LetsUpp Marathi
4.88K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
पेट्रोलपाठोपाठ डिझेलही शंभरी पार; जाणून घ्या आजचे दर

LetsUpp | Trending

⚡ सात दिवसांच्या दरवाढीनंतर अखेर पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला आज लगाम बसला आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना किमान आजपुरता दिलासा मिळाला आहे.
👉 भारतीय तेल कंपन्यांच्यावतीनं आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरांनुसार, मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये आज दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दोन्हींचे दर वाढलेले नाहीत.
📝 माहितीनुसार, दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 104.44 रुपये प्रति लिटर आहे, तर मुंबईत 110.41 रुपये प्रति लिटरच्या सर्वोच्च स्तरांवर आहे.
⛽ तसेच मुंबईत डिझेल आता 101.03 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय. तर दिल्लीत आज डिझेल 93.17 रुपयांवर स्थिर आहे.
👀 देशातील सर्व चार प्रमुख शहरांमध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईबाबत बोलायचं झालं तर, पेट्रोल-डिझेलचे सर्वाधिक दर मुंबईत आहेत.

● देशातील प्रमुख शहरातील दर :
● शहरं - पेट्रोल रुपये/लिटर - डिझेल रुपये/लिटर
● दिल्ली : 104.44 - 93.17
● मुंबई : 110.41 - 101.03
● कोलकाता : 105.05 - 96.24
● चेन्नई : 101.76 - 97.56

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/Nd2fJ6GJhkb
*टॉप 10 हेडलाईन्स; दुपारच्या महत्वाच्या बातम्या!*

* LetsUpp | Bulletin *

● गृहमंत्र्यांनी तशा कोणत्याही सूचना कुणाला दिल्या नसल्याचं सांगत'मुंबई पोलीस पाळत ठेवत असल्याच्या समीर वानखेडेंच्या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं स्पष्टीकरण
● कालच्या महाराष्ट्र बंदसह नेक मुद्द्यांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी व्यक्त केली नाराजी
● महिन्याचा पगार वेळेवर न झाल्यामुळे बस चालकाची आत्महत्या; बीड आगारातील धक्कादायक प्रकार!
● आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी केंद्र सरकार 6 कोटी नोकरदारांच्या खात्यात पीएफच्या व्याजाचे पैसे जमा करणार
● काश्मीरमध्ये नायब राज्यपालांच्या माजी सल्लागाराच्या घरी सीबीआयचे छापे; बनावट शस्त्र परवान्याचे रॅकेट चालवल्याचा आरोप
● राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या (NHRC) २८ व्या स्थापना दिवसाच्या कार्क्रमात मानवी हक्कांच्या नावाखाली देशाची प्रतिमा मलिन करण्याचं काम काही लोक करतायत; पंतप्रधान मोदींचा घणाघात
● देशात गेल्या काही दिवसांपासून कोळशाच्या संभाव्य टंचाईची मोठी चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे कोळशाचा पुरवठा राज्य स्तरावर होत नसल्याचे चित्र दिसत असताना दुसरीकडे केंद्रीय पातळीवरून मंत्र्यांकडून कोळसा टंचाई नसल्याचे स्पष्ट
● भारतीय सैन्याने घेतला बदला; जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान, शस्त्रसाठा जप्त
● जम्मू -काश्मीरमधील दहशतवादाचे कंबरडे मोडण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा सक्रिय; द रेझिस्टन्स फोर्स आणि पाकिस्तानी दहशतवादी संघटनांच्या भूमिगत कार्यकर्त्यांच्या 18 ठिकाणी छापे
● चीनमधील सायनोवॅक आणि सायनोफार्म या लसी घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी WHOचा महत्त्वाचा सल्ला; या नागरिकांना कोरोना लसीचा तिसरा डोस घ्यावा लागणार आहे.

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/ow3xqXF0hkb
टॉप 10 हेडलाईन्स; संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या!

LetsUpp l Bulletin
● मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा, Covaxin च्या आपातकालीन वापराची DCGI कडे शिफारस
● राज्यात कोळसा टंचाई; विद्युत उपकरणांचा कमीत-कमी वापर करावा; ऊर्जामंत्री नितीन राऊतांचे आवाहन
● मरीन ड्राईव्हवर उभे राहणार भव्य मराठी भाषा भवन; १८ महिन्यांत पूर्ण होणार काम
● चित्रपटगृहे, नाट्यगृहे उघडण्यासंदर्भात कार्यपद्धती आणि नियमांचा अध्यादेश जारी!
● शिवलीला पाटील यांच्या किर्तनाचं आयोजन करणाऱ्यांवर गुन्हा; बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन
● 'आजही मीच मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं', देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'मन की बात'
● तुम्ही मुख्यमंत्री नाही हे मनातून काढून टाका; नवाब मलिकांची फडणवीसांवर मिश्किल टिप्पणी
● 'ज्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही दररोज जात काढली, त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं'; भाजप नेत्या पंकजा मुंडे
● आर्यन खानला जामीन मिळवून देण्यात सतीश मानेशिंदे अपयशी, शाहरुखनं आता वकीलच बदलला!
● “अमित शाह यांनी जम्मू -काश्मीरमध्ये नवं युग आणलं;” न्यायमूर्ती अरुण मिश्रा

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/42FOpNAhikb
टॉप 10 हेडलाईन्स; दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

LetsUpp | Bulletin
● राज्यभरातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे देखील पुन्हा सुरू होणार; कार्यपद्धती व नियमांचा अध्यादेश शासनाकडून जारी; मात्र प्रतिबंधित क्षेत्रात नाट्यगृह पुन्हा सुरू करण्यास परवानगी नाही
● राज्यात कुठेही भारनियमन केले जात नसून वीज उत्पादन वाढविण्यासाठी योग्य नियोजन; राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांची माहिती
● राज्याला मान्सूनचा शेवटचा तडाखा बसणार; येत्या २४ तासात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मेघ गर्जनेसह पाऊस तसेच शनिवारी विदर्भात पावसाची शक्यता
● पुणे हादरलं! बिबवेवाडीत एकतर्फी प्रेमातून आठवीत शिकणाऱ्या 13 वर्षीय मुलीचा खून; घटनेमुळे परिसरात एकच खळबळ
● एकनाथ खडसेंना मोठा झटका! पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी पत्नी मंदाकिनी खडसे यांचा जामीन अर्ज फेटाळला, अटकेची शक्यता
● राज्यात खुल्या आणि बंदिस्त जागेतील सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी; त्यामुळे यंदा दिवाळी पहाट आणि पाडवा पहाटसारखे कार्यक्रम घेता येणार
● क्रूझवरील छापेमारीमुळे चर्चेत आलेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे महाराष्ट्र पोलिसांवर गंभीर आरोप; एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांची भेट घेत दोन पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची केली तक्रार
● सात दिवसांच्या दरवाढीनंतर अखेर पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला आज लगाम बसला; आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केली नाही त्यामुळे सर्वसामान्यांना किमान आजपुरता दिलासा मिळाला आहे
● पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली; पहिल्याच दिवशी लोणावळ्यात पर्यटकांनी हजेरी लावायला सुरुवात; निर्बंधांमुळं यंदाच्या पावसाळ्यात पर्यटकांचा झाला होता हिरमोड
● भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान भक्तीगडावरील १२ एकर परिसरात होणार; गड परिसरातील डागडूजी आणि इतर कामांना वेग; कोरोना नियमांचे पालन करत हा मेळावा पार पडणार असल्याची भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांची माहिती

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/44EQ72Yvikb
टॉप 10 हेडलाईन्स ! सकाळच्या महत्वाच्या बातम्या

LetsUpp | Bulletin
● पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरात आठवीत शिकणाऱ्या एका कबड्डीपटूची हत्या करण्यात आली; प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती
● मुलांचे लसीकरण लवकरच ; २ ते १८ वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लस वापराची शिफारस तज्ज्ञ समितीने औषध महानियंत्रकांकडे केली
● देशांतर्गत विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास हवाई वाहतूक कंपन्यांना १८ ऑक्टोबरपासून परवानगी देण्यात आली; केंद्र सरकारचा निर्णय
● भिवंडीत तीन गोदामांतून 'हुक्का' फ्लेवरचा 9 कोटी रुपयांचा साठा जप्त; ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे हुक्का पार्लर सुरू
● पीएम केअर फंडसाठी राजमुद्रा, तिरंगा आणि पंतप्रधानांचा फोटो कशासाठी?, हायकोर्टात याचिका; आपत्कालीन परिस्थितीसाठी 'पीएम केअर फंड चॅरिटेबल ट्रस्ट'ची स्थापना
● राज्यात मंगळवारी 2, 069 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रुग्ण बरे होण्याचा दर 97.36 टक्के; राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के
● काही समाजकंटकांकडून दहिसरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळील वारकरी शिल्पाची तोडफोड; तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली
● अवैध इंधन, बनावट बायोडिझेल विक्री रोखण्यासाठी तातडीने कारवाई करा, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांचे निर्देश
● ठाण्यात सिरो सर्व्हेला सुरुवात, अँटिबॉडीचे प्रमाण तपासले जाणार, सहकार्य करण्याचे महापौर नरेश गणपत म्हस्के यांचे आवाहन
● राज्यावरील वीज संकटासाठी ठाकरे सरकार जबाबदार : माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भारतात आयात करण्यात येणाऱ्या कोळशाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/d05DCY3djkb