LetsUpp Marathi
4.86K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
1 सप्टेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू होणार?

LetsUpp | Trending

● बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा जुलैअखेर घेऊन, 15 ऑगस्टपर्यंत निकाल आणि 1 सप्टेंबरपासून व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे नियोजन आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

● तर बीए, बीकॉम, बीएससी अशा विनाव्यावसायिक अभ्यासक्रमांची सीईटी घ्यावी आणि घेऊ नये, असे दोन प्रवाह आहेत.

● त्यामुळे प्रत्यक्षात बारावीचे निकाल हाती आल्यानंतर कुलगुरूंशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. प्रवेशापासून कोणीही वंचित राहणार नाही, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

● कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिक जनता आपलीच आहे. त्यांना मराठीतून शिक्षण मिळावे, यासाठी महाराष्ट्राच्या हद्दीत शिवाजी विद्यापीठाच्या प्रयत्नातून कौशल्यपूर्ण पाच अभ्यासक्रम सुरू करीत आहोत.

● लवकरच स्वतःच्या जागेत हे शैक्षणिक संकुल निर्माण करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लवकरच होईल, असे उदय सामंत यांनी सांगितले.

To know more click here
https://letsup.app.link/GPN7eGHsWgb
कोरोना लसींच्या किंमती निश्चित; असे आहेत नवीन दर

LetsUpp | Covid Helpline

● देशातील लस उत्पादकांकडून 75 टक्के लसीचे डोस केंद्र सरकार खरेदी करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

● दरम्यान 25 टक्के लसी खासगी क्षेत्रात उलब्ध करून देण्याची परवानगी देण्यात आली आहे.

● आता खासगी क्षेत्रातील रुग्णालयांमध्येदेखील कोरोना लसींच्या कमाल किंमती किती असतील, हे केंद्र सरकारने निश्चित करून दिले आहे.

खासगी रुग्णालयांत अशा असणार लसींच्या किंमती :
• कोविशिल्ड: 780 रुपये
• कोवॅक्सिन: 1410 रुपये
• स्पुतनिक व्ही: 1145 रुपये

● दरम्यान आता लसीकरणाच्या नावाखाली रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयांना चाप बसणार आहे.

कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या सर्व अत्यावश्यक गोष्टी तसेच महत्वपूर्ण माहिती आता मिळवा एका क्लिकवर!
https://letsup.app.link/ojBXz5cjWgb
पहा व्हिडिओ : https://www.instagram.com/p/CP5TzUfplwm/

letsupp.marathi
कोकण रेल्वेला भीषण आग!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप रेल्वे स्टेशन परिसरात कोकण रेल्वेच्या विद्युत दुरुस्ती सामान ठेवण्याच्या कोचला लागली आग... आगीची भीषणता दाखवणारा व्हिडिओ समोर आला आहे.
रिपोर्टर : विवेक ताम्हणकर
व्हिडिओ एडिटर : सुहास साबळे
-
बातम्या, मनोरंजन, Job Alerts आणि बरंच काही, फक्त #LetsUppApp वर!
https://letsupapp.page.link/apps
MHT CET साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?

LetsUpp | Trending

● MHT CET २०२१ साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी ८ जूनपासून ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी ७ जूलैपर्यंत अर्ज करु शकतात.

● इंजीनियरिंग, टेक्नोलॉजी, फार्माकोलॉजी किंवा अ‍ॅग्रीकल्चर एज्युकेशनमध्ये प्रवेश घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट mahacet.org वर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकता.

● महाराष्ट्र उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एमएचटी सीईटी २०२१ च्या ऑनलाईन नोंदणी आणि अर्जाच्या शेवटच्या तारखेची घोषणा केली.

● इंजीनियरिंग आणि टेक्नॉलॉजी, फार्मेसी, आणि फार्म डी डिग्री कोर्सेस पहिल्या वर्षामध्ये प्रवेश करण्यासाठी एमएचटी सीईटी अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डवर आधारित असेल.

To know more click here
https://letsup.app.link/bFGYkOpJWgb
एकाच वेळी दिला १० बाळांना जन्म; ‘गिनीज बुक’मध्ये विश्व विक्रमाची नोंद

LetsUpp | International

● एखाद्या माहिलेने एकाच वेळी दहा बाळांना जन्म दिल्याचे तुम्हाला सांगितले तर तुम्ही सांगणाऱ्याला वेड्यात काढाल. मात्र दक्षिण आफ्रिकेमध्ये एका महिलेने एकाच वेळी १० बाळांना जन्म दिला असून याची नोंद गिनीज बुकने घेतली आहे. गोसियामी धमारा सिटहोल असं या माहिलेचे नाव आहे.

● ३७ वर्षीय गोसियामी धमारा सिटहोल यांच्या पोटी एकाच वेळी जन्माला आलेल्या १० बाळांमध्ये सात मुलं आणि तीन मुलींचा समावेश आहे. गरोदर असतानाच डॉक्टरांनी या महिलेला सहा बाळं होतील असा अंदाज व्यक्त केला होता.

● मात्र ७ जून रोजी या महिलेच्या पोटात फार दुखू लागल्याने तिच्यावर शस्त्रक्रीया करुन सिझेरियन पद्धतीने बाळांना जन्म देण्याचा निर्णय घेण्यात आला. या महिलेने दहा बाळांना एकाच वेळी जन्म दिल्याने डॉक्टरांना आश्चर्य वाटत आहे. सर्व बाळांची प्रकृती ठणठणीत आहे.

देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप
https://letsup.app.link/wheaTovMWgb
एक नजर या घडीच्या महत्वाच्या बातम्यांवर...

(स्रोत : लेट्सअप न्यूज नेटवर्क)

-

बातम्या, मनोरंजन, Job Alerts आणि बरंच काही, फक्त #LetsUppApp वर!
https://letsupapp.page.link/apps
(Link in the bio)
राज्यातील कोरोना रुग्णसंख्या स्थिर

LetsUpp | Trending

● आज राज्यात १०,९८९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले, तसेच आज १६,३७९ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले
राज्यात आजपर्यंत एकूण ५५,९७,३०४ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरेहोण्याचे प्रमाण ९५.४५% झाले आहे

● आज राज्यात २६१ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.७४% एवढा
झाला आहे.

● आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,७१,२८,०९३ प्रयोगशाळा नमुन्यापैकी ५८,६३,८८० नमनुे पॉझिटिव्ह आलेआहेत.

● सध्या राज्यात ११,३५,३४७ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत तर ६,४९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत.

To know more click here
https://letsup.app.link/U7h5zXhWWgb
*आज २०२१ वर्षातील पहिले सूर्यग्रहण; जाणून घ्या सर्व काही!*

LetsUpp | Trending

● आज गुरुवारी १० जून रोजी या वर्षीचे पहिले सूर्यग्रहण होणार आहे.

● हे सूर्यग्रहण दुपारी १ वाजून ४२ मिनिटांनी लागेल आणि संध्याकाळी ६ वाजून ४१ मिनिटांनी संपणार आहे.

● अमावस्येच्या दिवशी चंद्र सूर्य आणि पृथ्वी यांच्या मधोमध येतो, तेव्हा त्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात.

● भारतात आंशिक सूर्यग्रहण दिसेल. म्हणून सूर्यग्रहणाच्या दिवशी सुतक काळ मानला जाणार नाही.

● हे सूर्यग्रहण उत्तर अमेरिका, युरोप, उत्तर कॅनडा आणि रशिया आणि आशियामध्ये अंशतः दिसेल.

● भारतात अरुणाचल प्रदेश आणि लडाखचा भाग वगळता, सूर्यग्रहण दिसणार नाही.

To know more click here
https://letsup.app.link/ICra0CCVXgb
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत अत्यंत महत्वाची बातमी

LetsUpp | Trending

● कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द झाली मात्र निकाल कशापद्धतीने जाहीर होणार याकडे विद्यार्थ्यांसह
पालकांचे लक्ष लागून होते.

● या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल करण्यासंदर्भातील
कार्यपद्धती जाहीर केली.

असे होणार निकालाबाबतचे मूल्यमापन

● यामध्ये नववीचा अंतिम निकाल, दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व दहावीचे अंतिम तोंडी/प्रात्याक्षिक/
अंतर्गत मूल्यमापन इत्यादींच्या आधारे विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात येणार आहे.

● त्यानुसार इयत्ता नववीतील 100 पैकी 50 गुण तर दहावीतील 80 पैकी 30 गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

● निकाल कधी जाहीर होणार? : दहावीचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल, अशी चर्चा सध्या सुरु आहे.

To know more click here
https://letsup.app.link/OxjBy0lPXgb
भारताचे ऐतिहासिक पाऊल; कोरोना लसीच्या 'या' चाचण्या करणारा पहिला देश

LetsUpp l Positive News

● कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे. ही तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे सांगितले जाते. यासाठी २ वर्षाच्या मुलांवर कोरोना लसीची चाचणी ट्रायल करण्यात आली आहे. जगात छोट्या वयातील मुलावर कोरोना चाचणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

● भारत बायोटेकची कोवॅक्सिनची या मुलांवर चाचणी करण्यात येत आहे. कानपूरच्या प्रखर हॉस्पिटलमध्ये मंगळवारपासून ही चाचणी करण्यात येत आहे. लसीची चाचणी करण्यासाठी तीन गटात मुलांना विभागण्यात आलं आहे.

● पहिल्या गटात २-६ वयोगटातील मुले. दुसऱ्या गटात ६ ते १२ वयोगट तर तिसऱ्या टप्प्यात १२ ते १८ वयोगटातील मुलांचा समावेश करण्यात आला आहे. याचे सकारात्मक परिणाम समोर येऊ लागले आहेत.

जगातील पहिलीच चाचणी

● लसीच्या चाचणीचे मुख्य संशोधक बालरोग तज्ज्ञ प्रोफेसर वीएन त्रिपाठी म्हणाले की, २ वर्षाच्या मुलांवर कोरोना चाचणी करण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे. इतक्या छोट्या वयोगटातील मुलांवर कोरोना लसीची चाचणी कुठेच झाली नाही. आता २ वर्षाच्या मुलांवर कोरोना लसीची चाचणी करण्यात येईल असं त्यांनी सांगितले.

● रशियाची स्पुतनिक आणि झायडस कॅडिला लसीची चाचणीही झाली. लस उत्पादन करणाऱ्या अन्य कंपन्या कानपूरमध्ये चाचणी करण्यासाठी प्रयत्नात आहे. कोवॅक्सिनचं नेजल स्प्रे पुढील महिन्यात येणार आहे.

आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पॉझिटिव्ह बातमी वाचा एका क्लिकवर
https://letsup.app.link/oheeh7XiYgb
लस घेतल्यानंतर हाताला चिकटल्या लोखंडी वस्तू : व्हायरल व्हिडिओने संभ्रम

LetsUpp | Trending

● कोरोनाच्या लसीबद्दल नागरिकांच्या मनात संभ्रम अवस्था आहे. नाशिकमधील सिडको येथील एका ज्येष्ठ नागरिकाने डाव्या दंडावर लस घेतल्यानंतर त्याच्या दोन्ही हाताला स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

● जिल्हा प्रशासनाने हा संशोधनाचा विषय असल्याचं सांगितलं असलं तरी आता ग्रामीण भागात हा व्हिडीओ व्हायरल झाला तर आदिवासींमध्ये आणखी उदासीनता निर्माण होण्याची शक्यता आहे.

● सिडकोच्या शिवाजी चौकात राहणारे अरविंद जगन्नाथ सोनार यांनी कोरोनाच्या कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहे. कोरोना लस घेतलेल्याच्या हाताला लोखंडी, स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचं समजल्यावर त्याने वडिलांच्या हातावर हा प्रयोग करून बघितला आहे.

● वडिलांच्या हाताला लोखंडाच्या व स्टीलच्या वस्तू, कॉईन, चमचे चिटकत असल्याचे निदर्शनास आले. हाताला घाम आला असेल म्हणून त्यांनी हात धुतला, मात्र पुन्हा हाच प्रकार घडला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही अशा वस्तू चिटकत असल्याचे समोर आले आहे.

● याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनाही हा संशोधनचा विषय असल्याचं सांगितलं आहे. लस घेतल्यानंतर वस्तू चिकटत असल्याचा दावा डॉ. थोरात यांनी फेटाळून लावला आहे. सदर इसमाची तपासणी करत तज्ञ मंडळींकडून अहवाल मागवण्यात आला आहे.

To know more click here
https://letsup.app.link/Oc8wgxLnYgb
शेतकऱ्याचा नादखुळा, एकाच झाडावर घेतलं देशी-विदेशी आंब्याचं उत्पादन

LetsUpp | Trending

▪️ सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील अंतराळ येथील एका शेतकऱ्यानं एकाच आंब्याच्या झाडावर २२ प्रकारच्या जातीच्या आंब्यांचं उत्पादन घेतलं आहे.

▪️ काकासाहेब सावंत असे या शेतकऱ्याचे नाव असून त्याने एकाच आंब्याच्या झाडावर 22 प्रकारच्या जातीचे आंबे घेण्याची किमया साधलीय.

▪️ एकाच झाडाला सावंत यांनी वेगवेगळ्या जातीची 44 कलम केली आहेत.

▪️ त्यापैकी 22 जातीचे कलम लागू झाले आणि यंदा या एकाच झाडांच्या आंब्याला 22 प्रकारचे आंबे आले आहेत.

या जातीच्या आंब्यांचा समावेश :

▪️ केशर, हापुस, सिंधू, रत्ना, सोनपरी, नीलम, निरंजन, आम्रपाली, क्रोटोन, तैवान, लालबाग, दशेरी, राजापुरी, बेनिश, पायरी, बारोमाशी, वनराज, मलगोबा, मल्लिक्का, तोतापुरी

▪️ यातील काही आंब्याचा तोडा झाला असून 22 जातीच्या मिळून जवळपास 700 आंबे लागले होते. काही जातीचे 4-4 डझन तर काही जातीचे 2-3 डझन आंबे लागले आहेत.

सावंत यांचा थोडक्यात प्रवास :

▪️ जत तालुक्यातील अंतराळ गावचे काकासाहेब सावंत यांनी नोकरी सोडून गाव गाठले आणि शेती सुरू केली. नंतर शासनमान्य बनशंकरी नावाने नर्सरी सुरू केली.

▪️ या तालुक्यातील शेती निसर्गाच्या कृपेवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीतही मोठ्या हिंमतीने काकासाहेब सावंतांनी नर्सरी सुरू केली आहे.

▪️ दरम्यान, सावंत यांना नर्सरीच्या व्यवसायात वर्षाकाठी 50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.

To know more click here
https://letsup.app.link/w7UrffUqYgb
राज्यात पुढील पाच दिवस धुवाँधार पावसाचा अंदाज : 17 जूनपर्यंत पेरण्या टाळा

LetsUpp | Trending

● महाराष्ट्रात पुढील पाच दिवस धुवाँधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रतील कोकण किनारपट्टीवर अत्यंत मुसळाधार पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि कोकणात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर दिली आहे.

● नागरिकांनी झाडाखाली थांबू नये. जलसाठा जवळ, नदी जवळ जाऊ नये. लहान मुलांना जलसाठ्यावर, नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये. पुलावरून तसेच नाल्यावरून पाणी वाहत असताना कोणीही स्वतः किंवा वाहनासह पुल, नाला ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.

● पाऊस सुरू असताना विजेच्या तारा, जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते, विजांचा कडकडाट सुरू असताना नागरिकांनी घराबाहेर जाणे टाळावे, शेतकऱ्यांनी 17 जूनपर्यंत पेरण्या टाळाव्यात, असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे.

To know more click here
https://letsup.app.link/QZj25cZEYgb
VIDEO! मराठा आरक्षणाबाबत छत्रपती संभाजीराजे म्हणाले राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी

LetsUpp | Trending

● मराठा आरक्षणाबाबत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांकडे बोट करत आहेत. आपल्याला आता कुणाच्या चुका काढायच्या नाहीत. पहिल्यांदा राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे. कलम 338 बी मधून पुन्हा मराठा समाजाला मागास असल्याचे सिद्ध केले पाहिजे अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली.

● कोल्हापुरात संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत मराठा समाजाची बैठक झाली. कोल्हापुरातील सर्व समन्वयक या बैठकीला उपस्थित होते. 16 जूनला मराठा समाजाच्या वतीनं जे आंदोलन करण्यात येणार आहे त्यावर चर्चा करण्यात आली.

व्हिडिओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा : https://youtu.be/yhavSklp6LQ

● येत्या 16 जून रोजी कोल्हापूर, नाशिक, अमरावती, संभाजीनगर, रायगड याठिकाणी सुरुवातीला आंदोलन होईल.36 जिल्ह्यात आंदोलन केलं जाईल आणि मराठा आरक्षणावर निर्णय झाला नाही तर एकदाच जोर लावाण्यात येईल. त्यात पुण्यापासून मंत्रायलापर्यंत लॉंग मार्च काढला जाईल. या मोर्चासाठी सर्व आमदार, खासदार यांचा सन्मान ठेऊन बोलवू.

● संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, "येत्या 12 तारखेला कोपर्डीला जाणार काकासाहेब शिंदे यांना अभिवादन केले जाणार. जे आमदार खासदर येणार नाही त्यांची रिकामी पाटी लावली जाणार. 16 तारखेला आता मूक आंदोलन करण्यात येईल.आम्ही बोललो आता लोकप्रतिनिधीनी बोलायला हवं. आपली व्हॉट बँक बाजूला जाईल म्हणून कुणी बोलत नाही."

● माझे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते या सगळ्यांशी संबध चांगले असल्याचं सांगत संभाजीराजे म्हणाले की, "माझ्या मराठा समाजासाठी काय करता ते सांगा. मी समाजाची दिशाभूल करणारा नाही, दिशा देणारा आहे. शाहू महाराजांच्या भूमीतून आंदोलन व्हावं अशी भूमिका सर्व समन्वयक यांनी घेतली."

To know more click here
https://letsup.app.link/ujCj3NJJYgb
कोरोना लसीकरणासाठी जिओचा पुढाकार : WhatsApp वर मिळणार 'ही' माहिती

LetsUpp | Trending

● भारताने लसीकरण मोहिमेला जोरदार सुरवात केली आहे. लसीकरणाबद्दल जागरुकता निर्माण करण्यावर केंद्र आणि राज्य सरकारने भर दिला. आता लसीच्या तुतवड्याच्या समस्येवर भारताने मात करून सर्वत्र पुन्हा लसीकरणाला सुरवात केली आहे.

● रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना कोरोना लसीच्या उपलब्धते विषयी जागरूक करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिओने व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटवरुन आपल्या ग्राहकांना कोव्हिड -19 लस आणि इतर ग्राहक सेवा देण्यास सुरवात केली आहे.

या सुविधा मिळतील

● जीओने सुरु केलेल्या या नवीन सेवेद्वारे, सेशन रीफ्रेश करण्यासाठी Jio युजर्स वन-टाइम पासवर्डच्या त्रासातून वाचतील. ही सेवा त्यांना कोणत्याही अडचणीशिवाय कोरोना लसीच्या उपलब्धते बद्दल माहिती मिळवण्यात मदत करेल.

● 'जिओ यूजर्स आता व्हॉट्सअ‍ॅपवर जियो चॅटबॉटवर रिचार्ज करू शकतात, पेमेंट करू शकतात, प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतात. याशिवाय तक्रार देखील दाखल करु शकतात. ही सेवा कोव्हिड -19 या लसीच्या उपलब्धते विषयी ही माहिती देते.

● तुम्हाला 7000770007 या क्रमांकावर फक्त 'Hi'टाइप करावे लागेल. यानंतर कंपनी तुमचा या सेवेमध्ये समावेश करुन घेईल आणि तुम्हाला वेळोवेळी नोटीफिकेशन मिळेल.

To know more click here
https://letsup.app.link/sdvf277MYgb
पॉकेट व्हेंटिलेटरची निर्मिती ; भारतीय वैज्ञानिकानं लावला शोध

LetsUpp l Positive News

● कोरोनाची दुसरी लाट कमी होत असली तरी दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सची कमतरता देशात जाणवली होती. परंतु यावर कोलकात्यातील एका वैज्ञानिकानं तोडगा काढला आहे. त्यांनी एका पॉकेट व्हेंटिलेटरची निर्मिती केली आहे.

● डॉ. रामेंद्र लाल मुखर्जी असं त्यांचं नाव असून ते एक इंजिनिअर आहेत. त्यांनी नुकताच बॅटरीवर चालणारा व्हेंटिलेटर तयार केला आहे. तसंच हा व्हेंटिलेटर सहजरित्या काम करू शकतो आणि स्वस्तदेखील आहे. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास जाणवत असेल तर तो रुग्णांसाठी अतिशय दिलासादायक ठरू शकतो.

कार्य कसं करतो ?

यामध्ये डिव्हाईसमध्ये दोन युनिट आहेत. पॉवर आणि व्हेंटिलेटर हे मास्कशी जोडलेले आहेत. एक बटन दाबल्यानंतर व्हेंटिलेटर काम करण्यास सुरूवात करतो. तसंच याद्वारे शुद्ध ऑक्सिजन रुग्णापर्यंत पोहोचवला जातो. जर कोणत्याही रुग्णाला कोरोनाची लागण झाली असेल तर युव्ही फिल्टर विषाणूचा खात्मा करण्यास मदत करतो आणि शुद्ध हवा रुग्णापर्यंत पोहोचवतो, असं मुखर्जी म्हणाले.

काय आहे विशेष?

या व्हेंटिलेटरची एक महत्त्वाची बाब म्हणजे यात एक कंट्रोल नॉब आहे जो हवेचा फ्लो कंट्रोल करतो. याचं वजन केवळ २५० ग्राम आहे. हा व्हेंटिलेटर ब‌ॅटरीच्या मदतीने चालतो. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर हा व्हेंटिलेटर ८ तास काम करतो. तसंच अँड्रॉईड फोनच्या चार्जरनंही हा व्हेंटिलेटर चार्ज करता येऊ शकतो.

आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पॉझिटिव्ह बातमी वाचा एका क्लिकवर
https://letsup.app.link/OWAwc5t2Zgb
संख्याशास्त्राच्या स्पर्धेत सोलापूरचा प्रशांत ननवरे भारतात दुसरा

LetsUp | Trending

● भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वय मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय संख्याशास्त्राच्या स्पर्धेत भंडीशेगाव (ता.पंढरपूर ) मधील प्रशांत विजय ननवरेने भारतामध्ये द्वितीय क्रमांक मिळविला आहे.2014नंतर प्रथमच महाराष्ट्रातील विद्यार्थीने पारितोषिक मिळविल्याने सर्वत्र प्रशांतचे कौतुक होत आहे.

● प्रशांत ननवरे हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा संख्याशास्र विभाग व प्रगत अध्ययन केंद्राचा विद्यार्थी आहे.ह्या स्पर्धेत देशातील सर्व विद्यापिठांच्या संख्याशास्र विषयामध्ये पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी सहभागी झाले होते.

● फेब्रुवारी 2021मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील केवळ प्रशांतलाच हे पारितोषिक मिळाले आहे.

● ह्या स्पर्धेसाठी पुणे विद्यापिठाच्या संख्याशास्र विभागाच्या शिक्षिका डाॕ.आकांक्षा काशीकर व इतर सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

● अत्यंत गारीब परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या प्रशांतचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भंडीशेगाव ,नवोद्यय विद्यालय पोखरापूर , फर्ग्युसन कॉलेज व पुणे विद्यापिठ येथे झाले आहे.

To know more click here
https://letsup.app.link/HiQ7mYo4Zgb
आता एटीएममधून पैसे काढणे महागणार

LetsUpp | Trending

● एटीएममधून पैसे काढताना आता ग्राहकांना 20 रुपयांऐवजी 21 रुपये मोजावे लागणार आहेत.

● आरबीआयने सर्व बँकांना एटीएम चार्जमध्ये वाढ करण्याची परवानगी दिली आहे.

● यापुढे फ्री लिमिटपेक्षा जास्त वेळा ट्रांझॅक्शन केल्यास जास्तीचे पैसे आकारले जाणार आहेत.

● तर अन्य बँकेतील चारहून अधिक व्यवहारासाठी 15 रुपयांऐवजी 17 रुपये शुल्क भरावे लागेल.

● वाढीव शुल्करचना 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे.

आर्थिक गैरआर्थिक व्यवहार

● गैर आर्थिक ट्रांझॅक्शनसाठी असणारी फी 5 रुपयांवरुन 6 रुपये केली आहे.

● आर्थिक ट्रांझॅक्शन: पैसे काढणे, किंवा पैशाचा व्यवहार करणे.

● गैर आर्थिक ट्रांझॅक्शन: खात्यावरील बॅलेन्स चेक करणे.

दरम्यान आरबीआयचा हा नियम 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होणार आहे.

*चेक बुकसाठी शुल्क :*

एका आर्थिक वर्षात खातेधारकास बॅंक 10 पानी चेकबुक देईल. त्यानंतर चेकबुक करता एसबीआय
शुल्क आकारणार आहे.

● 10 पानी चेकबुक : 40 रुपये आणि जीएसटी शुल्क

● 25 पानी चेकबुक : 75 रुपये आणि जीएसटी शुल्क

● 10 पानी आपत्कालीन चेकबुक : 50 रुपये आणि जीएसटी शुल्क

To know more click here
https://letsup.app.link/vlpEhl1PZgb
मुंबई मनपाकडून खासगी रुग्णालयातील लसींचे दर जाहीर

LetsUp | Trending

● मुंबईत लसीकरण मोहीम अधिक वेगाने करण्यात येणार आहे. यावेळी खासगी रुग्णालयाने लसींसाठी अव्वाच्या सव्वा रक्कम वसुल करू नये म्हणून महापालिका प्रशासनाने खासगी रुग्णालयांसाठी लसींचं दरपत्रक जाहीर केलं आहे.

● त्यानुसार खासगी रुग्णालयात कोव्हिशिल्डसाठी 780 रुपये, कोव्हॅक्सिन 1410 रुपये, आणि स्पुतनिक व्हीसाठी 1 हजार 145 रुपये दर ठरवण्यात आले आहेत.

● त्यात 5 टक्के जीएसटी आणि 150 रुपये सेवा शुल्काचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच यापेक्षा अधिक रक्कम आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

तक्रार कुठे करता येणार?

● कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण राष्ट्रीय मोहीम अंतर्गत, अधिकाधिक नागरिकांना लस देता यावी यासाठी खासगी रुग्णालयांना सशुल्क लसीकरणाची मुभा देण्यात आली आहे.

● त्यासाठी लस उत्पादकांनी ठरवलेले उत्पादन दर आणि त्यावर लागू होणारे कर हे सर्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने कोविड लसींचे कमाल दर निश्चित केले आहेत.

● या दरांनुसारच खासगी रुग्णालयांनी आकारणी करावयाची असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी अधिक रक्कम मागितल्यास complaint.epimumbai@gmail.com या मेलवर तक्रार करण्याचे आवाहन पालिकेने केलं आहे.

To know more click here
https://letsup.app.link/5ks9426c0gb
ऑनलाईन उपस्थितीसाठी विद्यार्थ्यांना मिळणार 1200 रुपये भत्ता : 'या' महापालिकेचा निर्णय

LetsUpp | Trending

● महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाईन शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी व त्यांची नियमित उपस्थिती असावी, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांला सहा महिन्यांसाठी 1200 रुपये प्रोत्सानपर उपस्थिती भत्ता दिला जाणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे.

● कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभर शाळा संपूर्णपणे बंद आहेत. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व ते शिक्षणापासून दूर जावू नयेत. यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले.

● ऑनलाईन शिक्षण पध्दतीचा आढावा घेण्यासाठी महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त डॉ विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीस शिक्षण समिती सभापती योगेश जानकर, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, उपायुक्त मनिष जोशी, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, गट अधिकारी संगीता बामणे व अस्लम कुंगले आदी उपस्थित होते.

To know more click here
https://letsup.app.link/be11uraf0gb