LetsUpp Marathi
4.88K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
टॉप 10 हेडलाईन्स ! सकाळच्या महत्वाच्या बातम्या

LetsUpp | Bulletin
● पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरात आठवीत शिकणाऱ्या एका कबड्डीपटूची हत्या करण्यात आली; प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती
● मुलांचे लसीकरण लवकरच ; २ ते १८ वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लस वापराची शिफारस तज्ज्ञ समितीने औषध महानियंत्रकांकडे केली
● देशांतर्गत विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास हवाई वाहतूक कंपन्यांना १८ ऑक्टोबरपासून परवानगी देण्यात आली; केंद्र सरकारचा निर्णय
● भिवंडीत तीन गोदामांतून 'हुक्का' फ्लेवरचा 9 कोटी रुपयांचा साठा जप्त; ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे हुक्का पार्लर सुरू
● पीएम केअर फंडसाठी राजमुद्रा, तिरंगा आणि पंतप्रधानांचा फोटो कशासाठी?, हायकोर्टात याचिका; आपत्कालीन परिस्थितीसाठी 'पीएम केअर फंड चॅरिटेबल ट्रस्ट'ची स्थापना
● राज्यात मंगळवारी 2, 069 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रुग्ण बरे होण्याचा दर 97.36 टक्के; राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के
● काही समाजकंटकांकडून दहिसरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळील वारकरी शिल्पाची तोडफोड; तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली
● अवैध इंधन, बनावट बायोडिझेल विक्री रोखण्यासाठी तातडीने कारवाई करा, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांचे निर्देश
● ठाण्यात सिरो सर्व्हेला सुरुवात, अँटिबॉडीचे प्रमाण तपासले जाणार, सहकार्य करण्याचे महापौर नरेश गणपत म्हस्के यांचे आवाहन
● राज्यावरील वीज संकटासाठी ठाकरे सरकार जबाबदार : माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भारतात आयात करण्यात येणाऱ्या कोळशाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/d05DCY3djkb
टॉप 10 हेडलाईन्स; सकाळच्या महत्वाच्या बातम्या!

LetsUpp | Bulletin
● नाशिकमध्ये कोथिंबिरच्या जुडीला मिळाला २०० रुपयांचा विक्रमी भाव; संबंधित शेतकऱ्याने समाधान व्यक्त केले
● शिर्डी : साईबाबा संस्थानच्यावतीने पुण्यतिथी उत्सव प्रतीकात्मक स्वरूपात; आज दि.१४ ते १७ ऑक्टोबर दरम्यान हा उत्सव साजरा करण्यात येणार
● माजी पंतप्रधान मनमोहन सिंग प्रकृती बिघडल्याने एम्स रुग्णालयात दाखल; सध्या ते डाॅ. नितीश नायक यांच्या देखरेखाली आहेत
----------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : 7798655655
-----------------------
● नागरी भागातील नैसर्गिक नद्या-नाले निचरा प्रणाली पुनर्स्थापित केली जाणार; कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांच्या पूर नियंत्रणासाठी उपाय योजना राबविण्याबाबत नेमलेल्या कृष्णा खोरे पूर अभ्यास समितीची शिफारस
● वैफल्यातून केंद्रीय यंत्रणांचा वापर; शरद पवार यांचा भाजपवर आरोप; अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरी गेले सहा दिवस छापे टाकले जात आहेत
● अर्धवातानुकूलित लोकल प्रकल्पाला तूर्तास स्थगिती; मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर प्रस्तावित २३८ लोकल संपूर्ण वातानुकूलित
● आर्यन हा तस्करीच्या कटाचा भाग असल्याचा ‘एनसीबी’चा आरोप; विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली
● आर्यन खान ड्रग्ज प्रकरण: साक्षीदार किरण गोसावी विरोधात पुणे पोलिसांची लूकआऊट नोटीस; क्रूझ पार्टी ड्रग्ज प्रकरणात गोसावी साक्षीदार आहे
● आशीष मिश्राचा जामीन अर्ज फेटाळला; लखीमपूर हिंसाचारप्रकरणी आणखी दोघांना अटक; विशेष तपास पथकाने १२ तासांच्या चौकशीनंतर ९ ऑक्टोबरला आशीष मिश्राला अटक केली होती
● कोविड काळात वाढले टीबी-एड्सचे रुग्ण; देशात २० टक्के टीबीच्या तर १० टक्के एचआयव्ही रुग्णांच्या मृत्यूंमध्ये वाढ

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/6PiPju8Rkkb
टॉप 10 हेडलाईन्स; दुपारच्या महत्वाच्या बातम्या

LetsUpp | Bulletin

● दसऱ्याच्या मुहूर्तावर 'गिफ्ट', पदोन्नतीसंदर्भात मोठा निर्णय, तब्बल 45 हजार पोलिसांना होणार थेट फायदा
● लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याच्या सरसंघचालकाकडून केंद्राला सूचना
● नगरमधील भुईकोट शिवपट्टण किल्ल्यात देशातील सर्वात मोठा भगवा , रोहित पवारांची संकल्पना
● बीड येथील भगवान गडावर दसरा मेळावा पार पडणार; या दसऱ्या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष!
● ठिकठिकाणी भगवे झेंडे आणि बॅनर लावत शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
● औरंगाबाद-नगर रेल्वे मार्गावर 17 स्थानके निश्चित, सर्वेक्षणासाठी 18 कोटींचा निधी लागणार
● जेईई ॲडवान्स परीक्षेचा निकाल जाहीर, मृदूल अग्रवाल देशात पहिला, मुलींमधून काव्या चोप्राची बाजी
● संभाजी भिडेंचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान
● आता 18 वर्षाच्या आतील मुलांनाही रेल्वे प्रवासाची मुभा, रेल्वे प्रशासनाचा निर्णय
● दिल्ली जवळ संयुक्त किसान मोर्चाच्या मुख्य टेंटजवळ पोलिस बॅरिकेटला मृतदेह बांधलेला आढळल्याने एकच खळबळ

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/9XAzhUX0mkb
*टॉप 10 हेडलाईन्स; सकाळच्या महत्वाच्या बातम्या!*

LetsUpp | Bulletin
● राज्यांच्या कारभारात लुडबुड नको ! केंद्राच्या दडपशाहीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आव्हान; हिंदूत्व धोक्यात आहे ते परक्यांपासून नाही तर ह्या नवहिंदूंपासून, अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केली
● देशात उपचाराधीन रुग्णांत सातत्याने घट; देशभरात आतापर्यंत एकूण ३ कोटी ४० लाख ३७ हजार ५९२ जणांना कोरोनाची लागण तर २ लाख ०३ हजार ६७८ रुग्णसंख्या गुरुवारी नोंदली गेली
● पैशांचा पाऊस पडण्याचे आमिष दाखवून ४ महिलांवर बलात्कार ; विरार मधल्या भोंदू बाबाचा अघोरी प्रकार; फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर या चारही पीडित महिलांनी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली
● अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना आहाराकरिता रोख रक्कम; शहरातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा साडेतीन तर जिल्हा व तालुकास्तरावरील विद्यार्थ्यांना दरमहा तीन हजार रुपये; अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक
● आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यामध्ये १८४ कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न उघडीस; ७ ऑक्टोबरपासून पुणे, बारामती, मुंबई, गोवा, जयपूरमध्ये आयकर विभागाची शोध मोहिम हाती
● शाळा परिसरात मद्यपरवाना देण्याविरोधातील याचिका फेटाळली; आदिवासी परिसरातील मुलांसाठी शाळा आणि वसतिगृह चालवणारे देवेंद्र मुंढे यांच्यासह तिघांनी ही याचिका केली होती
● गावागावांत संविधान सभागृहे, ग्रंथालय, अभ्यासिका ; सामाजिक न्याय विभागाचा निर्णय; सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती
● नवज्योत सिंग सिद्धूंनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला; नवज्योत सिंग सिद्धूच पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहणार आहेत
● रवी शास्त्री यांच्यानंतर राहुल द्रविडकडे टीम इंडियाचं मुख्य प्रशिक्षकपद; BCCIकडून दुजोरा; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपत आहे
● चेन्नईचा विजयी चौकार ! फॅफ डय़ूप्लेसिस-शार्दूल यांच्यामुळे कोलकातावर २७ धावांनी मात; महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईचे हे चौथे ‘T20 लीग’ जेतेपद ठरले

*अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा*
https://letsup.app.link/UfpSzCycokb
टॉप 10 हेडलाईन्स! संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या

LetsUpp | Bulletin
● राज्यातील सर्व उपहारगृहे, हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत तर सर्व प्रकारची दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी

● '15 दिवसात आरोप सिद्ध केल्यास आमदारकीचा राजीनामा देतो अन्यथा तुम्ही पदाचा राजीनामा द्या' रवी राणांचे यशोमती ठाकूर यांना आव्हान

● पैगंबरांच्या मानव कल्याणाच्या शिकवणीला अनुसरुया;मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून ‘ईद ए मिलाद’च्या शुभेच्छा

● अजित पवारांना ईडीच्या छाप्यांनी फारसा फरक पडणार नाही; रामदास आठवलेंचे महत्वाचे विधान

● दिवाळीनंतर कोरोना पुन्हा फोफावण्याची शक्यता, राजेश टोपे यांचा सावधानतेचा इशारा

● “राहुल गांधींना ड्रग्जचं व्यसन, तस्करीदेखील करतात,”; भाजपा नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

● मनसेमुळे नुकसान होईल, भाजपानं राज ठाकरेंच्या नादी लागू नये; केंद्रीय मंत्र्यांचा सल्ला

● सर्वस्तरातून टीकेनंतर सरकारला जाग, आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी 8 निरीक्षकांची नेमणूक

● भारतीय लष्कराकडून ‘लष्कर ए तोयबा’च्या सहा दहशतवाद्यांचा खात्मा; राजौरी सेक्टरमध्ये चकमक सुरु

● उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसकडून ४० टक्के महिला उमेदवार; प्रियांका गांधींची घोषणा

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/aiJVekTStkb
टॉप 10 हेडलाईन्स! दुपारच्या महत्वाच्या बातम्या

LetsUpp | Bulletin
● वाजवा रे वाजवा! नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील फटाके विक्री बंदीचा निर्णय अखेर मागे
● उस्मानाबादमध्ये दगडफेक प्रकरणी 43 प्रमुख आरोपींसह 150 जणांवर गुन्हा नोंद
● आता टीव्ही पाहणंही महागणार! 1 डिसेंबरपासून चॅनल्स पाहणं 50 टक्के अधिक खर्चिक
● 'हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा', नारायण राणेंचा मुख्यमंत्री ठाकरेंवर 'प्रहार'!
● नागपुरातील कळमना भागात निर्माणाधीन उड्डाणपुलाचा भाग कोसळला, निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत असल्याचा आरोप करत शिवसेनेचं आंदोलन
● पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं राज्यभरात आंदोलन
● PM Modi to CBI, CVC : केंद्रीय तपास यंत्रणांचं काम कोणाला घाबरवणं नाही, तर मनातून भीती दूर करणं - पंतप्रधान
● वर्षभरापासून सुरु असलेलं शेतकरी आंदोलन संपणार?; मोठ्या प्रमाणात दिल्लीच्या सीमेवर जमण्याचं आवाहन
● उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार, 46 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
● व्हॉट्सअप चॅटमधून मोठा खुलासा; ड्रग्जबद्दल एका अभिनेत्रीनंही केलेली आर्यनसोबत चर्चा

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/OwmHuv2fvkb
*दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; दहावीचा निकाल घसरला*

*LetsUpp l Trending*
⚡ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला आहे. मंडळाने या निकालांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सविस्तर आकडेवारी जाहीर केली आहे.
💁‍♂️ १२ वीच्या नवीन अभ्याक्रमानुसार या परिक्षेला यंदा २ हजार १०९ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी १ हजार ८०९ विद्यार्थी परिक्षेला हजर राहिले त्यापैकी ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
🧐 उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ही २५.८७ टक्के इतकी आहे. १२ वीच्या जुन्या अभ्याक्रमानुसारच्या परिक्षेसाठी १२ हजार ५३४ जणांनी अर्ज केलेला. त्यापैकी १२ हजार १६० जण परिक्षेला उपस्थित राहिले.
💫 या १२ हजार १६० जणांपैकी ३ हजार ३२२ जण उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्यांचं प्रमाणे २७.३१ टक्के इतकं आहे. १० वीच्या निकालामध्ये १२ हजार ३६३ अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी केवळ तीन हजार ५३ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.
👀 १० हजार ४७७ जणांनी १० वीची परिक्षा दिली होती. उत्तीर्ण होणाऱ्यांची टक्केवारी २९.१४ टक्के इतकी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल हा तीन टक्क्यांहून अधिकने घसरला आहे. २०२० साली नोव्हेंबर डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये ३२.६० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेले.
👨🏻‍💻 विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहून त्याची प्रत घेता येईल. निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषय सोडून) कोणत्याही विषयात मिळवलेल्या गुणांची पडताळणी, छायाप्रत, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय मंडळाकडे अर्ज करता येईल.
📍 दहावीच्या विद्यार्थ्यांना https://varificatuin.mh-ssc.ac.in/ आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना https://varificatuin.mh-hsc.ac.in/ या संकेतस्थळाद्वारे स्वत: किंवा शाळा-कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येईल.

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/tedLoMgqvkb