LetsUpp Marathi
4.85K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
Let's Up News Updates

🎯 राष्ट्रीय घडामोडी :

👉 नवी दिल्ली - दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात 'टॉक टू एके' अभियानात अफरातफर केल्याचा आरोपावरुन सीबीआयने केला गुन्हा दाखल

👉 नवी दिल्ली - बेहिशेबी मालमत्तेचे व्यवहार रोखण्यासाठी सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील : वैंकय्या नायडू

👉 तामीळनाडू - जल्लीकट्टूच्या समर्थनात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चेन्नईमध्ये आज 31 कॉलेजला सुट्टी जाहीर

👉 जोधपूर - सलमानला दोषमुक्त करण्याच्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेणार, बिष्णोई समाजाच्या वकिलांची प्रतिक्रिया

👉 गुजरात - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात 63 टक्के वाढ, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी केली घोषणा

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :

👉 रोम - भूमध्य सागरात निर्वासितांना घेऊन जाणारी बोट शनिवारी उलटल्यामुळे जवळपास 180 जण बेपत्ता झाल्याची संयुक्त राष्ट्र संघाची माहिती

🎯 राजकीय घडामोडी :

👉 मुंबई - भाजपा युवा मोर्चाकडून 92 उमेदवारांची यादी, आशिष शेलार यांच्याकडे इच्छुक उमेदवारांची यादी सुपूर्द

👉 नाशिक - विधान परिषदेच्या नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघासाठी दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद, आता 22 उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक

👉 पुणे - आमदार विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटनाही उतरणार राजकीय आखाड्यात, शुक्रवारी पुण्यातील मेळाव्यात ठरणार पुढील दिशा

🎯 प्रादेशिक घडामोडी :

👉 कोल्हापूर - विमानतळ विस्तारीकरणासाठी दहा हेक्टर जागा हस्तांतरित करण्यासाठी दिलेला प्रस्ताव वन खात्याने फेटाळला

👉 नागपूर - सराफा सर्व्हे तसेच महाराष्ट्रात 41 ठिकाणी आयकर विभागाचे छापे, विदर्भातील 21 तर पुण्यातील 20, नाशिकमधील 2 तसेच अकोल्यातील एका ठिकाणाचा समावेश

👉 मुंबई - 'असर'चा अहवाल जाहीर, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केला अहवाल, भारताच्या तुलनेत राज्याची प्रगती चांगली

👉 नंदुरबार - बनावट कागदपत्रे सादर करून जिल्ह्यातील 29 उद्योजकांनी तब्बल सहा कोटी तीन लाख 14 हजार 862 रुपयांचे अनुदान लाटल्याचा प्रकार उघड

👉 सातारा - आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे सांगत खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेशावरील चर्चांना पूर्ण विराम दिला

🎯 खेळ घडामोडी :

👉 कटक - भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज दुसरा वन-डे सामना, सायंकाळी दव पडण्यास सुरुवात होते, आजही असेच घडले तर नाणेफेक कौल निर्णायक ठरू शकतो

🎯 मनोरंजन घडामोडी :

👉 मुंबई - सलमानची निर्दोष मुक्तता झाली ही बातमी ऐकून आम्हाला खूप आनंद झाला आहे : सलमान खानचे वडील सलीम खान

👉 गडचिरोली - सकारात्मक व्यसनांनी माणसाचे आयुष्य घडते तर नकारात्मक व्यसनांनी मात्र माणसाचे आयुष्य लवकरच संपते : मकरंद अनासपुरे

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 *’नकारात्मक‘ नाही ’सकारात्मक’व्हा...*

*Let's Up Think Katta*

प्रत्येकामध्ये काहीतरी आगळं-वेगळं किंवा अशक्य वाटणारं काम करण्याचीही धमक असतेच. ही प्रचंड ताकद किंवा उर्जा दडून बसलेली असते. म्हणून ती योग्यवेळी बाहेर यायली हवी हे ही तितकेच महत्वाचे... पण होतं काय, ‘तुला हे जमणार नाही’, ‘तुला हे शक्य होणार नाही’, ‘तुझ्यात तेवढी ताकद नाही’, ‘तुझ्या बुद्धीला हे झेपणार नाही.’ यासारखी ‘नकारात्मक’ टिपण्णी करणारेच जास्त भेटतात. ‘तु स्वतःला काय फार शहाणा समजतोस काय? तुला फार अक्कल आली असे वाटले तरी तो तुझा गैरसमज आहे. ‘डोन्ट बी ओव्हरस्मार्ट’अशांसारखी वाक्ये हे लोक सहजरित्या तोंडावर फेकून आपल्याला नामोहरम करत असतात. आपण करायचे नाही व दुसर्‍याला करू द्यायचे नाही ही त्यांची वृत्ती…

आपल्यापैकी कित्येकांना अशी माणसे नेहमी भेटत असतात. त्यांच्याकडे ‘आपण काय करू शकतो’ यापेक्षा ‘आपण काय करू शकत नाही.’ याचीच यादी भलीमोठी असते. दुर्दैवाने आपल्या आसपास अशा प्रकारच्या ‘नकारात्मक’ मनोवृत्तीची माणसे मोठ्या प्रमाणावर असतात.

समजा एखाद्याने असे काही ‘अचाट’ काम करण्याचा प्रयत्न केला व त्यात तो अपयशी ठरला तर हीच माणसे ओरडतात, ‘तरी मी त्याला सांगत होतो की, नसते धाडस करू नकोस, अंगाशी येईल! तरी मी त्याला सांगत होतो की, तु तोंडाघशी पडशील! तरी मी त्याला सांगत होतो की, हा असला येडपटपणा करू नकोस!’ असे म्हणत स्वतःच्या शहाणपणाची मिजास मारायला व स्वतःची पाठ थोपटून घ्यायला तयारच बसलेले असतात.

ही अशी माणसे एखादी गोष्ट कशी यशस्वी करायची याचे मार्ग शोधत न बसता ही गोष्ट का करू नये? याची कारणे शोधत बसतात. बहुतेक वेळा अशा या ‘नकारात्मक’माणसांची सुरुवात आपल्या कुटुंबापासूनच होते. जिथं-जिथं अशी ‘नकारत्मक’ विचारसरणीची माणसं जास्त प्रमाणात असतात तिथं-तिथं प्रगती थांबलीच म्हणून समजा. म्हणून विचार करा, ‘नकारत्मक’ विचारसरणी आपल्यावर कोणी थोपवत तर नाही ना? आणि असे असेल तर त्याचं म्हणणं ऐका पण निर्णय तुम्ही स्वतः घ्या. कारण ‘सकारत्मक’ विचारसरणीच तुम्हाला जीवनात पुढे घेऊन जाईल...!
Let's Up News Updates

🎯 राष्ट्रीय घडामोडी :

👉 नवी दिल्ली - 30 हजारांवरील व्यवहारांसाठी ‘पॅनकार्ड’ बंधनकारक करण्याचे सरकारच्या विचाराधीन, कॅशलेसला चालना देण्यासाठी घेणार निर्णय

👉 नवी दिल्ली - केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) संचालकपदी दिल्लीचे पोलिस आयुक्त अलोक वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली

👉 नवी दिल्ली - मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईकच्‍या एनजीओचे जवळपास 100 कोटी रुपये रिअल इस्‍टेटमध्‍ये - एनआयए

👉 शिमला - धर्मशालाला हिमाचल प्रदेश राज्याच्या उपराजधानीचा दर्जा, मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांची घोषणा

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :

👉 वॉशिंग्टन - कोणत्याही जाती, धर्म आणि पंथातील गुणवत्ता प्राप्त लोक अमेरिकेची ताकद, भविष्यात अमेरिकेला केवळ महिला राष्ट्राध्यक्षच नव्हे तर हिंदू, लॅटीन, ज्यू राष्ट्राध्यक्षही मिळू शकतील - बराक ओबामा

🎯 राजकीय घडामोडी :

👉 मुंबई - भाजप नेत्यांच्या बेताल वक्यव्यासंदर्भात शिवसेना नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली

👉 नवी दिल्ली - भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 150 उमेदवारांची नावं निश्चित झाल्याचे वृत्त

🎯 प्रादेशिक घडामोडी :

👉 मुंबई - जे.जे. रुग्णालयातील नेत्ररोग विभागातील विद्यार्थ्यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. रागिणी पारेख यांच्याविरुद्ध केलेली तक्रार घेतली मागे

👉 नागपूर - मेयो इस्पितळाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांना एक दिवसाची पोलिस कोठडी, लाच घेतल्याप्रकरणी झाली होती अटक

👉 पुणे - 16 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) मंदार जोशी दिग्दर्शित 'लेथ जोशी' या मराठी चित्रपटाला राज्य सरकारचा 'संत तुकाराम सर्वोत्कृष्ट चित्रपटा'चा पुरस्कार

👉 कोल्हापूर - विविध प्रलंबित मागण्यांसाठी शाळा संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या वतीने आज शाळा बंद आंदोलन, सुमारे 1500 शाळा बंद राहणार

👉 नाशिक - शेतामध्ये जाणार्‍या अल्पवयीन मुलीस अडवून तिच्यावर सामूहिक बलात्कार आणि धमकावल्याप्रकरणी चौघा आरोपींना प्रत्येकी 20 वर्ष सक्तमजुरी

🎯 खेळ घडामोडी :

👉 कटक - इंग्लंडविरुद्धच्या दुस-या एकदिवसीय सामन्यात भारताचा 15 धावांनी विजय, युवराज सिंग ठरला 'मॅन ऑफ द मॅच

🎯 मनोरंजन घडामोडी :

👉 लॉस अँजिलिस - बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने 2017 च्या 'पीपल्स चॉईस अवॉर्ड'मध्ये फेव्हरेट ड्रामॅटिक अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला

👉 मुंबई - अभिनेत्री रती अग्निहोत्री आणि तिच्या पतीवर वीज चोरी प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, बेस्टच्या दक्षता पथकाची कारवाई


(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 कोल्हापुरात सोन्याचा पाऊस पडणारं गाव...!

Let's Up Special Update

कोल्हापूरपासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर तुळशी आणि भोगावती या दोन नद्यांच्या संगमावर वसलेलं करवीर तालुक्यात बीड हे गाव. या गावात कल्लेश्वरचा माळ आणि बीड शेड परिसरात डाळीच्या आकाराची सोन्याची छोटी छोटी नाणी सापडतात. त्यामुळे या गावावर सोन्याच्या नाण्यांचा पाऊस पडतो, ही आख्यायिका आहे.

गावातील अनेक घरातील देव्हाऱ्यात ही नाणी पुजली जातात. शेतात काम करत असताना, रस्त्याने जाताना इतकंच काय जनावराच्या शेणावर आणि शेतीच्या पानावरही अनेक लोकांना नक्षीकाम केलेले सोन्याचे छोटे मोठे तुकडे यापूर्वी सापडले आहेत आणि ते आजही सापडतात.

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

बाराव्या शतकात शिलाहाराच्या राजधानीचं गाव हेच बीड होतं. येथील राजाने पन्हाळगड बांधला आहे अशी इतिहासात नोंद आहे. राजधानीचं गाव असल्याने गावाभोवती तटबंदी, राजवाडा, जुन्या विहिरी, वास्तू होत्या. तसेच तत्कालीन परिस्थितीत सोन्याची नाणी काढली जात होती. ही नाणी डाळीच्या आकाराची आणि विशेष म्हणजे त्यावर मुद्राही उमटवली होती. बीडमध्ये बहुतेक घरांत एक-दोन स्वरुपात ही नाणी आहेत. अर्थात त्या नाण्यात खूप श्रद्धा दडलेली आहे. काही कालावधीनंतर हे गाव लुप्त झालं, या परिसरात खोदकाम करताना सहज ही नाणी मिळाल्याने या गावात सोन्याचा पाऊस पडतो, अशी आख्यायिका रुढ झाली.

बीड हे शिलाहारांच्या राजधानीचं गाव साधारण 1200 सालात अतिशय समृद्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष हे, की आपल्या गावाचा हा इतिहास पुराव्याच्या निकषावर जगासमोर आणण्यासाठी गावकऱ्यांनीच पुढाकार घेतला आहे. शुद्ध सोन्याची नाणी काढणारी आणि नाण्यावर वेगवेगळे छाप उठवणारी इथे टांकसाळच होती. अशा दंतकथांवर आधारित असलेली बीडची चर्चा इतिहासात आहे. त्याची मूर्त साक्ष याच परिसरात असलेल्या शिलालेखातून मिळते. यावर इतिहासाचे अभ्यासक उमाकांत राणिंगा आणि डॉ. आनंद दामले संशोधन करत आहेत...

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 आता कर्ज पात्रता रिपोर्ट (सिबिल) मिळणार फुकट!

Let's Up Current Affair

रिझर्व बँकेने कर्जासाठी आवश्यक असणारा आणि तुमची पत दाखवणारा सिबिल (क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिडेट) रिपोर्ट मोफत उपलब्ध करून देणे बंधनकारक केले आहे. रिझर्व बँकेने हा क्रेडिट रिपोर्ट वर्षातून एकदा विनंती केल्यावर पूर्णपणे मोफत उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश क्रेडिट रेटिंग कंपन्यांना दिलेत. त्याची अंमलबजावणीही 1 जानेवारीपासून सुरू झाली आहे.

याआधी या रिपोर्टसाठी 400 ते 500 रूपये मोजावे लागायचे. आताही पैसे मोजावे लागतील मात्र तुम्ही वर्षातून एकदा तो मोफत मिळवू शकाल. त्यापेक्षा जास्त वेळा क्रेडिट हिस्ट्री रिपोर्ट तुम्हाला हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला चार्ज भरावा लागेल.

सिबिल का आवश्यक?

जर तुम्ही कुणाही बँकेकडे कर्ज मागणी केली तर? बँक प्रथम पाहते ज्याला आपल्याला कर्ज द्यायचे आहे त्याची पत काय आहे? ही पत पडताळण्यासाठी बँक सिबील रिपोर्टची मागणी करतात. या सिबील रिपोर्टमध्ये तुमचे गेल्या 3 वर्षातले आर्थिक व्यवहार कसे आहेत, तुम्ही काही हफ्ते किंवा क्रेडिट कार्डची देणी थकवली आहेत का? याचा तपशील असतो. त्यावरून तुमचं क्रेडिट रेटिंग ठरतं, त्यावरून तुम्हाला नवं कर्ज द्यायचं की नाही, याचा निर्णय बँका घेतात. त्यामुळे सिबिलच्या रिपोर्टमध्ये तुमचं क्रेडिट रेटिंग चांगलं नसेल तर तुम्हाला कुणीही म्हणजे कोणतीही बँक किंवा आर्थिक संस्था लोन देणार नाही.

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

सिबील रिपोर्टचं काम पाहणाऱ्या सिबिलप्रमाणेच अन्य चार संस्था किंवा कंपन्या इक्विफॅक्स क्रेडिट इन्फॉर्मेशन सर्विसेस प्रा लि, एक्स्पेरियन क्रेडिट इन्फॉर्मेशन सर्विसेस प्रा लि आणि सीआरआयएफ हायमार्क क्रेडिट इन्फॉर्मेशन सर्विसेस प्रा लि. या आहेत.

सिबिलने दिलेल्या माहितीनुसार, क्रेडिट रेटिंग पॉईंटची रेंज ही 300 ते 900 दरम्यान असते. त्यानुसार 80 टक्के कर्जवाटप हे किमान 750 किंवा त्यापेक्षा जास्त क्रेडिट रेटिंग असलेल्या खातेदारांनाच होतं. त्यापेक्षा रेटिंग कमी आलं तर तुमच्या कर्जाची मागणी संबंधित बँकेकडून फेटाळली जाते.

त्यामुळेच ऑनलाईन माध्यमातून किंवा क्रेडिट कार्ड किंवा पॅनकार्ड देऊन केलेल्या प्रत्येक व्यवहारांवर कुणाची तरी नजर असते. किंवा त्याची माहिती या क्रेडिट रेटिंग कंपन्याना मिळवता येते. अशा व्यवहारांची माहिती मिळवण्यावर सध्या मर्यादा असली तरी तुम्ही थकवलेले कर्जाचे हफ्ते किंवा क्रेडिट कार्डची देणी यामुळे तुमची ऐपत खालावू शकते. त्यासाठीच आपली पत सांभाळा, सर्व प्रकारची देणी वेळच्या वेळी फेडा कारण तरच तुम्ही नव्या कर्जासाठी पात्र ठरू शकता…

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
Let's Up News Updates

🎯 राष्ट्रीय घडामोडी :

👉 नवी दिल्ली - नोटबंदीमुळे जीडीपीवर अल्पकाळासाठी परिणाम होईल, पण दीर्घकालीन दृष्टीकोनातून हा निर्णय फायदेशीर ठरेल, आरबीआय गव्हर्नरांनी दिली पीएसीसमोर माहिती

👉 अहमदाबाद - काळ्याचं पांढरं करण्याच्या संशयातून गुजरातेतील प्रसिद्ध व्यावसायिक जिग्नेश भजियावालाला अटक, ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी केली कारवाई

👉 नवी दिल्ली - चर्चमधून मिळणाऱ्या घटस्फोटाला कायदेशीर मान्यता देण्यास सुप्रीम कोर्टाने दिला नकार

👉 बंगळुरु - इन्फोसिसने आपल्या 8 ते 9 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन केले कमी, कंपनीचे मुख्य एचआर कृष्णमूर्ती शंकर यांनी केले स्पष्ट

👉 चेन्नई - जलिकट्टूच्या समर्थनार्थ शेकडोंच्या संख्येने जोरदार निदर्शने सुरू असताना तामिळनाडू सरकारने एक-दोन दिवसांत यासंबंधी अध्यादेश जारी करण्यात येईल, असे सांगितले आहे

👉 चेन्नई - जलीकट्टू बंदीविरोधात संपूर्ण तामिळनाडू एकवटले, या खेळावरील बंदी उठवण्यात यावी यासाठी सर्वसामान्यांसून, सेलिब्रिटी ते राजकारण्यांपर्यंत सर्वांनीच उठवला आवाज

👉 बराक ओबामा अमेरिकेच्या राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर सर्वात जास्त फॉलोअर्स असणारे नेते

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :

👉 गँबिया देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून आदम बेरो यांनी घेतली शपथ, डकार दूतावास येथे झाला शपथविधी सोहळा

👉 लिबियामध्ये अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचे 80 हून अधिक दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याचे एएफपीचे वृत्त

🎯 राजकीय घडामोडी :

👉 भाजपचा त्याग करून काँग्रेसमध्ये सामील झालेले नवज्योतसिंग सिद्धूंकडे 52.55 कोटींची संपत्ती, तब्बल 44 लाखांची घड्याळे

🎯 प्रादेशिक घडामोडी :

👉 मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणात वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर स्कॉटलंड यार्डची मदत घेता येणार नाही, सीबीआयची मुंबई हायकोर्टात माहिती

👉 मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांची जागतिक फुटबॉल महासंघ अर्थात फिफाच्या अर्थ समितीवर निवड

👉 नाशिक पदवीधर निवडणूक 5 जणांची माघार, विठल गुंजाळ, पुरुषोत्तम रकीबे, सुरेश टाके, सुभाष डांगे, मनोज पवार यांची माघार, निवडणुकीच्या रिंगणात एकूण 17 उमेदवार

👉 भंडारा - तुमसर तालुक्यातील चिखला खाणीत झालेल्या अपघातात दिलीप सोनावणे या कामगाराचा मृत्यू

👉 कोल्हापूर - ‘कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपासात प्रगती असून चौकशी योग्य दिशेने सुरु आहे’, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची माहिती

🎯 व्यापार घडामोडी :

👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 27034.50, निफ्टी : 8349.35, सोने भाव : 28,575 (प्रतितोळा), चांदी : 41,194 (प्रतिकिलो)

🎯 तंत्रज्ञान घडामोडी :

👉 नवी दिल्ली - सॅमसंगचा 36,900 रुपयांचा गॅलक्सी सी 9 प्रो मोबाईल लाँच

🎯 खेळ घडामोडी :

👉 बीसीसीआय विरुद्ध लोढा समिती, अॅमिकस क्युरी यांनी बीसीसीआयच्या प्रशासकपदासाठी 9 सदस्यांची नावे सुप्रीम कोर्टाला सोपवली

🎯 मनोरंजन घडामोडी :

👉 मुंबई - सब टीव्हीवरच्या ‘एफआयआर’ या विनोदी कार्यक्रमातली चंद्रमुखी चौटाला अर्थात कविता कौशिक लवकरच रोहित बिस्वाससोबत होणार विवाहबद्ध

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 पेटीएमचे नवीन फिचर्स!

Let's Up Techno Katta

आपल्या सेवा अधिक सुरक्षित व गतीमान होण्यासाठी पेटीएमने ताज्या अपडेटच्या माध्यमातून आपल्या युजर्ससाठी विविध नाविन्यपूर्ण सुविधा प्रदान केल्या आहेत. अलीकडेच पेटीएमने ‘पेमेंट बँक’ सुरू केली आहे.15 जानेवारीपासून या बँकेस प्रारंभ झाला आहे. ताज्या अपडेटनुसार आता पेटीएम वॉलेटचे सर्व विद्यमान युजर्स हे आपोआप नवीन बँकेशी जुडणार आहेत. अर्थात पेटीएम बँकेत या युजर्सला नव्याने खाते उघडण्याची कोणतीही आवश्यकता नाही. तसेच आगामी काळात पेटीएम युजरला बँकेच्या खात्याप्रमाणे चेकबुक, डेबिट कार्ड वापरण्याची सुविधा देण्यात येणार असून त्याच्या अकाऊंटमधील पैशांवर व्याजही मिळेल.

दरम्यान, याचसोबत पेटीएमने आपल्या युजर्सला भेडसावणार्‍या विविध समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ‘कम्युनिटी फोरम’ही सुरू केला आहे. तसेच पेटीएमवर आता कुणीही स्वत:ला (प्रत्यक्षात नसला तरी!) व्यापारी घोषित करून 50 हजार रूपयांपर्यंतचे व्यवहार करू शकेल. अर्थात यासाठी आपल्याला पेटीएमच्या पेमेंट बँकेतील खात्याशी संलग्न होण्यासाठी आवश्यक ती माहिती भरावी लागणार आहे...

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 इंडस आणि फ्रिचार्जची नवीन पेमेंट प्रणाली

आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी इंडस ऑपरेटींग सिस्टीम आणि फ्रिचार्ज या वॅलेट सेवेने एकत्रीतपणे ‘रिचार्ज 2.0’ ही नवीन पेमेंट प्रणाली विकसित केली आहे. ‘रिचार्ज 2.0’ ही इंडस ऑपरेटींग प्रणालीवर चालणार्‍या स्मार्टफोनधारकांच्या उपयोगात येणार आहे. याच्या अंतर्गत कुणीही ‘इंडस डायलर’ वरून सुलभपणे रिचार्ज करू शकेल. यात बॅलन्सदेखील टाकता येणार येईल. तसेच कुणीही विविध रिचार्जची तुलना तसेच त्याने आठवडा वा महिनाभरात केलेल्या रिचार्जची माहिती सहजपणे मिळवू शकेल. याच्या मदतीने टॉकटाईम, डाटा, युजेस आदींबाबत अलर्टही मिळतील. देशात 95 टक्के मोबाईल युजर्स हे प्रिपेड कार्डचा उपयोग करतात. याचा विचार करता ‘रिचार्ज 2.0’ हे खास याच युजरबेससाठी विकसित करण्यात आले आहे.

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
Let's Up News Updates

🎯 राष्ट्रीय घडामोडी :

👉 नवी दिल्ली - दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात 'टॉक टू एके' अभियानात अफरातफर केल्याचा आरोपावरुन सीबीआयने केला गुन्हा दाखल

👉 नवी दिल्ली - बेहिशेबी मालमत्तेचे व्यवहार रोखण्यासाठी सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील : वैंकय्या नायडू

👉 तामीळनाडू - जल्लीकट्टूच्या समर्थनात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चेन्नईमध्ये आज 31 कॉलेजला सुट्टी जाहीर

👉 जोधपूर - सलमानला दोषमुक्त करण्याच्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेणार, बिष्णोई समाजाच्या वकिलांची प्रतिक्रिया

👉 गुजरात - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात 63 टक्के वाढ, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी केली घोषणा

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :

👉 रोम - भूमध्य सागरात निर्वासितांना घेऊन जाणारी बोट शनिवारी उलटल्यामुळे जवळपास 180 जण बेपत्ता झाल्याची संयुक्त राष्ट्र संघाची माहिती

🎯 राजकीय घडामोडी :

👉 मुंबई - भाजपा युवा मोर्चाकडून 92 उमेदवारांची यादी, आशिष शेलार यांच्याकडे इच्छुक उमेदवारांची यादी सुपूर्द

👉 नाशिक - विधान परिषदेच्या नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघासाठी दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद, आता 22 उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक

👉 पुणे - आमदार विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटनाही उतरणार राजकीय आखाड्यात, शुक्रवारी पुण्यातील मेळाव्यात ठरणार पुढील दिशा

🎯 प्रादेशिक घडामोडी :

👉 कोल्हापूर - विमानतळ विस्तारीकरणासाठी दहा हेक्टर जागा हस्तांतरित करण्यासाठी दिलेला प्रस्ताव वन खात्याने फेटाळला

👉 नागपूर - सराफा सर्व्हे तसेच महाराष्ट्रात 41 ठिकाणी आयकर विभागाचे छापे, विदर्भातील 21 तर पुण्यातील 20, नाशिकमधील 2 तसेच अकोल्यातील एका ठिकाणाचा समावेश

👉 मुंबई - 'असर'चा अहवाल जाहीर, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केला अहवाल, भारताच्या तुलनेत राज्याची प्रगती चांगली

👉 नंदुरबार - बनावट कागदपत्रे सादर करून जिल्ह्यातील 29 उद्योजकांनी तब्बल सहा कोटी तीन लाख 14 हजार 862 रुपयांचे अनुदान लाटल्याचा प्रकार उघड

👉 सातारा - आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे सांगत खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेशावरील चर्चांना पूर्ण विराम दिला

🎯 खेळ घडामोडी :

👉 कटक - भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज दुसरा वन-डे सामना, सायंकाळी दव पडण्यास सुरुवात होते, आजही असेच घडले तर नाणेफेक कौल निर्णायक ठरू शकतो

🎯 मनोरंजन घडामोडी :

👉 मुंबई - सलमानची निर्दोष मुक्तता झाली ही बातमी ऐकून आम्हाला खूप आनंद झाला आहे : सलमान खानचे वडील सलीम खान

👉 गडचिरोली - सकारात्मक व्यसनांनी माणसाचे आयुष्य घडते तर नकारात्मक व्यसनांनी मात्र माणसाचे आयुष्य लवकरच संपते : मकरंद अनासपुरे

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 मस्त करिअर : विमानाची देखभाल

👉 Let's Up Career Katta

आज जगातल्या विविध देशांकडे मालाची आणि प्रवाशांची वाहतूक करणारी निरनिराळ्या प्रकारची पाच लाखापेक्षा अधिक विमाने आहेत. त्याचबरोबर काही बड्या उद्योगपतींनी आणि व्यापक संपर्क असलेल्या कंपन्यांनी स्वत:ची छोटी विमाने घेतलेली आहेत. जगात अशा छोट्या विमानांची संख्या 40 लाखांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे जगाच्या प्रगतीबरोबर वाढत चाललेलं आणि उत्तम, भरपूर पगाराची नोकरी देणारं करिअर म्हणजे विमानाची देखभाल...

भारत विमानांची वेगाने विकसित होणारी बाजारपेठ आहे. अशा विमान कंपन्यांना विमानाची देखभाल करणार्‍या तंत्रज्ञांची तीव्र टंचाई नेहमीच जाणवत असते. त्यामुळे विमानाच्या देखभालीचे शिक्षण घेणार्‍या तरुणांना ही एक उत्तम रोजगार संधी आहे. सध्या भारतातल्या विविध विमान कंपन्यांना अशी माणसे तातडीने हवी आहेत. या कंपन्यांमध्ये हे शिक्षण घेऊन जाणार्‍या विद्यार्थ्यांना दरमहा 25 ते 40 हजार रुपये एवढे वेतन मिळते आणि हे वेतन दरमहा 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. या संबंधातल्या प्रशिक्षणाचे खास अभ्यासक्रम उपलब्ध नाहीत.

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

विमानाच्या बाबतीत दोन प्रकारच्या नोकर्‍या असतात. विमान चालवणारी एक आणि विमानाची देखभाल करणारी एक. त्यातल्या विमान चालविणाऱ्यांना पायलट असे म्हणतात आणि पायलट होण्यासाठी घ्यावे लागणारे प्रशिक्षण अतिशय महागडे असते. ज्याला साधारणत: 8 ते 10 लाख रुपये खर्च येतो. मात्र विमानाची दुसरी शाखा म्हणजे देखभाल करणार्‍या लोकांची शाखा. तिला मात्र प्रशिक्षणासाठी केवळ सव्वा लाख रुपये खर्च येतो. विमानाचा रखरखाव करणार्‍या या लोकांसाठी मोठा अभ्यासक्रम नाही. परंतु काही छोट्या-छोट्या संस्थांचे छोटे छोटे अभ्यासक्रम आहेत आणि हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर डायरेक्टर ऑफ जनरल ऍन्ड सिव्हील एरियेशन या संस्थेचे परवाना कम् प्रमाणपत्र मिळवावे लागते. हे प्रमाणपत्र मिळणे म्हणजेच नोकरीची पात्रता.

हे प्रशिक्षण घेणारा उमेदवार बारावी उत्तीर्ण असावा लागतो. खालील संस्था हे प्रमाणपत्र देतात. 1) स्कूल ऑफ एव्हीएशन सायन्स ऍन्ड टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एअरोनॉटिक्स् ऍन्ड इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एअरोनॉटीकल सायन्स, नवी दिल्ली 2) फ्लायटेक एव्हियेशन अकॅडमी, इन्स्टिट्यूट ऑफ एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनिअरींग, राजीव गांधी एव्हियेशन अकॅडमी ऍन्ड हैदराबाद कॉलेज ऑफ एव्हियेशन टेक, हैदराबाद. 3) एअरोनॉटिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, लखनौ 4) नेहरू कॉलेज ऑफ एअरोनॉटिक्स् ऍन्ड अप्लाईड सायन्सेस, कोईमतूर, तमिळनाडू. 5) एअरक्राफ्ट मेन्टेनन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरींग इन्स्टिट्यूट, कोलकत्ता 6) व्हीएसएम एअरोस्पेस अ‍ॅण्ड हिंदुस्थान एव्हियेशन अकॅडमी, बंगळूर.

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 इस्रो करणार नवा विक्रम

👉 Let's Up Current Affair

येत्या फेब्रुवारी महिन्यात एकाच वेळी 103 उपग्रहांचे प्रक्षेपण करून भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) नवा विक्रम रचणार आहे. त्यातील केवळ 3 वगळता बाकी सगळे उपग्रह हे परदेशी आहेत. आजपर्यंत कोणत्याही देशाने अशा प्रकारची कामगिरी केलेली नाही.

आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे प्रक्षेपण होणार आहे. यावेळी एकाच रॉकेटद्वारे 103 उपग्रह अवकाशात सोडण्यात येतील. त्यातील 100 हे परकीय असून त्यांमध्ये अमेरिका व जर्मनीचाही समावेश आहे. इस्रोच्या लिक्विड प्रॉपल्शन सिस्टिम्स सेंटरचे संचालक एस. सोमनाथ यांनी सध्या चालू असलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या दुसर्‍या दिवशी खुल्या सत्रात ही माहिती दिली. एकाच वेळी 100 पेक्षा जास्त उपग्रह सोडून आम्ही शतक गाठणार आहोत, असे ते म्हणाले.

इस्रोने आधी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात 83 उपग्रह सोडण्याची योजना बनवली होती. मात्र त्यात 20 उपग्रहांची भर पडल्यामुळे हे प्रक्षेपण एक आठवडा दूर गेले आणि आता ते फेब्रुवारीत पार पडेल, असे सोमनाथ म्हणाले. हे अत्यंत लहान असे 100 उपग्रह असतील. पीएसएलव्ही (पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल) - सी37 या रॉकेटद्वारे त्यांचे प्रक्षेपण होईल. या रॉकेटचे वजन 1350 किग्रॅ असेल, त्यातील 500-600किग्रॅ वजन हे उपग्रहाचे असेल, असे सोमनाथ म्हणाले.

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 अ‍ॅप डाऊनलोड ; भारत पुढे अमेरीका-ब्राझील मागे

गेल्या वर्षी 2016 साली गूगल प्ले-स्टोरवरून भारतातून जवळपास 6 अब्ज अ‍ॅप डाऊनलोड झाले आहेत. 2015 साली हीच संख्या 3.5 अब्ज एवढी होती. अ‍ॅप डाऊनलोड करण्याच्या बाबतीत भारताने अमेरीका आणि ब्राझीलला मागे टाकले, असे अ‍ॅप अ‍ॅन संस्थेने म्हटले आहे. त्यांनी अहवालात म्हटले आहे, की अ‍ॅपलच्या आयओएस अ‍ॅप स्टोरवरून कमाईमध्ये चीन हा पहिल्यांदाच सर्वात मोठा स्रोत बनला आहे. मात्र अ‍ॅपलच्या स्वतःच्या अहवालानुसार अमेरिका आणि जपानच्या तुलनेत चीनची बाजारपेठ अजूनही लहान आहे.

भारत हा 2016 साली जगातील दुसर्‍या क्रमांकाची स्मार्ट फोनची बाजारपेठ बनला आहे. सध्या फक्त चीनमध्ये भारतापेक्षा अधिक स्मार्ट फोन वापरकर्ते आहेत. 2020 या वर्षाच्या शेवटापर्यंत गूगल प्ले-स्टोरवरून भारतात 20 अब्ज अ‍ॅप डाऊनलोड होतील आणि या यादीत भारत सर्वात वरच्या स्थानी जाईल, याची मोठी शक्यता आहे.

भारतात गुगल प्ले आणि आयओएसवरून डाऊनलोड केल्या जाणार्‍या अ‍ॅपमध्ये फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप आणि यूसी ब्राऊजर यांचा क्रमांक सर्वात वरचा राहिला, तर कँडी क्रश, सबवे सर्फर्स आणि टेम्पल रन 2 हे सर्वाधिक डाऊनलोड केले गेलेले गेम्स ठरले आहेत.

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
Let's Up News Updates

🎯 राष्ट्रीय घडामोडी :

👉 नवी दिल्ली - तामिळनाडूच्या लोकांनी जलीकट्टूसाठी दाखवलेल्या एकतेचे कौतुक, सरकार सर्वपरीने त्यांना मदत करेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी

👉 नवी दिल्ली - गरीब वर्गाची सामाजिक सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी जनधन खातेधारकांना पुढल्या 3 वर्षांपर्यंत 2 लाखांचा विमा विनामूल्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या विचाराधीन, याबाबत 1 फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता

👉 नवी दिल्ली - नजरचुकीने एलओसी पार गेलेले भारतीय जवान चंदू बाबूलाल चव्हाण यांची पाकिस्तानने केली सुटका, चंदू चव्हाण 29 सप्टेंबर 2016 पासून पाकिस्तानच्या ताब्यात होते

👉 तुमकूर - कर्नाटकातील कुनीगल तालुक्यातील शिमशा नदीतील पाणी आटल्यामुळे ही 700 वर्षे जुनी हनुमानाची भव्य दगडी मूर्ती सापडली

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :

👉 पाकिस्तान - कुर्रम एजन्सीच्या ईदगाह बाजारात बॉम्बस्फोट, 12 ठार तर 35 जखमी झाल्याचे वृत्त

👉 वॉशिंग्टन - अमेरिकन एअरफोर्सने सीरियातील अल कायदाच्या ट्रेनिंग कॅम्पवर केलेल्या हल्ल्यात 100 पेक्षा जास्त दहशतवादी ठार, ओबामांनी शेवटच्या तासांत केली कारवाई

🎯 राजकीय घडामोडी :

👉 मुंबई - भाजपच्या निवडणूक समितीने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 227 जागांसाठी 512 उमेदवारांची यादी केली तयार

👉 मुंबई - मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची 31 जणांची दुसरी यादी जाहीर, यादीत राष्ट्रवादी काँग्रेसने तरुण आणि महिलांना दिले प्राधान्य

🎯 प्रादेशिक घडामोडी :

👉 मुंबई - पंकज भुजबळ यांना 2 लाखांच्या व्यक्तीगत जातमुचलक्यावर मिळाला जामीन, मुंबई सत्र न्यायालयाने दिला जामीन

👉 नागपूर - खैरलांजी हत्याकांडातील पीडित आणि एकमेव साक्षिदार भैयालाल भोतमांगे (वय, 62) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

👉 इंदापूर - पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ लक्झरी बसचा भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू तर 13 जण जखमी, जखमींवर इंदापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

👉 सातारा - कास पठारावर शिकारीसाठी आलेले 3 जण ताब्यात, वनविभागाची कारवाई, तिघांविरोधात गुन्हा दाखल


🎯 तंत्रज्ञान घडामोडी :

👉 झियाओ नान या रोबोट पत्रकाराने लिहिलेली 300 अक्षरांची बातमी चीनमध्ये प्रकाशित, त्याने हि बातमी केवळ एका सेकंदात लिहिली

🎯 खेळ घडामोडी :

👉 कटक - भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये षटकांची गती संथ राखल्याबद्दल इंग्लंडच्या संघाला 10 टक्के तर इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनलाही 20 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे

🎯 मनोरंजन घडामोडी :

👉 मुंबई - ‘सरकार 3’ चित्रपटात यामी गौतम पहिल्यादांच निगेटिव्ह भूमिका साकारण्यासाठी खूपच उत्सुक आहे

👉 मुंबई - पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही मालिका येणार, या पर्वाची कथा पुर्णता नविन असणार आहे

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 उगाच अ‍ॅडजेस्ट करत बसू नका!

👉 Let's Up Think Katta

आपण नेहमीच आहे त्या परिस्थितीत स्वतःला अ‍ॅडजेस्ट व्हायचा प्रयत्न करत असतो. उगीच कशाला वाकड्यात शिरायचे म्हणून आपल्याला जी वेडी वाकडी माणसे भेटत असतात त्यांच्याशी पण आपण अ‍ॅडजेस्ट करायचा प्रयत्न करत असतो. खरे म्हणजे यातून लवकर सुटका कशी करून घेता येईल याचे मार्ग आपल्याला दिसत असतात व समजत पण असतात. पण आपण याकडे दुर्लक्ष करत असतो.

या सगळ्या भानगडीत आपली बरीच ताकद खर्च होत असते हे मात्र आपल्याला कळत नसते. पण जेव्हा डोक्यावरून पाणी वाहू लागते व यातून आपली सुटका करून घेण्याची वेळ येते तेव्हा सुटका करून घेण्यासाठी लागणारी ‘एनर्जी’ च आपल्याकडे शिल्लक रहात नाही. आपण मग त्यात कायमचे अडकून पडतो व दुसर्‍याला दोष देण्यापलीकडे फारसे काही करू शकत नाही...

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

अगदी हेच सांगणारी बेडकाची कथा पाहूयात. एकदा एका बेडकाला कोमट पाण्यात ठेवण्यात आले. अपेक्षा होती कि, बेडूक टुणकन उडी मारून बाहेर येईल. पण तसे काही झाले नाही. मग हळू-हळू ते पाणी गरम करण्यात येऊ लागले. जसजसे पाण्याचे तापमान वाढू लागले, आतातरी बेडूक टुणकन उडी मारून बाहेर येईल असे वाटू लागले. पण तसे काही घडेना. शेवटी पाणी उकळू लागले तरी पण बेडूक बाहेर येईना. शेवटी त्या बेडकाला जेव्हा उकळत्या पाण्यातून बाहेर काढले तेव्हा तो बेडूक मेलेला आढळला.

तुम्हाला वाटेल कि, बेडूक उकळत्या पाण्यामूळे भाजून मेला. पण तसे नव्हते. पाण्याच्या तापमानाप्रमाणे आपल्या शरीराचे तापमान अ‍ॅडजेस्ट करायची एक खास देणगी बेडकाला मिळाली आहे. कारण बेडूक ज्या पाण्यात रहातो त्याचे तापमान नेहमीच कमी जास्त होत असते. बेडकाला कोमट पाण्यात टाकल्यावर बेडकाने आपल्या शरीराचे तापमान पाण्याच्या तापमानाप्रमाणे अ‍ॅडजेस्ट करायला सुरूवात केली. पुढे जस-जसे पाण्याचे तापमान वाढू लागले बेडकाने तोच प्रयोग चालु ठेवला. पण यामध्ये बेडकाची बरीच ताकद खर्च झाली. ज्यावेळी पाणी उकळू लागले व बेडकावर टुणकन उडी मारून पाण्याबाहेर पडण्याची वेळ आली तेव्हा उडी मारायला बेडकाकडे ताकदच शिल्लक राहीली नाही. त्यामूळे बेडकावर मरण ओढवले. जर ज्या वेळी ताकद होती त्यावेळी बेडूक उडी मारून बाहेर पडला असता तर नक्कीच वाचला असता.

आपले पण असेच असते. आपण अनेकवेळा संकटे, अडथळे, अडचणी, दुःख, उदासीनता, स्वप्नभंग, निराशा यामूळे वेढले गेलेलो असतो. तसेच आपल्याला पुष्कळवेळा आपल्याला कमी लेखणारी, आपला अपमान करणारी, आपले शारिरीक, मानसीक, भावनीक व आर्थिक शोषण करणारी माणसे भेटत असतात. अशा परिस्थितीला व माणसांना तोंड देण्यासाठी देवाने आपल्याला एक आगळी वेगळी शक्ती बहाल केली आहे. पण आपण तिचा योग्य वेळी वापर करत नाही आणि वापर करायचं असं ठरवतो, तेव्हा सगळं हाताबाहेर गेलेलं असतं...त्यामुळे उगाच अ‍ॅडजस्ट करत बसू नका, परिस्थितीला बळू पडू नका, आपल्यातील शक्तीचा योग्य वेळी योग्य तो वापर करा...!

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
Let's Up News Updates

🎯 राष्ट्रीय घडामोडी :

👉 नवी दिल्ली - केंद्र सरकार पंतप्रधान जनधन खातेधारकांना सामाजिक सुरक्षा देणार, या योजने अंतर्गत खातेधारकांना तीन वर्षांसाठी 2 लाखांचा विमा मिळणार

👉 नवी दिल्ली - लोकप्रतिनिधीची संपत्ती जाहीर करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची संपत्ती किती हे आता वर्तमानपत्रातून कळणार

👉 तामिळनाडू - जलिकट्टूवर सर्वोच्च न्यायालयाने घातलेली बंदी सरकारने अध्यादेशाद्वारे उठवल्यानंतर या खेळादरम्यान दोघांचा मृत्यू तर 28 जण जखमी

👉 राजकोट - गुजरातमधील राजकोट येथील कागवाड जिल्ह्यात एकाचवेळी साडेतीन लाख लोकांनी एकत्र येऊन गायले राष्‍ट्रगीत, गिनीज बुकात नोंद

👉 अरुणाचल प्रदेश - आसाम रायफलच्या जवानांनी अरुणाचल प्रदेशातील जयरामपूर जवळील कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला तर दोन जवान शहीद झाले

👉 आंध्र प्रदेश - जगदलपूर-भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसला अपघात, इंजिनासह आठ डबे रुळावरून घसरले, 39 प्रवाशांचा मृत्यू, 100 जखमी

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :

👉 वॉशिंग्टन - दक्षिण अमेरिकेतील जॉर्जिया येथे आलेल्या चक्रीवादळामुळे 11 जण ठार तर 23 जण जखमी

🎯 राजकीय घडामोडी :

👉 उत्तर प्रदेश - भाजपने 155 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, राजनाथ सिंह यांचा मुलगा पंकज सिंह नोएडातून निवडणूक रिंगणात

👉 मुंबई - युतीबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष दानवेंचा शब्द अंतिम, 'वर्षा'वरील चर्चेनंतर आशिष शेलार यांची माहिती

👉 मुंबई - शाखानिहाय बैठकीत स्वबळावर निवडणूक लढविण्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संकेत दिल्याची माहिती

🎯 प्रादेशिक घडामोडी :

👉 पुणे - प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचलनासाठी राज्यातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) 23 छात्रांची निवड

👉 औरंगाबाद - दोन गायींचे दूध प्यायल्याने गावातल्या 81 जणांना विषबाधा, सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे घडली घटना

👉 नाशिक - मध्यवर्ती कारागृहात आरोपींची तुफान हाणामारी, हाणामारी सोडवण्यास गेलेल्या पोलिसांनाही मारहाण, रेडिओचं चॅनल बदलण्यावरुन झाला वाद

👉 जळगाव - भुसावळ रेल्वे पुलाखाली अल्पवयीन मुलीवर दोन अल्पवयीन मुलांचा बलात्कार, बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, 4 संशयित ताब्यात

🎯 खेळ घडामोडी :

👉 कोलकाता - येथील तिसऱ्या वन डे सामन्यात इंग्लंडचा भारतावर 5 धावांनी विजय, भारताने मालिका 2-1 ने घातली खिशात, केदार जाधव मालिकावीर

👉 सरावक - सायना नेहवालची मलेशिया मास्टर्सच्या विजेतेपदाला गवसणी, अंतिम लढतीत सायनाने थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगला सरळ गेममध्ये 22-20, 22-20 असा केला पराभव

🎯 मनोरंजन घडामोडी :

👉 मुंबई - अमीर खानच्या ‘दंगल’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 376.14 कोटीची कमाई करुन नवा विक्रम प्रस्थापित केला

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
फिट राहण्यासाठी चालवा नियमित सायकल

Let's Up Health Katta

तुम्हांला खास वेळ काढून जिममध्ये घाम गाळायला जमत नाही किंवा तुमच्याकडे वेळेची कमतरता असेल तर काही वेळ सायकल चालवलीत तर हाच व्यायामप्रकार तुमच्या आरोग्यासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर ठरू शकतो, तो कसा त्यावर एक नजर...

👉 काही तास सायकाल चालवल्याने ब्लड सेल्स आणि स्किनमध्ये ऑक्सीजनचा पुरेसा प्रवाह होत असल्याने त्वचा जास्त चांगली आणि चमकदार दिसते.

👉 सायकल चालवणा-यांची ब्रेन पॉवर सायकल न चालवणा-यांच्या तुलनेत 15 टक्के जास्त असते. सायकल चालवल्याने तुमचं हृदय मजबूत राहतं तसेच यामुळे तुमच्या शरिरात ब्रेन सेल्सही वाढतात.

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 सायकलींगमुळे हृदयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक असलेला रक्तप्रवाह सुरळीत होतो. तज्ज्ञांच्या मते, सायकलींगमुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता कमी होऊ शकते.

👉 नियमित सायकल चालवल्यास शरीराचे स्नायू बळकट होतात. विशेषतः, कमरेखालच्या भागाचे म्हणजेच मांड्या आणि पोटर्‍यांचे स्नायू बळकट होतात.

👉 सायकल चालवल्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती बळकट होते. तसेच बाह्य संसर्गांपासून शरीराचा बचाव करण्यात हा व्यायाम महत्त्वाची भूमिका बजावतो.

👉 सायकलींगमुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहते. त्यामुळे ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी नियमित सायकल चालवण्याचा व्यायाम करावा.

👉 सांध्यातील लवचीकता कायम ठेवण्यासाठी मदत करणार्‍या कार्टिलेजचे संरक्षण करण्यासाठी सायकलींग फायदेशीर आहे. सायकल चालवताना होणार्‍या वर्तुळाकार हालचालींमुळे शरीरास ऊर्जा मिळते आणि सांध्यांची कार्यक्षमताही वाढते.

👉 सर्वात महत्वाचं सायकलींगने तुम्ही तुमचं वाढलेलं वजन कंट्रोलमध्ये ठेवू शकता.

👉 जर तुम्ही सकाळी-सकाळी काही वेळ सायकल चालवली, तर तुम्हाला रात्री मस्त झोप लागेल. म्हणजे झोप न येण्याची समस्या दूर होईल.

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
Let's Up Current Affair

👉 नवनीत कौर जाणार भाजपात?

नवनीत कौर राणा राष्ट्रवादीला रामराम करण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीमुळे अमरावती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही कार्यक्रमात त्या दिसल्या नव्हत्या, आता मात्र पदवीधर निवडणुकीत मुख्यमंत्र्यांसोबत म्हणजेच भाजपसोबत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं काम चांगलं आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असं नवनीत कौर राणा यांनी म्हटलं आहे.

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 सिंधुताईंच्या गाडीला अपघात

ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या इनोव्हा गाडीला आज पहाटे 5 च्या सुमारास अपघात झाला असून सुदैवाने सिंधुताई पूर्णपणे सुखरुप आहेत. सिंधुताई पुण्याहून वर्ध्याच्या दिशेने जात असताना हा अपघाता घडला. नागेवाडीजवळ एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात सिंधुताई याच्या गाडीचा अपघात झाला.

👉 जलिकट्टू आंदोलकांवर लाठी हल्ला

जलिकट्टू या पारंपरिक खेळावरील बंदी हटवण्यात यावी या मागणीसाठी गेल्या आठवड्याभरापासून मरीना बीचवर आंदोलन करणा-यांवर पोलिसांनी सकाळी कारवाई केली. ' तुमची मागणी आता मान्य झाली आहे, त्यामुळे आता हा परिसर रिकामा करा' असे आदेश पोलिसांनी आंदोलकांना दिले. मात्र आंदोलकांनी जागेवरून हटण्यास नकार देत पोलिसांनी कारवाई केल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिल्याने बीचवरील परिस्थिती चिघळली आहे. पोलिसांनी लाठीमार करत आंदोलकांना हटवण्यास सुरुवात केली आहे.

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 भारतात 45 टक्के वकील बोगस!

Let's Up Current Affair

गेल्या आठवड्यात बार कौंसिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी भारताचे मुख्य मुख्य न्यायमूर्ती जे.एस खेहर व अन्य एका न्यायधिशांसमोर वकीलांच्या पदवीवर सुरु असलेल्या पडताळणीमध्ये देशात 55-60 टक्के वकील हे खरे आहेत, अशी माहिती दिली आहे.

बार कौंसिल ऑफ इंडियाच्या 2012 मधील निवडणुकींच्या आकडेवारीनुसार आपल्याजवळ 14 लाख वोटर्स वकील होते, पण पडताळणीची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर फक्त 6.5 लाख वकीलांची नोंद झाली. मिश्रा पुढे म्हणाले, प्रॅक्टिस करत असलेल्या सर्व वकिलांच्या पदवीची पडताळणी केली असता 45 टक्के पदव्या ह्या बनावट असल्याचे समोर आले. मिश्रा म्हणाले, देशात 30 टक्के वकील बोगस आहेत. जे चुकीच्या पद्धतीने वकिलीची बोगस पदवी मिळवून प्रॅक्टीस करत आहेत. तर 15 टक्के वकिलांकडे अधिकृत पदवीच नाही.

या गैरप्रकाराबाबत बार कौंसिल पुढाकार घेणार असून नोंद असलेला प्रत्येक वकील खरोखरीच प्रॅक्‍टिस करतो का? हे पाहण्याचे काम सुरु आहे. तसेच बोगस वकीलांवर कठोर कारवाई करण्याबाबत लवकरच पुढाकार घेऊन कायद्यातच तशी तरतूद करण्याबाबत बार कौंसिल ऑफ इंडियाचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 शिवसेनेचा वचननामा जाहीर

बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईसाठी वचननामा जाहीर केला. शिवसेनेसाठी 23 तारीख महत्वाची असून आम्ही वचनबद्ध होत आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ‘बोलतो ते करुन दाखवतो’, या टॅग लाईनखाली सेनेने आपला वचननामा जाहीर केला.

👉 शिवसेनेचा वचननामा पुढीलप्रमाणे :

👉 महापालिकेत शिक्षण घेणाऱ्या मुलांना महापालिकेच्या नोकऱ्यांमध्ये प्राधान्य

👉 आरेचा आरक्षित हरितपट्टा कायम राखणार

👉 मुंबईत स्वच्छता गृहांची संख्या वाढवणार

👉 वृक्षसंवर्धनासाठी कटीबद्ध राहणार

👉 मुंबईतील जुन्या विहिरीचं पुनर्रज्जिवित करणार

👉 मुंबई मनपा स्वत:चं हक्काचं वीज केंद्र उभारणार

👉 खड्ड्यांचा प्रश्न निकाली काढू

👉 मुंबईचं ई-वाचनालंय उभारणार

👉 चार मोठे जलतरण तलाव उभारू

👉 डबे वाल्यांसाठी डबेवाला भवन उभारू

👉 जेनरिक मेडिसीन वाढवण्यावर भर

👉 मुलींसाठी आत्मरक्षण केंद्र उभारणार

👉 पालिकांमध्ये दर्जेदार, पौष्टीक भोजन

👉 मुंबईतील सर्व स्थानकांजवळ दुचाकी स्टँड उभारणार

👉 नॅशनल पार्कमधून गोरेगाव-मुलुंड मार्ग काढणार

👉 शेतकऱ्यांना थेट शेतीमाल विकण्यासाठी केंद्र उभारू

👉 मुंबईतील महिलांसाठी सॅनेटरी नॅपकिन पुरवणार

👉 बेस्टचा स्वतंत्र अर्थसंकल्प नाही

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
Let's Up News Updates

🎯 राष्ट्रीय घडामोडी :

👉 नवी दिल्ली - 1 फेब्रुवारीलाच सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प, अर्थसंकल्पामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

👉 नवी दिल्ली - सीबीआयचे माजी संचालक रणजित सिन्हा यांच्या कोळसा घोटाळ्यातल्या कथित सहभागाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश दिले आहेत

👉 नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनाची तयारी जोरात सुरू, पहिल्यांदाच अरबी सैनिक प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणार

👉 नवी दिल्ली - चिट फंड घोटाळ्यात 15 जणांना 1 कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका दाम्पत्याला द्वारका पोलिसांनी केली अटक

👉 लखनऊ - महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे गेल्या कित्येक वर्षांपासून स्वतंत्र राहत आहे, समाजवादी पक्षाचे बडतर्फ नेते अमर सिंह यांचा गौप्यस्फोट

👉 कर्नाटक - येथील रायचूरमध्ये एका महिलेने चार पाय आणि दोन लिंग असलेल्या बाळाला जन्म दिल्याची माहिती समोर, या बाळाला नवजात शिशु केंद्रात ठेवण्यात आले आहे

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :

👉 श्रीलंकेत यंदा भयानक दुष्काळ, या वर्षात किमान 1 कोटी 50 हजार नागरिकांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत

🎯 राजकीय घडामोडी :

👉 मुंबई - मनसेचे मंगेश सांगळे, काँग्रेसचे कृष्णा हेगडे आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप ताहेल भाजपात दाखल

👉 मुंबई - आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी माजी महापौर आणि शिवसेने नेत्या शुभा राऊळ, नगरसेविका शितल म्हात्रे, सेनेचे स्विकृत नगरसेवक अवकाश जाधव यांच्यावर बोरिवलीतील एमएचबी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

🎯 प्रादेशिक घडामोडी :

👉 मुंबई वाहतूक विभागाच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी अतिरिक्त पोलीस महासंचालक एसीबी यांना भ्रष्टाचाराची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

👉 नागपूर - तीन अपत्य असलेल्यांना निवडणूक लढण्यास बंदी करणाऱ्या कायद्याला आव्हान, हायकोर्टाची शासनाला नोटिस

👉 यवतमाळ - यवतमाळ-हिवरी मार्गावर स्कॉर्पिओ-ट्रकच्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला, अपघातात सहा जणा ठार, दोन गंभीर जखमी

👉 पंढरपूर - मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सोमनाथ आवताडे, तर उपसभापतीपदी रघुनाथ पडळकर यांची बिनविरोध निवड

🎯 व्यापार घडामोडी :

👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 27117.34, निफ्टी : 8391.50, सोने भाव : 28,768 (प्रतितोळा), चांदी : 41,740 (प्रतिकिलो)

🎯 तंत्रज्ञान घडामोडी :

👉 नवी दिल्ली - VIVO ने भारतात VIVO V5 प्लस हा स्मार्टफोन केला लाँच, या फोनची किंमत 27 हजार 980 रुपये ठेवण्यात आली आहे

🎯 खेळ घडामोडी :

👉 मुंबई - इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत आर. अश्विन आणि रवींद्र जाडेजाला विश्रांती, अमित मिश्रा आणि परवेझ रसूल यांना संधी

🎯 मनोरंजन घडामोडी :

👉 मुंबई - बास्केटबॉलपटू सतनाम सिंग भामरा यानेही त्याच्या जीवनावर एखादा चित्रपट साकारला जावा अशी इच्छा केली व्यक्त, अभिनेता अभिषेक बच्चनला भूमिकेसाठी दिले प्राधान्य

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 नव-नवीन गोष्टी शिकत रहा!

👉 Let's Up Think Katta

कुठेतरी-कधीतरी रटाळ वाटायला लागतं सगळंच. नको-नको वाटायला लागतं. असं का होतं? तर आपण नवीन काहीच करत नाही, नवीन काहीच शिकत नाही. असं होऊ नये म्हणून आपण काही गोष्टींवर बारकाईने विचार केला पाहिजे.

जीवन हे एक प्रकारचे शिक्षणच आहे असे मानून आपण त्याप्रमाणे वाटचाल करायला हवी. प्रत्येक दिवशी काही तरी नविन शिकलं पाहिजं. ते कसं? त्यासाठी विचार करण्याच्या पद्धतीत आमुलाग्र सुधारणा घडवून आणा, विचारांची व्याप्ती वाढवा, स्वत:चे क्षितीज वाढवा. त्यामुळे होईल काय की तुम्ही वृध्द होणार तर नाहीतच, उलटपक्षी सदैव चिरतरुणच राहाल…

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

वृद्धापकाळ किंवा म्हातारपण त्या लोकांमध्येच येत असते, ज्यांच्यामध्ये चांगले मिळविण्याची आशा मावळते, तसेच जे लोक त्यांच्यामध्ये असणार्‍या चौकसबुद्धीला सोडचिट्टी देतात. प्रत्येक तीन ते चार वर्षांनी आपण नव-नविन विषयाला अनुसरा किंवा हात घाला. मग तो कोणताही विषय असो. जसे जपानी भाषा शिकणे, अर्थशास्त्र शिकणे, इतिहास शिकणे वगैरे वगैरे. ह्या तीन चार वर्षात तुम्ही त्याच्यावर प्राविण्य मिळवू शकणार नाहीत, परंतू तुम्ही निश्‍चितच तो विषय समजू शकाल. त्यासाठी पुस्तकांवर प्रेम करा. पुस्तके वाचा. वाचन वाढवा आणि त्यातूनच नव-नविन विषय शिकण्याचा प्रयत्न करा.

एका तज्ञांना एकदा विचारले गेले की, तुम्ही केव्हा वाचता? त्यावर त्यांनी प्रतिप्रश्‍न केला की, मी केव्हा वाचत नाही? ते पुढे म्हणाले, सकाळी उठल्यावर, नाश्ता करताना, संध्याकाळी, रात्री म्हणजेच ज्या ज्या वेळेस वेळ मिळेल, त्या त्या वेळेस मी वाचन करीत असतो. मग तो विषय कोणताही असो.

बरीच माणसे ही त्यांचे शालेय शिक्षण किंवा विद्यापीठीय शिक्षण संपल्यावर वाचन करावयाचेच सोडून देतात. विश्‍वास बसत नाही ना? बरीच माणसे, आपला अमूल्य वेळ हा टी. वी. बघण्यात घालवितात. परंतू मोठ्या माणसांच्या चरित्र वाचनात मात्र घालवीत नाहीत. तर बर्‍याच माणसांनी आपल्या मनाची कवाडेच बंद करून घेतलेली असतात. ते नविन विचारांना आपल्या जीवनात थाराच देत नाहीत किंवा चांगल्या विचारांचा पाठपुरावाच करीत नाहीत.

एखादे पुस्तक वाचतांना, त्यातुन मिळणार्‍या एका कल्पनेने किंवा विचाराने तुमचे संपूर्ण आयुष्यच बदलू शकते. तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो, तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो, तुमची इतरांशी सुसंवाद साधण्याची पद्धत बदलू शकते. एखाद्या पुस्तकात वाचलेली कल्पना तुम्हाला तुमचे आयुष्य वाढविण्यास मदतच करील. तुमच्या आयुष्यात आनंद भरेल किंवा तुम्हाला तुमचा व्यापार-उदीम वाढविण्यास मदत देखील करील. याचाच अर्थ, तुम्ही घरातून बाहेर पडताना एखादे पुस्तक हातात घेवूनच बाहेर पडा आणि सदैव वाचत रहा. वाचन करता-करता आपल्या ज्ञानात भर घालीत जा. ते ज्ञान कधी ना कधी आपल्या उपयोगाचे आहे, हे आपणांस कळून येईल व त्या ज्ञानाचा आपल्या जीवनात उपयोग देखील होईल. म्हणून नव-नवीन गोष्टी शिकत रहा कारण हाच फंडा आपल्यात जीवनात पुढे-पुढे घेऊन जाईल...

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
Let's Up News Updates

🎯 राष्ट्रीय घडामोडी :

👉 नवी दिल्ली - निवडणुकीत पारदर्शकतेसाठी अर्थसंकल्पात कोणत्याही विशेष घोषणा होणार नाहीत - निवडणूक आयोग

👉 नवी दिल्ली - परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवला, 28 जानेवारी 2018 पर्यंत राहणार कार्यरत

👉 नवी दिल्ली - विजय मल्ल्याच्या कर्ज प्रकरणात सीबीआयने किंगफिशरच्या 4 अधिका-यांसह आयडीबीआय बँकेच्या तीन माजी अधिका-यांना केली अटक

👉 नवी दिल्ली - जलिकट्टूला परवानगी देण्याचे विधेयकही तामिळनाडू विधानसभेत मंजूर झालं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन तात्काळ थांबवावे - रजनीकांत

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :

👉 पोर्ट लुईस - भारतीय वंशाचे अनिरुद्ध जगन्नाथ यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधानपदाची सूत्र त्यांचा मुलगा प्रवीण्ड जगन्नाथ यांच्याकडे सोपविली

🎯 राजकीय घडामोडी :

👉 मुंबई - ज्यांना माझ्यावर विश्वास नाही त्यांनी आताच पक्ष सोडून जा, माझा निष्ठावंत शिवसैनिकांवर विश्वास - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

👉 पुणे - शिवसेनेशी युती झाली तर ठीक, अन्यथा स्वबळावर लढू, शिवसेनेकडून सकारात्मक प्रस्तावाची वाट पाहत आहोत - भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे

🎯 प्रादेशिक घडामोडी :

👉 मुंबई - ‘शांतता क्षेत्रा’त मोडत असलेल्या शिवाजी पार्कवर भविष्यात ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी देणार नाही, असे आश्वासन देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले

👉 मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील नियोजित भव्य स्मारक मुंबईतील गिरगाव चौपाटीवर करावे व वाचलेल्या पैशातून मराठा समाजातील गरीब मुलामुलींच्या शिक्षणासाठी व आत्महत्याग्रस्त शेतक-यांसाठी ती रक्कम खर्च करावी - ओबीसी संघर्ष समितीची मागणी

👉 सिंधुदुर्ग - बांदा येथे माकडतापाचे आणखी 2 रुग्ण आढळले, रुग्णांची संख्या पोहचली 5 वर, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

🎯 खेळ घडामोडी :

👉 मुंबई - भारत आणि इंग्लंड संघामध्ये 26 जानेवारी पासून होणाऱ्या तीन टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, आर. अश्विन व जडेजाला विश्रांती

🎯 मनोरंजन घडामोडी :

👉 सातारा - आपले प्राण हातात घेऊन जीवाची बाजी लावून देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी मला सीमेवर जाऊन गायचंय - आशा भोसले

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
भारतीय सैन्य दलात 264 जागांसाठी भरती

Let's Up Job Updates

A. 49th SSC (Tech) Men & 20th SSC (Tech) Women Course OCT 2017 : 196 जागा

पोस्ट : 49th शॉर्ट सर्व्हिस कमिशन (Tech) पुरुष - जागा : 175

पोस्ट : 20th शॉर्ट सर्व्हिस कमिशन (Tech) महिला - जागा : 20

पोस्ट : विडोवंस ऑफ डिफेन्स पर्सनल - जागा : 01

B. JAG Entry Scheme 19th Course Oct 2017- SSC Law Graduates : 14 जागा

पुरुष - जागा: 10

महिला - जागा: 04

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

C. NCC Special Entry Scheme 42st Course – OCT 2017: 54 जागा

पुरुष - जागा: 50

पुरुष - जागा: 04

शैक्षणिक पात्रता :

A : इंजिनिअरिंग पदवी

B : 50% गुणांसह पदवीधर, NCC प्रमाणपत्र

C : 55 % गुणांसह LLB

वय : (SC/ST- 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट)

A : जन्म दि. 02 ऑक्टोबर 1990 ते दि. 01 ऑक्टोबर 1997

B : जन्म दि. 02 जुलै 1992 ते दि. 01 जुलै 1998

C : जन्म दि. 02 जुलै 1990 ते दि. 01 जुलै 1996

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत :

A : दि. 22 फेब्रुवारी 2017 I B : दि. 15 फेब्रुवारी 2017 I C : दि. 22 फेब्रुवारी 2017

अधिक माहितीसाठी : https://goo.gl/TKMrn4

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/t09Dr4

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
शाओमीचा रेडमी नोट 4 विक्रीस उपलब्ध

Let's Up Techno Katta

शाओमी कंपनीने नवा स्मार्टफोन रेडमी नोट 4 लॉन्च केला असून काल दुपारी 12 वाजतापासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर तसेच फ्लिपकार्टवर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची किंमत 9999 ते 12,999 रुपये असेल तर हा फोन ब्लॅक, गोल्ड आणि डार्क ग्रे कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

रेडमी नोट 4 चे फिचर्स

👉 ऑपरेटिंग सीस्टिम : अँड्रॉईड 6.0 मार्शमेलो

👉 प्रोसेसर : 625 स्नॅपड्रॅगन

👉 रॅम : 2/3/4 जीबी

👉 डिस्प्ले : 5.5 फुल एचडी डिस्प्ले

👉 कॅमेरा : रिअर 13 मेगापिक्सेल आणि फ्रंट 5 मेगापिक्सेल

👉 मेमरी : 32 जीबी आणि 64 जीबी

👉 बॅटरी : 4100 mAh

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

2. आयडियाचा 1 GB च्या किंमतीत 15 GB डेटा

आयडिया सेल्युलर कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी खुशखबर आणली आहे. ‘फ्लिपकार्ट’वर 4G स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आयडियाचा 15 GB 4G डेटा 1 GB च्या किंमतीत उपलब्ध होणार आहे. फ्लिपकार्टवर निवडक 4G स्मार्टफोन्सच्या खरेदीवरच ही ऑफर उपलब्ध असेल.

कसा मिळेल या स्कीमचा लाभ?

👉 फ्लिपकार्टवरुन खरेदी केलेल्या 4G स्मार्टफोनमध्ये आयडियाचे 4G सिम टाका.

👉 http://i4all.ideacellular.com/offers/get-headerinfo.htm या लिंकवर क्लिक करा.

👉 या लिंकवर तुमचा मोबाईल नंबर नोंदवा.

👉 रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर 1 GB चा रिचार्ज करा. ऑफरनुसार तुमच्या अकाउंटमध्ये 14 GB डेटा जमा होईल.

👉 हा डेटा वापरण्यासाठी 28 दिवसांची मुदत आहे.

👉 31 मार्चपर्यंत तीन वेळा ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)