LetsUpp Marathi
4.87K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
टॉप 10 हेडलाईन्स ! सकाळच्या महत्वाच्या बातम्या!

LetsUpp | Bulletin

● चेंबूर बालसुधारगृहातील 18 मुलांना कोरोना, मुले बाधित होण्याची मुंबईतील दुसरी मोठी घटना

● केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान काँग्रेस देशभरात पत्रकार परिषदेचं आयोजन करणार

● केंद्रीय मंत्री नारायण राणेंची आज पहिली पोलिसांसमोर हजेरी, अलिबागमध्ये बंदोबस्त वाढवला

● अजूनही तपास सुरू आहे! माजी गृहमंत्री अनिल देशमुख 'क्लीन चिट'प्रकरणी सीबीआयचा खुलासा

● अयोध्येतील राम मंदिर होणार इकोफ्रेंडली, एकाच वेळेस 5 लाख भाविक दर्शन घेऊ शकणार

● राज्याचे परिवहनमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली. मंगळवारी 31 ऑगस्ट रोजी 'ईडी' कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे लागणार

● शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण 5 सप्टेंबपर्यंत पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल आहे - आरोग्यमंत्री राजेश टोपे

● अफगाणिस्तान धोरणाचा नव्याने विचार करण्याची गरज आहे, भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

● राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची घोषणा

● निशादला रौप्य, विनोदला कास्य, क्रीडादिनी टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत पदकांची लयलूट

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/2d6xINsd8ib
टॉप 10 हेडलाईन्स; दुपारच्या महत्वाच्या बातम्या!

LetsUpp l Bulletin

● शिक्षण विभागाने अकरावीच्या प्रवेश शुल्काबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला; आगामी अकरावी प्रवेशाच्या शुल्कात 15 टक्के कपात करण्यात येणार

● राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये आता पाचवी ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय; शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नवीन जीआर जारी केला

● TET 2021 साठी नोंदणीची तारीख वाढवली, अर्ज करण्याची तारीख 5 सप्टेंबर करण्यात आली; अधिकृत वेबसाइट mahatet.in वर जाऊन ऑनलाइन नोंदणी करु शकता

● घरगुती LPG सिलेंडरच्या किंमतीत आजपासून 25 रुपयांची वाढ; गेल्या 15 दिवसात विनाअनुदानित LPG सिलेंडर 50 रुपयांनी महागला

● शासकीय रुग्णालयांच्या डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी राज्य सरकार दोन हजार खासगी सुरक्षा रक्षक तैनात करणार

● ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविषयी खोटी बातमी दिल्याच्या आरोपावरून औरंगाबाद येथील एका वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक रविंद्र विठ्ठलराव तहकिक व प्रकाशक अंकुशराव नानासाहेब कदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

● निलेश राणेंच्या करेक्ट कार्यक्रमाच्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ, ६ जवान तैनात, घराजवळही कडेकोट बंदोबस्त

● राज ठाकरेंनी घेतली ठाणे पालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळेंची भेट; फेरीवाल्यानं केला होता हल्ला

● स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदयात्रेला सुरुवात; 5 सप्टेंबरला शेतकऱ्यांसोबत जलसमाधी घेणार

● भारताच्या अध्यक्षेत संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने तालिबानला अफगाणिस्तानमधील सरकार सांभाळण्यासाठी सशर्त मंजुरी दिली

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/xNjaFtuWbjb