LetsUpp Marathi
4.87K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी निकालासंदर्भातील महत्त्वाची बातमी

Letsupp | Trending

● राज्य माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या निकालानंतर आता सीबीएसईतर्फे दहावी आणि बारावीचा निकाल टॅब्युलेशन पॉलिसीनुसार तयार करण्यात आला आहे. आता बोर्डातर्फे लवकरच कोणत्याही दिवशी निकालाची तारीख जाहीर केली जाऊ शकते. विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर जाऊन निकाल पाहू शकतात.

● डिजिलॉकरच्या माध्यमातून देखील निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टीकलच्या परीक्षांवेळी देण्यात आलेल्या रोल नंबरच्या माध्यमातून हे निकाल पाहता येऊ शकतात. तसेच डिजिलॉकरवर विद्यार्थ्यांना आपली गुणपत्रिका पाहता येणार आहे.

● बोर्डातर्फे शाळांना २२ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांच्या गुणांचा रेकॉर्ड भरण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर ही तारीख वाढवून २५ जुलै करण्यात आली. कोणत्याही शाळेने फॉर्मुलेशननुसार गुण अपलोड केले नसतील तर त्यांना संधी मिळावी यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली.

● बोर्डातर्फे तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी हेल्प डेस्कची स्थापना करण्यात आली. शाळांना कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास ते हेल्प डेस्कच्या मदतीने गुण अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण करु शकतील यासाठी हेल्प डेस्क सुरु करण्यात आला.

To know more click here
https://letsup.app.link/M8NlzNoieib
आसाम मिझोराम सीमेवरील चकमकीत पुण्याचे वैभव निंबाळकर जखमी, अभिनेत्री उर्मिला निंबाळकरचे आहेत भाऊ

LetsUpp | Trending

⚡ ईशान्येकडील आसाम आणि मिझोरम या राज्यांमधील सीमासंघर्ष अधिकच चिघळला आहे. आसामच्या सीमेवरील कचार जिल्ह्यात उडालेल्या चकमकीत आसाम पोलीस दलातील सहा पोलीस हुतात्मा झाले आहेत.

👮🏻 यामध्ये अनेक पोलीस शिपाई आणि मूळचे महाराष्ट्रातील असलेले अधिकारी वैभव निंबाळकर हेदेखील यामध्ये जखमी झाले आहेत. निंबाळकर यांच्या पायाला गोळी लागली आहे. वैभव निंबाळकर हे अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिचे भाऊ आहेत.

💁‍♀️ उर्मिलाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन वैभव निंबाळकर यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. माझा भाऊ, आयपीएस वैभव निंबाळकर कर्तव्यावर गोळीबार आणि दगडफेकीत जखमी झाला आहे. त्यांची प्रकृती स्थीर असून तो सध्या आयसीयूत आहे.

👨🏻‍⚕️ निंबाळकर यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती उर्मिलानं तिच्या पोस्टमधून दिली आहे. तसंच विचारपूस केल्याबद्दल हितचिंतकांचे तिने आभारही मानले आहेत.

To know more click here
https://letsup.app.link/F6BsTbgoeib
भारतीय संघाला मोठा धक्का! संघातील 'हा' खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

Letsupp | Trending

● भारताचा मर्यादीत षटकांचा संघ श्रीलंका दौऱ्यावर असून सध्या टी२० मालिका सुरु आहे. यामालिकेतील दुसरा सामना आज (२७ जुलै) होणार होता. मात्र आता हा सामना रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

● भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे दुसरा टी२० सामना स्थिगत करण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे.

● त्यामुळे आता अन्य सर्व खळाडूंचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यास श्रीलंका विरुद्ध भारत संघातील दुसरा टी२० सामना बुधवारी (२८ जुलै) होईल. अशी माहिती समोर आली आहे.

To know more click here
https://letsup.app.link/o4gzcX5peib
लहान मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची दिलासादायक माहिती

LetsUpp | Trending

💉 लहान मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी दिलासा देणारी बातमी दिली आहे.

💁‍♂️ ऑगस्ट महिन्यात लहान मुलांसाठीची लस भारतात येईल, अशी माहिती त्यांनी भाजपा संसदीय दलाच्या बैठकीत दिली आहे.

🗣️ “सरकार पुढच्या महिन्यापासून लहान मुलांचे लसीकरण सुरु करणार आहे. तसेच भारत जगातील सर्वाधिक लस उत्पादन करणारा देश होत आहे.

👍 अनेक कंपन्यांना लस उत्पादनाचा परवाना देण्यात येत असल्याचेही केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले.

📍 सध्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीची २ वर्षांवरील मुलांवर चाचणी सुरु आहे. ही चाचणी अंतिम टप्प्यात असून त्याबाबत निकाल पुढच्या महिन्यात येणार आहे.

To know more click here
https://letsup.app.link/Yyls0O7peib
अकरावी सीईटीच्या परीक्षेसाठी अशी करा नोंदणी!

LetsUpp l Trending

👨🏻‍💻 अकरावी सीईटीच्या नोंदणीसाठी नवी वेबसाईट तयार झाली असून, या वेबसाईटवर राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची २६ जुलैपासून नोंदणी सुरु झाली असून इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना २८ जुलैपासून नोंदणी करता येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी नुकतीच दिली आहे.

📄 सीईटी नोंदणीबाबत डॉ. भोसले यांनी सविस्तर पत्रक प्रसिद्ध करुन माहिती दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना http://cet.11thadmission.org.in या वेबसाईटहून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना २ ऑगस्टपर्यत सीईटीसाठी नोंदणी करता येणार आहे.

👎 अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तयार केलेली वेबसाईट तांत्रिक त्रुटी असल्याने नोंदणी बंद करावी लागली होती.

आता अकरावी सीईटीच्या नोंदणीसाठी नवी वेबसाईट तयार करून ती कार्यान्वित केली आहे. जुन्या वेबसाईटहून सीईटीसाठी साधारण एक लाख ४६ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.

💁‍♂️ या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज नोंदणी करण्याची गरज नाही. मात्र, अर्ज पूर्ण न करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

👉 अशी करा नोंदणी :
अकरावीच्या प्रवेशाच्या हेतूने विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षेचे आयोजन केले आहे. मात्र ती ऐच्छिक परीक्षा असणार आहे. सीईटी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी पुढील पायऱ्यांचा वापर करा.

- महाराष्ट्र FYJC CET २०२१ ची अधिकृत वेबसाईट cet-mh-ssc.ac.in वर जा.
- ड्रॉप डाउन मेनूमध्ये आपला बोर्ड निवडा
- नोंदणीसाठी नाव, संपर्क क्रमांक, जन्म तारीख, पत्ता आणि शिक्षणाचे माध्यम यासारख्या आवश्यक सर्व माहिती भरा.
- त्यानंतर जिल्हा व तालुका निवडून परीक्षा केंद्राचा तपशील निवडा.
- फोटो, स्वाक्षरी, आयडी प्रूफ आणि काही दिव्यांग असल्यास त्याचे सर्टिफिकेट अपलोड करा.
- इतर सर्व औपचारिकता पूर्ण करा आणि सबमिटवर क्लिक करा.
- खात्रीसाठी महाराष्ट्र एफवायजेसी सीईटी २०२१ च्या अर्जाची एक प्रिंटआउट घ्या.

To know more click here
https://letsup.app.link/1b378M9Pfib
आज दिवसभरातील 10 महत्वाच्या घडामोडी

LetsUpp | Bulletin

✂️ शालेय शिक्षण विभागाच्या 15 टक्के फी कपातीला मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी; राज्य सरकार लवकरच अध्यादेश काढणार

📚 दहावीच्या परिक्षेनंतर आता अकरावीची सीईटीही वादाच्या भोवऱ्यात, राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश

🌧️ अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आता महाडमध्ये एनडीआरएफचा बेस कॅम्प उभारणार; कोकणातील भविष्यातील धोका लक्षात घेता राज्य सरकारचा निर्णय

📍 अनिल देशमुख प्रकरणी सीबीआयची 12 ठिकाणी छापेमारी; पोलीस अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे; पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील घराची तपासणी

🔗 मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी मुंबई पोलिसांकडून SITची नेमणूक

💰 नाशिक- करन्सी नोट प्रेस मधील गहाळ नोटांचा लागला छडा; प्रेस व्यवस्थापनाकडून सुपरवायझरवर करावाई

💵 बँक बंद पडली तर खातेधारकांना 90 दिवसात मिळणार पैसे, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ठेवीदारांला पाच लाख रुपये दिले जाणार

📱 संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गदारोळ सलग दहाव्या दिवशीही कायम; पेगासिस मुद्द्यावरुन विरोधकांची एकजूट

🚑 उत्तर प्रदेशात भीषण अपघात! बसमध्ये 135 प्रवासी झोपेत असताना काळाचा घाला; 18 लोकांचा दुर्घटनेत मृत्यू, देशाला हादरवणारी घटना

🥇 टोकियो ऑलिंपिक 2020 मध्ये पीव्ही सिंधूची प्री-क्वॉर्टर फायनल्समध्ये धडक, तर बॉक्सिंगमध्ये पूजा राणीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

To know more click here
https://letsup.app.link/lfHHUbQhgib
जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

LetsUpp | Pune

👨🏻‍💻 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पद्धतीच्या ऑनलाईन शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेने इन्फोसिस कंपनीच्या सहकार्याने नवे ई-लर्निंग ॲप विकसित केले आहे.

💁‍♂️ दरम्यान त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना घरबसल्या परीक्षा देणे शक्य होणार आहे. या ॲपचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या आठवडाभरात ते कार्यान्वित होणार आहे.

👨‍💼 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांबाबतच्या संशोधनांचा अभ्यास करून स्वतः या ॲपची रचना केली आहे.

👍 या ॲपमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारने वर्गनिहाय उपलब्ध करून दिलेला आणि जिल्हा परिषदेने तयार केलेला अभ्यासक्रम ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.

📍 कोरोना काळात शिक्षणापासून दुरावण्याची शक्यता असलेल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

To know more click here
https://letsup.app.link/4VBSNdGbhib
💥 गोल्डमॅन दत्ता फुगेच्या मुलाला खून प्रकरणी अटक!

LetsUpp | Pune

⚡ पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. गोल्डमॅन दत्ता फुगेचा मुलगा शुभम फुगे याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी खून केल्याप्रकरणी अटक केली आहे.

🧐 शुभमने कानशिलात मारल्याचा रागातून एकाची हत्या केली आहे. भोसरी परिसरात ही घटना घडली आहे. तीन तरुणांनी मिळूनच आपल्याच मित्राचा खून केला आहे. या घटनेने पिंपरी चिंचवडसह पुणे शहर हादरले आहे.

🥂 शुभम फुगे आणि अमन सुरेश डांगळे हे दोघे जण दारु पित बसले होते. दारु पिताना या दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाला.

👀 या वादात अमनने शुभमच्या कानशिलात लगावली. याचाच राग शुभमला अनावर झाल्याने याच रागात इतर दोन मित्रांच्या साथीने अमनची हत्या केली.

👮🏻 सुरुवातीला वेगळे कारण पुढे आले होते. दोन दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास अमनचा मृतदेह भोसरी गावठाण परिसरात आढळल्यानंतर पोलिसांनी या हत्येचा तपास सुरू केला.

🧐 भोसरी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली, तेव्हा पाठीमागे शस्त्राचे वार होते. अमनचा मोबाईल तपासला तेव्हा मध्यरात्री दोन वाजता पत्नी आणि लातूरहून आणखी एकाचा फोन आला होता.

📍 पोलिसांनी त्या दिशेनं तपास सुरु केला. मात्र तपासा दरम्यान शुभमच्या नावाचा देखील उल्लेख झाला. त्यानंतर पोलिसांनी शुभमसह त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.

To know more click here
https://letsup.app.link/w7mSHCTihib
अकरावी प्रवेश ! न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकार पेचात

LetsUpp | Trending

⚡ अकरावी प्रवेश परीक्षेत राज्य मंडळाबरोबरच अन्य शिक्षण मंडळांच्या अभ्यासक्रमाशी सुसंगत प्रश्नांचाही समावेश करण्याबाबत विचार करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला दिले.

🤦🏻‍♂️ न्यायालयाच्या या निर्णयामुळे अकरावी प्रवेशाचा गुंत्यात आणखी भर पडल्याचे दिसून आले आहे..

📣 अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर केल्यामुळे राज्यातील अकरावीच्या प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले.

🏛️ मात्र, अद्यापही प्रवेशाचा घोळ संपलेला नाही. राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा घेण्याच्या राज्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

📚 या याचिकेवरील सुनावणीदरम्यान प्रश्नपत्रिकेत इतर मंडळांच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश करण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले.

📝 अन्य मंडळांचे विद्यार्थीही या परीक्षेसाठी नोंदणी करू शकतात. तसेच परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असून वैकल्पिक प्रश्नांचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात येईल, असा दावा राज्य शासनाने के ला.

💁🏻‍♂️ मात्र, आयसीएसई किंवा सीबीएससीचे विद्यार्थी त्यांच्यासाठी पर्यायी विषय असलेल्या विषयांवर आधारित या बहुवैकल्पिक प्रश्नांची उत्तरे कशी देऊ शकतील? असा प्रश्न न्यायमूर्ती रमेश धानुका आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने उपस्थित केला.

👍 या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवता येणार नाही. त्यामुळे प्रश्नपत्रिकेत इतर मंडळांच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश करावा. त्यासाठी अन्य मंडळातील सदस्यांची समिती नेमण्यात यावी, असे न्यायालयाने सांगितले.

🧑🏻‍🦱 तसेच दहावीला निवडलेल्या विषयांशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्याचा पर्याय या विद्यार्थ्यांना उपलब्ध करता येऊ शकेल, असेही न्यायालयाने सूचवले.

✍🏻 ही परीक्षा ऐच्छिक असली तरी अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही विभागाने स्पष्ट के ले आहे.

🗓️ याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी न्यायालयाने राज्य सरकारला 4 ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे.

To know more click here
https://letsup.app.link/o1J0EY2qhib