LetsUpp Marathi
4.86K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
संख्याशास्त्राच्या स्पर्धेत सोलापूरचा प्रशांत ननवरे भारतात दुसरा

LetsUp | Trending

● भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वय मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय संख्याशास्त्राच्या स्पर्धेत भंडीशेगाव (ता.पंढरपूर ) मधील प्रशांत विजय ननवरेने भारतामध्ये द्वितीय क्रमांक मिळविला आहे.2014नंतर प्रथमच महाराष्ट्रातील विद्यार्थीने पारितोषिक मिळविल्याने सर्वत्र प्रशांतचे कौतुक होत आहे.

● प्रशांत ननवरे हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा संख्याशास्र विभाग व प्रगत अध्ययन केंद्राचा विद्यार्थी आहे.ह्या स्पर्धेत देशातील सर्व विद्यापिठांच्या संख्याशास्र विषयामध्ये पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी सहभागी झाले होते.

● फेब्रुवारी 2021मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील केवळ प्रशांतलाच हे पारितोषिक मिळाले आहे.

● ह्या स्पर्धेसाठी पुणे विद्यापिठाच्या संख्याशास्र विभागाच्या शिक्षिका डाॕ.आकांक्षा काशीकर व इतर सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

● अत्यंत गारीब परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या प्रशांतचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भंडीशेगाव ,नवोद्यय विद्यालय पोखरापूर , फर्ग्युसन कॉलेज व पुणे विद्यापिठ येथे झाले आहे.

To know more click here
https://letsup.app.link/HiQ7mYo4Zgb
आता एटीएममधून पैसे काढणे महागणार

LetsUpp | Trending

● एटीएममधून पैसे काढताना आता ग्राहकांना 20 रुपयांऐवजी 21 रुपये मोजावे लागणार आहेत.

● आरबीआयने सर्व बँकांना एटीएम चार्जमध्ये वाढ करण्याची परवानगी दिली आहे.

● यापुढे फ्री लिमिटपेक्षा जास्त वेळा ट्रांझॅक्शन केल्यास जास्तीचे पैसे आकारले जाणार आहेत.

● तर अन्य बँकेतील चारहून अधिक व्यवहारासाठी 15 रुपयांऐवजी 17 रुपये शुल्क भरावे लागेल.

● वाढीव शुल्करचना 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे.

आर्थिक गैरआर्थिक व्यवहार

● गैर आर्थिक ट्रांझॅक्शनसाठी असणारी फी 5 रुपयांवरुन 6 रुपये केली आहे.

● आर्थिक ट्रांझॅक्शन: पैसे काढणे, किंवा पैशाचा व्यवहार करणे.

● गैर आर्थिक ट्रांझॅक्शन: खात्यावरील बॅलेन्स चेक करणे.

दरम्यान आरबीआयचा हा नियम 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होणार आहे.

*चेक बुकसाठी शुल्क :*

एका आर्थिक वर्षात खातेधारकास बॅंक 10 पानी चेकबुक देईल. त्यानंतर चेकबुक करता एसबीआय
शुल्क आकारणार आहे.

● 10 पानी चेकबुक : 40 रुपये आणि जीएसटी शुल्क

● 25 पानी चेकबुक : 75 रुपये आणि जीएसटी शुल्क

● 10 पानी आपत्कालीन चेकबुक : 50 रुपये आणि जीएसटी शुल्क

To know more click here
https://letsup.app.link/vlpEhl1PZgb
मुंबई मनपाकडून खासगी रुग्णालयातील लसींचे दर जाहीर

LetsUp | Trending

● मुंबईत लसीकरण मोहीम अधिक वेगाने करण्यात येणार आहे. यावेळी खासगी रुग्णालयाने लसींसाठी अव्वाच्या सव्वा रक्कम वसुल करू नये म्हणून महापालिका प्रशासनाने खासगी रुग्णालयांसाठी लसींचं दरपत्रक जाहीर केलं आहे.

● त्यानुसार खासगी रुग्णालयात कोव्हिशिल्डसाठी 780 रुपये, कोव्हॅक्सिन 1410 रुपये, आणि स्पुतनिक व्हीसाठी 1 हजार 145 रुपये दर ठरवण्यात आले आहेत.

● त्यात 5 टक्के जीएसटी आणि 150 रुपये सेवा शुल्काचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच यापेक्षा अधिक रक्कम आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

तक्रार कुठे करता येणार?

● कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण राष्ट्रीय मोहीम अंतर्गत, अधिकाधिक नागरिकांना लस देता यावी यासाठी खासगी रुग्णालयांना सशुल्क लसीकरणाची मुभा देण्यात आली आहे.

● त्यासाठी लस उत्पादकांनी ठरवलेले उत्पादन दर आणि त्यावर लागू होणारे कर हे सर्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने कोविड लसींचे कमाल दर निश्चित केले आहेत.

● या दरांनुसारच खासगी रुग्णालयांनी आकारणी करावयाची असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी अधिक रक्कम मागितल्यास complaint.epimumbai@gmail.com या मेलवर तक्रार करण्याचे आवाहन पालिकेने केलं आहे.

To know more click here
https://letsup.app.link/5ks9426c0gb
ऑनलाईन उपस्थितीसाठी विद्यार्थ्यांना मिळणार 1200 रुपये भत्ता : 'या' महापालिकेचा निर्णय

LetsUpp | Trending

● महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाईन शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी व त्यांची नियमित उपस्थिती असावी, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांला सहा महिन्यांसाठी 1200 रुपये प्रोत्सानपर उपस्थिती भत्ता दिला जाणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे.

● कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभर शाळा संपूर्णपणे बंद आहेत. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व ते शिक्षणापासून दूर जावू नयेत. यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले.

● ऑनलाईन शिक्षण पध्दतीचा आढावा घेण्यासाठी महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त डॉ विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीस शिक्षण समिती सभापती योगेश जानकर, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, उपायुक्त मनिष जोशी, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, गट अधिकारी संगीता बामणे व अस्लम कुंगले आदी उपस्थित होते.

To know more click here
https://letsup.app.link/be11uraf0gb
....चहाच्या घोटाने वाचविला 'त्या' दोघांचा जीव

LetsUpp | Pune

● कल्याण-नगर महामार्गावरील माळशेज घाटात अचानक उभ्या असलेल्या व नगरकडून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या एका कारवार माळशेज घाटात दरड कोसळली आहे. यात कारचे नुकसान झाले तर दोघेजण बचावले आहेत.

● सविस्तर घटना अशी की, माळशेज घाटात सध्या पाऊस तसेच दाट धुके आहे. या घाटातून शुक्रवारी सायंकाळी दोन मित्र कारने मुंबईला जात होते.

● चहा पिण्यासाठी ते माळशेज घाटात कार बाजुला लावून खाली उतरले. हॉटेलमध्ये पोहचताच याच वेळी कारवर मोठी दरड कोसळली. यात कारचा चक्काचूर झाला. गाडीत कुणी नसल्याने दुर्घटना टळली.

● घाटात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असून दाट धुके पसरलेले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दरड कोसळल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

To know more click here
https://letsup.app.link/iD6cLzYh1gb
कोरोनातून बरे झालेल्यांना लस देऊ नये; तज्ज्ञांचा दावा!

LetsUpp l Covid HelpLine

● सार्वजनिक आरोग्य या विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी पंतप्रधानांना एक अहवाल दिला आहे. यामध्ये अपुऱ्या लसीकरणामुळे विषाणूचे आणखी नवे प्रकार उत्पन्न होऊ शकतात, असा इशारा देण्यात आला असून कोरोनाची बाधा झालेल्या व त्यातून बरे झालेल्यांना लस देण्याची आवश्यकता नाही असे देखील सांगण्यात आले आहे.

● या टास्क फोर्समध्ये एम्सचे डॉक्टर, इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन, इं. असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसीन, असो. ऑफ पिडेमिऑलॉजिस्टसच्या तज्ज्ञांनी अहवाल बनविला आहे.

● लसींचा तुटवडा असल्याने वयोवृद्ध, स्थूलपणा वा एकाहून अधिक सहव्याधींनी ग्रस्त असलेल्यांमध्ये कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तरुणांना लस देणे किमतीच्या दृष्टीने परवडणारे नाही. असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

● डेल्टा प्रकाराचा संसर्ग असलेल्या भागात कोविशिल्डच्या २ डोसचे १२ आठवड्यांचे अंतर घटवण्याचा विचार करावा. त्याचबरोबर पोलिओ किंवा इतर लसी देण्याच्या मोहिमांमधील अनुभव कोरोना लसीकरण मोहीम राबवण्यासाठी वापरावा असे देखील डॉक्टरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केलेल्या या अहवालात म्हटले आहे.

कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या सर्व अत्यावश्यक गोष्टी तसेच महत्वपूर्ण माहिती आता मिळवा एका क्लिकवर!
https://letsup.app.link/I4YbPFbm1gb
पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...!

(स्त्रोत : लेट्सअप न्यूज नेटवर्क)
राज्यभरामध्ये चार दिवस अतिवृष्टीचा इशारा

LetsUpp l Trending

● मुंबईसह महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनने आगमनाच्या पहिल्याच दिवशी मुंबापुरीला दिलेला तडाखा अजूनही कायम आहे.

● मुंबईला मान्सूनच्या मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले आहे. मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्राला व्यापले आहे.

● नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पावसाने वेग धरला आहे. मुंबईत सलग पाऊस पडत आहे. तर राज्यातील काही भागात संततधार पावसाने हजेरी लावली आहे.

● मुंबईसह उपनगरांमध्ये पुढील ५ दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट दिला आहे.

● या पाच दिवसांत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अति तिव्र मुसळधार पावसाची शक्यता : बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र व त्याची तीव्रता वाढण्याचे पुर्वानुमान आणि त्याबरोबरच त्याचा पश्चिमेकडचा प्रवास हे गृहित धरुन पश्चिम किनारपट्टी म्हणजेच कोकणाकडे पुढील ४ ते ५ दिवस अती तिव्र मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

● पश्चिम किनारपट्टीच्या भागात जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडणार असून, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

To know more click here
https://letsup.app.link/OL3IthOr1gb
शरद पवार-प्रशांत किशोर यांच्या या भेटीत नेमकी चर्चा काय झाली?

LetsUpp l Special

प्रख्यात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेली बैठक राजकीय वर्तृळातील अनेकांच्या भूवय्या उंचावणारी होती. या बैठकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

या भेटीत नेमकी चर्चा काय झाली याची माहिती अद्याप समोर आली नसली तरी आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही याचे पडसाद पहायला मिळणार का? हि भेट देशात-राज्यात पवारांची भाजपविरोधी मोर्चेबांधणीसाठी होती का? अशाच काही शक्यतांबद्दल जाणून घेऊयात...

२०१४ मधील मोदींचा विजय असो किंवा नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल, तमिळनाडूतील निवडणूक असो प्रशांत किशोर यांनी महत्त्वाची भूमिका बजावलीय. या सर्व पार्श्वभूमीचा विचार करता प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने याची दाखल राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे.

1. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याशी सविस्तर चर्चा केल्याने आगामी राजकीय डावपेचांची पवारांनी चाचपणी केल्याचे मानले जाते आहे.

2. महाराष्ट्र आणि केंद्रात भाजपला दूर ठेवायचे, त्याच वेळी देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सक्षम पर्याय कसा द्यायचा? यावरही बैठकीत चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.

3. बिगर भाजप आघाडीचे नेतृत्व शरद पवार यांनी करावे, असा राजधानीत सूर आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रशांत किशोर यांच्याशी केलेली चर्चा महत्त्वाची मानले जाते आहे.

4. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसने यात सहभागी होण्याचे टाळल्यास बिगर भाजप व बिगर काँग्रेसची तिसऱ्या आघाडीच्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे. यात शरद पवार, ममता बॅनर्जी, देवेगौडा, अकाली दल अशा विविध पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

5. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर चर्चा झाल्याचं कळतं. यामुळे विरोधक पवारांना गळ घालणार आहे का? हा हि एक महत्वाचा मुद्दा यानिमित्ताने समोर येत आहे.

महाराष्ट्र आणि केंद्रात भाजपला दूर ठेवणे शक्य होईल का? शरद पवार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुक लढतील का? हे येणारी वेळच सांगेल. मात्र या बैठकीमुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले एवढं नक्की!

To know more click here
https://letsup.app.link/leRn6eGx1gb
पाच वर्ष सत्तेत असतानाही गुलामासारखी वागणूक मिळाली - संजय राऊत यांचे खळबळजनक विधान

LetsUpp | Trending

● शिवसेना नेते खासदार संजय राऊत आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. संजय राऊत यांच्या उपस्थितीत जळगाव महानगर शिवसेनेची आढावा बैठक झाली. यावेळी त्यांनी फडणवीस सरकार विरुद्ध निशाणा साधत खळबळजनक विधान केले.


● "पाच वर्ष राज्यात सत्तेत असतानाही गुलामासारखी वागणूक मिळाली" असे खळबळजनक विधान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी शिवसैनिकांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.

● सत्ता आली म्हणून माजू नका आणि सत्ता गेली म्हणून लाजू नका. जोरात काम केले तर जळगावात आपला खासदार निवडून येईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे

To know more click here
https://letsup.app.link/4HNKwhLF1gb
दिल्लीमध्ये भीषण अग्नितांडव! 30 अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी

LetsUpp l Trending

● राजधानी दिल्लीमध्ये भीषण अग्नी तांडव पहायला मिळत आहे. लाजपत नगरमधील कपड्यांच्या शोरूमला भीषण आग लागली आहे.

● अग्निशमनदलाच्या 30 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून ही दिल्लीमधील सर्वात मोठी आग आहे.

● सेंट्रल मार्केटच्या केएफसीजवळील कपड्यांच्या शोरूमला आग लागली आहे. सकाळी 10.30 च्या सुमारास ही आग लागली आहे. कपड्यांमुळे आगीने रौद्र रूप घेतले आहे.

● अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळात आहे.

● अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पाच मोठ्या कपड्यांची दुकाने आगीच्या विळख्यात आली असून यामध्ये बाटला हँडलूम, संगम साडी आणि रेमंड अशी तीन आणखी दोन मोठ्या दुकानांचा यामध्ये समावेश आहे.

● दिल्लीत वाऱ्याचे प्रमाण अधिक असल्याने विझवलेली आग पुन्हा पेटली आहेत.

To know more click here
https://letsup.app.link/7uJ8a8kx1gb
विद्यापीठात फिरण्यासाठी आता लागणार १ हजार रुपये

LetsUpp l Trending

● पुणे विद्यापीठ परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना एसपीपीयू ऑक्सि पार्क योजना आणली होती. ज्यामध्ये नागरिकांना महिन्याला 1 हजार रुपये आकारावे लागणार असल्याचे परिपत्रक काढले होते.

● मात्र अनेक पुणेकर नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून या परिपत्रकाला विरोध केला. त्यामुळे सावित्रीबाई फुले विद्यापीठ प्रशासनाकडून एक हजार रुपयांच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.

● सावित्रीबाई फुले विद्यापीठ हे सरकारी ठिकाण असताना कुलगुरूंनी आणि विद्यापीठ रजिस्टर यांनी पुणेकरांना लुटण्याचा नवीन फंडा काढला असल्याच्या भावना पुणेकरांनी व्यक्त केल्या होत्या.

● त्या नंतर ही गोष्ट राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या पर्यंत ही गोष्ट पोहचल्यानंतर त्यांनी

● निर्णय स्थगित करून योजनेची पुनर्रचना करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या आहेत असं मंत्री उदय सामंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

● सामंत यांनी विद्यापीठ प्रशासनाशी चर्चा केली. त्यानंतर उदय सामंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्थगितीचं परिपत्रक लवकरच विद्यापीठ प्रशासनाकडून जारी करण्यात येईल अशी माहिती मंत्री सामंत यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

To know more click here
https://letsup.app.link/2cgZasvI1gb
जगाला पहिल्यांदा शून्याची ओळख देणारे 'आर्यभट्ट'

LetsUpp | Special

● जगाला सर्वात आधी शून्याची ओळख देणारे भारतीय, तसेच ग्रह नक्षत्र आणि तारे यांचे ज्ञान असणारे इसवी सन १५०० च्या पूर्वीचे महान व्यक्तिमत्व, आपण सर्व या महान व्यक्तिमत्वाला ओळखत असणारच ते आहेत महान खगोलशास्त्री आणि गणितज्ञ आर्यभट्ट आज त्यांच्या स्मृतिदिन जाणूनन घेऊया त्यांच्या विषयी ज्यांनी जगाला सर्वात आधी बऱ्याच गोष्टींचे ज्ञान दिले.

आर्यभट्ट यांचे सुरुवातीचे जीवन

● आर्यभट्ट यांचा जन्म कधी झाला याविषयी कुठेही असा ठोस पुरावा नाही परंतु आर्यभट्ट यांनी त्यांच्या “आर्यभटिया” या ग्रंथात असा उल्लेख केला आहे कि जेव्हा कलियुगाचे ३६०० वर्ष संपले होते तेव्हा त्यांचे वय २३ वर्ष होते, तर यावरून त्यांचा जन्म इसवी सन ४७६ ला झाला असेल असे इतिहासकार मानतात.आर्यभट्ट यांचे निधन इसवी सन ५५० च्या जवळपास झाल्याचे इतिहासात दिसून येते.

आर्यभट्ट यांचे कार्य

● आपण आज सहज समजतो आणि मानतो सुद्धा कि पृथ्वी अंडाकृती आहे आणि तिच्या स्वतःच्या ध्रुवावर फिरते. तेच नाही तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणून दिवस रात्र होतात, हे सुद्धा आपण आता मानतो.

● आपण समजतो कि हि गोष्ट सर्वात आधी जगाला मध्ययुगातील खगोलशास्त्री निकोलस कॉपरनिकस नी सांगितली पण निकोलस कॉपरनिकस यांच्या १ हजार वर्ष अगोदर आर्यभट्ट यांनी आपल्या ग्रंथात फक्त हेच नव्हते सांगितले कि पृथ्वी गोल आहे, तर तिचे आकारमान सुद्धा सांगितले होते तर आपण विचार करू शकता कि आर्यभट्ट यांनी त्या काळात कसे या गोष्टीचे संशोधन केले होते.

● आर्यभट्ट यांनी आर्किमिडीज़ पेक्षाही अचूक अशी “पाय” ची किमंत सांगितली होती, ती अशी होती ३.१४१६. परंतु नालंदा विश्वविद्यालयाला जाळण्यात आले होते तेव्हा तेथील काही महत्वाची ग्रंथे जाळल्या गेली होती, त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या ग्रंथातील बरेचश्या गोष्टी आज नष्ट झालेल्या आहेत, आणि त्यामुळे त्यांनी केलेले काही नवीन प्रयोग आपल्यापर्यंत पोहचले नाहीत.

● १५ एप्रिल १९७५ साली आर्यभट्ट यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त भारताने “आर्यभट्ट” नावाचा पहिला उपग्रह अवकाशात सोडला.

● भारतीय अवकाश संशोधन करणारी संस्था इस्रो ने २००९ मध्ये पृथ्वीच्या स्ट्रॅटोस्फिअर मध्ये शोधलेल्या तीन जिवाणूंपैकी एका जीवाणुला “बॅसिलस आर्यभट’ असे नाव दिले.

● आंतरराष्ट्रीय खगोलीय संस्थेने चंद्रावरील एका छिद्राला ‘आर्यभट्ट’ असे नाव दिले आहे.

सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप
https://letsup.app.link/nwB0GBmv1gb
१०० दिवसांच्या आत तयार होणार कोणत्याही साथीवरील लस?

LetsUpp | Positive News

● जगभर कोरोनाने थैमान घातलेले असताना ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या जी-७ देशांच्या बैठकीमध्ये मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

● यामध्ये भविष्यातील कोरोना सारख्या संकटांचा सामना करण्यासाठी जी-७ देशांकडून जगासमोर ॲक्शन प्लॅन मांडला जाण्याची शक्यता आहे.

● या घोषणेचे प्रमुख उद्देश भविष्यात अशी कुठली साथ आल्यास त्या साथीवरील लस विकसित करण्यासाठीचा कालावधी १०० दिवसांपेक्षा कमी करणे हा असल्याचे सांगण्यात येत आहे.

● कारण कोरोनाच्या संसर्गास सुरुवात झाल्यानंतर जगाला या आजारावरील पहिली लस मिळवण्यासाठी सुमारे १० महिन्यांपर्यंत वाट पाहावी लागली होती.

● मिळालेल्या माहितीनुसार जी-७ देश एक विशेष अधिवेशनानंतर कार्बिस बे डिक्लरेशन जारी करण्यात येणार आहे.

आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पॉझिटिव्ह बातमी वाचा एका क्लिकवर
https://letsup.app.link/c58qijXN1gb
मुंबईतील पवई तलाव ओव्हरफ्लो, उद्योगांसाठी वापरणार पाणी

LetsUpp | | Trending

● गेल्या वर्षीच्या तुलनेत २४ दिवस आधी भरून वाहिला पवई तलाव १८९० मध्ये ४० लाख रुपये खर्चून बांधण्यात आला होता हा कृत्रिम तलाव या तलावाचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक बाबींसाठी वापरण्यात येते

● बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव आज दिनांक १२ जून २०२१ रोजी दुपारी तीन वाजता च्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागला आहे. हाच तलाव गेल्या वर्षी दिनांक ०५.०७.२०२० रोजी पहाटे ६ वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला होता.

● ही बाब लक्षात घेतल्यास गेल्यावर्षीपेक्षा यंदा हा तलाव सुमारे २४ दिवस आधी भरून वाहू लागला आहे. ५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरले जाते. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

पवई तलावाबाबत महत्त्वाची माहिती संक्षिप्त स्वरुपात पुढीलप्रमाणे आहे :

१. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २७ किलोमीटर (सुमारे १७ मैल) अंतरावर हा तलाव आहे.

२. या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८९० मध्ये पूर्ण झाले.

३. या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ४० लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.

४. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे असते.

५. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये ५४५.५ कोटी लीटर (५४५५ दशलक्ष लिटर) पाणी असते.

६. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.

To know more click here
https://letsup.app.link/pVBydEg21gb
कोणत्या कोरोना रुग्णाला कोणते उपचार द्यावेत? जाणून घेऊया सविस्तर ...

LetsUpp | Covid Helpline

● एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यावर प्रत्येकाला त्याच्या लक्षणांनुसार आणि प्रमाणानुसार वेगवेगळे उपचार दिले जातात. कोणत्या कोरोना रुग्णाला कोणते उपचार द्यायचे, यासाठी काही टेस्ट केल्या जातात.

● सीबीसी, सीआरपी, डी-डायमर, एलडीएच, आयएल 6, एलएफटी , आरएफटी आणि ब्लड शुगर लेव्हल सारख्या लॅबोरेटरी रक्त चाचण्या करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, या चाचण्यांच्या अनुषंगाने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनात अनेक प्रश्न असतात, जाणून घेऊया सविस्तर काही प्रश्नांची उत्तरं.

● सीबीसी/सीबीपी म्हणजे संपूर्ण रक्ताची स्थिती दाखवणारी आकडेवारी. यात रक्तपेशी (आरबीसी), पांढऱ्या पेशी (डब्ल्यूबीसी) आणि प्लेटलेटस (थ्रोम्ब्रोसाईटस) यांची पातळी तसंच परिणात्मक आणि आकारात्मक झालेला बदल दिसून येतो.

● संसर्गामुळे रक्तपेशींमध्ये संख्यात्मक (प्रमाण) आणि मॉर्फोलॉजिकल (आकार) बदल होतात. ज्यामुळे डॉक्टरांना उपचार व्यवस्थापनाची पुढील दिशा ठरवण्यात मदत होते.

सीआरपी

● सी रिअॅक्टिव प्रोटीन यकृतात वेगात संश्लेषित होऊन संसर्गाला प्रतिक्रिया देते. दाह आणि संसर्गाची प्रतिक्रिया म्हणून रक्तातील सीआरपीची पातळी वाढलेली दिसते. मधुमेह आणि रक्तदाबासारख्या तीव्र आजारात याची पातळी सौम्यपणे वाढते. संधिवात आणि संसर्गजन्य संधिवातात ती मध्यम प्रमाणात तर विषाणूजन्य किंवा बुरशीजन्य आजारांमध्ये ही पातळी उच्च प्रमाणात वाढलेली असते.

डी-डायमर

● गंभीर आजार आणि संसर्गामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. याला प्रतिसाद म्हणून, रक्ताच्या गुठळ्या ब्रेक होतात. परंतु, या विरघळलेल्या गुठळ्यांमधील निकृष्ट दर्जाचे पदार्थ लहान रक्त वाहिन्यांमध्ये साठतात आणि यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.

● डी-डायमर हे या गुठळ्यातील निकृष्ट गुठळ्यांचे (फायब्रिन) उत्पादन होय. डी-डायमरची पातळी वाढलेली असणं हे रक्तांच्या गुठळ्या अधिक प्रमाणात असल्याचे सूचित करतं. अशावेळी रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी रक्त पातळ करण्याची औषधे सुरू करण्याची गरज असते.

एलडीएच

● लॅक्टेड डिहायड्रेजनेस हे एन्झामाईन शरीरातील सर्व पेशींमध्ये असतं. काही रोग किंवा संसर्गामुळे पेशींचे नुकसान झालं असल्यास याची रक्तातील पातळी वाढते. अनेकदा अधिक हालचाली किंवा जोरदार व्यायाम केल्याने याची पातळी वाढलेली दिसते.

● अवयवांशी संबंधित विविध प्रकारचे एलडीएच त्या विशिष्ट अवयवाच्या नुकसानी संबंधी माहिती देऊ शकतात.याचा तपासणीचा उपयोग एखादया अवयवची स्थिती बघून निदान आणि उपचारांसाठी होतो.

आयएल 6

● शरीराच्या प्रतिकारशक्तीमुळे इंटरल्युकीन -6 हा पदार्थ बाहेर पडतो. हा पदार्थ यकृतात सीआरपी आणि फायब्रिनसारख्या घटकांचं उत्पादन वाढवून संसर्गास विरोध करतो. आयएल6 ची रक्तातील वाढलेली पातळी सातत्याने होणाऱ्या संसर्गाची प्रतिक्रिया म्हणून दाह स्वरुपात दर्शवते.

● संधिवातासारख्या अनेक दाहक आजारांमध्ये त्याची पातळी वाढल्याचे दिसते. याची पातळी वाढली असता यजमान पेशींच्या संरक्षणासाठी अँण्टी इन्फ्लेमेट्री औषधे किंवा स्टेरॉईडस सुरू करणं गरजेचं असतं.

एलएफटी

● लिव्हर फंक्शन टेस्ट ही रक्ताद्वारे केली जाणारी आणि लिव्हरचे कार्य सामान्यपणे सुरू आहे की नाही हे तपासण्याची एक सामान्य चाचणी असते. लिव्हरचं सामान्य कार्य म्हणजे अलब्युमिनसारखी प्रथिनं तयार करणं आणि बिलीरुबिनसारखे रक्तातील टाकाऊ घटक बाहेर फेकणं.

● रक्तातील प्रोटीनची कमी पातळी आणि एन्झामाईमची उच्च पातळी लिव्हरचे कार्य बिघडल्याचे दर्शवते. एलएफटी ही असामान्य येणे म्हणजे नेहमीच लिव्हर डिसीज असल्याचे दर्शवत नसते तर ते संसर्ग आणि औषधांमुळे देखील असामान्य होऊ शकते.

आरएफटी

● मूत्रमार्ग शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकत किडनी रक्त शुध्द करीत असते. किडनी फंक्शन टेस्टमध्ये किडनीव्दारे फिल्टर केलेल्या अलब्युमिन, युरिया आणि क्रिएटिनिन सारख्या घटकांचे मूल्य दर्शवते.

● असामान्य आकडेवारी किडनीच्या क्षमतेवर परिणाम झाल्याचे दर्शवते. मात्र किडनी फंक्शन टेस्टचा रिपोर्ट असामान्य येणे म्हणजे किडनी विकारच आहे असे समजू नये, कारण रिपोर्ट असमान्य येण्यास अन्य आजार किंवा औषधे देखील कारणीभूत असतात.

युरीन रुटीन मायक्रोस्कोपी किंवा युरिन अॅनालिसिस

● या चाचणीत युरीनची मायक्रोस्कोपखाली तपासणी केली जाते. यात युरीनचे स्वरुप, केंद्रीकरण आणि सामुग्री तपासली जाते. मुत्रमार्गातील संसर्ग, मुतखडा आणि मधुमेहासंबंधी विकारांवर उपचारांकरिता ही चाचणी उपयुक्त ठरते.

ब्लड शुगर टेस्ट

● ही तपासणी प्रामुख्याने रक्तातील ब्लड शुगर लेव्हल बघण्यासाठी केली जाते. मधुमेही रुग्णांवरील उपचारांसाठी ही सर्वात महत्वाची तपासणी असते. तणाव, संसर्ग किंवा स्टेरॉईड सारख्या औषधांमुळे ब्लड शुगर लेव्हल विस्कळीत होऊ शकते.
प्रो-कॅल्सिटोनिन टेस्ट

● रुग्ण बुरशीजन्य आजाराला कशाप्रकारे प्रतिसाद देत आहे, हे पाहण्यासाठी ही रक्ताव्दारे केली जाणारी बायोमार्कर टेस्ट आहे. याची रेंज बुरशी संसर्गाच्या 3ते6 तासांनी वाढते, 12 ते 24 तासांत सर्वोच्च पातळीवर जाते आणि संसर्ग बरा झाल्यावर कमी होते.

● मात्र विषाणूजन्य आजारांमध्ये याची प्रो-कॅल्सिटोनिनची पातळी कमी होते. दुय्यम बुरशीजन्य संसर्गाची तपासणी आणि रोगाची प्रगती ठरवण्यासाठी पीसीटी मदत करते.

● स्टेरॉईडसमुळे किंवा बुरशीच्या संसर्गामुळे डब्ल्यूबीसीची (WBC) संख्या वाढली आहे की नाही हे देखील या टेस्टद्वारे समजू शकते. रुग्णाला अँटिबायोटिक औषधांची गरज आहे की नाही हे ठरवण्यासाठी पीसीटी एक महत्वाचे साधन आहे.

कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या सर्व अत्यावश्यक गोष्टी तसेच महत्वपूर्ण माहिती आता मिळवा एका क्लिकवर!
https://letsup.app.link/dSxDLATU2gb
दहावीच्या निकालाची तारीख ठरली: मूल्यमापन पद्धतीनुसार निकाल तयार होणार

LetsUpp | Trending

● कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. यामुळे मूल्यमापन पद्धतीनुसार निकाल तयार केला जाणार आहे.

● परीक्षेचा निकाल जाहीर होण्यासाठी १५ जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. राज्य मंडळाकडून नववी व दहावीतील अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांच्या आधारे दहावीचा निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यासाठी शाळांकडून प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण मागविले जाणार आहेत.

● शाळांनी विशिष्ट आराखड्यात ऑनलाइन पद्धतीने हे गुण भरून द्यायचे आहेत. राज्य मंडळाने हा आराखडा तयार केला आहे. शाळांनी या आराखड्यामध्ये गुण कसे भरायचे आहेत, या संदर्भांत एक व्हिडिओ तयार केला आहे.

To know more click here
https://letsup.app.link/ujtLvFa22gb
स्वातंत्र्य लढ्यातील महत्वपूर्ण व्यक्तिमत्व गणेश दामोदर सावरकर

LetsUpp | Special

आज 13 जून. भारतीय स्वातंत्र्यसेनानी आणि समाजसुधारक विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू, अभिनव भारत सोसायटीचे संस्थापक वीर स्वातंत्र्यसेनानी गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबाराव सावरकर यांचा जन्मदिवस. त्यांच्या प्रवासाबद्दल थोडक्यात जाणूयात.

गणेश सावरकर उर्फ बाबाराव यांचा जीवनप्रवास :

▪️ १३ जून १८७९ रोजी गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबाराव यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण भगूर गावात गेले. सावरकर लहानपणापासूनच हुशार, अभ्यासू, संघटनकुशल, सततोद्योगी होते.

▪️ तसेच बुद्धिबळ, आट्यापाट्या, विटी-दांडू, धनुष्य-बाण चालविणे वगैरे विविध खेळातही ते पटाईत होते. घरच्या परिस्थितीमुळे आणि कुटुंबाच्या जबाबदारीमुळे बाबारावांचे शालेय शिक्षण मॅट्रिकच्या आतच उरकले पण योगविद्या, वैद्यकाचा नाद असल्याने त्या अनुषंगाने त्यांनी अनेक पुस्तकांचे वाचन केले.

▪️ आईच्या अकाली निधनानंतर १८९६ साली बाबारावांचे लग्न झाले. लग्नानंतर त्यांनी पत्‍नीचे नाव यशोदा ठेवले. बाबारावांना दोन मुले झाली पण दोघेही फार काळ राहू शकली नाही. बाबाराव भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते.

▪️ तात्याराव आणि मित्रांनी १८९९ च्या नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रभक्तसमूह नावाची एक गुप्त संस्था स्थापन केली. सुरुवातीला बाबारावांना या संस्थेबद्दल काहीच माहिती नव्हती. मात्र, नंतर त्यांना माहिती मिळाल्यावर बाबांनी या संस्थेसाठी काम सुरू केले.

▪️ गुप्त संस्थेत तरुणांना प्रवेश देण्यापूर्वी त्यांची मानसिक तयारी पाहण्यासाठी १ जानेवारी १९०० या दिवशी मित्रमेळा नावाची संस्था उघडपणे सुरू करण्यात आली. बाबाराव मित्रमेळा संस्थेचे कार्यवाह होते.

▪️ बाबारावांनी संस्थेतील तरुणांना मार्गदर्शन मिळावे म्हणून लोकमान्य टिळकांसह अनेकांना वेळोवेळी नाशिक येथे आमंत्रण दिले. बाबांच्या प्रयत्‍नांनी राष्ट्रीय चळवळीचे केंद्र म्हणून नाशिक ओळखले जाऊ लागले.

▪️ १९०४ साली मित्रमेळाची गुप्त संस्था म्हणून अभिनव भारत संस्था स्थापन करण्यातही बाबांचा पुढाकार होता. अभिनव भारत ही जहालवाद्यांची संस्था होती. त्यातील लोकांचा पूर्ण स्वातंत्र्य हाच ध्यास होता.

▪️ या दोन संस्थांशिवाय बाबारावांच्या पुढाकारानेच १९०३ साली मित्रसमाज नावाची विद्यार्थ्यांची संस्था आणि १९०५ साली आत्मनिष्ठ युवतीसंघ नावाची स्त्रियांची संघटना स्थापन करण्यात आली.

▪️ या सर्व संस्था आपापल्या कार्यक्षेत्रात स्वदेशीचा पुरस्कार करणार्‍या होत्या आणि यातील निवडक मंडळींना अभिनव भारतशी जोडले जात असे. २०-जुलै-१९०५ रोजी वंगभंगची अधिकृत घोषणा झाली. त्यानंतर याचा विरोध म्हणून सर्वत्र विदेशीचा बहिष्कार - होळी, स्वदेशीचा पुरस्कार सुरू झाला.

▪️ बाबाराव नाशिक येथून आणि तात्याराव पुणे येथून ही चळवळ चालवीत. सशस्त्र क्रांतीचा प्रचारही गुप्तपणे सुरू करण्यात आला. सरकारी यंत्रणा बाबारावांच्या पाळतीवर होतीच. त्यातच बाबाराव मुंबईला गेले आणि क्षुल्लक वादात सापडले.

▪️ त्यावरून चौकशी करून बाबांना २८ फेब्रुवारी १९०९ रोजी मुंबईत अटक करण्यात आली. नंतर त्यांना नाशिकला नेण्यात आले. सखोल चौकशीअंती बाबांच्या घरी आक्षेपार्ह बर्‍याच गोष्टी आढळल्याने त्यांच्यावर तत्कालीन दंडविधानाच्या कलम १२१ आणि १२४ अ अंतर्गत खटला दाखल करण्यात आला.

▪️ ८ जून इ.स. १९०९ रोजी बाबारावांना जन्मठेपेची - काळ्यापाण्याची शिक्षा आणि सर्व मिळकतीच्या जप्तीची शिक्षा तसेच सश्रम कारावासाची शिक्षा ठोठाविण्यात आली. काळ्यापाण्याची शिक्षा अंदमान येथे भोगावयाची होती. ही शिक्षा सुनावल्यावर थोड्याच काळात बाबारावांनी उच्च न्यायालयात फेर निर्णयासाठी याचिका दाखल केली.

▪️ पण यथावकाश त्याचाही निकाल बाबांच्या विरुद्धच लागला आणि जुनी शिक्षा कायम करण्यात आली. काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी इ.स. १९११ साली अंदमानला पाठविण्यात आले. अंदमान येथील शिक्षा अतिशय कठोर स्वरूपाची होती. बाबाराव रोज मरण यातना भोगत.

▪️ दरम्यान, अनेक तरुणांना प्रोत्साहन देऊन सशस्त्र क्रांतीशिवाय पर्याय नसल्याचे त्यांना पटवून दिले. क्रांतिकार्य अव्याहतपणे सुरू असतांनाच १६ मार्च १९४५ रोजी बाबाराव सावरकर यांचे निधन झाले.

सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप
https://letsup.app.link/xO3yvFtV2gb