओमीने दोन दिवसातच 10 लाख स्मार्टफोनची विक्री केली

11. मुंबई - 'न्यूटन' चित्रपटाद्वारे संवेदनशील आणि चांगला विषय हाताळण्यात आल्याने या चित्रपटाला केंद्र सरकार 1 कोटी रूपयांचे अनुदान देणार

12. इंदूर - पहिले दोन सामने जिंकणा-या भारतीय संघाने आज पुन्हा आॅस्ट्रेलियाला धूळ चारून मालिका विजयासह नंबर वन होण्याचे लक्ष्य आखले

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Lets Up News Updates

1. श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला भागातील उरी सेक्टरमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान, सोपोरमध्ये बँकेत फेकले ग्रेनेड, 3 जण जखमी

2. फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज; जबरदस्त ऑफर्स आणि डिस्काऊंट्स… लिंकवर क्लिक करा आणि शॉपिंग करा बिनधास्त https://goo.gl/Pe1KPk

3. नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये घट होईल मात्र करांमध्ये कपात केली जाणार नाही : धर्मेंद्र प्रधान

4. नवी दिल्ली - देशामधील पर्यटन वाढवण्यासाठी पुढाकार घ्या, मन की बात मधून पंतप्रधान मोदींचे देशवासियांना आवाहन

5. भोपाळ - मध्य प्रदेशातील मदरशांना आता वर्षाला 50 हजार रुपयांचे अनुदान मिळणार, मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली घोषणा

6. भारत म्हणजे दक्षिण आशियामधील दहशतवादाची जननी आहे, असे पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूत मलीहा लोधी यांनी म्हटले

7. गेल्या चार महिन्यांपासून पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड, चिनी गुंतवणूकदारांना तब्बल 154 कोटी रुपयांचा फटका

8. ऑकलॅन्ड - न्यूझीलंड पार्लमेंटमध्ये खासदार म्हणून 3 भारतीय निवडून आले, सरदार कवलजीत सिंह बख्शी हे सलग चौथ्यांदा विजयी

9. न्युयॉर्क - अमेरिकेने कोरियावरून भिरकावली अण्वस्त्रवर्षक विमाने, आव्हानांसाठी सज्ज असल्याची स्पष्टोक्ती

10. मुंबई - येत्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल करतील, पण सत्ता सोडण्याचं पाऊल ते उचलणार नाहीत, सूत्रांची माहिती

11. मुंबई - राज ठाकरेंचा व्यंगचित्राद्वारे पंतप्रधान मोदींवर निशाणा, दाऊदचं मोदींना भारतात खेचून आणतानाचे व्यंगचित्र फेसबुक पेजवर पोस्ट

12. नागपूर - वर्तमानात राज्यात केवळ 23 टक्के सिंचन; 40 टक्क्यांपर्यंत सिंचन झाल्यास राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबतील : नितीन गडकरी

13. पुणे - नारायण राणे यांच्याकडे रिमोट कंट्रोल असून ते राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय योग्य वेळी घेतील : नितेश राणे

14. रेनो कंपनीने आपल्या कॅप्चर या क्रॉसओव्हर मॉडेलचे केले अनावरण, येत्या काही दिवसांमध्ये ही कार अधिकृतरित्या बाजारपेठेत येणार

15. नवी दिल्ली - कुलदीप आणि चहलने आपल्या कामगिरीने आर. अश्विन आणि रवींद्र जडेजाची उणीव जाणवू दिली नाही : वीरेंद्र सेहवाग

16. मुंबई - अभिनेता अमेय वाघची भूमिका असलेल्या ‘फास्टर फेणे’ चित्रपटाचा दुसरा टीझर लाँच, रितेश देशमुखने त्याच्या फेसबुक-ट्विटरवर केला टीझर पोस्ट

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Lets Up News Updates

1. जम्मू-काश्मीर - उरी सेक्टरमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 2 एके 47, 1 एके यूबीजीएल, ग्रेनेड, पेट्रोल बॉम्ब, 2 आयईडी, मोबाइल्स आणि इतर साहित्य केले जप्त

2. नवी दिल्ली - लोकसभा व राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाचवेळी व्हाव्यात याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही, सर्वपक्षीय सहमतीसाठी प्रयत्न करणार

3. नवी दिल्ली - भौगोलिक-राजकीय अशांततेमुळे चालू महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भांडवल बाजारातून तब्बल पाच हजार 500 कोटी रुपये काढून घेतले

4. नवी दिल्ली - अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅट्टीस हे 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान नियोजित भारत दौ-यातवर, अमेरिका-भारत संरक्षण संबंध सुधारणार

5. नवी दिल्ली - मोबाईलच्या आयएमईआय नंबरशी छेडछाड करणे आता दंडनीय गुन्हा ठरणार, यामध्ये तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवासही होऊ शकतो

6. नवी दिल्ली - देशातील महिलांमध्ये शिक्षणाबाबत जागृती होत असताना आता विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींचा शिक्षणातील टक्का वाढला

7. मुंबई - ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचे आज पहाटे निधन, काल सकाळी त्यांना मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

8. मुंबई - काँग्रेसला साेडचिठ्ठी दिलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे आज दिल्लीत जाऊन भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना भेटणार असल्याची चर्चा

9. मुंबई - कर्जमाफीसाठी राज्यभरातून आलेल्या अर्जापैकी 2 लाख 41 हजार शेतकऱ्यांचे आधार क्रमांक नसल्याने त्या सर्व अर्जांची पुन्हा छाननी होणार

10. न्यूयार्क - काश्मीरमध्ये कसे अत्याचार होतात हे दाखवण्यासाठी पाकिस्तानने गाझा हल्ल्याचा खोटा फोटो दाखवला, त्यामुळे जगभरात त्यांची नाचक्की झाली

11. मुंबई - बहुचर्चित 'बापजन्म' हा चित्रपट येत्या 29 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून तो परदेशात सुद्धा प्रदर्शित होणार

12. इंदूर - भारतीय संघाने तिसऱ्या वन-डे क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर पाच विकेटनी विजय नोंदविला, भारत वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Lets Up News Updates

1. नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाकांक्षी 'सौभाग्य योजने'चे उदघाटन केले, या योजनुसार गरिबांना मोफत वीज जोडणी देण्यात येणार

2. नवी दिल्ली - देशातील काही भागांत पूर आणि काही भागांत दुष्काळी परिस्थिती अशा विषमतेचा फटका यंदाच्या खरीप हंगामाला बसणार, उत्पन्न घटण्याची शक्यता

3. नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना; विवेक देबरॉय यांची परिषदेच्या प्रमुखपदी नियुक्ती

4. नवी दिल्ली - देशविरोधी आणि धार्मिक भावना भडकावणारी काश्मीरमधील 115 ट्विटर हँडल बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारने ट्विटरला दिले

5. नवी दिल्ली - आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आधार घेत एसबीआयने चॅटबोट हा समस्या सोडवणारा रोबो ग्राहकांच्या सेवेत दाखल केला

6. नवी दिल्ली - रेल्वे परिसरात विक्री केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवर एमआरपीची रक्कम छापणे सक्तीचे, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिले आदेश

7. मुंबई - हॉस्पिटलच्या उद्घाटनाचे आमंत्रण देण्यासाठी नारायण राणे अमित शहा यांना भेटले, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही - रावसाहेब दानवे

8. मुंबई - भायखळा महिला कारागृहातील बहुचर्चित वॅार्डन मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस आज आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता

9. मुंबई - राज्यातील हजारो चतुर्थ श्रेणी शासकीय कर्मचारी 27 सप्टेंबरपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाणार

10. बर्लिन - जर्मनीमध्ये झालेल्या निवडणुकीत अँजेला मार्केल यांनी विजय संपादन करत चौथ्यांदा चान्सलरपद भुषविण्याचा मान मिळविला

11. मुंबई - 28 दिवसांसाठी दररोज 3G/4G डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देणारा नवीन डेटा प्लॅन एअरटेलने प्रीपेड ग्राहकांसाठी आणला

12. लखनौ - मुंबईचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉचा विक्रम, दुलीप करंडकाच्या अंतिम सामन्यात शतक ठोकणारा तो सर्वात तरुण क्रिकेटर ठरला

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Lets Up News Updates

1. पाकिस्तानच्या सीमेवरील नापाक कारवाया सुरुच राहिल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु : लष्करप्रमुख बिपिन रावत

2. नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्रसंघात पुन्हा एकदा पाकिस्तान तोंडघशी, पाकिस्तानच्या राजदूत मलीहा लोधी यांनी पॅलेस्टिनच्या महिलेचा फोटो काश्मीरमधील पीडित म्हणून दाखवला

---------------------------------------------
सॅमसंगच्या स्मार्टफोनवर जबरदस्त सूट, सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा http://bit.ly/samsung-anniversary-sale
---------------------------------------------

3. नवी दिल्ली - दहशतवाद खपवून घेणार नाही; अमेरिकेचा पाकिस्तानवर निशाणा, दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारताला पाठिंबा

4. नवी दिल्ली - गुरमीत राम रहिमची निकटवर्तीय हनीप्रीतच्या जामीन अर्जावर निर्णय राखीव, दिल्ली हायकोर्ट उद्या पुन्हा करणार सुनावणी

5. टोकियो - उत्तर कोरियाच्या वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी मुदतपूर्व निवडणूक घेण्याची केली घोषणा

6. मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 31599.76, निफ्टी : 9871.50, सोने भाव : 30,012 (प्रतितोळा), चांदी : 40,190 (प्रतिकिलो)

7. मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण, आरोपी मेजर रमेश उपाध्यायला जामीन मंजूर, 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

8. मुंबई - INS कलवरी पाणबुडी नोव्हेंबर, डिसेंपर्यंत नौदलात दाखल होणार, युध्दनौकाबांधणीतील विलंब मात्र चिंताजनक : व्हाईस एडमिरल गिरीश लुथ्रा, नौदल पश्चिम तळाचे प्रमुख

9. मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावर, राज्यातील समृद्धी महामार्गासारख्या प्रकल्पांसाठी कमी व्याज दराचे कर्ज मिळविण्याचा प्रयत्न करणार

10. मुंबई - पंतप्रधान मोदींकडून सचिन तेंडुलकर-आदित्य ठाकरेंचं जाहीर कौतुक; स्वच्छता अभियानातील सहभागासाठी केलं ट्विट

11. मुंबई - दिल्लीवारी नंतरही राणेंचा भाजप प्रवेश अद्याप निश्चीत नाही, त्यामुळे राणे आता नवीन पक्ष स्थापन करण्याची शक्यता

12. पुणे - ग्रामीण भागातही होणार रिक्षा परवान्यांचे वाटप, राज्य शासनाने काढला अध्यादेश

13. सोनी कंपनीने थ्रीडी स्कॅनिंगची सुविधा असणारा एक्सपेरिया एक्सझेड 1 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत केला लाँच, किंमत 44,990 रूपये

14. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजवर लवकरच चित्रपट बनणार, या चित्रपटाचे सर्व हक्क Viacom18 Motion Pictures ने घेतले विकत

15. मुंबई - दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या ‘द सायलेन्स’ चित्रपटात नागराज मंजुळे महत्त्वाची भूमिका साकारणार, येत्या 6 ऑक्टोबरला चित्रपट होणार प्रदर्शित

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Lets Up News Updates

1. श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये हिज्बूल मुजाहिदीन टॉप कमांडर अब्दुल कय्यूम नजरला सुरक्षा पथकांनी कंठस्नान घातले

2. नवी दिल्ली - केंद्र सरकारने आता 4जी नंतर 5जी सेवेच्या दिशेने पाऊल टाकले, 5जी समितीची स्थापना 2020 पर्यंत भारतात 5जी सेवा सुरू होणार

3. ओरलांडो - भारताच्या आधार ओळख प्रणालीचा विस्तार मोठ्या प्रमाणावर, विंडोज, अँड्रॉइड, फेसबुक अशा प्रणालींनाही मागे टाकले - मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नादेला

4. नवी दिल्ली - भारताला सोबत घेऊन दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करू, अशा शब्दांत अमेरिकन संरक्षणमंत्री जीम मॅटिस यांनी पाकिस्तानवर थेट हल्ला चढविला

5. नवी दिल्ली - गुरमीत राम रहीमची कथित कन्या हनीप्रीतला ट्रान्झिट अंतरिम जामीन देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला

6. हैदराबाद - निवृत्तीला तीन दिवस शिल्लक असताना एका अधिका-याकडे तब्बल 500 कोटी रुपयांची मालमत्ता भ्रष्टाचारविरोधी पथकाने समोर आणली

7. मुंबई - संपत्तीच्या अवैध हस्तांतरण प्रकरणी दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर, इसरार सय्यद, मुमताझ शेख आणि इतरांविरोधात चौकशीस सुरुवात

8. मुंबई - ‘हुरुन इंडिया’ने जारी केलेल्या श्रीमंतांच्या सहाव्या वार्षिक यादीनुसार रिलायन्सचे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत तब्बल 58 टक्के वाढ

9. पुणे - फुले-शाहू-आंबेडकर यांचा महाराष्ट्र पुरोगामी असे म्हटले जाते, ते तिघे पुरोगामी होते; पण महाराष्ट्र कधीच पुरोगामी नव्हता, आणि आजही नाही - राजन खान

10. मुंबई - इंटरनेट जगतातील सर्व नेटकऱ्यांसाठी अत्यंत लोकप्रिय असलेल्या लाडक्या गुगलचा आज 19 वा वाढदिवस

11. पुणे - अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये गाजलेल्या 'घुमा' चित्रपटाचे 'पसायदान' हे गाणे रिलीज, घुमा 29 सप्टेंबर रोजी होणार प्रदर्शित

12. नवी दिल्ली - दक्षिण आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशीपचे यजमानपद भारताला, गुवाहाटीमध्ये होणार स्पर्धा

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Lets Up News Updates

1. नवी दिल्ली - पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी बीएसएफने राबवले ऑपरेशन अर्जुन, यामध्ये पाकिस्तानचे 7 सैनिक आणि 11 नागरिक मारले गेले, पाकिस्तानने टेकले गुडघे

2. नवी दिल्ली - भारतीय पॅराकमांडोंनी आज पहाटे म्यानमार सीमेजवळ केली कारवाई, मात्र हा सर्जिकल स्ट्राईक नाही तर लष्कराची कारवाई आहे : भारतीय सैन्यदलाने केले स्पष्ट

3. नवी दिल्ली - सरकारने नोटाबंदीचा घेतलेला निर्णय हा आगीत तेल ओतण्यासारखाच आहे, भाजपा नेते यशवंत सिन्हा यांनी केली टीका

4. नवी दिल्ली - केंद्र सरकार बोफोर्स प्रकरण पुन्हा उकरून काढत आहे; काँग्रेसला बदनाम करण्याची ही खेळी आहे : मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते

5. सिरसा - ईडी आणि आयकर विभाग करणार राम रहीमच्या संपत्तीची चौकशी; पंजाब-हरयाणा हायकोर्टाचे आदेश

6. ठाणे - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला आणखी 4 दिवसांची पोलिस कोठडी

7. काबुल - काबुल विमानतळावर 20 ते 30 रॉकेटने हल्ला, अनेक विमानांचं उड्डाण रद्द, हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता

8. मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 31159.81, निफ्टी : 9735.75, सोने भाव : 29,796 (प्रतितोळा), चांदी : 39,935 (प्रतिकिलो)

9. मुंबई - खोटी माहिती पसरवण्यासाठी आणि लोकांची मने कलुषित करण्यासाठी भाजपने सोशल मीडिया नावाचे अस्त्र वापरले, तेच आता त्यांच्यावर बुमरँग झाले : राज ठाकरे

10. औरंगाबाद - चंद्रकांत दादा स्वतः बोगस व्यक्ती आहेत. ते स्वतः मुख्यमंत्री असल्याच्या अविर्भावात असतात : राजू शेट्टी

11. पुणे - नारायण राणेंच्या दिल्ली भेटीदरम्यान राजकीय चर्चाही झाल्या, त्या चर्चेला मूर्त स्वरूप मिळाल की लवकरच भूमिका स्पष्ट करू : रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष

12. ट्विटरने ट्विटमधील अक्षरसंख्या वाढवण्याचा घेतला निर्णय, आता ट्विट करताना कॅरेक्टर लिमिट 280 होणार, ट्विटरची माहिती

13. मोझिलाने आपल्या फायरफॉक्स या ब्राऊजरची नवीन बीटा आवृत्ती केली सादर, हि आवृत्ती आधीपेक्षा दुपटीने अधिक गतीमान असणार

14. मुंबई - भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर सट्टा, बॉलिवूड अभिनेत्याच्या (अमित अजित गिल) नातेवाईकासह सहा जण अटकेत

15. मुंबई - राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘द सायलेंस’ या वास्तवदर्शी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित


न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Lets Up News Updates

1. जम्मू-काश्मीर - बांदीपुरा येथे दहशतवाद्यांनी रमीज अहमद परे या निवृत्त जवानाची गोळी मारून केली हत्या, गोळीबारात कुटुंबातील 3 जण जखमी

2. *सण-उत्सवाचा मौका, शॉपिंग तो बनती है बॉस! जबरदस्त ऑफर्स आणि डिस्काऊंट्ससाठी लिंकवर क्लिक करा आणि शॉपिंग करा बिनधास्त https://goo.gl/YYfp5P*

3. नवी दिल्ली - तुम्ही आता 31 डिसेंबर 2017पर्यंत आधारला पॅन कार्डशी जोडू शकता, केंद्र सरकारने अधिकृतरीत्या केली घोषणा

4. नवी दिल्ली - ‘सौभाग्य’ची वीज फुकट नाही! गरिबांना फक्त वीज जोडणी विनामूल्य, सरकारचा खुलासा

---------------------------------------------
आजचे राशीभविष्य जाणून घेण्यासाठी क्लिक करा... http://bit.ly/horo-28-sept
---------------------------------------------

5. नवी दिल्ली - साखरेचे दर 45 रुपये किलोच्या आत राहणार असतील तर यावर्षी साखरेची आयात होऊ देणार नाही : नितीन गडकरी

6. नवी दिल्ली - लघु उद्योगांना उद्योग जगतातील आव्हानांचा लाभ घेण्यासाठी जीएसटीच्या कक्षेत यावे लागेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी

7. नवी दिल्ली - भाजपनेते लालकृष्ण अडवाणी पुन्हा लाेकसभा शिस्तपालन समितीचे बनले अध्यक्ष

8. नवी दिल्ली - कामाच्या प्रचंड बोजामुळे जेटली वित्त मंत्रालयास न्याय देऊ न शकल्याने त्यांनी देशाची अर्थव्यवस्था खड्ड्यात घातली : यशवंत सिन्हा, ज्येष्ठ भाजपानेते

9. ठाणे - दाऊदचा भाऊ इक्बाल कासरकर याची टोळी छोटा शकील चालवत असून, खंडणीच्या गुन्ह्यांचा तोच मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांचा दावा

10. न्युयाॅर्क - उत्तर कोरियाला क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आणि अण्वस्त्र तंत्रज्ञान काेणत्या देशाच्या सहकार्यामुळे मिळाले, याची चौकशी व्हायला हवी : सुषमा स्वराज, परराष्ट्रमंत्री

11. न्यूयॉर्क - लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबई हल्ल्यातला मास्टरमाईंड हाफिज सईद पाकिस्तानसाठी डोकेदुखी : ख्वाजा आसिफ, पाक परराष्ट्रमंत्री

12. मुंबई - कर्जखाते असलेल्या बँकेला शेतक-यांनी तात्काळ आधार क्रमांक द्यावा, आपला आधार नंबर कर्जखात्याशी नोंद करुन घ्या, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे आवाहन

13. मुंबई - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना थेट भाजपमध्ये प्रवेश न देता मित्रपक्ष म्हणून त्यांचा एनडीएत समावेश करण्याच्या निर्णयावर भाजप पक्षश्रेष्ठींनी केले शिक्कामोर्तब

14. मुंबई - टाटा मोटर्सने आपली नवी कार ‘नेक्सन’ केली लाँच, या कारच्या बेसिक मॉडेलची किंमत 5.85 लाख रुपये (एक्स शोरुम)

15. बंगळुरु - विराट कोहलीची टीम इंडिया मालिकेतील चौथ्या विजयासाठी सज्ज, संघात काही बदल करण्याची शक्यता

16. लॉस एंजेलिस - फोर्ब्सच्या यंदाच्या सर्वाधिक कमाई करणा-या टिव्ही अभिनेत्रींच्या यादीत सोफिया वरगारा पहिल्या तर बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आठव्या क्रमांकावर

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Lets Up News Updates

1. नवी दिल्ली - लवकरच तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल घरपोहोच मिळण्याची शक्यता, पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती

2. नवी दिल्ली - केंद्र सरकार लवकरच शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील तब्बल 20 लाख रिक्त पदे भरणार, केंद्रीय कामगार मंत्रालयाच्यावतीने यासाठी पुढाकार

3. नवी दिल्ली - रेल्वे टीसींना तिकीट चेकिंगसाठी युनिफॉर्मसक्ती; सर्व आरपीएफ स्टाफ, तिकीट चेकर यांनी अधिकृत गणवेशातच चेकिंग करावं : पियुष गोयल, रेल्वेमंत्री

4. नवी दिल्ली - सरकार अडचणीत आले की सर्जिकल स्ट्राइक करतं, काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केली खरमरीत टीका

5. नवी दिल्ली - नोटबंदीच्या परिणामांची शहानिशा न करताच जीएसटी लागू करण्याची घाई केली, भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी केला हल्लाबोल

6. जयपूर - योगगुरु रामदेव बाबा यांच्या ‘पतंजली आयुर्वेद’ने टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये केला शिरकाव, अंडरवेअर ते स्पोर्ट्सवेअर तयार करण्याचा रामदेव बाबा यांचा मानस

7. गोवा - बलात्कार प्रकरणी तरुण तेजपाल यांच्यावरील आरोप निश्चित, आपण दोषी नसल्याचा तरुण तेजपाल यांचा दावा, 21 नोव्हेंबरला पुढील सुनावणी

8. लॉस एंजल्स - जगप्रसिद्ध मॅगझीन ‘प्लेबॉय’चे संस्थापक ह्यू हेफनर यांचं वृद्धापकाळाने निधन, ते 91 वर्षांचे होते

9. न्यूयॉर्क - कुलभूषण जाधव यांच्या मोबदल्यात पेशावरमधील शाळेवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याला सोडण्याचा प्रस्ताव, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांचा दावा

10. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी संसदेचे कनिष्ठ सभागृह बरखास्त करून मध्यावधी निवडणुका घेण्याचे दिले संकेत

11. मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 31282.48, निफ्टी : 9768.95, सोने भाव : 29,632 (प्रतितोळा), चांदी : 39,767 (प्रतिकिलो)

12. मुंबई - मुंबईत लोकलच्या 2 ऑक्टोबरपासून 60 नव्या फेऱ्या, गर्दीच्या वेळी कोणतीही फेरी नाही

13. कोल्हापूर - छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत झाला राडा, सतेज पाटील-महादेव महाडिक गट भिडले, कार्यकर्त्यांची हाणामारी

14. नवी दिल्ली - रॉयल एनफिल्ड कंपनी लवकरच दमदार आणि हटके लुक असणारी इंटरसेप्टर 750' ही नवी बुलेट लाँच करण्याची शक्यता

15. बंगळुरु - भारत वि. ऑस्ट्रेलिया चौथी वनडे, ऑस्ट्रेलियाचे भारतापुढे 335 धावांचे आव्हान, उमेश यादवचे 4 बळी

16. मुंबई - मराठी चित्रपट अभिनेत्री मृण्मयी गोडबोलेची प्रमुख भूमिका असलेला द्वैभाषिक चित्रपट 'सीआरडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Lets Up News Updates

1. नवी दिल्ली - सरकारी योजनांचा आणि अनुदानांचा लाभ घेण्यासाठी ‘आधार क्रमांक’ प्राप्त करण्याची मुदत केंद्र सरकारने 31 डिसेंबरपर्यंत वाढवली

2. नवी दिल्ली - पान टपर्‍यांवर सॉफ्टड्रिंक्‍स, बिस्किट तसेच चॉकलेट विकण्यावर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा विचार, तसा प्रस्ताव तयार करण्यात आला

3. नवी दिल्ली - केंद्र सरकार लवकरच शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील तब्बल 20 लाख रिक्त पदे भरणार, रेल्वेतच सुमारे 2 लाखाहून अधिक पदे

4. नवी दिल्ली - उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाकडून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता

5. नवी दिल्ली - उत्तर प्रदेश कॅडरची आयपीएस अधिकारी अपर्णा कुमार ठरली माउंट मनास्लू सर करणारी पहिली भारतीय महिला

6. नवी दिल्ली - नोटबंदीनंतर पेमेंट सिस्टीममध्ये केलेल्या बदलांमुळे विविध बँकांना 3800 कोटी रुपयांचा फटका बसला

7. पुणे - दसऱ्याच्या निमित्ताने शनिवारी बंद होणाऱ्या बँका थेट मंगळवारीच उघडणार, रोख रकमेची अडचण भासण्याची शक्यता

8. मुंबई - महाराष्ट्रातील नवबौद्धांता कायदेशिररित्या बौद्ध समजणे अनिवार्य, त्यांना बौद्ध अल्पसंख्यांक कायदेशीर दर्जा 1956 पासूनच - राज्य सरकार

9. बीड - भगवान बाबा यांचे जन्मगाव घाट सावरगाव येथील गावकऱ्यांनी निमंत्रण दिल्यामुळे पंकजा मुंडें दसरा मेळावा सावरगाव येथे घेणार

10. न्यूयॉर्क - भारतीय एनजीओ ‘प्रथम’ने भारतातील उपेक्षित मुलांच्या शिक्षणासाठी 40 लाख डॉलरची रक्कम जमा केली

11. मुंबई - बीबीसीची शंभर प्रभावशाली महिलांची यादी जाहीर, त्यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची आई मेहरूनिस्सा सिद्दीकी यांच्या नावाचा समावेश

12. बंगळूर - चौथ्या वन-डेत ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी विजय, 335 धावांचा पाठलाग करताना भारताच्या 50 षटकात 8 बाद 313 धावा

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
लेट्स अप डिजिटल न्यूज पेपर

आज दिवसभरात काय घडले याचा आढावा...!

सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा http://myletsup.com/digitalnewspaper.pdf

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

प्रतिक्रिया कळवा : feedback@myletsup.com
Lets Up News Updates

1. श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती यांनी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण व सेना प्रमुख जनरल बिपीन राव यांची घेतली भेट

2. नवी दिल्ली - एका सर्वेक्षणानुसार सर्जिकल स्ट्राइक्सनंतर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाशी संबंधित हिंसाचारात मृत्यू होण्याचे प्रमाण 31 टक्क्यांनी वाढले

3. नवी दिल्ली - स्पाइस जेट कंपनी 50 क्यू 400 टर्बोप्रॉप विमाने खरेदी करणार, त्यात 90 आसनी टर्बोप्रॉप विमान उडविणारी स्पाइसजेट पहिली ठरणार

4. नवी दिल्ली - दसरा, दिवाळीसह सणासुदीचा फायदा घेण्याच्या उद्देशाने स्टेट बँकेने कर्जांच्या किमान आधारभूत दरात (बेस रेट) 0.05 टक्के घट केली

5. नवी दिल्ली - कुलभूषण जाधव यांच्या सुटकेच्या बदल्यात दहशतवाद्याची सुटका करण्याचा प्रस्ताव असल्याचा पाकिस्तानचा दावा भारताने खोडाला

6. राजस्थान - महिलेला लिफ्ट दिल्यानंतर रस्त्याच्याकडेला नेऊन तिच्यावर 23 जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बिकानेरमध्ये घडली

7. मुंबई - काँग्रेसचा राजीनामा दिलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे 1 ऑक्टोबरला आपल्या नव्या पक्षाची स्थापना करणार असल्याची माहिती

8. मुंबई - एल्फिन्स्टन स्थानकातील चेंगराचेंगरीनंतर रेल्वेच्या मुंबईतील सर्व पादचारी पुलांचे आठवड्याभरात ऑडिट करण्याचे आदेश

9. मुंबई - डॉ. तात्याराव लहाने यांची अॅट्रॉसिटीच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता, सबळ पुराव्यांअभावी सत्र न्यायालयाने डॉ. लहाने यांना निर्दोष ठरवले

10. नवी दिल्ली - यापुढील काळात होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदारांना आपले मत कोणाला गेले हे तत्काळ समजणार

11. मुंबई - बहुचर्चित ‘पद्मावती’मधील एका गाण्यावरील नृत्यासाठी संजय लीला भन्साळीने कॅटरिना कैफला साईन केले असल्याची चर्चा

12. लंडन - इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सच्या मारहाणीच्या व्हिडिओनंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) स्टोक्सवर निलंबनाची कारवाई केली

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
आजचा डिजिटल न्यूजपेपर वाचा लगेच

दिवसभरात काय घडले याचा आढावा लेट्सअप-डिजिटल न्यूजपेपर सोबत...!

सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा http://myletsup.com/digitalnewspaper.pdf

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

प्रतिक्रिया कळवा : feedback@myletsup.com
Lets Up News Updates

1. नवी दिल्ली - भारतात अत्यंत लोकप्रिय असलेली आकाशवाणी आता जपान, जर्मनी, द. आफ्रिका, कॅनडा या देशांत आपली सेवा सुरू करणार

2. नवी दिल्ली - घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 1.50 रुपयांनी वाढ, दिल्लीमध्ये 14.2 किलोग्रॅम अनुदानित गॅस सिलिंडरचा दर 488.68 रुपये

3. नवी दिल्ली - विकासासाठी पैशांची गरज असते, ज्यांना देशात विकास पाहिजे आहे, त्यांना त्या विकासासाठी किंमत तर मोजावीच लागेल - अरुण जेटली

4. नवी दिल्ली - दिवाळीनंतर राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याची शक्यता असल्याचे सचिन पायलट यांनी सांगितले

5. नवी दिल्ली - भारतीय जवानांना स्वदेशी पण अत्यंत हलके आणि अभेद्य असलले ‘सुरक्षा कवच’ जवानांना सुरक्षा प्रदान करणार

6. गुजरात - अरबी समुद्रात 130 फूट खोलीवर 10 हजार वर्षे जुने अवशेष आढळले, तज्ज्ञांच्या मते भगवान श्रीकृष्णाने वसवलेली द्वारका नगरीचा हा भाग

7. नागपूर - फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे गेल्या तीन महिन्यात विदर्भात 18 शेतकऱ्यांचा मृत्यू तर 546 शेतकरी व्हेंटिलेटरवर

8. मुंबई - राज्यातील 29 जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदेच्या 15 हजार 766 प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश राज्य शासनाने काढले

9. मुंबई - महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला स्टेट बँक आॅफ इंडिया वित्तपुरवठा करणार

10. नवी दिल्ली - जिओ आणि आयफोन यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला असून लवकरच जिओच्या स्टोअरमध्ये आयफोन उपलब्ध होणार

11. मुंबई - कॉलेजविश्वातल्या नाट्यप्रेमींचं मुख्य आकर्षण ठरणाऱ्या आयएनटी एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत दहा एकांकिका दाखल

12. नागपूर - अंतिम वनडे सामन्यात रोहित शर्माच्या धडाकेबाज शतकाच्या बळावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 7 गडी राखून पराभव केला

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup