LetsUpp Marathi
4.87K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
महावितरणच्या कर्मचाऱ्याने पाण्यातून पोहत येत डिपी केली सुरक्षित

LetsUpp | Ratnagiri

● संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे पुराच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर मात्र वीज प्रवाह सुरक्षेसाठी बंद करावा लागला. दिवसभर महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील होते.

● गुरुवारी सायंकाळी वाशी फिडरचा वीज प्रवाह सुरु करायचा होता. मात्र लोवले येथील महावितरणची डिपी पूर्णतः पाण्याखाली असल्याने वाशी फिडर सुरु करणे शक्य नव्हते. संगमेश्वर येथील सब स्टेशन मधून लाईनमन अक्षय घाटकर यांच्याजवळ संपर्क साधण्यात आला.

● त्यांनी लोवले येथील डिपी मध्ये असणारे फ्यूज काढण्यासाठी बुरंबी येथून चार ठिकाणी भरलेल्या सहा फूट पाण्यातून पोहत येत लोवले येथील महावितरणची डिपी सुरक्षित केली. घाटकर यांना विक्रांत भोसले आणि अंकेश गेल्ये यांचे सहकार्य लाभले.

● लोवले येथील फ्यूज काढल्यानंतर वाशी फिडरचा वीज प्रवाह सायंकाळी ५ : ३० वा . सुरु करण्यात आला. यामुळे पूरस्थिती पूर्णत : संपुष्टात आलेली नसतांनाही वाशी फिडरवर असणाऱ्या अनेक गावांचा वीज प्रवाह सुरळीत होवू शकला.

● एवढेच नव्हे तर सायंकाळी ६ वा . नंतर अक्षय घाटकर , विक्रांत भोसले आणि अंकेश गेल्ये पुराच्या पाण्यातून वाट काढत संगमेश्वर येथे मदतीसाठी रवाना झाले.

● अक्षरश : आपला जीव धोक्यात घालून लाईनमन अक्षय घाटकर आणि त्याला सहकार्य करणारे सहकारी विक्रांत भोसले, अंकेश गेल्ये यांना, त्यांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल नागरिकांनी धन्यवाद दिले आहेत.

To know more click here
https://letsup.app.link/Uo88TFVG7hb
'या' घडीच्या 10 महत्वाच्या बातम्या

LetsUpp | Bulletin

▪️ रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्यात पावसाने थैमान सुरुच; नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ

▪️ कोल्हापुरात हाहाकार; पूरस्थितीमुळे ७,६७१ कुटुंबातील ३६ हजाराहून अधिक व्यक्तींचे स्थलांतर

▪️ गंगापूरचा पाणीसाठा ५० टक्क्यांवर, दारणा धरणात ७५% पाणी, नाशिककरांची पाण्याची चिंता तूर्तास मिटली

---------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ७७९८६५५६५५
----------------------

▪️ राज्यात पावसामुळे आतापर्यंत १२९ मृत्यू; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती; कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा हाहा:कार सुरु

▪️ इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ, अंनिस पाठोपाठ सरकारी पक्षाच्या वतीनं उच्च न्यायालयात याचिका

▪️ आयसीएसई दहावी आणि आयएससी बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार, दुपारी ३ वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल

▪️ मुंबईतील बनावट लस घेतलेल्यांचं आजपासून लसीकरण, कांदिवलीतील ३९० जणांना दिली जाणार लस

▪️ मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर खंडणी मागितल्याचा दुसरा गुन्हा ठाण्यात दाखल

▪️ महाराष्ट्राच्या स्थितीवर केंद्राचे सातत्याने लक्ष, देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहराज्यमंत्री, मुख्यमंत्र्यांशी चर्चा

▪️ टीम इंडियाचा श्रीलंकेकडून ३ विकेट्ने पराभव, भारताने २-१ ने मालिका जिंकली

To know more click here
https://letsup.app.link/4C7SjWMM8hb
'या' घडीच्या 10 महत्वाच्या बातम्या

LetsUpp | Bulletin

▪️ रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्यात पावसाने थैमान सुरुच; नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ

▪️ कोल्हापुरात हाहाकार; पूरस्थितीमुळे ७,६७१ कुटुंबातील ३६ हजाराहून अधिक व्यक्तींचे स्थलांतर

▪️ गंगापूरचा पाणीसाठा ५० टक्क्यांवर, दारणा धरणात ७५% पाणी, नाशिककरांची पाण्याची चिंता तूर्तास मिटली

---------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ७७९८६५५६५५
----------------------

▪️ राज्यात पावसामुळे आतापर्यंत १२९ मृत्यू; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती; कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा हाहा:कार सुरु

▪️ इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ, अंनिस पाठोपाठ सरकारी पक्षाच्या वतीनं उच्च न्यायालयात याचिका

▪️ आयसीएसई दहावी आणि आयएससी बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार, दुपारी ३ वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल

▪️ मुंबईतील बनावट लस घेतलेल्यांचं आजपासून लसीकरण, कांदिवलीतील ३९० जणांना दिली जाणार लस

▪️ मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर खंडणी मागितल्याचा दुसरा गुन्हा ठाण्यात दाखल

▪️ महाराष्ट्राच्या स्थितीवर केंद्राचे सातत्याने लक्ष, देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहराज्यमंत्री, मुख्यमंत्र्यांशी चर्चा

▪️ टीम इंडियाचा श्रीलंकेकडून ३ विकेट्ने पराभव, भारताने २-१ ने मालिका जिंकली

To know more click here
https://letsup.app.link/4C7SjWMM8hb
विप्रो या जगप्रसिद्ध कंपनीचे चेअरमन अझीम प्रेमजी यांचा आज जन्म दिवस

LetsUpp | Special

👨‍👩‍👦 अझीम प्रेमजी यांचा जन्म मुंबई मधील एका भारतीय मुस्लिम कुटुंबामध्ये झाला. त्यांचे वडील हे एक नावाजलेले उद्योगपती होते व राईस किंग ऑफ बर्मा म्हणून ओळखले जात होते. अझीम प्रेमजी भारतातील दहा अतिश्रीमंत लोकांमध्ये येतात. २०१३ मध्ये त्यांनी द गिविंग प्लेज साइन करून त्यांची अर्धी संपत्ती दान करण्याचे ठरवले आहे. जाणून घेऊया त्यांच्याविषयी सविस्तर...

👨‍💻 त्यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठामधून इलेकट्रीकल इंजिनीयरींग या विषयामधून पदवी घेतली आहे. त्यांनी यास्मिन यांच्याशी विवाह केला.अझीम प्रेमजी यांनी 'अझीम प्रेमजी फौंडेशन'ची स्थापना केली आहे. हे फौंडेशन भारतातील शिक्षण क्षेत्रासाठी काम करते.

👉 महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या ठिकाणी मुहंमद हाशिम प्रेमजी यांनी १९४५ साली वेस्टर्न इंडियन वेजिटेबल प्रोडक्ट्स लि. सुरु केली. १९६६ साली वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून अझीम प्रेमजी स्टॅनफर्ड विद्यापीठामधून भारतात परतले व त्यांनी विप्रो कंपनीचा चार्ज घेतला. यावेळी ते २१ वर्षांचे होते.

🖥️ १९८० च्या दशकात माहिती तंत्रज्ञानाची महत्व ओळखून या तरुण उद्योगपतीने उच्च तंत्रज्ञानाच्या निर्मितीस सुरवात केली. सेंटीने या अमेरिकन कंपनीच्या सहकार्याने त्यांनी मिनी कॉम्प्युटरचे उत्पादन घेण्यास सुरवात केली. याच काळात त्यांनी आपल्या कंपनीचे 'विप्रो' असे नामकरण केले. त्यांनी आपले सगळे लक्ष माहिती तंत्रज्ञानाकडे वळवले.

👑 टाईम नियतकालिकाने दोनदा त्यांचा जगातील १०० सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान देऊन गौरव केला. २००५ साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. तसेच २०११ साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

🏭 अझीम प्रेमाजीनी स्थापन केलेल्या कंपन्या

● विप्रो लायटिंग व विप्रो जीई मेडिकल सिस्टिम्स, १९९१
● विप्रो नेट, १९९९
● नेटक्रेकर, २०००
● विप्रो वॉटर, २००८
● विप्रो इकोएनर्जी, २००९

सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप
https://letsup.app.link/2xU5C0fV8hb
सरकारी कार्यालयात मोबाईल वापराला नियमावली, काय आहेत नियम?

LetsUpp | National

💁‍♂️ शासकीय कार्यालयात ड्रेस कोड कसा असावा याचे नियम जारी केल्यानंतर आता मोबाईलचा वापर कसा करायचा या संदर्भात राज्य सरकारने परिपत्रक काढून नियम जारी केले आहेत.

👍 शासकीय कार्यालयात मोबाईल वापरताना अपेक्षित शिष्टाचार पाळण्यात येत नाही. अशा प्रकारच्या वर्तणुकीमुळे शासनाची प्रतिमा मलिन होत असल्याचं सांगत परिपत्रक काढण्यात आलं आहे.

मोबाईल वापरण्याच्या संदर्भात काय आहे नियम-

📞 कार्यालयीन कामासाठी कार्यालयात असलेला दूरध्वनीचा (लँडलाईन) वापर करावा

📱 मोबाईल वरती बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा आणि आपल्या बाजूला इतरही उपस्थित आहे याचाही विचार करावा

🗣️ मोबाईल वरती बोलताना संविधानिक भाषेचा वापर करावा

💁‍♂️ मोबाईल वरती बोलत असताना लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कॉल्सला तात्काळ उत्तर द्यावा

👉 अत्यावश्यक वैयक्तिक मोबाईल कक्षाच्या बाहेर जाऊन घ्यावेत

📍 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत मोबाईल सायलंट मोड वरती ठेवण्यात यावा

📌 कार्यालयीन कामासाठी दौऱ्यावरती असाल तर मोबाईल बंद ठेवू नये

To know more click here
https://letsup.app.link/ra3vEk428hb
आयसीएसई दहावी, बारावीचा निकाल आज; कसा पाहाल, जाणून घ्या

LetsUpp | Trending

● इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा निकाल आज (२४ जुलै) जाहीर होणार आहे.

● निकाल दुपारी तीनला ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार असल्याची माहिती ‘आयसीएसई’तर्फे देण्यात आली. एसएसई बोर्ड आणि सीबीएसईप्रमाणे आयसीएसई बोर्डाच्या परीक्षाही यंदा करोनामुळे रद्द करण्यात आल्या होत्या.

त्यामुळे विशिष्ट सूत्र आणि वर्षभरातील विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन या आधारे गुण दिले जाणार आहेत.

👉 कुठे पाहाल निकाल?

● निकाल बोर्डाच्या www.cisce.org किंवा www.results.cisce.org या वेबसाइटवर पाहता येईल. मेसेजच्या माध्यमातूनही निकालाची माहिती मिळेल. दहावीसाठी मेसेजमध्ये ICSE असे लिहून त्यापुढे आपला सात अंकी युनिक आयडी टाइप करायचा आहे, तर बारावीसाठी मेसेजमध्ये ISC असे लिहून त्यापुढे सात अंकी युनिक आयडी टाइप करून ०९२४८०८२८८३ या क्रमांकावर पाठवल्यास निकालाची माहिती मिळेल.

💫 स्टेप बाय स्टेप कसा पाहाल निकाल

- काउन्सिलच्या www.cisce.org किंवा www.results.cisce.org या संकेतस्थळावर जा
- होमपेजवर 'Results 2021' या लिंकवर क्लिक करा.
- आता दहावी किंवा बारावी यापैकी पर्याय निवडा
- आता विद्यार्थ्यांनी त्यांचा युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि कॅपचा आदी माहिती भरून लॉगइन करावे.

To know more click here
https://letsup.app.link/6lfdKo818hb