LetsUpp Marathi
4.87K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
'या' घडीच्या १० महत्वाच्या बातम्या

LetsUpp l Bulletin

● मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा; दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येणार

● राज्य सरकारविरोधात रंगकर्मीचे आज राज्यव्यापी आंदोलन; कोरोनाकाळात कोणतीही आर्थिक मदत न मिळाल्याने रंगकर्मीवर आली उपासमारीची वेळ

● मुंबईत कोरोना मृत्यूंमध्ये २४ टक्क्यांनी घट; शहरात प्रतिदिन रुग्णसंख्याही ५०० पेक्षा कमी झाली, तर रविवारी धारावीत देखील शून्य कोरोना रुग्णांची नोंद

---------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ७७९८६५५६५५
----------------------

● पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडी खटल्यातील आरोपींच्या सुटकेला राज्य सरकार आव्हान देणार; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची माहिती

● कोव्हिशिल्ड-कोव्हॅक्सिनच्या मिश्र मात्रा जास्त परिणामकारक; ‘आयसीएमआर’च्या अभ्यासातील निरीक्षणे

● देशात उपचाराधीन कोरोनाच्या रुग्ण संख्येत ५ हजारांनी घट; गेल्या २४ तासांत ३९ हजार कोरोनाबाधित; तर ४३ हजार रुग्णांची कोरोनावर मात

● टोकियो ऑलिम्पिकचा समारोप; पुढील स्पर्धा तीन वर्षांनी पॅरिसमध्ये होणार

● आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरण : पी चिदंबरम यांच्याविरोधातील सीबीआयच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टात होणार सुनावणी

● काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे ट्विटर लाॅक केल्यावरून काॅंग्रेस संतप्त; केंद्र सरकारने दबाव टाकल्याचा आराेप

● काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे तोंडभरून कौतुक केले; मोदीस्तुतीमुळे काँग्रेस नेते पडले बुचकळ्यात

To know more click here
https://letsup.app.link/9YNSO3elzib
'या' घडीच्या १० महत्वाच्या बातम्या

Letsupp | Bulletin

● नागपुरात डेंग्यूचा कहर सुरूच, 383 घरांमध्ये अळी आढळल्या; या पार्श्वभूमीवर नागपूर महापालिकेकडून डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहीम

● येत्या दोन दिवसांत सोलापूरला पुण्याप्रमाणेच शिथिलता : पालकमंत्री दत्तात्रय भरणे, शहरातील व्यापाऱ्यांची लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी

---------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ९६२३१७४५५६
----------------------

● नवी मुंबईतील विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्यासाठी ठाणे, नवी मुंबईतील भूमिपुत्र पुन्हा आक्रमक

● मोहरमसाठी नियमावली जाहीर, मातम मिरवणुकीला परवानगी नाही; या वर्षी मोहरम साध्या पध्दतीने पाळण्याचा निर्णय

● आगामी 14 महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सरसकट महाविकास होणार नाही : राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक

● पत्रकारितेचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून हलवण्यास पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि माजी विद्यार्थ्यांकडून विरोध

● राज्यात सोमवारी 4,505 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 68 रुग्णांचा मृत्यू; तब्बल 44 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यू नाही

● 45 झोपड्या, सहा मजली इमारतीवर हातोड, ठाणे महापालिकेची अनधिकृत बांधकाम विरोधात कारवाई

● सुधा भारद्वाज, वरवरा राव यांच्यासह 15 जणांविरोधात आरोप निश्चितीची प्रक्रिया लवकरच, एनआयएची मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात माहिती

● भारतीय पुरूष, महिला संघाचं जोरदार स्वागत, विमानतळापासून हाॅटेलपर्यंत जंगी मिरवणूक; दोन्ही टीमने केक कापून सेलिब्रेशन केलं

To know more click here
https://letsup.app.link/TapI1REZAib
'या' घडीच्या १० महत्वाच्या बातम्या

Letsupp | Bulletin

● सीईटी रद्द केल्याने दहावीच्या गुणवंतांवर अन्याय;उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेक शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली मतं; राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची प्रतिक्षा; शिक्षण विभागाच्या निर्णयाकडे लक्ष

● मागासवर्ग निश्चितीबाबत विधेयक लोकसभेत मंजूर; दुरुस्तीमुळे मराठा समाजाला राज्याच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास यादीत समाविष्ट करण्याचा मार्ग सुकर मात्र, ५० टक्के आरक्षण मर्यादा शिथिलीकरणास बगल दिल्याची विरोधकांची टीका!

---------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ९६२३१७४५५६
---------------------- ●

● मुंबई लोकल सर्वसामान्यांना नियम आणि अटी घालून 15 ऑगस्टपासून सुरु होणार; आज 11 ऑगस्टपासून रेल्वे स्टेशनवर क्यूआर कोड सुविधा उपलब्ध, रेल्वे स्थानकांवर कोव्हिड लसीकरण ऑफलाईन पडताळणी करुन मासिक पास देण्याची प्रक्रिया सुरु होणार

● राजकीय पक्षांनी निवडणुकीतील उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर 48 तासांत संबंधित उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती जाहीर करावी; सर्वोच्च न्यायालयाचे राजकीय पक्षांना आदेश!

● मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा सुकर करण्याची मोठी संधी केंद्र सरकारकडे होती. परंतु, केंद्राने ही संधी गमावली - सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण

● केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्कारातील राजीव गांधी यांचे नाव वगळल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा माहिती – तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय

● काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जम्मू-काश्मीरमधील खीर भवानी मंदिराला तसेच हजरतबाल या मुस्लिमांच्या धार्मिक स्थळास भेट; गांधी यांचे दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीर भेटीसाठी सोमवारी आगमन

● राज्यात पावसाला पोषक हवामान तयार; आज विदर्भात सर्वत्र हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता

● राज्यातील तासिका तत्वावर कारम करणाऱ्या प्राध्यापकांना दिलासा मिळणार; नवीन पर्यायी धोरणासाठी समिती गठीत ही समिती राज्य सरकारला दोन महिन्यात अहवाल सादर करणार

● पत्रकारितेच्या शिक्षण क्षेत्रात राज्यभरात नाव असलेल्या पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतराचा वाद चांगलाच पेटण्याची शक्यता; या वादात आता युवा सेनेनं उडी घेतली असून, रानडे इन्स्टिट्यूटच्या मुद्द्यावरुन त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

To know more click here
https://letsup.app.link/C3xCcEwFCib