🤰 गर्भवतींना संसर्ग होऊ नये म्हणून...
LetsUp I Health
कोरोनाने सर्वांनाच हैराण करून सोडले आहे. विशेषतः या काळात गर्भवती स्त्रीला याचा संसर्ग होऊ नये म्हणून जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी खालील गोष्टी तुम्हाला मदत करतील.
● बाहेरून आल्यावर, जेवणाच्या आधी आणि शिंका आल्यानंतर आणि नाक शिंकारल्यानंतर हात स्वच्छ धुवा.
● अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझर जवळ ठेवा. जशी गरज पडेल तसा वापर करा.
● विशेषतः जे लोक आजारी आहेत त्यांच्याशी शक्य असेल तेवढा संपर्क टाळा.
● डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे शक्यतोवर टाळा.
● सोशल डिस्टंसिंग नियमितपणे पाळा.
● कुठलेही लक्षण सौम्य प्रमाणात जरी जाणवले तरी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी लेट्सअप घेत नाही.
📚 वाचण्यासारखं बरंच काही एकाच ठिकाणी, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp

letsupapp.page.link
LetsUpp App
LetsUpp is an Infotainment Platform to keep you updated with Hyperlocal updates on Verified News, Entertainment, Motivation, Lifestyle & much more.
💥 जिल्ह्यात 2 कोरोना पॉझिटिव्ह
LetsUp l Ahmednagar
मुंबईहून संगमनेर येथे आलेल्या 40 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने बाधा झाली आहे, आणि वाशी, मुंबईहून आलेल्या मिरी रोड शेवगाव येथे आलेल्या 22 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.
संगमनेर येथील खासगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या 3 रुग्णांचा जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्येत समावेश केला आहे. नव्या दोन रुग्णामुळे एकूण रुग्णसंख्या 217 झाली आहे.
🎯 आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp

🐍 'या' सापाची किंमत ऐकून व्हाल थक्क!
LetsUp l Trending
⚡ आपल्याकडे सापाची कुणी खरेदी करण्याचा विचार करू शकत नाही. मात्र औषधी उपयोग, अंधश्रद्धा या व अश्या अनेक कारणांनी साप खरेदी करतात, किंवा सर्पप्रेमी साप खरेदी करतात.
💁🏻♂️ अजगर : अंधश्रद्धेपोटी नाही तरी फक्त आकर्षक रंगामुळे बक्कळ पैसे मोजून खरेदी केला जाणारा एक साप आहे. जगात हा सर्वात महाग साप असून त्याचे नाव आहे 'ग्रीन ट्री पायथन', म्हणजे प्रत्यक्षात हा अजगर म्हणता येईल.
🧐 दुर्मिळ : या सापाचा रंग नावाप्रमाणे हिरवा असतो, मात्र त्यात खूप शेड असतात, याच जातीचा एक निळा सापही आहे मात्र तो दुर्मिळ आणि म्हणून अधिक महाग आहे.
💸 किंमत : या सापाच्या किंमतीत एक मोठे घर, छोटे जहाज सहज खरेदी करता येऊ शकते, कारण ग्रीन ट्री पायथनची किंमत लाखात नाही तर करोडोमध्ये आहे. चार लाख डॉलर्स किंवा त्याहून अधिक किंमत या सापाला मिळते.
👉🏻 येथे आढळतात : ग्रीन ट्री पायथन हे त्यांच्या आयुष्यातील 90 टक्के आयुष्य झाडावर घालवितात. इंडोनेशियन बेटे, न्यू गिनिया, न्यू गिनी व ऑस्ट्रेलियामध्ये ते आढळतात.
📌 या सापाची लांबी साधारण 2 मीटर तर वजन दीड किलोच्या आसपास असते. मादी लांबीला थोडी अधिक व वजनाला थोडी जास्त असते. हे साप साधारण 20 वर्ष जगतात.
📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp

🧐 *जिल्ह्याचा आपत्ती निवारण कृती आराखडा तयार*
*LetsUp l Nashik*
गेल्यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जिल्हा प्रशासनाला मोठ्या आपत्तीला सामोरं जावं लागलं होतं मात्र यंदा मागील वर्षासारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी जिल्हा प्रशासन आतापासूनच कामाला लागले आहे.
त्यासाठीचा निवारण कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तयार करण्यात आला आहे. गंगापूर धरणात मागील वर्षी पेक्षा अधिक पटीने पाणीसाठा तसाच आहे. त्यामुळे गंगापूर धरणाच्या परीक्षेत्रामध्ये जास्त पाऊस झाल्यास नाशिक शहर तसेच सायखेडा चांदोरी या गावांना पुराचा फटका बसू शकतो.
दरम्यान नाशिक शहरापेक्षा चांदोरी सायखेडा या गावांना या पुराच्या पाण्याचा फटका अधिक तीव्रतेने बसतो. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपत्ती निवारण खरं कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
तसेच या संबंधीच्या सर्व जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहे. एकूणच पावसाळा सुरू होताच कुठलीही ही आपत्ती या पावसाच्या पाण्यामुळे होऊ नये यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp

*पतीकडून पत्नीला स्टूलने मारहाण*
*LetsUp | Pune*
आज काल भांडणाला कोणतेही कारण लागत नाही. असाच एक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. मोबाईल रिचार्ज करण्यावरुन झालेल्या वादात पतीने पत्नीला लाकडी स्टुलने मारहाण करण्यात आल्याची घटना भवानी पेठे मध्ये घडली आहे. याप्रकरणी पतीविरुध्द खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रियाज फयाज खान(47) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पती-पत्नीमध्ये मोबाईल रिचार्ज करण्यावरुन वाद झाला होता. यावेळी रागाच्या भरात रियाजने लाकडी स्टुल उचलून पत्नीला मारला. पत्नीने स्टुल वाचविण्याकरीता दोन्ही हात आडवे धरले होते. यावेळी रियाजने दोन ते तीन वेळा तीच्या हातावर स्टुलने मारहाण केली. यामध्ये तीच्या दोन्ही हाताला इजा झाली असून एक हात फ्रॅक्चर झाला आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सावंत करत आहेत.

*धक्कादायक; घाटी रुग्णालयातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाला*
*LetsUp l Aurangabad*
औरंगाबाद : शहरातील गणेशनगर भागातील 38 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण घाटी रुग्णालयातून पळून गेल्याची माहिती मिळाली आहे.
तो रुग्ण घाटी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेत होता. आज सकाळी साडे सहा वाजता सुरक्षा रक्षकांना चकमा देऊन बाधीत रुग्ण पळून गेल्याने एकच खळबळ उडाली. त्या रुग्णाविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

💥 *देशाच्या चिंतेत भर; 24 तासांत 'एवढे' मृत्यू*
*LetsUp l Update*
⚡ दिवसेंदिवस देशातील वाढती कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंतेत भर घालत आहे. गेल्या सात दिवसांपासून दररोज नऊ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. आरोग्य मंत्रलायाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशामध्ये 9 हजार 987 कोरोनाबाधित रुग्ण आढळे आहेत. तर तब्बल 332 जणांचा मृत्यू झाला आहे.
💁🏻♂️ *रुग्णांची संख्या* : देश अनलॉक होतानाच कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या चिंतेत भर घालणारी ठरत आहे. देशभरात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन लाख 66 हजार 598 झाली आहे. त्यापैकी 1 लाख 29 हजार 215 रुग्ण बरे झाले आहेत.
📌 *मृतांची संख्या* : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 48.49 टक्के आहे. सध्या एक लाख 29 हजार 917 जणांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत 331 रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या 7 हजार 466 वर पोहोचली आहे.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp

✍🏻 *नोक-यांचा आलेख*
*LetsUp l Editorial*
गेल्या दोन वर्षांपासून देशात बेरोजगारी वाढते आहे. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाने गेल्या वर्षी जाहीर केलेला आकडा हा गेल्या 45 वर्षांतील उच्चांकी होता. त्यातच कोरोनामुळे जाहीर कराव्या लागलेल्या टाळेबंदीने तर बेरोजगारीत अधिकच भर पडली. काही संस्था हा आकडा 35 टक्क्यांवर गेल्याचे सांगत असल्या, तरी सरकारनेच स्वतः बेरोजगारीचा आकडा 27 टक्के असल्याचे मान्य केले आहे. स्थलांतरित मजुरांचे लोंढेच्या लोंढे जेव्हा त्यांच्या त्यांच्या राज्यात जायला लागले, तेव्हा संबंधित राज्यांनी आम्ही आमच्या लोकांना रोजगार देऊ, अशा फुशारक्या मारल्या. त्यासाठी काय काय केले, किती तरतुदी केल्या, उद्योग कसे सुरू होतील असे सांगितले.
मनरेगाच्या तरतुदीत वाढ करून सेल्फवर किती कामे आहेत, याची आकडेवारी दिली; परंतु आता एक महिन्यानंतर त्यातील फोलपणा लक्षात यायला लागला आहे. स्थलांतरित कामगार त्यांच्या मूळ राज्यात परत आल्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत भारतातील बेरोजगारीवर वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे परिणाम झाले आहेत. या कालावधीत, परप्रांतीय कामगार मोठ्या संख्येने आपल्या मायदेशी परतले आहेत. अशा परिस्थितीत देशातील काही राज्यांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे, तर काही राज्यात ते कमी झाले आहे. मोठ्या संख्येने उद्योग असलेल्या राज्यांतून स्थलांतरित त्यांच्या मूळ राज्यात गेल्याने उद्योग, सेवा क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे.
महाराष्ट्र आणि दिल्लीसारख्या राज्यात ही समस्या वाढली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (सीएमआयई) डेटाच्या माध्यमातून देशातील कोणती राज्ये बेरोजगारीची परिस्थिती आहे, याचे नेमके चित्र पुढे आणले आहे. झारखंडमधील रोजगाराची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. इथल्या दहापैकी सहा लोक बेरोजगार आहेत. त्याचबरोबर बिहार आणि दिल्लीची परिस्थितीही अत्यंत वाईट आहे. येथे बेरोजगारीचा दर 40 टक्क्यांहून अधिक आहे. सर्व प्रमुख राज्यांमध्ये बेरोजगारी चिंताजनकरीत्या वाढली आहे. हा दर गेल्या वर्षाच्या तुलनेत खूपच जास्त आहे.
काही बड्या राज्यांमध्ये मे दरम्यान बेरोजगारीचे प्रमाण 20 ते 30 टक्के राहिले आहे. ही आकडेवारी फेब्रुवारी 2020 आणि मे 2019 च्या तुलनेत जास्त आहे. टाळेबंदीच्या काळानंतर देशातील मोठ्या औद्योगिक राज्यांमधील बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि गुजरात राज्यांना हा अनुभव येत आहे. या राज्यांतून स्थलांतरित मोठ्या संख्येने त्यांच्या राज्यातून बाहेर गेल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. एप्रिलपासून तामीळनाडूमध्ये बेरोजगारीत लक्षणीय घट झाली आहे. त्यानंतर ओडिशामध्ये 14.2 टक्के, कर्नाटकात 9.4 टक्के आणि हरयाणामध्ये बेरोजागारीत साडेसात टक्के घट झाली आहे. काही राज्यांमध्ये बेरोजगारीचे दर स्थिर राहिले आहेत किंवा वाढले आहेत.
एप्रिल ते मे 2020 दरम्यान आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम आणि राजस्थान यांसारख्या काही राज्यांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण स्थिर राहिले किंवा वाढले आहेत. बंगालमध्ये फेब्रुवारीच्या तुलनेत तो तीनपट वाढला. ओडिशामध्ये एप्रिलपासून बेरोजगारीत 1.2 टक्क्यांनी घट झाली आहे. आता टाळेबंदी हळूहळू शिथिल होत असल्याने कामगारांना रोजगार मिळायला लागला आहे. असे असले, तरी मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, पुणे आदी ठिकाणी अजूनही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने परराज्यात गेलेले कामगार अजून परतायला तयार नाहीत.
काही ठिकाणी अकुशल कामगारांची मोठ्या प्रमाणात टंचाई आहे. दुकानांत कामगार मिळत नाहीत. एप्रिलमधील 35.4 टक्क्यांच्या तुलनेत मेच्या अखेरीस बेरोजगारी 38.7 टक्क्यांवर पोहोचली. एप्रिलमध्ये सुमारे 12 कोटी लोकांच्या नोक-या गेल्या. असे असले, तरी एवढे लोक सध्या नोकरीच्या शोधात नाही. हे एकदा लक्षात घेतले, तर काही लोक शेती किंवा अन्य व्यवसायाकडे वळले असण्याची शक्यता आहे. केवळ पाच कोटी तीस लाख बेरोजगार नोक-यांच्या शोधत आहेत. याचा अर्थ उर्वरित लोकांना नोकरी करायची नाही, असाही होतो किंवा त्यांना अन्यत्र रोजगार मिळाला असावा, असे मानण्यास जागा आहे. मोठ्या प्रमाणात नोक-या गमावल्यामुळे कामगारांत नैराश्य आले आहे. अशा लोकांची संख्या 7.7 कोटी आहे, जी एप्रिलमध्ये 8.9 कोटी होती, तर गेल्या वर्षी ती 1.2 कोटी होती.
👌 *माहितीचा विश्वासार्ह स्रोत एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp

*धक्कादायक; गेवराईत मयत डॉक्टरवर गुन्हा दाखल*
*LetsUp | Beed*
गेवराई : गेवराईत मेडिकलमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. मयत झालेल्या डाक्टरनेच हा स्फोट घडवून आणल्याचा जवाब जखमी कंम्पाऊंडरने दिल्याने पोलीसांनी मयत डॉक्टर सुधाकर भाऊसाहेब चोरमले (वय 35 रा. बाग पिंपळगाव ता.गेवराई ) व कम्पाऊंडर सुनील माळी यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरु केली आहे, अशी माहिती गेवराईचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना दिली. रात्री साडेदहापर्यंत गुन्हा नोंद झालेला नव्हता.
पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार मयत डॉक्टरचा व मेडिकल चालकांचा देवाण-घेवाणीवरुन जुना वाद होता. त्या रागातून मयत डॉक्टरने कम्पाऊंडरला रात्री एकच्या सुमारास बोलावून घेतले. या मयत डॉक्टरने आधीच मेडिकलची एक बनावट चावी बनवून घेतली होती. त्या चावीने शटर उघडून डॉक्टर आत गेले.
आणि काही वेळातच मेडिकलमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटात डॉक्टर दुकानाच्या बाहेर 15 फुट लांब फेकले गेले. तर बाहेर उभा कंम्पाऊंडर जखमी झाला आहे. घटनेची माहिती रात्रीच अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन आग विझवली.
त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत जागेचा पंचनामा केला असता त्यांना अनेक गोष्टी संशयास्पद आढळून आल्या. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय अधिकारी स्वप्निल राठोड, पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.राजाराम तडवी करत आहेत.

💥 *मुंबईत दर दिवस 'एवढे' मृत्युमुखी*
*LetsUp | Corona Live*
💫 मुंबईत कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक असून कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचे प्रमाणही अधिक वाढत चालले आहे.
✨ मुंबईत जुनमधील पहिल्या ९ दिवसांत गत दिवशी सरासरी ५३ मृत्यू झाल्याचे समोर आले असून या तुलनेत मे महिन्यांतील पहिल्या ९ दिवसांत हे प्रमाण ४१ इतकं होत.
⚡ जूनमध्ये मुंबईत ४८१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला, तर १ जून रोजी ४० जणांचा मृत्यू झाला होता. तसेच त्यानंतरच्या ३ दिवसांत ५० जणांचा मृत्यू झाला आहे
📍 या आठवड्यात मुंबईत कोरोनाबाधितांच्या मृत्यूने उच्चांक गाठला असून सोमवारी तब्बल ६४ जणांचा मृत्यू झाला आहे.
📌 दरम्यान, मुंबईमधील गत दिवसाची रूग्णवाढ आणि मृत्यूदर खाली येऊ लागला असून सोमवारी रूग्णदर ३.५. टक्के होता, तर मृत्यूदर तीन टक्क्यांपर्यंत आला आहे.

💵 *येरवड्यात सात कोटीं रुपयांच्या बनावट नोटा जप्त*
*LetsUp | Update*
⚡ पुणे शहरातील उच्चभ्रु समजल्या जाणाऱ्या येरवडा परिसरात संजय पार्कमध्ये डॉलरच्या बदल्यात बनावट नोटा देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
💁♂️ मिळलेल्या माहितीनुसार सध्या याप्रकरणी 6 जणांना ताब्यात घेतले आहे. सर्वजण मुंबई येथील रहिवासी आहेत.
💰 दरम्यान आरोपीकडून 7 कोटी 60 लाखांच्या बनावट नोटा आणि 2 लाख 80 हजारांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.
👮 पुणे पोलिसांचे खंडणी विरोधी पथक आणि भारतीय लष्कराने संयुक्त कारवाई केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
*LetsUp | Update*
⚡ पुणे शहरातील उच्चभ्रु समजल्या जाणाऱ्या येरवडा परिसरात संजय पार्कमध्ये डॉलरच्या बदल्यात बनावट नोटा देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
💁♂️ मिळलेल्या माहितीनुसार सध्या याप्रकरणी 6 जणांना ताब्यात घेतले आहे. सर्वजण मुंबई येथील रहिवासी आहेत.
💰 दरम्यान आरोपीकडून 7 कोटी 60 लाखांच्या बनावट नोटा आणि 2 लाख 80 हजारांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.
👮 पुणे पोलिसांचे खंडणी विरोधी पथक आणि भारतीय लष्कराने संयुक्त कारवाई केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
letsupapp.page.link
LetsUpp App
LetsUpp is an Infotainment Platform to keep you updated with Hyperlocal updates on Verified News, Entertainment, Motivation, Lifestyle & much more.
*दोन बाधित स्त्रियांची प्रसुती; बाळं लक्षणे विरहीत*
*letsup | satara*
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधरण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या जावली तालुक्यातील गावडी येथील कोरोना बाधित 26 वर्षीय गरोदर महिलेची प्रसुती 30 मे 2020 रोजी झाली
असून बाळ व आई सुखरुप असून बाळाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आज तिला डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधरण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या माण तालुक्यातील बनवडी येथील कोरोना बाधित 25 वर्षीय गरोदर महिलेची 10 जून 2020 रोजी सकाळी सुरक्षित प्रसुती झाली आहे.
बाळ व आई सुखरुप असून बाळ लक्षणे विरहीत आहे. डॉ. सुनिल एम. सोनवणे, स्त्री रोग तज्ञ वर्ग-1 व विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु आहेत.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
*letsup | satara*
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधरण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या जावली तालुक्यातील गावडी येथील कोरोना बाधित 26 वर्षीय गरोदर महिलेची प्रसुती 30 मे 2020 रोजी झाली
असून बाळ व आई सुखरुप असून बाळाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आज तिला डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधरण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या माण तालुक्यातील बनवडी येथील कोरोना बाधित 25 वर्षीय गरोदर महिलेची 10 जून 2020 रोजी सकाळी सुरक्षित प्रसुती झाली आहे.
बाळ व आई सुखरुप असून बाळ लक्षणे विरहीत आहे. डॉ. सुनिल एम. सोनवणे, स्त्री रोग तज्ञ वर्ग-1 व विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु आहेत.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
letsupapp.page.link
LetsUpp App
LetsUpp is an Infotainment Platform to keep you updated with Hyperlocal updates on Verified News, Entertainment, Motivation, Lifestyle & much more.
🙏 *जिवापेक्षा काहीच मौल्यवान नाही!*
😷 मास्क वापरा, स्वतःला कोरोनापासून सुरक्षित ठेवा.
👌 *अमेझॉनची दमदार ऑफर*
🎨 मल्टि-कलर रीयुजेबल कॉटन मास्क
👍 *3 पिसेस फक्त ~599~ 499 रुपयांत*
🛒 *अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा* 👉 : https://amzn.to/306TJsU

💥 *अखेर महाराष्ट्रात मान्सून दाखल*
*LetsUp | Update*
💫 महाराष्ट्रात अखेर मान्सून दाखल झाला असून सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या भागांमध्ये मान्सून सक्रिय झाला असल्याची माहिती वेधशाळेकडून देण्यात आली.
✨ मान्सूनने कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात प्रगती केल्याचे चित्र असून कोकणातील हर्णे, सोलापूरपर्यंत मजल मारली आहे.
📍 तसेच संपूर्ण गोवा, कर्नाटक राज्यदेखील व्यापले असून अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून सक्रिय झाला आहे.
📌 दरम्यान, मान्सूनने गोवा आणि कोकण किनारपट्टी व्यापली असल्याची माहिती गोवा वेधशाळेकडून देण्यात आली आहे.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
*LetsUp | Update*
💫 महाराष्ट्रात अखेर मान्सून दाखल झाला असून सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या भागांमध्ये मान्सून सक्रिय झाला असल्याची माहिती वेधशाळेकडून देण्यात आली.
✨ मान्सूनने कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात प्रगती केल्याचे चित्र असून कोकणातील हर्णे, सोलापूरपर्यंत मजल मारली आहे.
📍 तसेच संपूर्ण गोवा, कर्नाटक राज्यदेखील व्यापले असून अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून सक्रिय झाला आहे.
📌 दरम्यान, मान्सूनने गोवा आणि कोकण किनारपट्टी व्यापली असल्याची माहिती गोवा वेधशाळेकडून देण्यात आली आहे.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
letsupapp.page.link
LetsUpp App
LetsUpp is an Infotainment Platform to keep you updated with Hyperlocal updates on Verified News, Entertainment, Motivation, Lifestyle & much more.
💥 *मृत व्यक्तींचे नातेवाईक मृतदेह नेण्यास येईना*
*LetsUp | Corona Live*
💫 मुंबईतील केईएम रुग्णालयात सात कोरोनाबाधितांचे सात मृतदेह पडले असून या रुग्णांचे नातेवाईक मृतदेहांचा ताबा घेण्यासाठी येत नसल्याची माहिती समोर आली आहे.
⚡ तसेच नातेवाईकांशी संपर्क होत नसल्याने मृतदेह रुग्णालयात पडून आहेत. सातपैकी एका मृतदेहाला तीन आठवडे झाले असून इतर मृतदेह नजीकच्या काळातील आहेत.
👉 कोरोनाबाधितांचे मृतदेह नेण्यासाठी त्यांचे नातेवाईक न आल्यास काय करायचे याबाबत ८ मे रोजी पार पडलेल्या गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली होती.
📍 पोलिसांच्या परवानगीशिवाय तसेच कायद्याचे उल्लंघन करून मृतदेहाच्या विल्हेवाटीबाबत महापालिका काहीही करू शकत नाही.
📌 दरम्यान, कोविड मार्गदर्शक तत्वानुसार महापालिका आयुक्त चहल पोलीस आयुक्तांशी चर्चा करून मार्ग काढणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर दिली.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
*LetsUp | Corona Live*
💫 मुंबईतील केईएम रुग्णालयात सात कोरोनाबाधितांचे सात मृतदेह पडले असून या रुग्णांचे नातेवाईक मृतदेहांचा ताबा घेण्यासाठी येत नसल्याची माहिती समोर आली आहे.
⚡ तसेच नातेवाईकांशी संपर्क होत नसल्याने मृतदेह रुग्णालयात पडून आहेत. सातपैकी एका मृतदेहाला तीन आठवडे झाले असून इतर मृतदेह नजीकच्या काळातील आहेत.
👉 कोरोनाबाधितांचे मृतदेह नेण्यासाठी त्यांचे नातेवाईक न आल्यास काय करायचे याबाबत ८ मे रोजी पार पडलेल्या गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली होती.
📍 पोलिसांच्या परवानगीशिवाय तसेच कायद्याचे उल्लंघन करून मृतदेहाच्या विल्हेवाटीबाबत महापालिका काहीही करू शकत नाही.
📌 दरम्यान, कोविड मार्गदर्शक तत्वानुसार महापालिका आयुक्त चहल पोलीस आयुक्तांशी चर्चा करून मार्ग काढणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर दिली.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
letsupapp.page.link
LetsUpp App
LetsUpp is an Infotainment Platform to keep you updated with Hyperlocal updates on Verified News, Entertainment, Motivation, Lifestyle & much more.
*LetsUp News Update*
▪ आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थानवेळी 50 लोकांच्या उपस्थितीला राज्य शासनाची परवानगी; महापूजेसाठी मंदिर समितीकडून मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
▪ राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट; स्वीय सहाय्यकासह अन्य कर्मचारीही बाधित असल्याचे समोर, राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मुंडे सहभागी झाले होते
▪ राज्यात दिवसभरात 3 हजार 607 नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या 97 हजार 648 वर पोहचली; दिवसभरात 152 बाधित दगावले
----------------------
*Advertisment On LetsUp*
*Contact* : 7798655655
----------------------
▪ जीएसटी परिषदेची आज 40 वी बैठक; राज्यांना भरपाई व ऑगस्ट 2017 ते जानेवारी 2020 कालावधीत जीएसटी परतावा न भरणाऱ्यांना विलंब शुल्क माफ करण्यावर निर्णय होण्याची शक्यता
▪ छोटय़ा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव फक्त 1 टक्का; भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांची माहिती
▪ राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीत (एनआयआरएफ) सर्वसाधारण आणि विद्यापीठ या दोन्ही गटात महाराष्ट्राला द्वितीय स्थान; सर्वसाधारण गटात राज्यातील 12 संस्था आणि विद्यापीठ गटात 13 संस्था
▪ भारताशी योग्य पद्धतीने सीमाप्रश्न हाताळत असल्याचा चीनचा दावा; दोन्ही देश तणाव कमी करण्यासाठी कारवाई करीत आहेत
▪ ऑटोमोबाइल क्षेत्रातील फोर्ड कंपनीने आपल्या तब्बल 25 लाख सदोष कार माघारी बोलावण्याचा घेतला निर्णय; अमेरिका, कॅनडा व अन्य ठिकाणी विकलेल्या कारचा यात समावेश
▪ भारतीय क्रिकेट संघाचा पुढील महिन्यातील श्रीलंका दौरा कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे स्थगित; आयसीसीची ट्विटद्वारे माहिती
▪ राम गोपाल वर्मा यांनी केली 'गांधी-गोडसे' यांच्यावरील 'द मॅन हू किल गांधी' चित्रपटाची घोषणा; पहिले पोस्टर येताच लोक भडकले

💥 *राज्यात कोरोनाचा आलेख वाढताच!*
*LetsUp l Corona Live*
⚡ राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृतांचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. आज राज्यात दिवसभरात 152 कोरोनाबाधित दगावले असून राज्यात मुंबईत सर्वाधिक 97 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या 3 हजार 590 झाली आहे.
💁🏻♂️ *कोरोनामुक्त* : राज्यात दिवसभरात 3 हजार 607 नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या 97 हजार 648 वर पोहचली आहे. शिवाय दिवसभरात 1 हजार 561 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या 46 हजार 78 झाली आहे.
😷 *मृत्यू* : राज्यात दिवसभरात दगावलेल्या 152 रुग्णांपैकी 97 रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. मिरा-भायंदर येथे 9, कल्याण-डोंबिवली 7, नवी मुंबई 4, वसई-विरार 2, नाशिक 5, औरंगाबाद 6, लातूर 2, पुणे आणि सोलापुर प्रत्येकी 8, रत्नागिरी, हिंगोली, जालना आणि नांदेडमध्ये प्रत्येकी एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
📌 मृत रुग्णांमध्ये 102 पुरुष आणि 50 महिलांचा समावेश आहे. तसेच मृतांपैकी 60 वर्षांवरील 85, 40 ते 59 वयोगटातील 54 आणि 40 वर्षांखालील 13 रुग्णांचा समावेश आहे. मृत रुग्णांपैकी 107 रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आदी आजार होते, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

💥 *सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंसह पाच जणांना कोरोना*
*LetsUp l Update*
⚡ सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह 5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. धनंजय मुंडे यांच्यासह त्यांचा स्वीय सहायक, मुंबईतील वाहन चालक, बीडचा स्वयंपाकी आणि बीडचा वाहनचालक अशा पाच जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
🧐 *विशेष* : मुंबईत आल्यानंतर धनंजय मुंडे आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्वांची कोरोना चाचणी केली होती. याचे रिपोर्ट गुरुवारी रात्री आले. यामध्ये मंत्री धनंजय मुंडेंसह पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. विशेष म्हणजे यापैकी कोणामध्येही कोरोनाची लक्षणं दिसत नव्हती. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मंत्री मुंडे सहभागी झाले होते.
📌 राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेले धनंजय मुंडे हे तिसरे मंत्री आहेत. सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली होती. तेही कोरोनामुक्त झाले आहेत.

⛽ *सहा दिवसांत पेट्रोल 'एवढे' महागले!*
*LetsUp l Update*
⚡ सलग सहाव्या दिवशी पेट्रोल व डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. कोरोनामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला पेट्रोल-डिझेल दरवाढीचा फटका बसत आहे. शुक्रवारी पेट्रोलच्या दरांमध्ये प्रतिलिटर 57 पैशांनी वाढ करण्यात आली तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 59 पैशांची वाढ करण्यात आली आहे.
💥 *इंधन महागले* : दोन्ही इंधनांच्या दरांत गुरुवारी प्रत्येकी 60 पैशांची वाढ केली होती. सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. सहा दिवसांत पेट्रोल 3 रुपये 31 पैशांनी महागले आहे.
🧐 *विरोधाभास* : पेट्रोलच्या दरात सहाव्या दिवशी वाढमुळे मुंबईत आज पेट्रोल प्रतिलिटर 81 रुपये 53 पैसे मिळत आहे तर डिझेल प्रतिलिटर 71 रुपये 48 पैसे झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी कच्या तेलाच्या किंमती घटल्या आहेत. मात्र, भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली दिसत आहे.
👀 इंडियन ऑयलच्या संकेतस्थळानुसार आजचे दर,
पेट्रोल डिजल
*दिल्ली* : 74.57 72.81
*कोलकाता* : 76.48 68.70
*मुंबई* : 81.53 71.74
*चेन्नई* : 78.47 71.14
📌 सलग सहाव्या दिवशी पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.

*वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न*
*LetsUp | Nashik*
नाशिक शहरात वाहनांची तोडफोड करून दहशत माजवन्याचा प्रकार काल मध्यरात्री घडला आहे. देवळाली गाव परिसरातील सुंदर नगर भागात गावगुंडांनी हैदोस घालत वाहनांची तोडफोड केली आहे.
उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुंदर नगर भागातल्या झोपडपट्टीत कुमावत आणि घोरपडे या दोन कुटुंबात वाद झाले. या वादाचे पर्यवसान घोरपडे कुटुंबीयांनी दहशती मध्ये केले आहे.
कुमावत कुटुंबासह परिसरात गाड्यांची आणि घरांची तोडफोड करून मारुती घोरपडे याच्यासह अन्य 12 साथीदारांनी सुंदर नगर भागात घरघुती वादातून कोयता लोखंडी रॉड घेऊन गाड्यांची तोडफोड केली आहे.
या घरांच्या तोडफोडित कुमावत कुटुंबातील एका लहान मुलाच्या हातावर वार झाल्याने तो जखमी आहे. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी एकूण 13 जणांवर गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत पोलिसांनी मुख्य आरोपी मारुती घोरपडे याच्यासह 3 जण आणि आईला ताब्यात घेतले आहे.
या तोडफोड प्रकरणातील मुख्य आरोपी मारुती घोरपडे हा अल्पवयीन असून सुधा याआधी त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले यांनी दिली आहे.
सुंदर नगर भागात झालेल्या या तोडफोडीत अनेक वाहनांचे नुकसान झाले असून 13 पैकी 5 आरोपी ताब्यात असून उर्वरित 8 आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.