LetsUpp Marathi
4.87K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
'या' घडीच्या १० महत्वाच्या बातम्या

LetsUpp l Bulletin

● ५ वी आणि ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऑगस्ट रोजी होणार; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

● बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

● राज्यभरात गर्भपाताच्या औषधांची बेकायदेशीर विक्री, एफडीएची धडक कारवाई, १४ गुन्हे दाखल, तर ११ जणांना अटक

---------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ७७९८६५५६५५
----------------------

● ग्रामपंचायतींची थकीत वीज बिलांची वसुली आणि वीज तोडणी थांबवा, तोडलेल्या जोडण्या पूर्ववत करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश

● महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, पेडणेकरांची प्रकृती उत्तम, डॉक्टरांची माहिती

● राज्यात मंगळवारी ६, ९१० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर ७ हजार ५१० रुग्ण कोरोनामुक्त; १४७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद; मृत्यूदर २.०४ टक्के

● छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला हलवलं ही अफवा, अदानी ग्रुपकडून स्पष्टीकरण

● महाविकासआघाडीचं सरकार पाच वर्ष टिकणार, सरकारमध्ये काही अंतर्गत वाद नाही : राहुल गांधींच्या भेटीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच वक्तव्य

● कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर करण्यासंदर्भात केंद्र सरकारची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव

● जम्मूत पोलीस कॉन्स्टेबलच्या पत्नी, मुलीवर दहशतवाद्यांचा हल्ला; गंभीर जखमी; जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेचा हात

● अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाचा श्रीलंकेविरुद्ध तीन विकेट्सने विजय, मालिकाही जिंकली; दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार ठरले विजयचे शिल्पकार

To know more click here
https://letsup.app.link/MEdUG9rO3hb
‘आयटीआय’ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

LetsUpp l Trending

⚡ राज्यातील ४१७ शासकीय आणि ५४९ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी (आयटीआय) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे.

👉 यंदा शासकीय आयटीआयमध्ये ९२ हजार, तर खासगी आयटीआयमध्ये ४४ हजार अशा एकूण १ लाख ३६ हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.

📝 राज्यातील आयटीआयमध्ये प्रवेशासाठी एकूण ९१ प्रकारचे व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यापैकी ८० अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण, तर ११ अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थी पात्र असतील.

🖥️ प्रवेश प्रक्रिया, नियमावली, आवश्यक कागदपत्रे, संस्थांची यादी, अभ्यासक्रम, प्रवेश पात्रता माहिती https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

💫 विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचे शुल्क भरण्यासाठी संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने कागदपत्र तपासणी, प्रवेश अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी प्रत्यक्ष संस्थेत जाण्याची गरज नाही.

📍 दरम्यान, दहावीचे गुण आणि प्रवेश नियमावलीनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करून प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

To know more click here
https://letsup.app.link/7jgLueRZ3hb
कोविड प्रोटोकॉलनुसार 'नवोदय' प्रवेश परीक्षा होणार; परीक्षेच्या तारखा जाहीर!

Letsupp | Trending

● नवोदय विद्यालय समिती, एनव्हीएसने JNVST २०२१ साठी ६ वीच्या प्रवेश परीक्षेच्या तारखांची नुकतीच घोषणा केलीय. जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा ११ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.

● सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात कोविड प्रोटोकॉलनुसार, प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असल्याचे एनव्हीएसने स्पष्ट केले. यामध्ये एकूण २,४१,७००९ उमेदवारांनी निवड चाचणीसाठी नोंदणी केली असून त्यापैकी ११, १८२ केंद्रांमध्ये ४७, ३२० उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

● याबाबत शिक्षण मंत्रालयाने एका ट्विटव्दारे ही माहिती दिलीय. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या जवाहर नवोदय विद्यालयातील सत्र २०२१-२२ च्या वर्ग-८ मधील प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा ११ ऑगस्ट रोजी घेतली जाणार आहे. दरम्यान, ही परीक्षा दोनदा पुढे ढकलण्यात आली होती.

To know more click here
https://letsup.app.link/Kd5oy90e4hb
जाणून घ्या, काय आहे? बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी देण्यामागील कारण...

Letsupp | Special

● मुस्लिम समुदायाचे लोक रमजान संपल्यावर किमान ७० दिवसांनंतर बकरी ईदचा सण साजरा करतात. याला ईद-उल-जुहा देखील म्हणतात. ईद-उल-फितर (मिठी ईद) नंतर मुस्लिम समुदायाच्या सर्वात मोठ्या सणांमध्ये एक आहे बकरी ईद.

● यामध्ये मुख्य प्रथा म्हणजे या दिवशी कुर्बानी दिली जाते. हि प्रथा इस्लाम धर्माचे प्रमुख पैगंबरांमध्ये हजरत इब्राहिम हे एक होते. यांच्यामुळेच कुर्बानी देण्याची परंपरा सुरू झाली. यामागे एक कथा देखील संगितली जाते. यामध्ये विशेषतः बकर्‍याची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. कुर्बानी दिल्यानंतर मांस समान तीन हिश्शांमध्ये गोरगरीब व अनाथ, आप्त व नातेवाईक आणि स्वत: व शेजारी यांना वाटप करावे लागते.

● कुर्बानीइतिहास सांगणारी कथा अशी कि, इस्लाम धर्माचे प्रमुख पैगंबर हजरत इब्राहिम म्हणजेच ज्यांनी हि कुबानींची परंपरा सुरु केली. यांच्या स्वप्नात येऊन पुत्र इस्माइल (प्रेषित) याचे बलिदान दे, अशी आज्ञा केली होती. त्यांना म्हातारपणी जाऊन अब्‍बा बनण्याचा आनंद मिळाला होता. पण अल्लाहच्या अज्ञापुढे ते आपला आनंद कुर्बान करण्यास तयार होते.

● परमेश्वरावरील असीम भक्ती व प्रेमासाठी त्यांनी आपल्या एकुलत्या एक व उतरत्या वयात झालेल्या पुत्रास परमेश्वरासाठी बळी देण्याचे ठरवले. मक्काच्या पर्वतराजीमध्ये एका मोठ्या शीळेवर पुत्राचा बळी देण्यासाठी त्यांनी पुत्राच्या गळ्यावर सुरी चालवली.

● मात्र परमश्रेष्ठ अल्लाह या भक्तीने स्तिमित व प्रसन्न झाले व पुत्राच्या ठिकाणी त्यांनी देवदूताकरवी एका बोकडास अवतरीत केले. याच प्रसंगास अनुसरून परमेश्वरभक्ती, परमेश्वर प्रेमापोटी बलिदानाचे एक प्रतीक म्हणून 'ईल-उल-जुहा' साजरी करण्याची प्रथा पडली. तर अशी आहे बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी देण्याची प्रथा!

सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप
https://letsup.app.link/RiyEURW53hb
जीवाची बाजी लावणाऱ्या 'या' वायरमॅनचं होतंय सर्वत्र कौतुक

LetsUpp l Positive News

💁‍♂️ मुंबईसह नवी मुंबई, ठाणे या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे शहापूर तालुक्यातील अटगाव फिडरची लाईट गेल्याने साधारण 35 गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता.

🔌 हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी एका वायरमॅनने जीवाची पर्वा न करता पाण्यात जाऊन पोलवरील तुटलेली हायटेन्शनची तार जोडली. त्यामुळे 35 गावांचा वीज पुरवठा पुन्हा एकदा सुरु झाला. श्रावण शेलवले असे या वायरमॅनचे नाव असून सध्या त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

30 ते 35 गाव पाड्यांचा वीजपुरवठा खंडित

💡 वीज दुरुस्त करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कानविंदे या गावालगत एक तलाव आहे. या तलावात वीजेचा पोल आहे. या पोलवर लाईटचा कंडक्टर तुटला आहे. त्यामुळे अटगाव फिडरवर चालू आलेल्या 30 ते 35 गाव पाड्यांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे, अशी माहिती श्रावण शेलवले यांना संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळाली.

भर पावसात पोहत जाऊन तार जोडणी

🪛 ही माहिती मिळाल्यानंतर श्रावण यांनी भर पावसात सुरक्षेसाठी कोणतेही साहित्य नसताना स्वत:च्या जीवाची पर्वा न करता थेट तलावात उडी मारली. जनतेची सेवा करण्यासाठी वायरमॅन श्रावण यांनी हातातले हँडग्लोव्हज आणि पक्कड या गोष्टी तोंडात पकडल्या.

🏊 त्यानंतर पुढे पाण्यात पोहत जाऊन पोलवर चढून तुटलेली तार जोडली. यामुळे 35 गावांचा खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत झाला. त्यावेळी त्यांच्यासोबत फोडसे नावाचे आणखी एक वायरमॅन उपस्थितीत होते.

🙏 श्रावण शेलवले आणि फोडसे या दोघांच्या या कामगिरीमुळे 35 गावांचा वीज पुरवठा पूर्ववत होण्यास मदत मिळाली आहे. या महावितरणच्या दोन्ही जनसेवकांचे शहापूर तालुक्यात कौतुक केले जात आहे.

आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पॉझिटिव्ह बातमी वाचा एका क्लिकवर
https://letsup.app.link/R0MxqVS13hb
'या' घडीच्या १० महत्वाच्या बातम्या

LetsUpp l Bulletin

● ११ वी CET परीक्षेचे ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा तांत्रिक कारणासाठी बंद; सुविधा पूर्ववत होताच, बोर्डाकडून अवगत करण्यात येणार

● रत्नागिरीच्या खेड शहरात पूरसदृश्य परिस्थिती; बाजारपेठ पाण्याखाली, जगबुडी नदीचे रौद्र रूप; खाडी पट्ट्यातील २० गावांचा संपर्क तुटला

● मुंबईत आजही लसीकरण बंद, उद्यापासून लसीकरण सुरळीत होण्याची शक्यता; पुरेशा लससाठ्या अभावी लसीकरण मोहीमेत अडथळे

---------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ७७९८६५५६५५
----------------------

● अहमदनगर महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदाच्या भाजपमधील रस्सीखेचीवर तोडगा काढणार; भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील शुक्रवारी नगर दौऱ्यावर

● जलयुक्त शिवार योजनेच्या कामांतील गैरव्यवहार आणि अनियमिततेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला

● आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील बंद करण्यात आलेली एसटीची प्रवासी वाहतूक आजपासून सुरू करण्यात येणार

● नाशिक जवळील वाडीवऱ्हे जवळ ट्रक आणि चारचाकी गाडीच्या भीषण अपघातात ३ जण जागीच ठार तर २ जण जखमी झाले

● सरकारने पेगाससचा वापर केला नाही असे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल करावे;काँग्रेस नेते कमलनाथ यांची मागणी

● बकरी ईद निमित्त पहिल्यांदाच भारत-पाक सैनिकांनी सीमेवर एकमेकांना दिली मिठाई; पुलवामा हल्ल्यानंतर बंद होती प्रथा

● सरकारच्या चुकीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ५० लाख जणांचा मृत्यू; काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

To know more click here
https://letsup.app.link/Ez7UcOus5hb
VID-20210722-WA0013.mp4
4.1 MB
नाशिक शहरात मुसळधार पाऊस

LetsUpp | Nashik

● नाशिक शहरात मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. यामुळे सराफ बाजार, दहीपूल परिसरातील अनेक दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने दुकानदारांची धावपळ उडाली आहे.

● यामध्ये सोने, कपडे व्यावसायिकांच्या दुकानांत पावसाचे पाणी घुसल्याने आर्थिक नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याच्या कामाचा दुकानदारांना फटका बसला आहे.

● दुसरीकडे शहरातील गटारी, नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने गोदावरी नदीला पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. छोट्या मोठ्या नाल्यांचे पाणी गोदावरी नदीच्या पात्रात मिसळत असल्याने दुतोंडया मारुतीच्या गुडघ्याला पाणी लागले आहे.

To know more click here
https://letsup.app.link/nTiDcNtx5hb
राज्यात अतिवृष्टीचा इशारा, हवामान खात्याकडून रेड अलर्ट

LetsUpp | Trending


☔ भारतीय हवामान खात्याने मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला आहे. आयएमडीने राज्यातील ५ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

🌨️ कोल्हापूर, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी येथे गुरुवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील जालना, बीड, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

💦 मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आज आणि उद्या हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर ठाणे पालघर आणि सिंधुदूर्गमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रायगड, कोल्हापूर, रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

To know more click here
https://letsup.app.link/Olk1N1aI5hb