LetsUpp Marathi
4.87K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळाचे शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

LetsUpp | Trending

● अकरावी प्रवेशासाठीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते आज शनिवारी करण्यात आले.

● अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभाग सज्ज असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.

● बृहन्मुंबई क्षेत्र, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती आणि नाशिक शहरातील सुमारे साडेपाच लाख जागांसाठी ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. इतर ग्रामीण भागांत प्रचलित पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहेत.

● पहिल्या फेरीची सुरूवात शनिवारपासून होणार असून २२ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांनी नोंदणी करायची आहे.

● दि. १७ ते २२ ऑगस्ट या दरम्यान जागांची उपलब्धता बघता येईल त्याचप्रमाणे प्राधान्यक्रम भरता येणार आहे. दि. २३ ते २५ ऑगस्टदरम्यान मेरिट लिस्ट लागेल.

● दि. २७ ते ३० ऑगस्टदरम्यान महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. दुसऱ्या फेरीची प्रक्रिया दि. ३१ ऑगस्टला, तिसरी फेरी दि. ५ सप्टेंबरला, चौथी फेरी दि. १२ सप्टेंबरला होणार आहे.

● विद्यार्थ्यांना https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर जाऊन प्रवेश घेता येणार आहे.

To know more click here
https://letsup.app.link/wdQ6KyskIib
*देशात १४ ऑगस्टबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा*

LetsUpp | Trending

⚡ भारतात १४ ऑगस्ट हा फाळणी दिन म्हणून पाळणार अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. फाळणीचे दुःख आणि वेदना आपण कधीच विसरू शकत नाही.

🗣️ या दुःखद गोष्टींची आठवण मनात राहिली तरच स्वातंत्र्याचे मोल समजेल असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी १४ ऑगस्ट हा फाळणी दिन म्हणून पाळणार असल्याचे जाहीर केले.

👉 'ब्रिटिश इंडिया'ची १४ ऑगस्ट १९४७ रोजी फाळणी झाली आणि पाकिस्तान या देशाची निर्मिती झाली. यानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी पारतंत्र्य संपले आणि भारत स्वतंत्र झाला. पण फाळणीच्या काही दिवस आधी आणि नंतरही भारत-पाकिस्तान सीमेवर नागरिकांची पळापळ सुरू होती.

👀 फाळणीनंतर झालेल्या दंगलींमध्ये अनेकांचे प्रचंड नुकसान झाले, कित्येकजण बेघर झाले. फाळणीचा सर्वाधिक फटका महिला आणि मुलांना बसला.

🧐 फाळणीमुळे लोकांच्या मनात एकमेकांविषयी तिरस्काराची आणि अविश्वासाची भावना निर्माण झाली. या सर्व घटना विसरायच्या म्हटल्या तरी विसरता येणार नाहीत.

📍 आता १४ हा दिवस फाळणी दिन अर्थात 'विभाजन विभीषिका स्मृति दिवस' म्हणून पाळताना स्वातंत्र्याचे आणि मानवता जपण्याचे महत्त्व लक्षात येईल. यातूनच तिरस्काराची आणि अविश्वासाची भावना कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

To know more click here
https://letsup.app.link/yw6mCQTeIib
'या' घडीच्या १० महत्वाच्या बातम्या

LetsUpp | Bulletin

● देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देश, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. संपूर्ण देशात, देशभक्तीचे चैतन्यमयी वातावरण

● राष्ट्रपतींचं स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधन; कोरोना लस, कृषी, जम्मू काश्मीरसहित अनेक मुद्द्यांवर भाष्य

----------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ७७९८६५५६५५
----------------------

● स्वातंत्र्य दिनी राज्यभर होणाऱ्या ग्रामसभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही रद्द, ज्यांना ग्रामसभा घ्यायची असेल त्यांनी ऑनलाइन पद्धतीने घ्यावी; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

● आजपासून दोन डोस घेतलेल्यांचा मुंबई लोकलप्रवास, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त

● महाराष्ट्रामध्ये डेल्टा प्लसच्या रुग्णांची वाढ, डेल्टा प्लस बाधित रुग्णांची संख्या 66 वर गेली असून आतापर्यंत 5 डेल्टा प्लस बाधित रुग्णांचा मृत्यू; आरोग्य मंत्री राजेश टोपे

● भंडारदरा व कळसुबाई, हरिश्चंद्रगड परिसर पर्यटकांसाठी खुले; महसूल, पोलीस वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठकीत घेतला निर्णय

● गणेशोत्सव, नवरात्रोत्सव मंडळांना मोठा दिलासा, व्यावसायिक जाहिराती स्वीकारण्यास परवानगी

● वेतनापासून वंचित ठेवणाऱ्या शिक्षण संस्थाचालकाविरुद्ध कारवाई योग्यच; यवतमाळच्या एका प्रकरणात उच्च न्यायालयाचा निर्वाळा

● राज्यभर अनलॉक असताना पंढरपूरमध्ये संचारबंदी, व्यापाऱ्यांमध्ये संताप; सोलापुरातील पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा आणि सांगोला या पाच तालुक्यात संचारबंदी लागू

● टीम इंडियाच्या दमदार कामगिरीला इंग्लंडकडून सडेतोड उत्तर; इंग्लंडचा पहिला डाव ३९१ धावांवर संपुष्टात, कर्णधार जो रूट १८० धावांवर नाबाद राहिला

To know more click here
https://letsup.app.link/g7BCtW4hJib
'या' घडीच्या १० महत्वाच्या बातम्या

LetsUpp l Bulletin

● औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर असे करण्यासाठी हीच अनुकूल वेळ; उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे मोठे विधान

● केबल ग्राहकांना टीव्हीवरचे कार्यक्रम आता मोबाईलवर कोणत्याही अतिरिक्त शुल्काविना पाहता येणार; केबलवाल्यांनी आणली नवी यंत्रणा

● बैलगाडा शर्यतीबाबत कायद्याच्या चाकोरीतून निर्णय घ्यावा लागेल; जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा इशारा; गोपीचंद पडळकर मात्र ठाम

● सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचं मुख्यमंत्र्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य; या वक्तव्यानंतर शिवसैनिकांकडून भरणेंवर जोरदार टीका, अखेर दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली दिलगिरी

● देशाच्या अर्थकारणाला गती देण्यासाठी पुढील दोन वर्षांत १०० लाख कोटींच्या गुंतवणुकीच्या महत्त्वाकांक्षी ‘पंतप्रधान गतिशक्ती योजना’ची पंतप्रधानांची घोषणा

● संसदेतील चर्चेची वाईट स्थिती; कायद्यांचा उद्देशच कळत नाही; सरन्यायाधीश एन.व्ही.रमण यांची संसदीय कामकाजावर परखड टिप्पणी

● बंगळुरूमध्ये गेल्या १० दिवसात ५०० हून अधिक मुलांना कोरोनाची लागण, तर आता ओडिशामध्ये १३८ मुलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आली समोर

● दिल्लीच्या शाळांमध्ये आता अभ्यासक्रमात ‘देशभक्ती’चा समावेश; मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा

● 'इंडियन आयडॉल'च्या बाराव्या सिझनचा विनर जाहीर; पवनदीप राजनने मारली बाजी, ठरला १२ व्या सिझनचा इंडियन आयडॉल

● अफगाणिस्तान अखेर तालिबानच्या मुठीत; राष्ट्रपती अशरफ घनी यांनी सोडला देश, ठिकठिकाणी चकमकी

To know more click here
https://letsup.app.link/Ax7mGNGXKib
“..म्हणून मी देश सोडला”; अफगाणिस्तान सोडल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांची फेसबुक पोस्ट

LetsUpp | International

⚡ अमेरिका आणि नाटो फौजा अफगाणिस्तानातून परत गेल्यानंतर सक्रिय झालेल्या तालिबानी बंडखोरांनी अवघ्या आठवडाभरातच जवळजवळ संपूर्ण देशावर ताबा मिळवला आहे. तालिबानने रविवारी राजधानी काबूलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केलं आहे. तालिबाने अफगाणिस्तानला पुन्हा ‘इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान’ (आयइए) जाहीर केलं आहे.

📍 २० वर्षांच्या लढाईनंतर अखेर तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे. देशात हिंसाचाराला सामोरे जावं लागू नये म्हणून अनेकांनी देश सोडला आहे. दरम्यान राष्ट्रपती अशरफ घनी देखील देश सोडून पळून गेले आहेत. अफगाणिस्तानातून पळून गेलेल्या राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडण्याचे कारण स्पष्ट केले आहे. फेसबुकवर रात्री उशिरा त्यांनी याबाबत माहिती दिली. लोकांना जास्त रक्तपात पाहावा लागू नये म्हणून आपण अफगाणिस्तानातून पळून गेलो, असे घनी यांनी म्हटले आहे.

काबूल उद्ध्वस्त झाला असता

💁‍♀️ “जर मी अफगाणिस्तानमध्ये राहिलो असते तर मोठ्या संख्येने लोक देशासाठी लढायला आले असते. अशा स्थितीत असंख्य लोक तिथे मरण पावले असते. तसेच काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असते. आता तालिबान जिंकला आहे. आता तो अफगाण लोकांच्या सन्मान, मालमत्ता आणि सुरक्षेसाठी जबाबदार आहे. तालिबान एका ऐतिहासिक परीक्षेला सामोरे जात आहे. आता एकतर तो अफगाणिस्तानचे नाव आणि सन्मान वाचवेल,” असे घनी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

📌 मात्र, अशरफ घनी यांनी आपल्या पोस्टमध्ये ते सध्या कुठे आहेत हे सांगितले नाही. अफगाणिस्तानातील टोलो न्यूजच्या मते, घनी ताजिकिस्तानला गेले आहेत. शांती प्रक्रियेचे प्रमुख अब्दुल्ला-अब्दुल्ला यांनी अफगाणिस्तानला या स्थितीत आणण्यासाठी अश्रफ घनी यांना दोषी ठरवले. दरम्यान, अफगाणिस्तानमधील परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. त्याचबरोबर काबूल विमानतळावरून उड्डाणे बंद करण्यात आली आहेत.

💁‍♂️ तालिबानी बंडखोरांनी रविवारी काबूलमध्ये प्रवेश केला. मात्र ते शहराच्या मध्यभागाबाहेरच थांबले. दरम्यान, काही काळ काबूलच्या सीमेवर घालवल्यानंतर रविवार रात्री आपण या शहराच्या अंतर्भागात प्रवेश करू, असे तालिबानने सांगितले होते. तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्याने आता अफगाणिस्तान प्रशासनाच्या हाती फारसे काही उरलेले नाही.

देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप
https://letsup.app.link/lSgx4hy8Kib
राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

LetsUpp | Trending

⛈️ राज्यातील विविध भागांमध्ये येत्या दोन ते तीन दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान हवामान विभागाच्या मुंबई येथील केंद्राने वर्तवला आहे.

💁‍♂️ राज्यातील बहुतांश भागात गेल्या काही दिवस पाऊस गायब असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

🌱 पेरण्या झाल्यानंतर अपेक्षित पाऊस होत नसल्याने नापिकीचे संकट शेतकऱ्यांवर घोंगावत आहे.

👉 या परिस्थितीत हवामान विभागाने दिलेला अंदाज महत्त्वाचा आहे.

👍 विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्र या भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

📍 काही भागात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यताही वर्तवली आहे.

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/RfYcbUeBLib
आर आर पाटील जयंती विशेष; आबांचे 4 धडाकेबाज निर्णय

LetsUpp l Special

⭐ रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर आर पाटील… सर्वसामान्यांचे आबा… आज त्याच आबांची जयंती… 16 ऑगस्ट 1957 ला सांगली जिल्हातील तासगाव तालुक्यातल्या अंजनी गावातला त्यांचा जन्म… घरची हालाखीची परिस्थिती… पण शाळेत एकदम हुशार… दहावीच्या परीक्षेत तर आबा केंद्रात पहिले आले… पण परिस्थितीमुळे काम करत करत त्यांना पुढचं शिक्षण घ्यावं लागलं… ‘कमवा आणि शिका योजने’त काम करुन ते पुढचं शिक्षण घेऊ लागले…

💁‍♂️ पण आबांचा स्वभाव धडपड्या… तिथेही ते शांत बसले नाहीत… तिथे त्यांनी विद्यार्थ्यांचं संघटन केलं… एका आंदोलनात प्राचार्यांसमोर विद्यार्थ्यांची बाजू मांडताना त्यांनी जोरदार भाषण केलं… प्राचार्यांना आबांचं भाषण आवडलं… त्यांनी आबांना वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्याचा सल्ला दिला… त्यावर आबा म्हणाले, सर घरची परिस्थिती गरिबीची आहे. स्पर्धेला गेलो तर काम बुडेल, मग खाणार काय?, आबांचं उत्तर ऐकून प्राचार्यांच्या पोटात तुटलं. ते आबांना म्हणाले, काळजी करु नकोस.. तू स्पर्धेला जा… स्पर्धेच्या दिवसांत तुझ्या कामाची हजेरी लावली जाईल… तुला पैसे मिळतील… बस्स… इथूनच आबांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली…

💁‍♀️ आबांनी महाविद्यालयीन जीवनात वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली… अनेक स्पर्धा जिंकल्या.. बक्षीसं जिंकली… आबांची भाषणकला दिवेसंदिवस बहरत होती… पुढे आबा राजकारणाकडे वळले… जिल्हा परिषद सदस्य, सहा वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा राजकारणातला डोळे दिपवणारा प्रवास करुनही आबा शेवटपर्यंत सर्वसामान्यांसाठी आबाच राहिले, त्यांनी आबांचा ‘आबासाहेब’ होऊ दिला नाही…!

आर आर आबांचे चार निर्णय ज्यामुळे त्यांनी सामान्यांच्या मनात घर केलं!

💫 आघाडी सरकारमध्ये आर आर आबांनी अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली. ग्रामविकास, गृह आणि पुढे उपमुख्यमंत्रीपदाची धुरा त्यांनी समर्थपणे पेलली. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात त्यांनी अनेक लोकोपयोगी आणि धोरणी निर्णय घेतले. ग्रामविकास मंत्रिपदाची जबाबदारी खांद्यावर असताना संपूर्ण राज्यभरात त्यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवलं. याच कामाने आबांना वेगळी ओळख मिळाली. गावंच्या गावं स्वच्छ झाली, लोकांनी एकत्र येऊन गावं स्वच्छ केलीच पण यानिमित्ताने अनेकांची मनंही स्वच्छ झाली…!

📌 गृहमंत्रीपदाच्या काळात त्यांनी महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान राबवलं.. गावातल्या लोकांनी भांडणांपासून लांब रहावं आणि जरी भांडण-तंटे झाले तरी कोर्ट कचेरीची पायरी न चढता ते भांडणं गावातच मिटलं जावं, असा त्यापाठीमागचा उद्देश… या अभियानामुळे तुटलेली मनं जवळ आली…. अनेक गावांत कित्येक वर्षांचे भाऊबंदकीतले वाद संपले… दोन-दोन दशकांपांसून असलेले वाद संपुष्टात आले. गावात खऱ्या अर्थाने लक्ष्मी नांदू लागली… गावांनी विकासाच्या दिशेने एक-एक पाऊल टाकलं…

📍 आबांनी गृहमंत्री असताना मोठ्या प्रमाणात पोलीस भरती केली… त्यामुळे गोर-गरिबांची अनेक पोरं शासकीय सेवेत आली. पर्यायाने अनेक कुटुंबांची गरिबी संपली… पुढच्या पिढीला चांगले दिवस बघायला मिळाले… पण शासकीय सेवेत गेलेल्या गरीबांच्या पोरांना आबा सक्त ताकीद देत… की लग्न करताना हुंडा घ्यायचा नाही, आता आपली गरिबी संपली म्हणजे मुलीच्या घरच्यांना कर्जाच्या खाईत लोटाचयं नाही… अशा पद्धतीने पोरी-बाळींच्या बापाचा विचार करणारा राजकारणी विरळाच…

👉 आबांच्या आयुष्यातील एक गाजलेला प्रसंग म्हणजे डान्सबारवरील बंदी…डान्सबारमुळे अनेक तरुण वाममार्गाला लागतात… अनेकांचे संसार उध्वस्त होतात… अनेक तरुण पोरांनी जमिनी विकून त्यातून आलेला पैसा बारमध्ये बारबालांवर उधळला… स्वतःचा संसार आणि आयुष्य उद्ध्वस्त करुन घेतलं… अशा डान्सबारवर बंदी घालणं आवश्यक होतं… डान्सबारवर बंदी घालायचीच, असा पण आबांनी केला आणि त्यांनी तो पूर्णही करुन दाखवला. आबांच्या निर्णयाने अनेक लेकी-बाळींचे संसार वाचले… आजही कित्येक माता माऊल्या आबांना याच कामामुळे आशीर्वाद देतात… आबांबद्दल भरुभरुन बोलत असतात… हीच आबांच्या कामाची पोचपावची….

सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप
https://letsup.app.link/LXIBE0i6Kib