LetsUpp Marathi
4.87K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
VIDEO : फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या कोल्हापूरच्या महिलेला प्रियांका चोप्रा म्हणाली, यू रॉक!

LetsUpp | Kolhapur

💁🏻‍♂️ सोशल माध्यमांवर काही गोष्टी व्हायरल झाल्या तर कधी त्या ट्रोलही करतात तर काही प्रसिद्धीच्या शिखरावर देखील पोहचवतात.
👱🏻‍♀️ नुकतेच कोल्हापूर येथील मेहंदी आर्टिस्ट सोनाली यांच्या खडाखड इंग्रजीची बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस व प्रियांका चोप्राला चांगलीच भूरळ पडली आहे.

😍 मेहंदी आर्टिस्ट सोनाली वाघारिया या अस्खलित इंग्रजी बोलतात. त्यांच हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून याचीच दखल सिनेकलाकारांनी घेतली आहे.

🧐 कोण आहेत सोनाली वाघारिया?
▪️ जेमतेम परिस्थितीमुळे सोनाली वाघारिया यांचे सातवीपर्यंत शिक्षण झाले. मुंबईतील सांताक्रूझ येथे सोनाली यांनी जुहू परिसरात परेदशी पर्यटकांच्या हातावर मेहंदी काढण्याचे काम केले.

🗣️ परदेशी नागरिकांच्या संपर्कात येत असल्याने त्यांची इंग्रजी भाषा त्यांनी अवगत केली. एके दिवशी इंग्रजी बोलण्याचा व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला.

👩🏻‍🦰 अभिनेत्रींनी घेतली दखल
या व्हिडिओची दखल अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांनी घेतली. ‘स्ट्राँग वुमन’ म्हणून त्यांनी व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. तर अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस यांनी त्यांना मुंबईला येऊन रिल्स बनविण्याचे व मेहंदी काढण्याचे आमंत्रण दिले आहे.

To know more click here
https://letsup.app.link/Hry0miiVpib
भारतीय तिरंदाज प्रवीण जाधवच्या कुटुंबीयांना शेजाऱ्यांकडून धमकी

LetsUpp | Trending

⚡ टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेला तिरंदाज प्रवीण जाधवच्या कुटुंबीयांना शेजाऱ्यांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे प्रकार समोर आला आहे.

🏠 प्रवीण जाधव हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील साराडे गावचा आहे. जाधव कुटुंबातील चार जण एका झोपडी वजा घरात राहतात. जाधव लष्करात दाखल झाल्यानंतर त्यांनी पक्के घर बांधले.

💁🏻‍♂️ यासंदर्भात जाधवने सांगितले की, सकाळी पाच सहा जण आले आणि माझ्या वडीलांना आणि काकांना धमकी देऊन गेले. आम्ही घराची काही दुरुस्ती करणार आहोत, यासाठी त्यांचा विरोध आहे.

👉 याआधी देखील त्यांनी अशा प्रकारे त्रास दिला होता. त्यांना एक स्वतंत्र मार्ग हवा आहे. ज्यावर आम्ही होकार दिला होता. पण आता त्यांनी मर्यादा सोडली आहे.

🗣️ आम्ही घराची दुरुस्ती करणार आहोत. त्याला विरोध करत आहे. या घरात आम्ही अनेक वर्षापासून राहत आहोत, सर्व कागदपत्र आमच्याकडे आहेत, असे जाधवने सांगितले.

To know more click here
https://letsup.app.link/ic0zgMXQpib
...आणि अभिनेते मिलिंद शिंदे बालंबाल बचावले!

LetsUpp | Trending

⚡ लॉकडाऊनमुळे चित्रपटांच्या चित्रीकरणाची कामं अर्धवट थांबली होती. मात्र अनलॉकनंतर काही प्रमाणात ती कामे चालू झाली आहेत.

👉 या पार्श्वभूमीवरच एका आगामी मराठी चित्रपटाच्या उर्वरीत भागाच्या चित्रीकरणाचे काम चालू असताना जेष्ठ अभिनेते मिलिंद शिंदे हे थोडक्यात बचावले आहेत.

काय आहे घटना? :

● अभिनेते मिलिंद शिंदे आपल्या उत्तम अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र "जयंती" या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांच्यासोबत अगदी जीवावर बेतण्याइतकी घटना घडली आहे.

● मोठ्या प्रतीक्षेनंतर या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाल्याने सर्वजण अगदी उत्साहित होते. चित्रपटाच्या व्याप्तीनुसार मोठमोठाले लाईट्स, जिमी जीब क्रेन्स, मल्टिकॅमेरा सेटअप अशा अनेक अवजड उपकरणांच्या साहाय्याने रात्रीच्या वेळी चित्रपटाच्या चित्रीकरणाचे काम सुरु होणार होते.

● नेहमीप्रमाणे मिलिंद शिंदे आपल्या भूमिकेमध्ये मग्न होऊन सराव करत होते, सेटवर जिमी जीब कॅमेराचा सेटअप लावलेला होता, कॅमेरा टीमही जिमी जीबवर पुढील मंद प्रकाशातील शॉट च्या चित्रीकरणाचा सराव करत होती.

● कथित सीनसाठी जिमी जीब क्रेनचं वेगाने खाली येणं हा चित्रीकरणाचा एक महत्वपूर्ण भाग होता आणि म्हणूनचं क्रेनच्या वेगाचे नियंत्रण हे चोख असावे यासाठी टीम काम करत होती.

● या आव्हानात्मक शॉटच्या सरावात टीम इतकी गुंतली होती की कोणालाचं आपल्या सरावात मग्न असलेले मिलिंद शिंदे हे क्रेन ज्या दिशेने खाली येणार होती नेमके तिथेचं उभे होते हे समजलं नाही.

● परंतु जिमी जीब क्रेन नियंत्रित करणाऱ्या ऑपरेटरला खाली उभे असलेले मिलिंद शिंदे दिसले आणि सरावादरम्यान वेगाने खाली येणाऱ्या जिमी जीब क्रेनला त्याने अगदी चपळाईने नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत दुसऱ्या बाजूला वळवली.

● नेमक्या त्याच क्षणी मिलिंद शिंदें फ्रॅक्शन ऑफ सेकंदातचं खाली वाकले आणि थोडक्यात बचावले. जिमी जीब ऑपरेटरने प्रसंगावधान दाखवून ती क्रेन नियंत्रित केली म्हणून होणारा भयंकर अनर्थ टळला.

To know more click here
https://letsup.app.link/QoEO9KFPpib
'या' घडीच्या १० महत्वाच्या बातम्या

LetsUpp l Bulletin

● पुरेशा लस साठ्याअभावी आज मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद; लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल

● जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या पुनर्नियुक्तीचे परभणीकरांकडून स्वागत, जिल्हाभरात केलेल्या संघर्षाला यश

● NDRF चे निकष बदलण्यासाठी शरद पवार यांनी घेतली अमित शाह यांची भेट : खासदार सुनील तटकरे यांची माहिती

---------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ७७९८६५५६५५
----------------------

● फाईल पाठवूनही निर्णय घेत नसल्याचा राज्य सरकारचा आरोप, फाईल उशीरा मिळाल्याचं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं एमपीएससी सदस्य नियुक्तींच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण

● सुप्रसिद्ध तमाशा कलावंत मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश; पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागात करणार काम

● अहमदनगर जिल्ह्यात पोलिस प्रशासनाने अवैध धंद्यांविरोधात कंबर कसली; तब्बल 5 लाख 1 हजार 960 रूपायांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला; या प्रकरणी 12 आरोपींविरोधात गुन्हा दाखल

● राज्यात मंगळवारी 6005 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 6 हजार 799 रुग्ण कोरोनामुक्त; सहा जिल्ह्यात मंगळवारी एकही रुग्ण नाही

● सोलापूर; 43 दिवसांपासून अकलूज-माळेवाडी व नातेपुते नागरीकांच्या सुरु असलेल्या लढ्याला यश; अकलूज आणि नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपालिका आणि नगरपंचायतीत रूपांतर

● भारतीय महिला हॉकी संघ सुवर्णपदकापासून केवळ दोन पावलं दूर, आज सेमीफायनल्समध्ये अर्जेंटीनाशी लढत

● कसोटी वर्ल्ड कप स्पर्धेचे दुसरे पर्व सुरु; इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या पतौडी चषक मालिकेला आजपासून सुरूवात

To know more click here
https://letsup.app.link/beADzLy3qib
Tokyo Olympics 2020 : भालाफेकीमध्ये भारताच्या नीरज चोप्राची जबरदस्त कामगिरी!

LetsUpp | Trending

⚡ टोकियोमध्ये आजच्या दिवसाची सुरुवात भारतासाठी चांगली झाली आहे. पुरुषांच्या भालाफेकीमध्ये भारताच्या नीरज चोप्रा याने जबरदस्त कामगिरी करत दिमाखात अंतिम फेरी गाठली.

👉 अ गटात समावेश असलेल्या नीरजने पहिल्याच प्रयत्नात तब्बल ८६.६५ मीटर भालाफेक करत अंतिम फेरीचे तिकीट पक्के केले.

💫 मात्र, भालाफेकीच्या पात्रता फेरीत ब गटात समावेश असलेल्या भारताच्या शिवपाल सिंह याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

📝 त्याची सर्वोत्तम भालाफेक ७६.४० मीटर राहिली, जी अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याच्या निकषापेक्षा खूप कमी होती.

✅ दरम्यान, पुरुषांच्या भालाफेकीमध्ये भारताचा युवा खेळाडू नीरज चोप्राचाच बोलबाला राहिला. नीरज चोप्रा ८६.६५ मीटर भालाफेकीसह अव्वलस्थानी राहिला. अ आणि ब गटातील कुठल्याही खेळाडूला त्याच्या कामगिरीची बरोबरी करता आली नाही.

📍 पात्रता फेरीत ८५.६४ मीटर अंतरासह जर्मनीचा वेटर जॉन्सन दुसऱ्या स्थानी राहिला. तर पाकिस्तानचा नदीम अर्शद ८५.१६ मीटर भालाफेकीसह तिसऱ्या स्थानी राहिला.

To know more click here
https://letsup.app.link/AHIOQL8crib
पुण्यातील टिळक रस्त्यावर मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा

LetsUpp | Trending

⚡ पुण्यातील टिळक रस्त्यावरील हिराबाग चौक परिसरात एका मद्यधुंद तरुणीने मंगळवारी रात्री भररस्त्यात अनेक वाहनांना अटकाव करत धिंगाणा घातला.

👉 काही नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून याबाबत कळविल्यानंतर तरुणीला पोलिसांनी रस्त्यावरून बाजूला हटवले आणि पोलीस ठाण्यात नेले. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं? :

● पुणे शहरातील टिळक रस्त्यावरील हिराबाग चौक परिसरातील प्रकार सर्वांनाच धक्का देणारा होता. दारूच्या नशेत असलेली एक तरुणी रस्त्याच्या मधोमध येऊन धिंगाणा घालत होती.

● रस्त्यावर बसत तिने गाड्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. माझ्या अंगावरून गाडी न्या असेही ती ओरडत होती. काहींनी तिला रस्त्यावरून बाजूला जाण्यासाठी विनंती केली मात्र ती ऐकायला तयार नव्हती.

● त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पोलीस आले आणि मग या तरुणीला गपगुमान त्यांच्यासोबत जावं लागलं. ही तरुणी कोण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

To know more click here
https://letsup.app.link/1w7Anf84qib
🇮🇳 टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरने रचला इतिहास; कांस्यपदक जिंकलं

LetsUpp | Trending

💫 महिला बॉक्सिंगमध्ये भारतीय बॉक्सर लवलिनानं इतिहास रचला आहे. सेमिफायनलमध्ये भलेही तिचा पराभव झाला मात्र तिनं देशासाठी पदक जिंकलं आहे. तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेलीनं लवलीनाचा पराभव केला.

🇮🇳 लवलीनानं जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनल जिंकली होती. या विजयासह लवलीनानं इतिहास रचत भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं होतं.

🥇 आज ती पदकाचं रुपांतर सुवर्ण किंवा रौप्य पदकात करण्यासाठी मैदानात उतरली होती. मात्र तिला पदकाचा रंग बदलण्यात यश मिळालं नाही. तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेलीनं या विजयासह फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

आसामच्या छोट्या खेड्यातून सुरु झाला प्रवास

🏆 आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील बाडा मुखिया गावात राहणाऱ्या लवलीनानं मोठ्या संघर्षातून हे यश मिळवलं आहे. लवलीना या भागात खूप लोकप्रिय आहे. लवलीनाला तिच्या कामगिरीच्या बळावर मानाचा अर्जुन पुरस्कार देखील मिळाला आहे.

🏠 भारताच्या दुर्गम भागातून आलेल्या अन्य काही खेळाडूंसारखाच लवलीनाचा संघर्ष आहे. आर्थिक संकाटाचा सामना करत लवलीनानं ऑलिम्पिक पदकापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे.

लवलीनाच्या दोन बहिणीही बॉक्सिंगमध्ये

👩🏻 लवलीना बॉरगोहेनचा जन्म 2 ऑक्टोबर 1997 रोजी झाला. तिचे वडील टिकेन आणि आई मामोनी बॉरगोहेन. वडील टिकेन एक छोटे व्यापारी तर आई गृहिणी. आपल्या मुलीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी लवलीनाच्या आईवडिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.

👉 लवलीनाला तीन बहिणी आहेत. तिच्या दोन मोठ्या बहिणी लिचा आणि लीमा यांनी आधी किक बॉक्सिंग सुरु केली. त्यानंतर लवलीनाही किकबॉक्सिंगमध्ये आली.

To know more click here
https://letsup.app.link/W8NA5LRnrib
एमएचटी सीईटीच्या परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी!

LetsUpp | Trending

⚡ इंजिनीअरिंग, मेडिकल, फार्मसी, कृषी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या एमएचटी सीईटीची परीक्षा २६ ऑगस्टपासून होणार आहेत.

📝 बारावीनंतरच्या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची सीईटी ४ ते १० सप्टेंबर आणि १४ ते २० सप्टेंबर अशा दोन संत्रात होणार आहे.

👉 यंदा एमएचटी सीईटी परीक्षेसाठी राज्यातून तब्बल ४ लाख ६ हजार ६७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्याचप्रमाणे परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.

📍 दरम्यान, यंदा नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याचे समोर आले आहे. गतवर्षी ५ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यंदा हा आकडा चार लाख सहा हजार इतकाच आहे.

To know more click here
https://letsup.app.link/GzWnbCiTsib
अकरावीच्या प्रवेश परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी!

LetsUpp | Trending

⚡ अकरावी प्रवेश परीक्षेचे स्वरूप शिक्षण विभागाने उच्च न्यायालयासमोर मांडले असून या परीक्षेसाठी १७५ पैकी १०० प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवायचे आहेत.

👉 इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांनाही सामावून घेण्यासाठी प्रश्नसंख्या वाढवण्याचा पर्याय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने काढला आहे. प्रत्येक मंडळाने दोनशे प्रश्न राज्यमंडळाकडे सादर करावेत, अशी सूचना न्यायालयाने दिली आहे.

📝 अकरावी प्रवेश परीक्षेसाठी सगळ्या मंडळांच्या अभ्यासक्रमांवर आधारित एकच प्रश्नपत्रिका तयार करण्याबाबत विचार करण्याची सूचना न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी राज्य सरकारला केली होती. त्या पार्श्वभूमीवर सरकारतर्फे बुधवारी भूमिका स्पष्ट करण्यात आली.

🤔 अकरावी प्रवेश परीक्षेचे स्वरूप कसे असणार? :

● प्रवेश परीक्षेसाठी प्रत्येकी २५ गुणांचे सात गट असतील. त्यातील चार गट राज्य मंडळाच्या गणित, विज्ञान, सामाजिक विज्ञान आणि इंग्रजी या विषयांवर आधारित असतील, तर उर्वरित तीन गटांमध्ये अन्य मंडळांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित प्रश्न असतील.

● या सात गटांपैकी कोणत्याही चारमधून प्रश्न विचारण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध असेल. तसेच विद्यार्थ्यांना १७५ पैकी १०० प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, असे राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी स्पष्ट केले.

● दरम्यान, अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी राज्य मंडळाच्या दहा लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून अन्य मंडळांच्या केवळ ३५ हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केल्याची माहिती सरकारतर्फे न्यायालयाला देण्यात आली.

To know more click here
https://letsup.app.link/qqtArp6Vsib