LetsUpp Marathi
4.88K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
टॉप १० हेडलाईन्स; सकाळच्या महत्वाच्या बातम्या

LetsUpp | Bulletin
▪️ महाराष्ट्राने गाठला ११ कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे दिली माहिती
▪️ राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट! मागील २४ तासात ८४८ कोरोनाबाधितांची नोंद, तर ५० जणांचा मृत्यू
▪️ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रुग्णालयात दाखल, पुण्यात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू
▪️ रत्नागिरीतील जयगड समुद्रात एक महिन्यापूर्वी बुडालेली नौका अद्यापही बेपत्ताच; पोलिसांच्या अहवालाची मच्छिमारांना प्रतिक्षा
▪️ देशभरात मागील २४ तासांत ९,११९ नवीन कोविड रुग्ण; तर ३९६ रुग्णांचा मृत्यू
▪️ रायगडमधील माणगाव तालुक्यातील निजामपूरजवळ गावठी हातबॉम्बच्या स्फोटात होऊन एकाचा जागीच मृत्यू; तर तर १० वर्षीय मुलासह महिला किरकोळ जखमी
▪️ उत्तर प्रदेशात महापुरुषांची जयंती आणि महाशिवरात्रीला मांस विक्रीवर बंदी; योगी सरकारने जारी केले आदेश
▪️ भारत-बांगलादेश सीमेवर शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास भूकंपाचे धक्के; भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी
▪️ देशात प्रथमच महिलांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक; एक हजार पुरुषांमागे देशात १०२० महिला, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आकडेवारी जाहीर
▪️ भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठी भरभराट होणार! डिसेंबरपर्यंत सेन्सेक्स 70 हजारांच्या पार जाणार; मॉर्गन स्टॅनलेचा दावा

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/iHEvBiPeulb
*टॉप 10 हेडलाईन्स ! दुपारच्या महत्वाच्या बातम्या*

LetsUpp | Bulletin
● मुंबई हादरली! टेरेसवर १९ वर्षीय तरुणीची बलात्कारानंतर हत्या, प्रियकराने मित्रासोबत केलं दुष्कर्म
● राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये वृद्ध महिलेचा धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या; मारेकरी मात्र अद्याप फरार
● पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठमोळ्या मयूर पाटीलचं कौतुक; गाड्यांचा मायलेज वाढवणाऱ्या उपकरणाचा शोध लावला
● ‘ओमिक्रॉन’चा धोका वाढत असल्याने महाराष्ट्रात कठोर निर्णय?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक
● गाडगेबाबांच्या दशसूत्रीनुसार काम करणारे सरकार, द्विवर्षपूर्तीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीं मांडला सरकारचा लेखाजोखा
● भालचंद्र नेमाडे साहित्य संमेलनाकडे फिरकतही नाहीत; अध्यक्षपद कसे मिळते याची सगळ्यांना कल्पना, ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांचे खडेबोल
● भाजप खासदार गौतम गंभीर यांना तिसऱ्यांदा गंभीर धमकी; गौतम गंभीर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत वाढ
● उत्तर प्रदेशात रोज तीन मुली होतात गायब; १२ ते १८ वयोगटातील मुली अधिक; आकडेवारीतून धक्कादायक माहिती
● पश्चिम बंगाल:अंत्यविधीसाठी स्मशानभूमीकडे जाताना भीषण अपघात; १८ जण ठार, पाच गंभीर जखमी
● भारत आणि न्यूझीलंड कसोटी; लंचपर्यंत भारताचा अर्धा संघ गारद, भारताने ५ बाद ८४ धावा केल्या, श्रेयस-अश्विन नाबाद!

*अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा*
https://letsup.app.link/U3jPEd4Xxlb
समृद्धी महामार्गाचा गोंदियापर्यंत विस्तार करण्याबाबत मोठा निर्णय

LetsUpp l Trending
🛣️ मुंबई ते नागपूर समृद्धी मार्गाचा विस्तार आता नागपूर गोंदियापर्यंत करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे.
👉 त्यानुसार नागपूर ते गोंदियादरम्यानच्या विस्तारीकरणासाठी व्यवहार्यता अभ्यास करण्यात येणार आहे.
📄 या कामासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यासाठी एक-दोन दिवसांत निविदा काढण्यात येण्याची शक्यता आहे.
💁‍♂️ नागपूर ते गोंदिया असा साधारणत: १५० किमी महामार्ग असेल. हे विस्तारीकरण झाल्यास मुंबई ते गोंदिया अंतर काही तासांत पार करणे शक्य होणार आहे.
🧐 मुंबई ते नागपूर हे अंतर आठ तासांत पूर्ण करण्यासाठी ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग बांधण्यात येत आहे.
👍 ५५,३३५.३२ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे आतापर्यंत ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यातही नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे ९० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे.
🤔 हा पहिला टप्पा येत्या काही महिन्यांत वाहतुकीसाठी खुला करण्यात येण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण महामार्ग सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे.
💫 या प्रकल्पाची व्याप्ती वाढवून त्याचा फायदा अधिकाधिक नागरिकांना, गावांना आणि जिल्ह्यांना व्हावा या दृष्टीनेही एमएसआरडीसीकडून प्रयत्न सुरू आहेत.
💁‍♀️ त्याचाच एक भाग म्हणून समृद्धी महामार्गाचा जालना ते नांदेड असा अंदाजे २०० किमी विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
📍 या विस्तारीकरणाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. तर आता समृद्धी महामार्गाचा नागपूर ते गोंदिया असाही विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/Eu8N0Nx2Alb
'ओमायक्रॉन' व्हेरिएंटबाबत डॉ.प्रदीप आवटे यांनी दिली महत्वाची माहिती!

LetsUpp | Trending
⚡ 'ओमायक्रॉन' व्हेरिएंटचे रुग्ण ज्या - ज्या देशात सापडत आहेत. त्या देशातील माहिती घेऊन अभ्यास केला जात आहे. तसेच दुसऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे.

👉 त्यामध्ये जे पॉझिटिव्ह आढळतील, त्यांचं सॅम्पल हे जिनॉमिक सिक्वेन्सला पाठवण्यात येणार आहेत, असं आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे यांनी सांगितलं आहे.
💫 त्या पद्धतीनेच जे निगेटिव्ह येतील त्यांनाही 7 दिवस क्वारंटाईन ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पुन्हा 8 व्या दिवशी सॅम्पल घेतलं जाणार आहे. त्यामध्येही पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचं सॅम्पल जिनॉमिक सिक्वेन्सला पाठवण्यात येणार आहे.
📍 दरम्यान, यामागचे उद्दिष्ट हेच आहे की, या विषाणूचं निदान व्हावं. तसेच ज्या देशात हा व्हायरस नाही त्या देशामधील देखील प्रवाशांचे 5 टक्के सॅम्पल टेस्ट करण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे यांनी दिली.

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/yvmzCtyCBlb
बिटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सी म्हणजे नेमकं काय?

https://youtu.be/b-FsB1gNWJY

गेल्या काही दिवसापासून सातत्याने क्रिप्टोकरन्सी, बिटकॉईन वैगरे ऐकत असाल पण तुमच्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडला असेल कि क्रिप्टोकरन्सी, बिटकॉईन आहे तरी काय ? हेच समजून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमधून करणार आहोत. तेही अगदी सोप्या शब्दात म्हणजे 'बातमी सोप्या शब्दात'...
वैद्यकीय शिक्षण विभागात भरतीबाबत मोठी बातमी!

LetsUpp | Trending
⚡ वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागामार्फत दीड हजार पदांची भरती करण्यात येणार आहे.
💁‍♂️ महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘अ’ आणि ‘ब’ वर्ग पदांसाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
💫 राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागामार्फतची ही मोठी पद भरती आहे. आतापर्यंत या विभागामार्फत एकूण 1 हजार 584 वर्ग ‘अ’ आणि ‘ब’ पदांसाठीचे मागणीपत्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्यात आले आहे.
👍 यापैकी 1 हजार 269 पदे वैद्यकीय शिक्षण कक्षाची आहेत. या पदांपैकी बहुतांश पदांसाठी आयोगामार्फत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
🗣️ भरतीची प्रक्रिया सुरू असल्याचे देशमुख यांनी सांगितले. वर्ग 3 आणि वर्ग 4 मधील रिक्त पदे सध्या 50 टक्क्यांपर्यंत भरण्याची मंजुरी मिळालेली आहे.
🏥 तर वर्ग 4 मधील पदे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणार्‍या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांना कंत्राटी पद्धतीने भरण्याची परवानगी देण्यात आली आहे.
📍 वर्ग 4 बाबत मंजूर पदांपैकी 50 टक्के पदे भरण्याची परवानगी राज्य शासनाची असल्याने भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी, असे निर्देश देशमुख यांनी दिले आहेत.

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/rxSQCTlUClb
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
बहुभाषिक ओटीटी प्लॅटफॉर्म ‘1 ओटीटी’चा लोगो सादर

आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशी आणि प्रख्यात उद्योजक व दानशूर व्यक्तिमत्त्व नरेंद्र फिरोदिया यांचा संयुक्त प्रकल्प असलेले ‘1 ओटीटी’ (ओव्हर द टोप) हे व्यासपीठ आता आपल्या भेटीला आले आहे.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले ‘1 ओटीटी’चे अनावरण

अभिनेता स्वप्नील जोशी आणि उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्यातील संयुक्त प्रकल्प असलेल्या ‘1 ओटीटी’ या ‘अपने भारत का अपना मोबाईल टीव्ही’चा शुभारंभ करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज ‘1 ओटीटी’ या नवीन ओटीटीच्या लोगोचे अनावरण राज भवन येथे अत्यंत दिमाखदार अशा समारंभात करण्यात आले. ‘1 ओटीटी’ (ओव्हर द टोप) हे व्यासपीठ हे सर्व भारतीय भाषांमधील कार्यक्रमांसाठी तयार झाले असून त्याद्वारे तो ‘अपने भारत का अपना मोबाइल टीव्ही’ असणार आहे. हिंदीबरोबरच मराठी, बंगाली आणि इतर भारतीय भाषांमधील कार्यक्रम सादर करत हे व्यासपीठ खऱ्या अर्थाने ‘अपने भारत का अपना मोबाईल टीव्ही’ ठरणार आहे.