LetsUpp Marathi
4.87K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
आज दिवसभरातील 10 महत्वाच्या घडामोडी

LetsUpp l Bulletin

● मुंबईत लवकरच म्हाडाच्या 8 हजार घरांची लॉटरी काढण्यात येईल, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची महत्वपूर्ण घोषणा

● गेल्या 7 वर्षांत 12 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजगाराबद्दल एक शब्दही बोलत नाहीत- काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे टीकास्त्र

● कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 100 कोटी मंजूर; केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

● लसीकरण झालेल्या नागरिकांना मुंबई लोकल प्रवासासाठी स्वतंत्र पासची व्यवस्था करा; हायकोर्टाचा राज्य सरकारला सल्ला

● राज्यात जुलै महिन्यात तब्बल 15 हजारपेक्षा अधिक बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला; कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

● केंद्राकडे संपूर्ण देशासाठी लस उत्पादन करण्याची क्षमता नाही”, नोबेल विजेते अभिजीत बॅनर्जींनी सरकारला सुनावले!

● राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या तपासासाठी सरकार कागदपत्र देत नाही, सीबीआयचा मुंबई हायकोर्टात दावा

● कुस्तीपटू रविकुमार दहियाने जिंकलेल्या ऑलम्पिक रौप्य पदकालाही सुवर्ण झळाळी; राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार

● कोल्हापूरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळासाठी निधी उपलब्ध; प्रस्ताव तात्काळ सादर करा, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे प्रतिपादन

● उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थाना बाहेर स्फोटक ठेवल्या प्रकरणी अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला

To know more click here
https://letsup.app.link/UdZlZ1Kztib
राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नामांतर, पंतप्रधानांची घोषणा

LetsUpp | Trending

▪️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार केल्याचे जाहीर केले.

▪️ यासंदर्भात पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. सध्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे खेळाडू देशाचे नाव उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत.

▪️ काही खेळाडूंनी टोकियोमध्ये शानदार कामगिरी करत पदक देखील जिंकून दिले आहेत.

▪️ दरम्यान, राष्ट्रीय क्रीडा निवड समितीमार्फत भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात येत होता.

▪️ आता हा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावाने देण्यात येणार आहे.

To know more click here
https://letsup.app.link/UQYw3UDLuib
कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना किती घातक?; नवीन संशोधनातून आली 'ही' माहिती समोर!

LetsUpp | Trending

केरळमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने तिसऱ्या लाटेचे संकेत मिळू लागले आहेत. त्यामुळे ऑक्टोबरपर्यंत तिसरी लाट शिखर गाठेल असाही अंदाज व्यक्त होऊ लागला आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना अधिक धोका असल्याचे बोललेत जात आहे. मात्र, नव्या संशोधनानुसार लहान मुलांना कोरोनाचा जास्त धोका नसल्याचे स्पष्ट होत असल्याचा अहवाल एका मासिकात प्रसिद्ध झाला आहे.

'या' संशोधनात काय आढळले? :

● ज्या मुलांना कोरोना होतो ती सहा दिवसांत बरी होतात.
● चार आठवड्यांहून अधिक काळ कोरोनाची लक्षणे राहिलेल्या मुलांचे प्रमाण अवघे ४ टक्के होते.
● लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे अल्पकाळ टिकत असल्याचे अहवालात नमूद आहे.
● १७३४ मुलांचा डेटा या अभ्यासासाठी निरीक्षणाखाली ठेवण्यात आला होता.

हे संशोधन कोणी केले?

● लंडन येथील किंग्ज कॉलेज येथील संशोधकांनी ‘झो कोविड’ स्टडी स्मार्टफोन ॲपचा वापर करून लहान मुलांवर कोरोनाच्या लक्षणांचा अभ्यास केला.

● या ॲपवर १७ वर्षांपर्यंतच्या अडीच लाख मुलांचा डेटा उपलब्ध होता. संशोधकांच्या चमूने १ सप्टेंबर २०२० ते २२ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत संकलित करण्यात आलेल्या अहवालांवर लक्ष केंद्रित केले.

'या' संशोधनाचा निष्कर्ष काय?

● लहान मुलांमध्ये कोरोना फार काळ न टिकता सरासरी सहा दिवसांत बरा होतो.
● कोरोनाची तीव्र बाधा होत नाही. सौम्य लक्षणे लहान मुलांमध्ये आढळतात. ते लवकर बरे होऊ शकतात.
● कोरोनाची मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेले चार आठवड्यांपर्यंत बरे झाले.

To know more click here
https://letsup.app.link/vXnHxTNJuib
आता व्हॉट्सअ‍ॅपवर एकदा पाहिलेला मेसेज ऑटो होणार डिलिट, नवं फिचर लाँच

LetsUpp | Trending

🌐 इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी View Once हे नवं फिचर लाँच केलं आहे.

⚡ या फीचर अंतर्गत, कोणताही व्हिडिओ किंवा फोटो युजर्स View Once मोड अंतर्गत पाठवू शकतात.

👉 या मोडद्वारे पाठवलेले कोणतेही फोटो आणि व्हिडिओ फक्त एकदाच शेअर केले जाऊ शकतात.

📍 एकदा फोटो ओपन केल्यानंतर, युजर्स तो पुन्हा पाहू शकणार नाहीत आणि ते इतरांना शेअर करू शकणार नाहीत.

👉 यासंदर्भात कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे.

⚡ तुम्हाला हे फिचर वापरायचे असेल तर तुम्हाला तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करावे लागणार आहे.

📍 यासाठी तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ते अपडेट करू शकतात. या नवीन फीचरसह, इन-अ‍ॅप मेसेज नोटिफीकेशनची स्टाईलदेखील बदलली आहे.

📌 जेव्हा तुम्ही हा फोटो किंवा व्हिडिओ पाहताच तुम्हाला त्या फोटोऐवजी Opened असा मॅसेज दिसेल आणि तो फोटो किंवा व्हिडिओ गायब होईल.

To know more click here
https://letsup.app.link/smEpAQIRuib
विमलबाई ठरल्‍या बहिणाबाई चौधरी गौरव पुरस्काराच्‍या पहिल्‍या मानकरी

LetsUpp l Trending

🥇 कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा पहिला ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी गौरव पुरस्कार’ वर्डी (ता.चोपडा) येथील विमलबाई हिरामण भिल यांना जाहीर झाला आहे.

💁‍♂️ वर्डी शिवारात झालेल्या विमान अपघातात जखमी तरूणीसाठी अंगावरची साडी सोडून त्याची झोळी बनवून रूग्णवाहिकेपर्यंत पोहचविण्यासाठी मदत करून मानवतेचा आदर्श घालून दिल्याबद्दल हा पुरस्कार देऊन त्यांचा विद्यापीठाच्यावतीने त्यांचा ११ ऑगस्टला सन्मान करण्यात येणार आहे.

विमलबाईंची अशी होती कामगिरी

🥇 विद्यापीठाच्यावतीने यावर्षीपासून कवयित्री बहिणाबाई चौधरी गौरव पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली होती. १६ जुलैला एमव्हीकेएम संस्थेअंतर्गत शिरपूर येथे सुरू असलेल्या विमान प्रशिक्षण केंद्रामधील प्रशिक्षणार्थी विमान चोपडा तालुक्यातील वर्डी शिवारात कोसळले होते.

✈️ या दुर्घटनेत वैमानिकाचा मृत्यू झाला. तर प्रशिक्षणार्थी वैमानिक अंशिका गुर्जर ही जखमी झाली. ५० फुट खोल दरीत हे विमान कोसळले. डोंगराळ भाग असल्यामुळे रूग्णवाहिका घटनास्थळापर्यंत पोहचू शकत नव्हती.

🤕 आदिवसाी बांधवांनी विमानाची काच फोडून या तरूणीला बाहेर काढले. यावेळी ३ किमी लांबवर असलेल्या रूग्णवाहिकेजवळ तिला तात्काळ नेण्यासाठी स्ट्रेचर उपलब्ध नसल्यामुळे विमलबाई भिल यांनी तात्काळ अंगावरची साडी काढून त्याची झोळी तयार करण्यासाठी दिली. त्यामुळे तात्काळ रूग्णवाहिकेजवळ आणून इस्पितळात दाखल करता आले व या तरूणीचा प्राण वाचला.

To know more click here
https://letsup.app.link/iynqORH4uib
आज दिवसभरातील 10 महत्वाच्या घडामोडी

LetsUpp l Bulletin

● कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करण्यासाठी दोन दिवसात निर्णय होऊ शकतो; राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची महत्वपूर्ण माहिती

● केंद्र सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराच्या नावात बदल करण्याचा मोठा निर्णय घेतला. आता यापुढे या पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं असणार आहे

● राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ; नागपुरातील एनआयटी महाविद्यालयावर ईडीचे छापे

● राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या ताफ्यातील वाहनाला हिंगोली जिल्ह्यातील नर्सी नामदेव येथे अपघात, सुदैवाने राज्यपाल कोश्यारी सुरक्षित

● मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरनं भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी यांच्या ट्विटर अकाऊंटची ब्ल्यू टिक हटवली होती. मात्र, काही वेळानंतर धोनीच्या अकाऊंटची टिक पुन्हा देण्यात आली

● केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवियांनी घेतली सीरमचे सीईओ अदार पूनावालांची भेट; कोविशील्ड लसीच्या पुरवठ्याबद्दल करण्यात आली चर्चा

● कोरोना लस घेतल्यानंतर, डेल्टा व्हायरसच्या संसर्गाचा धोका 60 टक्क्यांनी कमी होतो; ब्रिटीश रिसर्चर्सचा दावा

● संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्षामुळे स्थगित होत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत मांडण्यात अडथळा येत असल्याची खंत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केली

● तुम्ही राजीनामा द्या, अशीही जनतेची मागणी”; ‘खेलरत्न’च्या नामांतरावरुन राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

● विविध मागण्यांसाठी होमगार्डचा पुणे ते मुंबई पायी मोर्चा, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याबाहेर करणार ठिय्या आंदोलन

To know more click here
https://letsup.app.link/Eo0uiMQevib
हॉटेल व्यावसायिकांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; निर्बंधांबाबत मोठा निर्णय घेणार

LetsUpp l Trending

🦠 राज्यात 25 जिल्ह्यात कोरोना निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससाठी अद्यापही निर्बंध लागू आहेत. या पार्श्वभूमीवर हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांच्या संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

📍 त्यावेळी राज्यात काही जिल्ह्यात पहिला टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. याबाबतचे परिणाम आणि अजूनही गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेऊन, हॉटेल आणि रेस्टाँरंट व्यावसायिकांना वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

💁‍♂️ यादरम्यान आपल्याला कोरोनाची तिसरी लाट टाळायची आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियम कठोरपणे पाळावे लागतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

💁‍♀️ राज्यातील हॉटेल आणि रेस्टाँरंट व्यावसियांकाच्या इंडियन हॉटेल अँण्ड रेस्टॉंरंटंस असोसिएशन-आहार तसेच हॉटेल ओनर्स असोसिएशन, एनआरएई या संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासमवेत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.

👉 टास्क फोर्सचे डॉ. जोशी यांनी हॉटेल व्यावसायिकांनी कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे, वातानुकूलन प्रणाली बंद करून हवेशीर व्यवस्था करणे, स्वच्छतागृहांची रचना याबाबतही सूचना केल्या.

To know more click here
https://letsup.app.link/rvUIwMOkvib
आता लसीकरणाचा एकच डोस पुरेसा! भारतात सिंगल डोसला मंजुरी

LetsUpp l Trending

🦠 जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनच्या सिंगल डोसच्या लसीला भारतात मंजूरी मिळाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मंसुख मांडविया
यांनी ही माहिती ट्वीट करुन दिली आहे. मांडवीय यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, भारताने आपली लस बास्केट वाढवली आहे.

💉 जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनच्या सिंगल-डोस कोविड -19 लसीला भारतात आणीबाणीच्या वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. आता भारताकडे 5 EUA लस उपलब्ध आहे. यामुळे आपल्या देशात कोविडविरुद्धच्या लढाईला आणखी बळ मिळेल, असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. जॉन्सनअ‍ॅण्डजॉन्सन

To know more click here
https://letsup.app.link/GXLPf1eDwib
राज्यातील 'हे' शहर ठरले पहिले कोरोना मुक्त शहर

Letsupp | Trending

● राज्याच्या आकडेवारी नुसार भंडारा जिल्हा राज्यातील पहिला कोरोनामुक्त जिल्हा तर धुळे हे पहिले कोरोनामुक्त शहर म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या दिलासादायक बातमीमुळे धुळेकरांकडून समाधान व्यक्त होत आहे.

● कोरोनाचा सर्वत्र कहर सुरु होता यात दुसऱ्या लाटेत कोरोनाला रोखण्यासाठी सर्वत्र प्रयत्न करण्यात येत होते. कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत होत्या आता मिळालेल्या माहिती नुसार राज्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे.

● भंडारा जिल्हा हा राज्यातील पहिला करोनामुक्त जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्याच सोबत कोरोना रोखण्यास यशस्वी ठरलेले धुळे हे राज्यातील पहिले कोरोनामुक्त शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. या दिलासादायक बातमीमुळे धुळेकरांच्या चेहऱ्यावर आनंद बघायला मिळत आहे.

● धुळे शहरात कोरोनाचे सक्रिय रुग्ण शुन्य आहेत तर 3 ऑगस्टपासून कुठलीही पॉझिटिव्ह केस आलेली नसुन कोरानाने मृत्यू देखील झालेला नाही तसेच धुळे शहरात एकही कंटेन्मेंट झोन नसल्याचे सांगण्यात आले आहे.

To know more click here
https://letsup.app.link/sTL90Pitwib
ब्रेकिंग! भारतीयांसाठी सुवर्ण 'क्षण', भालाफेकमध्ये देशासाठी पहिलं 'गोल्ड'

LetsUpp l Trending

🥇 टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी आजचा दिवस अविस्मरणीय आहे. कारण भारताच्या झोळीत पहिलं सूवर्ण पदक पडलं आहे. नीरज चोप्राने चमकदार कामगिरी करत भालाफेकमध्ये सूवर्ण पदकाची कमाई केली आहे. नीरजने 87.88 मीटर भाला फेकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.

💫 याआधी आज कुस्तीपटू बजरंग पुनियाने 65 किलो फ्री स्टाईल कुस्तीमध्ये भारतासाठी कांस्य पदक पटकावलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनियाने कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोव वर 8-0 ने मात केली.

To know more click here
https://letsup.app.link/y070oLILwib
'या' घडीच्या १० महत्वाच्या बातम्या

LetsUpp l Bulletin

● लोकलच्या गर्दीवर नियंत्रणासाठी अ‍ॅपचा विचार, लोकल, हॉटेलबाबत आठवड्याभरात निर्णय; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

● मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर ठाण्यातील हॉटेल मालकांचा संप तूर्तास मागे; हॉटेल्स असोशिएशनचे आणि बार अँन्ड रेस्टोरंट असोसिएशन अध्यक्षांची माहिती

---------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ७७९८६५५६५५
----------------------

● चिपळूण पुराचा वाद आता कोर्टात; नगरपालिका पाटबंधारे विभाग, हवामान विभाग आणि महसूल विभागांना पाठवणार कायदेशीर नोटीस!

● कस्तुरबा रुग्णालयातील गॅस गळतीनंतर रुग्णांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर, आदित्य ठाकरे यांची माहिती

● पुणे - शिवने-उत्तमनगरमधील बस मॉडिफाय करणाऱ्या गॅरेजला भीषण आग, 14 वाहनं जळाल्याची माहिती

● तुळजापुरातील 3 मंदिरं सील, कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तहसीलदारांनी कडक कारवाई केली

● राहुल गांधींवर ट्विटरची कारवाई: दिल्ली कँट बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या पालकांचे फोटो शेअर केल्याप्रकरणी केली कारवाई; राहुल गांधी इन्स्टाग्रामवर सक्रिय

● पत्नीच्या शरीराला आपली संपत्ती समजणं म्हणजे वैवाहिक बलात्कार, घटस्फोटासाठी ठोस कारण ठरेल; केरळ उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

● स्वातंत्र्य दिनी दिल्लीत घातपाताची शक्यता, दिल्लीत कडक सुरक्षा तैनात; पहिल्यांदाच लाल किल्ल्याच्या सुरक्षतेसाठी दिल्ली पोलिस, आर्मीच्या जवानांबरोबर कंटेनरची एक उच्च भिंत

● भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक शोरेड मरिन यांचा राजीनामा! संघाची जबाबदारी जानेका शॉपमन यांच्याकडे

● टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी; एक सुवर्ण, दोन रौप्य, चार कांस्य पदकांची कमाई

To know more click here
https://letsup.app.link/Uso6d6tGxib
मराठी चित्रपट सृष्टीला सुवर्ण दिवस दाखवणारा सोंगाड्या

LetsUpp l Special

(जन्म 8 ऑगस्ट 1932, मृत्यू 14 मार्च 1998, विवाह - नलिनी कोंडके )

🙏 मराठी चित्रपट सृष्टीचा बादशहा अशी ओळख असणारे हरहुन्नरी कलाकार म्हणजेच दादा कोंडके. एकेकाळी डबघाईला आलेल्या मराठी चित्रपट सृष्टीला परत सुवर्ण दिवस दाखवणारा कलाकार म्हणजेच दादा कोंडके. जाणून घेऊया या हरहुन्नरी कलाकाराबद्दल...

सुरुवातीचे जीवन

💁‍♀️ दादा कोंडके यांचे मूळ नाव कृष्णा कोंडके. दादांचा जन्म 8 ऑगस्ट 1932 रोजी एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील हे मिलमध्ये कामगार होते. त्यांचे बालपण लालबाग जवळच्या नायगाव येथे गेले.

💁‍♂️ मुळगाव हे भोर तालुक्यातील इंगवली हे गाव. कुटुंबाला हातभार लावण्याच्या दादांनी बँड पथकामध्ये सहभाग घेतला होता. बँड पथकमध्ये कार्यरत असताना समाजसेवेमधे सुद्धा भाग घ्यायला सुरुवात केली.

मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण

👉 भालजी पेंढारकर यांच्या तांबडी माती या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या सोंगाड्या या चित्रपटाने दादांना यशाच्या शिखरावर विराजमान केले. सोंगाड्याने मराठी चित्रपट सृष्टीला एक नवीन विनोदी अभिनेता मिळाला.

दादा आणि बाळासाहेब ठाकरे

⚡ कोहिनूर चित्रपटाच्या मालकाने दादांचा सोंगाड्या हा सिनेमा रोखून धरला होता. त्यांना देव आनंद यांचा "तेरे मेरे सपने" हा चित्रपट प्रदर्शित करायचा होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर दादांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे धाव घेतली.

💫 बाळासाहेबांच्या आदेशामुळे सोंगाड्या चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. बाळासाहेबांचे हे उपकार दादा कधीही विसरले नाहीत आणि शेवटपर्यंत ते कट्टर शिवसैनिक राहिले.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

🎞️ दादांचे सलग नऊ चित्रपट हे पंचवीस आठवडे सुपरहिट ठरले होते त्यामुळे दादांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला होता. एवढे चित्रपट सलग सुपरहिट होणे हे चित्रपट सृष्टीतील एक नवीन रेकॉर्ड होते जे आजही अबाधित आहे.

🎙️ ते एक कसलेले अभिनेते सुद्धा होते. गाणी सुद्धा त्यांनी गायली. ते गीतकार आणि पटकथाकार सुद्धा होते. ते एक यशस्वी दिग्दर्शक आणि नावाजलेले संगीतकार देखील होते. एकाच व्यक्तीकडे एवढे गुण असणे म्हणजे आश्चर्यच नव्हे काय!

🎥 द्विअर्थी विनोदाने गाजलेल्या चित्रपटात मध्ये सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव,आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथे गुदगुल्या, ह्योच नवरा पाहिजे, आली अंगावर, मुका घ्या मुका, मला घेऊन चला, पळवा पळवी या चित्रपटांची आवर्जून नावे घेता येतील.

विवाह आणि प्रेम

👩‍❤️‍👨 दादांचा विवाह नलिनी यांच्या बरोबर झाला होता पण तो फार काळ टिकला नाही आणि लवकरच अंतर्गत वादाने त्याचे परिवर्तन घटस्फोटात झाले. दादा कोंडके यांच्या बऱ्याच चित्रपटातील अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याबरोबर दादांचे प्रेम संबंध असल्याच्या चर्चांना उत आला होता पण याची पुष्टी दादांनी कधीच केली नाही. दादांच्या घटस्फोटानंतर दादा आणि उषा चव्हाण हे लग्न करणार असल्याच्या अफवा सुद्धा पसरत होत्या पण शेवटपर्यंत त्या अफवाच राहिल्या.

जगाचा निरोप

📌 14 मार्च 1998 रोजी चा तो काळा दिवस उजाडला आणि दादर येथील आपल्या रामनिवास निवासस्थाने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली होती आणि नियतीने त्यांना आपल्यातून हिरावून नेले.

📍 आजही दादांच्या चित्रपटातील गाणी ऐकताना त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्याएवढा अष्टपैलू अभिनेता आजवर तरी कोणी झाला नाही. या कसलेल्या अभिनेत्याला मानाचा मुजरा.

सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप
https://letsup.app.link/iJt7Dq7Rxib