LetsUpp Marathi
4.86K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
✍🏻 *सीमेवरचा तणाव*

*LetsUp l Editorial*

लडाखमधील तणावातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असताना नेपाळच्या सीमेवर मात्र तणाव वाढतो आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी नेपाळच्या अंतर्गत राजकारणात नाक खुपसण्याची किंमत आपण मोजतो आहोत. नेपाळची राज्यघटना कशी असावी, त्यांच्या प्रांतांची रचना कशी असावी, याचा निर्णय घ्यायचा पूर्णतः अधिकार तेथील संसदेचा आहे. तेथील मधेशीसारख्या समाजघटकांवर अन्याय होत असेल, तर तो दूर करण्याची जबाबदारीही नेपाळची आहे. मधेशी समाजाबाबतच्या भावना आपण फक्त त्या सरकारच्या कानी घालणे आपले काम होते; परंतु आपल्या राज्यकर्त्यांनी त्यांच्या अंतर्गत कारभारात नाक खुपसले. चुकलेल्या परराष्ट्र धोरणाची किंमत आपल्याला मोजावी लागते आहे.

सरकार ते मान्य करणार नाही, हा भाग वेगळा. नेपाळमध्ये सत्तांतर झाले आणि तेथील राज्यकर्त्यांनी भारताऐवजी चीनला जवळ केले. भारताच्या सीमा नेपाळला लागून आहेत. बिहारमधील अनेकांचे रोटीबेटी व्यवहारही नेपाळमध्ये होतात. सीतामढी जिल्ह्यात तर दररोज काही लोक रोजगारासाठी परस्परांच्या देशात जातात. नेपाळचा ऐंशी टक्के व्यापार भारताशी निगडीत होता; परंतु एका चुकीमुळे आता बहुतांश व्यापार चीनच्या ताब्यात गेला. व्यापार जाण्यामुळे जेवढे नुकसान झाले नाही, तेवढे नुकसान चीनने नेपाळपर्यंत रस्ते, विमान, लोहमार्ग टाकण्यामुळे होणार आहे.

चीनचे सैन्य नेपाळमार्गे भारतावर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या सीमांवर अधिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आताही चीनच्या सांगण्यावरूनच मानससरोवराला जाण्याचा मार्ग नेपाळ बंद करतो आहे. भारताचा काही भाग नेपाळच्या नकाशात दाखविण्यात आला आहे. संसदेची मान्यतही घेण्यात आली आहे. नेपाळसारखा छोटा देश भारतासारख्या आर्थिक महासत्ता म्हणविल्या जाणा-या देशाला आव्हान देतो, यावरून भारताची कशी कोंडी झाली आहे, हे लक्षात यायला हरकत नाही. भारत नेपाळ तणाव भारत आणि नेपाळ यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नेपाळ सशस्त्र संरक्षक दलाने बिहार सीमेवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात एक भारतीय ठार झाला. यामुळे सीमेवरचा ताण आणखीच वाढला आहे.

आतापर्यंत पाकिस्तानच्या सीमेवर अशा चकमकी व्हायच्या. आता नेपाळ सीमेवरही ते घडायला लागले आहे. नेपाळ सशस्त्र संरक्षक दलाने केलेल्या गोळीबारात एका शेतक-याला प्राण गमवावे लागले. काही जखमी झाले. त्यांची प्रकृती ही चिंताजनक आहे. आता दोन्ही बाजूंनी सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. नेपाळ सशस्त्र संरक्षक दलाने भारतीयांना लक्ष्य करत अंदाधुंद गोळीबार केला. नेपाळ सशस्त्र संरक्षक दलाने सीमाभागातून एका व्यक्तीला ओलीस ठेवले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार नेपाळमधून 18 फैरी झाडल्या. सीतामढीच्या खासदारांनी तर हा भारत-नेपाळ मैत्रीसंबंधावर गोळीबार असल्याचे म्हटले आहे.

बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील रहिवासी लगन राय हे आपल्या मुलासह एका महिला नातेवाइकाला भेटण्यासाठी सीमेवर गेले. नेपाळ सशस्त्र संरक्षक दल त्यांना सीमेवरुन दूर नेण्याचा प्रयत्न करीत होते. जेव्हा वडिलांनी मुलाला थोडे थांबायला सांगितले, तेव्हा नेपाळ सशस्त्र संरक्षक दलाने त्यांच्या मुलावर गोळीबार केला. हे पाहून सीमेवर क्रिकेट खेळणा-या काही तरुणांनी आणि शेतात काम करणा-या लोकांनी नेपाळ सशस्त्र संरक्षक दलाच्या या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी नेपाळ सशस्त्र संरक्षक दलाने गोळीबार सुरू केला. भारतीयांना त्याची बंदूक हिसकावून घ्यायची होती, असा आरोप नेपाळ सशस्त्र संरक्षक दलाने केला आहे. नेपाळ सशस्त्र संरक्षक दलाने शेतक-यांना स्मगलर ठरवले आहे. एक व्हिडिओत नेपाळ सशस्त्र संरक्षक दल मुलाला मारहाण करताना दिसत आहे. त्यामुळे नेपाळचा कांगावा जगासमोर आला आहे.

📚 *वाचण्यासारखं बरंच काही एकाच ठिकाणी, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
💥 *जालना जिल्ह्याची त्रिशतकी वाटचाल; नवीन 12 रुग्ण*

*LetsUp l Jalna*

जालना जिल्ह्यावरील कोरोनाचे सावट अधिकच गडद होत असुन आतापर्यंत आठ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या प्रयोग शाळेच्या अहवालानुसर नवीन 12 रुग्णांची भर पडल्याने आता जालना जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या 267 वर पोहोचली आहे.

नवीन बारा रुग्ण आढळल्यानंतर जालन्यात कोरोनाची त्रिशतकी वाटचाल सुरु झाली असली तरी कोरोना चाचणीत निगेटिव्ह येणाऱ्या संशयीत रुग्णांचे प्रमाणही मोठे आहे. काल रात्री उशिरा आलेल्या अहवालात तब्बल 105 रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असुन 12 जणांचा रिपोर्ट पाॅझिटीव्ह आल्याचे प्रशासकीय सुत्रांनी सांगीतले.

नव्याने पाॅझिटीव्ह आढळून आलेल्या 12 रुग्णांमध्ये जालना राज्य राखीव पोलीस बल गट (एसआरपीएफ) - 4, काद्राबाद परिसर - 4 व बदनापूर तालुक्यातील भराडखेडा येथिल 4 रुग्णांचा समावेश असल्याचे प्रशासकिय सुत्रांनी स्पष्ट केले.

🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
💥 *बिहारच्या सीमेवरील गावात नेपाळ पोलिसांचा गोळीबार*

*LetsUp | National*

⚡ बिहारमधील भारत - नेपाळ सीमेवर नेपाळ सशस्त्र दलाकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे.

💁🏻‍♂️ सध्या भारत आणि नेपाळ सीमेवरून दोन्ही देशांमध्ये मागच्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे.

👉🏻 भारत नेपाळ सीमेवर असलेल्या बिहारमधील सीतामढी या गावात नेपाळकडून गोळीबार करण्यात आला.

🧐 यामध्ये शेतात काम करणाऱ्या एका भारतीयाचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

📌 दरम्यान, दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेनंतर सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
💥 *बारा दिवसाच्या बाळाची कोरोनावर मात*

*LetsUp | Pune*

पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयामध्ये तीन दिवसाच्या कोरोना पॉझिटीव्ह बाळाला व त्यांच्या आईला दाखल करण्यात आले होते. जन्मल्यानंतर आईपासून कोरोनाची लागण झालेल्या नवजात बालकाचे प्राण वाचविणे हे मोठे आव्हान होते.

मात्र, रुग्णालयात देण्यात आलेल्या उपचारास बालकालाने दोन ते तीन दिवसात प्रतिसाद देवून कोरोनावर मात केली आहे. 

एका खासगी रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलेस दुसर्‍याच दिवशी ताप व खोकला अशी कोरोनाची लक्षणे दिसू लागली. सदर महिला ही उत्तर प्रदेशातील आहे. महिला आणि तिच्या नवजात बालकाला वायसीएममध्ये दाखल करण्यात आले. तपासणीनंतर दोघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले.

यावेळी बालकाला धाप लागत असल्यामुळे नवजात शिशुच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. बालकाच्या आईला देखील कोरोना झाला असल्यामुळे आईला वेगळ्या वॉर्डमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञांच्या देखरेखी खाली ठेवण्यात आले.

तसेच बाळाला ऑक्सिजन लावल्यामुळे आईचे दूध देता येत नव्हते. अशावेळी बाळाला सलाईनमधून कोविडचे उपचार सुरु केले. 

तीन ते चार दिवसात बाळाने उपचारास चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर बाळाच्या आईच्या प्रकृतीत देखील सुधारणा होत होती.

पाच दिवसानंतर त्याला आईचे दूध देण्यात आले. बारा दिवसानंतर आता बाळ आणि आई सुखरुप असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. 

🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
💥 *राज्यातील तिघाडी सरकारमध्ये बिघाडी...*

*LetsUp | Update*

💫 महारष्ट्रात तिघाडी सरकारमध्ये बिघाडी होत असल्याचा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.

💁‍♂️ *आठवले म्हणाले :*

▪️ शिवसेना आणि राष्ट्रवादीएवढे काँग्रेसला महत्त्व मिळत नसल्याची खदखद काँग्रेसचे मंत्री तसेच आमदारांच्या एका गटात आहे.

▪️ यासंदर्भात काँग्रेसच नेते राहुल गांधी यांनीही महाराष्ट्रात सरकारच्या निर्णय प्रक्रियेत स्थान नसल्याचे विधानही केले होते.

▪️ निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला जे स्थान असायला हवे ते मिळत नसून काँग्रेसला विश्वासात घेतले जात नसेल तर त्यांनी राज्य सरकारचा पाठिंबा काढावा.

▪️ लवकरच मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घालणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

📌 दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्याच नगरसेवकांना अर्थ खात्याकडून निधी देताना झुकते माप दिले जाते, काँग्रेसच्या नगरसेवकांना मात्र डावलले जाते, अशीही तक्रार आहे.

📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
💥 *चोवीस तासांत अकरा हजारांपेक्षा अधिक रुग्ण...*

*LetsUp | Corona Live*

💫 भारतात मागील चोवीस तासांत अकरा हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून मृत्यूचा आकडा तर धडकी भरवणारा आहे.

✨ भारत जगात चौथ्या क्रमांकावर असून आकडे वाढत राहिले तर भारत चौथा क्रमांकही मागे टाकेल अशी शक्यता आहे. देशात कोरोनाव्हायरसच्या संसर्गाची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे.

📍 जूनच्या पहिल्या दिवसापासून, दररोज सरासरी सुमारे दहा हजार प्रकरणे नोंदवली जात असून आज मागील चोवीस तासांत अकरा हजारांपेक्षा जास्त संसर्ग झाल्याची घटना घडली आहे.

📌 दरम्यान, देशभरात एक लाख चोपन्न हजार तीनशे तीस रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत आठ हजार आठशे पेक्षा अधिक लोकांचे बळी गेले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
💥 *येरवडा कारागृहातून दोन कैद्यांचे पलायन*

*LetsUp | Pune*

पुण्यातील येरवडा कारागृहातून आज (शनिवारी) दोन कैद्यांनी पलायन केले आहे. या दोघांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

हर्षद सय्यद (२०, रा.कासारवाडी), आकाश बाबुराव पवार (२६. रा.काळेवाडी) असे कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही कैद्यांवर गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्याची नोंद आहे. या प्रकरणी अधिक तपास येरवडा पोलिसांकडून सुरू आहे.

🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
💥 *सारीच्या 36 रुग्णांना कोरोनाची बाधा*

*LetsUp | Aurangabad*

जिल्ह्यात कोरोनाबरोबर सारीचे रुग्णही वाढत आहे. मागील तीन दिवसांत सारीचे ५५ रुग्ण आढळले. कोरोना चाचणीनंतर ३६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

सारीच्या आजाराची लक्षणे कोरोनासारखीच असल्याने प्रत्येक सारीबाधित रुग्णाचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेतले जात आहेत. मागील आठवड्यात तीन दिवसांत आढळलेल्या ३९ सारी बाधितांतून २९ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते.

या आठवड्यातही सारीच्या रुग्णांतून कोरोना पॉझिटिव्ह निघण्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी पुन्हा वाढले आहे. आतापर्यंत शहरात सारीचे ५६६ रुग्ण आढळले. त्यापैकी ५५३ जणांचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी घेण्यात आले.

पैकी १३७ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह तर ४२३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सहा जणांचे अहवाल बाकी असून आजपर्यंत सारीमुळे १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मागील दीड महिन्यापासून घाटी किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयातून सारीचा एकही रुग्ण आढळला नाही. केवळ शहरातील विविध खासगी रुग्णालयांतून सारीच्या ४८४ रुग्णांच्या नोंदी पालिकेला प्राप्त झाल्या आहेत.

त्यातूनच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती समोर येत आहे. घाटीकडून नोंद झालेल्या सारीच्या रुग्णांची संख्या ८२ आहे.असे प्रशासनाने कळवले आहे.

🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
😱 *अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या*

*LetsUp | Breaking*

⚡ बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

😰 बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली आहे.

🏠 मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली आहे.

👮🏻 सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. दरम्यान अधिक तपासासाठी मुंबई पोलिस सुशांतच्या घरी पोहोचले आहेत.

☎️ वृत्तानुसार सुशांतच्या सेवकाने पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली आहे.

👍 *जगातील सुपरफास्ट अपडेटसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
💥 देशात कोरोनाची परिस्थिती

LetsUp l Corona Live

⚡ देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेला लॉकडाउन हळूहळू शिथिल केला असला, तरी कोरोनाचे संकट अजूनही कायम आहेच.

💁‍♂️ केंद्रीय आरोग्य मंत्रलयाची माहिती : गेल्या 24 तासांत 11 हजार 502 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 325 जणांचा मृत्यू झाला आहे. सलग पाचव्या दिवशी तीनशेहुन अधिक कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सिक्कीम, लडाखसारख्या ईशान्येकडील भागांमध्येही कोरोनाचा धोका वाढू लागला आहे.

💫 दिलासा : देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीन लाख 32 हजार 424 इतकी झाली आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आधिक आहे.

📌 उपचार व मृत्यू : आतापर्यंत एक लाख 69 हजार 798 जणांनी कोरोनावर मात केली आहे. एक लाख 53 हजार 106 जणांवर उपचार सुरू आहेत. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 9 हजार 520 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात या चार राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.

📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
💥 'ते' फोटो तत्काळ डिलीट करा; सायबर सेलचा इशारा

LetsUp l Trending

⚡ महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावर शेअर न करण्याचा इशारा दिला आहे. रविवारी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात सुशांतने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

💁‍♂️ इशारा : सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. आत्महत्येनंतर सोशल मिडियावर सुशांतच्या घरातील काही फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये सुशांतचा मृतदेह दिसत आहे. मात्र महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने याच फोटोंवरुन इशारा दिला आहे.

🙏 आवाहन : सुशांतचे ते फोटो शेअर करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्याचबरोबर यापूर्वी अनेकांनी हे फोटो शेअर केले असतील तर ते डिलीट करावे असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

👉 महाराष्ट्रामधील सायबर सेलला सध्या सोशल मिडियावर एक धक्कादायक ट्रेण्ड दिसून येत आहे. ज्यात सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतरचे फोटो सर्क्युलेट केले जात आहेत. अशाप्रकारचे फोटो शेअर करणे कायद्याच्या नियमांप्रमाणे गुन्हा आहे. सायबर सेलच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन या फोटोंविषयी इशारा पोलिसांनी दिला आहे.

📌 न्यायालयाच्या निर्देशांनुसार अशा प्रकारच्या कृतीसाठी कायदेशीर करावाई केली जाऊ शकते. महाराष्ट्र सायबरने सर्वांना अशाप्रकारचे फोटो सर्क्युलेट न करण्याचे आवाहन केले आहे.

📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
💥 नगरसेवकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

LetsUp l Mumbai

⚡ चेंबूर येथील प्रभाग क्र.155 चे नगरसेवक श्रीकांत शेट्ये यांच्या मुलाने रविवारी रात्री आत्महत्या केली.

💁‍♂️ मृत अभिषेक शेट्ये (वय 26) हा रविवारी लालडोंगर परिसरातील श्रमिक इमारतीतील त्याच्या राहत्या घरात एका वेगळ्या खोलीत झोपला होता. रात्री बराच उशीर होऊनदेखील तो खोलीबाहेर आला नाही.

📌 त्याचे कुटुंबीय त्याच्या खोलीत पाहायला गेल्यानंतर अभिषेकने गळफास घेतल्याचे त्यांना आढळले. सुमारे दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने अभिषेक यास तत्काळ चेंबूरच्या सुश्रुत रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याला मृत घोषित केले. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

🎯 आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
LetsUp News Update

▪ देशात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांमध्ये 11 हजारांहून अधिक वाढ; देशात 24 तासांत 11 हजार 502 रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या 3 लाख, 32 हजार 424 वर पोहचली

▪ भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये गैरसमज झाले असतील तर ते चर्चेने दूर केले जातील; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा दावा

▪ राज्यात कोरोना मृत्यूंचा नवा उच्चांक; 24 तासात कोरोनामुळे 178 रुग्णांचा बळी, राज्यात कोरोनामृत्यूंचा आकडा 4 हजार 128 वर पोहचला; राज्यात 2 हजार 786 नवीन रुग्ण

----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7798655655
----------------------

▪ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा लॉकडाऊनची शक्यता फेटाळली, मुंबई, पुण्यातही टाळेबंदी लागू करण्याचा राज्य सरकारचा विचार नसल्याचे केले स्पष्ट; चेन्नईत मात्र पुन्हा निर्बंध लागू

▪ बँकेत काचेच्या दरवाजाला धडकून महिलेचा मृत्यू; केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील पेरम्बवूरमध्ये घडली घटना; बीना नॉबी असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव

▪ अडीच महिन्यानंतर सुरू झालेल्या मुंबईमधील लोकलमधून पहिल्याच दिवशी 50 हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी केला प्रवास

▪ जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर; दिवसभरात जिल्ह्यात 76 नविन रुग्ण आढळले, जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 1804 वर पोहचली, फक्त जळगाव शहराची एकूण रुग्णसंख्या 322

▪ शक्तीशाली अमेरिकन एअर फोर्सचं फायटर विमान उत्तर समुद्रात कोसळलं; पूर्व इंग्लंडमधील ब्रिटिश रॉयल एअर फोर्सच्या बेसवरुन एफ-15 सी विमानाने नियमित सरावासाठी केले होते उड्डाण

▪ ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय क्रिकेटर्सचा सन्मान; गल्ल्यांना भारतीय क्रिकेटर्सची नावे दिली जाणार, सचिन तेंडुलकर, कपिल देव, विराट कोहली या खेळाडूंची शहरात रस्त्यांना नावे देण्याचा सन्मान मिळणार

▪ लॉकडाउननंतर पुढल्या महिन्यात सिनेमागृहं उघडण्यासाठी जोरदार तयारी सुरू; प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी नाना क्लृप्त्या, मोफत चित्रपट दाखवण्याचे आमिष प्रेक्षकांना दाखवलं जाणार असल्याचे समजतंय

📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
😍 या देशात लाँच झाली व्हॉट्सअ‍ॅपची पेमेंट सेवा

LetsUp | Trending

💰 जगात सर्वाधिक वापरले जाणारे इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपची पेमेंट सर्व्हिस ब्राझीलमध्ये अधिकृतरित्या सुरू झाली आहे.

📜 फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गने एका पोस्टद्वारे याची माहिती दिली आहे.

🗣️ मार्क झुकरबर्गने सांगितले की... :

● आज आम्ही ब्राझीलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सर्व्हिसची सुरुवात करत आहोत.

● आम्ही पैसे पाठवणे आणि स्विकारण्याच्या प्रक्रियेला फोटो पाठवण्याऐवढे सोपे बनवत आहोत.

● लवकरच छोट्या व्यापाऱ्यांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे खरेदी-विक्रीची सुविधा देणार आहोत.

● व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटसाठी ब्राझीलच्या स्थानिक बँकांशी भागीदारी करण्यात आली आहे.

● व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सेवा सुरू करण्यात आलेला ब्राझील हा पहिला देश आहे.

● त्यांनी भारतासह इतर देशांमध्ये देखील ही सेवा लवकरच सुरू करणार असल्याचे सांगितले आहे.

📚 वाचण्यासारखं बरंच काही एकाच ठिकाणी, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
💥 सलग दहाव्या दिवशी पेट्रोल दरवाढीचा झटका!

LetsUp | Update

⚡ पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीचा झटका सुरूच आहे. सलग दहाव्या दिवशी इंधन कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केली आहे. आज मंगळवारी पेट्रोलच्या दरात दिल्लीत 47 पैशांची तर डिझेलच्या दरात 57 पैशांनी वाढ केली आहे.

⛽ दर वाढ : दिल्लीत पेट्रोलचे दर 76.73 रूपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर 75.19 रूपये प्रति लीटर एवढे झाले आहेत. गत दहा दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तीन रूपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे

💁‍♂️ राज्यनिहाय पेट्रोल दर (लिटरमध्ये) :

▪️ दिल्ली : पेट्रोल - 76.73 | डिझेल - 75.19
▪️ मुंबई : पेट्रोल - 83.62 | डिझेल - 73.75
▪️ चेन्नई : पेट्रोल - 80.37 | डिझेल - 73.17
▪️ कोलकाता : पेट्रोल - 78.55 | डिझेल - 70.84

🎯 आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
💥 जागतिक आरोग्य संघटनेचा धक्कादायक इशारा!

LetsUp | Trending

⚡ जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाने थैमान घातले असतानाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने एक धक्कादायक इशारा दिला आहे.

💁‍♂️ कोरोनाचे थैमान आशिया, दक्षिण अमेरिका आणि मध्य पूर्व देशांमध्ये कायम राहणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वेगाने वाढ होत आहे.

🧐 दोन आठवडे कायम : गत 15 दिवसांपासून रोज जवळपास 1 लाखाहून अधिक नवीन रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने पुढील दोन आठवडे अशीच स्थिती कायम राहण्याचा इशारा दिला आहे.

🗣️ संघटनेचे प्रमुख टेडरॉस एडहोम यांचे मत : चीनमध्ये 50 दिवसांनंतर पुन्हा एकदा बिकट स्थिती निर्माण झाली आहे. बीजिंगमधील 90 हजार लोकांच्या चाचण्या केल्या असून हे प्रकरण चीन चांगल्या पद्धतीने हाताळले असा जागतिक आरोग्य संघटनेला विश्वास आहे.

📌 इशारा : चीनला काही मदत लागल्यास जागतिक आरोग्य संघटनेचे एक पथक तेथे जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग आफ्रिकेमध्येही वेगाने पसरत असल्याचेही त्यांनी सांगितले. दोन आठवड्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होईल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
🏫 राज्यात जुलैपासून शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू

LetsUp | Update

⚡ शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी जाहीर केला आहे.

💁‍♂️ शैक्षणिक वर्ष सुरू होण्याबाबत शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या मनातील संभ्रम या निर्णयामुळे दूर झाला आहे.

🧐 असे असू शकतात पर्याय! :
● सुरू होणार्‍या शाळा मात्र 5 तासांऐवजी 3 तास भरणार
● एका वर्गात जास्तीत जास्त तीस विद्यार्थीच असावेत
● शाळा दोन सत्रांत भरविण्याची अथवा विद्यार्थ्यांनी एक दिवसाआड (सम-विषम) शाळेत यावे
● सकाळी 9 ते 12 आणि, दुपारी 12 ते 3 अशा दोन सत्रात शाळा चालवावे
● सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी वर्ग 1 आणि 2,
● मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी वर्ग 3 व 4 भरवण्यात यावेत

📍 दरम्यान; भविष्यात शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्देशही सरकारने शिक्षण विभागाला दिले आहेत.

👉 भविष्यात शाळा सुरू झाल्यावर वर्ग तीन तासांचे किंवा एक दिवसाआड सुरू होण्याची शक्यता शालेय शिक्षण विभागाने व्यक्‍त केली आहे.

📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
LetsUp I Job

💁‍♂️ पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे :

● प्राध्यापक : 07
● सहकारी प्राध्यापक : 06
● सहाय्यक प्राध्यापक : 08

📍 नोकरी ठिकाण : मुंबई

💸 फी : General/OBC/EWS: ₹2000/- [SC/ST/PWD:₹500]

🗓️ ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 10 जुलै 2020

👍 अधिकृत वेबसाईट पाहा : https://www.tiss.edu/

📝 जाहिरात पाहा : http://recruitment.tiss.edu/

👩‍💻 ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/3dbx55C

✔ नोकरीपासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व घडामोडींसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
💥 *यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने...*

*LetsUp | Update*

💫 यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सार्वजानिक गणेशोत्सव मंडळ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.

✨ यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यासंदर्भात गणेशमंडळाना सूचना दिल्या.

👉 तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनीही तयारी दर्शवून राज्य सरकारचा आदेश मान्य करणार असून कोणताही अडथळा आणला जाणार नसल्याचे आश्वासन दिले.

📍 गणेशोस्तव काळात ध्वनिक्षेपकाचा वापर, आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये गणेशोत्सव मंडळांसमवेत बैठकांमध्ये स्पष्ट करण्यात येत आहे.

📌 दरम्यान, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली.

📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
🧐 *कोरोनाबाधित मृतदेह दिला नातेवाईकांच्या ताब्यात*

*LetsUp | Nashik*

कोरोनाच्या भीषण काळातही नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार सुरूच आहे. या ना त्या कारणाने चर्चेत असलेले शासकीय रुग्णालयाने पुन्हा एक मोठी चूक केली आहे.

कोरोना संशयित 65 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या महिलेचा मृतदेह रुग्णालयाने अंत्यविधीसाठी चक्क नातेवाईकांच्या ताब्यात दिला. हा मृतदेह नातेवाईकांनी तब्बल 7 तास फुलेनगरमधील मयत महिलेच्या राहत्या घरात ठेवला.

मात्र काही वेळा नंतर या मृत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सगळ्यांच धक्का बसला. मृत महिलेच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णलयात या घटनेचा जाब विचारल्या नंतर डॉक्टरांनी मृतदेह पुन्हा हॉस्पिटलला आणून द्या अस सांगितल्याने रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

शेवटी जिल्हा रुग्णालयाने रात्री 1 वाजता शासकीय पथक पाठवून राहत्या घरातून या कोरोना बाधित महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन विल्हेवाट लावली आहे.

आधीच फुले नगर, पेठ रोड, राम नगर भाग हा कोरोनाचा हॉटस्पॉट तयार झालेला असताना दुसरीकडे आता जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या चुकीच्या कारभारामुळे या भागात आणखी कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे या कोरोना बाधित महिलेचा मृतदेह घरी दिल्याने नातेवाईकांनी भीती व्यक्त केली आहे. या भोंगळ कारभारामुळे आमच्या जीवाला धोका झाला तर याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नातेवाईकांनी केला आहे.

🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp