LetsUpp Marathi
4.86K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
अहमदनगर महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा महापौर आणि उपमहापौर बिनविरोध

LetsUpp | Trending

● अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे व उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोन उमेदवारांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज भरले नाहीत. त्यामुळे बुधवारी (30 जून) या दोन्ही पदांसाठी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत शेंडगे व भोसले यांच्या नावाच्या अधिकृत घोषणेची औपचारिकता राहिली आहे.

● महापौरपदासाठी शिवसेना उमेदवार रोहिणी शेंडगे यांचा अर्ज सोमवारी (28 जून) दाखल झाला आहे. त्यानंतर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत करता मंगळवारी महाविकास आघाडीच्या वतीने उपमहापौर पदाकरता गणेश भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

● दरम्यान महापौर व उपमहापौर पदाकरता प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे महानगरपालिकेची निवडणूक बिनविरोध झाली. उद्या अधिकृत घोषणा केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेसचे 4 नगरसेवक उपस्थित होते. महानगरपालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदा महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

● यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे, आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष माणिक विधाते, विनीत पाऊलबुद्धे, संजय शेंडगे, संजय चोपडा, सुभाष लोंढे, दत्ता कावरे, नगरसेवक गणेश कवडे, कुमार वाकळे, निखिल वारे आदी उपस्थित होते.

To know more click here
https://letsup.app.link/mLjNXRGTthb
https://www.youtube.com/watch?v=B9vUOGB_sdo

आज दिवसभरातील 10 महत्वाच्या घडामोडी

LetsUpp | Bulletin

● 'वन नेशन, वन रेशनकार्ड' योजना देशातील सर्व राज्यांना ३१ जुलैपर्यंत लागू करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश; न्यायाधीश अशोक भूषण यांच्या खंडपीठाने दिला निकाल


● गणेश मंडळातील मूर्ती ४ फूटांची, तर घरातील बाप्पा २ फुटांचा! गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर, राज्य सरकारने लागू केलेले निर्बंध गणेशोत्सवातही कायम

● राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पाच आणि सहा जुलैला; अधिवेशनाला संपूर्ण दिवस उपस्थित राहण्यासाठी शिवसेनेचा सर्व आमदारांना व्हिप जारी

● अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे व उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची बिनविरोध निवड; अधिकृत घोषणा उद्या होणार

● ७२ वर्षांचा असल्याने मला कोरोना संक्रमणाचा धोका, माझ्या विनंतीचा विचार करावा; चौकशीस गैरहजर राहणाऱ्या अनिल देशमुखांचे ईडीला पत्र

● आधी शहराचं संपूर्ण लसीकरण करा मगच आषाढी वारी भरवा, पंढरपूर मधील नागरिकांची मागणी, तर आषाढी वारीसाठी पायी पालख्यांना परवानगी द्यावी याबाबत संत नामदेव संस्थानतर्फे सुप्रीम कोर्टात याचिका

● रत्नागिरीत ३ बालकांची कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटवर मात, देशातील १२ राज्यांमध्ये याच व्हेरिएंटमुळे सतर्कतेचा इशारा

● मुंबईतील बोगस लसीकरण प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. मनिष त्रिपाठींचं आत्मसमर्पण, कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यावर शरणागती

● अमेरिकेच्या मॉडर्ना लसीला भारतात परवानगी; आपत्कालीन वापरासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने आयातीसाठी दिली मंजुरी!

● टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे सामने संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये होणार; १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत होणार स्पर्धा; आयसीसीची घोषणा

To know more click here
https://letsup.app.link/MbFKpkBduhb
https://www.youtube.com/watch?v=I5pL30mCsYU भर पावसात वेगवान कारने ऑटोला जोरात धडक दिल्याने प्रवाशाचा मृत्यू
हैदराबादमध्ये २७ जून रोजी सायबरबादच्या इनॉर्बिट मॉलजवळ भर पावसात अति वेगवान लक्झरी कारने ऑटोला जोरदार धडक दिली. या घटनेत ऑटोमध्ये बसलेल्या एका प्रवाशाचा मृत्यू झाला.
https://www.youtube.com/watch?v=6gvNo0XdHiY मराठा, ओबीसी आरक्षणावर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते मराठा, ओबीसी आरक्षण तसेच सारथी संस्थेसाठी 1 हजार कोटी दिले गेले त्याबद्दल आपले परखड मत व्यक्त केले आहे.
रिपोर्टर - उमेश आवणकर
अभिनेत्री मंदिरा बेदी यांच्यावर दुःखाचा डोंगर

LetsUpp l Trending

● प्रख्यात अभिनेत्री मंदिरा बेदी यांच्या पतीचे निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

● मंदिरा यांचे पती राज कौशल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती कुटुंबियांकडून मिळाली आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

● राज कौशल यांनी अभिनेता म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ और ‘एंथनी कौन है’ या सिनेमांचं त्यांनी दिग्दर्शन केले आहे.

● राज कौशल यांच्या निधनाची बातमी समजताच बॉलिवूडमधून शोक व्यक्त केला जात आहे.

● २७ जूनला राज आणि मंदिरा यांनी त्यांच्या मित्र परिवारासोबत वेळ घालवत पार्टी एन्जॉय केली होती. त्यानंतर राज यांच्या निधानाची अचानक बातमी आल्याने सर्वानाच मोठा धक्का बसला आहे.

To know more click here
https://letsup.app.link/WBg0dsIcvhb
नगर महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा

LetsUpp l Ahmednagar

● अहमदनगर महानगरपालिकेत महाविकास आघाडीची सत्ता आली आहे.

● राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येत भाजपला सत्तेवरून खाली खेचले आहे. महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची निवड झाली आहे.

● महापालिकेमध्ये यापूर्वी भाजप-राष्ट्रवादी आणि बसपाची सत्ता होती. मात्र अधिक संख्याबळ बळ असतानाही शिवसेना सत्तेपासून दूर होती.

● पालिकेत महाविकास आघाडीची सत्ता येण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून सूत्र हालली आहेत, आज पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ऑनलाईन पद्धतीने ही निवडणूक घेतली आहे.

● दोघांच्या अर्ज छाननीनंतर त्यांनी महापौर पदासाठी एकच अर्ज असल्याने शेंडगे यांची तर उपमहापौर पदासाठी भोसले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांनाही बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

● आयुक्त शंकर गोरे, निवडणुकीचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, नगर विकास अधिकारी एस. बी. तडवी हे उपस्थित होते. कोरोना काळात महापौर आणि उपमहापौर यांनी चांगले काम करावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी भोसले यांनी व्यक्त केली.

To know more click here
https://letsup.app.link/qmFLioakvhb
https://www.youtube.com/watch?v=pz1NRBJm2BM अहमदनगर महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा अहमदनगर महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा
-अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांची तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत ही निवड झाली.
महागाईचा भडका ! या कारणामुळे फ्रीज, टीव्ही होणार महाग

LetsUpp | Trending

कोरोनामुळे देशातील देशातील आर्थिकचक्र बिघडले आहे. यातच लोकांना महागाईचा फटकाही सहन करावा लागत आहे.

अनेक कंपन्यांनी पुन्हा एकदा आपल्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, स्मार्ट फोन्स आदींच्या किंमतीत वाढ केली आहे. यावर्षी तब्बल तीन वेळा या वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली आहे.

नुकतेच मारुती सुझुकी, हिरो मोटर कॉर्प, इलेक्ट्रोनिक उत्पादन कंपन्या, सोनी, एलजी आणि गोदरेजनेही आपल्या वस्तुंच्या किंमती वाढवल्या होत्या.

याशिवाय, शाओमी, रिअलमी आणि व्हिवोनेही आपल्या वस्तूंच्या किंमती वाढविण्याची घोषणा केली होती. मात्र वस्तूंच्या किंमती वाढल्याने वस्तूंची मागणीत घट होण्याची भीती कंपन्यांना सतावत आहे.

म्हणून वस्तूंच्या किंमती वाढल्या...
बाजारात कच्च्या मालाच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्यानेच, वस्तूंच्या किंमतीत वाढ होत आहे. स्टिल, अल्युमिनियम, रबर, कॉपर, प्लास्टिक, रेअर मटेरिअल आणि इतर कच्च्या वस्तूंच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

टीव्ही, फ्रिज महागणार...
एक जुलैपासून एसी, टीव्ही, फ्रीज यांच्यासह इतर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या उत्पादनाच्या किंमती वाढविण्याची घोषणा केली आहे. यांच्या किंमतीत जवळपास 3-4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

To know more click here
https://letsup.app.link/Yn57u1OHvhb
विदर्भाच्या ध्येयवेड्या तरुणाने मिळवली लंडनची स्कॉलरशिप

LetsUpp | Trending

● बुलढाणा जिल्ह्यातील पिंपरी या छोट्याशा गावातील एका ध्येयवेड्या तरुणाने ब्रिटिश सरकारची अत्यंत प्रतिष्ठित असलेली चेव्हेनिंग स्कॉलरशिप मिळवली आहे. या ध्येयवेड्या तरुणाचं नाव राजू आत्माराम केंद्रे असं आहे.

● युकेमधील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊ इच्छितात अशा जगभरातील 160 देशातील युवा नेतृत्व करणाऱ्या तरुणांसाठी चेव्हेनिंग स्कॉलरशीप दिली जाते. फॉरेन कॉमनवेल्थ डिपार्टमेंटकडून ही स्कॉलरशीप दिली जाते.

● या स्कॉलरशिप अंतर्गत राजुला जवळपास 45 लाखांपर्यंत स्कॉलरशिप मिळणार आहे. उच्च शिक्षणासाठी जगभरातील 19 नामांकित विद्यापीठांमध्ये त्याची निवड झाली आहे. चेव्हेनिंग स्कॉलरशिपमुळे त्याला हव्या त्या विद्यापीठामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकणार आहे.

● जिल्हा परिषद, मुक्त विद्यापीठ, टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायंस, मुख्यमंत्री फेलोशिप, समाजकार्य महाविद्यालय आणि आयपॅक असा प्रवास करत राजू चेव्हेनिंग स्कॉलरशिपपर्यंत येऊन पोहचला आहे. ज्या विद्यापीठात प्रवेश घेईल त्याची पूर्ण फी व राहणे, तसेच खाण्याचा खर्च या स्कॉलरशिपमधून भागविला जाणार आहे.

● गेल्या चार वर्षांपासून राजू केंद्रे सहकार्यांच्या मदतीने एकलव्य चळवळ लीड करत आहे. ज्या फर्स्ट जनरेशन लर्नर्सला भारतातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, अशा ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणासाठी एकलव्य चळवळ काम करते.

● या चळवळीतील 125 विद्यार्थी आतापर्यंत राष्ट्रीय पातळीवरील संस्थेत शिकत आहेत. तळागाळातील तरूणांचं एक भक्कम नेतृत्व तयार करण्याचा राजू केंद्रेंचा मानस आहे.

To know more click here
https://letsup.app.link/zlAnloSSvhb
https://www.youtube.com/watch?v=KJMCM-GiYtA सेंद्रिय शेतीसह संशोधनाची वाट धरलेल्या २८ वर्षीय शेतकऱ्याची यशोगाथा! धुळे जिल्ह्यातील शिरपुर तालुक्यातील अंतुर्ली या गावातील समाधान बागुल हा २८ वर्षीय तरुण चर्चेचा विषय ठरला आहे. त्याने आपल्या वडिलोपार्जीत केवळ तीन एकर शेतीतून स्वतःची कंपनी सुरु केली त्यातून सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या निर्मितीसह संशोधनही सुरु केले आहे.
देशात आजपासून 'हे' मोठे बदल होणार

LetsUpp l Trending

1 जुलैपासून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. आजपासून देशात बँकिंग आणि कराच्या नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत.

कोरोनामुळे आधीच कंबरडे मोडलेल्या सर्वसामान्यांना आता या नव्या बदलांनी बोजा वाढणार आहे. या बदलांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत ते पाहुयात...

स्टेट बँक ऑफ इंडिया
बेसिक सेव्हिंग बँक डिपॉजिट खातेधारकांना महिन्यातून 4 वेळा एटीएमचा वापर मोफत करता येणार आहे. त्यानंतर एटीएमचा वापर केल्यास प्रत्येक व्यवहाराला 15 रुपये व जीएसटी द्यावा लागणार आहे. चेकबुकसाठीही अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत.

आयडीबीआय बँक
आयडीबीआय बँकेने 1 जुलैपासून आपल्या चेक लीफ चार्ज, सेव्हिंग अकाउंट चार्ज आणि लॉकर चार्जमध्ये बदल केला आहे. सेमी अर्बन आणि ग्रामीण भागातील खातेधारक आता बँकेत फक्त 5 वेळाच पैसे जमा करू शकणार आहेत. .

LPG गॅसच्या किंमतीत वाढ
सरकारी तेल कंपन्यांनी घरी वापरल्या जाणार्‍या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ केली आहे. वाढलेल्या किमतींमुळे देशाची राजधानी दिल्लीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचे दर आता 834 रुपयांवर पोहोचले आहेत.

कार आणि दुचाकी महागणार
मारुती आणि हिरोच्या गाड्यांच्या किंमती वाढणार आहे. हिरोच्या दुचाकींच्या एक्स-शो रूम किंमतीत 3 हजार रुपयांची वाढ होऊ शकते.

50 लाख रुपयांच्यावरील खरेदीवर टीडीएस कापला जाणार
50 लाखांवरील खरेदीवर 0.10 टक्के टीडीएस कापला जाणार आहे. मागील वर्षी एखाद्याचा 10 कोटींचा टर्नओव्हर असेल, तर तो यावर्षी 50 लाखांपेक्षा अधिकचा माल खरेदी करू शकेल. यावर जी विक्री होईल त्यावर टीडीएस कापला जाईल.

लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज
लर्निंग लायसन्स बनवण्यासाठी आता आरटीओत जाण्याची गरज नाही. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर घरातूनच चाचणी दिली जाऊ शकणार आहे. चाचणीत पास झाल्यानंतर लर्निंग लायसन्स घरी पाठवून दिले जाणार आहे.

सोन्याच्या दागिन्याला यूनिक ओळख
सोन्याच्या व्यवहारात फसवणूक होऊ नये म्हणून सोन्याच्या प्रत्येक दागिन्याला यूनिक ओळख तयार केली जाणार आहे. दागिने हरवल्यास किंवा चोरी झाल्यास या यूनिक ओळखीमुळे ओळख पटवण्यात मदत होणार आहे. त्यामुळे प्रत्येक दागिन्याला यूनिक ओळख (यूआईडी) देण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

सिंडिकेट बँक ग्राहकांना नवा IFSC कोड
सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत विलीन झाली आहे. त्यामुळे आता सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना नवा IFSC कोड वापरावा लागणार आहे.

To know more click here
https://letsup.app.link/FxdvnVHaxhb
https://www.youtube.com/watch?v=ZPE2xZkAAis गाडीवर दगडफेक झाल्यानंतर गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया...! गाडीवर दगडफेक झाल्यानंतर गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया...!
घोंगडी बैठकीच्या माध्यमातून समाजाला जागृत करतो आहे आणि हीच बाब राष्ट्रवादीला खटकत असल्याने माझ्या गाडीवर दगड टाकले जात असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांच्या कडून करण्यात आलाय.
दोन दिवसांचेच अधिवेशन का?; मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांच्या पत्राला उत्तर

LetsUpp l Trending

● राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, विधानसभा अध्यक्ष निवड आदी विषयांसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली होती.

● यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २४ जून रोजी पत्र पाठविले होते.

● यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यपालांना दोन दिवसांचेच अधिवेशन का बोलावले याचे स्पष्टीकरण करणारे पत्र पाठविले आहे.

मुख्यमंत्र्यांनी पत्रात काय म्हंटले? :

● विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक २२ जून, २०२१ रोजी झाली.

● कोविड-19 मधील डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ञांनी व्यक्त केलेली चिंता आणि केंद्र सरकारने दिलेला सावधगिरीचा इशारा यावर या बैठकीमध्ये सखोल विचारविनिमय करण्यात आला.

● त्यानुसार, केवळ ज्या कामकाज सल्लागार समितीला अधिवेशनाचा कालावधी ठरविण्याचा अधिकार आहे, त्याच समितीने कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून, सन २०२१ च्या द्वितीय (पावसाळी) अधिवेशनाचा कालावधी दि.५ जुलै ते ६ जुलै, २०२१ असा दोन दिवसांकरीता निश्चित करण्यात आल्याचे या पत्रामध्ये म्हटले आहे.

● राज्यामध्ये सध्या असलेली कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. त्यातच तिसऱ्या लाटेचीही तीव्र शक्यता या क्षेत्रातील तज्ञांनी, केवळ आपल्या राज्यापुरतीच नव्हे तर संपूर्ण देशाबाबत व्यक्त केलेली आहे.

● संभाव्य लाटेच्या दाहकतेबाबत देखील या तज्ञांनी तीव्र चिंता व्यक्त केलेली आहे, असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हंटल आहे.

● तसेच भारतीय संविधानाच्या कलम १७८ तसेच महाराष्ट्र विधानसमा नियम, ६ अन्वये विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येते. तथापि, याकरीता विवक्षित कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.

● कोविडच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जास्त काळ अधिवेशन घेता येणे शक्य झाले नाही. महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील बहुतांश राज्यातही अल्प कालावधीची अधिवेशने घेण्यात आलेली आहेत.

● त्यामुळे राज्यात अध्यक्षांची निवडणूक घेता आलेली नाही. या परिस्थितीत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडेच अध्यक्षपदाचा कार्यभार सोपविण्यात आलेला आहे.

● अर्थसंकल्पीय अधिवेशनही त्यांच्याच अध्यक्षतेखाली पार पडले आहे. यामुळे निवडणुकीअभावी कोणत्याही सांविधानिक तरतूदीचा भंग झालेला नाही अथवा घटनात्मक अडचण निर्माण झालेली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

To know more click here
https://letsup.app.link/7oBExGhFyhb
https://www.youtube.com/watch?v=p3r_Asc2QVM

ईडीने साखर कारखान्यांवर केलेली कारवाई राजकीय हेतूने प्रेरित – राजू शेट्टी

LetsUpp | Trending

● राज्यातील ४३ सहकारी साखर कारखान्यांच्या व्यवहाराची चौकशी व्हावी अशी मागणी सातत्याने केली आहे. आता ईडीने केलेली कारवाई मात्र राजकीय हेतूने प्रेरित आहे.”, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.

● कारवाई १०० टक्के झाली पाहिजे, ही अनेक वर्षांपासून आम्ही मागणी करत आहोत. रस्त्यावर आंदोलन करत आहोत. न्यायालयात दाद मागितली होती. ईडी आज ज्या पुराव्याच्या आधारे चौकशी करत आहेत. ते पुरावे मी पाच वर्षांपूर्वीच त्यांच्याकडे सादर केले होते.” असं राजू शेट्टींनी म्हटलं आहे.

हे सुद्धा तपासाचं नाटक होणार –

● ”साखर कारखान्याचा खरेदी व्यवहारात महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते आहेत. एकही पक्ष यापासून अलिप्त नाही, या सगळ्या नेत्यांनी मिळून हा दरोडा टाकलेला आहे.

● ईडी हा दिल्लीकरांना सोय होईल अशी, दिल्लीकरांना जे त्रासदायक ठरतात, त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी अशाप्रकारे तपासाचं नाटक करतं, मला माहिती हे सुद्धा तपासाचं नाटक होणार आहे. दिल्लीमध्ये खलबतं झाली बैठक झाली की तपास शांत होणार आहे. ” असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.

To know more click here
https://letsup.app.link/0ytBN8eNyhb
मराठा-ओबीसी विद्यार्थ्यांना 50 टक्के फी माफ

LetsUpp | Trending

● अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत यावर्षी प्रवेश घेणाऱ्या शिर्डी विधानसभा मतदार संघातील मराठा आणि ओबीसी विद्यार्थ्याची 50 टक्के शुल्क माफ करण्याचा निर्णय संस्थेचे चेअरमन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज जाहीर केला.

● राज्यात अनेकांच्या शिक्षण संस्था आहेत. प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघापुरता या पद्धतीने निर्णय घेतला तर राज्यभरातील विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.

● आरक्षण रद्द झाल्यांनतर उगाच सल्ले देत फिरण्यापेक्षा सामाजिक जबाबदारी म्हणून हा निर्णय घेतल्याचे विखे-पाटील स्पष्ट केले.

● आरक्षण टिकविण्यात आलेल्या अपयशाचे प्रायश्चित म्हणून आघाडी सरकारने देखील विद्यार्थ्याची या वर्षाची संपूर्ण शैक्षणिक फी भरावी आशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

To know more click here
https://letsup.app.link/vu8c8XXJyhb