LetsUpp Marathi
4.87K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
टॉप 10 हेडलाईन्स; दुपारच्या महत्वाच्या बातम्या!

LetsUpp | Bulletin

● मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची गुप्तचर विभागाची माहिती; मुंबई लोकल स्थानकांवरच्या सुरक्षेत वाढ!

● पेट्रोल आणि डिझेल GST मध्ये आणण्याला महाराष्ट्राचा विरोध, अजित पवारांनी पत्रातून मांडली भूमिका

● मोठा दिलासा! देशात आठ प्रकारच्या खाद्य तेलाच्या किमतीत गेल्या आठवड्याच्या तुलनेत घट; केंद्राकडून जारी करण्यात आली माहिती

● आता एटीएममधून औषधे मिळणार; औषधांचे हे ATM मशीन बसवण्यात येणार असल्यामुळे दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना आता 24 तास ओषधे उपलब्ध होणार

● राज्याचे ग्रामविकास मंत्री मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल; रुग्णालयात दाखल करण्यामागील कारण अद्याप समोर नाही

● पुण्यात मानाच्या गणपतीचं मंडपात विसर्जन होणार, शहरात 7 हजार पोलिसांचा बंदोबस्त; एखाद्या मंडळानं विसर्जन मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई

● जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या बाबतीत केंद्राचा हस्तक्षेप वाढला; याच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

● उत्तराखंड उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर अनेक दिवसांपासून बंद असलेली चारधाम यात्रा आजपासून पुन्हा सुरू

● माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या साई शिक्षण संस्थेच्या कार्यालयावर आयटीची धाड आजं दुसऱ्या दिवशीही धाडसत्र सुरु

● वर्ल्ड कपनंतर ट्वेंटी-२० कर्णधारपद सोडण्याच्या घोषणेनंतर विराट कोहलीची इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/Gdm9ycN9Djb
गडहिंग्लज कारखान्यातही 100 कोटींचा घोटाळा; किरीट सोमय्यांचा हसन मुश्रीफ यांच्यावर नवा आरोप

LetsUpp | Trending

⚡ माजी खासदार किरीट सोमय्या यांना कराडमध्ये पोलिसांनी उतरवलं होतं. तिथेच आज सकाळी पत्रकार परिषद घेत त्यांनी राज्य सरकारवर कडाडून हल्ला चढवला.

👉 गडहिंग्लज कारखान्यातही 100 कोटींचा घोटाळा झाला आहे, असा आरोप करत हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा आता बाहेर काढणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.

🚆 सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. त्यासंबंधित पाहणीसाठी सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला निघाले होते.

🚔 मात्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत जिल्हाबंदी केली. त्यानुसार पोलिसांनी सोमय्यांना पहाटे कराडमध्ये उतरवलं.

💰 हसन मुश्रीफ आणि कुटुंबीयांनी 127 कोटींचा घोटाळा केला, असा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेत केला. तसंच मला हे घोटाळे उघड करण्यास देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील सांगितलंय, असंही किरीट सोमय्या म्हणाले.

🗣️ किरीट सोमय्या काय म्हणाले?

● मूळ विषय आहे की हसन मुश्रीफ साहेब 127 कोटी रुपये आपल्या कंपनीत मनी लाँडरिंगचे आले. त्याचा हिशेब अजून का दिला नाही. शरद पवार साहेब ही तुमची व्यूवरचना आहे का?

● मला चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय, बाकीचे विषय आम्ही बघतो, तुम्ही मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा.

● मी पुन्हा सांगतो, सरसेनापती घोरपडे कारखान्यात 98 कोटी रुपये हे बोगस कंपन्याद्वारे भ्रष्टाचाराद्वारे आणले. मुश्रीफ परिवारातर्फे 2 कोटी आहे, बाकी सगळा पैसा बोगस कंपन्याद्वारे आहे.

● मुश्रीफांना आणखी एक प्रश्न विचारायचा आहे, आपला आणि अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना याचा संबंध काय?

● मुश्रीफ परिवाराने अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा केला. यामध्येही शेल कंपन्यांद्वारे पैसे उभारले. बोगस अकाऊंट उघडून कॅश टाकायचे आणि पैसे घ्यायचे, 100 कोटी रुपये घेतले.

● दरम्यान, गडहिंगल्ज कारखान्यातील घोटाळ्याबाबत ईडी आणि इन्कम टॅक्सकडे उद्या तक्रार करणार, असंही सोमय्या यांनी सांगितलं.

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/uzGPLTXiHjb
येत्या 24 तासात राज्यातील 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता

LetsUpp | Trending

🌧️ येत्या 24 तासांत राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, पनवेलसह राज्याच्या कोकण पट्टी परिसरात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

💁🏻‍♂️ रविवारपासूनच मुंबई, कोकणासह राज्यातील इतर भागांमध्ये पावसानं दमदार बँटिंग केल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच कोकण किनारपट्टी भाग आणि उर्वरित परिसरातही पावसाने हजेरी लावली होती.

⛈️ बंगालच्या खाडी परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाच्या मध्यम ते तीव्र स्वरुपाच्या सरी कोसळत आहेत.

🏕️ विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रापर्यंत हा पाऊस पोहोचला असून, जनजीवनावर याचे परिणाम झाल्याचं दिसून येत आहे.

📍 राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटसह पाऊस पडेल. तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/j3e9RFGhHjb
टॉप 10 हेडलाईन्स! संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या

LetsUpp | Bulletin

● आता महाविकास आघाडीही वात पेटवणार, फडणवीस सरकारच्या काळातील फायली काढणार; नाना पटोलेंचा इशारा

● शरद पवारांचं नाव घ्यायची यांची लायकी आहे का? हसन मुश्रीफ किरीट सोमय्यांवर संतापले!

● किरीट सोमय्यांचे आरोप खोटे आणि बिनबुडाचे, किरीट सोमय्यांनी माफी मागावी : हसन मुश्रीफ

● काही पक्षात अराजकता, काँग्रेसनं आत्मपरीक्षण करावं, फडणवीसांचं गोव्यात वक्तव्य

● औरंगाबाद पालिका निवडणुकीसाठी भाजपचा स्वबळाचा नारा, बड्या मंत्र्याचे स्पष्ट संकेत, शिवसेनेची कोंडी ?

● राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे

● पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावर काँग्रेसनं चरणजितसिंह चन्नी यांची निवड करुन अनेकांना धक्का दिला

● पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी एनडीएमध्ये यावं; रामदास आठवलेंची खुली ऑफर

● कंगनाला कोर्टावर भरवसा नाय... अंधेरी दंडाधिकारी कोर्टातील मानहानीचा खटला दुसरीकडे वर्ग करण्याची मागणी

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/IyhqAtwKHjb
विदेशात पुन्हा लस पुरवठा सुरु करण्याबाबत मोठा निर्णय!

LetsUpp | Trending

⚡ देशातून पुन्हा इतर देशांमध्ये लस पुरवठा सुरु करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली आहे. 'वॅक्सीन मैत्री' कार्यक्रमांतर्गत हा लस पुरवठा केला जाणार आहे.

💉 ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून लस निर्मिती कंपन्या विदेशात लस पाठवू शकणार आहेत. दुसऱ्या लाटेमध्ये देशात पुरेसे लसीकरण झालेलं नसल्यानं केंद्राने विदेशात लस पाठवण्यावर निर्बंध आणले होते.

🗣️ केंद्रीय आरोग्य मंत्री मांडवीय यांनी स्पष्ट केलं की, लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांजवळ जे काही अतिरिक्त लस उपलब्ध असतील या लस 'व्हॅक्सिन मैत्री' कार्यक्रमांतर्गत इतर देशांमध्ये पाठवण्यात येतील.

💁‍♂️ विविध लस कंपन्यांकडून ऑक्टोबरपासून देशात ३० कोटींहून अधिक लस उपलब्ध होतील, असा दावाही आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.

🔝 भारत कोरोना प्रतिबंधक लसींचा जगातील सर्वात मोठा निर्माता आहे. एप्रिल महिन्यात भारताने आपल्या जास्तीत जास्त जनतेचं लसीकरण करण्यावर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी लस निर्यातीवर निर्बंध आणले होते.

📍 दरम्यान, डिसेंबरपर्यंत भारत आपल्या सर्व ९४.४ कोटी प्रौढ जनतेला लसीकरण पूर्ण करायचं ध्येय ठेवलं आहे. यांपैकी आत्तापर्यंत ६१ टक्के जनतेला एक डोस देण्यात आला आहे.

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/AbV3EBOWHjb
आरोग्य विभागात पदभरती ! आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केल्या तारखा

LetsUpp | Trending

🩺 महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि ड या प्रवर्गातील परीक्षा 25 व 26 सप्टेंबर रोजी होणार आहेत.

💁🏻‍♂️ या परीक्षेसाठी साधारणपणे गट 'क'साठी एकूण 2740 एवढय़ा जागा आपण भरत आहोत.

👉 गट 'ड'साठी 3 हजार 500 जागा आपण भरत आहोत. एकूण जवळपास 6 हजार 200 जागा आपण भरत आहोत.

✍️ या जागांसाठी साधारणपणे एकूण आठ लाखांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत आणि हॉल तिकीटपण दिले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

🗣️ परीक्षा केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पूर्णपणे पालन करावे असे आवाहन देखील टोपे यांनी यावेळी केले आहे.

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/kxnfstSKIjb
परभणी हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; पीडितेची आत्महत्या

LetsUpp | Trending

⚡ परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यामध्ये महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन तरुणीवर 3 जणांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

👉 या घटनेनंतर पीडित मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

💫 सोनपेठ तालुक्यातील 16 वर्षीय मुलीला त्याच परिसरातील तीन मुले त्रास देत होती. त्यातच 12 सप्टेंबर रोजी या नराधम तरुणांनी पीडित मुलीला तालुक्यातील डिघोळ तांडा परिसरात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

🏥 त्यानंतर नैराश्यात गेलेल्या अल्पवयीन मुलीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला उपचारासाठी अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तेथील डॉक्टरांनी तिला लातूरला हलवण्याचा सल्ला दिला.

🚔 मात्र पीडित मुलीचा लातूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल होताच सोनपेठ पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोन अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे. तर तिसरा आरोपी परळी परिसरातून आज पोलिसांनी अटक केला आहे.

🗣️ या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली असून या प्रकरणात पीडितेने तिच्यावर अत्याचार झाल्याचं स्टेटमेंट दिलं आहे.

📍 दरम्यान, सामूहिक बलात्कार आणि नंतर झालेल्या मुलीच्या आत्महत्येनं परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/wMRmeP5XIjb
टॉप 10 हेडलाईन्स; दुपारच्या महत्वाच्या बातम्या!

LetsUpp | Bulletin

● “महिला सुरक्षेप्रश्नी दोन दिवसांचं अधिवेशन घ्या”, मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना निर्देश!

● गणेशोत्सव काळातील गर्दी, पावसाळा संपत असल्याने १५ दिवस अत्यंत महत्वाचे; आगामी पंधरा दिवसात ठरणार तिसऱ्या लाटेचे भवितव्य- अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी

● जिल्हा परिषद, महापालिकांच्या निवडणुकीमध्ये चांगली ताकद लावून आपल्या उमेदवारांना विजयी करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन

● "मोदी लाट लोकसभा निवडणुका जिंकून देऊ शकते पण राज्यातल्या निवडणूक नाही"; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला आहेर

● जम्मू -काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; शिवगढ धार भागात घडली घटना; हेलिकॉप्टरमध्ये दोन जण असल्याची माहिती

● महाराष्ट्राला हादरवणारी घटना, परभणीत एका अल्पवयीन मुलीवर तीन जणांकडून सामूहिक बलात्कार; पीडित मुलीची विष प्राशन करून आत्महत्या

● नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली प्रकरणाला आता गंभीर वळण मिळण्याची शक्यता

● महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 17 कोटी रुपयांचे उत्पन्न लपवले; आयकर विभागाच्या तपासात खुलासा

● देशात पाच दिवसांनंतर 30 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद; काल दिवसभरात 26,115 कोरोनाबाधितांची नोंद, तर 252 रुग्णांचा मृत्यू

● अहमदनगरमधील संगमनेर बस डेपोमध्ये बस चालकाने एसटीतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/lxaQ8OTbJjb