LetsUpp Marathi
4.86K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
💥 *...अखेर 'निसर्ग' वादळ धडकले*

*LetsUp | Update*

💫 पूर्व मध्य अरबी समुद्रात तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ अखेर महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकले असून मुंबईसह कोकण किनारपट्टीवर हे वादळ धडकले आहे.

⚡ या वादळामुळे मुंबईसह उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला असून पुढील सहा तास या वादळाचा प्रभाव कायम राहणार आहे.

📍 आज दुपारी रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग जवळून ताशी 100-110 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर धडकले आहे.

📌 दरम्यान, उत्तर पूर्व अरबी समुद्र आणि दक्षिण गुजरात किनाऱ्यावर समुद्र खवळलेला असून 1 ते 2 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
🗞️ *आज दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी*

▪️ भारतात कोरोना बाधितांची संख्या पोहोचली तब्बल दोन लाखांवर; तर अत्तापर्यंत 5 हजार 739 जणांचा कोरोनाने मृत्यू

▪️ निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात NDRF च्या 21 तुकड्या तैनात; तर एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविल्याची एनडीआरएफची माहिती

▪️ पुलवामात जैशच्या ३ दहशतवाद्यांना कंठस्थान; खबरदारीचा उपाय म्हणून लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरु

▪️ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; G 7 देशांच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी भारताला निमंत्रण

▪️ निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरात थांबावे, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आवाहन

▪️ पुढील सहा तासांत निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता कमी होणार; भारतीय हवामान विभागाची माहिती

▪️ घरातून बाहेर पडू नका, सरकारच्या सूचनांचं पालन करा; खासदार सुप्रिया सुळे यांचे जनतेला आवाहन

▪️ सॅमसंग कंपनीचा Galaxy A31 हा स्मार्टफोन भारतात 4 जूनला ऑनलाईन पद्धतीने होणार लाँच

▪️ लॉकडाऊनमुळे बंद पडलेल्या आतंरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन; ईसीबीकडून विंडीजविरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर

▪️ 2020 हे वर्ष निराशाजनक; घाबरु नका, संकटाचा सामना करा; अभिनेता अक्षय कुमारचे नागरिकांना आवाहन

📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
💥 *कोरोना; आयसीएमआरची दिलासादायक माहिती...*

*LetsUp | Corona Live*

✨ देशातील कोरोनाबाधितांची संख्या 2 लाखांवर पोहोचली असून केवळ 15 दिवसांतच हा आकडा एक लाखांवरून दोन लाखांवर गेला आहे.

⚡ तर तब्बल पाच हजारांहून अधिक लोकांना आपली जीव गमवावा लागला असल्याची माहिती इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) दिली आहे.

✨ ICMR ने देशामध्ये कोरोना व्हायरस पीक सीझन (Peak) देशात येण्यासाठी अद्याप बराच काळ आहे असे म्हटले आहे.

📍 कोरोनाच्या प्रकरणांमध्ये रोज 8000 हजार नवीन रुग्णांची नोंद होत असून भारतात कोरोनाचा पीक सीझन आल्याचे मानले जात होते.

📌 मात्र (ICMR )च्या संशोधक डॉ. निवेदिता गुप्ता यांनी भारत कोरोनाच्या पीकपासून खूप दूर असल्याचे स्पष्ट केले आहे.

📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
💥 *गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीत स्फोट; पाच जणांचा मृत्यू*

*LetsUp | National*

⚡ गुजरातमधल्या भरूच जिल्ह्यातील एक केमिकल फॅक्टरीत स्फोट झाला आहे.

🏭 भरूचमधल्या दाहेज औद्योगिक क्षेत्रात एका फॅक्टरीत स्फोट झाल्यानंतर तिथं भीषण आग लागली आहे. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला असून, 32 जण जखमी आहे.

💁‍♂️ या स्फोटात अनेक कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, जखमींची संख्या जवळपास 32 च्या आसपास सांगितली जात आहे.

📍 या केमिकल फॅक्टरीत स्फोट कशामुळे झाला, याची कारणं अद्याप अस्पष्ट आहेत.

🏥 दरम्यान; जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या 15 गाड्यांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
😱 *​तीन दिवसांत 651 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू*

*LetsUp | Corona Live*

⚡ देशातील कोरोनग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने 2 लाखाचा टप्पा पार केला आहे.

🏠 गेल्या एका दिवसात 4 हजार 776 नागरिकांना विविध रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

💁‍♂️ तर, गेल्या तीन दिवसांमध्ये देशभरातील 651 जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.

🧐 सध्या देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 7 हजार 615 झाली आहे. यातील 1 लाख 303 नागरिकांनी कोरोनावर मात मिळवली आहे.

📍 तर, 1 लाख 1 हजार 497 कोरोनाग्रस्तांवर विविध रूग्णालयात उपचार सुरु आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंत देशातील 5 हजार 815 नागरिकांचा बळी घेतला आहे.

📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
🗞️ *LetsUp News Update*

▪ भारतातील कोरोना बाधितांची संख्या 2 लाख 7 हजार 615 वर पोहचली; मागील 24 तासांत 8 हजार 909 नव्या रुग्णांची भर

▪ भारत सरकारकडून व्हिसा, प्रवास निर्बंधामध्ये शिथिलता; परदेशातील व्यावसायिक, आरोग्यसेवा कर्मचारी, तंत्रज्ञ व इतर तज्ञांना देशात प्रवासाची परवानगी

▪ फटाकेयुक्त अननस खायला दिल्याने हत्तीणीचा मृत्यू, दोषींची माहिती देणाऱ्यांना 50 हजारांचं बक्षिस

----------------------
*Advertisment On LetsUp*
*Contact* : 7798655655
----------------------

▪ अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळयाची विटंबना; युनायटेड स्टेटस पार्क पोलिसांकडून तपास सुरु.

▪ राज्यात तब्बल 2 हजार 500 हून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून राज्यातील विविध रुग्णालयांत 1 हजार 526 पोलिसांवर उपचार सुरु

▪ राज्यात रुग्णवाढीचा दर 7 वरून 4.15 टक्क्यांवर, आतापर्यंत 32 हजार 329 रुग्ण झाले कोरोनामुक्त

▪ निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यातून महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले आभार

▪ रतीय संघाची माजी कर्णधार व अव्वल हॉकीपटू राणी रामपाल हिची देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वात मानाच्या खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

▪ Mitron App नंतर आता Remove China App ही Google Play Store वर करतंय हकालपट्टीचा सामना

▪ लॉकडाऊन परिणाम; अभिनेता कार्तिक आर्यन-कियाराचा "भूलभुलैया 2' सिनेमा झाला पोस्टपॉंड

📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
🌾 *शेतकऱ्यांसाठी खुशखबर; आता देशभरात कुठेही माल विकता येणार*

*LetsUp | Update*

😍 शेतकऱ्यांना आपला माल आता देशभरात कुठेही विकता येणार आहे.

💁‍♂️ शेतकरी आणि ग्राहक यांच्यात असलेला दलालही व्यवहारातून बाद करण्यात आला असून शेतकऱ्यांना ई-ट्रेडिंगच्या माध्यमातून खरेदी विक्री करण्याची मुभा मिळणार आहे.

👍 शेतकरी आणि व्यापारी अगोदरच करार करून शेतमालाचा किमान भाव ठरवतील आणि पीक आल्यानंतर भाव जास्त मिळाल्यास व्यापाऱ्याचा फायद्यातून शेतकऱ्याला ही त्याचा हिस्सा मिळेल.

📍 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी विशेष बैठक झाली. या बैठकीत शेतीविषयक महत्वाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

🗣️ त्याच बरोबर साठ वर्षांपूर्वीच्या जीवनावश्यक वस्तू कायद्यातही बदल करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
😡 *अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळयाची विटंबना*

*LetsUp | International*

⚡ अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळयाची विटंबना करण्यात आली आहे.

💁‍♂️ जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सध्या सर्वत्र हिंसक आंदोलने सुरु आहेत. या हिंसाचारादरम्यान ही घटना घडली.

🏛️ वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दुतावासाबाहेर महात्मा गांधींचा पुतळा आहे. काही असामाजिक तत्वांकडून या पुतळयाची विटंबना करण्यात आली आहे.

🔎 युनायटेड स्टेटस पार्क पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे.

📍 जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर फक्त अमेरिकेतच नव्हे तर जगभरात निदर्शनांच्या माध्यमातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
🎯 पावसाळ्यात चेहरा चिकट होतोय? 'हे' उपाय करा!

Letsup I Tips & Tricks

पावसाळ्यात सतत वातावरण बदल होत असल्याने अनेकदा चेहऱ्यावर चिकटपणा तयार होतो. त्यामुळे या काळात विशेषतः त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागते.

अशात तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आणि चिकटपणापासून मुक्ती हवी असल्यास घरगुती फेसपॅकचा प्रयोग करा. आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती सांगणार आहोत.

कोणत्याही खर्चाशिवाय घरी 'खालील' फेसपॅक बनवू शकता.

1) बेसन, मध आणि ग्रीन टी : यासाठी 1 चमचा बेसनासोबत 1 मोठा चमचा मध आणि थोडीशी ग्रीन टी मिसळा. हे एकत्रित मिसळून चेहऱ्यावर 20 ते 30 मिनिटांपर्यंत लावून नंतर धुवून टाका.

2) काकडी, गुलाब पाणी आणि ग्रीन टी : यासाठी गुलाब पाणी, काकडीचा रस आणि ग्री टी मिसळा. हा पॅक लावल्याने चेहऱ्याला आराम मिळतो.

3) बटाटा, लिंबू आणि गुलाब पाणी : यासाठी बटाटाच्या रसात 2 छोटे चमचे लिंबाचा रस आणि गुलाब पाणी मिसळा. हा पॅक 30 मिनिटांपर्यंत लावून धुवून टाका. याने मुरुमांच्या समस्या दूर होतील.

4) डाळींबाचे दाणे, मध आणि ताक : यासाठी 2 चमचे डाळींबाचे दाणे, 2 चमचे मध आणि थोडे ताक मिसळून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून थंड पाण्याने धुवा. याने पावसाळ्यात त्वचा ड्राय होणार नाही.

📚 वाचण्यासारखं बरंच काही एकाच ठिकाणी, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
🧐 'कोरोनाऐवजी अर्थव्यवस्थेचा आलेखच खाली आणला'

LetsUp l Ahmednagar

⚡ काही दिवसांपासून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे भारतातील अनेक तज्ज्ञ व्यक्ती आणि उद्योगपतींशी संवाद साधत आहे. दरम्यान, गुरूवारी त्यांनी देशातील उद्योगपती आणि बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांच्याशी संवाद साधला.

💁🏻‍♂️ या चर्चेदरम्यान बजाज यांनी देशात लागू केलेल्या लॉकडाउनवरही टीका केली. “तुम्ही कोरोनाऐवजी अर्थव्यवस्थेचाच आलेख खाली आणला,” असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

🗣️ बजाज म्हणाले : “भारताने शेजाऱ्यांकडून शिकण्याऐवजी पाश्चिमात्यांचे अनुकरण केले. त्यांची भौगोलिक स्थिती, अन्य परिस्थिती आणि तापमान यांसारख्या गोष्टी वेगळ्या आहेत. आपण कठोर लॉकडाउन लागू करण्याचा प्रयत्न केला. मात्र तसे करता आले नाही. मात्र यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. कोरोनाच्या आलेखाऐवजी अर्थव्यवस्थेचाच आलेख खाली आला,” असे म्हणत बजाज यांनी केंद्र सरकारवरच निशाणा साधला.

📌 “भारताला जपान किंवा स्वीडनप्रमाणे पाऊल उचलणे अपेक्षित होते. ते हर्ड इम्युनिटीच्या मार्गावर पुढे गेले. याचा अर्थ असा नाही की त्यांनी ज्या लोकांना कोरोनाचा धोका अधिक होता त्यांना मरण्यासाठी सोडून दिले. याचा अर्थ असा आहे की सॅनिटायझेशन, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे असा होता. आपल्याकडे दुर्देवाने पूर्ण लॉकडाउन राबवलाच गेला नाही,” असाही टोला त्यांनी लगावला.

📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
💥 चीनच्या दिशेने वळवली बोफोर्सची तोंडं...

LetsUp | Update

💫 भारताने आपल्या बोफोर्स आर्टिलरी तोफांची तोंडंही चीनच्या दिशेने वळवली असून लडाखजवळील लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल जवळ (LAC) धावपट्टी तयार करण्याच्या कामास अधिक गती दिली आहे.

⚡ ही धावपट्टी तयार झाल्यास भारताची लढाऊ विमाने ड्रॅगनच्या नाकाखाली उतरतील आणि नाकाखालूनच उडणार आहेत.

✨ अनंतनागजवळ NH-४४ वर इमरजंसी धावपट्टीचे काम सुरू असून सदरील ठिकाणी लढाऊ आणि इतर विमाने उतरवणे सहज शक्य व्हावे यासाठी धावपट्टी तयार करण्यात येत आहे.

📌 भारत-चीन तणावा दरम्यान दोन्ही देशांच्या लष्करांची 6 जून रोजी ही बैठक आयोजित केली असून या बैठकीत दोन्ही देशांच्या सैन्याचे अधिकारी भाग घेतील.

📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp\
🧐 देशात 24 तासात 9851 नवे 'कोरोना' पॉझिटिव्ह

LetsUp | Corona Live

⚡ देशातील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला असून दिवसेंदिवस अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत़

😷 गेल्या 24 तासात देशभरात सर्वाधिक उच्चांकी 9 हजार 851 नवीन रुग्ण आढळून आले आहेत़, तर सर्वाधिक 273 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

💁‍♂️ देशभरातील आतापर्यंत एकूण 2 लाख 26 हजार 770 कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली आहे. या एकूण रुग्णांपैकी 1 लाख 10 हजार 960 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

😰 गेल्या 24 तासात देशात सर्वाधिक 273 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. आतापर्यंत देशात 6 हजार 348 जणांचा मृत्यु झाला आहे.

📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
💁‍♂️ *अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कोरोनाची लागण*

*LetsUp | International*

⚡ कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कोरोना झाला आहे. या घटनेनंतर दाऊदचे सुरक्षारक्षक व इतर कर्मचारी यांना क्वारंटाईन करण्यात आले आहेत.

🏥 दाऊदची पत्नी महजबीनही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. त्याला आणि त्याच्या पत्नीला कराचीच्या मिलिटरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

😷 पाकिस्तानच्या कराचीमध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. मात्र, पाकिस्तानकडून वारंवार या गोष्टीला नकार दिला जात आहे.

📍 सूत्रांच्या माहितीनुसार ही बातमी पूर्णपणे सत्य आहे आणि दाऊद आणि त्याची पत्नी यांना मिलिटरी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
🧐 *कोरोनाबाधितांच्या संख्येत आता भारत इटलीच्याही पुढे*

*LetsUp | Corona Live*

👉 भारतात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासात सर्वात जास्त नवीन प्रकरणं आणि सर्वाधिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

👉 आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या नव्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 9887 नवीन प्रकरणं समोर आली असून एकूण 294 रुग्णांचा मृत्यू झाला.

👉 भारतात आता 2 लाख 36 हजार 657 एकूण कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 6642 लोकांचा मृत्यू झाला आहे.

👉 भारतानं कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येत आता इटलीला मागे टाकलं आहे.

👉 भारतानं इटलीला मागे टाकत जगभरातील कोरोनाबाधितांमध्ये भारत आता सहाव्या क्रमांकावर आहे.

👉 भारताआधी अमेरिका, ब्राझील, रशिया, स्पेन आणि ब्रिटन यांचा क्रमांक लागतो.

👉 इटलीमध्ये 2 लाख 34 हजार कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर, 33 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
💥 *केजमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी*

*LetsUp l Beed*

केज : कोयता, तलवारीचा वापर करत केजमध्ये पारधी समाजाच्या दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये काही जण जखमी झाले असून केज पोलिसात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, दि. 4 जून रोजी केज येथील मुख्य रस्त्यालगत सायंकाळी 5 सुमारास पूर्वीचे जुने भांडण आपआपसात मिटविण्याच्या कारणावरून पारधी समाजाची बैठक बोलावली होती. त्यात हेव्यादाव्यावरून त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. यात चार दुचाकीचे देखील नुकसान झाले आहे. भांडणात दगड, काठी, कोयता व तलवारीने मारहाण झाल्याच्या परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.

बापू बाबू काळे रा. केज यांच्या फिर्यादी नुसार राजाराम अच्युत काळे, बबलू अच्युत काळे, सुरेश बंकट काळे, लालू अच्युत काळे, रा बजरंग नगर केज आणि गंगाराम बापू पवार, गणेश पोपट चव्हाण, रवींद्र शामराव काळे व पापा बंकट पवार अशा दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे हे तपास करीत आहेत.

तर पापा बंकट पवार रा.शिवाजी चौक, दूध डेअरी जवळ कळंब यांच्या फिर्यादी खंडू बापू काळे, बापू बाबू काळे, सुरेश बाबू काळे, दीपक खंडू काळे, आकाश बापू काळे, बालाजी खंडू काळे, राजू छमु पवार, राहुल उत्तम शिंदे, शिवा बाबू शिंदे या दहा जणांच्या विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउपनि महादेव गुजर हे तपास करीत आहेत.

🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
🧐 'या' तारखेनंतर देशात शाळा, महाविद्यालये सुरू होतील

LetsUp | National

⚡ येत्या 15 ऑगस्टपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न असून त्यानंतर म्हणजे 15 ऑगस्टनंतर देशातील शाळा, महाविद्यालये सुरू होतील, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी स्पष्ट केले आहे.

💁‍♂️ देशात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाल्यापासून संपूर्ण देशभरातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून बहुतांश वर्गांच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत.

🏣 दरम्यान, आता जून महिन्याला सुरुवात झाल्याने शाळा, महाविद्यालये सुरू होणार की नाही याबाबत विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

📣 या पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी देशातील शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याबाबत मोठी घोषणा केली आहे.

📍 रमेश पोखरियाल निशंक यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, देशातील शाळा आणि महाविद्यालये ऑगस्टनंतर पुन्हा सुरू करण्यात येतील.

👌 माहितीचा विश्वासार्ह स्रोत एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
🤰 गर्भवतींना संसर्ग होऊ नये म्हणून...

LetsUp I Health

कोरोनाने सर्वांनाच हैराण करून सोडले आहे. विशेषतः या काळात गर्भवती स्त्रीला याचा संसर्ग होऊ नये म्हणून जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी खालील गोष्टी तुम्हाला मदत करतील.

● बाहेरून आल्यावर, जेवणाच्या आधी आणि शिंका आल्यानंतर आणि नाक शिंकारल्यानंतर हात स्वच्छ धुवा.

● अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझर जवळ ठेवा. जशी गरज पडेल तसा वापर करा.

● विशेषतः जे लोक आजारी आहेत त्यांच्याशी शक्य असेल तेवढा संपर्क टाळा.

● डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे शक्यतोवर टाळा.

● सोशल डिस्टंसिंग नियमितपणे पाळा.

● कुठलेही लक्षण सौम्य प्रमाणात जरी जाणवले तरी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी लेट्सअप घेत नाही.

📚 वाचण्यासारखं बरंच काही एकाच ठिकाणी, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
💥 जिल्ह्यात 2 कोरोना पॉझिटिव्ह

LetsUp l Ahmednagar

मुंबईहून संगमनेर येथे आलेल्या 40 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने बाधा झाली आहे, आणि वाशी, मुंबईहून आलेल्या मिरी रोड शेवगाव येथे आलेल्या 22 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.

संगमनेर येथील खासगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या 3 रुग्णांचा जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्येत समावेश केला आहे. नव्या दोन रुग्णामुळे एकूण रुग्णसंख्या 217 झाली आहे.

🎯 आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
🐍 'या' सापाची किंमत ऐकून व्हाल थक्क!

LetsUp l Trending

⚡ आपल्याकडे सापाची कुणी खरेदी करण्याचा विचार करू शकत नाही. मात्र औषधी उपयोग, अंधश्रद्धा या व अश्या अनेक कारणांनी साप खरेदी करतात, किंवा सर्पप्रेमी साप खरेदी करतात.

💁🏻‍♂️ अजगर : अंधश्रद्धेपोटी नाही तरी फक्त आकर्षक रंगामुळे बक्कळ पैसे मोजून खरेदी केला जाणारा एक साप आहे. जगात हा सर्वात महाग साप असून त्याचे नाव आहे 'ग्रीन ट्री पायथन', म्हणजे प्रत्यक्षात हा अजगर म्हणता येईल.

🧐 दुर्मिळ : या सापाचा रंग नावाप्रमाणे हिरवा असतो, मात्र त्यात खूप शेड असतात, याच जातीचा एक निळा सापही आहे मात्र तो दुर्मिळ आणि म्हणून अधिक महाग आहे.

💸 किंमत : या सापाच्या किंमतीत एक मोठे घर, छोटे जहाज सहज खरेदी करता येऊ शकते, कारण ग्रीन ट्री पायथनची किंमत लाखात नाही तर करोडोमध्ये आहे. चार लाख डॉलर्स किंवा त्याहून अधिक किंमत या सापाला मिळते.

👉🏻 येथे आढळतात : ग्रीन ट्री पायथन हे त्यांच्या आयुष्यातील 90 टक्के आयुष्य झाडावर घालवितात. इंडोनेशियन बेटे, न्यू गिनिया, न्यू गिनी व ऑस्ट्रेलियामध्ये ते आढळतात.

📌 या सापाची लांबी साधारण 2 मीटर तर वजन दीड किलोच्या आसपास असते. मादी लांबीला थोडी अधिक व वजनाला थोडी जास्त असते. हे साप साधारण 20 वर्ष जगतात.

📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
🧐 *जिल्ह्याचा आपत्ती निवारण कृती आराखडा तयार*

*LetsUp l Nashik*

गेल्यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जिल्हा प्रशासनाला मोठ्या आपत्तीला सामोरं जावं लागलं होतं मात्र यंदा मागील वर्षासारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी जिल्हा प्रशासन आतापासूनच कामाला लागले आहे.

त्यासाठीचा निवारण कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तयार करण्यात आला आहे. गंगापूर धरणात मागील वर्षी पेक्षा अधिक पटीने पाणीसाठा तसाच आहे. त्यामुळे गंगापूर धरणाच्या परीक्षेत्रामध्ये जास्त पाऊस झाल्यास नाशिक शहर तसेच सायखेडा चांदोरी या गावांना पुराचा फटका बसू शकतो.

दरम्यान नाशिक शहरापेक्षा चांदोरी सायखेडा या गावांना या पुराच्या पाण्याचा फटका अधिक तीव्रतेने बसतो. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपत्ती निवारण खरं कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

तसेच या संबंधीच्या सर्व जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहे. एकूणच पावसाळा सुरू होताच कुठलीही ही आपत्ती या पावसाच्या पाण्यामुळे होऊ नये यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.

🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp
*पतीकडून पत्नीला स्टूलने मारहाण*

*LetsUp | Pune*

आज काल भांडणाला कोणतेही कारण लागत नाही. असाच एक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. मोबाईल रिचार्ज करण्यावरुन झालेल्या वादात पतीने पत्नीला लाकडी स्टुलने मारहाण करण्यात आल्याची घटना भवानी पेठे मध्ये घडली आहे. याप्रकरणी पतीविरुध्द खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रियाज फयाज खान(47) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पती-पत्नीमध्ये मोबाईल रिचार्ज करण्यावरुन वाद झाला होता. यावेळी रागाच्या भरात रियाजने लाकडी स्टुल उचलून पत्नीला मारला. पत्नीने स्टुल वाचविण्याकरीता दोन्ही हात आडवे धरले होते. यावेळी रियाजने दोन ते तीन वेळा तीच्या हातावर स्टुलने मारहाण केली. यामध्ये तीच्या दोन्ही हाताला इजा झाली असून एक हात फ्रॅक्‍चर झाला आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सावंत करत आहेत.

🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp