LetsUpp Marathi
4.88K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
टॉप 10 हेडलाईन्स; सकाळच्या महत्वाच्या बातम्या!

LetsUpp | Bulletin

● आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा पुढे ढकलली; तांत्रिक अडचणींमुळे निर्णय, विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ

● राज्य सरकारचा मोठा निर्णय; मंदिरे, धार्मिक स्थळे 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार, नवी नियमावली जाहीर

● कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; राज्यात ऑक्सिजनबाबत गाईडलाईन्स जारी

● जळगावात राजकीय भूकंप; भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे 12 नगरसेवक शिवसेनेत; मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्वांच्या हातावर बांधले शिवबंधन

● केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर; शुभम कुमार देशात पहिला, तर अहमदनगरचा विनायक नरवडे देशात 37 वा आला

● जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत; राज्य निवडणूक आयोगाने केले स्पष्ट

● पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांच्यात दीड तास चर्चा; बैठकीत व्यापार, सुरक्षा, द्विपक्षीय संबंधांबाबतचं व्हिजन आदी महत्वपूर्ण विषयांवर झाली चर्चा

● जेव्हा जीएसटी परिषद पेट्रोल आणि डिझेलचा दर नेमका किती ठेवायचा, हे निश्चित करेल तेव्हा इंधन जीएसटीच्या कक्षेत आणले जाईल; निर्मला सीतारामन यांची माहिती

● केंद्र सरकारचा टाटा-एअरबससोबत 20 हजार कोटींचा करार; हवाई दलाला हायटेक मालवाहू विमाने मिळणार

● लीग 2021 च्या 35 व्या सामन्यात चेन्नईने बंगळुरूचा सहा विकेट्सने केला पराभव, बेंगळुरूला पराभूत करत चेन्नई गुणतालिकेत अव्वल

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/nhN9uRGlPjb
टॉप 10 हेडलाईन्स; दुपारच्या महत्वाच्या बातम्या!

LetsUpp l Bulletin

● काँग्रेसची विनंती मान्य, राज्यसभा पोटनिवडणुकीतून भाजपची माघार; रजनी पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित

● आरोग्य विभागातील रद्द झालेली क आणि ड गटातील पदभरतीची परीक्षा 15 -16 किंवा 22 - 23 ऑक्टोबरला होईल, आरोग्यमंत्री राजेश टोपे

● शिवसेनेचे अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळांच्या घरी ईडीचे छापे, सिटी को-ऑप बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीचा छापा

● मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान मोदींना पत्र; प्रस्तावित हायस्पीड रेल्वे प्रकल्प आणि समृद्धी महामार्ग यांच्या कामासंदर्भात पत्र पाठवून पंतप्रधानांचं लक्ष वेधून घेतलं

● मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अपघात, इंदोर-पुणे रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

● नाशिकमध्ये चिकुन गुन्याचे थैमान; महिन्यापासून डेंग्यूचाही उद्रेक, स्वच्छता मोहीम राबवण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना

● T20 लीगच्या सामन्यावर सट्टा, 1 कोटींची रोकड जप्त; पुणे पोलिसांनी दोन आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट बुकींना ताब्यात घेतले

● केंद्र सरकारविरोधात शेतकरी संघटनांचा आज भारत बंद, गुरुग्राम येथे अभूतपूर्व वाहतूक कोंडी

● नाशिकमध्ये उत्तर प्रदेशाच्या दहशतवादी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली असून धर्मांतराचे रॅकेट चालवणार्‍या एका व्यक्तीला एटीएसने नाशिकमधून अटक केली

● आता कोणताही नागरिक आरोग्यसुविधांपासून वंचित राहणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/pmykUfw5Sjb