LetsUpp Marathi
4.88K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
टॉप 10 हेडलाईन्स; संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या

LetsUpp | Bulletin

● शाहीन चक्रीवादळाची तीव्रता वाढणार; येत्या 4 दिवसांत राज्यात हवामान विभागाने दिला मुसळधार पावसाचा इशारा!

● कमी दाबाचा पट्टा आता शाहीन चक्रीवादळात रुपांतरीत झाला 7 राज्यांना अलर्ट जारी!

● रेल्वेतील खासजीकरणासह अनेक मागण्यांसाठीऑल इंडिया एस.सी., एस.टी रेल्वे एम्पलाॅईज असाेसिएशनचे वतीने पुणे रेल्वे स्टेशन जवळील पुणे मंडल डीआरएम ऑफीस समाे आंदाेलन

● मराठवाड्यात गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीतुन सावरण्यासाठी सुमारे 845 कोटी 79 लाख रूपयांच्या मदतीची गरज असल्याचा प्राथमिक अहवाल तयार

● मराठवाड्यात पुन्हा पावसाला सुरुवात, वीजांच्या कडकडाटासह सरी; औरंगाबद शहरासह दौलताबाद, खुलताबाद, पैठण, कन्नड भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात

● महापालिका शाळांचे जे शिक्षक कोविड सेंटर, रेल्वे स्टेशनवर कोवीड लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी कामाला होते, त्यांना आता यातून कार्यमुक्त करावे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा

● राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी वाढ ; मुंबई सत्र न्यायालयाकडून समन्स जारी, १६ नोव्हेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश!

● उत्तराखंडच्या माऊंट त्रिशूळवर गिर्यारोहणासाठी गेलेल्या नौदलाच्या टीमवर हिमस्खलन; पाच जवान आणि एक पोर्टर बेपत्ता

● कृषी आवजारांच्या देशभरातील एकाच किंमती संदर्भात केंद्र सरकारचा निर्णया! शेतकऱ्यांना होणार फायदा; केंद्रीय कृषी राज्य मंत्री शोभा करंडलाजे यांची घोषणा

● एअर इंडियामधील टाटा ग्रुपकडून गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं वृत्त फेटाळल; निर्गुंतवणूकीला अद्याप केंद्र सरकारने मान्यता दिली नसल्याची केंद्र सरकारच्या विभागाच्या सचिवांची माहिती

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/mm8hL7h1Zjb
लेट्सअप, आय लव्ह नगरचे संस्थापक नरेंद्र फिरोदिया यांच्यासह 35 जणांचा ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज महाराष्ट्र’ पुरस्काराने सन्मान

LetsUpp | Trending

💫 लेट्सअप, आय लव्ह नगरचे संस्थापक नरेंद्र फिरोदिया यांच्यासह 35 जणांना ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज महाराष्ट्र’ पुरस्काराने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

⭐ यामध्ये राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांचा समावेश आहे.

⚡ मुंबईच्या हॉटेल ताज महालमध्ये या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन इंटरऍक्टिव्ह फोरम ऑन इंडियन इकॉनॉमी तसेच पंचायती टाइम्स न्यूज पोर्टलतर्फे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला फोरमचे अध्यक्ष नंदन झा व ज्येष्ठ पत्रकार डॉ. वेद प्रताप वैदिक उपस्थित होते.

📍 यावेळी राज्यपालांच्या हस्ते अभिनेते जॅकी श्रॉफ, अभिनेत्री दिया मिर्झा, सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, पोपटराव पवार, शांतीलाल मुथा, उषा काकडे, मोतीलाल ओसवाल, पाणी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ यांना चॅम्पियन्स ऑफ चेंज महाराष्ट्र पुरस्कार देण्यात आला.

📌 भारताचे माजी सरन्यायाधीश न्या. के जी बालकृष्णन व सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायमूर्ती ग्यानसुधा मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने पुरस्कार विजेत्यांची निवड केली.

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/D22Tmf5d0jb
टॉप 10 हेडलाईन्स; सकाळच्या महत्वाच्या बातम्या!

LetsUpp l Bulletin

● पुणेकर हळहळले! एकवीस वर्षीय प्रियदर्शनी वाघिणीचे वृध्दापकाळाने निधन, राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील पांढरी वाघिण प्रियदर्शनीचे वय झाल्याने निधन झाले

● मनी लाँड्रिंगप्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १६ नोव्हेंबर रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले

----------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : 7798655655
----------------------

● शैक्षणिक शुल्क माफीसह विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला; रुग्णव्यवस्था कोलमडली

● ४ ऑक्टोबरपासून मुंबईमध्ये शाळा सुरु होणार; आठवड्यात तीन दिवस निर्जंतुकीकरण, पालकांच्या संमतीपत्रानंतरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश : महापौर किशोरी पेडणेकर

● मर्क अँड रिजबॅक बायोथेरापिटीक्स कंपनीने कोरोनावर गोळ्यारुपी औषध शोधले; हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची आणि मृत्यूचे प्रमाण 50 टक्क्यांनी कमी करत असल्याचे वैद्यकीय चाचणीमध्ये समोर आले

● गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार १०५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ५० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३ हजार १६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले, कोरोनाबाधितांची संख्या ६५ लाख ५३ हजार ९६१ वर पोहोचली

● रस्ते दुरुस्त न केल्यामुळे तरुणाने केला नितीन गडकरींच्या घरासमोर आत्महत्येचा प्रयत्न; घरासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली; विजय पवार असं पीडित व्यक्तीचे नाव

● धक्कादायक! मुंबईसह राज्यभरात कॅन्सरवरील औषधांचे बनावटीकरण करत विक्री; आर्थिक गुन्हे शाखेच्या कारवाईत एका महिलेकड़ून ६७ लाख ९० हजार किंमतीचे बनावट इंजेक्शन आणि गोळ्या जप्त

● एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीला अद्याप मंजुरी नाही, केंद्र सरकारचा खुलासा; एअर इंडिया मध्ये टाटा ग्रुपकडून गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं असल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं

● लीगच्या ४५ वा सामना कोलकाता आणि पंजाब संघामध्ये झाला; कर्णधार केएल राहुलची एकाकी झुंज यशस्वी, रोमहर्षक सामन्यात पंजाब ५ गडी राखून विजयी

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/rJJcNSKY0jb
महात्मा गांधी यांच्याबद्दलच्या 'या' गोष्टी नक्की जाणून घ्या

LetsUpp | Special

आज 2 ऑक्टोबर, महात्मा गांधी यांची जयंती. सत्य आणि अहिंसा यांचे प्रेरणास्त्रोत अशी गांधीजींची ओळख असून आजचा हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.

चला तर मग आज आपण गांधीजींविषयी काही अज्ञात अशा गोष्टी जाणून घेऊ...

1. महात्मा गांधींचे शांततेचे नोबेल या पारितोषिकासाठी तब्बल 5 वेळा नामांकन झाले होते. नोबेल हा पुरस्कार आतापर्यंत मरणोत्तर कुणालाही दिलेला नसल्याने कमिटी त्यांना नोबेल दिला नसल्याचे सांगते.

2. मोहनदास करमचंद गांधी यांनी तब्बल 4 महाद्वीप व 12 देशातील नागरिक हक्क चळवळ घडवून आणली.

3. महात्मा गांधीजींची अंत्ययात्रेसाठी तब्बल 8 किलोमीटर लांब पर्यंत लोकांची गर्दी होती.

4. ग्रेट ब्रिटन,ज्या देशाविरुद्ध गांधीजीनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, त्या देशाने त्यांच्या मृत्यूनंतर 21 वर्षानी त्यांच्या नावाने टपाल तिकीट छापून त्यांचा सन्मान केला.

5. महात्मा गांधी त्यांच्या आयुष्यात तब्बल रोज 18 किमी चालले, एवढ अंतर पूर्ण जग फिरण्याच्या दुप्पट होते.

6. गांधीजीनी बोअर युद्धादरम्यान सैन्यातही सेवा केली. पण युद्धाच्या भयानक संकल्पना लक्षात येताच त्यांनी हिंसेविरुद्ध लढा देण्यास सुरुवात केली.

7. महात्मा गांधी हे जगभरातील विविध लोकांशी नेहमी संवाद साधत असत. हिटलर, आइन्स्टाइन व टॉलस्टोय हे त्यापैकी काही महान लोकं उदाहरण म्हणून बघू शकतो.

8. स्वातंत्र्य साजरं करण्यासाठी झालेल्या नेहरुजींच्या भाषणावेळी गांधीजी उपस्थित नव्हते.

9. गांधीजींशी निगडित जास्तीत जास्त वस्तू या मदुराईमध्ये असणाऱ्या गांधी संग्रहालयात आपणास बघायला मिळू शकतात. त्यामध्ये त्यांना गोळ्या झाडण्यात आलेल्या कपड्यांचा ही समावेश आहे.

10. आपल्या आयुष्याचा अखेरच्या काळात त्यांनी कधीही कोणत्याच राजकीय पक्षात अधिकृत पद धारण केले नाही.
आता येणार कोरोना प्रतिबंधक गोळी?

Letsupp | Trending

● गेल्या दोन वर्षणापासून कोरोना आजरावर अनेक उपाय आणि संशोधन करण्यात आले आहे. आता कोरोना वरील लास देखील आल्या आहेत. मात्र तरी देखील कोरोनाचे प्रमाण कमी झालेले नाही आता यासाठी एक प्रतिबंधक गोळी विकसित केली जात आहे.


● कोण तयार करतंय गोळी?
- फायझर ही अमेरिकी कंपनी कोरोनाप्रतिबंधक गोळी तयार करत आहे
- त्यासाठी कंपनीकडून चाचण्या सुरू आहेत
- गोळी आल्यास लसीला एक चांगला पर्याय निर्माण होऊ शकणार

● कसे काम करणार ही गोळी?
- ही गोळी घेतल्यास संसर्ग होण्याची शक्यताही मावळते
- कोरोनाबाधिताच्या संपर्कात आले तरी धोका नाही
- ही गोळी शरीरात गेल्यानंतर प्रतिकारशक्ती वृद्धिंगत करते
- सर्व रक्तपेशींना उ्ददिपीत करून बाह्यसंकटापासून संरक्षण देते

● कशी आहे गोळी?
- ही अँटिकोरोना गोळी सामान्य गोळीप्रमाणेच असेल
- ही गोळी कोरोना विषाणूला प्रतिबंध करणारी असेल
- प्राथमिक लक्षणांवेळीच ही गोळी घेतली तर कोरोना आटोक्यात येईल
- ही गोळी पूर्णत: कोरोनाकेंद्रितच आहे

● वैज्ञानिक चाचण्या कशा होणार?
- गोळीची चाचणी फायझर २६०० जणांवर केली जाणार
- काही जणांना प्रत्यक्ष गोळी दिली जाईल तर काहींना प्रतिकात्मक औषध
- पाच ते दहा दिवस ही गोळी दिली जाईल
- दिवसातून दोनदा असे प्रमाण असेल.
- १८ वर्षांवरील लोकांनाच चाचणीत सहभागी होता येणार
- पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत अभ्यासाचे निष्कर्ष हाती येतील
- गोळीला मंजुरी देण्यासाठी अमेरिकी एफडीएकडे अर्ज करता येणार

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/FYbXOhOB4jb
टॉप 10 हेडलाईन्स ! दुपारच्या महत्वाच्या बातम्या

LetsUpp | Bulletin

● "शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, लाठ्या-काठ्या उचला,त्यांना जशास तसे उत्तर द्या"; हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त विधान

● दीड वर्षांनी शाळांची घंटा वाजली! औक्षण आणि फुलांची उधळण करत विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत

● नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 तर पंचायत समितीच्या 31 जागांसाठी मंगळवारी 5 ऑक्टोबरला मतदान होणार

● अग्रलेख लिहून जे नेते होतात त्यांना शेतकऱ्यांचे दुःख काय माहीत; संजय राऊत यांना देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

● शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुंबईतील एका शाळेत भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला

● न्यायासाठीच्या अहिंसक लढाईत आपण देशाच्या अन्नदात्याला विजयी करू; काँग्रेसनेते राहुल गांधी यांचे प्रतिपादन

● उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरीमधील हिंसेप्रकरणी 7 जणांना अटक, आता एसटीएफ करेल तपास

● अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान 4 वर्षांपासून घेतोय ड्रग्स, एनसीबीच्या चौकशीत केला खुलासा

● गोंडवाना विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दरवर्षी निधी उपलब्ध करणार - विजय वडेट्टीवार

● प्रकृतीच्या कारणास्तव बिग बॉस मराठी 3 च्या घरातून शिवलीला पाटील हिने माघार घेतली

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/aoLL8IaH4jb
शिर्डी साईमंदिर दर्शन नियमावली जाहीर

Letsupp | Trending

● घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील धार्मिक स्थळ खुली होणार असून साईबाबा संस्थानने साईभक्तांसाठी नियमावली जाहीर केली आहे.
● साईबाबा मंदिरात दिवसाला 15 हजार पासेसची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली असून त्यामध्ये पाच हजार फ्री ऑनलाईन पद्धतीने, पाच हजार ऑफलाइन पद्धतीने (बायोमेट्रिक) तर पाच हजार पासेस सशुल्क पद्धतीने देऊन दर्शन दिले जाणार आसल्याची माहिती श्री साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.
● साईबाबांच्या सर्व आरतीचे पास ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार आहेत व यात प्रत्येक आरतीला फक्त 10 ग्रामस्थांसाह 90 भाविकांना उपस्थित राहता येणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बानायत यांनी दिली.

शिर्डी साईमंदिर दर्शन नियमावली

● दररोज 15 हजार भाविकांना दर्शन दिले जाणार
● पाच हजार ऑनलाईन, पाच हजार सशुल्क पासद्वारे तर पाच हजार भक्तांना शिर्डीत ऑफलाईन मिळणार मोफत दर्शन पास
● दर तासाला 1150 भाविकांना दिले जाणार दर्शन
● साईबाबांची काकड आरती, माध्यान्ह आरती, सायंआरती आणि शेजारतीला 80 भाविकांना सशुल्क प्रवेश
● प्रत्येक आरतीला 10 गावकऱ्यांना प्रवेश
● 65 वर्षावरील नागरिकांना आणी 10 वर्षाच्या आतील बालकांना व गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेश नाही
● साईभक्तांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार
● साई मंदिरात फुल हार प्रसाद घेऊन जाण्यास मनाई
● साई मंदिराचे भक्तनिवासही सुरू होणार
● online.sai.org.in या वेब साईट वर दर्शन व आरती पास मिळतील

● शासनाच्या नियमावलीनुसार 65 वर्षापेक्षा जास्त तसेच 10 वर्षाखालील बालकांसोबतच गर्भवती महिलांना साई दर्शन घेता येणार नसल्याच स्पष्ट केलं आहे.
● साई मंदीर व दर्शन रांगेत दोन भाविकांमध्ये अंतर ठेवण्यासाठी सहा फुटावर मार्किंग करण्यात आले आहे. तसेच थर्मल स्क्रीनिंग, सॅनिटायझरची व्यवस्था प्रवेशद्वारावर केली आहे.
● याशिवाय मंदिरात मूर्तीच्या गाभार्‍यात हात न लावता दर्शन दिले जाणार असून भाविकांसाठी चक्रीय पद्धतीने भक्तनिवास सुद्धा उपलब्ध करून देणार असल्यची माहिती भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/767RizGD6jb