LetsUpp Marathi
4.87K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
विजय मल्ल्याला लंडन कोर्टाने केले दिवाळखोर घोषित

LetsUpp | Trending

⚡ देशाचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवणाऱ्या विजय मल्ल्याला लंडन हायकोर्टाने दिवाळखोर म्हणून घोषित केले.

💰 कोर्टाच्या या निकालामुळे आता त्याची संपत्ती जप्त करण्याचेही मार्ग खुले झाले आहेत.

✈️ विजय मल्ल्या याच्या किंगफिशर एअरलाइन्सला दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी त्याला दिवाळखोर घोषित करण्यात यावं, अशी मागणी बँकांच्या संघटनेने कोर्टात याचिकेतून केली होती.

🏛️ भारतीय बँकांच्या या याचिकेवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. लंडनच्या हायकोर्टाने आपला निर्णय देत विजय मल्ल्याला दिवाळखोर घोषित केलं.

📍लंडनच्या उच्च न्यायालयाचा निकाल आलेला असला तरी देखील या निर्णयाविरोधात मल्ल्या एक अपील करू शकतो.

To know more click here
https://letsup.app.link/RyCsdDeRdib
भारतीय हॉकी संघाने स्पेनला 3-0 ने हरवले

LetsUpp | Sports

🏑 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या हॉकी संघाने स्पेनचा 3-0 ने पराभव करत पहिल्या विजयाची नोंद केली आहे.

🤩 सिमरनजीत सिंह आणि रुपिंदर पाल सिंहने केलेल्या गोल्समुळे भारताने विजय मिळवला आहे.

🇮🇳 या दणदणीत विजयामुळे भारत संघ अ गटात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

💁🏻‍♂️ भारताकडून रुपिंदर पाल सिंगने 2 गोल केले तर सिमरनजीतने एक गोल वसूल केला.

👍 दरम्यान रुपिंदर पाल सिंगने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत 3 गोल पूर्ण केले आहेत.

To know more click here
https://letsup.app.link/TDJShDcTdib
राज्यातील पावसाबाबत हवामान विभागाची महत्वपूर्ण माहिती

LetsUpp | Trending

🌧️ राज्यात मागच्या आठवड्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे.

🚨 तर आगामी काही दिवस राज्यातील पावसाबाबत हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे.

📍रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्यासह अनेक जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे संकट ओढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

🗓️ हवामान विभागाने 30 जुलैपर्यंतची पावसाची शक्यता वर्तवली आहे. यात पालघर, ठाणे सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.

🟠 तर महिन्याच्या शेवटच्या दिवशी रायगड, रत्नागिरी पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज असून, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

To know more click here
https://letsup.app.link/r4tgbeQYdib
सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी निकालासंदर्भातील महत्त्वाची बातमी

Letsupp | Trending

● राज्य माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या निकालानंतर आता सीबीएसईतर्फे दहावी आणि बारावीचा निकाल टॅब्युलेशन पॉलिसीनुसार तयार करण्यात आला आहे. आता बोर्डातर्फे लवकरच कोणत्याही दिवशी निकालाची तारीख जाहीर केली जाऊ शकते. विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर जाऊन निकाल पाहू शकतात.

● डिजिलॉकरच्या माध्यमातून देखील निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टीकलच्या परीक्षांवेळी देण्यात आलेल्या रोल नंबरच्या माध्यमातून हे निकाल पाहता येऊ शकतात. तसेच डिजिलॉकरवर विद्यार्थ्यांना आपली गुणपत्रिका पाहता येणार आहे.

● बोर्डातर्फे शाळांना २२ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांच्या गुणांचा रेकॉर्ड भरण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर ही तारीख वाढवून २५ जुलै करण्यात आली. कोणत्याही शाळेने फॉर्मुलेशननुसार गुण अपलोड केले नसतील तर त्यांना संधी मिळावी यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली.

● बोर्डातर्फे तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी हेल्प डेस्कची स्थापना करण्यात आली. शाळांना कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास ते हेल्प डेस्कच्या मदतीने गुण अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण करु शकतील यासाठी हेल्प डेस्क सुरु करण्यात आला.

To know more click here
https://letsup.app.link/M8NlzNoieib
आसाम मिझोराम सीमेवरील चकमकीत पुण्याचे वैभव निंबाळकर जखमी, अभिनेत्री उर्मिला निंबाळकरचे आहेत भाऊ

LetsUpp | Trending

⚡ ईशान्येकडील आसाम आणि मिझोरम या राज्यांमधील सीमासंघर्ष अधिकच चिघळला आहे. आसामच्या सीमेवरील कचार जिल्ह्यात उडालेल्या चकमकीत आसाम पोलीस दलातील सहा पोलीस हुतात्मा झाले आहेत.

👮🏻 यामध्ये अनेक पोलीस शिपाई आणि मूळचे महाराष्ट्रातील असलेले अधिकारी वैभव निंबाळकर हेदेखील यामध्ये जखमी झाले आहेत. निंबाळकर यांच्या पायाला गोळी लागली आहे. वैभव निंबाळकर हे अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिचे भाऊ आहेत.

💁‍♀️ उर्मिलाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन वैभव निंबाळकर यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. माझा भाऊ, आयपीएस वैभव निंबाळकर कर्तव्यावर गोळीबार आणि दगडफेकीत जखमी झाला आहे. त्यांची प्रकृती स्थीर असून तो सध्या आयसीयूत आहे.

👨🏻‍⚕️ निंबाळकर यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती उर्मिलानं तिच्या पोस्टमधून दिली आहे. तसंच विचारपूस केल्याबद्दल हितचिंतकांचे तिने आभारही मानले आहेत.

To know more click here
https://letsup.app.link/F6BsTbgoeib
भारतीय संघाला मोठा धक्का! संघातील 'हा' खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

Letsupp | Trending

● भारताचा मर्यादीत षटकांचा संघ श्रीलंका दौऱ्यावर असून सध्या टी२० मालिका सुरु आहे. यामालिकेतील दुसरा सामना आज (२७ जुलै) होणार होता. मात्र आता हा सामना रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

● भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे दुसरा टी२० सामना स्थिगत करण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे.

● त्यामुळे आता अन्य सर्व खळाडूंचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यास श्रीलंका विरुद्ध भारत संघातील दुसरा टी२० सामना बुधवारी (२८ जुलै) होईल. अशी माहिती समोर आली आहे.

To know more click here
https://letsup.app.link/o4gzcX5peib
लहान मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची दिलासादायक माहिती

LetsUpp | Trending

💉 लहान मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी दिलासा देणारी बातमी दिली आहे.

💁‍♂️ ऑगस्ट महिन्यात लहान मुलांसाठीची लस भारतात येईल, अशी माहिती त्यांनी भाजपा संसदीय दलाच्या बैठकीत दिली आहे.

🗣️ “सरकार पुढच्या महिन्यापासून लहान मुलांचे लसीकरण सुरु करणार आहे. तसेच भारत जगातील सर्वाधिक लस उत्पादन करणारा देश होत आहे.

👍 अनेक कंपन्यांना लस उत्पादनाचा परवाना देण्यात येत असल्याचेही केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले.

📍 सध्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीची २ वर्षांवरील मुलांवर चाचणी सुरु आहे. ही चाचणी अंतिम टप्प्यात असून त्याबाबत निकाल पुढच्या महिन्यात येणार आहे.

To know more click here
https://letsup.app.link/Yyls0O7peib
अकरावी सीईटीच्या परीक्षेसाठी अशी करा नोंदणी!

LetsUpp l Trending

👨🏻‍💻 अकरावी सीईटीच्या नोंदणीसाठी नवी वेबसाईट तयार झाली असून, या वेबसाईटवर राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची २६ जुलैपासून नोंदणी सुरु झाली असून इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना २८ जुलैपासून नोंदणी करता येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी नुकतीच दिली आहे.

📄 सीईटी नोंदणीबाबत डॉ. भोसले यांनी सविस्तर पत्रक प्रसिद्ध करुन माहिती दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना http://cet.11thadmission.org.in या वेबसाईटहून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना २ ऑगस्टपर्यत सीईटीसाठी नोंदणी करता येणार आहे.

👎 अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तयार केलेली वेबसाईट तांत्रिक त्रुटी असल्याने नोंदणी बंद करावी लागली होती.

आता अकरावी सीईटीच्या नोंदणीसाठी नवी वेबसाईट तयार करून ती कार्यान्वित केली आहे. जुन्या वेबसाईटहून सीईटीसाठी साधारण एक लाख ४६ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.

💁‍♂️ या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज नोंदणी करण्याची गरज नाही. मात्र, अर्ज पूर्ण न करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

👉 अशी करा नोंदणी :
अकरावीच्या प्रवेशाच्या हेतूने विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षेचे आयोजन केले आहे. मात्र ती ऐच्छिक परीक्षा असणार आहे. सीईटी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी पुढील पायऱ्यांचा वापर करा.

- महाराष्ट्र FYJC CET २०२१ ची अधिकृत वेबसाईट cet-mh-ssc.ac.in वर जा.
- ड्रॉप डाउन मेनूमध्ये आपला बोर्ड निवडा
- नोंदणीसाठी नाव, संपर्क क्रमांक, जन्म तारीख, पत्ता आणि शिक्षणाचे माध्यम यासारख्या आवश्यक सर्व माहिती भरा.
- त्यानंतर जिल्हा व तालुका निवडून परीक्षा केंद्राचा तपशील निवडा.
- फोटो, स्वाक्षरी, आयडी प्रूफ आणि काही दिव्यांग असल्यास त्याचे सर्टिफिकेट अपलोड करा.
- इतर सर्व औपचारिकता पूर्ण करा आणि सबमिटवर क्लिक करा.
- खात्रीसाठी महाराष्ट्र एफवायजेसी सीईटी २०२१ च्या अर्जाची एक प्रिंटआउट घ्या.

To know more click here
https://letsup.app.link/1b378M9Pfib
आज दिवसभरातील 10 महत्वाच्या घडामोडी

LetsUpp | Bulletin

✂️ शालेय शिक्षण विभागाच्या 15 टक्के फी कपातीला मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी; राज्य सरकार लवकरच अध्यादेश काढणार

📚 दहावीच्या परिक्षेनंतर आता अकरावीची सीईटीही वादाच्या भोवऱ्यात, राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश

🌧️ अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आता महाडमध्ये एनडीआरएफचा बेस कॅम्प उभारणार; कोकणातील भविष्यातील धोका लक्षात घेता राज्य सरकारचा निर्णय

📍 अनिल देशमुख प्रकरणी सीबीआयची 12 ठिकाणी छापेमारी; पोलीस अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे; पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील घराची तपासणी

🔗 मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी मुंबई पोलिसांकडून SITची नेमणूक

💰 नाशिक- करन्सी नोट प्रेस मधील गहाळ नोटांचा लागला छडा; प्रेस व्यवस्थापनाकडून सुपरवायझरवर करावाई

💵 बँक बंद पडली तर खातेधारकांना 90 दिवसात मिळणार पैसे, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ठेवीदारांला पाच लाख रुपये दिले जाणार

📱 संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गदारोळ सलग दहाव्या दिवशीही कायम; पेगासिस मुद्द्यावरुन विरोधकांची एकजूट

🚑 उत्तर प्रदेशात भीषण अपघात! बसमध्ये 135 प्रवासी झोपेत असताना काळाचा घाला; 18 लोकांचा दुर्घटनेत मृत्यू, देशाला हादरवणारी घटना

🥇 टोकियो ऑलिंपिक 2020 मध्ये पीव्ही सिंधूची प्री-क्वॉर्टर फायनल्समध्ये धडक, तर बॉक्सिंगमध्ये पूजा राणीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

To know more click here
https://letsup.app.link/lfHHUbQhgib