LetsUpp Marathi
4.88K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
*हिंगणघाट जळीत हत्याकांडातील आरोपीला जन्मठेपच!*

*LetsUpp | Trending*
● महाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी प्रा. अंकिता पिसुड्डे हिला जिवंत जाळणारा विक्की उर्फ विकेश नगराळे याला हिंगणघाट जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाने काल (बुधवारी) हत्या प्रकरणात दोषी ठरवले होते.
● विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपी विक्की नगराळेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. आपल्याशी लग्न न केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या विक्कीने अंकिताला एकतर्फी प्रेमातून जिवंत पेटवून दिले होते.
● या घटनेला दोन वर्षे झाली असून अंकिताच्या मृत्यूला आजच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे तिच्या दुसऱ्या स्मृतिदिनी लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हिॅगणघाट जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
🗣️ *उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया काय?*
● अंकिताला जाऊन बरोबर दोन वर्षे झाली आहेत. त्यामुळे तिला खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली आहे. आज न्यायालयाने आरोपी विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही मरेपर्यंत जन्मठेप होते.
● आज न्यायालयाने हे देखील सांगितलं आहे की आरोपी विकेशला 3 फेब्रुवारीला अटक झाली होती. तरी हा दोन वर्षाचा काळ त्या शिक्षेत गृहित धरला जाणार नाही. त्याला आजपासून आजीवन कारावासाची शिक्षा भोगायची आहे.
● त्याचप्रमाणे 5 हजार रुपये दंडही त्याला द्यायचा आहे. निकालाची पूर्ण प्रत आम्हाला अजून मिळाली नाही. बचावपक्षाला हायकोर्टात जायचं असेल तर निकालाची प्रत वाचून आम्ही पुढील पाऊल उचलू. आम्ही फाशीची मागणी केली होती.
● मात्र हा अपवादात्मक गुन्हा नसल्याचं न्यायालयाने म्हटलं आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. निश्चितपणे अंकिताला न्याया मिळाला असं म्हणावं लागेल, अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.

*अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा*
https://letsup.app.link/FYEtV185wnb