LetsUpp Marathi
4.87K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
👌 पुणेकरांची चांदी, चक्क एका रुपयात 1 लिटर पेट्रोल, ग्राहकांची झुंबड!

LetsUpp l Trending

● राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून नगण्य दरात पेट्रोल वाटप केले जात आहे. त्यामुळे पुणेकरांची चांगलीच चांदी झाली आहे.

● पुण्यातल्या धानोरीत अवघ्या एका रुपयात 1 लीटर पेट्रोल दिले जात आहे. सध्या मुंबई, पुण्यासह राज्यातील बहुतांश शहरात पेट्रोलचा (Petrol) प्रतिलीटर दर 107 रुपयांच्या पलीकडे गेला आहे. त्यामुळे हे स्वस्त पेट्रोल घेण्यासाठी पेट्रोल पंपाबाहेर दुचाकीच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळाल्या

● पेट्रोल दरवाढीसाठी केंद्र सरकार कसं जबाबदार आहे, हे वारंवार अजित पवार यांनी दाखवून दिलंय, तशी टीका ते वारंवार करत असतात. राष्ट्रवादीने महागाई विरोधात अनेक वेळा आंदोलनही केलं आहे.

● आज अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक रुपये दराने एक लिटर पेट्रोल देऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एक प्रकारे चपराक देण्याचा प्रयत्न केला आहे. हा उपक्रम जाणता राजा प्रतिष्ठान आणि शशिंकात टिंगरे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला.

💁‍♂️ मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करा- अजित पवार

● देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप सुरु आहे. अनेक जवळची माणसं आपल्याला सोडून जात आहेत. अशावेळी थाटामाटात वाढदिवस साजरा करणं उचित नाही. त्यामुळे यंदा साधेपणाने वाढदिवस साजरा करत कार्यकर्ते, शुभचिंतकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचं आवाहन खुद्द अजित पवार यांनी केलंय.

To know more click here
https://letsup.app.link/iUlOwjJZ5hb
'या' घडीच्या 10 महत्वाच्या बातम्या

LetsUpp | Bulletin

▪️ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन; कोकणातील पूर परिस्थितीचा घेतला आढावा

▪️ रेंगडी गावातील पाच शेतकरी गेले वाहून; मेढा महाबळेश्वर रोडवरील रेंगडी येथील घटना; शेतातील काम करुन घरी परतताना ही घटना घडली

▪️ महाडमध्ये दरड कोसळून 30 घरे गाडली गेल्याची भीती; महाड तालुक्यातील बीरवाडी पासून14 किमी अतंरावर घडली घटना; 72 नागरिक बेपत्ता असण्याची भिती

---------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ७७९८६५५६५५
----------------------

▪️ तळकोकणात 25 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट, अत्यंत आवश्यक असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे : जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

▪️ रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 40 वर्षातला उच्चांकी पाऊस, जुलै महिन्यात सरासरीच्या183% पाऊस; चिपळूणची परिस्थिती बिकट

▪️ अकोला जिल्ह्यात एका दिवसात विक्रमी 202.9 मिलीमीटर पाऊस, ढगफुटीसदृष्य पावसाने संपूर्ण जिल्ह्यात पूर परिस्थिती

▪️ कृष्णा नदीची पाणीपातळी 25 फुटांवर, सांगली-कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस

▪️ कट्टरतावाद्यांचा विरोध झुगारत नाशिकमध्ये बहुचर्चित आंतरधर्मीय विवाह संपन्न, अंनिसचे पदाधिकारी मामाच्या भूमिकेत

▪️ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मूभा द्या, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता

▪️ राज्यात गुरुवारी 7302 कोरोना बाधित रुग्णांची नोंद, तर 7756 रुग्ण कोरोनामुक्त, तीन जिल्ह्यात एकही रुग्ण नाही

▪️ टोकियो ऑलिम्पिकचं आज उद्घाटन, 204 देशांच्या 11,238 खेळाडूंचा सहभाग; भारताचे 18 क्रीडा प्रकारांमध्ये 127 सदस्यांची टीम

To know more click here
https://letsup.app.link/m1BflyO76hb
टोकियो ऑलिम्पिकचे बिगुल आज वाजणार

LetsUpp | Trending

● कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नव्या नियमांसह आजपासून ऑलिम्पिक क्रीडा महोत्सवास सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकात 22 खेळाडू आणि 6 अधिकारी सहभागी होणार आहेत.

● भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी ही माहिती दिली आहे. कोरोना महामारीमुळे उद्घाटन सोहळ्यातील उपस्थितीला कात्री लावण्यात आली आहे.

आठ खेळांतील खेळाडूंची हजेरी

● ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकात एक हॉकीपटू, 8 बॉक्सर, 4 टेबल टेनिसपटू, 2 रोविंगपटू, 1 जिमनास्ट, एक जलतरणपटू, 4 नौकायनपटू आणि तलवारबाजीतील एकमेव खेळाडू यांचा समावेश असणार आहे.

● 6 अधिकारी या खेळाडूंसोबत ध्वजसंचलनात सहभागी होणार आहेत. म्हणजेच एकूण 28 जणांचे भारतीय पथक असणार आहे.

● तिरंदाजी, ज्युडो, बॅडमिंटन, भालाफेक, टेनिस, हॉकी व नेमबाजी या खेळांतील खेळाडू उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार नाहीत. कारण या खेळातील स्पर्धा 23 व 24 जुलैला होणार असल्याने खेळाडूंना तयारी किंवा विश्रांतीची गरज आहे.

● ऑलिम्पिक उद्घाटन सोहळा जपानमध्ये स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजता, तर भारतीय वेळेनुसार सायंकाळी 4ः30 वाजता सुरू होईल.

To know more click here
https://letsup.app.link/ZTBo8fxi7hb
मुंबईत गोवंडीमध्ये घर कोसळून तिघांचा मृत्यू

LetsUpp | Trending

● मुंबईत पुन्हा एकदा घर कोसळण्याची दुर्घटना घडली असून गोवंडी परिसरात घर कोसळून तीन जणांचा मृत्यू तर सात जण जखमी झाले आहेत.अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

● गोवंडीतील शिवाजीनगर भागात ही घटना घडली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.

● रेस्क्यू व्हॅन, रुग्णवाहिका, जेसीबी, डम्पर अशा सर्व गोष्टींसह बचावपथक दाखल झालं होतं.

● मृत्यमुखी पडलेल्यांपैकी नेहा परवेझ शेख (वय 35 वर्षे) आणि मोकर झबिर शेख (वय 80 वर्षे) अशी दोघांची नावं आहेत.

● जखमींना राजावाडी आणि सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

To know more click here
https://letsup.app.link/vtmc36rn7hb