LetsUpp Marathi
4.86K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
मराठा मूक आंदोलनासंदर्भात खासदार संभाजीराजे यांची मोठी घोषणा

LetsUpp | Trending

● राज्य सरकारने प्रशासकीय कामे करण्यासाठी आमच्याकडे २१ दिवसांचा वेळ मागितला असून त्यासाठी आम्ही पुढील महिनाभरासाठी मूक आंदोलन स्थगित करत आहोत, अशी घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

● जर येत्या महिन्याभरात आम्हाला अपेक्षित परिणाम दिसले नाहीत, तर आम्ही आमचे आंदोलन अधिक तीव्र करू, असेही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

● खासदार संभाजीराजे यांनी आज नाशिकमध्ये मूक आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत मूक आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली.

खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले :

● 'राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या असून या मागण्याची अंमलबजावणी करण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी लागेल, असे सरकारचे म्हणणे आहे.

● या मागण्यांची प्रशासकीय स्तरावर अंमलबजावणी होत आहे. मात्र असे असले तरी राज्यातील मूक आंदोलनाच्या समन्वयकांनी हे आंदोलन थांबवायचे नाही, असा निर्धार केला आहे. म्हणूनच आम्ही आमचे आंदोलन तूर्तास १ महिन्याभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

● आता सरकारने महिन्याभरात आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करावी. जर सरकारने मागण्यांची अंमलबजावणी केली नाही, तर मात्र आम्ही आमच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवू, असेही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.

To know more click here
https://letsup.app.link/4hRgJcfVghb
'बाबूराव पेंढारकर' ऐसा नटश्रेष्ठ होणे नाही

LetsUpp | Special

● नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकरांचा जन्म २२ जून, १८९६ रोजी कोल्हापूरमध्ये झाला. मराठी चित्रपट-अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते अशी त्यांची ख्याती होती. आज त्यांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

● बाबूराव पेंढारकरांनी १९२० साली 'सैरंध्री' या मराठी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले. या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले.

● १९२० च्या दशकापासून १९६० दशकापर्यंत त्यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तर ६८ चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले.

● दोन चित्रपटांची निर्मितीही केली. त्यांच्या असंख्य चित्रपटांपैकी एक उल्लेखनीय चित्रपट म्हणजे 'अयोध्येचा राजा' होय.

● व्ही. शांताराम दिग्दर्शित 'अयोध्येचा राजा' हा बोलपट ६ फेब्रुवारी १९३२ रोजी प्रदर्शित झाला होता. हा मराठीत बनलेला पहिला बोलपट आहे. याची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली होती.

● 'अयोध्येचा राजा'मध्ये बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक, गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, शंकरराव भोसले, मानाजीराव माने, बुवासाहेब, कुमार दिगंबर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

● प्रभात कंपनी पुण्याला हलवण्यात आली. परंतु, बाबुराव पेंढारकर पुण्याला गेले नाहीत. मेजर निंबाळकर आणि भालजी यांनी 'कोल्हापूर सिनेटोन कंपनी' काढली आणि बाबूरावांना मॅनेजर करण्यात आले.

● 'कोल्हापूर सिनेटोन कंपनी'चा 'विलासी ईश्वर' हा चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये बाबूरावांनी अभिनय केला होता. पुढे त्यांनी मित्राच्या सहाय्याने 'हंस पिक्चर्स' नवी कंपनी उभारली.

● 'श्यामची आई,' 'महात्मा फुले,' 'धर्मवीर,' 'देवता,' 'अर्धांगी अमृत,' 'पहिला पाळणा,' 'भक्त दामाजी,' 'पुनवेची रात,' 'जय मल्हार,' 'मी दारू सोडली' यांसारख्या मराठी चित्रपटांबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटही केले.

● यामध्ये 'डॉ. कोटनीस की अमर कहानी', 'नवरंग', 'दो आँखे बारह हाथ' या हिंदी चित्रपटांचा समावेश आहे.

● पोटाच्या कर्करोगाने बाबूराव यांचे ९ नोव्हेंबर, १९६७ रोजी निधन झाले.

सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप
https://letsup.app.link/xjgatwjQhhb
चिंताजनक! राज्यात कोरोनानंतर आता 'निपाह'चा धोका?

LetsUpp | Trending

● राज्यातील वटवाघळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह विषाणू आढळला आहे. राज्यातील वटवाघळांमध्ये निपाह विषाणू आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

● पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या तज्ज्ञांनी याबद्दलचं संशोधन केलं आहे.

● निपाह विषाणू असलेल्या वटवाघळांच्या प्रजाती साताऱ्यातील महाबळेश्वरमधील गुफेत मार्च २०२० मध्ये आढळून आल्या.

● याआधी राज्यात कधीही वटवाघळांमध्ये निपाह विषाणू आढळून आला नव्हता, अशी माहिती याबद्दलचं संशोधन करणाऱ्या पथकाच्या प्रमुख डॉ. प्रज्ञा यादव यांनी दिली.

● देशात याआधी काही राज्यांमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे. हा विषाणू वटवाघूळांमधून माणसांमध्ये संक्रमित होतो. निपाह विषाणू अतिशय धोकादायक मानला जातो.

● निपाहवर कोणतंही औषध किंवा लस उपलब्ध नाही. निपाह विषाणूवर औषध उपलब्ध नसल्यानं मृत्यूदर तब्बल ६५ टक्क्यांच्या पुढे आहे.

● गेल्या काही वर्षांपासून वटवाघळांमुळे विषाणू पसरत असल्याचं वारंवार समोर आलं आहे. इबोला, मारबर्ग यासारखे विषाणू वटवाघुळांमुळेच पसरले होते.

To know more click here
https://letsup.app.link/Y99NPBn0hhb
अन् बच्चु कडू हे युसुफ खान पठाण बनतात तेव्हा...

LetsUpp l Amravati

● राज्याचे शालेय शिक्षण व जलसंपदा राज्यमंत्री व अकोल्याचे पालकमंत्री हे आपल्या आगळ्यावेगळ्या आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत, असाच प्रकार सोमवारी अकोला आणि पातुर या शहरात घडला आहे.

● बच्चु कडू यांनी वेशांतर करून प्रशासकीय यंत्रणेची झाडाझडती घेतली आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा धास्तावल्याचे दिसून येत आहे.



● त्यांनी चक्क मुस्लिम समाजातील व्यक्तीचा पेहराव करून तोंडाला रुमाल बांधून विविध प्रशासकीय यंत्रणेची झाडाझडती घेतली आहे.

● जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकाने, जिल्ह्यातील गुटखा विक्री सुरू आहे का? हे देखील त्यांनी तपासले असता यात अनेकांचे पितळ उघडे पडले आहेत.



● दरम्यान पोलीस यंत्रणांनीदेखील धसका घेतला आहे. त्यांनी अकोला महापालिकेत प्रहार संघटनेच्यावतीने घरकुलासाठी आंदोलन सुरु होते, या आंदोलनात सहभाग घेऊन येथील प्रशासकीय यंत्रणेची चौकशी केली आहे.

● त्यांनी पातुर येथील कलश व एसबी या दोन पान सेंटरवर गुटखा मागितला, तेथील पान सेंटरवाल्यांनी तुम्हाला पुष्कळ गुटखा देऊ असे देखील सांगितले. त्यामुळे त्या पान सेंटर वाल्यांचे पितळ सुद्धा उघडे आले आहे.

● अशा आगळ्या वेगळ्या विषयात बच्चू कडू यांनी यंत्रणेचा आढावा घेतला आहे, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा एकंदरीत चक्क झाली आहे.

To know more click here
https://letsup.app.link/2XqdqSHPhhb
महाआघाडीची चाचपणी; शरद पवार यांच्या उपस्थितीत आज विरोधी पक्षांची बैठक

LetsUpp | Trending

● राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज विरोधी पक्षनेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे.

● देशातील विद्यमान राजकीय परिस्थिती, जनतेला भेडसावणारे प्रश्न आणि केंद्र सरकारची वादग्रस्त धोरणे या मुद्यांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

● त्याचबरोबर संभाव्य बिगरभाजप महाआघाडीच्या पर्यायाची चाचपणी हाच बैठकीचा प्रमुख हेतू असल्याचे मानले जात आहे.

● निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा सोमवारी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. याआधी ११ जून रोजी मुंबईतही प्रशांत किशोर यांनी पवारांशी तीन तास चर्चा केली होती.

● ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये भाजपला पराभूत केल्यानंतर, मोदी सरकारविरोधात बिगरभाजप-बिगर काँग्रेस पक्षांची आघाडी स्थापन करण्याबाबत गांभीर्याने चर्चा सुरू झाली आहे.

● २०२४ मधील लोकसभा निवडणुकीतच नव्हे तर, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही भाजपविरोधात एकत्रितपणे लढण्याची रणनीती आखली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या निवासस्थानी आज होणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

बैठकीत काँग्रेसचा सहभाग नाही? :

● काँग्रेसच्या ‘जी-२३’ गटातील नेते कपिल सिबल यांना या बैठकीचे निमंत्रण असले तरी आपण उपस्थित राहणार नसल्याचे सिबल यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या बैठकीत काँग्रेसचे प्रतिनिधी सहभागी होण्याची नाही.

● ही बैठक बिगरभाजप आघाडीच्या शक्यतेवर चर्चा करण्यासाठी होत असली तरी, काँग्रेसला वगळून भाजपविरोधी आघाडी तयार करण्याबाबत शरद पवार व अन्य विरोधी पक्ष नेत्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही.

'या' १५ पक्षांना निमंत्रण : ’समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष आदी १५ विरोधी पक्षांच्या नेत्यांना बैठकीचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

To know more click here
https://letsup.app.link/tDhQ85TQhhb
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन फक्त 2 दिवसांचेच..!!!

LetsUpp | Trending

● मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, करोना आणि राज्यातील इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन कमीत १५ दिवसांचं तरी घेण्यात यावं, अशी मागणी विरोधी बाकांवरील भाजपा केलेली असताना राज्य सरकारने दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे.

● ५ आणि ६ जुलै रोजी राज्य विधिमंडळाचं अधिवेशन होणार असून, अधिवेशनाच्या कामकाजातून प्रश्नोत्तर, तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी गोष्टी वगळण्यात आल्या आहेत.

● दरम्यान, राज्य सरकारच्या दोन दिवसांच्या अधिवेशनाच्या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे.

● करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने विरोधकांकडून मराठा आणि ओबीसी आरक्षणावर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र अधिवेशन घेण्याची तसेच १५ दिवसांचं विधिमंडळांचं अधिवेशन घेण्याची मागणी विरोधकांकडून होत होती.

● विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत पुढील महिन्यात म्हणजे ५ आणि ६ जुलै रोजी असं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

● दोन दिवसांचंच अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे भाजपाने बैठकीतून बहिष्कार टाकत सभात्याग केला.

To know more click here
https://letsup.app.link/7PsQcyhdihb
ब्रेकिंग! खासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

LetsUpp | Breaking

▪️ अमरावतीच्या खासदार नवनीत राणा सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. अंतिम सुनावणीपर्यंत हायकोर्टाच्या निर्णयाला स्थिगिती दिली आहे.

▪️ खा. राणा यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध असल्याचं निरीक्षण नोंदवत त्यांना २ लाख रुपयांचा दंड ठोठावल्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयं स्थगिती दिली आहे.

▪️ मुंबई उच्च न्यायालयानं बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुसूचित जातीचा दाखला मिळवून नंतर जात वैधता प्रमाणपत्रही मिळवल्याबद्दल राणा यांना दंड ठोठावला होता.

▪️ दरम्यान, निवडणुकीनंतर जातीचा खोटा दाखला मिळवून नवनीत राणा यांनी निवडणूक लढवल्याचा आरोप आरोप अडसूळ यांनी खा. राणा यांच्यावर केला होता.

▪️ या संदर्भात अडसूळ यांनी राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

To know more click here
https://letsup.app.link/6agnMqRgihb
भाजपने माझ्या कुटुंबालाही त्रास दिला; शंकरराव गडाखांचा गौप्यस्फोट

LetsUpp | Trending

● शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपच्या नेत्यांशी जुळवून घेण्याबाबत पत्र पाठविल्यानंतर आता जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.

● ‘राज्यात भाजपची सत्ता असताना मला आणि माझ्या कुटुंबीयांना विनाकारण त्रास देण्यात आला होता. मात्र, म्हणून शिवसेनेने भाजपशी जुळवून घेण्याची मागणी आम्हाला मान्य नाही,’ असा गौप्यस्फोट शंकरराव गडाख यांनी केला आहे.

काय म्हणाले शंकरराव गडाख?:

● ‘भाजपच्या सत्ताकाळात तपास यंत्रणांना हाताशी धरून विरोधकांना त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत. राज्यात भाजपची सत्ता असताना माझ्या कुटुंबालाही त्रास झाला होता. पूर्वी एका शेतकरी आंदोलनाच्या वेळी गुन्हा दाखल झाला होता.

● ते प्रकरण न्यायालयात सुरू झाल्यानंतर न्यायालयाकडून समन्स मिळालेले नव्हते, त्यामुळे न्यायालयात हजर होऊ शकलो नव्हतो. त्यावेळी पोलिसांनी मोठा फौजफाटा पाठवून माझ्या घराची झडती घेतली होती. याचा खूप त्रास झाला.

● सरनाईक यांचे कुटुंबही सध्या अशाच त्रासातून जात आहे. त्यामुळे त्यांनी मनमोकळ्या भावना व्यक्त केल्या असाव्यात. ज्यांना त्रास होतोय, ते लोक आता बोलू लागले आहेत. मात्र, यासाठी भाजपशी जुळवून घ्यावे, याच्याशी सहमत नाही.’

To know more click here
https://letsup.app.link/3sdoshWdihb
जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

LetsUpp | Trending

● सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर, पालघर या जिल्ह्यातील ओबीसीचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलं होतं.

● रद्द करण्यात आलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

● 6 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 19 जुलै रोजी मतदान होणार असून 20 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

To know more click here
https://letsup.app.link/rFWX7z0pihb
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकार देणार 4000 रुपये

LetsUpp | Trending

● केंद्र सरकार जून महिन्यात देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये पाठवण्याची शक्यता आहे. पंतप्रधान कृषी सन्मान योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे.

● काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवला होता. त्यावेळी शेतकऱ्यांना 2000 रुपये देण्यात आले होते. आतापर्यंत 9 कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदवले आहे.

● पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत नाव नोंदवण्यासाठी pmkisan.gov.in या संकेतस्थळावर एक अर्ज भरावा लागेल. नाव नोंदवल्यानंतर केंद्र सरकार थेट तुमच्या बँकेत पैसे ट्रान्सफर करेल.

4000 रुपये मिळवण्यासाठी काय कराल?

● गेल्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन न केल्यामुळे त्यांना 2000 रुपयांचा हप्ता मिळाला नव्हता. त्यामुळे आत शेतकऱ्यांना पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत नाव नोंदवण्यासाठी 30 जूनपर्यंतची मुदत आहे.

● तुमचे नाव नोंदवले गेल्यानंतर एप्रिल-जूनचा हप्ता जुलै महिन्यात आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यात नवा हप्ता जमा केला जाईल. याचा अर्थ आता नाव नोंदवल्यास शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयाचे दोन्ही हप्ते लागोपाठ मिळतील.

रजिस्ट्रेशन कशाप्रकारे कराल?

1. सर्वप्रथम pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जा.
2. Farmers Corner या ऑप्शनवर क्लिक करा.
3. आता तुम्हाला New Farmer Registration हा पर्याय निवडावा लागेल.
4. नवा टॅब ओपन झाल्यावर त्यामध्ये आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा.
5. त्यानंतर आपली माहिती आणि जमिनीचा तपशील नमूद करावा.
6. सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करावा.

आर्थिक मदत कधी मिळणार?

एखाद्या शेतकऱ्याने जून महिन्यात नोंदणी केली तर त्याला योजनेचा आठवा हप्ता जुलै महिन्यात मिळेल. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पुढचा हप्ता मिळेल. याचा अर्थ आता नाव नोंदवल्यास शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयाचे दोन्ही हप्ते लागोपाठ मिळतील.

To know more click here
https://letsup.app.link/Sz7o6Zmoihb
मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल

LetsUpp | Trending

▪️ मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केल्याची माहिती खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

▪️ मराठा आरक्षणाबाबत आम्ही पुन्हा एकदा याचिका दाखल करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती.

▪️ त्याप्रमाणे राज्य सरकाने आमची प्रमुख मागणी मान्य केली असून त्यानुसार आज राज्य सरकारने याचिका दाखल केली आहे.

▪️ माझ्या मागणीनुसार या याचिकेमध्ये गायकवाड आयोगाच्या अहवालातील उर्वरीत परिशिष्टदेखील भाषांतरीत करण्यात येतील, असे नमूद केले आहे.

▪️ मराठा आरक्षणाबाबत येत्या 8 दिवसांत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची तसेच एक समिती नेमून मागण्या सोडविण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती.

To know more click here
https://letsup.app.link/6RD7EjInihb
बेशुद्ध अवस्थेत असलेल्या रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडले

LetsUpp | Mumbai

● मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात बेशुद्ध अवस्थेत असलेल्या एक रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडल्याचे गंभीर प्रकरण समोर आला आहे.

● डोळ्याच्या पापण्यांचा आणि आसपासचा भाग कुरतडला गेला आहे. अतिशय खेदजनक गोष्ट आहे. या प्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

● हा वॉर्ड सर्व बाजूंनी बंद आहे. कुठुनही उंदीर जाणार आहे याची खबरदारी घेतलेली आहे. पावसाळ्यात जेव्हा दरवाजा उघडला जातो तेव्हा कदाचित हा उंदीर आयसीयूत गेला असावा.

● रुग्ण हा व्हेंटिलेटवर असल्यानं निश्चितच त्याला याबाबत काही जाणवलं नसेल. ही गोष्टी नर्सच्या लक्षात आल्यानं लगेचच डॉक्टरांनी डोळ्यांची तपासणी केली.

● श्रीनिवास यल्लपा असे या २४ वर्षीय रुग्णाचं नाव आहे. दोन दिवसांपूर्वी त्याला राजावाडी पालिका रुग्णालयात दम लागत असल्यानं दाखल केलं होतं. त्याला मेंदूज्वर आणि लिव्हर खराब असल्याचं समोर आलं आहे.

● यावर त्याच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी त्याच्या नातेवाईकांनी या रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचं दिसलं. तेव्हा त्यांनी डोळे तपासले असता त्यांना डोळ्याला उंदरानं कुरतडल्यासारखं दिसून आलं. रुग्णाचे डोळे उंदरानं कुरतडल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

To know more click here
https://letsup.app.link/DKzoeARzihb
आज दिवसभरातील 10 महत्वाच्या घडामोडी

LetsUpp | Bulletin

● मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल; भाजप खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटरवरून यासंदर्भात दिली माहिती

● कोरोनामुळे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन फक्त 2 दिवस येत्या 5 आणि 6 जुलैला मुंबईत होणार, अधिवेशनात, प्रश्नोत्तर, तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी होणार नाही

● सुप्रीम कोर्टानं OBC आरक्षण रद्द केलेल्या 5 जिल्हा परिषदा, 33 पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, 19 जुलै रोजी मतदान तर 20 जुलैला होणार मतमोजणी

● डेल्टा प्लसमुळे रुग्ण सीरिअस होण्याचे प्रमाण अधिक, तरी घाबरू नका आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्त्वाची माहिती

● अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा-कौर यांना जातपडताळणीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला दिली स्थगिती

● आषाढी वारीसाठी 17 ते 25 जुलै या काळात चंद्रभागा परिसरात कलम 144 लागू, परवानगी नसलेल्या एकाही भाविकाला या काळात सोलापूर जिल्ह्यात प्रवेश मिळणार नाही

● घरोघरी जाऊन लसीकरणाबाबत टास्क फोर्सची नियमावली तयार; राज्य सरकारने सीलबंद अहवाल हायकोर्टात सादर केलाय. मात्र, धोरणात्मक निर्णयासाठी राज्य सरकारने आठवड्याचा अवधी मागितला

● भारतात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणार नाही, राकेश झुनझुनवाला यांनी केला दावा; तसेच तिसरी लाट येईल म्हणून मार्केटमधील गुतंवणूकदारांनी काळजी करू नये, असा सल्लाही दिला

● CBSE आणि ICSE च्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

● भारत बायोटेककडून कोव्हॅक्सिनच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीच्या निकालांची माहिती भारतीय ड्रग कंट्रोलर जनरलला सादर, बायोटेकची कोव्हॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी

To know more click here
https://letsup.app.link/ZFIXlwdCihb
राष्ट्रवादीला शिर्डी साई संस्थान तर काँग्रेसकडे पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान

LetsUpp | Trending

● शिर्डी साई संस्थान आणि पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या विश्वस्तपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती.

● अखेर आज याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डी साई संस्थान अध्यक्षपदावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांनी दावा केला होता. मात्र, आज महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीच्या बैठकीत यावर तोडगा काढण्यात आला आहे.

● या बैठकीत तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत महामंडळ नियुक्त्या आणि साई संस्थान, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी संस्थान विश्वस्तपदाबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

● यानुसार आता शिर्डी साईबाबा संस्थान अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर काँग्रेसकडे गेले आहे. आशुतोष काळे हे शिर्डी साई संस्थानचे अध्यक्ष असणार आहेत.

● कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीतील साईबाबा आणि पंढऱपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानच्या विश्वस्तपदावर वर्णी लागण्यासाठी राजकीय मंडळींकडून फिल्डिंग लावण्यात येत होती. अखेर आज या संस्थानचे विश्वस्तपद, अध्यक्षपदाच्या संदर्भात निर्णय झाला आहे.

● महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक झाल्यावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली, तिन्ही पक्षांची समन्वय समितीची बैठक झाली.

● काही महामंडळांचे वाटप झालं आहे. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत. तिन्ही पक्षांकडे महामंडळे असतील. आमदारांच्या संख्येनुसार महामंडळ ठरवले जातील, आघाडीत विसंवाद नाही, गैरसमज नाहीत.

To know more click here
https://letsup.app.link/RxWIQPRBihb
भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात, किवींना मिळाली आघाडी

LetsUpp | Trending

● वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात आज न्यूझीलंडचा पहिला डाव संपुष्टात आला. भारतीय गोलंदाजांनी 249 धावात किवींचा संघ गारद केला आहे. तरी किवींना 32 धावांची नाममात्र आघाडी मिळाली आहे.

● न्यूझीलंडकडून सलामीवीर कॉनवे याने 54 तर कर्णधार केन विलियमसनने 49 धावांची खेळी केली. तसेच टीम साऊदीने 30 धावांची खेळी केली. भारताकडून मोहम्मद शमी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. शमीने 76 धावात 4 बळी घेतले.

● तर त्याला इशांत शर्मा (3 बळी) आणि रवीचंद्रन अश्विन (2 बळी) यांनी चांगली साथ दिली. तत्पूर्वी न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता.

● कर्णधाराचा निर्णय न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. न्यूझीलंडने भारताचा पहिला डाव 217 धावांमध्ये संपुष्टात आणला होता. त्यामुळे न्यूझीलंडला 32 धावांची आघाडी मिळाली आहे.

To know more click here
https://letsup.app.link/995RTEbFihb
राज्यामध्ये लसीकरणाचा नवा उच्चांक!

LetsUpp l Trending

● राज्यात मंगळवारपासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली आहे.

● राज्यात दिवसभरात ५ लाख ५२ हजार ९०९ जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविला आहे.

● आरोग्य यंत्रणेच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समाधान व्यक्त करत आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.

● राज्य कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशात अग्रेसर असून हे सातत्य टिकवत आतापर्यंत सुमारे २ कोटी ८५ लाखांहून अधिक नागरिकांना लस दिली आहे.

● ही आकडेवारी मंगळवार रात्री ८ वाजेपर्यंतची असून त्यात अजून वाढ होऊ शकते, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले आहे.

● यापूर्वी २६ एप्रिल रोजी एकाच दिवशी ५ लाख ३४ हजार नागरिकांना लस दिल्याचेही डॉ. व्यास यांनी सांगितले आहे.

To know more click here
https://letsup.app.link/71AILgMsjhb
'डेल्टा प्लस' व्हेरियंटला घाबरून जाऊ नये कोरोना विषाणूचा नवा 'डेल्टा प्लस' व्हेरियंटला घाबरून जाऊ नये, असे आवाहन जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. जाणून घ्या नेमके काय म्हणाले जिल्हाधिकारी... (रिपोर्टर - योगिता सोनवणे) https://youtu.be/Y8XKny0JZfM
शरद पवार आणि प्रशांत किशोर आज तिसऱ्यांदा भेटणार

LetsUpp | Trending

● निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेतली. दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट झाली.

● साधारण अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तीन दिवसांत या दोघांची दिल्लीत दुसऱ्यांदा भेट होत आहे.

● दोन्हीही नेते तिसऱ्या आघाडीचा विषय हा अजेंड्यावर नसल्याचं सांगतात. मात्र तरीदेखील या दोघांमध्ये गाठी-भेटीचं सत्र सुरु असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

● गेल्या 48 तासांमधील शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची ही दुसरी भेट आहे. तर पंधरा दिवसातील ही तिसरी भेट आहे.

● अशातच आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं की, प्रशांत किशोर यांच्या बैठकीत तिसऱ्या आघाडीचा विषय नव्हता.

● मात्र सध्याची जी राजकीय स्थिती आहे, त्यामध्ये विरोधकांना कसं आणखी आक्रमक होता येईल, यासंदर्भात चर्चा झाली.

● अशातच प्रशांत किशोर यांनी यापूर्वीत आपण निवडणूक व्यवस्थापनातून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळेच या भेटीच्या सत्राबाबत सर्वांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

To know more click here
https://letsup.app.link/6lkIXw6Njhb