LetsUpp Marathi
4.89K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
🧐 वयाच्या चौथ्या वर्षी सुरुवात ते 9 वर्षांचा ब्रेक! महाराष्ट्राचा जावई, अभिनेता महेश बाबूबद्दल

LetsUpp I Birthday Special

* दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूचा जन्म 9 ऑगस्ट 1975 रोजी चेन्नईमध्ये झाला. त्याचे वडील कृष्णा तेलुगू मनोरंजन विश्वातील खूप मोठे अभिनेते होते.

* 1979 साली वयाच्या चौथ्या वर्षी ‘नीदा’ चित्रपटाद्वारे त्याने बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण केले.

* यानंतर त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. पण, वडिलांनी अभिनयाऐवजी शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. यानंतर तो 9 वर्षे चित्रपटांपासून दूर राहिला.

* 1999 मध्ये पदवी शिक्षण पूर्ण करून त्याने ‘राजा कुमारुडू’ मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यासाठी महेश बाबूला आंध्र प्रदेश सरकारचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा नंदी पुरस्कार मिळाला.

* प्रिन्स ऑफ टॉलिवूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेश बाबूने 2006 साली अभिनेत्री नम्रता शिरोडकरसोबत लग्न केले व तो महाराष्ट्राचा लाडका जावई बनला.

👉 लेट्सअपचे सर्व अपडेट व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी क्लिक करा : https://join.letsupp.com/
📜 संस्कृत दिनाबद्दल वाचून छाती अभिमानाने भरून येईल!

LetsUpp I Day Special

* हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला जातो. यानुसार आज 9 ऑगस्टला जागतिक संस्कृत दिन (विश्व संस्कृत दिनम्) आहे.

* संस्कृतचा उगम भारतात सुमारे 3,500 वर्षांपूर्वी झाल्याचं मानलं जातं. या भाषेची मुळे इसवी सन पूर्व 2000 पर्यंत जात असल्याचे पुरावे आहेत.

* संस्कृतला जगातील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात व शास्त्रीय भाषा मानली जाते. या भाषेत सुमारे 102 अब्ज 78 कोटी 5 दशलक्ष शब्दसंग्रह आहे.

* या भाषेला भारताच्या समृद्ध संस्कृतीचं ठळक वैशिष्ट्य मानलं जातं. संस्कृतविषयी जागरूकता पसरवण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी 1969 पासून संस्कृत दिन साजरा केला जातो.

या अभिजात भाषेचा दिवस साजरा करण्यासाठी काही सुभाषिते :
* सर्व भवन्तु सुखिनः (सर्वजण सुखी होवोत)
* विद्या ददाति विनयं (ज्ञान विनम्रता देते)
* सत्यं वद धर्मं चर (सत्य बोला, धर्माचे पालन करा)

✔️ तुम्हाला माहिती कशी वाटली? रिअ‍ॅक्ट करा... 1.बेस्ट I 2.ओके I 3.सुधारणा हवी

👉 लेट्सअपचे सर्व अपडेट व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी क्लिक करा : https://join.letsupp.com/
😍 टीव्ही रिपोर्टर ते सिल्व्हर स्क्रीन : ग्लॅमरस जॅकलिनचा फिल्मी प्रवास, वाचा

LetsUpp I Birthday Special

* मुळची श्रीलंकन असलेल्या जॅकलिनचा जन्म 11 ऑगस्ट 1985 रोजी झाला. तिचे वडील श्रीलंकन तर आई मलेशियन आहे.

* जॅकलिनने सिडनीमधुन मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने श्रीलंकेत टीव्ही रिपोर्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

* याचवेळी तिला मॉडेलिंगच्या ऑफर येऊ लागल्या, त्यानंतर 2006 मध्ये तिची मिस श्रीलंका युनिव्हर्स म्हणून निवड झाली.

* मॉडेलिंगच्या संदर्भात भारतात आल्यानंतर तिने 'अलादीन' चित्रपटासाठी ऑडिशन दिली व 2009 मध्ये या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

* जॅकलीनने मर्डर-2, जुडवा-2, किक, अ फ्लाईंग जेट, रेस-3, हाऊस फुल-2, अ जेंटलमन, ढिशूम, रामसेतू, हाऊसफुल-3, यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे.

✔️ तुम्हाला माहिती कशी वाटली? रिअ‍ॅक्ट करा... 1.बेस्ट I 2.ओके I 3.सुधारणा हवी

👉 लेट्सअपचे सर्व अपडेट व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी क्लिक करा : https://join.letsupp.com/
🚆 रेल्वे प्रवाशांसाठी भन्नाट ऑफर! सणवार प्रवासासाठी 20 टक्के सूट

LetsUpp I Special

* रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केली ‘राउंड ट्रिप पॅकेज फॉर फेस्टिव्हल रश’ योजना

* येण्याचे आणि जाण्याचे दोन्ही तिकीट एकत्र बुक केल्यास परतीच्या तिकीवर 20 टक्के सूट मिळेल

* योजनेबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा https://tinyurl.com/2e8jr7f7

✔️ तुम्हाला माहिती कशी वाटली? रिअ‍ॅक्ट करा... 1.बेस्ट I 2.ओके I 3.सुधारणा हवी

👉 लेट्सअपचे सर्व अपडेट व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी क्लिक करा : https://join.letsupp.com/
🎯 MPSC राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप नेमके कसे? जाणून घ्या

LetsUpp I Comp Exam

1. पूर्व परीक्षा (400 गुण) : पेपर - 1 : सामान्य अध्ययन : 200 गुण I विषय : चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरण, विज्ञान, इ.

पेपर - 2 : नागरी सेवा अभियोग्यता चाचणी (CSAT) (किमान 33% गुण आवश्यक) : 200 गुण I विषय : निर्णय क्षमता व आकलन, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी भाषाज्ञान इ.

2. मुख्य परीक्षा (1750 गुण) : यात एकूण 9 वर्णनात्मक पेपर असतात.

* मराठी, इंग्रजी भाषा विषय पेपर (पात्रता फक्त) : प्रत्येकी 300 गुण
* निबंध पेपर 250 गुण, सामान्य अध्ययन 4 पेपर : प्रत्येकी 250 गुण
* ऑपशनल पेपर 1 व 2 : प्रत्येकी 250 गुण

3. मुलाखत (100 गुण) : अंतिम निवड : मुख्य परीक्षा + मुलाखत गुणांच्या आधारे अंतिम यादी

✔️ तुम्हाला माहिती कशी वाटली? रिअ‍ॅक्ट करा... 1.बेस्ट I 2.ओके I 3.सुधारणा हवी

👉 लेट्सअपचे सर्व अपडेट व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी क्लिक करा : https://join.letsupp.com/
💰 60 टक्के हत्ती एकट्या भारतात, संवर्धनासाठी काय करु शकतो?

LetsUpp I Day Special

सुश्री पॅट्रिशिया सिम्सनी 12 ऑगस्ट 2012 ला हत्तींच्या संरक्षणासाठी ‘एलिफंट रीइंट्रोक्शन फाउंडेशन’ची स्थापना केली. तेव्हापासून हत्तींसंदर्भातील जनजागृतीसाठी जागतिक हत्ती दिन साजरा केला जातो.

* सध्या आफ्रिकन फॉरेस्ट एलिफंट, आफ्रिकन बुश एलिफंट, एशियाटिक एलिफंट या तीनच प्रजाती अस्तित्वात आहेत.

* जगात हत्तींची संख्या 50 ते 60 हजार असून, यातील 60 टक्के हत्ती एकट्या भारतात आहेत.

* हत्तींच्या संरक्षणाची गरज निसर्ग व मानवाच्या अस्तित्वाशी जोडली गेली असल्याने संवर्धन गरजेचे आहे.

* हत्तींच्या संरक्षणासाठी आपण काय करू शकताे? :
1.हस्तिदंतापासून बनवण्यात आलेल्या वस्तू घेऊ नका.
2.वाईल्ड एलिफंट टूरिझमला पाठिंबा द्या.
3.हत्तींचे संरक्षण, संवर्धन करणाऱ्या संस्थांना देणगी द्या.

✔️ तुम्हाला माहिती कशी वाटली? रिअ‍ॅक्ट करा... 1.बेस्ट I 2.ओके I 3.सुधारणा हवी

👉 लेट्सअपचे सर्व अपडेट व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी क्लिक करा : https://join.letsupp.com/
🎬 आमिरमुळे शूटिंग थांबलं... वैतागलेल्या यश चोप्रांचा भन्नाट किस्सा

LetsUpp I Entertainment Special

* परंपरा या चित्रपटातील एक गाणं (आधी रात को पलको कि छाओ में) होतं जे कॉलेजमध्ये चित्रित होणार होतं. यातील या एका सीनमध्ये आमिर खान पियानो वाजवत आहे, असं दाखवायचं होतं.

* दरम्यान आमिर खान या छोट्या सीनसाठी वारंवार प्रॅक्टिस करत असल्याने बरेच दिवस शूट चालू होतं आणि चित्रपट रेंगाळत चालला होता.

* यश चोप्रांनी आमिरला समजावून सांगितले की, “अरे भावा स्क्रीनवर तुझी बोटं दिसणार नाही. इतक्या छोट्या गोष्टीसाठी इतका वेळ का वाया घालवतोस?

* आमिर ऐकायला तयारच नव्हता. मग वैतागलेल्या यश चोप्रांनी ठरवलं आणि सीनचा सीक्वेन्सचं बदलून टाकला. पियानोवर आमीरला न बसता सैफला बसवलं.

* आमिरमुळे वैतागलेले चोप्रा म्हणाले होते, यानंतर मी आमीरसोबत काम करणार नाही. तो मिस्टर परफेक्शनिस्ट कमी आणि वेडा जास्त आहे.

✔️ तुम्हाला माहिती कशी वाटली? रिअ‍ॅक्ट करा... 1.बेस्ट I 2.ओके I 3.सुधारणा हवी

👉 लेट्सअपचे सर्व अपडेट व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी क्लिक करा : https://join.letsupp.com/
🧐 श्रीदेवीसाठी अफगानिस्तानात गोळीबार थांबायचा! बॉलिवुडच्या या सुपरस्टारविषयी वाचाच

LetsUpp I Birthday Special

रूपेरी पडद्यावरची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवीचा आज जन्मदिवस, यानिमित्ताने तिच्या कारकीर्दीविषयी थोडसं…

* श्रीदेवीचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडूतील मीनमपट्टी गावात झाला.

* 1967 साली ‘कंधन करुनई’ या तामिळ चित्रपटातून श्रीदेवीने वयाच्या चौथ्या वर्षी मनोरंजन विश्वात पदार्पण केले.

* 1979 साली श्रीदेवीने ‘सोलवां सावन’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट फ्लॉप ठरला, त्यानंतर तिने हिम्मतवाला चित्रपटाद्वारे जोरदार पुनरागमन केले.

* त्यानंतर तोहफा, मास्टरजी, नगीना, जांबाज, मिस्टर इंडिया, चांदनीसारखे अनेक हिट चित्रपट देऊन ती बॉलिवूडची सुपरस्टार बनली.

* तिची लोकप्रियता इतकी होती की, 1992 सालच्या खुदा गवाह चित्रपटाच्या शुटिंगवेळी अफगाणिस्तनात तिला चित्रीकरण करता यावे म्हणून गोळीबार थांबायचा.

* बोनी कपूरसोबत लग्न केल्यानंतर श्रीदेवी चित्रपटांपासून दुरावली. 2017 सालचा ‘मॉम’ तिचा शेवटचा चित्रपट ठरला.

✔️ तुम्हाला माहिती कशी वाटली? रिअ‍ॅक्ट करा... 1.बेस्ट I 2.ओके I 3.सुधारणा हवी

👉 लेट्सअपचे सर्व अपडेट व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी क्लिक करा : https://join.letsupp.com/
🤔 एक अवयवदाता किती लोकांचे प्राण वाचवू शकतो?

LetsUpp I Day Special

* रोनाल्ड ली हेरिक या व्यक्तीने 1954 साली आपली एक किडनी जुळ्या भावाला दान केली. या यशस्वी अवयव प्रत्यारोपणाच्या स्मरणार्थ अवयव दान दिवस साजरा करतात.

* अवयव दानाचे महत्त्व पटवून देणे व जनजागृती करणे हा या दिनाचा उद्देश आहे.

* अहवालानुसार एक व्यक्ती अवयव दान करून 8 लोकांना जीवनदान देऊ शकते. भारतातील अवयवदानाचे प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

* नॅशनल हेल्थ पोर्टलनुसार भारतात दरवर्षी 5 लाख लोक वेळेवर अवयव न मिळाल्याने दगावतात.

* कोण अवयव दान करू शकतं? : वय 18 वर्षे किंवा अधिक - स्वतः नोंदणी करू शकता. 8 वर्षांखालील - पालकांची संमती आवश्यक.

* कोणते अवयव दान करू शकतो? : सामान्यत: मूत्रपिंड, हृदय, यकृत, स्वादुपिंड, आतडे, फुफ्फुसे, हाडे, अस्थिमज्जा, त्वचा, कॉर्निया दान करता येते.

✔️ तुम्हाला माहिती कशी वाटली? रिअ‍ॅक्ट करा... 1.बेस्ट I 2.ओके I 3.सुधारणा हवी

👉 लेट्सअपचे सर्व अपडेट व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी क्लिक करा : https://join.letsupp.com/
😍 सुवर्णसंधी! ठाणे महानगरपालिकेत 1773 पदांची मेगाभरती

LetsUpp I Job Update

* पद संवर्ग : गट-क व गट-ड संवर्गातील पदे

* पदे : प्रशासकीय, लेखा, तांत्रिक, अग्निशमन, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय, निमवैद्यकोष सेवेतील विविध पदे

* अर्ज कालावधी : 2 सप्टेंबर 2025 पर्यंत

* अधिकृत संकेतस्थळ : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/Index.html

✔️ तुम्हाला माहिती कशी वाटली? रिअ‍ॅक्ट करा... 1.बेस्ट I 2.ओके I 3.सुधारणा हवी

👉 लेट्सअपचे सर्व अपडेट व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी क्लिक करा : https://join.letsupp.com/
🛵 कमी किंमत, भारी फीचर्स! सर्वांत बजेट फ्रेंडली इलेक्ट्रिक स्कूटर्सची यादी

LetsUpp I Auto Update

* व्हिडा V2X गो : एक्स-शोरूम किंमत 44,990 रुपये I बॅटरी 2.2 किलोवॅट I रेंज - सिंगल चार्जवर 92 किमी I टॉप स्पीड - 70 किमी प्रति तास.

* व्हिडा V2X प्लस : एक्स-शोरूम किंमत 57,990 रुपये I बॅटरी 3.4 किलोवॅट I रेंज - सिंगल चार्जवर 142 किमी I टॉप स्पीड 80 किमी प्रति.

* ओला : S1 झेड STD मॉडेल एक्स-शोरूम किंमत 59,999 रुपये I S1 Z+ मॉडेल एक्स-शोरूम किंमत 64,999 रुपये I दोन्ही मॉडेल्सची रेंज - सिंगल चार्जवर 146 किमी I टॉप स्पीड 70 किमी प्रति तास.

* होंडा : होंडा QC1 ची एक्स-शोरूम किंमत 94,094 रुपये I बॅटरी 1.8 किलोवॅट I रेंज - सिंगल चार्जवर 80 किलोमीटर I टॉप स्पीड 50 किमी प्रति तास.

* टीव्हीएस आयक्यूब :एक्स-शोरूम किंमत 94,434 रुपये I बॅटरी 2.2 किलोवॅट I रेंज - फुल चार्जवर 94 किमी I टॉप स्पीड 75 किलोमीटर प्रति तास.

* बजाज चेतक 3001 : एक्स-शोरूम किंमत 1.07 लाख रुपये I बॅटरी 3 किलोवॅट I रेंज - फुल चार्ज रेंज 127 किमी I टॉप स्पीड 63 किलोमीटर प्रति तास.

✔️ तुम्हाला माहिती कशी वाटली? रिअ‍ॅक्ट करा... 1.बेस्ट I 2.ओके I 3.सुधारणा हवी

👉 लेट्सअपचे सर्व अपडेट व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी क्लिक करा : https://join.letsupp.com/
🧐 *करिअरचा नवा कॅनव्हास : 12वी नंतरच्या हटके करिअर संधी*

*LetsUpp | Career*

_खूप कमी विद्यार्थी वेगळ्या करिअर पर्यायांचा विचार करतात. नियमित अभ्यासक्रमांशिवाय असे अनेक पर्याय आहेत, ज्यात करिअर करून तुम्ही लाखात कमवू शकता._

* _1. क्रिएटिव्ह मीडिया : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मधून टेक्सटाईल डिझायनिंग व लेदर डिझायनिंग कोर्स, जर क्रिएटिव्ह स्किल्स असतील तर गेम डिझायनर कोर्सही करता येईल._

* _2. पेंट टेक्नॉलॉजी कोर्स : बारावीनंतर इंडस्ट्रियल रिसोर्सेस लॅबोरेटरी कोलकाता किंवा युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, महाराष्ट्र येथून हा कोर्स करू शकता._

* _3. इतर कोर्सेस : फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, डेहराडून येथून फॉरेस्ट संबंधित अभ्यासक्रम, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, म्हैसूर येथून फूड टेक्नॉलॉजीचा कोर्स_

✔️ _तुम्हाला माहिती कशी वाटली? रिअ‍ॅक्ट करा... 1.बेस्ट I 2.ओके I 3.सुधारणा हवी_

👉 *लेट्सअपचे सर्व अपडेट व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी क्लिक करा* : https://join.letsupp.com/