LetsUpp Marathi
4.86K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
बारावीची परीक्षा रद्द, बोर्डाची अधिकृत घोषणा

LetsUpp | Trending

● बारावीची परीक्षा रद्दची बोर्डाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून याबाबत सविस्तर परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.

● कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता विद्यार्थ्यांना लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून परीक्षा रद्द करण्यात आल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

राज्य सरकारकडून बारावी परीक्षा रद्दचा शासन निर्णय जारी

● सुधारित मूल्यमापनाचं धोरण आणि निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

● कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षितता आणि मानसिक स्वास्थ्य यांनाच प्राधान्य देण्याची सरकारची भूमिका आहे.

● 12 वीच्या परीक्षेचे महत्त्व लक्षात घेता मूल्यमापनाचे एकसमान सूत्र निश्चित करावं, अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली होती.

● सर्व संबंधित घटकांशी केलेल्या चर्चेअंती सध्याचे वातावरण परीक्षेसाठी पोषक नसल्यानं परीक्षा रद्द करून पर्यायी मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषित करावा, असं महाराष्ट्र सरकारने केंद्राला यापूर्वीच सुचवलं होतं असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

To know more click here
https://letsup.app.link/Clcsqmfe5gb
ग्रेट भेट : मराठा आरक्षणप्रश्नी दोन्ही 'राजे' सोबत

LetsUpp | Trending

● खासदार संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांची आज पुण्यात भेट झाली.


● पुण्यात दोन्ही राजेंमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाली. पत्रकार परिषदेनंतर दोन्ही राजेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

● उदयनराजे यांनी संभाजीराजे यांच्या कोल्हापुरातील मोर्चाला आपला पाठिंबा जाहीर केला.

● त्यांनी 16 जूनला कोल्हापुरात मराठा मोर्चा काढण्याची घोषणाही केली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

उदयनराजे झाले आक्रमक...

● मराठा आरक्षणाचा प्रश्न कायदेशीर मार्गाने सुटणार नाही. त्यासाठी राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र आले पाहिजे.

● मात्र राज्यकर्त्यांना आरक्षण द्यायची इच्छाच नसून यांना फक्त राजकारण करायचे आहे. आरक्षणाच्या मुद्यावरुन व्यक्तीकेंद्रीत राजकारण सुरु असून उद्रेक झाला तर राज्यकर्ते जबाबदार असतील.

● त्यावेळी आम्हीदेखील थांबवू शकणार नाही. आम्ही आडवे आलो तर आमच्यावरही हल्ला करायला थांबणार नाहीत.

● आरक्षणप्रश्नी समाज बोलला आहे, लोक बोललेत आणि लोकप्रतिनिधींनी बोलणं गरजेचं आहे. अधिवेशनाच्या माध्यमातूनही हा प्रश्न मार्गी लागू शकतो,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

To know more click here
https://letsup.app.link/0BGJfwxW4gb
राज्यातील 'हे' 20 जिल्हे निर्बंधमुक्त

LetsUpp | Trending

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्यात अनेक अनलॉक प्रक्रिया राबवली जात आहे.

यातच ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती काहीशी आटोक्यात आली आहे, असे तब्ब्ल 20 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहे.

मात्र, गर्दी टाळण्यासाठी मुंबईतील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. तसेच ठाणे शहर तिसऱ्या लेव्हलमध्ये असून निर्बंधांतील शिथिलता कायम आहे. तर आजपासून पुणे शहरातील निर्बंध शिथिल केले आहे.

राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल :
अहमदनगर, नागपूर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, नंदुरबार, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ

या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक :
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे ग्रामीण, कोल्हापूर आणि सातारा या सहा जिल्ह्य़ांत रुग्णसंख्या आणि संसर्गदर जास्त, चौथ्या स्तरात समावेश.

मुंबईतील रेल्वेसेवा कोणासाठी? जाणून घ्या :
मुंबई शहर तिसऱ्या लेव्हलमध्ये असल्याने सर्वसामान्यांना या आठवडय़ात रेल्वे सेवेचा वापर करता येणार नाही. ही सेवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच मिळणार आहे.

To know more click here
https://letsup.app.link/TRd5D0DL4gb
दिलासादायक ! राज्यातील रुग्णवाढ १० हजारांच्या खाली

LetsUpp | Trending

● राज्यात आज ८,१२९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आले. तर आज २०० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

● राज्यात आज १४,७३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ५६,५४,००३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

● राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५५ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९ टक्के एवढा आहे.

● सध्या राज्यात ९,४९,२५१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर राज्यात एकूण १,४७,३५४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

To know more click here
https://letsup.app.link/DbPs2Ixp5gb
गृहिणींच्या बजेटला किंचित दिलासा! खाद्यतेलांच्या दरामध्ये घट

LetsUpp l Trending

● कोरोना काळात खाद्यतेलांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेतून स्थानिक बाजारपेठेत आवक वाढल्याने खाद्यतेलांच्या दरात घट झाली आहे.

● कोरोनाचा काळात जागतिक बाजारपेठेतून होणारी खाद्यतेलांची आवक कमी होत गेल्याने देशासह जगभरातील बाजारपेठांमध्ये खाद्यतेलांचा तुटवडा जाणवत होता.

● त्यामुळे खाद्यतेलांच्या दरात सातत्याने वाढ होत गेली. सध्या खाद्यतेलांची आवक वाढल्याने दरामध्ये घट झाली आहे. मात्र, पुढील काळात खाद्यतेलांचे दर यापुढील काळात टिकून राहणार असल्याचे तेलाचे व्यापारी आंग्ल आहेत.

किती घट? :
- किरकोळ बाजारात एक किलो तेल पिशवी : १० ते १५ रुपये
- घाऊक बाजारात १५ किलो तेलडबा : २०० ते २५० रुपये

आयात :
● जागतिक बाजारपेठेत दुसऱ्या क्रमांकाचा आयातदार असून भारतात दरवर्षांला दीडशे लाख टन खाद्यतेल आयात केले जाते.
● आपल्या देशाची गरज २२५ लाख टन असून देशात ८० ते ८५ लाख टन तेलनिर्मिती होते.

- राज्यात शेंगदाणा तेलाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर केले जाते.
- इंडोनेशिया, मलेशिया, रशिया, स्वित्र्झलड या देशांतून सूर्यफूल, पाम, सोयाबीन तेलाची आयात केली जाते.

To know more click here
https://letsup.app.link/C1VKxflR7gb
‘एमएचटी-सीईटी’ परीक्षांबाबत महत्वाची बातमी

LetsUpp l Trending

● कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता उच्च व तंत्रशिक्षण विभागाने १५ जुलैपासून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणारी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा परिमंडळ स्तरावर घेण्याचा निर्णय घेतला आहे.

● याबाबतची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

● राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण, स्थापत्य अभियांत्रिकी आणि हॉटेल व्यवस्थापन या अभ्यासक्रमासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्यावतीने प्रवेश परीक्षा घेतली जाते.

● या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून साडेतीन लाखांवर विद्यार्थी नोंदणी करतात. त्यासाठी ३६ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील महाविद्यालयात परीक्षा केंद्राची निर्मिती करण्यात येते.

● मात्र, यंदा कोरोनामुळे अनेकांनी धसका घेतला आहे. त्यातच तिसरी लाट येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

● त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांना अधिकाधिक परीक्षा केंद्रांवर विभागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

● यासाठी तालुका स्तरापेक्षा परिमंडळ स्तरावर परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा त्रास वाचणार आहे.

To know more click here
https://letsup.app.link/gk4LskoZ7gb
आता लसीकरणासाठी कोविनवर ऑनलाईन नोंदणीची सक्ती नाही

LetsUpp l Trending

● लसीकरणासाठी ‘कोविन’वर ऑनलाईन नोंदणीची सक्ती रद्द करण्याचा निर्णय नुकताच केंद्राने घेतला आहे.

● दरम्यान त्यामुळे १८ वर्षांवरील कोणालाही थेट लसीकरण केंद्रावर जाऊन थेट नोंदणीनंतर लस घेता येणार आहे.

● देशात लसीकरण संथगतीने सुरू असून, ऑनलाईन नोंदणीच्या सक्तीमुळे ग्रामीण भागांमधील नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

● २१ जूनपासून १८ ते ४४ वयोगटासाठीही केंद्रच लसपुरवठा करणार असल्याने लसीकरण मोहीम व्यापक होण्याची आशा आहे.

● या पार्श्वभूमीवर केंद्राने ‘कोविन’वर ऑनलाईन पूर्वनोंदणीची सक्ती न करण्याचा निर्णय घेतल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने सांगितले आहे.

To know more click here
https://letsup.app.link/CmtjnA447gb
लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवावे की नाही? वैज्ञानिकांचा खुलासा !

LetsUpp | Covid Helpline

● गेल्या महिन्यात १३ मे रोजी केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून दुप्पट करत १२ ते १६ आठवडे निश्चित केलं.

● हा निर्णय वैज्ञानिकांच्या गटानं केलेल्या शिफारशींनुसार घेतल्याचं देखील सांगितलं गेलं. पण आता त्याच वैज्ञानिकांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

● लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवून दुप्पट करण्याला आमचा पाठिंबा नव्हता, असा खुलासा तज्ज्ञ गटातल्या ३ सदस्यांनी केला आहे.

● देशात लसींचा तुटवडा असल्याचं समोर येत असतानाच केंद्र सरकारने कोविशिल्डच्या दोन डोसमधलं अंतर १२ ते १६ करण्याचा निर्णय जाहीर केला.

● यासाठी केंद्र सरकारच्या नॅशनल टेक्निकल अॅडवायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन या गटाने अंतर वाढवण्याच्या दिलेल्या सल्ल्यावरून हा निर्णय घेतल्याचं देखील जाहीर करण्यात आलं.

● या गटाने अंतर दुप्पट करण्याला कधीही समर्थन दिलं नव्हतं, असा धक्कादायक खुलासा यापैकी काही तज्ज्ञांनी केला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या या निर्णयावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या सर्व अत्यावश्यक गोष्टी तसेच महत्वपूर्ण माहिती आता मिळवा एका क्लिकवर!
https://letsup.app.link/rSYy5qfT7gb
दूध दरासाठी राज्यभरात आंदोलनाला सुरुवात; शेतकरी रस्त्यावर

LetsUpp l Trending

● दूध दरवाढीच्या मागणीवरून पुन्हा एकदा शेतकरी रस्त्यावर उतरले आहे. राज्यभरात ठिकठिकाणी किसान सभेच्यावतीने आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

● अंबड गावातील अकोले येथे दूधाचा अभिषेक करत आंदोलनाला सुरुवात केली आहे.

● आज किसान सभा आणि संघर्ष समितीतर्फे दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभरातील तहसील कार्यालयासमोर आंदोलनाला सुरूवात केली आहे.

● किसान सभेचे नेते अजित नवले यांच्या उपस्थितीत अकोले तालुक्यातील अंबड येथे दूधाचा अभिषेक करत आंदोलनाला सुरूवात केली आहे.

● लॉकडाऊनपूर्वी दूधाला ३५ रूपये दर मिळत होता तो आता २० रूपये केली आहे. तो पुन्हा ३५ रूपये करण्याची मागणी संघटनेनं केली आहे.

नेमक्या मागण्या काय?
- लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याचा बाऊ करत ज्या खाजगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर पाडले, त्या सर्व दूध संघांचे ऑडिट करा, प्रत्यक्षात दुधाची मागणी किती घटली होती व त्याप्रमाणात किती दर कमी देण्यात आले, याबाबत सखोल चौकशी करा व परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांची लूटमार करणाऱ्या खाजगी व सहकारी दूध संघांवर कठोर कारवाई करा, केलेली लूटमार वसूल करून ती शेतकऱ्यांना परत करा. लॉकडाऊनपूर्वी मिळत असलेला प्रति लिटर ३५ रुपये दर तातडीने सुरू करा.
- आगामी काळात दूध उत्पादकांची लूटमार करता येणार नाही, यासाठी खाजगी व सहकारी दूध संघांना लागू होईल असा लूटमार विरोधी कायदा करा.
- साखर व्यवसायाप्रमाणे दूध व्यवसायाला किमान आधारभावासाठी एफ.आर.पी. व शिल्लक मिळकतीत हक्काच्या वाट्यासाठी रेव्हेन्यू शेअरींग असे कायदेशीर दुहेरी संरक्षण लागू करा.
- अनिष्ट ब्रँड वॉर रोखण्यासाठी एक राज्य एक ब्रँड धोरण स्वीकारा.
- दूध भेसळी बंद करा. टोंन्ड दुधावर बंदी आणा. भेसळ विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करून ग्राहकांना शुद्ध दूध रास्त दरात उपलब्ध होईल याची कायदेशीर हमी द्या.

To know more click here
https://letsup.app.link/DvmkOSpF9gb
केंद्र सरकारने ट्विटरचे कायदेशीर संरक्षण काढून घेतले

LetsUpp | Trending

माहिती तंत्रज्ञान नियमांचे व नवीन आदेशांचे पालन केले नाही म्हणून केंद्र सरकारने ट्विटरचे कायदेशीर संरक्षण काढून घेतले आहे.

ही कारवाई फक्त ट्विटरवर करण्यात आली आहे. गुगल, फेसबूक, युट्यूब, व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम इत्यादींचा दर्जा कायम आहे.

● कायदेशीर संरक्षण हटवणे म्हणजे काय?
माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 79 अंतर्गत थर्ड पार्टी मजकुराबाबत सोशल मीडिया कंपन्यांना संरक्षण मिळत होते. याचा अर्थ, एखाद्याने काही आक्षेपार्ह पोस्ट केली तर त्यासाठी त्या व्यक्तीला जबाबदार धरलं जायचं.

पण, ट्विटरकडून नव्या आयटी नियमांचे पालन झाले नसल्याने यापुढे ट्विटरवर केल्या जाणाऱ्या प्रत्येक पोस्टसाठी कंपनीलाही जबाबदार धरलं जाणार आहे.

● *नियमांची पायमल्ली*
केंद्र सरकारने सगळ्या सोशल मीडिया कंपन्यांना नव्या नियमांबाबत 25 मे पर्यंतची डेडलाईन दिली होती. मात्र विहित वेळेत ट्विटरने भारतीय तक्रारनिवारण अधिकाऱ्याची नियुक्ती न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

● ट्विटरला धोका !
वादग्रस्त आणि बेकायदेशीर मजकूर ट्विटरवर प्रसारित झाल्यास टिवटरच्या उच्चाधिकार्‍यांना पोलिस चौकशीला सामोरे जावे लागेल.

● ट्विटरचा खुलासा
ट्विटरने मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती आम्ही केली आहे अशी माहिती दिली आहे. तसंच केंद्राच्या माहिती तंत्रज्ञान विभागाला याबाबत आम्ही कळवलं असल्याचंही ट्विटरने म्हटलं आहे.

To know more click here
https://letsup.app.link/6JqPpHjG9gb
सीबीएसई बारावी बोर्डाच्या परीक्षाचा फॉर्म्यूला ठरला

LetsUpp | Trending

● बारावीच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सीबीएसईकडून सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे.

● सीबीएसईच्या 12 वीच्या निकाल प्रकरणी नियुक्त केलेली 13 सदस्यीय समितीनं सुप्रीम कोर्टाला आपला अहवाल सादर केला आहे. या समितीनं मार्कशीट तयार करण्यावर अहवाल तयार केला आहे.

असा असणार फॉर्म्युला
● सीबीएसई बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.

● त्यामध्ये दहावी, अकरावी आणि बारावीचे 30:40:40 टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.

निकाल कधी जाहीर होणार? : सीबीएसईने 31जुलै पर्यंत बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याचं जाहीर केलं आहे.

अंतिम निकाल असा बनवला जाणार

● दहावीच्या 5 विषयांपैकी 3 विषयातील सर्वाधिक गुण घेतले जातील. तर अशाचप्रकारे अकरावीच्या पाच विषयांची सरासरी घेतली जाईल.

● तसंच बारावीच्या युनिट, टर्म आणि प्रॅक्टिकलचे गुण अंतिम निकाल बनवण्यासाठी घेतले जातील. दहावीचे 30 टक्के, अकरावी 30 टक्के आणि बारावीच्या 40 टक्के गुणांच्या आधारावर अंतिम निकाल बनवला जाईल.

To know more click here
https://letsup.app.link/rsyc3r6K9gb
हॉलमार्क नसलेल्या तुमच्याकडील दागिन्यांचं काय होणार?

LetsUpp l Trending

● सोन्याच्या दागिन्यांवर १६ जूनपासून हॉलमार्क बंधनकारक केला असला तरी नागरिकांना त्यांच्याकडील जुने हॉलमार्क नसलेले दागिने विकता येणार आहेत.

● व्यावहारिक असल्यास ज्वेलर्स जुने दागिने वितळवून हॉलमार्कसह नवे दागिने तयार करू शकतात, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

● १६ जूनपासून २५६ जिल्ह्यांमध्ये हाॅलमार्क बंधनकारक करण्याची योजना टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार असून ऑगस्ट २०२१ पर्यंत याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जाणार नसल्याचे केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी ज्वेलर्स आणि उद्योजकांशी झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट केले.

● या २५६ जिल्ह्यांमध्ये सोनारांना फक्त १४, १८ आणि २२ कॅरेटचे दागिने विकता येतील. २०, २३ आणि २४ कॅरेटचे दागिनेही बनवता येणार आहेत.

● दरम्यान घड्याळे, फाऊंटेन पेन तसेच कुंदन, पोल्की, जडाऊ आदी आभूषणांमध्ये वापरलेल्या सोन्यावर हॉलमार्कमधून सूट दिल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.

● सरकारने २०१९ मध्ये सोन्याचे दागिने व आभूषणांवर १५ जानेवारी २०२१ पासून हॉलमार्क बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला होता. नंतर याला आणखी चार महिने मुदत वाढवून दिली होती.

● कोरोनामुळे ज्वेलर्स व उद्योजकांनी विनंती केल्याने ही मुदत १५ जूनपर्यंत वाढवली होती.

To know more click here
https://letsup.app.link/9VL8ASGM9gb
PUBG बॅटल ग्राऊंड्स मोबाइल इंडिया गेम आजपासून उपलब्ध...

LetsUpp | Tech

▪️ अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर बॅटल ग्राऊंड्स मोबाइल इंडिया आता भारतात डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होत आहे.

▪️ PUBG Mobile वर चीनसोबत झालेल्या वादानंतर बंदी घालण्यात आली होती. तेव्हापासून या गेमचे चाहते या गेमची वाट पाहत होते.

▪️ ज्यांनी Pre-Register केलं होतं, त्यांच्यापैकी काही जणांना हा गेम आता प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

▪️ आताही ही गेम Early Access मध्येच आहे. प्रि रजिस्टर सुरू केल्यावर २ आठवड्यातच तब्बल २ कोटी युजर्सनी नोंदणी केली होती.

▪️ PUBG Mobile चा आधीचा गेम डेटा या नव्या गेममध्ये Migrate करण्याची सोय देण्यात आली आहे.

▪️ त्यामुळे तुमच्याकडे आधी असलेल्या Skins इथेही उपलब्ध होतील. त्यासाठी Krafton ने Proxima Beta Pte. Limited मार्फत पर्याय दिला आहे.

▪️ दरम्यान, तुम्ही गेम इंस्टॉल करून सुरू केली की तसा पॉपअप आलेला दिसणार आहे.

To know more click here
https://letsup.app.link/Xrb6FDmQ9gb
🎯 *आयसीआयसीआय घेऊन आलेय तुमच्या जीवनशैलीला पूरक क्रेडिट कार्ड*

💳 'आयसीआयसीआय बँक प्लॅटिनम चिप क्रेडिट कार्ड'

✔️ *'या' कार्डचे फायदे एकदा वाचाच!* :

● कॉन्टॅक्टलेस तंत्रज्ञानासह मॅग्निफिसिएंट कार्ड
● रीडीमेबल पेबॅक पॉईंट्स, आकर्षक भेटवस्तू आणि व्हाउचर
● आजीवन मोफत प्लॅटिनम चिप ग्रेट कार्ड
● विशेष ऑनलाईन ऑफर

चिप कार्डच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या आणि तुमचे अर्थ विश्व सुरक्षित करा!

👍 *अधिक माहितीसाठी क्लिक करा* https://offer.trackrpm.com/click?campaign_id=218&pub_id=264&p1=%7Bclick_id%7D

(ADVT)