LetsUpp Marathi
4.88K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
'एमपीएससी’ भरतीबाबत मुख्यमंत्र्यांचे सर्व विभागांना निर्देश

LetsUpp | Trending

⚡ महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा भरतीसाठी काही विभागांनी अद्याप मागणीपत्र सादर न केल्याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.

🗣️ कोणत्याही परिस्थितीत सर्व विभागांनी तात्काळ मंजूर पदांचा आढावा घेऊन आपले मागणीपत्र ३० सप्टेंबरपर्यंत आयोगाकडे पाठवावे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी बुधवारी सचिवांना दिले.

💁‍♂️ महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांचा तपशील ३० सप्टेंबरपर्यंत पाठविण्याचे निर्देश याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. संबंधित विभागांनी बिंदु नामावली तयार करुन, उचित मान्यता घेऊन हे प्रस्ताव ‘एमपीएससी’कडे पाठवायचे होते.

🧐 वारंवार निर्देश देऊनही काही विभागांनी पदांचे मागणीपत्र न पाठविल्याने नवीन पदभरती प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता आहे. आत्ता मुख्यमंत्र्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत सर्व विभागांनी मागणीपत्र पाठविण्याचे निर्देश मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले.

👀 ‘एमपीएससी’च्या पदभरती जाहिरातीला विलंब होत असल्यानेच पुण्याच्या स्वप्निल लोणकर या तरूणाने अधिवेशन सुरू असताना आत्महत्या केली.

📍 या गोष्टीची गंभीर दखल घेत सरकारच्या वतीने एमपीएससीच्या १५ हजार ५११ पदांची भरती केली जाईल, अशी घोषणा करण्यात आली. उपमुख्यमंत्री वारंवार या प्रक्रियेचा आढावा घेत असूनही विभागांकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे पदभरती प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/4LuEupd8Ljb
टॉप 10 हेडलाईन्स; सकाळच्या महत्वाच्या बातम्या!

LetsUpp | Bulletin

● आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा पुढे ढकलली; तांत्रिक अडचणींमुळे निर्णय, विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ

● राज्य सरकारचा मोठा निर्णय; मंदिरे, धार्मिक स्थळे 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार, नवी नियमावली जाहीर

● कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; राज्यात ऑक्सिजनबाबत गाईडलाईन्स जारी

● जळगावात राजकीय भूकंप; भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे 12 नगरसेवक शिवसेनेत; मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्वांच्या हातावर बांधले शिवबंधन

● केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर; शुभम कुमार देशात पहिला, तर अहमदनगरचा विनायक नरवडे देशात 37 वा आला

● जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत; राज्य निवडणूक आयोगाने केले स्पष्ट

● पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांच्यात दीड तास चर्चा; बैठकीत व्यापार, सुरक्षा, द्विपक्षीय संबंधांबाबतचं व्हिजन आदी महत्वपूर्ण विषयांवर झाली चर्चा

● जेव्हा जीएसटी परिषद पेट्रोल आणि डिझेलचा दर नेमका किती ठेवायचा, हे निश्चित करेल तेव्हा इंधन जीएसटीच्या कक्षेत आणले जाईल; निर्मला सीतारामन यांची माहिती

● केंद्र सरकारचा टाटा-एअरबससोबत 20 हजार कोटींचा करार; हवाई दलाला हायटेक मालवाहू विमाने मिळणार

● लीग 2021 च्या 35 व्या सामन्यात चेन्नईने बंगळुरूचा सहा विकेट्सने केला पराभव, बेंगळुरूला पराभूत करत चेन्नई गुणतालिकेत अव्वल

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/nhN9uRGlPjb
टॉप 10 हेडलाईन्स; दुपारच्या महत्वाच्या बातम्या!

LetsUpp l Bulletin

● काँग्रेसची विनंती मान्य, राज्यसभा पोटनिवडणुकीतून भाजपची माघार; रजनी पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित

● आरोग्य विभागातील रद्द झालेली क आणि ड गटातील पदभरतीची परीक्षा 15 -16 किंवा 22 - 23 ऑक्टोबरला होईल, आरोग्यमंत्री राजेश टोपे

● शिवसेनेचे अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळांच्या घरी ईडीचे छापे, सिटी को-ऑप बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीचा छापा

● मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान मोदींना पत्र; प्रस्तावित हायस्पीड रेल्वे प्रकल्प आणि समृद्धी महामार्ग यांच्या कामासंदर्भात पत्र पाठवून पंतप्रधानांचं लक्ष वेधून घेतलं

● मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अपघात, इंदोर-पुणे रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

● नाशिकमध्ये चिकुन गुन्याचे थैमान; महिन्यापासून डेंग्यूचाही उद्रेक, स्वच्छता मोहीम राबवण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना

● T20 लीगच्या सामन्यावर सट्टा, 1 कोटींची रोकड जप्त; पुणे पोलिसांनी दोन आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट बुकींना ताब्यात घेतले

● केंद्र सरकारविरोधात शेतकरी संघटनांचा आज भारत बंद, गुरुग्राम येथे अभूतपूर्व वाहतूक कोंडी

● नाशिकमध्ये उत्तर प्रदेशाच्या दहशतवादी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली असून धर्मांतराचे रॅकेट चालवणार्‍या एका व्यक्तीला एटीएसने नाशिकमधून अटक केली

● आता कोणताही नागरिक आरोग्यसुविधांपासून वंचित राहणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/pmykUfw5Sjb