LetsUpp Marathi
4.85K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
👉 केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार; जाणून घ्या फेरबदल काय?

Lets Up Special Update

अखेर आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एकूण 13 जणांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. मागील 3 वर्षांच्या कार्यकाळात भरीव कामगिरी करणाऱ्यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती देण्यात आली तर, एकूण 9 नव्या चेहऱ्यांना राज्यमंत्री म्हणून संधी देण्यात आली आहे. सुरेश प्रभूंकडे वाणिज्य, त्याबरोबरच राज्यवर्धन सिंह राठोड यांच्याकडे क्रीडा आणि युवक-कल्याण खात्याचा स्वतंत्र प्रभार सोपवण्यात आला आहे.

👉 कॅबिनेट मंत्रिपदी 4 जणांना बढती

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, ऊर्जामंत्री पियूष गोयल, वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन व संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती देण्यात आली आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

👉 9 नवे चेहरे

मंत्रिमंडळात नवीन 9 चेहऱ्यांचा समावेश केला आहे. यात 4 निवृत्त सनदी अधिकारी आहेत. पैकी 2 आयएएस, 1 आयपीएस, 1 आयएफएस अधिकारी राहिलेले आहेत.

👉 घटकपक्षांना स्थान नाही!

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या घटकपक्षांनाही सामावून घेतले जाईल, अशी चर्चा होती. मात्र, ती फोल ठरली आहे. नव्या विस्तारात एकाही मित्रपक्षाला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही.

👉 सीतारामन देशाच्या नव्या संरक्षणमंत्री

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर संरक्षणमंत्रिपद भूषविणाऱ्या निर्मला सीतारामन या दुसऱ्या महिला ठरणार आहेत. मनोहर पर्रिकर हे गोव्याच्या राजकारणात परतल्यापासून संरक्षणमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे होता. आता देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या संरक्षण खात्याला पुन्हा एकदा पूर्णवेळ संरक्षणमंत्री मिळाला आहे.

👉 पीयूष गोयल नवे रेल्वे मंत्री

ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्या खांद्यावर रेल्वे खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याआधी राज्यमंत्री असलेल्या गोयल यांच्याकडं ऊर्जा व कोळसा मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार होता. या खात्यात त्यांनी अनेक सुधारणा घडवून आणल्या. कोळखा खाणींच्या लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता आणली. त्यांच्या कामावर पंतप्रधान मोदीही समाधानी होते. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना बढतीच्या रूपात रेल्वेची जबाबदारी देण्यात आली आहे.

👉 जाणून घ्या कोणाला कोणतं खातं?

कॅबिनेट मंत्री

1) धर्मेंद्र प्रधान : कौशल्य व उद्योजकता विकास, पेट्रोलियम मंत्रालय

2) पीयुष गोयल : रेल्वे मंत्रालय

3) नर्मला सीतारमन : संरक्षण मंत्री

4) मुख्तार अब्बास नकवी : अल्पसंख्याक मंत्रालय

5) सुरेश प्रभू : वाणिज्य मंत्रालय

6) स्मृती इराणी : माहिती आणि प्रसारण मंत्रालय, वस्रोद्योग मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी

7) नितीन गडकरी : जल संसाधन मंत्री

8) उमा भारती : पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय

राज्यमंत्री

1) शिव प्रताप शुकला (राज्यसभा खासदार, यूपी सरकारमध्ये 8 वर्षे मंत्रिपदाचा अनुभव)

खातं : अर्थ राज्यमंत्री.

2) अश्विनी कुमार चौबे (बिहारमधून 5 वेळा लोकसभा खासदार. बिहार सरकारमध्ये मंत्रिपदाचा अनुभव)

खातं : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय.

3) वीरेंद्र कुमार (मध्य प्रदेशातून 6 वेळा लोकसभा खासदार. दलित समाजाचे नेते)

खातं : बालविकास मंत्रायल आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्रालय.

4) अनंत कुमार हेगडे (खासदार - उत्तर कर्नाटक)

खातं : कौशल्य व उद्योजकता विकास

5) राजकुमार सिंह (खासदार - बिहार. माजी सनदी अधिकारी. गृहसचिवपदाचा अनुभव)

खातं : ऊर्जा आणि नूतनीकरण आणि अक्षय ऊर्जा मंत्रालय (स्वतंत्र प्रभार)

6) हरदीप सिंह पुरी (1974 च्या बॅचचे माजी आयएफएस, सुरक्षा व परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक)

खातं : गृहनिर्माण आणि शहरी विभाग मंत्रालय (स्वतंत्र प्रभार)

7) गजेंद्र सिंह शेखावत (खासदार - राजस्थान)

खातं : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय.

8) सत्यपाल सिंह (खासदार - यूपी. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त)

खातं : मनुष्यबळ व विकास मंत्रालय, जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालय .

9) अल्फोंस कन्नननाथम (1979 च्या बॅचचे माजी आयपीएस अधिकारी)

खातं : पर्यटन मंत्रालय (स्वतंत्र प्रभार)

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Lets Up News Updates

1. प्याँगयांग - उत्तर कोरियाकडून हायड्रोजन बॉम्बची चाचणी, संपूर्ण जगात एकच खळबळ

2. सिंगापूर - भारतीय वंशाच्या जे. पिल्लई यांची सिंगापूरच्या हंगामी राष्ट्रपतीपदी नियुक्ती

---------------------------------------------
‘या’ देशात संरक्षणमंत्रीपदी महिला, सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा... http://bit.ly/female-defence-minister
---------------------------------------------

3. नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेने दिलेल्या इशाऱ्यानंतरही नोटबंदी करण्यात आली. त्यामुळे नोटबंदीची मोठी किंमत देशाला मोजावी लागली : रघुराम राजन, RBI माजी गव्हर्नर

4. पाटणा - भाजपसोबत हातमिळवणी करुन नितीशकुमार यांनी स्वतःचे नुकसानच केले : लालूप्रसाद यादव

5. मुंबई - एनडीएची हत्या झाली आहे; एनडीए फक्त बैठकीपुरतंच, शिवसेनेची संतप्त प्रतिक्रिया

6. मुंबई - लोकलची मागणी आणि त्याप्रमाणातील पुरवठ्यावर लोकलचे प्रवासभाडे बदलणार, मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार

7. मालवण - किनारपट्टीवर दक्षिण दिशेकडुन वाहणाऱ्या वाऱ्यांचा जोर वाढल्याने मासेमारी व्यवसाय ठप्प

8. एयरटेलचा नवीन प्लॅन; 399 रूपयांत 84 दिवसांसाठी 84 जीबी डाटा

9. सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोवीच आणि येलेना जोकोवीच दाम्पत्याला कन्यारत्नाची (तारा) प्राप्ती

10. कोलंबो - भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 फलंदाजांना यष्टीचीत करण्याचा नवा विश्वविक्रम केला

11. मुंबई - बॅालिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा 'इजंट इट रोमॅंटिक' या हॉलिवूडपटात 'सिक्स पॅक अॅब्स'मध्ये दिसणार, यात ती योगगुरुची भूमिका साकारणार

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Lets Up News Updates

1. नवी दिल्ली - भारत, बांगलादेश आणि नेपाळ या तीन देशांमध्ये आलेल्या पुरामुळे या तिन्ही देशांतील मिळून एकूण 1.60 कोटी मुले बाधित झाली - युनिसेफ

2. नवी दिल्ली - मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षीच्या ब्रिक्स परिषदेसाठी चीनला रवाना, दहशतवाद मुद्दा गाजणार

3. नवी दिल्ली - बँक कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वरूपाची आणि जनहिताशी संबंधित नसलेली माहिती ही आरटीआयमध्ये येत नाही - सर्वोच्च न्यायालय

4. नवी दिल्ली - RBIने 200 रुपयांची नोट आठवडाभरापूर्वी चलनात आणली असली तरी ती एटीएमवर उपलब्ध व्हायला आणखी 3 महिने लागणार

5. मुंबई - IPLच्या विविध हक्कांवर पकड मिळविण्यासाठी जगभरातील अनेक कंपन्या आज होत असलेल्या लिलावात भाग घेणार

6. उत्तर प्रदेश - ‘ब्ल्यू व्हेल’ खेळाने मध्य प्रदेशमध्ये एका मुलाचा जीव घेतला, एका 17 वर्षीय मुलाने धावत्या रेल्वेसमोर येऊन आत्महत्या केली

7. मुंबई - अवघ्या एक रुपयात रुग्णांना आरोग्यसेवा देणारा वन रुपी क्लिनिक हा प्रकल्प समाजकंटकांच्या त्रासाला वैतागून बंद करण्याचा निर्णय

8. मुंबई - केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर आता राज्याच्या विस्ताराकडे लक्ष लागले असून नारायण राणेंचा भाजप प्रवेश आणि मंत्रीपद एकाचवेळी होणार

9. लातूर - लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी लातूर येथे लिंगायत समन्वय समितीच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला

10. चीन - ब्रिक्स देशांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाशी लढा देण्यासाठी समग्र दृष्टिकोन स्वीकारावा, असे आवाहन चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी केले

11. मुंबई - ट्विटर आणि फेसबुकप्रमाणे आता तुमचे अकाऊंट व्हॉट्सअॅपवरही व्हेरिफाईड करता येणार, लवकरच बिझनेससाठी भारतात नवीन अॅप

12. मुंबई - भारत-श्रीलंका यांच्यातील पाचव्या वन-डेत भारताने 6 विकेटने विजय मिळवत श्रीलंकेला व्हाइट वॉश दिला, बुमराह मॅन ऑफ द सीरीज

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Lets Up News Updates

1. जम्मू-काश्मीर - सोपोरमध्ये सुरक्षादलाच्या गोळीबारात हिजबुल मुजाहिद्दीनचे 2 दहशतवादी ठार, कोम्बिंग ऑपरेशन चालूच

2. नवी दिल्ली - आयपीएल प्रक्षेपणासाठी स्टार इंडिया कंपनीची 16 हजार 347 कोटींची सर्वाधिक बोली, सोनी पिक्चर्सची मक्तेदारी मोडीत काढली

3. नवी दिल्ली - अरुण जेटली यांची मानहानी केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला

4. नवी दिल्ली - कॉंग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी जाणार अमेरिकेच्या दौऱ्यावर , सिलिकॉन वॅली येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात होणार सहभागी

5. नवी दिल्ली - देशाच्या पहिल्या फुलटाईम संरक्षणमंत्री म्हणून निर्मला सीतारमण यांची नियुक्ती केल्यानंतर त्या गुगल इंडियावर सर्वाधिक सर्च केल्या गेल्या

6. उत्तर प्रदेशा - फर्रुखाबाद येथील राम मनोहर लोहिया रुग्णालयात ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा असल्याने एका महिन्यात 49 चिमुरड्यांचा मृत्यू

7. मुंबई - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री' निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांसह राज्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली

8. सांगली - हिंदू आणि मुस्ल‌िम समाजात दंगल झाल्याची अफवा पसरवल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक शरद रामचंद्र दिंडेला अटक

9. बीजिंग - ब्रिक्स परिषदेत सहभागी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा शांतता आणि विकासासाठी सहकार्याचे आवाहन केले

10. बीजिंग - आंतरराष्ट्रीय शांतता आणि विकासाच्या दृष्टीने आपण सर्वांनी एकजुटीने आवाज उठवत, समस्यांवरही एकत्रितपणे मार्ग काढला पाहिजे - चीन राष्ट्राध्यक्ष

11. मुंबई - हायड्रोजन बॉम्बमुळे सोन्याच्या दरात वाढ, सोने 29 हजारावरून 30 हजाराच्या घरात

12. मुंबई - टेनिस स्‍टार मारिया शारापोव्‍हा अमेरिकन ओपन मधून बाहेर, अनास्‍तासिजा सेवास्‍तोवा हिने मारियाला पराभूत करत बाहेरचा रस्‍ता दाखवला

13. मुंबई - फिल्मी पुरस्कार सोहळ्यात पक्षपात होत असतो, उद्या मला ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला तरी स्वीकारायला जाणार नाही - कंगना राणावत

14. पुणे - ‘मुंबई-पूणे-मुंबई’ सिरीज चा तिसरा पार्ट लवकरच प्रेक्षाकांच्या भेटीला येणार, या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार

15. मुंबई - रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने कंबर कसली असून एअरटेल आता आठ रुपयांपासून सुरू होणारे टॅरिफ प्लॅन आणणार

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Lets Up News Updates

1. नवी दिल्ली - ब्रिक्स देशांच्या जाहीरनाम्यात प्रथमच पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांची नावे प्रसिद्ध करण्यात आली, भारताचा राजनैतिक विजय

2. नवी दिल्ली - डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वेपासून ते एसटीच्या तिकिटापर्यंत डिजिटल पेमेंट करण्याची सक्ती होण्याची शक्यता

3. नवी दिल्ली - बलात्कारप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा झालेल्या रामरहीमच्या डेरा मुख्यालयावर पोलिसांनी छापा मारला, मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त

---------------------------------------------
आजचे राशीभविष्य जाणून घेण्यासाठी क्लिक करा... http://bit.ly/horosep05
---------------------------------------------

4. नवी दिल्ली - महाराष्ट्रातील 25 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार, आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार पुरस्कारांचे वितरण

5. नवी दिल्ली - ध्वनिप्रदूषणाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला केंद्र सरकारने दिले होते आव्हान

6. मुंबई - टीसीएलएल राज्यातील 15 हजार बेरोजगार युवकांना ‘प्रमोद महाजन कौशल्यविकास व उद्योजकता’ अभियानांतर्गत प्रशिक्षण देणार

7. मुंबई - शांतता क्षेत्रं निश्चित करेपर्यंत लाउड स्पीकर्सना बंदी घालता येणार नाही हा राज्य सरकारचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला

8. मुंबई - साईभक्तांसाठी केंद्र सरकारची खुशखबर, शिर्डीला जाण्यासाठी मुंबई, दिल्ली आणि हैदराबादहून दररोज सहा विमाने सुटणार

9. नागपूर - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी 8 सप्टेंबरला राज्याच्या दौऱ्यावर, सकाळी 9.30 वाजता नांदेड येथे विभागीय मेळावा, 1.30 वाजता परभणी येथे सभा

10. वॉशिंग्टन - डोनाल्ड ट्रम्प डेफर्ड अॅक्शन फॉर चिल्ड्रन अरायव्हल योजना रद्द करण्याच्या तयारीत, 7000 भारतीय वंशाच्या नागरिकांवर टांगती तलवार

11. मुंबई - अनेक सिनेमांना कात्री लावून चर्चेत राहणारे सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या ‘जुली-2’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

12. पुणे - महेश काळे दिग्दर्शित 'घुमा' चित्रपटाचा दुसरा टीजर रिलीज, चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Lets Up News Updates

1. बंगळुरु - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या, त्या ‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या संपादिका होत्या

2. नवी दिल्ली - बालविवाह म्हणजे मॅरेज नव्हे, तर मिराज आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने बालविवाहावर चिंता व्यक्त केली

3. नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियामध्ये एका कंपनीने मटनाच्या जाहिरातीत गणपतीला दाखवले, येथील हिंदू समाजात नाराजीचे वातावरण

4. नवी दिल्ली - अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले अब्दुल रशीद यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी गौतम गंभीरचा पुढाकार, शिक्षणाचा सर्व खर्च उचलणार

5. नवी दिल्ली - भटिंडा येथील मोर मंडीत झालेल्या कार स्फोटात बलात्कारी बाबा रामरहीमचा हात असल्याची धक्कादायक माहिती उघड

6. मुंबई - राष्ट्रीय अथवा राज्य महामार्ग जाणाऱ्या महापालिका, नगर परिषदा व नगरपंचायतीच्या 500 मीटर हद्दीतील दारूविक्रीवरील बंदी राज्य सरकारने मागे घेतली

7. मुंबई - राज्यभरात काही ठिकाणी गणपती विसर्जन सोहळ्याला गालबोट, दिवसभरात झालेल्या अपघातांमध्ये 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

8. सातारा - कोयना धरण परिसरासह कोकण किनारपट्टीला भूकंपाचा सौम्य धक्का, या भूकंपाची क्षमता 3 रिश्टर स्केल नोंदविली गेली

9. औरंगाबाद - गणपती विसर्जनासाठी गेले असताना बिडकीनजवळ शिवनाई तलावात बुडून तीन मुलांचा मृत्यू

10. मुंबई - होंडाने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘दी ग्रेट होंडा फेस्ट’ ही स्पेशल ऑफर आणली, 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2017 पर्यंत असणार ही ऑफर

11. मुंबई - ‘तु माझा सांगाती’ ही मराठी मालिका लवकरच 1000 भाग पूर्ण करत असून मालिकेचे दुसरे पर्व लवकरच सुरू होणार, भरत जाधव विठ्ठल साकारणार

12. मुंबई - भारताच्या पुढील वर्षीच्या इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक निश्चित, भारत इंग्लंडविरूद्ध तीन टी-20, तीन वन डे आणि पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Lets Up News Updates

1. म्यानमार - देशहितासाठी कठोर निर्णय घेतच राहणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा म्यानमारमध्ये भारतीयांशी संवाद

2. नवी दिल्ली - भारत लवकरच रशियाकडून S-400 एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी करणार, यामुळे हवाई सुरक्षा अधिक बळकट होणार

3. नवी दिल्ली - लष्करच नव्हे तर संपूर्ण देशाला चीन आणि पाकिस्तानसोबतच्या एकत्र युद्धाला तयार राहायला हवं : बिपीन रावत, लष्करप्रमुख

---------------------------------------------
आजचे राशीभविष्य जाणून घेण्यासाठी क्लिक करा... http://bit.ly/horo_7_Sept
---------------------------------------------

4. नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने 13 वर्षांच्या एका 31 आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातासाठी दिली परवानगी

5. नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या सुरक्षा ताफ्यातील बेपत्ता कमांडो सापडला, आर्थिक विवंचनेमुळे राकेश कुमार घरी परतला नव्हता

6. वॉशिंग्टन - अमेरिकेच्या राजकारणातील श्रेष्ठ नेत्यांची यादी जाहीर, 5 भारतीय नेत्यांची वर्णी, यात अमेरिकेची राजदूत निक्की हेली, सीमा वर्मा, वकील नील कत्याल, अर्थशास्त्री अर्पणा माथुर आणि वकील नियोमी राव यांचा समावेश

7. मुंबई - 1993 सालचा बॉम्बस्फोट खटला, कुख्यात गुंड अबू सालेमसह 5 जणांच्या शिक्षेचा निर्णय आज

8. मुंबई - गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये केलेल्या कथित घोटाळ्याची चौकशी राज्याच्या लोकायुक्तांमार्फत करण्यास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिली मंजुरी

9. मुंबई - राज्यात सप्टेंबर महिन्यात हलका ते मध्य स्वरूपात काही ठिकाणी पाऊस पडणार, कुलाबा वेधशाळेने वर्तवली शक्यता

10. मुंबई - मुंबई विद्यापीठाची निकालाकरता 19 सप्टेंबर नवी डेडलाईन, बकरी ईद आणि गणेशोत्सवामुळे निकालाला उशीर झाल्याचा दावा

11. मुंबई - परदेशी शिष्यवृत्तीसाठी आपल्या मुलीची निवड निकषांनुसारच, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचा दावा

12. नवी मुंबई - सोसायटीमधील वादातून जमावाकडून चौघांवर कोयत्याने हल्ला, एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी, ऐरोली सेक्टर 2 मधील भर रस्त्यात घडली घटना

13. मुंबई - वेगवेगळ्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी, महाराष्ट्र राज्य सरकार चतुर्थ श्रेणी कर्मचारी 21 आणि 22 सप्टेंबरला संपावर जाणार

14. स्मार्टफोन बाजारात सध्या जोरदार स्पर्धा, विक्रीमध्ये अॅपलची तिसऱ्या स्थानी घसरण तर सॅमसंग आजही पहिल्या स्थानावर कायम

15. कोलंबो - भारताचा श्रीलंकेवर 7 गडी राखून दणदणीत विजय, कर्णधार विराट कोहलीने 82 धावांच्या खेळीच्या जोरावरच मालिकावीर आणि सामनावीराचा पुरस्कार पटकावला

16. मुंबई - बजेट वाढल्याने बॉलिवुड अभिनेत्री बिपाशा बासुची वेब सीरीज सुरु होण्याधीच बंद, चाहत्यांची निराशा

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Lets Up News Updates

1. श्रीनगर - दहशतवाद्यांनी शहरातील वर्दळीच्या जहांगिर चौकामध्ये ग्रेनेडहल्ला केला, एका नागरिकाचा मृत्यू तर तीन पोलिसांसह 15 जण जखमी

2. नवी दिल्ली - निर्मला सीतारामन यांनी 8685 माजी सैनिक, हुतात्मा जवानांच्या विधवा आणि कुटुंबीयांसाठी 13 कोटींच्या निधीला मंजुरी दिली

3. नवी दिल्ली - बीएसएनएल तर्फे पुढील वर्षी मार्च महिन्यापासून मोबाइल जगतात क्रांती घडवून आणणाऱ्या ‘फाइव्ह-जी’ सेवेच्या चाचण्या घेण्यात येणार

4. पाटणा - रेल्वे हॉटेल टेंडर प्रकरणात लालू प्रसाद यादव आणि त्यांचे चिरंजीव माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना सीबीआयने समन्स बजावले

5. हरियाणा - हिंसा घडवून आणण्यासाठी डेरा सच्चा सौदाने आंदोलकांना 5 कोटी रूपये दिले, एसआयटीच्या तपासातून धक्कादायक माहिती उघड

6. मुंबई- जुहु परिसरातील बांधकाम सुरु असलेल्‍या 13 मजली इमारतीला तळमजल्‍यावर सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागल्‍यामुळे 6 जणांचा मृत्‍यू झाला

7. मुंबई - राज्यातल्या बैलगाडी शर्यतींवर लागू असलेली बंदी मुंबई हायकोर्टाने आणखी तीन आठवड्यांसाठी कायम ठेवली

8. पुणे - टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशात सातवा क्रमांक पटकाविला

9. मुंबई - महिलेबाबत अपशब्द वापरल्याचा आरोपप्रकरणी अंजली दमानिया यांच्या तक्रारीवरून एकनाथ खडसे यांच्या विरोधात मुंबईत गुन्हा दाखल

10. नाशिक - गेल्या पाच महिन्यात तब्बल 187 नवजात अर्भकांचा मृत्यू, देशातील सर्वाधिक मृत्यूचं प्रमाण असलेलं रुग्णालय म्हणून नाशिक जिल्हा रुग्णालय बदनाम

11. मुंबई - शाहरुख खानला नायक, खलनायकानंतर आता हॉरर चित्रपट करायचा आहे, आपण अशा चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची त्याने इच्छा व्यक्‍त केली

12. मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Lets Up News Updates

1. बंगळुरू - कर्नाटक सरकारने पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्याबाबत पोलिसांना माहिती देणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले

2. नवी दिल्ली - नोटबंदीनंतर मार्च 2017 पर्यंत 2 हजार 451 कोटी रुपये कर जमा तर 4 हजार 900 कोटी रुपये इतका काळा पैसा उघड - आयकर विभाग

3. नवी दिल्ली - अप्रत्यक्ष करात मोठे बदल केल्यानंतर इन्कम टॅक्स, कॉर्पोरेशन टॅक्स व प्रत्यक्ष कर कायद्यातही बदल करण्याचा सरकारचा विचार

4. चंदीगड - राम रहिमच्या सिरसा येथील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात सापडली 5 मुले, विना लेबल औषध, 2 खाेल्याभर नाेटा व प्लास्टिक मनी

5. मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने 13 वर्षीय बलात्कार पीडित मुलीच्या गर्भपाताची परवानगी दिल्यानंतरही तिने मुलाला जन्म दिला, दोघेही सुखरूप

6. मुंबई - भारतातील किरकोळ क्षेत्रातील उद्योग 2021 पर्यंत 85 लाख कोटींचा होणार असल्याचा अंदाज फिक्की आणि डेलोइट या संस्थांनी व्यक्त केला

7. मुंबई - महाराष्ट्र हिरवागार करण्यासाठी 26 सिंचन प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला, नितीन गडकरींची माहिती

8. सातारा - शहीद संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक आजपासून देशसेवेत रुजू होणार, स्वाती महाडिक आज लेफ्टनंट पदाची शपथ घेणार

9. पुणे - पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्रात मुसळधार तर पुण्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

10. मेक्सिकोमध्ये समुद्र किनाऱ्याजवळ 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला असून इमारती आणि घरे कोसळल्याने 32 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

11. मुंबई - जर गौरी लंकेश यांच्यासारख्या वैचारिक व्यक्तींच्या हत्या होत असतील तर हा माझा भारत नाही, प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांचं वक्तव्य

12. मुंबई - भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक असलेल्या वाल्थेरुस मरीजिने यांनाच पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Lets Up News Updates

1. श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याचा (रियाझ अहमद) खात्मा; सोपोरे भागातील शैक्षणिक संस्था बंद, इंटरनेट सेवाही स्थगित

2. नवी दिल्ली - संरक्षण मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, सैन्यात जवळपास 800 महिलांची भरती केली जाणार, यामध्ये 52 महिला जवानांची भरती दरवर्षी केली जाईल

3. नवी दिल्ली - जीएसटी रजिस्ट्रेशन केल्यास एअरटेल फ्री डेटा देणार, जीएसटी फाईल करण्यासाठी तुम्हाला www.airtel.in/gst-advantage येथे जावे लागणार

4. नवी दिल्ली - शाळेच्या बस कंडक्टरनेच (अशोक कुमार) केली 7 वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या, त्याने मुलावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता

5. संयुक्त राष्ट्र - जम्मू कश्मीर भारताचे अभिन्न अंग आहे व भविष्यातही काश्मीर भारताचाच भाग असेल, UN मध्ये भारताने पाकला पुन्हा ठणकावले

6. इस्लामाबाद - काश्मीर प्रश्न हा द्विपक्षीय चर्चेतून सुटू शकतो, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी व्यक्त केले मत

7. सिरसा - ‘डेरा सच्चा सौदा’च्या मुख्यालयाची झाडाझडती सुरू, मृत्यूच्या दाखल्यांशिवाय डेरा सच्चा सौदाकडून 14 मृतदेहांचे दान, मुख्यालयात फटाक्यांचा अवैध कारखाना

8. कोलकाता विमानतळावर विमानातील 100 प्रवासी थोडक्यात बचावले, भूतान एअर लाइन्सच्या विमानाच्या एका इंजिनाला लागली होती आग

9. चेन्नई - वीरपत्नी स्वाती महाडिक भारतीय लष्करात दाखल, दिमाखदार दीक्षांत समारंभात महाडिक लेफ्टनंटपदी रुजू

10. पाटणा - बिहारच्या पुरातून एनडीआरएफच्या जवानांनी वाचवले 102 गर्भवती महिलांचे प्राण, 3 महिलांची बोटीतच प्रसूती

11. ठाणे - हागणदारीमुक्त ठाणेसाठी पालिकेने घेतली गुगलची मदत, त्यानुसार शहरातील तब्बल 11 हजार 217 सार्वजनिक शौचालयांची माहिती आता गुगलवर उपलब्ध होणार

12. मुंबई - वातानुकूलित बस गाड्यांमुळे बेस्टचा घाटा वाढल्याने या 259 वातानुकूलित बसगाड्या बंद, आता या बसगाड्या भंगारात काढल्या जाणार

13. मुंबई - लालबागच्या राजाची फसवणूक; दानपेटीत मिळाल्या चलनातून रद्द झालेल्या 1000 रुपयांच्या 110 जुन्या नोटा

14. रायगड - जिल्ह्यात एकूण 502 अर्भकांचा तर 81 बालकांचा वर्षभरात मृत्यू, तसेच 25 मातांचाही मृत्यू

15. बीएसएनएलने कॉर्पोरेट ई-मेल सेवा केली सादर,याचा बेसिक प्लॅन एक रूपये प्रति-दिवस इतका किफायतशीर असेल

16. नवी दिल्ली - आपल्यात अजून आठ ते दहा वर्षांचं क्रिकेट बाकी : कर्णधार, विराट कोहली

17. मुंबई - सोनी टिव्हीवर 'मेरा साई' या साई बाबांच्या आयुष्यावर आधारित हिंदी मालिकेत अभिनेता वैभव मांगले झळकणार

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Lets Up News Updates

1. जम्मू-काश्मीर - शोपियानमध्ये इमाम साहेब भागात दहशतवाद्यांचा लष्कराच्या गाडीवर हल्ला, प्रतिउत्तरात एका दहशतवाद्याला कंठस्नान

2. नवी दिल्ली - काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांच्या घरावर आणि कार्यालयांवर सीबीआयचे छापे

3. नवी दिल्ली - जीएसटी परिषदेने इडली पीठ, फुटाणे, रेनकोट, रबरबँड आणि पेंड यांसारख्या दैनंदिन वापराच्या 30 वस्तूंवरील करात कपात केली

4. गोवा - नौदलच्या महिला अधिकाऱ्यांचा चमू भारतीय बनावटीच्या आयएनएसव्ही ‘तारिणी’ या नौकेने आज जगप्रवासाला रवाना होणार

5. मुंबई - राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून ‘माझी कन्या भाग्यश्री’ सुधारित योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला

6. पुणे - स्वयंपाकिणीने सोवळं मोडल्याची तक्रार करणाऱ्या डॉ. मेघा खोले यांनी एक पाऊल मागे येत तक्रार मागे घेतली

7. पालघर - बालमृत्यू रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात असताना गेल्या 8 महिन्यांत पालघर जिल्ह्यात 313 बालकांचा मृत्यू

8. मुंबई - ‘क’ आणि ‘ड’ वर्ग महापालिकेत महापौरांची निवड थेट जनतेतून करण्याचा विचार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

9. औरंगाबाद - राज्यातील रस्ते डिसेंबरअखेर खड्डे मुक्त करू त्यासाठी 550 कोटींची तरतूद, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

10. मुंबई - पाच वर्षांपेक्षा अधिक काळात कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या राज्यातील तीन लाख निष्क्रिय संस्थांची नोंदणी रद्द होणार

11. मुंबई - भारतीय चित्रपटसृष्टी आपल्याला बाहेरून वाटते, तेवढी उदारमतवादी नाही, अभिनेत्री पूजा भट यांनी मांडली कैफियत

12. मुंबई - आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या तीन वनडेंसाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड होणार

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
👉 _*सिम आधार कार्डशी लिंक करण्याची मुदत फेब्रुवारी 2018 पर्यंत!*_

_*लेट्सअप ब्रेकिंग न्यूज*_

फेब्रुवारी 2018 पर्यंत सिम आणि आधार एकमेकांशी जोडले न गेल्यास, त्याचे व्हेरिफिकेशन न झाल्यास सिम कार्ड बंद होणार आहे. आधार-सिम व्हेरिफिकेशन ग्राहकहिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

---------------------------------------------
IND-AUS वनडे सिरीजसाठी टीमची घोषणा, सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा http://bit.ly/team_indian_17
---------------------------------------------

या प्रकरणी लोकनिती फाउंडेशनने केलेल्या याचिकेवर फेब्रुवारी महिन्यात सुनावणी झाली होती. त्यावेळी माजी सरन्यायाधीश जे एस खेहर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केंद्र सरकारला ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसारच, देशातील 100 कोटींहून अधिक मोबाइल ग्राहकांची ओळख पडताळून पाहण्यासाठी सिम कार्ड आधार कार्डशी जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. वर्षभरात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारतर्फे देण्यात आली आहे.

_*5 लाखांपेक्षा जास्त युझर्स असलेले ‘LetsUp - Digital Magazine’ जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती आणि मनोरंजन अगदी विनामूल्य ते ही आपल्या WhatsApp वर. त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा*_ https://goo.gl/SWpvGa
Lets Up News Updates

1. जम्मू-काश्मीर - पोलिसांना लवकरच बुलेटप्रूफ वाहने आणि जॅकेटस् मिळणार असून, केंद्र सरकारने या वाहनांच्या खरेदीसाठी निधी दिला

2. नवी दिल्ली - देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प उभारला जात असून या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा शुभारंभ 14 सप्टेंबर रोजी होणार

3. नवी दिल्ली - केंद्र सरकारने आधारकार्ड मोबाईल सिमकार्डशी लिंक करण्यासाठी फेब्रुवारी 2018 पर्यंतचा कालावधी निश्‍चित केला

4. नवी दिल्ली - आगामी काळात दहशतवाद्यांकडून देशावर रासायनिक हल्‍ला होऊ शकतो, असा केंद्रीय गृह मंत्रालयाने इशारा दिला

5. नवी दिल्ली - महाराष्ट्रासह देशातील 17 राज्यांमधील 225 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पडण्याचा प्राथमिक अंदाज केंद्र सरकारच्या संबंधित यंत्रणेने व्यक्त केला

6. नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या नंतर पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक 12 सप्टेंबरला बोलावली

7. मुंबई - राज्यभरातील आयटीआयमध्ये जवळपास 84.45 टक्के जागा भरण्यात आल्या असून सुमारे 33 हजार जागा शिल्लक राहिल्या

8. पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला, 10 डिसेंबर रोजी होणार निवड

9. उस्मानाबाद - महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आता प्रवेश पास अनिवार्य, कालपासून त्याची अंमलबजावणी सुरु झाली

10. न्यूयार्क - एक नवे औषध विकसित करण्यात आले असून त्याच्या वापराने ‘हार्ट अ‍ॅटॅक आणि कॅन्सर’चा धोका कमी केला जाऊ शकतो, अमेरिकन संशोधकांचा दावा

11. पुणे - पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत अंतिम फेरीत न्यू आर्टस् कॉलेज अहमदनगरच्या 'माईक' या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकाविला

12. न्यूयॉर्क - स्लोआन स्टीफन्स अमेरिकन ओपनच्या महिला एकेरीची नवी विजेती ठरली तर अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद राफाल नदालने पटकावले

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Lets Up News Updates

1. जम्मू-काश्मीर- पाकिस्तान लष्कराकडून पुंछ सेक्टरमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय लष्कराचंही चोख प्रत्युत्तर

2. नवी दिल्ली - 'ब्ल्यू व्हेल गेम'मुळे आतापर्यंत 200 जणांनी आत्महत्या केली असून या गेमवर देशात बंदी घालावी, अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल

3. नवी दिल्ली - देशातील 7 खासदार आणि 98 आमदारांच्या संपत्तीमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे आढळल्याबाबत तपास करण्यात येत असल्याची माहिती

4. नवी दिल्ली - सहारा समुहाला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा दणका दिला, अँबी व्हॅलीचा लिलाव थांबवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने दिला नकार

5. तामिळनाडू - रामेश्वरम किनारपट्टीजवळ श्रीलंकन नौदलाने 12 भारतीय मच्छिमारांना घेतले ताब्यात, तीन बोटी केल्या जप्त

6. छत्तीसगड - सुरक्षा दलांवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या 5 नक्षलवाद्यांना दंतेवाडातील अरनपूरमध्ये अटक करण्यात आली

7. मुंबई - वीजनिर्मिती केंद्रांना कोळशाच्या उपलब्धतेत अडचणी येत असल्यामुळे कालपासून राज्यात तात्पुरतं भारनियमन करण्यात येत आहे

8. मुंबई - बीडमधील 106 बोगस स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा, राज्य सरकारचे आदेश

9. पुणे - राज्यातील 'स्वाइन फ्लू' मृत्यू रोखा, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे सरकारी, खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांसह आरोग्य अधिकाऱ्यांना आदेश

10. मुंबई - लाँचिंगपूर्वीच सॅमसंग गॅलक्सी नोट 8 हा फोन खरेदी करण्यासाठी आतापर्यंत अडीच लाख ग्राहकांनी नोंदणी केली

11. मुंबई - झी मराठी वाहिनीवरील ‘काहे दिया परदेस’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असून 27 सप्टेंबरपासून ‘संभाजी’ ही ऐतिहासिक मालिका सुरु होणार

12. चेन्नई - ऑस्ट्रेलियन संघ आज भारताच्या अध्यक्षिय संघाविरुद्ध सराव सामना खेळणार, या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया संघाचा हा एकमेव सराव सामना

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Lets Up News Updates

1. नवी दिल्ली - येमेनमध्ये दहशतवाद्यांनी अपहरण केलेले ख्रिश्चन धर्मगुरू फादर टॉम उझुन्नलिल यांची दीड वर्षाने सुटका करण्यात यश

2. नवी दिल्ली - डॉ. एम. जी रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त केंद्र सरकार लवकरच शंभर रुपयांचं नाणं जारी करणार

3. नवी दिल्ली - घटस्फोट मिळण्यापूर्वी अनिवार्य असलेला सहा महिन्यांचा कालावधी (कुलिंग पीरियड) कमी करता येणे शक्य - सर्वोच्च न्यायालय

4. नवी दिल्ली - केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एका टक्क्याने वाढवण्याचा निर्णय घेतला, 1 जूनपासूनचा महागाई भत्ता मिळणार

5. नवी दिल्ली - व्यापार व सौहार्द वाढीस लागण्याच्या हेतूने सुरू झालेला भारत-पाकिस्तान यांच्यातील वस्तुविनिमय व्यापार (बार्टर ट्रेड) बंद होण्याच्या मार्गावर

6. नवी दिल्ली - भारतात सर्वच ठिकाणी घराणेशाहीचा प्रभाव, या विषयावरून काँग्रेसला लक्ष्य करणे चुकीचे असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले

7. मुंबई - येत्या 30 सप्टेंबर रोजी भगवान गडावर पंकजा मुंडे यांच्या होणाऱ्या दसरा मेळाव्याला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली

8. मुंबई - पुणे, नाशिक मालगाडी आणि पॅसेंजर ट्रेनच्या सुरळीत वाहतुकीसाठी दौंड-मनमाड रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाला केंद्राने मंजुरी दिली

9. मुंबई - ग्रामपंचायत निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदान आता 14 ऐवजी 16 ऑक्टोबर रोजी, तर मतमोजणी 17 ऑक्टोबर रोजी होणार

10. कॅलिफोर्निया - अॅपलचा बहुप्रतीक्षित आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X हे तीन स्मार्टफोन लाँच करण्यात आले

11. मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत 80 वर्षांच्‍या वृध्‍देच्‍या भूमिकेत दिसणार, चित्रपटाचे नाव 'तेजू' असून कंगना स्‍वत: हा चित्रपट दिग्‍दर्शित करणार

12. नवी दिल्ली - विराट कोहली पराभवाला कधीही भीत नाही. तो विजयासाठी आक्रमकतेने संघाचं नेतृत्त्व करतो - मायकल क्लार्क

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
👉 NEFT, RTGS आणि IMPS म्हणजे काय?

Lets Up Useful Info

भारतात पैसे पाठवणे प्रक्रिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या देखरेखी खाली चालते. सध्या भारतात विविध प्रकारच्या पैसे पाठवणे प्रक्रिया अस्तित्वात आहेत. त्यात NEFT, RTGS आणि IMPS या प्रक्रियांचा समावेश होतो. बँकेत किंवा ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना तुम्ही NEFT, RTGS आणि IMPS बद्दल ऐकलं असेल. पण कधी तुम्ही विचार केलाय का, NEFT, RTGS आणि IMPS म्हणजे नेमकं काय आहे? त्यांच्यामधील फरक काय? चला तर आज जाणून घेऊया...

1) NEFT (National Electronic Fund Transfer) : भारतातील प्रमुख पैसे हस्तांतरणापैकी हि एक प्रणाली एक आहे. यात पैसे लगेच ट्रान्सफर होत नाहीत. यामध्ये प्रत्येक तासाचा टाइम स्लॉट बनवलेला असतो आणि त्यानुसार पैसे दुसऱ्याला पाठवले जातात. हे इलेक्ट्रॉनिक संदेशाच्या माध्यमाने वापरले जाते. नोव्हेंबर 2005 मध्ये ही प्रणाली सुरु करण्यात आली. ही सुविधा देशाच्या जवळपास 30000 बँकांमध्ये उपलब्ध आहे.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

2) RTGS (Real Time Gross Settlement) : या माध्यमातून पैसे लगेच हस्तांतरीत करता येतात. या पद्धतीमध्ये OK बटण दाबल्यावर लगेच पैसे समोरच्याच्या खात्यामध्ये जमा होतात. त्यामुळे देशातील 95% देवाणघेवाण याच प्रणाली मधून होते. ही जगात सर्वात जास्त वापरली जाणारी प्रक्रिया आहे.

3) IMPS (Immediate Payment Service) : यात एका बँक खात्यामधून दुसऱ्या बँक खात्यामध्ये पैसे कधीही पाठवता येऊ शकतात. मोबाईलच्या माध्यमातून देखील या सेवेचा वापर करता येतो. NEFT आणि RTGS च्या वापरावर मर्यादा आहे, तर दुसरीकडे IMPS चा वापर मात्र दिवसाच्या 24 तासांत कधीही आणि सुट्टीच्या दिवशीही करता येतो. ह्या सेवेचे व्यवस्थापन NationalPayment Corporation Of India (NPCI) द्वारे केले जाते. भारतामध्ये 22 नोव्हेंबर 2010 रोजी सार्वजनिकरीत्या ही सेवा सुरु करण्यात आली.

👉 IMPS सुविधा कशी वापरावी?

1) IMPS सुविधा वापरासाठी IMPS सुविधा पुरविणाऱ्या बँकेतील खात्यास मोबाईल क्रमांक नोंदवावा व बँकेकडून MMID मिळवावा. IMPS सुविधेसाठी नोंदणी केल्यानंतर बँकेकडून 7 अंकी क्रमांक देण्यात येतो त्याला MMID (Mobile Money Identifier) म्हणतात.

2) इतर बँकेमधून IMPS मार्फत रक्कम मागविण्यासाठी, IMPS नोंदणीवेळी बँकेत नोंदविलेला मोबाईल क्रमांक व बँकेमधून मिळालेला MMID रक्कम पाठविणाऱ्यास द्यावा. साधारणतः बँकांमध्ये IMPS व Mobile Banking सुविधा Android मोबाईलवर वापरण्यासाठी Application उपलब्ध करून देण्यात येत आहे.

👉 NEFT आणि RTGS मध्ये फरक काय?

i) NEFT च्या माध्यमाने छोटे बचत खाते धारक पैसे हस्तांतरीत करतात. तर RTGS चा उपयोग मोठमोठ्या उद्योगसंस्था आणि कंपन्या करतात.

ii) NEFT मधून किमान पैसे पाठवण्याची मुभा असते, परंतु RTGS मधून कमीत-कमी 2 लाख रुपये हस्तांतरीत करणे अनिवार्य असते.

iii) NEFT मधून पैसे हस्तांतरीत होण्यासाठी वेळ लागतो. पण RTGS मधून पैसे त्वरित हस्तांतरीत होतात.

iv) NEFT च्या माध्यमातून बँकेच्या कार्यालयीन वेळातच पैसे ट्रान्सफर करता येतात. RTGS मध्ये लगेचच पैसे ट्रान्सफर होतात पण त्यादिवशी बँक चालू असणे गरजेचे असते.

👉 NEFT आणि शुल्क :

i) 1 लाखांपर्यंत : 5 रुपये + सेवा कर

ii) 1 लाखांपेक्षा जास्त आणि २ लाखांपेक्षा कमी : 15 रुपयांपेक्षा जास्त नाही + सेवा कर

iii) 2 लाखांपेक्षा जास्त पैसे पाठवण्यासाठी : 25 रुपयांपेक्षा जास्त नाही + सेवा कर

👉 RTGS आणि शुल्क :

i) 2 लाख ते 5 लाखांपर्यंत देवाणघेवाण करण्यासाठी : प्रत्येक ट्रान्सफरला कमाल 30 रुपये.

ii) 5 लाख रुपयांपेक्षा जास्तची देवाणघेवाण करण्यासाठी : प्रत्येक ट्रान्सफरला कमाल 55 रुपये.

👉 RTGS व NEFT प्रणाली मार्फत रक्कम पाठवण्यासाठी आवश्यक गोष्टी :

i) पाठवायची रक्कम.

ii) इतर बँकेत जमा करावयाच्या खातेदाराचा खाते क्रमांक.

iii) लाभार्थी बँकेचे नाव.

iv) इतर बँकेत जमा करावयाच्या खातेदाराचे नाव.

v) रक्कम पाठवणा-या काढून स्वीकारणा-या साठी काही संदेश असेल तर.

vi) IFSC Code (आयएफएससी कोड - RBI द्वारे सर्व बँकांना व त्यांचा शाखांना ओळखण्यासाठी विशिष्ट प्रकारचा कोड नियुक्त केलेला असतो)

vii) रक्कम पाठवणा-याचा मोबाईल क्रमांक.

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup