LetsUpp Marathi
4.88K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
*टॉप 10 हेडलाईन्स ! सकाळच्या महत्वाच्या बातम्या*

LetsUpp | Bulletin
● भारतीय रेल्वे पु्न्हा रुळावर, तब्बल २० महिन्यांनंतर सामान्य वेळापत्रकाप्रमाणे धावणार; रेल्वेचा हा निर्णय देशातून कोविडचे संकट कमी होत असल्याचं लक्षण
● राज्यातली परिस्थिती नियंत्रणात, पोलीस प्रशासनानं दक्ष राहावं : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
● महाराष्ट्रात झालेली दगडफेक, तोडफोड चिंतेचे प्रकार, राज्य सरकारनं त्वरित दखल घ्यावी : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस
---------------------
*लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क :* 7798655655
----------------------
● रुग्णालयांची अग्निसुरक्षा तपासणी; नगर येथील रुग्णालयातील आग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून तपासणी सुरू
● मुंबईत गेल्या १० वर्षात १३० मराठी शाळा विद्यार्थी संख्या कमी झाल्याने बंद कराव्या लागल्या; ६५ हजार मराठी विद्यार्थी पटसंख्या घटली
● अधिकारी, राजकारणी, श्रीमंतांनी आपली पोरं इंग्रजीत शिकवावी, मग आमच्या पोरांनी का मराठीत शिकावं? बच्चू कडूंचा सवाल
● मुंबईत पहिल्या मात्रेचे १०० टक्के लसीकरण पूर्णत्वास; मुंबईत शुक्रवारपर्यंत पहिल्या मात्रेचे ९९.९९ टक्के लसीकरण झाले
● नागपूर जिल्हा परिषदेत महिलांचे राज्य; काँग्रेसने जि.प.च्या अध्यक्षपदी रश्मी बर्वे यांची निवड केल्यानंतर प्रथमच उपाध्यक्षपदही महिला सदस्या सुमित्रा कुंभारे यांची निवड
● ११ महिला अधिकाऱ्यांना लष्करात कायम नियुक्ती; सर्वोच्च न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर लष्कराचा निर्णय
● दिल्लीतील प्रदूषणकारी घटकांत सहापट वाढ; मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दररोज ट्वीट करून हवेच्या गुणवत्तेची आकडेवारी प्रसिद्ध करत आहेत

*अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा*
https://letsup.app.link/rzwDnIEF8kb
*टॉप १० हेडलाईन्स; संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या*

*LetsUpp l Bulletin*
● अमरावतीत हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या येणार अमरावती दौऱ्यावर; पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या सोमय्या यांनी १५ दिवसानंतर अमरावतीत यावं
● चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवतीचा वाहन चोरीचा गोरखधंदा; पोलिसांकडून बेड्या; वैष्णवी देवतळे असं या अटक केलेल्या तरुणीचं नाव आहे
● अक्कलकोट-सोलापूर मार्गावर सकाळी ११ च्या सुमारास झालेल्या प्रवासी जीपच्या भीषण अपघातामध्ये पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू; १२ जण गंभीर जखमी असून दोघांची प्रकृती चिंताजनक
● जालना जिल्ह्यात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली तरच पगार मिळणार; जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे आदेश
● अंत्यसंस्काराहून परतताना भीषण अपघात, सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू; बिहारमधील लखीसराय येथे झाला अपघात
● मुंबई पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बारगळणार? पवई तलावाजवळील सायकल ट्रॅक प्रकल्पाला हायकोर्टाची स्थगिती
● शीना बोरा हत्याकांड : आरोपी इंद्राणी मुखर्जीला दिलासा नाहीच; हायकोर्टाने सहाव्यांदा जामीन अर्ज फेटाळला
● मुंबईतील नागरिक देखील प्रदूषणाच्या विळख्यात; सोमवारी दक्षिण मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक दिल्लीपेक्षाही अधिक पहायला मिळाला
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशमधील पूर्वांचल एक्स्प्रेस वेचं उद्घाटन; ३४१ किलोमीटर लांबीचा हा एक्स्प्रेस वे पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेशला जोडत आहे
● टी-२० विश्वचषक २०२२ पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार, यावेळी एकूण ४५ सामने ऑस्ट्रेलियाच्या ७ मैदानांवर खेळवले जाणार आहेत

*अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा*
https://letsup.app.link/sXRx0Zblelb
अमरावती शहरात पुन्हा कडक संचारबंदी लागू

LetsUpp | Amravati

● त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ अमरावती शहरात 13 तारखेला हिंसाचार घडला होता त्यापार्श्वभूमीवर शहरात सहा दिवस संचारबंदी लागू करण्यात आली होती व इंटरनेट सेवा सुद्धा बंद करण्यात आली होती.
● पुन्हा आज भाजपच्यावतीने त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
● त्यामुळे अमरावती शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने सतर्कता म्हणून आज सकाळी नऊ वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत कडक संचारबंदीचा आदेश दिला आहे.
● तसेच कडक कारवाईचे आदेश सुद्धा बजावण्यात आला आहे. तसेच पाच पेक्षा जास्त व्यक्ती एका ठिकाणी दिसल्यास त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/5hFSN6aPnlb
c6cd9783b0d445459ea0332476bd716e
25 MB
रजा अकादमीवर बंदी आणा, आरोपींना तात्काळ अटक करा - अनिल बोंडे

LetsUpp | Nanded
▪️ नांदेड, मालेगाव, अमरावती या ठिकाणी घडलेल्या हिंसाचारात निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
▪️ या आंदोलनात माजी मंत्री बोंडे म्हणाले की, रजा अकादमीवर बंदी आणावी, आणि या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावे.
▪️ अन्यथा भाजपच्यावतीने तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप नेते अनिल बोंडे यांनी दिला आहे.
▪️ दरम्यान, नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे एक कट्टर स्वरूपाचं मतदान मिळवण्यासाठी मुस्लिम समाजाला पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/wPUkMdLfolb
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'या' कलाकृतीची विश्‍वविक्रम म्हणून नोंद!

LetsUpp | Osmanabad
● कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण तालुक्यातील उजळंब येथे २५००० दिव्यांच्या प्रकाशातून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कलाकृतीची जागतिक विक्रमात नोंद झाली आहे. उस्मानाबादचे कलाकार राजकुमार दत्तात्रय कुंभार, यांनी ही कलाकृती साकारली आहे.

● या कलाकृतीसाठी २५००० दिव्यांचे प्रज्वलन केले होते. तिचा आकार ५० फुट × ५० फुट असा 2500 चौरस फूट आहे. ही शिवरायांची जगातील पहिली दीपप्रतिमा असून, दिनांक १३ नोव्हेंबर २०२० रोजी साकारली होती.
● उजळंब गावात शिवप्रताप दिनाचं औचित्य साधत दीपावलीच्या पार्श्वभूमीवर येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती उजळंब यांच्या आयोजनातून छत्रपती शिवरायांना आणि स्वराज्यासाठी त्यांच्यासोबत लढणाऱ्या प्रत्येक मावळ्याला या दिपोत्सवातुन त्यांच्या कार्याला एक आगळीवेगळी मानवंदना देण्याचा इथे प्रयत्न करण्यात आला होता.
● या प्रतिमेची एक्सक्लुझिव्ह वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये नोंद घेतली गेली आहे, त्याचबरोबर छत्रपती शिवरायांची दिपप्रज्वलन आतून साकारली जाणारी आत्तापर्यंतची जगातली पहिलीच प्रतिमा ठरली आहे. संकल्पना कलाकार: उस्मानाबाद जिल्ह्यातील कलाकार राजकुमार कुंभार यांच्या संकल्पनेतून ही कलाकृती साकारण्यात आली आहे.
● त्यासाठी त्यांचे मित्र सहकलाकार आकाश नेटके उस्मानाबाद यांना सोबत घेऊन ही कलाकृती पूर्णत्वास नेली गेली आहे छत्रपती शिवरायांच्या रांगोळी पासून विविध माध्यमातील घटकांचा वापर करत राजकुमार कुंभार यांनी अनेक कलाकृती साकारल्या आहेत आणि अशा आगळ्यावेगळ्या कलाकृती मधील जवळजवळ दहा कलाकृतींची विश्‍वविक्रम म्हणून नोंद करण्यात आली आहे.

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/Q76fDDoMplb